शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.
1 ऐच्छिक :
2 अपूर्णता :
3 विष्णूचे स्थान :
4 वाचा :
5भिन्नता :
6काळी तुळस :
7 सावत्र :
8धन्वंतरी :
9कायदेशीर :
10 आश्चर्य :
11गरूड :
12 समृद्धी :
13 सीता :
14 ऐश्वर्य :
15 निष्फळता :
17 शत्रू :
18 चारा :
19 संन्यासी :
20 ओसाड :
21 कुबेर :
२२. चतुर्वर्णापैकी एक :
23. विष्णूभक्त :
24 निज
25 सूड उगवणे :
26 लग्नाची एक पद्धत :
27 अग्नी :
प्रतिक्रिया
10 Jul 2020 - 3:08 pm | कुमार१
क्लासमेट्स >>> चूक
कारण तुम्ही 'संजय मोने' दुसऱ्यांदा घेऊ शकत नाही .
10 Jul 2020 - 3:06 pm | कुमार१
आनंद इंगळे, संदीप कुलकर्णी, जयवंत वाडकर,
पल्लवी पाटील, कादंबरी कदम, वेलणकर, अश्विनी भावे
10 Jul 2020 - 3:10 pm | कुमार१
पल्लवी पाटील, कादंबरी कदम, अश्विनी भावे
असे वाचावे.
10 Jul 2020 - 3:22 pm | कुमार१
३, ६ आणि ८ अक्षरी प्रत्येकी एक चित्रपट राहिलाय.
10 Jul 2020 - 9:25 pm | कुमार१
आता पहिले निम्मे तर सुटलंय,
पुढचं निम्मे सोपे जायला हवे :))
10 Jul 2020 - 10:08 pm | सत्यजित...
संदीप-कादंबरी
अजिंक्य
11 Jul 2020 - 6:59 am | कुमार१
अजिंक्य
बरोबर
11 Jul 2020 - 11:09 am | आवडाबाई
जयवंत वाडकर-पल्लवी पाटील : तू तिथे असावे
अश्विनी भावे-आनंद इंगळे: आजचा दिवस माझा
11 Jul 2020 - 11:29 am | कुमार१
बरोबर . छान.
सत्यजित सर्वोत्तम .
सर्वांना धन्यवाद !
13 Jul 2020 - 5:43 pm | कुमार१
आता घेऊया ‘पर्यावरण’ हा विषय.
खाली सहा निरर्थक वाक्ये दिलेली आहेत. त्यातील शब्दांचा क्रमही विस्कटलेला आहे. प्रत्येक वाक्यात दिलेल्या विषयाचा एक शब्द दडलेला आहे. योग्य ती अक्षरे उचलल्यावर तो तयार होईल. अशा प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या वाक्यापुढील कंसात दिली आहे. ती संबंधित वाक्याच्या शब्दसंख्येइतकी नाही. त्यामुळे अक्षरे कशी उचलायची हे तुम्ही ठरवा.
असे विषयाशी संबंधित सहा शब्द तयार करा. ते झाल्यावर आणि खालीलप्रमाणे मांडल्यावर असे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल :
(१ २ ३ ) असल्याने ( ४ ५ ६ ).
...............................
१. सुपरिचित कापाकापीतून निरंतर चिकटवले. ( ५ अक्षरी शब्द )
२. दर्जाहीन शस्त्रोपवित उगवलेले.( ४)
३. विपरित चंद्रकोरीच्या आधारभूत पळत्याच्या दिसाकडे ( ६)
४. वजनदार दर्यावर्दीने म्हणावयाचा अपहरण (६)
५. उमजतोय कलकलाट भुसभुशीत (४)
६. हसलाकाळ ढालगज सडेतोड. (४) .
13 Jul 2020 - 7:10 pm | सत्यजित...
४.पर्यावरणाचा
५.समतोल
६.ढासळला
13 Jul 2020 - 7:33 pm | कुमार१
४.पर्यावरणाचा
५.समतोल >>> एक्दम बरोबर !
ढासळला >> शेवटचे अक्षर वेगळे. शेवटी वाक्य करताना सुधारता येईल.
13 Jul 2020 - 7:40 pm | सत्यजित...
ढासळतो.
13 Jul 2020 - 7:43 pm | सत्यजित...
उर्जास्त्रोत?
13 Jul 2020 - 7:53 pm | शा वि कु
पारंपरिक
13 Jul 2020 - 8:36 pm | कुमार१
उर्जास्त्रोत, पारंपरिक, ढासळतो.
>>> सर्व बरोबर !
14 Jul 2020 - 9:34 am | कुमार१
हे राहिले:
३. विपरित चंद्रकोरीच्या आधारभूत पळत्याच्या दिसाकडे ( ६)
14 Jul 2020 - 4:28 pm | कुमार१
३ = कोळसाधारित.
पूर्ण वाक्य:
पारंपरिक उर्जास्तोत कोळसाधारित
असल्याने
पर्यावरणाचा समतोल ढासळतो.
14 Jul 2020 - 7:21 pm | सत्यजित...
मात्र 'संधी' असावासे वाटले नाही.
14 Jul 2020 - 8:20 pm | कुमार१
हरकत नाही; तुम्ही नेहमीप्रमाणे बाजी मारलीत !
छान
17 Jul 2020 - 7:46 am | कुमार१
नवा खेळ पूर्ण नव्या ढंगात !
विषय: समाज.
खाली दिलेल्या ८ प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील मूळ अक्षरांची संख्या (म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, जोडाक्षर, रफार,इ. असलेली सर्व अक्षरे सोडून).
(उदा. ‘शासनयंत्रणा’ चा तपशील ६, २ असा असेल).
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक समस्या कोणती ? ( 6, 2)
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, 3)
३. समस्या १ वरील महत्त्वाचा उपाय कोणता ? ( 9,6 )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या (आजार) ? ( 4,2 )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5,1 ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सदोदित काय सहन करावे लागते ? (5, 4).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, 4 ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, 4).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर ....
17 Jul 2020 - 3:18 pm | मराठी_माणूस
(उदा. ‘शासनयंत्रणा’ चा तपशील ६, २ असा असेल).
हे जरा अजुन समजाउन सांगाल का ? ६ समजले , २ समजले नाही
17 Jul 2020 - 4:00 pm | सत्यजित...
जलप्रदूषण
17 Jul 2020 - 4:29 pm | कुमार१
‘शासनयंत्रणा’ चा तपशील ६, २ म्हणजे :
या शब्दातील एकून अक्षरे ६,
त्यातील मूळ अक्षरे फक्त २ - स , न.
.......
म्हणून जलप्रदूषण चूक. कारण ते ६, ४ आहे !
17 Jul 2020 - 4:33 pm | सत्यजित...
१.वायूप्रदूषण
17 Jul 2020 - 4:42 pm | कुमार१
वायूप्रदूषण नाही. हे पण चूक.
विषय : समाज , हे लक्षात घ्या.
पर्यावरणातली समस्या झाली. प्रश्नात विचारलेली समस्या प्रचंड मूलभूत आहे तुम्ही आम्ही आपण सगळे देखील त्या समस्येत अंतर्भूत आहोत !!
गेली कित्येक वर्षे आपण येता जाता त्या समस्येचा उल्लेख करतो आणि त्यामुळे “आपले सगळे असं” असे म्हणत असतो.
इतकी ती मूलभूत आहे. १ चे उत्तरा वरच खेळाचा पुढचा सगळा डोलारा उभा आहे. म्हणून ते माझ्या मनातलेच येण्यासाठी मी तुम्हाला अजून सुद्धा मदत करेन.
17 Jul 2020 - 5:09 pm | सत्यजित...
असल्याने प्रदूषणाशी निगडीत असावे वाटले होते.
17 Jul 2020 - 5:02 pm | कुमार१
१ ची समस्या आपली आणि चीनची पण आहे. त्यांच्या राजकीय व्यवस्थेमुळे चीन त्याच्यावर कायद्याने पण नियंत्रण आणू पाहते.
पण आपण खरी लोकशाही पडलो. त्यामुळे आपण त्या समस्येकडे हताशपणे बघत बसतो....
आता सोप्पे ? :))
17 Jul 2020 - 5:03 pm | मराठी_माणूस
लोकसंख्या. पण हे ६ ,२ मधे बसत नाही.
17 Jul 2020 - 5:07 pm | सत्यजित...
लोकसंख्यावाढ
17 Jul 2020 - 5:13 pm | सत्यजित...
जंगलतोड
17 Jul 2020 - 5:16 pm | मराठी_माणूस
२. निरक्षरता ?
17 Jul 2020 - 5:19 pm | कुमार१
१ लोकसंख्यावाढ व
२. निरक्षरता बरोब्बर , छान !
17 Jul 2020 - 5:29 pm | कुमार१
आता बघूया ३.
उडी मारून पुढच्या प्रश्नाकडे जाऊ नका. ३ हे काय आहे ते तसं सोपे आहे. त्यासाठी एक वापरून वापरून गुळगुळीत झालेला सरकारी शब्द तुमच्या मनात आला असेलच. पण, त्याऐवजी कोडयासाठी एक खास लांब शब्द वापरला आहे. त्यासाठी तुम्हाला जरा ताण द्यावा लागेल !
17 Jul 2020 - 5:39 pm | मराठी_माणूस
हो, मनात "समाननागरीकायदा" हा शब्द आला होता
17 Jul 2020 - 5:41 pm | कुमार१
कायद्याकडे नका जाऊ,
समाजशास्त्र आणि वैद्यकाच्या दृष्टीने शब्द बघा
17 Jul 2020 - 5:45 pm | कुमार१
Demography हा संपूर्ण कोड्याचा विषय आहे .
17 Jul 2020 - 6:19 pm | मराठी_माणूस
३. स्त्रीपुरुषसमानता. हा शब्द नक्की नाही , पण ह्याच्याशी संबंधीत आहे का ?
17 Jul 2020 - 6:27 pm | कुमार१
म मा
नाही. लोकसंख्या नियंत्रणात आणायला थेट उपाय कोणता? असा विचार करा. त्यासाठी लोकसंख्याशास्त्रातील शब्द हवा.
17 Jul 2020 - 6:32 pm | कुमार१
१९७५च्या आणीबाणीत सक्तीने उपद्व्याप केल्याने ‘तो’ ६ अक्षरी शब्द बदनाम झाला. पुढे त्याला पर्यायी शब्द सरकारने काढला.
आपल्याला ९ अक्षरी हवा आहे !
17 Jul 2020 - 6:35 pm | कुमार१
तो ७ अक्षरी बदनाम झाला
17 Jul 2020 - 6:51 pm | पलाश
३ जुने बदनाम झालेले नाव : कुटुंबनियोजन
नवे नाव : कुटुंबकल्याणयोजना (९/४)?
17 Jul 2020 - 6:59 pm | कुमार१
तुमची दिशा योग्य आहे.
आता ९, ६ वाला योग्य शब्द शोधा !
17 Jul 2020 - 7:00 pm | कुमार१
'सरकारी' दृष्टीने बघण्याऐवजी 'लोकसंख्याशास्त्राचे' दृष्टीने बघा .
17 Jul 2020 - 8:19 pm | कुमार१
निसर्गानुसार कुठल्याही समाजात दोन घटना कायम घडत असतात. त्यांचा समतोल बिघडला की मगच लोकसंख्या वाढ होत राहते .
बघा या माहितीचा काही उपयोग होतोय का !
17 Jul 2020 - 9:12 pm | पलाश
घटणारा मृत्युदर व तुलनेने स्थिर जन्मदर यामुळे लोकसंख्यावाढ होते.
पण यासंबंधी कोड्यातला हा शब्द काही सांगता येत नाही.
17 Jul 2020 - 9:16 pm | कुमार१
ठीक आहे .
सध्या ३ बाजूला ठेऊ. अन्य कोणी बघेल.
कुटुंबनियोजन न केल्यास ४ व ५ समाजात उद्भवतात. त्यांची उत्तरे देऊ शकता.
17 Jul 2020 - 9:20 pm | शा वि कु
बेरोजगारी ?
17 Jul 2020 - 9:24 pm | कुमार१
बेरोजगारी >>>
अग्दी बरोबर !
17 Jul 2020 - 9:40 pm | पलाश
४. कुपोषण
17 Jul 2020 - 9:44 pm | कुमार१
४. कुपोषण >>>
आ हा, बरोबर !
...
आता ६ घ्यावे...
18 Jul 2020 - 4:12 am | सत्यजित...
कमतरता
17 Jul 2020 - 10:10 pm | शा वि कु
गलबलाट ?
खात्री नाही.
17 Jul 2020 - 10:11 pm | शा वि कु
विकसनशील
17 Jul 2020 - 10:17 pm | कुमार१
गलबलाट >>> बस्स, थोडासा बदला !
विकसनशील >>> बरोबर !
शा वि कु , मस्तच ,
३ चे आव्हान घ्याच !
17 Jul 2020 - 10:42 pm | कुमार१
३ व ८ राहिले.
शुभ रात्री
सकाळी भेटू !
18 Jul 2020 - 4:18 am | सत्यजित...
समाजप्रबोधन
18 Jul 2020 - 4:32 am | सत्यजित...
महिला-सबलीकरण
18 Jul 2020 - 6:26 am | कुमार१
समाजप्रबोधन बरोबर
महिला-सबलीकरण चूक.
६ गजबजाट
18 Jul 2020 - 10:55 am | सत्यजित...
आपला निर्णय मान्य पण,मला 'कमतरता' अधिक समर्पक उत्तर वाटते.
18 Jul 2020 - 11:31 am | कुमार१
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सदोदित काय सहन करावे लागते ? (5, 4).
>>>>>
माझे उत्तर ‘गजबजाट’.
तुमचे : कमतरता .
माझे स्पष्टीकरण :
प्रश्नातील “आपल्या सर्वांना” हे पाहा. कायम सर्वत्र गर्दी ही देशातील सर्वांनाच सहन करावी लागते.
‘कमतरता’ ही जाणीव आर्थिक परिस्थितीची निगडीत आहे. = सापेक्ष.
तसेच सर्व गोष्टींची ‘कमतरता’ सदोदित असेल काय ?
..........
मतभिन्नतेचा आनंदच आहे. अशी चर्चा जरूर व्हावी. ३ च्या उत्तराबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन !!
18 Jul 2020 - 12:22 pm | सत्यजित...
आपण मांडलेल्या निकषावर विचार करुन मी माझे मत मांडले होते. मतभिन्नतेवर एकमत आणि चर्चेचे स्वागत असल्याने,जरा विस्ताराने भूमिका लिहितो आहे.
सापेक्षता तशी गजबजाटाच्या बाबतीतही आहे. जसे शहरी,निमशहरी,ग्रामीण भागांत यांत बरीच तफावत दिसते.
आर्थिक दृष्टीने समाजात वेगवेगळे वर्ग असले तरी,आवश्यक-अत्यावश्यक सेवा,संसाधनांची उपलब्धता,त्यासाठी लागणारा वेळ व मूल्य याची झळ सर्वांनाच सोसावी लागते. वाढती मागणी व अपुरा/घटता पुरवठा,याने उपलब्धता,वेळ व मूल्य आपल्या सर्वांसाठीच खर्चीक व दुष्प्राप्य होत राहते. किंबहुणा,या कमतरतेमुळेच,ठिकठिकाणी गजबजाट पहायला मिळतो.
बाकी,यावेळचे कोडे मात्र कठीणच होते! येवू द्या अजून!
18 Jul 2020 - 12:33 pm | कुमार१
सत्यजित
तुमचे स्पष्टीकरण आवडले. माझे स्पष्टीकरण लिहिल्यानंतर मलाही पश्चातबुद्धी झाली होती, की गजबजाट देखील सापेक्ष वाटू शकतो किंवा ठरवता येऊ शकतो.
अगदी बरोबर.
थोडक्यात हा मुद्दा असा आहे- एकाच वक्त्याला चर्चेतील दोन्ही बाजूंनी बोलायला सांगितले, तर तर तो दोन्हींचे समर्थन करून दाखवू शकतो. तसं हे काहीतरी आहे.
धन्यवाद !
18 Jul 2020 - 7:38 am | कुमार१
सर्वांचाच खेळ आतापर्यंत छान झाला आहे. आता फक्त ३ राहिले आहे. त्या शब्दाचा आशय कुटुंबनियोजन हाच आहे. पलाश यांचा हा प्रतिसाद त्या शब्दाच्या बऱ्यापैकी जवळ जात आहे :
घटणारा मृत्युदर व तुलनेने स्थिर जन्मदर यामुळे लोकसंख्यावाढ होते.
लोकसंख्याशास्त्रावरील लेखांमध्ये आपल्याला हा शब्द आढळतो.
मला खात्री आहे की तुमच्यापैकी कोणीतरी तो नक्की शोधून काढेल !
18 Jul 2020 - 10:48 am | सत्यजित...
जननदर-नियंत्रण
18 Jul 2020 - 10:53 am | आवडाबाई
भारी
18 Jul 2020 - 10:53 am | शा वि कु
हा बरोबर वाटतोय. ९-६ पण आहे
18 Jul 2020 - 11:29 am | पलाश
लोकसंख्येचा समतोल राखणारा हा शब्द बरोबर वाटतो आहे.
18 Jul 2020 - 10:45 am | आवडाबाई
जन्मम्रुत्युअसमतोल ?
लोकसंख्याअसमतोल ?
18 Jul 2020 - 10:50 am | आवडाबाई
उपाय हवाय ना म्हणजे समतोल
18 Jul 2020 - 11:22 am | कुमार१
जननदरनियंत्रण >>
अग्दी बरोब्बर !
अभिनंदन !!
18 Jul 2020 - 11:36 am | मराठी_माणूस
सत्यजीत ह्यांचे अभिनंदन.
आणि तुम्हाला धन्यवाद कोड्यासाठी . खुप विचार करावा लागला, मजा आली.
आता पुढील कोड्याची वाट पहात आहे .
एक विनंती, नवीन कोड्यासाठी नवीन धागा चालु करावा.
18 Jul 2020 - 12:15 pm | कुमार१
वरील सर्व सहभागी सदस्यांचे आभार.
या वेळेस प्रत्येक सहभागीने किमान एक उत्तर बरोबर दिले हे छान वाटले. तुमच्या सहभागानेच विचारमंथन होते. म मा यांच्या सूचनेची नोंद घेतोय.
माझी पण एक विनंती.
शब्दखेळात नियमित सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने सवडीने एक तरी कोडे तयार करावे. आतापर्यंत ज्ञा पै व मी हेच कोडेनिर्माते राहिलो आहोत. तेव्हा अशा नव्या धाग्याचे उद्घाटन तुमच्यापैकीच कोणी तरी करा.
प्रतीक्षेत !