विक्रमच्या पापण्यांची हालचाल झाली. पुसटशी चमक त्याला दिसत होती. रस्त्यावर काचेचा चुरा पडला होता. त्याची bike रस्त्याच्या कडेला तशीच पडून होती. तो भानावर आला. डोक्याला हात लावत रस्त्यावरच बसुन होता. त्याच्या कपाळावर जखम झाली होती. त्याच कपाळ, भुवया, कान सर्व काही रक्ताने माखल होत. हाता-पायालाही बरचस खरचटल होत. गुढग्या जवळ खरचटल्यामुळे jeans फाटली होती. शर्ट रक्त आणि मातीन माखला होता. तो हळुहळु ऊभा राहीला. त्याची नजर सुमनवर पडली. सुमन रक्ता-मातीच्या चिखलात तशीच निपचीत पडून होती. तिचा एक पाय Activa च्या खाली अडकला होता. तिचे रक्ताने भरलेले केस तिच्या चेहर्यावर चिटकून होते. विक्रम लगबगीन तिच्या जवळ गेला आणि तिच्या पायावरून Activa बाजुला सारली. तो खाली बसला आणि तिच डोक आपल्या मांडीवर ठेवल. तो तिच्या चेहर्या वरची केस सावरू लागला. तिच शरीर गार पडल होत. विक्रम तिच्या चेहर्याला कुरवाळत तिच्याकडे एकटक पाहत बसला होता. त्याच्या चेहर्यावर विचीत्र असे स्मीत हास्य होते. तो तिच्या डोक्यावर हळुवार थापा मारीत आकाशात चंद्राकडे पाहत बसला होता. सर्वत्र शांतता पसरलेली होती. दुरवर कुत्र्यांचा भुंकण्याचा आणि रडण्याचा आवाज त्या शांततेत भंग पाडत होता. रस्त्यावरच्या दिव्याचा तांबुस प्रकाश त्यांच्यावर पडत होता. विक्रम बराच वेळ तिच्या डोक्यावर थापत तिच्या कडे एकटक पाहत बसला होता. अचानक तो थांबला आणि तिला कुरवाळत बोलु लागला, “सुमन... तुझ्या coffee ची वेळ झाली... चल उठ लवकर ऊभी रहा” अस म्हणत त्याने तिच डोक खाली ठेवल. त्याने त्याची खाली पडलेली bike main stand ला लावली. त्याने तिला ऊभे केले. तिचा एक हात आपल्या खांद्यावर घेत तिला bike पर्यंत घेउन आला. “चल बस पटकन... आपल्याला अजुन sunset पन पहायचा आहे”. त्याने तिला bike वर बसवले आणि तिच्या ओढणीने तिला स्व:ता भोवती बांधले.
विक्रम bike चालवत होता. सुमनच डोक त्याच्या खांदयावर होत. रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात तिच्या चेहर्यावरची जखम दिसुन येत होती. तिचे डोळे बंद होते. तिच्या रक्ताने विक्रमचा शर्ट पार भिजला होता. विक्रम तसाच गाणी गुंगूणत bike चालवत होता. एका coffee shop जवळ त्याने bike थांबली. अचानक त्याला ग्लानी आली त्याचा तोल गेला आणि तो तिच्या सकट खाडकन खाली पडला...
घोरपडे ने एका जोडप्याला नाक्यावर आडवल होत. “काय Romeo , रातच्याला कूट प्रेम दावत हिंडताय?” आपल्या रानड्या आवाजान तो विचारपूस करत होता तोच त्याच्या walkie talkie वर message आला. “पाटील, या दोघांच्या घरला जरा फोन लावा... यांच्या बापासनी बी कळु द्या... पोर रातच्याला कूट night out मारताय ते... “ घोरपडे तोंडातला बार बोटाने बाहेर फेकत jeep जवळ गेला. “हा बोला... हं... हं... कूट? हं... पोचतो... “ walkie talkie बंद करत “ओ पाटील आर किती वेळ... गाडीचा नंबर घ्या आन सोडा त्यांना... आन ए Romeo… परत जर रातच्याला दिसलाना सरळ आत टाकीन... चला घरला निघा आता”. तो मुलगा लगबगीन गाडी सुरू करू लागला. “काय सर कश्याला सोडल? काहीतरी तोडीपानी झाली असती.” “पाटील, तुम्ही गाडी काढा... पाषाण रोडला accident झाला... Activa सापडली आहे... “
विक्रम आणि सुमन एका बंद coffee shop समोर bike सोबत पडून होते. विक्रमचा पाय फूटपाथ आणि bike मधे अडकला होता. तो शुद्धीत आला, अंगात होती नव्हती ती सर्व ताकत एकवटुन तो दुसऱ्या पायाने bike सरकवत होता. जसजशी bike सरकत होती, त्याचा पाय पण सोलला जात होता. अखेर, त्याने आपला पाय bike खालून काढून घेतला. वेदनेने तो तसाच फूटपाथवर तळमळत होता. त्याच्या सोबत बांधलेली सुमन पण हालत होती. त्याने सुमनला bike वर एका बाजूने बसवले होते, त्यामुळे तिचे दोघं गुढघे bike खाली अडकले होते. विक्रम तसाच फूटपाथवर लोळत तिचे दोघं खांदे धरून तिला ओढू लागला. जसजसे तो तिला ओढत होता, तिचा चेहरा फूटपाथवर घसरल्या जात होता. विक्रम कसातरी उभा राहिला आणि सुमन ला उचलून coffee shop कडे जाऊ लागला. Coffee shop बंद होते, बाहेर फक्त काही टेबल आणि खुर्च्या साखळीने बांधून ठेवल्या होत्या. विक्रमने सुमन ला एका खुर्चीवर बसवले आणि तो समोरच्या खुर्चीवर बसला. जस त्याने सुमन ला सोडलं, तीच डोकं खाडकन table वर आपटल. तीच रक्त मारबलच्या टेबल वरून खाली पडू लागलं. विक्रम तिच्या केसांना कुरवाळत होता. "काय ग? डोकं दुखतंय का तुझ?" "थांब मी तुझ्यासाठी एक strong coffee आणतो..." विक्रम कचऱ्यातून दोन coffee चे कप घेऊन आला. त्याचे दोघं हाथ रक्ताने माखले होते. त्याने ते कप table वर ठेवले. Cup वर त्याच्या रक्ताने भरलेल्या बोटांची ठसे उमटून दिसत होती. तो खुर्चीवर बसला आणि परत सुमन ला कुरवाळू लागला. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. एक विलक्षण भाव होता त्याच्या चेहऱ्यावर. डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर स्मित हास्य. " तुला माहितीये सुमन, मला coffee आवडतच नाही. पण तरीही मी रोज फक्त तुझ्यासाठी पीतो. मी पूर्ण दिवस संध्याकाळची वाट पाहत असतो. केव्हा तू "ए coffe ला जायचं?" असं विचारशील" विक्रम, हातात coffee चा cup घेऊन त्याकडे एकटक पाहत होता आणि हळूहळू त्याला दाबू लागला "रोजच... रोजचं" त्याने तो cup फेकून दिला आणि परत सुमन कडे पाहू लागला. "अरे तू coffee पीत का नाही?" त्याने एका हाताने तिचा चेहरवर केला आणि दुसऱ्या हाताने coffee चा रिकामा कप तो तिच्या तोंडाकडे नेऊन तिला भरवू लागला. "तुझ्या चेहऱ्यावर coffee चिकटली आहे" त्याच्या shirt ने तो तिचा रक्ताने भरलेला चेहरा पुसू लागला. सुमन अगदी बर्फा सारखी गार पडली होती. विक्रम ही थरथरत होता. मध्यरात्रीचा गार वारा सरळ त्याच्या जखमेतून हाडात शिरत होता. वाऱ्याची प्रत्येक झुळूक त्याला शुध्दीवर आणत होती. त्याच्या जखमेतून निघणारे रक्त पण आता सुकले होते. कडाक्याच्या थंडीत कोणी अंगात बर्फाचे खिळे भोकावेत अश्या असह्य वेदना तो सहन करत होता. Coffee shop समोर चौकात एक सिग्नल होता. त्या सिग्नलचा फक्त yellow light चालू बंद होत होता. विक्रम त्या सिग्नलकडे बघत बसला होता. "सुमन, तुला आठवतंय? तू एकदा बोलली होतीस की तुला या चौकात डान्स करायचा आहे... चल आज आपण दोघं या सिग्नल च्या स्पॉटलाईट मधे डान्स करू" विक्रमने तिला उभ केलं आणि खांध्याने धरून तिला सिग्नल कडे नेऊ लागला. त्याच्यामध्ये जराही ताकत शिल्लक राहिली नव्हती. तरीही तो तिला जेमतेम झटके मारत फरपटत नेत होता. अखेर तो तिला चौकाच्या मधोमध घेऊन आला. एका हाताने तिला मिठी मारत दुसरा हात हातात घेऊन तो उभा होता. "जब कोई बात बिघड जाये...जब कोई...मुश्किल अा जाये...तुम देना साथ मेरा.." तो तिच्या कानात गाणे गुणगुणत होता. सिग्नल च्या बंद चालू light मधे दोघांची सावली रस्त्यावर हलताना दिसत होती. त्याने तिला अतिशय घट्ट मिठी मारली होती जणू तिला त्या पासून दूर करणे आता अशक्य आहे. त्याला कसलेही भान नव्हते. बेधुंद होऊन तो तिच्या सोबत डान्स करत होता. कित्येकदा ते दोघं तोल जाऊन खाली पडले, पण तरीही विक्रम पुन्हा पुन्हा तिला उभी करत होता आणि तिच्या सोबत डान्स करत होता. खलाशी शिवाय समुद्रात सोडलेली एक नाव असा त्या दोघांना पाहून भास होत होता.
क्रमशः
प्रतिक्रिया
29 Aug 2020 - 10:46 pm | कपिलमुनी
सायको ष्टूरी
29 Aug 2020 - 11:36 pm | प. शी.
पुढील भाग लवकच...
30 Aug 2020 - 8:31 am | शा वि कु
पुभाप्र...
किंगची "अंडर द वेदर" नावाची गोष्ट सुद्धा याच कल्पनेवर आहे.
30 Aug 2020 - 8:56 am | प. शी.
अंडर द वेदर कधी वाचली नाही... पण आता वाचावी लागेल. तुमच्या कडे काही लिंक असेल तर नक्की पाठवा.
30 Aug 2020 - 10:56 am | शा वि कु
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=http://67-231-249-9...
बझार ऑफ बॅड ड्रिम्स कथासंग्रह आहे.
30 Aug 2020 - 11:02 am | प. शी.
धन्यवाद
30 Aug 2020 - 12:18 pm | सुमो
अंडर द वेदर
.
.
ऐका किंवा डाऊनलोड करा.
30 Aug 2020 - 12:25 pm | प. शी.
धन्यवाद
30 Aug 2020 - 4:34 pm | शा वि कु
ऑडिओ बुक्स कुठून मिळवावीत ?
31 Aug 2020 - 7:44 am | सुमो
मधली ऑडिओबुक्स LIBRIVOX वर आहेत. इतरही अनेक साइट्स आहेत.
किंग फॅन असाल तर वर मी दिलेले ऑडिओबुक यू ट्यूब वरून घेतले होते. स्टीफन किंगची अजून काही पुस्तके आहेत तिथे.
30 Aug 2020 - 12:18 pm | गणेशा
सुरुवात अप्रतिम..
लवकर लिहा पुढचा भाग
30 Aug 2020 - 12:25 pm | प. शी.
पुढील भाग लवकच...
30 Aug 2020 - 3:16 pm | दुर्गविहारी
उत्तम कथा उत्सुकता वाढली आहे. फक्त दोन सुधारणा करता येतात का बघा.
"तीचे दोघे खांदे धरून" च्या ऐवजी दोन्ही खांदे धरून हवे होते.
शिवाय अगदी शेवटचे खलाश्याचे उदाहरणं दिलेले वाक्य काढून टाक,, ते अनावश्यक वाटते आहे. सिग्नलच्या प्रकाशात दोघे नाचू लागले इथे क्रमश: दिले तर अधिक प्रभावी होईल.
30 Aug 2020 - 3:28 pm | प. शी.
दोन्ही सुधारणा आवडल्या. खूप वेळ नंतर मराठी मधे लिहत आहे...