पाटीलने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. तिथे आधी पासूनच दोन कॉन्स्टेबल उभे होते. "काय रे, कश्याला हात तर नाही लावला ना?" घोरपडे ने गाडीत बसूनच विचारले. "नाय sir" कॉन्स्टेबल ने उत्तर दिले. पाटील आणि घोरपडे गाडीतून उतरले. "कुठेय?" घोरपडे ने रस्त्याच्या कडेला थुंकत विचारले. "त्या झाडाकडे..." कॉन्स्टेबल ने झाडाकडे खुणावत सांगितले. "पाटील, बघा जरा जाऊन" पाटील, रस्त्या शेजारील झुडपे ओलांडत झाडाकडे जाऊ लागला. "अजुन काय काय सापडलं?" घोरपडे विचारपूस करू लागला. "ही एक अॅक्टिवा आणि purse. हे लायसेन्स आणि आधार कार्ड मिळालं त्यातून" एका कॉन्स्टेबल ने लायसेन्स आणि आधार कार्ड घोरपडे ला दिलं. "सुमन देशपांडे...मयुर कॉलनी, कोथरुड... मोबाईल वगैरे काही?" "मोबाईल मिळाला sir, पन तुटलाय" कॉन्स्टेबल ने तुटलेला मोबाईल घोरपडे ला दिला. "आन त्या मुला कडून?" "त्याला आजुन हात नाय लावला sir". पाटील झुडपातून ओकत बाहेर आला. "आहो पाटील, काय झालं? पहिल्यांदा dead body पहिली का?" घोरपडे हसत म्हणाला. पाटील अजून एकदा ओकला. "पाटील, दमान... ए पाणी घे रे गाडीतून" एक कॉन्स्टेबल गाडीतून पाण्याची bottle घ्यायला गेला. "Ambulance बोलावली आहे का?" "होय Sir... येतच असेल" कॉन्स्टेबल ने सांगितले.
विक्रम आणि सुमन एका ब्रीज वर बसले होते. तिथून आकाशातील चंद्र स्पष्ट दिसत होता. विक्रमने तिच्या कमरे भवती हात ठेवला होता. तीच डोकं त्याच्या खांद्यावर होत. ब्रीज खाली पाय लोमकावत ते दोघं बसले होते. विक्रम एकटक चंद्राकडे पाहत बसला होता. "तुला माहितीये सुमन, हा सनसेट माझा दिवसाचा सर्वात आवडता क्षण असतो. तू सनसेट पाहत असते आणि मी तुला पाहत असतो. अस्ताला जाणाऱ्या त्या सूर्याची तांबूस लालसर किरणे जेव्हा तुझ्या चेहऱ्यावर पडतात, तेव्हा त्या सूर्याला ही लाजवेल अशी सुंदरता तुझ्या चेहऱ्यावर दिसते. मनात एक खंतही असते की तू आता परत घरी जाशील, पण एक आशाही असते की तू उद्या पुन्हा येशील. म्हणून मी तुला मन भरून पाहून घेतो." विक्रम अचानक थांबला आणि एकटक तिच्याकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यांत पाणी होत. त्याला शब्द फुटत नव्हते. त्याच्या गळ्याला कोरड पडली होती. कातऱ्या आवाजात तो बोलू लागला "फार प्रेम होत ग माझं तुझ्यावर... आजवर कुठल्याच गोष्टीत इतकं मन नव्हतं लावलं...तुला कधी दिसलं नाही का ग माझ प्रेम? असं काय होतं त्याच्यात जे माझ्यात नाही... सांग ना...सांग..." विक्रम तिच्या गालावर थापा मारत विचारू लागला. "आजही त्याला मी सांगता होतो bike हळू चालव... हळू चालव...तरीही तो वेडीवाकडी करत चालवत होता...मला घाबरवण्यासाठी तो माझ्या जवळून bike चालवत होता...मला माझी काळजी नव्हती ग...पण तू त्याच्या मागे बसली होती म्हणून माझा जीव कासावीस होत होता...शेवटी त्याने bike ठोकलीच... मी जेव्हा शुध्दीवर आलो तेव्हा तू रस्त्यावर पडून होतीस...मी तुला उचलायला जात होतो तेव्हा तो बोलला "अरे ती मेली आहे वाटत...माझी मदत कर तिला सोड..." तिला सोड...?" "तुला कसं सोडू शकतो ग मी...तिला सोड...तुला कसं...मला फार राग आला इतका की आता डोक्याची नस फाटते की काय असं झालं...तरीही तो एक सारखा बोलत होता "तिला सोड माझी मदत कर... ती मेली आहे" तू मेली...तू जर मेली तर मग मी का जगतोय? आणि मुळात ज्यामुळे तू गेलीस तो का जिवंत आहे? जवळच एक दगड पडला होता...घेतला तो दगड आणि टाकला त्याच्या डोक्यात...४-५ दा मारल्यानंतर त्याची हालचाल तशी थांबली होती पण माझा राग शांत झाला नव्हता...जो वर माझ्या आंगात ताकत शिल्लक राहिली मी त्याच डोकं ठेचत गेलो...चिखलात उड्या मारल्यावर जसा आवाज होतो तसा आवाज येत होता...तो आवाज जणू माझ्या रागावर एक हळुवार फुंकर मारत मला शांत करत होता... खचाक... छपाक... खचाक... छपाक..." विक्रम हळूहळू पुटपुटत परत चंद्राकडे पाहू लागला.
Ambulance येऊन थांबली होती. Dead body ला stretcher वर ठेवलं होत. "पाटील, काही ID proof?" घोरपडे ने विचारले. "होय सर, निशिकांत जोशी नाव आहे" पाटीलने उत्तर दिले. पाटीलची हालत जाम खराब झाली होती. मुळात पाटीलच काय तर सर्वांची तीच अवस्था होती. २०-२१ वय असेल निशिकांत च. एवढ्या तरुण मुलाचं शव अश्या भयावह परिस्थितीत पाहून कोणाची पण अवस्था वाईट होईल. पाटील वर याचा जास्त परिणाम झाला कारण त्याचा मुलगा पण २१ वर्षाचा होता. निशिकांत चा चेहरा ओळखणे अशक्य होते. त्याच डोकं अश्या प्रकारे ठेचल होत की डोक्याचे काही तुकडे एका वेगळ्या पिशवीत भरावे लागले. चेहऱ्याचा कुठला भाग कुठे आहे हे ठरवण्यासाठी फार लक्ष देऊन चेहऱ्याकडे पहावे लागत होते, पण कुणात एवढी ताकत नव्हती की काही सेकंद पेक्षा जास्त त्याकडे कोणी बघेल. त्याच्या कवटीच्या काही भागात दगडाचे काही तुकडे देखील अडकले होते. त्याचे काही दांत खाली पडले होते तर काही जबड्या सोबत आंत दाबल्या गेले होते. निशिकांत च शव stetcher वर ठेवून त्यावर पांढरे कापड टाकून त्याला ambulance मधे ठेवण्यात आले. घोरपडे कॉन्स्टेबल ला सर्व सूचना देत होता. Walkie talkie वर call येत होता. घोरपडे गाडी जवळ गेला आणि walkie talkie वर बोलू लागला. "कुठ...? आलो... आलो..." "पाटील, गाडी काढा... सुस रोड वर एक bike सापडली आहे"
विक्रम सुमन सोबत ब्रीजवरच बसून होता. एक विलक्षण समाधान होत त्याच्या चेहऱ्यावर. वेदनेने तो तिळतीळ तुटत होता पण आता त्याला कसलाही फरक पडत नव्हता. त्याच पूर्ण शरीर बधीर झालं होत. तो आता अगदी मोक्ष च्या दरात उभा होता. त्याच्या नुसार त्याने त्याचे प्रेम सिध्द केले होते. तो आता असा क्षण अनुभवत होता ज्याचे स्वप्न तो कित्येक वर्षांपासून पाहत होता. ब्रीज खाली मुंबई - पुणे हायवे होता. रात्रीची वेळ होती म्हणून जास्तकरून जड वाहने जोरात हॉर्न मारून जात होते. त्या आवाजाने विक्रम शुध्दीवर येत होता. सुमन ला एका हाताने घट्ट मिठी मारून तो तिला निहारत होता. तिच्या सोबत घालवलेले एकएक क्षण तो आठवत होता. पण त्या प्रत्येक क्षणात तिच्या सोबत त्याला निशिकांत दिसत होता. मानसिक आणि शारीरिक अश्या दोन्हीही वेदना तो एकावेळी सहन करत होता. अचानक तो स्तब्ध झाला. "सुमन, आपण सोबत जगू नाही शकलो तर काय झालं, आपण सोबत मरू तर शकतो..." त्याने सुमन ला कडकडून मिठी मारली. ओठांवर चुंबन घेतले आणि तिच्या सोबत ब्रीज वरून खाली उडी मारली...
समाप्त.
प्रतिक्रिया
30 Aug 2020 - 3:19 pm | दुर्गविहारी
छान !
30 Aug 2020 - 3:29 pm | प. शी.
धन्यवाद
30 Aug 2020 - 4:39 pm | शा वि कु
अनपेक्षित !
पुलेशु.
30 Aug 2020 - 4:58 pm | प. शी.
धन्यवाद
30 Aug 2020 - 4:43 pm | गणेशा
छान लिहिली आहे कथा..
30 Aug 2020 - 4:58 pm | प. शी.
धन्यवाद
30 Aug 2020 - 11:51 pm | Gk
समजले नाही
31 Aug 2020 - 9:10 am | प. शी.
कुठला भाग समजला नाही?
31 Aug 2020 - 10:28 am | अनिरुद्ध.वैद्य
सुरेख लिहीलेली कथा!
31 Aug 2020 - 12:37 pm | प. शी.
धन्यवाद
31 Aug 2020 - 10:54 am | ज्ञानोबाचे पैजार
भारी लिहिले आहे.. एकदम थंड डोक्याने लिहिले आहे ..
सारखा काटा येत होता अंगावर.
फॅशबॅक अत्यंत प्रभावीपणे वापरला आहे त्याने शेवटपर्यंत उत्कंठा ताणून धरली
पैजारबुवा,
31 Aug 2020 - 12:41 pm | प. शी.
होय, २ वर्षांपासून स्टोरी डोक्यात होती पण लिहिण्याचा वेळ मिळत नव्हता. अखेर लॉकडाऊन् मुळे वेळ मिळाला.
अजुन काही कथा आहेत, नक्की प्रयत्न करेल छान लिहण्याचा.
धन्यवाद!
31 Aug 2020 - 11:33 am | Bhakti
दोन्ही भाग वाचले.. वेगळी सायको स्टोरी ..भारी लिहिलंय!
31 Aug 2020 - 12:42 pm | प. शी.
धन्यवाद
31 Aug 2020 - 12:15 pm | विजुभाऊ
आवडली पण फारच थोडक्यात आटोपली आहे गोष्ट.
खूप मस्त रंगवता आली असती
खास करून ते सगळे जिवंत असतानाची क्षणचित्रे
31 Aug 2020 - 12:45 pm | प. शी.
खूप वर्षा नंतर मराठीत लिहीत आहे. आणि म्हटलं लहान पण प्रभावशाली कशी बनवता येईल तोच प्रयत्न होता.
31 Aug 2020 - 10:29 pm | कानडाऊ योगेशु
कथा थरारक आहे पण मृतदेहाचे वर्णन बीभत्स वाटले.