लॉकडाऊनच्या काळात OTT वर बऱ्याच सिरीज/चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे, यातला काही कन्टेन्ट दर्जेदार होता तर काही अगदीच टाकाऊ. मला भावलेल्या काही सिरीज आणि चित्रपटांची यादी आणि माहिती थोडक्यात देतोय. तुम्हांला आवडल्या तर नक्की पहा. तुमच्याकडेही अजून काही पाहण्याजोग्या सिरीज आणि चित्रपटांची माहिती असल्यास खाली प्रतिसादामध्ये डकवा म्हणजे एक चांगली यादी होईल.
SCAM 1992: The Harshad Mehta Story - SONY LIV : हर्षद मेहता हे नाव माहिती नाही असं होवूच शकत नाही. भारतात उदारीकरण सुरु होण्याच्या काळात झालेल्या त्याकाळातल्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याविषयीची हि सिरीज. दहा भागांच्या या सिरीज मध्ये शेयर बाजारातल्या अनेक किचकट गोष्टी यात सोप्या पद्धतीने सांगितल्या आहे. प्रतीक गांधी ने हर्षद मेहताची भूमिका मस्त केलीये. सर्वात भारी बोनस म्हणजे रजत कपूर, त्याची भूमिका अगदी थोडी असली तरी त्याचं काम अगदी कडक झालाय.
Modern Love - अमेझॉन प्राईम : न्यूयॉर्क टाईम्स मध्ये मॉडर्न लव नावाचा एक कॉलम यायचा त्यात लोकांना आलेले प्रेमाचे वेगवेगळे अनुभव व्यक्त केलेले असायचे. प्राईमने त्याच कॉलम वर आधारित सिरीज बनवली मॉडर्न लव. प्रेमात आलेले अपयश, चाळीशी पार केलेल्या कपल मधले वादविवाद. चुकलेली डेट, डेटिंग ऍप द्वारे भेटलेलं प्रेम, निशब्द साथ करणारी मैत्री, गे पालकत्व अश्या वेगगेगळ्या विषयांवरच्या ८ स्टोरीज यात सामावलेल्या आहेत. टेलिव्हिजन सिरीज असली तरी यात अने/एना हॅथवे, मॉरीयार्टी वाला अँड्रयू स्कॉट, आपला घरचा देव पटेल सारखे बरेच चांगले कलाकार यात आहेत. अगदी हलकीफुलकी असलेली सिरीज तुमचा मूड एकदम फ्रेश करते.
Eat. Race. Win. -अमेझॉन प्राईम : खाणं आणि खिलवण हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग ते साधं घरच जेवण असो कि टूर डी फ्रांस सारख्या रेस मधल्या स्पर्धकांसाठी बनवलेलं असो ते सारख्याच निगुतीने बनवावं लागतं. इट रेस विन हि Orica-Scott या ऑस्ट्रेलियन प्रो सायकलिंग टिम च्या टूर डि फ्रान्स रेस मधल्या स्पर्धकांसाठी कसं जेवण बनवलं जाते, स्पर्धकांचा परफॉर्मन्स वाढावा यासाठी जेवण बनवतांनाची प्रोसेस यात खूप सुंदरपणे दाखवली आहे.
Putham Pudhu Kaalai अमेझॉन प्राईम : लॉकडाऊन सर्वांसाठीच त्रासदायक होता, त्याचा आपल्या सर्वांच्या मनावर नकळतपणे का होईना पण परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे बऱ्याच काळानंतर कुटुंब एकत्र आली असं म्हणता येईल. प्राईम वर या लॉकडाऊन आणि मानवी नातेसंबंध यावर आधारित वेगवेगळ्या कथा असणारी तामिळ फिल्म रिलीज झाली. विशेष म्हणजे स्व. एस पी बालसुब्रमण्यम यांचं योगदान असलेला हा शेवटचा चित्रपट.
The Crown नेटफ्लिक्स : इंग्लंडची राणी एलिझाबेथ उर्फ आज्जीबाई कोणाला माहिती नाही मी जर चुकीचा नसेल तर सर्वात जास्त काळ इंग्लंडवर राज्य करणारी एलिझाबेथ हिची हि गोष्ट गोष्ट. खरंतर बारकाव्यांसहित एखाद्या राजघराण्याबद्दल ०३ सिझन मध्ये मांडायचं जरा कठीणच काम पण या सिरीज मध्ये अगदी जबदस्त दाखवलं आहे. राजघराण्याच्या प्रथा, डामडौल, लॉर्ड माऊंटबॅटन, विन्स्टन चर्चिल पाहतांना आपण नकळत त्याकाळात जातो.
Rise of Empires: Ottoman नेटफ्लिक्स : कॉन्टॅन्टिनोपलचा पाडाव इतिहासातली महत्वाची घटना. या घटनेवर आधारित नेटफ्लिक्स ची हि मिनी सिरीज आपल्याला श्वास रोखून ठेवायला भाग पाडते. सिरीज फक्त ६ भागांची जरी असली तरी निर्मितीमुल्यांत कुठेही तडजोड केली नाहीये. विशेष म्हणजे याची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तुम्हांला इतिहास आवडत असेल तर नक्की पहा आणि आवडत नसेल तरी पहा कारण त्यातली गुंतागुंत अगदी सरळ करून सांगितली आहे.
प्रतिक्रिया
20 Oct 2020 - 9:09 am | प्रचेतस
नुकतीच नेटफ्लिक्सवर नार्कोस पाहून संपवली. जबरदस्त आहे.
पहिले दोन सीजन पाब्लो एस्कोबार आणि त्याच्या मेंडेलिन कार्टेलवर आधारीत आहेत. तर शेवटचा सीजन काली कार्टेलवर बेतलेला आहे. तुफान आहे सिरिज.
आता नार्कोस मेक्सिको सुरु करेन.
काल डेयरडेव्हिल सुरु केली. पहिला भाग बघून झाला. जबरदस्त आहे.
20 Oct 2020 - 11:20 am | कुमार१
आरॉन (मराठी ) : prime v.
शशांक केतकर, नेहा जोशी
छान कथानक. कोकण ते Paris व्याप्ती.
आई-मुलगा-काका व काकू यांतील भावनिक बंध छान.
20 Oct 2020 - 2:39 pm | भुमन्यु
१. द हेड (हॉटस्टार) - अन्टार्टिका मध्ये घडलेल्या शास्त्रज्ञांच्या हत्याकांडाबद्दल ६ भागांची मालिका
२. द अमेरिकन्स (हॉटस्टार) - शीत युद्ध काळात सोव्हिएत युनियन चे गुप्तहेर १७-१८ वर्षांपासुन अमेरिकेत आहेत, त्यांच्या घरासमोर एक एफ.बी.आय. एजंट रहायला येतो. ८० च्या दशकातला प्लॉट आहे
३. होमलँड (हॉटस्टार) - एका अतिहुशार पण ईमोशनल सी.आय.ए. एजंटची कहाणी
20 Oct 2020 - 2:50 pm | प्रचेतस
होमलँड मस्त आहे एकदम. रियलास्टिक आहे एकदम.
20 Oct 2020 - 3:05 pm | महासंग्राम
वाह वाह आजच डाऊनलोडतो
बाकी शी आय ए एजन्ट वर बर्लिन स्टेशन म्हणून ०३ सिझनची सिरीज पण भारी आहे आपल्याइकडे प्रदर्शित झाली नाही मला टेग्रा वर सापडली होती. ती पण रोचक आहे.
21 Dec 2020 - 12:41 pm | प्रदीप
माझ्या माहितीप्रमाणे ओटीटी स्ट्रीम डाऊनलोडता येत नाही. चूक असेल तर तसे सांगावे.
21 Dec 2020 - 1:37 pm | महासंग्राम
इन ऍप डाउनलोड करून ठेवता येतं, नंतर ऑफलाईन ला पाहता येतं पण ते आपल्या मोबाईलवर, संगणकावर काही प्रयत्न केला नाही
21 Dec 2020 - 4:00 pm | प्रदीप
ह्या अॅपविषयी जरा सविस्तर माहिती द्याल का?
"पण ते आपल्या मोबाईलवर, संगणकावर काही प्रयत्न केला नाही.." हे समजले नाही.
20 Oct 2020 - 3:31 pm | mayu4u
द स्पाय
चेर्नोबिल
अनबिलिवेबल
द एक्स्पान्स
मॅन इन हाय कॅसल
बॉडीगार्ड
एलिमेन्ट्री
20 Oct 2020 - 6:08 pm | शा वि कु
नेटफ्लिक्स-
बोजॅक होर्समन- (६ सिझन)
वाईल्ड वाईल्ड कंट्री-(ओशोच्या ओरेगॉन आश्रमाची डॉक्युमेंटरी)
ब्लॅक मिरर - सायन्स फिक्शन, प्रत्येक एपिसोड वेगळी कथा (५
सिझन, पहिले ४ उत्तम.)
लव, डेथ अँड रोबोट्स- सायन्स फिक्शन, प्रत्येक एपिसोड वेगळी
कथा, वेगळ्या प्रकारच्या ऍनिमेशनमध्ये.
डार्क- टाईम ट्रॅव्हल. (३ सिझन, पहिला सिझन पाहिलाय, आवडला.)
द किंग - हेन्री पाचवा, ब्रिटनच्या राजाची गोष्ट.
कासल्व्हानिया- ऍनिमे सिरीज.
adult swim- रिक अँड मॉर्टी - विक्षिप्त शास्त्रज्ञ रिक सांचेझ आणि त्याचा नातू मॉर्टी स्मिथ यांचे भन्नाट किस्से. (ऍनिमेटेड)
इतर- वेस्टवर्ल्ड (भविष्यातल्या अम्युसमेंट पार्कमधली कथा.)
चर्नोबिल - दोन्ही एचबिओ
एएमसीचे ब्रेकिंग बॅड- कॅन्सरग्रस्त प्रोफेसर एका विद्यार्थ्याला घेऊन मेथेंफेटामाइन बनवू लागतो.
21 Oct 2020 - 8:47 pm | तुषार काळभोर
Modern Love
The Crown
Scam1992
The Head
The American
The Homeland
यांची नोंद घेतली आहे. पहिले तीन कुठे डाऊनलोड मिळाले तर बरं. कदाचित telegram var असतील.
हॉट स्टार मार्च मध्ये घेऊन ठेवलंय. अजुन तानाजी सोडून काही बघितलं नाही. उगाच वायला चाललंय. हेड, अमेरिकन अन होमलँड बघतो आता.
आज अल्ट बालाजी वर देव DD सुरुवात केली, पण दुसरा एपिसोड बघताना पैसे मागितले. कदाचित फुकटात दिवसाला एकच बघता येत असेल. उद्या दुसरा भाग दिसला तर ठीक. नाहीतर तीन महिन्याचे १०० द्यायला हरकत नाही.
22 Oct 2020 - 11:43 am | महासंग्राम
Modern Love
The Crown
Scam199२
आहेत टेग्रा वर, crown तर कैच्याकै जब्राट आहे
अजून एक नवीन सिरीज आली आहे एमिली इन पॅरिस कालच डाऊनलोडली.
2 Nov 2020 - 7:55 am | तुषार काळभोर
मागच्या आठवड्यात पाहिली. रोज एकच तास पाहता येतं, बसमध्ये.
उत्तम सिरीज आहे. खिळवून ठेवते. आपल्याला फक्त हर्षद मेहता ने शेअर बाजारात घोटाळा केला एवढंच माहिती असतं.
पण त्याच्या आधी, त्याच्या पार्श्वभूमी वर कायकाय घडलं याचे बऱ्यापैकी डिटेल्स पाहायला मिळतात.
काही पात्रांसाठी अभिनेत्यांची निवड इतकी झकास आहे की लगेच कळतं की हे कोण पात्र आहे.
आजकाल वेबसिरिज चं व्यवच्छेदक लक्षण असलेले सेक्स, हिंसा वा शिव्यांची लाखोली असलेले संवाद यात येत नाहीत, ही जमेची बाजू. (अपवाद पात्राची गरज म्हणून सतीश कौशिक च्या तोंडी असलेल्या चार सहा शिव्या).
3 Nov 2020 - 12:42 pm | चौथा कोनाडा
+१
21 Oct 2020 - 10:01 pm | वीणा३
नेटफ्लिक्स वरच्या आवडलेल्या मालिका :
१. अम्ब्रेला अकॅडमी - जब्बरदस्त मालिका, टाइम ट्रॅव्हल आणि सुपरहिरो आणि झकास पार्श्वसंगीत. २ सीझन्स आहेत, दोन्ही उत्तम.
२. हाऊस ऑफ कार्ड्स - अमेरिकन राजकारणावर आधारित फिकशन (सत्यकथा नाहीये बहुतेक). मस्त अभिनय आणि संवाद.
३. ऍनिमल प्लॅनेट, डाँसिन्ग विथ बर्डस, द युनिव्हर्स - मस्त चित्रीकरण आणि निवेदन
४. सेक्रेड गेम्स - नवाज आणि अनुराग कश्यप ची मालिका. भरपूर शिव्या, पण पहिला भाग आवडला, धक्कातंत्र छान होत. दुसऱ्या भागात कंटाळा आला.
५. आउटलँडर - नायिका १९ व्य शतकातून १७व्य शतकात जाते. ह्याचा पण पहिला भाग आवडला, दुसऱ्यात कंटाळा आला.
22 Oct 2020 - 11:48 am | महासंग्राम
हाऊस ऑफ कार्ड्स मला पण आवडली होती, पण शेवटचा सिझन गंडला होता केविन स्पेसी नसल्याने. बहुदा अमेरिकेत तशी पद्धतच असावी.
HOC तोडीस तोड म्हणजे डेसिग्नेटेड सर्व्हायवर ती पण अमेरिकन राजकारणावर आहे.
YOU चे सिझन पण भारी आहेत विक्षिप्त प्रेमिकाची कथा
डॉक्युमेंट्री मध्ये सोशल डिलेमा /डायलेमा पण सध्या चर्चेत आहे.
22 Oct 2020 - 3:05 pm | साबु
GOT - HBO
Dexter
Person of interest - HBO
White collar - Netflix
Prison break - Netflix
Sherlock - Netflix
Luther - Netflix
Good detective - HBO
Walking dead -
Dr house - Prime
Black Orphan - Netflix
Lock and Key - Netflix
Black List - Netflix
Outlander - Netflix
Stranger Things - Netflix
Money Heist - Netflix
Homeland - Netflix
Good wife - Prime
Good Fight - Prime
Black Mirror - Netflix
Wanted - Netflix
22 Oct 2020 - 3:30 pm | डॅनी ओशन
पुढचा भाग इतुय म्हणे.
22 Oct 2020 - 4:05 pm | अमर विश्वास
Netflix
House of Cards
Designated Survival
Ozark
13 Reasons why
Line of Duty
Marcella
22 Oct 2020 - 11:36 pm | Ujjwal
स्कॅम 1992 (Sony Liv)
हर्षद मेहता
23 Oct 2020 - 11:25 am | महासंग्राम
काल रात्री मिर्झापूर २पाहून संपवली ओके ओके टाईप आहे. ठरलेल्या वेळेच्या ०३ तास आधी रिलीज केली प्राईम ने सिरीज बहुदा टेलिग्राम वर लीक झाली असावी
23 Oct 2020 - 12:06 pm | कानडाऊ योगेशु
सेम हिअर.
मी ही कालच पाहुन संपविली. पहिल्या सिझन इतकी पकड घेणारी नाही वाटली.
23 Oct 2020 - 2:26 pm | महासंग्राम
पण शेवटात माती खाल्ली नाही हे बरं केलं. नाहीतर हॉलिवूड वाल्यांचा कित्ता गिरवत GOT आणि HOC सारखा बकवास शेवट केला नाही हे बरं झालं
31 Oct 2020 - 10:09 am | महासंग्राम
काल कोजगरी च्या मुहूर्तावर एमिली इन द पॅरिस हि नेटफ्लिक्स ची मिनी सिरीज संपवली. शिकागो मध्ये वाढलेल्या पूर्णपणे अमेरिकन असलेल्या फ्रेंच भाषेचा गंध हि नसणाऱ्या एमिलीला शेवटच्या क्षणी पॅरिसला जाऊन एका मार्केटिंग कंपनीचं सोशल मीडिया अकाउंट सांभाळण्याची जबाबदारी देण्यात येते. तिथे वर्षभराच्या कालखंडात एमिलीच्या आयुष्यात येणार चढउतार सिरीज मध्ये दाखवले आहेत. फ्रेंच लोक इंग्रजी भाषेचा किती दुस्वास करतात हे जगजाहीरच आहे. त्या पार्श्ववभूमीवर सिरीज मध्ये वेळोवेळी इंग्रजीला कमी लेखून टोमणे मारले आहेत. व्हॉट हॅपन्ड इन पॅरिस स्टेज इन पॅरिस या म्हणीला जागणारी हि शॉर्ट आणि स्वीट सिरीज नक्कीच पाहणेबल आहे.
23 Nov 2020 - 10:23 am | महासंग्राम
क्राऊन चा नवीन सिझन भन्नाट केलाय. या वेळेस ८० च्या दशकातल्या मार्गारेट थॅचर, प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना, कॅमीला पार्कर आणि अर्थात थेरड्या आजीबाई यांचा कालखंड आहे
23 Nov 2020 - 6:29 pm | तुषार काळभोर
Netflix var आहे
अनुराग बसू दिग्दर्शित.
अभिषेक बच्चन, पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख.
चार समांतर कथा.
ब्लॅक कॉमेडी.
IMDB 7.6
24 Nov 2020 - 12:11 pm | महासंग्राम
ल्युडो जबरदस्त केलाय. अभिषेक बच्चन खास आवडलाय त्यातला. युवा मधल्या लल्लन ची आठवण करून देतो
24 Nov 2020 - 3:30 pm | सोत्रि
हेच म्हणतो!
-(युवामधला अभिषेक आवडलेला) सोकाजी
24 Nov 2020 - 12:18 pm | रंगीला रतन
मिर्झापूर २ चे दोन भाग बघितले. नंतरचे बघायला वेळ नाही मिळाला :(
11 Dec 2020 - 4:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेब सिरीजचा मी काही असा चाहता नाही...पण ’ SCAM 1992’ वेड लागल्यासारखी सलग दोन-अडीच दिवसात संपवली, गुंतवून ठेवणारं कथानक असल्यामुळे आणि कलाकारांच्या सहज अभिनयांनी ’हर्षद मेहता’ उलगडत गेला. एखाद्या खलनायकाबद्दल सहानुभूती वाटावी असे वाटून गेले. व्यवस्थेला कसे खपवता येते त्याचं उत्तम कथानक. मस्त मजा आली. धन्स.
असेच खिळवून ठेवणारे काही आले तर धाग्यात डकवावे ही नम्र विनंती.
-दिलीप बिरुटे
11 Dec 2020 - 4:53 pm | रंगीला रतन
>>>’हर्षद मेहता’ उलगडत गेला>>>
आम्ही कॉलेजमध्ये असताना आमचे इकोनॉमिक्सचे सर आम्हाला हर्षद मेहता बद्दल आवर्जून सांगायचे.
जुनाट किडक्या यंत्रणेतील लूप होल्स शोधून या माणसाने कसा घोटाळा केला ती कहाणी अजून आठवते.
11 Dec 2020 - 6:10 pm | कुमार१
Sound of Metal
हा प्राईमवरचा आवडला. बहिरेपणा आलेला ड्रमर कलाकार हा नायक. बहिऱ्या व्यक्तींचे पुनर्वसन, शिक्षण छान दाखवले आहे. त्या सहजीवनातून ‘आपल्यात काही न्यून आहे” ही भावना विसरते.
11 Dec 2020 - 7:56 pm | तुषार काळभोर
गेल्या आठवड्यात पाहिली.
मस्त आहे. अल्ट बालाजी वर आहे. (मी टेलिग्रामवर पाहिली).
दिव्येंदू शर्मा चा नायक एकदम मस्त. इन्स्पेक्टर निकुंज तिवारी झालेला झिशन काद्री कौतुकास्पद.
स्टोरी वेडी वाकडी, कधी अपेक्षित कधी अनपेक्षित वळणे घेत जाणारी.
18-२० मिनिटांचे नऊ भाग.
उल्लेखनीय वाराणसी चं चित्रीकरण आणि तिथली संस्कृत प्रचुर गोड हिंदी.
16 Dec 2020 - 10:41 pm | प्रचेतस
द मॅण्डलोरियन सुरू केली. स्टार वॉर्स फ्रँचाईझीमधील आहे. जबरी आहे.
17 Dec 2020 - 3:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही मिपाकरांमुळे She सीरीज चे दोन भाग पाहिले. माझ्या पिढीने सिनेमातलं चुंबन म्हणजे, दोन फुलांना एकमेकांना चिकटलेले पाहणे अशी तोंडओळख असलेल्यांनी 'शी' सारखे एवढे 'बोल्ड' सीन पाहणे म्हणजे लैच कठीण काम होतं. अशा मालिकांमधील स्त्रीया असेही काम करतात असे वाटून गेले. मालिकांमधील संवाद, काही शिव्या तर इअरबड्स मधूनही बाहेर पडणार नाही ना याची भिती वाटत होती. आता तिसरा भाग बघायला 'कथानक' पाहता काही हिंमत होत नाही. पेंडींग ठेवतो.
आपले मिपाकर काहीही बघायला शिफारस करतात. (कुठे फेडाल रे हे सर्व ) बाकी, अॅक्शन, थरार, पकडले, सुटले, अशा टाइप्सचे काही असेल तर सुचवा. स्कॅम १९९२ सारखं असल्यास प्राधान्य... आता त्या मिपाकर मित्रांनी प्रिझन ब्रेक, डेक्स्टर असे सुचवले आहे, आता माझ्यासमोर अजून काय वाढवून ठेवले असेल काय माहिती. :)
-दिलीप बिरुटे
17 Dec 2020 - 4:49 pm | तुषार काळभोर
प्रा डॉ साहेब, लुडो आणि बिच्छु का खेल बघा. तुम्हाला नक्की आवडतील.
17 Dec 2020 - 5:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओके...बघतो...!
-दिलीप बिरुटे
3 Jan 2021 - 11:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बीच्छु का खेल पण मस्त. शेवट अजून हटके पाहिजे होता असे वाटत होते.
-दिलीप बिरुटे
21 Dec 2020 - 12:13 pm | महासंग्राम
पंचायत बघा तुमची पंचाईत नक्की होणार नाही याची खात्री एकदम फुल्ल फॅमिली सिरीज
23 Dec 2020 - 5:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंचायतचा पहिला भाग पाहिला, नितांत सुदंर छायाचित्रण आणि विषय ही स्वदेश टाइप असावा असे वाटले. पहिला भाग आवडला. धन्स....!
-दिलीप बिरुटे
23 Dec 2020 - 10:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह ! छोटीशी गोष्ट अतिशय सुंदर चितारली आहे, यावर एक स्वतंत्र लेखन करावे असे वाटले. मजा आली.
पंचायत सुचवणा-या मित्रांचे तहेदिलसे शुक्रिया...!
-दिलीप बिरुटे
21 Dec 2020 - 11:20 pm | कपिलमुनी
पंचायत बघाच !
21 Dec 2020 - 12:15 pm | महासंग्राम
कोल्डवॉर आणि स्पाय आवडत असेल तर नेटफ्लिक्स वरचा द कोल्डेस्ट गेम पहा. वन टाईम वॉच आहे
23 Dec 2020 - 4:35 pm | चौथा कोनाडा
क्रिमिनल जस्टीसचा दुसरा भाग येतोय, तो बघणार !
पहिला भाग थोडा बोर (विशेषतः तुरुंगातील वर्चस्व तपशिल) झाला. १० एपिसोड भागाचे ७ किंवा ८ भाग केले असते तरी चालले असते.
पंकज त्रिपाठीचा अतिकॅज्युअलपणा काही वेळा वैताग देतो.
जॅकी श्रॉफचा घुमणारा खर्ज आवाज या मुळे काही वेळा संवाद समजून येत नाहीत. अभिनय आणि इतर अंगे उत्तमच !
3 Jan 2021 - 11:31 am | मदनबाण
हल्लीच पाहिलेल्या वेब सिरिज / चित्रपट इथे देतो !
आश्रम [ सिझन १ आणि २ ] [ बोलो काशीपुरवाले बाबा की जय , गरीबो वाले बाबा की जय, नसीबों वाले बाबा की जय हो ]
याच्यात बबीता [ त्रिधा चौधरी ] हीने अगदी तन-मन लावुन काम केलेलं आहे ! :)))
दरबान :- रायचरण या व्यक्तिरेखेचे चे काम पाहण्या सारखे आहे.
Criminal Justice Behind Closed Doors :- या वेब सिरीज चे ४ भाग बघुन झालेत, बाकीचे पहायचे आहेत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chabidar Chabi | Girlz | Praful-Swapnil | Sagar Das | Naren Kumar | Vishal Devrukhkar
3 Jan 2021 - 1:34 pm | प्रचेतस
सध्या सुपरनॅचरल सुरू केलीय. टीपी आहे.
3 Jan 2021 - 1:59 pm | कुमार१
मिर्च छान आहे.
पंचतंत्रातील कथेवर आधारित चार कथांचा एकत्र समूह
छान कलाकार वगैरे
26 Nov 2021 - 10:36 am | कुमार१
ओटीटी पर्यायांपैकी माझ्याकडे फक्त प्राईम व्हिडिओ गेली तीन वर्षे आहे.
पहिले दोन वर्ष मी समाधानी होतो. आता अलीकडे त्यांनी वार्षिक वर्गण मध्ये जे बघायला मिळते त्याच्यावर नियंत्रण आणले आहे आणि बऱ्याच अतिरिक्त पैसे देऊन बघायच्या गोष्टींची ते जाहिरात करीत आहेत.
या डिसेंबर पासून ते वार्षिक वर्गणी पाचशे रुपयांनी वाढवत आहेत.
माझ्या मनात एक असा विचार आला आहे, की प्राईम बंद करून यूट्यूब प्रीमियम घेऊन बघावे का ?
अनुभवी व्यक्तींनी सल्ला द्यावा. मला अद्याप त्याचा अनुभव नाही
26 Nov 2021 - 8:24 pm | राघवेंद्र
प्राईम वरिल मल्याळम चित्रपट पाहून झाले असतील तर नेटफ्लिक्स घ्या.
यु ट्यूब प्रिमिअम चा अनुभव नाही.
https://pi-hole.net/ कुणी ऍड-ब्लॉक करण्यासाठी वापरले आहे का ? मला यु ट्यूब आणि हुलू वरील ऍड-ब्लॉक करण्यासाठी सुचवले आहे.
26 Nov 2021 - 9:26 pm | कुमार१
नेटफ्लिक्स डेबिट पद्धतीने पैसे घेत नसल्याने मला रस नाही.
यु ट्यूब प्रिमिअमच्या कोणाच्या अनुभवाची वाट पाहतो.
26 Nov 2021 - 11:16 pm | जेपी
माझ्या कडे आहे. विना जाहिरात पाहत येते इतकाच फायदा आहे.
27 Nov 2021 - 8:42 am | कुमार१
धन्यवाद.
26 Nov 2021 - 8:46 pm | जेम्स वांड
ती भयानक आवडली होती, नाव आहे द युनिट, डेनिस हेसबर्ट मुख्य कलाकार (सार्जंट मेजर जोनास ब्लेन) ओळखीचा चेहरा मॅक्स मार्टिनी (सार्जंट मॅक्स गेरहार्ड)
द युनिट म्हणजे ५ लोकांची अतिशय जास्त स्कील्ड अन स्पेशलाईज्ड टीम असते डेल्टा फोर्स ऑपरेटर्सची, त्यांचा कमांडिंग ऑफिसर असतो कर्नल थॉमस रायन स्क्वाड लीडर असतो जोनास, जगभरात हाय रिस्क ऑपरेशन करतात, प्रसंगी सीआयएची पण वाजवतात, युनिटवर आलेली संकटे मिळून परतवून लावतात, युनिट इतके सिक्रेट असते की त्यांचे कव्हर असते लॉजीस्टिकल युनिटचे, त्यांची पर्सनल आयुष्य, नवरे जगाच्या एका कोपऱ्यात घर, पोरं अन नवऱ्याचे सिक्रेट जॉब्ज सांभाळत जगणाऱ्या त्यांच्या अमेरिकन गृहिणी बायका, अतिशय आवडली मला तरी, चार सिझनमध्ये गुंडाळली आहे सिरीज, पण जितकी बनवली तुफान बनवली आहे.
त्यांचं हे थीम म्युझिक खऱ्या कुठल्यातरी मिलिटरी पलटणीचे मार्चिंग सॉंग आहे म्हणतात बुआ, खरेखोटे देवजाणे.
26 Nov 2021 - 11:52 pm | धर्मराजमुटके
दृष्यम २ तेलुगू पाहिला. मल्याळम आणि हा दोन्ही छान. आता हिंदी कधी येतो ते पहायचे.
22 Jul 2022 - 12:13 pm | diggi12
In to the night मस्त आहे
22 Jul 2022 - 3:45 pm | अत्रुप्त आत्मा
जपनाम जपनाम !
22 Jul 2022 - 4:07 pm | जेम्स वांड
इस्रायली वेबसिरीज फौदा (हिब्रू/ अरबी अर्थ केओस) बघण्यात आली.
इस्राएल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) अंतर्गत चालणारी मिस्तारविम (मिस्त' अरवीम - अरबांत मिसळून राहणारी, ह्याचेच अरबी भाषेतील स्वरूप मुस्तारबीन) ह्या नावावरूनच लक्षात येईल अशा अंडरकव्हर युनिटची ही गोष्ट.
३ सिझन, ३६ भागात (प्रत्यल भाग ३३ मिनिटं ते ५० मिनिटं) अरब इस्राएल प्रॉब्लेम, पॅलेस्टाईन मध्ये राहणाऱ्या अरबांचे आयुष्य, कधी स्वतःहून तर कधी जुलमाने त्यांचे हमास किंवा आयडीएफला साथ देणे, हमास अन आयसिसचे आपापसातील हेवेदावे, इस्रायली मिस्तारविम युनिट्सची कार्यशैली, त्याला उत्तर देणारी हमास अन पॅलेस्टाईन ऑथोरिटीच्या चाली, मिशन्स मधली कॉम्प्लेक्सिटी दोन्ही बाजूंनी प्रसंगी जपली जाणारी माणुसकी, ज्यू लोकांबद्दल असलेली अरबांच्या मनातली अढी, अरबांबद्दल ज्युईश लोकांच्या मनात असलेले भय अन त्यातून उदभवणारी अग्रेसिव्ह डिफेन्स पॉलिसी, युनिट अंतर्गत घडामोडी, युनिट मेंबर्सची आपापसात असलेली मैत्री, त्यांचे कुटुंबीय अन त्यांना असणाऱ्या रिस्क अन त्यातून उद्भवणारा "फौदा" ह्यांचे अतिशय उत्तम अन प्रॅक्टिकल चित्रण ह्या सिरीजमध्ये पाहायला मिळेल.
उपलब्धता नेटफ्लिक्स किंवा टेलिग्राम जिंदाबाद, मी आपली पैसा भरून नेटफ्लिक्सवर बघितली
पोस्टर खालील प्रमाणे.
25 Jul 2022 - 7:55 pm | धर्मराजमुटके
मी नेटफ्लिक्सचे सभासदत्व घेतल्यावर सर्वप्रथम हिच मालिका पाहिली होती. आवडली होती. मालिकेचे पार्श्वसंगीत अगदी हृदयाचे ठोके वाढविणारे आहे. मात्र नेटफ्लिक्स म्हणा किंवा अजून कोणताही ओटीटी मंच असो, नंतर तोच तोच पणा येतो. सध्या lionsgateplay चे एक महिन्याचे सभासदत्व घेऊन ९९ रुपयात गंमत चालू आहे. चित्रपट चांगले आहेत. मालिकांच्या वाटेला अजून गेलेलो नाहिये.
25 Jul 2022 - 4:57 pm | तर्कवादी
प्राईमवर DNA नावाचा हृदयस्पर्शी मराठी चित्रपट आहे.
कथानक सगळ्यांना आवडेलच असे नाही पण अतिशय नैसर्गिक अभिनय, सहज साधे संवाद आणि कुठेही भडकपणा नसलेला हा चित्रपट संवेदनशील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. नवोदित कलाकारांचा अभिनय अगदी उत्तम आहे.
20 Aug 2022 - 1:15 am | चेतन सुभाष गुगळे
प्राईमवर क्रॅश कोर्स - भानू उदय नावाचा कलाकार अठरा वर्षांपूर्वी स्पेशल स्क्वाड नावाच्या मालिकेत पाहिला होता आजही अगदी तसाच्या तसाच दिसतो. मधल्या काळात मछली जल की रानी है आणि ल्यूडो या चित्रपटांध्ये देखील दिसला होता. सलग इतका काळ एकसारखं दिसत राहण्याबद्दल संतूर साबणाने याला सदिच्छादूत नेमायला हवे. असो. वेब सिरीज छान आहे. सिद्धार्थ काक वगळता इतर सर्व पात्रांना नकारात्मक छटा आहेत पण त्याला अभिनय येत नसल्याने मुख्य सकारात्मक पात्र असूनही त्याची लांबी कमी ठेवण्यात आली आहे. अन्नू कपूर आणि भानू उदय पूर्णतः डार्क शेड कॅरेक्टर्स किंवा खल भूमिकेत आहेत असे म्हणता येईल. या दोघांनी कमालीचा अभिनय केला आहे. त्यातही अन्नू कपूर जास्त उजवा म्हणता येईल. काही काळापूर्वीच होम या वेब सिरीज मध्ये त्याने न्यूनगंडाने पछाडलेलं अपयशी पात्र उभं केलं होतं आणि आता क्रॅश कोर्समध्ये चक्क अहंगडांने पछाडलेलं अतिमहत्त्वाकांक्षी अतियशस्वी आणि अहंमन्य पात्र देखील तितक्याच ताकदीने उभं केलं आहे. कोटा शहरातील कोचिंग क्लासचालक आणि विद्द्यार्थ्यांचे हे कथानक आहे. प्रचंड स्पर्धेमुळे अनेक विद्यार्थ्यांना नैराश्य येताना दिसतं आणि त्यांच्यापैकीच कोणी आता आत्महत्त्या करु शकेल अशी लक्षणे प्रत्येक वेळी दिसत असतात (पहिल्या भागाची सुरुवातच फाशीच्या दोरीपासून होते) पण अचानकच एक दिवस असा येतो की अगदी अनपेक्षित रीत्या ज्याची कल्पनाही कोणी करु शकणार नाही असं एक पात्र आत्महत्त्या करतं आणि मालिकेला एक वेगळंच निर्णायक वळण मिळतं. फक्त २४ तासांत एखाद्या व्यक्तिचं आयुष्य इतकं बदलू शकतं? कितीही अविश्वसनीय वाटत असलं तरी वेब सिरीजमध्ये ते पटेल असं दाखविण्यात आलं आहे.
स्पष्ट उल्लेख नसला तरी बहुदा मालिकेतील विद्यार्थ्यांचं वय १७ असावं. ते स्वयंचलित दुचाकी न चालविता सायकली चालविताना दाखविले आहेत त्यामुळे या शक्यतेला अजुनच पुष्टी मिळते. मात्र हे विद्यार्थी स्वयंचलित वाहन चालवित नसले तरी पडद्यावर हिंसा आणि शरीरसंबंध यांचे प्रदर्शन व मादक पदार्थांचे सेवन करताना दिसत असल्याने मालिकेची वर्गवारी प्रौढांसाठी (ए रेटिंग) झाली आहे. एवढा विरोधाभास सोडला तर बाकी मालिका उत्तम आहे.
26 Aug 2022 - 12:53 pm | सौंदाळा
कालच बघून संपवली. सुरुवातीला बघून कोटा फॅक्टरीची आठवण आली पण नंतर सिरिज रंगतदार झाली.
परिक्षण एकदम मस्त लिहिले आहे तुम्ही.
26 Aug 2022 - 2:25 pm | चेतन सुभाष गुगळे
जमल्यास आणि अन्नू कपूरचा अभिनय आवडत असेल तर होम देखील पाहा.
24 Aug 2022 - 9:43 pm | धर्मराजमुटके
भारत चीनी अॅपवर बहिष्कार का घालत आहे ? ही एक चित्रफीत पाहण्यात आली. मुद्दे रोचक वाटले.
26 Aug 2022 - 12:17 pm | शाम भागवत
माझ्या अंदाजानुसार गॅट करारानुसार भारताचे जे नुकसान झाले व चीन आपल्याला शह देत राहिला, त्यावरची ही उपाययोजना आहे. गॅट करारातून बाहेर तर पडायचं नाही, पण गॅट कराराचे फायदे चीनला मिळवू द्यायचे नाहीत अशी ती खेळी असावी. ट्रंम्प यांनी ती सुरू केली. भारत आता त्याचे लाभ घेतोय.
जोपर्यंत चीनची अर्थव्यवस्था बंदिस्त आहे तोपर्यंत तरी चीनला गॅट कराराचे फायदे मिळवू द्यायचे नाहीत हे धोरण भारताच्या दृष्टिने महत्वाचे आहे असे मला वाटते.
30 Aug 2022 - 9:46 pm | चेतन सुभाष गुगळे
https://www.youtube.com/watch?v=D3W8h4dBIII
साध्या सोज्ज्वळ मनमिळाऊ स्वभावाच्या नायिकेचा होणारा खून, एकमेकांवर कूरघोडी करणारी बिलंदर पात्रं, आणि ही मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह करणारा नायिकेचा मानलेला भाऊ हे एकमेव सकारात्मक पात्र. एकदा तरी पाह्यला हवा असा चित्रपट.
31 Aug 2022 - 12:39 am | तर्कवादी
सध्या मी हिंदी भाषेत डब केलेली वेबसिरीज व्हर्जिन रिव्हर चे चौथे पर्व बघतोय. अर्थातच आधीचे तीन पर्वही पाहिलेले आहेत.
ही एक भावूक अमेरिकन ड्रामा वेबसिरीज आहे.. तुमच्याकडे विलक्षण संयम आणि चिकाटी असल्यास तुम्ही या वेबसिरीजचा नक्कीच आनंद घेवू शकता :)
(सौजन्यः नेटफ्लिक्स)