तू म्हणालास, पाऊस मला मुळी सुद्धा आवडत नाही.
चिखल ओला सगळीकडे, एक काम होत नाही.
ऐकून इकडे माझ्या डोळ्यात काळे ढग जमून आले.
बरसणार होतेच पण मी निग्रहाने घालवून दिले.
पाऊस म्हणजे वेडेपणा, खूप मस्ती तुझ्या कुशीत,
पाऊस म्हणजे कटींग चहा अर्धा कप अर्धा बशीत.
पाऊस म्हणजे चिंब मी, थोडी धीट थोडी भित्री.
पाऊस म्हणजे आशिकीच्या पोस्टरवरची मोठ्ठी छत्री
पण तुझ्यासारखं असं कुणी पावसावरती रुसतं का?
भिजणं बिजणं सोडून कोरडं पावसात घरी बसतं का?
तेव्हापासून रागावून मी एक्कही मेसेज केला नाही
वाटलं तुझा येईल .. वाट पाहिली ....आला नाही.
....
आज पुन्हा अवेळीच पाऊस वेडा बरसत आहे.
आज पुन्हा मोबाईलवर तुझा नंबर शोधत आहे..
काव्यरस
वाचने
11596
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह !
अहाहा...! क्लास, सुरेख रचना.
छानच!
पाउस न आवडणारा माणुस विरळाच .
भारीये
ह्यातील पाऊस न आवडणारा
:))
उत्तम !
छान कविता
मला पाऊस आवडत नाही..
मस्तच...
एकदम गारवाच
छान
बऱ्याच दिवसांनी एक
धन्यवाद!:)
पाऊस म्हणजे......
:):)
In reply to पाऊस म्हणजे...... by कर्नलतपस्वी