#तू म्हणालास...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
18 May 2021 - 9:28 am

तू म्हणालास, पाऊस मला मुळी सुद्धा आवडत नाही.
चिखल ओला सगळीकडे, एक काम होत नाही.

ऐकून इकडे माझ्या डोळ्यात काळे ढग जमून आले.
बरसणार होतेच पण मी निग्रहाने घालवून दिले.

पाऊस म्हणजे वेडेपणा, खूप मस्ती तुझ्या कुशीत,
पाऊस म्हणजे कटींग चहा अर्धा कप अर्धा बशीत.

पाऊस म्हणजे चिंब मी, थोडी धीट थोडी भित्री.
पाऊस म्हणजे आशिकीच्या पोस्टरवरची मोठ्ठी छत्री

पण तुझ्यासारखं असं कुणी पावसावरती रुसतं का?
भिजणं बिजणं सोडून कोरडं पावसात घरी बसतं का?

तेव्हापासून रागावून मी एक्कही मेसेज केला नाही
वाटलं तुझा येईल .. वाट पाहिली ....आला नाही.
....
आज पुन्हा अवेळीच पाऊस वेडा बरसत आहे.
आज पुन्हा मोबाईलवर तुझा नंबर शोधत आहे..

भावकविताकवितामुक्तक

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2021 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला पाऊस. आशय तर थेट पोहचला. काल आभाळ भरून आल्यावर अशाच आठवणींचे ढग धावत होते. क्लास माहोल होता. आणि ही कविताही तितकीच आवडली.

उसकी यादें कांच के टुकड़े
और मेरा ईश्क नंगे पैर...!

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

18 May 2021 - 12:44 pm | प्रचेतस

अहाहा...!
क्लास, सुरेख रचना.

Bhakti's picture

18 May 2021 - 1:01 pm | Bhakti

छानच!
वातावरणच भारीये सध्या
मलापण काल तुझ्याकडे येणारी वादळवाट/वारा प्यायलेली मुलगी अशा काही कविता सुचत होत्या ;)

प्रज्ञादीप's picture

18 May 2021 - 3:11 pm | प्रज्ञादीप

पाउस न आवडणारा माणुस विरळाच ...बाकी कविता छान

टवाळ कार्टा's picture

18 May 2021 - 3:16 pm | टवाळ कार्टा

भारीये

आगाऊ म्हादया......'s picture

18 May 2021 - 6:41 pm | आगाऊ म्हादया......

माणूस मीच आहे जणू. खरंच मला पाऊस आवडत नाही.

ओलं, चिखल, न संपणारी सर्दी वगैरे ह्या मुद्द्यांशिवाय,

आतून जे काही हिरवे कोंब फुटू पाहतात, हॉर्मोन्स जो नाच करतात ह्या वातावरणात त्यांच्यामुळे पुढे एखादं पाऊल घसरण्याची भिती जास्त वाटते.
मेंदू कडून निर्णयक्षमता मनाकडे सरकू लागते.

कविता मस्त जमलीय, आधीचं मी का लिहिलं? कुणास ठाऊक.

माहितगार's picture

18 May 2021 - 6:53 pm | माहितगार

:))

कविता वाचून छान हसू आले. डोक्यावर कामाचे दडपण नसेल तर पावसाळी वातावरणासारखे वातावरण नाही. पण कामाचे दडपण असेल तर पावसाळी हवा केव्हा एकदा संपते आणि नेहमी पाऊस पडतो त्या चेरापुंजी का काय तिथले लोक कसे काम करत असतील असा प्रश्न पडतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपववून झाल्यावर पावसाळा सिझन मस्त असला तरी काम असतेच असते :)

प्रसाद गोडबोले's picture

18 May 2021 - 7:10 pm | प्रसाद गोडबोले

उत्तम !

विषय छन आहे , कविता उत्तम आहे , पण अजुन जास्त रोम्यँटिक करता आली असती .

अवांतर : बाकी आजकाल वृत्तबध्द कविता आणि गझल येत नसल्याने अन मुक्तछंदाचे विडंबन करण्यात मजा नसल्याने मिपावरील कुशल विडंबकांची कुचंबणा होत आहे हे जाताजाता नमूद करु इछितो . :)

उपयोजक's picture

19 May 2021 - 2:52 pm | उपयोजक

लिहित रहा. पुकशु

तुषार काळभोर's picture

21 May 2021 - 8:03 am | तुषार काळभोर

पण मला ती आवडते. आणि तिला आवडतो म्हणून आताशा मलाही पाऊस आवडायला लागलाय.

खिचडी

- महाबळेश्वरच्या पावसाळी वातावरणाचा फॅन

संजय पाटिल's picture

21 May 2021 - 10:36 am | संजय पाटिल

बर्‍याच दिवसानंतर एक मस्त कविता वाचायला मिळाली!

गॉडजिला's picture

21 May 2021 - 12:06 pm | गॉडजिला

....

सुरिया's picture

21 May 2021 - 12:35 pm | सुरिया

छान

कंजूस's picture

21 May 2021 - 2:26 pm | कंजूस

कविता कळली.

प्राची अश्विनी's picture

21 May 2021 - 7:33 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद!:)

कर्नलतपस्वी's picture

21 May 2021 - 8:08 pm | कर्नलतपस्वी

पाऊस म्हणजे कादां भजी
गरमा गरम ताजी ताजी........
छान

प्राची अश्विनी's picture

21 Aug 2021 - 1:35 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद!