शब्दखेळ : विरंगुळा

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
24 May 2020 - 3:45 pm

शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा

खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.

1 ऐच्छिक :
2 अपूर्णता :
3 विष्णूचे स्थान :
4 वाचा :
5भिन्नता :
6काळी तुळस :

7 सावत्र :
8धन्वंतरी :
9कायदेशीर :
10 आश्चर्य :
11गरूड :
12 समृद्धी :

13 सीता :
14 ऐश्वर्य :
15 निष्फळता :
17 शत्रू :
18 चारा :

19 संन्यासी :
20 ओसाड :
21 कुबेर :
२२. चतुर्वर्णापैकी एक :

23. विष्णूभक्त :
24 निज
25 सूड उगवणे :
26 लग्नाची एक पद्धत :
27 अग्नी :

भाषाविरंगुळा

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

13 Jun 2020 - 2:59 pm | कुमार१

म मा,
होय ! आता तुम्हाला सोपय...

मराठी_माणूस's picture

13 Jun 2020 - 3:06 pm | मराठी_माणूस

धन्यवाद.

"प्रख्यात नाटककार. यांचे वडील प्रसिद्ध कवी." ह्याचे उत्तर तर वसंत कानेटकर हे निश्चित आहे , मग "वसंत कानेटकर" कोडे २ ऐवजी ३ चे उत्तर आहे का ?

कुमार१'s picture

13 Jun 2020 - 3:11 pm | कुमार१

वसंत कानेटकर" कोडे ३ चे उत्तर आहे .
सहज, नाटक ओळखाल ?

मराठी_माणूस's picture

13 Jun 2020 - 3:15 pm | मराठी_माणूस

अश्रुंची झाली फुले

गणेशा's picture

14 Jun 2020 - 9:22 am | गणेशा

ओह..

लाल्या..

मस्त..

कुमार१'s picture

13 Jun 2020 - 3:17 pm | कुमार१

बरोबर
आता २ व ५ राहिले

कुमार१'s picture

13 Jun 2020 - 3:23 pm | कुमार१

५ तसे झालेच की.
शक्य असल्यास नाटक ?

२ च राहिले

कुमार१'s picture

13 Jun 2020 - 6:50 pm | कुमार१

फक्त.... हे बाकी

२. याचा नायक विमा प्रतिनिधी आहे. त्याचा नेटका संसार. उपकथानकात एक वेगळी ‘जोडी’ आणि त्यांचे ‘उद्योग’ आहेत. शोकांतिका.

आणि त्याची जोडी कोणाशी ते तुम्हाला माहितीच आहे.
येउद्यात रात्रीपर्यंत !

कुमार१'s picture

14 Jun 2020 - 7:50 am | कुमार१

तासाभराने उत्तर लिहितो......

कुमार१'s picture

14 Jun 2020 - 9:36 am | कुमार१

२. महासागर : जयवंत दळवी

सर्वांना धन्यवाद !
>म मा >>> विशेष कौतुक !

मराठी_माणूस's picture

14 Jun 2020 - 10:33 am | मराठी_माणूस

धन्यवाद. खुप मजा आली आठवताना आणि शोधताना.

रत्नाकर मतकरींच्या नाटकाचे नाव काय ?

कुमार१'s picture

14 Jun 2020 - 10:39 am | कुमार१

५. इथं हवय कुणाला प्रेम : मतकरी

कुमार१'s picture

14 Jun 2020 - 11:46 am | कुमार१

नाटक आणि नाटककार

१. सूर राहू दे : शन्ना नवरे
२. महासागर : ज. दळवी
३. अश्रूंची झाली फुले : वसंत कानेटकर

४. अशी पाखरे येती : वि. तेंडुलकर
५. इथं हवय कुणाला प्रेम : मतकरी
६. आसू आणि हसू : प्र ल मयेकर
७. मित्र : डॉ शिरीष आठवले

कुमार१'s picture

15 Jun 2020 - 2:51 pm | कुमार१

मित्रहो,
आता एक विशेष खेळ. तुम्हाला लेखकच ओळखायचे आहेत, पण हे दुसरे तिसरे कुणी नसून खुद्द आपलेच मिपाकर आहेत !
प्रत्येकाच्या इथल्या संग्राह्य लेखनातून एक निवडक उतारा घेतलाय. त्या शैलीवरून तुम्ही लेखक सहज ओळखाल याची खात्री आहे !

म्हणूनच आता लेखकाचा कुठलाही परिचय देत नाही. अहो, हे सर्व आपले जुने जाणते सहकारीच आहेत. परिचय न दिल्यामुळे कोडे चटकन संपणार नाही असे वाटते. सुरवातीच्या प्रतिसादांवरून ठरवतो.

...........................................................................
१.
त्याशिवाय महड गावातून पालीकडे जाणारा एक जवळचा रस्ताही त्यांनी सुचवला. त्यांचा शब्द प्रमाण मानुन पळसदरी रस्त्याला लागलो. खरोखरच खड्डे भरलेले होते. एक सांगायचं राहिलं.... बदलापूर कर्जत रस्त्यावर नेहमीप्रमाणेच नेरळच्या आसपास मोराची केकावली मस्त ऐकू आली. दहाच्या आसपास महडला पोचलो. हॉटेल साई गणेश येथे नाश्त्याकरता थांबलो. या हॉटेलचा मालक निव्वळ धन्देवाला नसून एक रसिकही आहे. हॉटेलमध्ये मित्र, बाप, आई, बहिण, कुटुंब अशा अनेक मानवी नात्यांच्या व्याख्या अत्यंत सुंदर, समर्पक स्वरुपात इंग्रजीत लिहिल्या आहेत. नाश्ता आणि सोलकढी यांचा आस्वाद घेतल्यावर हॉटेल मालकाची थोडा सुसंवाद साधला.
.................................................................................................
२.

मात्र याचा इफेक्ट उलटा झाला. अचानक दहाबारा कुत्री कुठून आली कळले नाही. "साल्यांनो दिवसा या, दाखवतोच तुम्हाला" मनात विचार आला. फार आक्रमक पद्धतीनं ती कुत्री अंगावर यायच्या बेतात होती. अगदी फुटभर अंतरावरुन जोरजोरात भुंकत होती. मला आता भिती वाटायला लागली होती. सावधगिरी म्हणून मी पाठीवरची सॅक हातात घेतली. माझी सॅक हेच माझे हत्यार. पुढे मागे बघत आपण त्या गावचेच नाही असा विचार करत चालू लागलो. पाळीव कुत्रीही फाटकाच्या आतून भुंकू लागली. मला वाटले एखादा वाचमन वगैरे काठी घेऊन येईल आणि माझी सुटका करेल. पण तसे काही झाले नाही.
......................................................................................................................................................................................
३.
कुणीतरी ह्या विषयावर धागा काढेल असे वाटत होते पण.....
एक श्रीलंकेविरूद्धचा सामना सोडला तर आजपर्यंत तरी भारतीय महिलांनी ह्या वेळी चांगली कामगिरी केली आहे.
मिताली राज स्वतः एक अप्रतिम फलंदाज आणि एक उत्तम संघनायक तर आहेच पण ह्यावेळी स्मृती मंधाना आणि पूनम राऊत ह्यांच्यामुळे एक उत्तम ओपनिंग पण मिळत आहेच.
झूलन गोस्वामी, एकता बिश्त, दिप्ती शर्मा, हरमीत कौर, पूनम यादव, मानसी जोशी आणि शिखा पांडे ह्यांची गोलंदाजी पण बर्‍यापैकी होत आहे.
..............................................................................

४.
याच जिममधला एक जबर हसवलेला पण काहीसा डेंजर किस्सा. हेवी बेंचप्रेस करत होतो. त्या दिवशी एकही इन्स्ट्रक्टर नव्हता, दुपारची वेळ होती. तीन चारच जण जिममधे होतो त्यामुळे मी आणि माझा मित्र एकमेकांना स्पॉट करत होतो, सपोर्टला उभे होतो. माझा मित्र बेंचप्रेस करत होता, पन्नास किलो. त्यावेळी रिसेप्शन वर कोण बया होती ठाऊक नाही पण जुनी हिंदी गाणी लावत होती. 'आप जैसा कोई मेरी ज़िंदगी में आए' हे गाणं लावलं होतं. या गाण्यात '...तो बात बन जाए.........' या ओळीनंतर एक 'टू.....' असा आवाज आहे. जिमच्या त्या (गाण्याव्यतिरिक्त) शांततेत बेंचप्रेस मारत असताना हा 'टू..........' आवाज आला
..............................................................................
५.

इथं मला अनेकदा भारतातली खेडी आठवतात. स्त्रिया कमी शिकतात; घरकाम ही त्यांचीच जबाबदारी वगैरे अनेक गोष्टी इथंही दिसतात. इकडे मुलीच्या वडिलांना मुलाकडून पैसे मिळतात; त्यामुळे पैशाच्या लोभाने मुलींना फार लवकर लग्नात अडकवलं जातं. कौटुंबिक अत्याचार आणि आरोग्य असे अनेक प्रश्न त्यातून उद्भवतात. अर्थार्जनाची आधुनिक कौशल्य कमी असल्याने बरेचदा स्त्रिया ‘स्वस्तातल्या कामगार’ असतात.
संसदेत आणि विधानसभांमध्ये स्त्रियांची संख्या चांगली आहे (सुमारे ४०%), पण त्या कितपत सक्रीय आहेत ते माहिती नाही. बँका, सरकारी कार्यालयं अशा ठिकाणी स्त्रिया दिसतात आणि सहजतेने वावरतात. चारचाकी चालवणा-या खूप स्त्रिया दिसतात – पण हे फक्त शहरांत.
.........................................................................................................................................................
६.

ते बुट होते भारतीय राजकारणाचे , ते बुट होते भारतीय समाजमनाचे . ती एकमात्र निशाणी मागे ठेवून तो लोकनायक परलोकवासी निघाला होता . पुढील काही दशके तरी या नेत्याची , या राष्ट्राला गरज भासणार होती . त्याच्या अशा अकाली जाण्याने राजकारणात कधीही न भरणारी पोकळी निर्माण होणार होती . या घडी नंतर संपूर्ण देश दु:खाच्या खाईत लोटला जाणार होता .
या घटनेचा मोहनवर इतका गंभीर परिणाम झाला की , त्या दिवसापासून त्याची वाचा गेली . तो कुणालाही प्रतिसाद देत नाही . त्याचे नैसर्गिक विधींवर पण नियंत्रण राहिले नाही . एकूणच त्याचा संपूर्ण शरीरावरचा ताबा सुटला आहे . नियंत्रणात आहेत ते फक्त डोळे , त्यांना खुप काही सांगायचंय
………………………………………………………………………
७.

स्वयंपाकघर, लिविंग रूम, एक आमची बेडरूम आणि गेस्ट रूम आणि बाथरूम/ टॉयलेट. हे सर्व 3००--३५० स्क्वेर फुट मधे बसविणे हे त्या आर्किटेक्ट्स चं कौशल्य होतं.
या सगळ्या घरांना जमिनीवर फरशीच्या जागी तातामी चटाया. या तातामीची जमीन दिसायला फार छान दिसते. जागा वाचवण्यासाठी घरात सगळी सरकणारी दारं असायची. तसेच आमच्या घरी सोफे किंवा झोपायला पलंग हे प्रकार नव्हतेच, ठेवणार कुठे? लिविंग रूम मधे बसायला गाद्या आणि लोडांची भारतीय बैठक आणि बेडरूममधे झोपायला जपानी गाद्या-फूतोन.
………………………………………………………………………………

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jun 2020 - 4:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी एवढा प्रतिथयश लेखक असुन सुध्दा माझ्या विपुल लेखनातला एकही उतारा न घेतल्या बद्दल सर्वप्रथम कुमार१ सरांचा निषेध... पण उतारे वाचल्यावर काही अंदाज बांधता आले.

१. भटक्या खेडवाला ?
२. जव्हेरगंज... हो नक्की तेच...
३. कुणीतरी ह्या विषयावर धागा काढेल असे वाटत होते पण. - असे फक्त आमचे मुवि काकाच लिहू शकतात.
७. पदमावती ताई- जपान वरचा लेख

बाकीचे पण वाचलेले आहे.. नक्की आठवेल... परत एकदा वाचून बघतो

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jun 2020 - 4:14 pm | ज्ञानोबाचे पैजार

५. शशकच्या प्रणेत्या अतिवासताई

पैजारबुवा,

कुमार१'s picture

15 Jun 2020 - 4:14 pm | कुमार१

एकदम बरोबर !
निषेधाचा प्रेमाने स्वीकार !
आता ४, ५, ६ राहिले. आपण निवृत्ती घ्यावी इथून
☺️

कुमार१'s picture

15 Jun 2020 - 4:15 pm | कुमार१

बरोबर
आपण निवृत्ती घ्यावी इथून.
☺️

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jun 2020 - 4:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

एक तर पहिल्यांदा तुम्ही आमच्या आवडत्या खेळपट्टीवर खेळायला उतरलात. याच्या आधी सगळ्या मॅच मधे शुन्यावर आउट व्हावे लागले. आता जरा कुठे शतक करेन म्हटले की तुम्ही रिटायर व्हायला सांगत आहात. ये नाही चॉलबे...

तरीपण तुमच्या विनंतीस मान देउन उरलेली उत्तरे पण मिळवतोच पण इथे सांगणार नाही...

पैजारबुवा,

कुमार१'s picture

15 Jun 2020 - 4:31 pm | कुमार१

तुमचे शतक मंजूर केले !
४ व ६ राहिले

अभ्या..'s picture

15 Jun 2020 - 6:10 pm | अभ्या..

४ वेल्लाभट
६ गुल्लुदादा

कुमार१'s picture

15 Jun 2020 - 6:17 pm | कुमार१

एकदम बरोबर अभ्या .
कोडे संपले.
आता यापुढचे कोडे किमान दोन दिवस टिकेल, असे द्यायची जबाबदारी आताचे सामनावीर ज्ञा पै यांची आहे !

अभ्या..'s picture

15 Jun 2020 - 6:20 pm | अभ्या..

पण डॉक हा प्रकार नको कोड्याचा.
कारण तो पॅरा उचलुन गुगल्यात टाकला की लगेच लिंक येते लेखाची. ;)
(मी असे केले नाही हे नमूद करतो)

कुमार१'s picture

15 Jun 2020 - 6:44 pm | कुमार१

हरकत नाही. प्रकार बदला

कुमार१'s picture

17 Jun 2020 - 2:26 pm | कुमार१

टाळेबंदी विशेष पर्वातील पुढच्या शब्दखेळात आपले स्वागत. आपल्या सर्वांच्या सहभागाने खूप मजा येत आहे. आतापर्यंत आपण भाषा, संगीत, नाट्य, चित्रपट, संस्कृती इत्यादी क्षेत्रात विहार केला. आता घेऊया राजकारण.

या नव्या खेळात तुम्हाला भारतीय राजकारणी ओळखायचे आहेत. त्या प्रत्येकाची थोडक्यात माहिती दिली आहे. या लोकांनी त्यांच्या जीवनात विविध टप्प्यांवर केलेल्या भूमिका दिल्या आहेत. ते आज काय आहेत याचा उल्लेख असेलच असे नाही.

या खेपेस जोड्या जुळविणे हा प्रकार नाही. व्यक्तींच्या माहितीवरून त्यांना ओळखावे. गरजेनुसार अधिक माहिती वाढवेन.
………………………………

१. व्यावसायिक उच्चशिक्षण. जागतिक स्तरावरील अनेक संस्थांशी संबंधित. राज्य पातळीवर मंत्रीपद नव्हते पण केंद्रात अनेक महत्वाची मंत्रि‍पदे. ‘G 20’ चे ‘शेर्पा’.
२. विज्ञानात पदव्युत्तर. शिक्षक. एक महत्वाचे राष्ट्रीय शौर्यपदक. मुख्यमंत्री. राज्यपाल.

३. भाषा व राजकारण या विषयात परदेशातून पदव्युत्तर. लेखक, संपादक, प्रकाशक. पक्षाचे महासचिव.
४. राज्यस्तरावरील एक महत्वाचे मंत्रिपद प्रदीर्घ काळ. वंचित कल्याणाच्या अनेक योजनांत यशस्वी. संयुक्त राष्ट्रसंघाकडून कौतुक. लेखक.

५. कला शाखेत पदव्युत्तर. टोपण नावाने विविध साहित्यलेखन. शिक्षक. दोन राज्यांत मंत्रि‍पदे. केंद्रीय मंत्री.
६. राज्यशास्त्रात पदव्युत्तर. इ-प्रशासनात वाकबगार. न्यायसंस्थेत योगदान. केंद्रीय मंत्री.

७. विज्ञान पदवीधर. दूरसंचार क्षेत्रात नोकरी. महाराष्ट्रातील एका पक्षाच्या तळागाळातून राजकारणास सुरवात. केंद्रीय मंत्री.
..................................................................................

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Jun 2020 - 2:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

१. सुरेश प्रभु

बाकीचे पण सांगतो

पैजारबुवा,

कुमार१'s picture

17 Jun 2020 - 2:48 pm | कुमार१

१. सुरेश प्रभु बरोबर.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Jun 2020 - 3:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

३ = अंबिका सोनी

पैजारबुवा,

कुमार१'s picture

17 Jun 2020 - 3:10 pm | कुमार१

३ = अंबिका सोनी >>. चूक.

कुमार१'s picture

17 Jun 2020 - 4:46 pm | कुमार१

मागच्या वेळेस पाटा विकेट होती. आता तसं नाय.
एकेक चेंडू जपून खेळायचा आहे...... :))

अभ्या..'s picture

17 Jun 2020 - 4:54 pm | अभ्या..

३. शशी थरुर

अभ्या..'s picture

17 Jun 2020 - 4:58 pm | अभ्या..

६. रविशंकर प्रसाद

कुमार१'s picture

17 Jun 2020 - 5:21 pm | कुमार१

३. >>> चूक

६. रविशंकर प्रसाद >>> बरोबर....
... छान !

कुमार१'s picture

17 Jun 2020 - 5:24 pm | कुमार१

३ शी गन्डायला होईल हे बरोबर.
३ मंत्री नव्हते.

सर्व मुद्दे जुळले पाहिजेत.

कुमार१'s picture

18 Jun 2020 - 12:03 pm | कुमार१

आता जे उरलेत त्यापैकी....

एक मराठी माणूस,
एक एका छोट्या राज्यात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला नेता, आणि
एक केंद्रीय मंत्री यांचा समावेश आहे.

आवडाबाई's picture

18 Jun 2020 - 12:23 pm | आवडाबाई

२. आनंदीबेन पटेल ?

कुमार१'s picture

18 Jun 2020 - 1:34 pm | कुमार१

'बाईंनी' बाईंना ओळखले ही पण धमालच !

कुमार१'s picture

18 Jun 2020 - 12:26 pm | कुमार१

२. आनंदीबेन पटेल ? >>>
अगदी बरोबर , मस्त !
आता पुढची फलंदाजी तुम्ही जोरात कराल .... :-)))

सत्यजित...'s picture

18 Jun 2020 - 12:42 pm | सत्यजित...

3.प्रकाश करात

कुमार१'s picture

18 Jun 2020 - 12:44 pm | कुमार१

3.प्रकाश करात >>
अगदी बरोबर , मस्त !
या उत्तराबद्दल तुम्हाला एक पदक !
....................................
४, ५, ७ राहिले.

सत्यजित...'s picture

18 Jun 2020 - 1:14 pm | सत्यजित...

७.अरविंद सावंत

कुमार१'s picture

18 Jun 2020 - 1:19 pm | कुमार१

७.अरविंद सावंत
बरोबर !
सत्यजित,
आता हॅटट्रिक करा ...

सत्यजित...'s picture

18 Jun 2020 - 1:28 pm | सत्यजित...

५.रमेश पोखरियाल 'निशंख'

कुमार१'s picture

15 Jul 2020 - 2:18 pm | कुमार१

रमेश पोखरियाल 'निशंक >>>
आज यांचा मराठीत इथे लेख आहे

कुमार१'s picture

18 Jun 2020 - 1:32 pm | कुमार१

सत्यजित,
आता हॅटट्रिक झाली,
बरोबर !

कुमार१'s picture

18 Jun 2020 - 2:51 pm | कुमार१

आता जे उरलंय त्याचे सूत्र नीट वाचा. त्यात मेख आहे.

४. राज्यस्तरावरील एक महत्वाचे मंत्रिपद प्रदीर्घ काळ. वंचित कल्याणाच्या अनेक योजनांत यशस्वी. संयुक्त राष्ट्रसंघाकडून कौतुक. लेखक.

आवडाबाई's picture

18 Jun 2020 - 5:33 pm | आवडाबाई

४. हंसा मेहता ?

कुमार१'s picture

18 Jun 2020 - 5:45 pm | कुमार१

४. हंसा मेहता ? >>> नाही.

कुमार१'s picture

18 Jun 2020 - 5:50 pm | कुमार१

४ ही हयात व्यक्ती आहे.

कुमार१'s picture

18 Jun 2020 - 6:56 pm | कुमार१

मेख इथेआहे :

४. राज्यस्तरावरील एक महत्वाचे मंत्रिपद प्रदीर्घ काळ.

राज्यस्तरावरील महत्वाचे मंत्रीपद म्हणजे मुख्यमंत्रीपद अपेक्षीत असेल तर,उत्तर नवीन पटनायक असावे बहुधा!

कुमार१'s picture

19 Jun 2020 - 6:33 am | कुमार१

अगदी बरोबर
तुम्ही सामनावीर ठरले,
अभिनंदन !

Prajakta२१'s picture

19 Jun 2020 - 10:21 pm | Prajakta२१

छान माहिती देणारी कोडी
धन्यवाद

गणेशा's picture

20 Jun 2020 - 12:52 am | गणेशा

किती अवघड होते.. एक पण आले नाही..

सत्यजित __^__

काम खुप असल्याने वेळ देता येईना

सत्यजित...'s picture

20 Jun 2020 - 9:55 am | सत्यजित...

पुढचे कोडे?

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 9:57 am | कुमार१

सर्वांना धन्यवाद !
..............................
आतापर्यंतच्या खेळांत भाषा, संस्कृती आणि राजकारण घेऊन झाले. आता वळूयात क्रीडा क्षेत्राकडे. इथे तुम्हाला भारतीय क्रीडापटू ओळखायचे आहेत.
या प्रत्येकाचा अल्पपरिचय व कारकीर्दीतील टप्पे दिले आहेत. ते भारतीय संघात आजी किंवा माजी असू शकतात. निवडलेल्या खेळांमध्ये क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, कुस्ती आणि मैदानी व्यायामाच्या खेळांचा समावेश आहे. या प्रत्येक खेळाचा एकच खेळाडू यादीत आहे. उत्तर देताना सर्व वैशिष्ट्ये जुळली पाहिजेत.

१. वडिलांकडून हॉकीचा वारसा पण स्वतः बंदिस्त जागेतील खेळ स्वीकारला. राष्ट्रकुल स्पर्धेत सहकाऱ्यासमवेत सुवर्णपदक.

२. दक्षिण भारतात जन्म. चेंडू आणि एक साधन यांनी खेळायचा “सेट्स” वाला मैदानवरील खेळ. पद्म पुरस्कार. या खेळाच्या अंतरराष्ट्रीय महास्पर्धेत दुहेरीत विजय मिळवणारा पहिला भारतीय. या खेळाच्या लीगची स्थापना केली.

३. इंजिनीयर. शरीराच्या एका अवयववैशिष्ट्यावरून टोपणनाव पडले. भारतीय संघाकडून काही विक्रम. हसतमुख. पद्म पुरस्कार.

४. फक्त चेंडूनेच खेळायचा मैदानी खेळ. दोघेही पालक व सासरे याच खेळातील राष्ट्रीय खेळाडू. पद्म पुरस्कार.
५. महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात जन्म. मैदानी खेळ. अर्जुन पुरस्कार.

६. स्टिकने ‘गोल’ करायचा खेळ. भारतीय संघात पिछाडीवर छान कामगिरी. पद्म पुरस्कार. माजी लोकप्रतिनिधी. व्यक्तीचे भाऊ पण खेळाडू.

७. आपले शरीर सोडून कुठलेच साधन न लागणारा खेळ. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक. जोडीदार पण हाच खेळ खेळतो. सरकारी नोकरी.
……………………………………………………………

सत्यजित...'s picture

20 Jun 2020 - 10:08 am | सत्यजित...

अश्विनी पोनाप्पा

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 10:21 am | कुमार१

अश्विनी पोनाप्पा >>> बरोबर
खाता खोला !

सत्यजित...'s picture

20 Jun 2020 - 10:31 am | सत्यजित...

सुनिल छेत्री

गणेशा's picture

20 Jun 2020 - 10:31 am | गणेशा

2. महेश भूपती

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 10:32 am | कुमार१

बरोबर !
तुमची जोडी आता डाव फटकन संपवणार वाटते !

सत्यजित...'s picture

20 Jun 2020 - 10:41 am | सत्यजित...

केदार जाधव!

(क्रिकेटचे कोडे कुठले हे कळू नये,यासाठीची गुगली मी ओळखलीय बहुतेक!)

सत्यजित...'s picture

20 Jun 2020 - 10:42 am | सत्यजित...

प्रकट सिंह

(गूगलकृपा)

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 10:50 am | कुमार१

५, ६ दोन्ही चूक.
६ मध्ये "व्यक्तीचे भाऊ पण खेळाडू." हे पण बघा.

3. राहुल द्रविड वाटतोय.. पण तो इंजिनियर नाहीये..
आणि अवयवा वरून नाही शैली वरून the वॉल नाव पडले होते..

आपला आवडता test क्रिकेटर.. सच्या बरोबर हा पण खुप आवडायचा..

चूक तर चूक :-))

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 10:54 am | कुमार१

3. राहुल द्रविड वाटतोय.. पण तो इंजिनियर नाहीये.. >>>
चूक.

म्हणूनच इंजिनियर दिलयं....

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 10:53 am | कुमार१

केदारचा जन्म पुण्यातला आहे !!!

५ हा साधने लागणारा मैदानी खेळ आहे

सत्यजित...'s picture

20 Jun 2020 - 10:56 am | सत्यजित...

लोकप्रतिनिधी होते का?

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 11:02 am | कुमार१

६ हयात आहेत, मध्यमवयीन,
'ते' पद २०१८ ला सम्पले.

सत्यजित...'s picture

20 Jun 2020 - 11:08 am | सत्यजित...

संदीप सिंह

सत्यजित...'s picture

20 Jun 2020 - 11:14 am | सत्यजित...

लोकप्रतिनिधी?

सत्यजित...'s picture

20 Jun 2020 - 11:10 am | सत्यजित...

आजची कोडी.खेळ कुठला ते ही ओळखायचे आहे आणि मग खेळाडू!

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 11:24 am | कुमार१

६ चूक.

धनराज? लोकप्रतिनिधी नव्हते.
खेळाच्या पदाकावरून गुगल सहज होते. म्हणून थोडी अवांतर माहिती वाढवली आहे.
...
जर सचिन, राहुल हे कोड्यात घेतले तर ते कोडेच राहत नाही !

सत्यजित...'s picture

20 Jun 2020 - 11:40 am | सत्यजित...

प्रशंसनीय आहे. शोधाशोध करतानाही, उत्तर नाहीच मिळाले तरी बरीच ईतर माहिती सापडते!

३. इंजिनीयर. शरीराच्या एका अवयववैशिष्ट्यावरून टोपणनाव पडले. भारतीय संघाकडून काही विक्रम. हसतमुख. पद्म पुरस्कार.
अनिल कुंबळे.

गणेशा's picture

20 Jun 2020 - 12:06 pm | गणेशा

हा असेल तर मी शोधलेले पण सांगता आला नाही असे वाटते..

कारण राहुल द्रविड आठवला.. कि इंजिनियर असणारे अनिल आणि जवागल श्रीनाथ आठवलेच.. पण अनिल कुंबळे ला अवयवावरून काय नाव होते? म्हणुन मी पार prasanna, बेदि पण आठवले..

आता पुन्हा काम खुप असल्याने तिकडे जातोय..
कुमार सर भेटू निवांत पुढच्या कुठल्याश्या कोड्यात...

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 12:10 pm | कुमार१

अनिल कुंबळे ला अवयवावरून काय नाव

मोठे पाय >>> जम्बो !

सत्यजित...'s picture

20 Jun 2020 - 11:55 am | सत्यजित...

गीता फोगाट

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 12:08 pm | कुमार१

तीन बरोबर. पलाश यांचा जोरदार षटकार !

सात : उत्तराच्या अगदी जवळ आला आहात.
विकी वरील माहिती नुसार गीता सरकारी नोकरीत नसावी
गणेशा , जरूर !

सत्यजित...'s picture

20 Jun 2020 - 5:37 pm | सत्यजित...

कुंबळे गोलंदाजी करत असताना,अचानक उसळलेल्या चेंडूस सिद्धू 'जम्बो जेट' म्हणाला होता.त्यातून जेट मागे पडला नी 'जम्बो' हे टोपणनाव राहिले,असे वाचले आहे.

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 5:45 pm | कुमार१

विकी नुसार दोन्ही कारणे आहेत:
१. मोठे पाय
२. उसळणारे चेंडू

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jun 2020 - 12:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

५. कविता राउत...

पैजारबुवा,

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 12:37 pm | कुमार१

५. कविता राउत...>>>
पर्यायी उत्तर म्हणून बरोबर.
माझे 'ललिता बाबर' होते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jun 2020 - 12:32 pm | ज्ञानोबाचे पैजार

७. बबिता कुमारी फोगाट

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jun 2020 - 12:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

६. दिलिप तिर्की

पैजारबुवा,

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 12:43 pm | कुमार१

बबिता पण सरकारी नोकरीत नसावी.
‘गीता’ चे कुटुंब नीट बघा ! तिच्यापाशीच उत्तर मिळेल.

६ बरोबर ! हे कडक उत्तर !!

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jun 2020 - 12:57 pm | ज्ञानोबाचे पैजार

गीता कुमारी फोगाट हरियाणा पोलीस मधे होती
पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jun 2020 - 12:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

बबिता कुमारी फोगाट माझ्या महिती प्रमाणे हरियाणा पोलीस मधे होती

असे वाचावे.

पैजारबुवा,

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 1:01 pm | कुमार१

आता असे बघू ..
७ 'स्त्री' नसेल तर.. असा विचार करा !
विकीनुसार ७ सध्या नोकरीत आहे.

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 3:30 pm | कुमार१

७. पवन कुमार (गीता फोगाटचा नवरा )
सर्वांना धन्यवाद.
...........................

क्रीडा कोडे तयार करतानाचे काही अनुभव.

१. जर खेळाचे नाव, स्पर्धा आणि पदक हे लिहिले तर एक मिनिटात गुगल उत्तर देणार.
२. मग पुरस्काराकडे लक्ष देऊ लागलो. तर लक्षात आले, की अर्जुन काय किंवा पद्म काय, हे पुरस्कार भरपूर मंडळींना आहेत !

३. आता खेळाडू आमदार किंवा खासदार झालेले बघू लागलो, तर तिथेही बरीच मोठी यादी दिसते.
४. मग शेवटी एखाद्या खेळाडू खरोखर वैशिष्ट्य काय राहील ? काहींच्या बाबतीत पुस्तकी शिक्षण तर काहींच्या बाबतीत कौटुंबिक माहिती.
.....
अशा प्रकारे कोडेनिर्मात्याची बरीच मानसिक घुसळण होते. आपल्या मनातील उत्तराला एखादे तसेच पर्यायी उत्तर पण निघू शकते.
पण तुमच्या सर्वांच्या सहभागाने तेवढीच मजा येते. आनंद मिळतो.

धन्यवाद !