बट्ट्याबोळ-१

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in जनातलं, मनातलं
12 Jul 2020 - 6:49 pm

लॉकडाऊनचा बट्ट्याबोळ

जगभरात लॉकडाऊन हा वाढणाऱ्या पेशंटच्या संख्येच्या तयारीसाठी वापरला जात असताना आपल्या देशात मात्र हाच एकमेव रामबाण उपाय म्हणून वापरला गेला. कोणतेही प्लॅनिंग ना करता जाहीर केलेला लॉकडाऊन 1,2,3 असा मनमानेल तसा वाढवत नेला. त्यादरम्यान गरीब लोकांना अन्न पुरवण्याची , आपापल्या घरी पोचवण्याची कोणतीही सप्लाय चेन तयार केली नाही, 8 वाजता यायचा , राणा भीमदेवी थाटात घोषणा करायच्या आणि लोकांना त्यांच्या नशीबावर सोडून द्यायचे, बाकी कोणाचाही विरोध मोडायला मीडिया आणि सोशल आर्मी तयार असतेच.

या काळात एकविसाव्या शतकात कित्येकांनी शेकडो किलोमीटर मुलाबाळांसहीत प्रवास केला , कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बुडाले, कर्जबाजारी झाले , कित्येक जण प्रवासात मेले , आत्महत्या केल्या.
जेव्हा सरकारला याचा फटका बसला, इन्कम बंद झाले तेव्हा त्यांना कळले अनलोक प्रक्रिया सुरू करायला हवी, मग तेच मीडिया आणि सोशल ट्रोल्स अनलोक कसे गरजेचे आहे हे सांगू लागले, पहिल्या दिवशी कोरोना होता तसाच आतापण आहे, मग एवढ्या प्रदीर्घ 90 दिवसाच्या लॉकडाऊनचे आणि त्यांच्या परिणामांची जबाबदारी कोणाची ?

लॉकडाऊनपूर्वी जसा कोरोना होता तसाच आताही आहे, लॉकडाऊन मध्ये ना त्याचा कर्व्ह फ्लॅट झालाय ना इतर काही तयारी झाली आहे.

सगळ्या गाईडलाईन्स केंद्र सरकार ठरवणार , सगळया किट्स (चायना इम्पोर्ट ) कंपल्सरी केंद्राकडून घ्यायच्या . त्याचा सप्लाय केंद्र करेल तसाच होईल.
झेपेना झालाय तेव्हा केंद्र सरकारने अनलोक करून राज्यांवर जबाबदारी ढकलून दिली आहे.

राज्य सरकार मध्येही सगळा शिमगाच आहे, वरतून आलेला दट्ट्या साहेब कारकूनावर टाकतो तसा त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थावर टाकला आहे. मग प्रत्येक नगरपालिका , पंचायत एवढेच काय को ऑप सोसायटी सुद्धा मन मानेल ते नियम करून बेबंदपणे वागत आहेत.

सर्वसामान्य मात्र बाहेर पडले तर कोरोनाची भीती आणि घरात बसले तर उपाशी मरायची अवस्था अशा कात्रीत आहेत.

परीक्षांचा बट्ट्याबोळ

जेव्हा कोरोना साथ प्राथमिक स्टेज मध्ये होती , गावोगावी संसर्ग नव्हता , देशातला आकडा काहीशे मध्ये होता, तेव्हा परीक्षा घेणे धोकादायक आहे म्हणून लॉक डाऊन मध्ये परीक्षा घेतली नाही, आता मात्र सामूहिक संसर्गजन्य स्थितीत असताना केंद्र आणि बाहुले राज्यपाल परीक्षेचा आग्रह धरत आहेत.

कित्येक शाळा , कॉलेज कोविड सेंटर किंवा क्वारंटाइन सेंटर मध्ये परावर्तित केले आहेत, किती पालक आपल्या मुलांना अशा ठिकाणी परीक्षा द्यायला पाठवतील ? याबद्दल राज्य निर्णय घेतेय तर राज्यपाल खोडा घालत आहेत आणि केंद्र अळीमिळी गुपचीळी धरून आहे.

अभ्यास करावा की नोकरी शोधावी असा प्रश्न पडला आहे, सध्याचे केंद्रातले शिक्षण मंत्री मात्र बहुधा झोपा काढत आहेत.

जीवनमानआरोग्यप्रकटनविचारवाद

प्रतिक्रिया

आपल्या मताशी काही प्रमाणात सहमत आहे. मुळात अर्ध शासकीय कर्मचारी म्हणुन काम करतांना या काळात काय करणे आवश्यक होते आणि काय नको करायला हे लक्षात आले. पण कोणाला सांगायचे? सुरुवाती पासुन विचार केला तर पहिले दोन लॉकडाउन व्यवस्थित पार पडले. पण त्या नंतर सगळा सावळा गोंधळ सुरु झाला. या सगळ्यात कामची मांडणी करणे, लोकांना कोणत्या अडचणी येत आहेत, आवश्यकता काय आहेत? कोणता भाग धोकादायक ठरु शकतो? तेथे आवश्यक कोणत्या सुविधा किती प्रमाणात लागतील त्याची उपलब्धता कशी आणि कोठुन होणार? त्यासाठी आवश्यक आर्थिक पुर्तता कशी येणार याचा कोणताही विचार आणि नियोजन केले गेले नाही. हे नियोजन स्थानिक पातळीवर होणे आवश्यक होते. किमान जिल्हा आणि तालुका पातळीवर. वरील कार्य न होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय नोकरशाही, ही मागील काही दशकात कार्य पातळीवरुन कधीच च्युत झालेली आहे. ती आता एक संघटीत लुटारु टोळी म्हणुन काम करु लागली आहे. कोणत्याही प्रसंगात आपल्याला काय मिळणार आहे त्याचा प्रथम विचार केला जातो. अगदी निर्जंतुकीकरण औषधे असो किंवा पी पी ई कीट. सगळ्यात जास्त अमानवीपणा लोकांच्या स्थलांतर करण्यात झाला. यात केंद्राने नियोजनाच्या व्यवस्थित सुस्पष्ट मार्गदर्शक सुचना देणे आवश्यक होत्या. ते राज्यांना दिल्या किंवा कसे ने माहित नाही. राज्याने आपल्या अधिनस्थ स्वराज्य संस्थांना नियोजन देणे आवश्यक होते. याबाबत प्रत्येक विभागाने आपल्या अधिनस्थ कर्मचार्‍यांना वेळोवेळी अनेक आदेश आणि सुचना काढुन गोंधळ वाढविला. नोकरशाही कडुन आवशयक कार्य करुन घेणे हे शासन आणि राजकीय पक्ष यांचे काम होते. त्यांनी नको तितके राजकारण करुन घेतले. खर म्हणजे आता असे वाटते की जशी जनता तसे शासन. सगळ्यात मोठा दोष आपलाच आहे. मी यात मुद्दाम कोणत्याच राजकीय पक्षाबाबत मत व्यक्त करीत नाही. जरी माझी काही मते असतील तरी.

तुषार काळभोर's picture

12 Jul 2020 - 10:31 pm | तुषार काळभोर

पण आशयाशी बऱ्यापैकी सहमत.
बऱ्यापैकी यासाठी, की लॉक डाऊन करणे ही मार्च मध्ये काळाची गरज होती. त्यानंतर अनलॉक करणे ही जून नंतर काळाची गरज आहे.
प्रॉब्लेम झाला तो इम्पलिमेंट करण्यात. ' भाईयो औ र बहनो, आज रात्री अमुक वाजल्यापासून तमुक बंद '
यापेक्षा ' आपल्याला करोनाला हरवायचे आहे, नव्हे आपण त्याला हरवणारच ' हे जास्त आश्वासक वाटलं होतं.
कधीही उठून काहीही घोषणा करणाऱ्या पंतप्रधानांची आधी धास्ती अन नंतर काहीच वाटेनासे झाले. हे आलेत म्हणजे काहीतरी बट्ट्याबोळ करणार, इतकी खात्री वाटायला लागली.
महाराष्ट्रात परिस्थिती (सुरुवातीला तरी) जास्त चांगली वाटली. मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री रोज अपडेट द्यायचे, दिलासा द्यायचे. बरं वाटायचं. नंतर राजेश टोपे गायबच झाले. उद्धव ठाकरे यांची व्हिजिबिलीटी सुद्धा मागच्या एक महिन्यात कमी झाल्यासारखी वाटतेय.

त्यामुळे एकूण परिणाम म्हणजे सर्वांनी सर्व काही रामभरोसे सोडून दिलंय की काय अशी शंका यायला लागली आहे.

एकशे तीस कोटींच्या देशात अजूनही रुग्नसंख्या दशलक्ष च्या आत आहे, रस्तो रस्ती कोरोना मृत दिसत नाहीत, हा चमत्कार म्हणायला हवा, त्यामध्ये लॉक डाऊन चा मोठा हात आहेच. मात्र लॉक डाऊन चे साईड इफेक्ट - अर्थ व्यवस्थेवर अतिवाईट परिणाम, स्थलंतरीत लोकांची दुःख, स्थानिक हातावर पोट असणाऱ्या लोकांचे प्रश्न - यांचं नियोजन चुकलंच. आधी अंदाज आला नाही, हे गृहीत धरलं ( कारण परिस्थितीच अभूतपूर्व होती. अंदाज येणं शक्यच नव्हतं.) तरी अंदाज आल्यावर त्यावर काहीच केलं गेलं नाही.

इकडून तिकडे जाण्यासाठी ई पास बनवण्या मागचं लॉजिक मला अजुन कळले नाही. मागेल त्याला ई पास मिळाला असेल तर, तो दिला तरी कशाला? गावाकडून आलेल्या लोकांनी सांगितलं की सरकारी दवाखान्यात जायचं, तिथं एका बॉक्स मध्ये दहा रुपये टाकायचे, वैद्यकीय अधिकारी ताप नसल्याचा दाखला देणार, मग लोक प्रवास करू शकणार. याला काय अर्थ आहे?
एप्रिल मध्ये लोक गावी गेले. तिथे चौदा दिवस विलगीकरण. त्यानंतर कुटुंबासोबत राहायचं. मग मे मध्ये पुण्यात परतीचा प्रवास. इथे येऊन परत चौदा दिवस विलगीकरण. एक महिना विलगीकरणात वाया गेला लोकांचा.

काय चालू आणि काय बंद ठेवायचं याला काही लॉजिक असल्याचं वाटत नाही.

सगळ्या निर्णय प्रक्रियेत सर्वात वरती, निर्णय घेणारे, राजकारणी
आणि जमिनीवर तो अमलात आणणारे प्रशासकीय अधिकारी, यात आरोग्य तज्ज्ञ कुठे होते असं वाटलं च नाही. ज्याला जसं योग्य वाटेल तो तस वागतोय, निर्णय घेतोय आणि कारवाई करतोय.

तीन आठवड्यापूर्वी आमच्या हडपसरच्या घराजवळ contentment झोन केला गेला. तीन रस्ते पूर्ण पॅक केले गेले. त्यातला एक रस्ता एका स्थानिक, श्रीमंत आणि वजनदार राजकीय कुटुंबाच्या घरासमोर जात होता. दुसऱ्या दिवशी त्या रस्त्यावर असलेलं बॅरिकेड् त्या घराच्या अलीकडे आलं. कारण त्या घरातल्यांना कुठे जायला अडचण नको. असं एकूण घडलेलं आहे.

भारतासारख्या देशात हा आजार आटोक्यात ठेवायला लॉक डाऊन ची मदत झाली, यात संशय नाही. मात्र सामाजिक अन आर्थिक आघाडीवर बट्ट्याबोळ झालाय हे नक्की!

ता. क. हायला, माझं लिहिणं जास्त विस्कळीत झालं !! प्रतिसादाच्या शीर्षकासाठी सॉरी बरका..

विटेकर's picture

14 Jul 2020 - 1:09 pm | विटेकर

"संघाने मेहनत केल्याने मुस्लिम धारावीत करोना नियंत्रीत झाला याचं क्रेडिट लाटायला येताना दिसतायेत..."

संघाने असा दावा केलाय का ? तसा दावा सन्घाच्या अधिकृत प्रवक्तयाने , अधिकार्याने केला आहे का ? कशाला उगाच चिखलफेक करताय ? तुमचा मोदी द्वेष चालू द्या , संघाला मध्ये घेऊ नका .. संघ सेवाकार्य करताना हिन्दू - मुस्लिम पहात नाही हे सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे. माझा मुलगा संघातर्फे स्कनिन्ग साठी पुण्यातील तादीवाला रोड वर गेला होता , मे महिन्यामध्ये .. त्यानी अनेक मुस्लिम नागरिकान्चे स्कनिन्ग केले हे मला पक्के माहीत आहे ! उगाच ओढून ताणून बदरायणी संबंध लावायचा का ?

माध्यान्ही सुर्यावर थुन्किती | त्याची थुन्की आपणांवरी !

संघाचे धारावी सेवाकार्याबद्द्ल काय म्हणणे आहे ते पहा ..

धारावी : श्रेयवादाची लढाई.
रवींद्र मुळे.
संपर्क प्रमुख ,प.महाराष्ट्र. ( रा.स्व.संघ )
धारावी येथे कोविद १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. तो आटोक्यात आणण्यासाठी सरकार असमर्थ ठरत होते. त्यात काही सामाजिक संस्था पुढे आल्या विशेष करून संघ विचाराच्या संस्थांनी
पुढाकार घेतला. स्वयंसेवकांनी ppe kit घालून स्क्रिनिंग साठी पुढाकार घेतला. समुपदेशन झाले. काढा ,औषध, स्वच्छता ,sanitisation याचा प्रसार झाला .परिणाम स्वरूप सरकारी प्रयत्नांना ही जोड मिळाल्यावर तेथील प्रादुर्भाव झपाट्याने कमी झाला. WHO ने पण दखल घेतली. आणि येथेच गम्मत सुरू झाली.सरकारला त्याचे श्रेय मिळणे स्वाभाविक होते. विरोधी पक्षातील मंडळी हे श्रेय सरकारचे नाही संघाचे आहे हे उच्च रवात चंद्रकांत पाटील ते नारायण राणे सांगू लागले. तिकडे सत्ताधारी मंडळीनी उदार पणे हे केवळ आमचे यश नाही तर सर्वांचे आहे असे न म्हणता स्वतःची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानली. पण ज्या स्वयंसेवकांनी किंवा संघांनी हे स्वाभाविक कर्तव्य म्हणून केले ते याकडे कसे पाहतात किंवा कसे बघितले पाहिजे यासाठी संघ समजून घेण्याची गरज आहे.
पूजनीय डॉक्टरांना एकदा नागपूरकर मंडळीनी भेट घेवून सध्या नागपूरमध्ये मुस्लिम समाजाचे खूप आक्रमक रूप दिसते आहे उद्या दंगल सदृश्य परिस्थिती झाली तर तुम्ही कार्यकर्त्यांना काय सांगणार असे विचारले.डॉक्टरांनी शांत पणे सांगितले मी त्यांना अंथरूण पांघरूण घेवून कार्यालयात झोपायला बोलवेल. ते आश्चर्याने डॉक्टर यांच्या कडे बघायला लागले. डॉक्टर पुढे म्हणाले समाजात कुठलेही
कॉन्ट्रॅक्ट घेणारी संघटना असे संघाचे स्वरूप मला करायचे नाही. संघावर सगळे सोपवून समाज निष्क्रिय राहणे हे जर घडले तर ते संघाचे अपयश आहे . संघ आणि समाज वेगळे नाही. त्या मुळे सर्व समाजाला बरोबर घेवून समाजा‌ कडून ते करून घेणे यासाठी समाज उभा राहिला पाहिजे अशी संघाची भूमिका आहे. धारावीत पण तेथील समाजाने ठरवले कोरोना‌ वर मात करायची म्हणून ते घडले संघ निमित्त मात्र ठरला.संघ स्वयंसेवक रोज म्हणतात त्या प्रार्थनेत निश्रेयस असा उल्लेख आहे. त्यामुळे संघाने अमक्या वेळेस काय केले ? तमक्या वेळेस संघ कुठे होता याची उत्तरे खरे तर संघाला द्यावी वाटत नाहीत. ( स्वयंसेवक जी प्रार्थना संघ स्थानावर म्हणतात ती पण संघाची नाही तर सगळ्या समाजाची आहे अशी संघाची धारणा आहे त्यात कुठेही संघाचे नाव नाही.)
फाळणीच्या वेळेस हिंदू समाजाला सुरक्षित भारतात आणणे किंवा त्यांचे पुनर्वसनाचे कार्य करणे किंवा श्रीनगर विमानतळ पाकिस्तानने हल्ला केल्यावर बर्फ दूर करून भारतीय सैन्याला विमाने उतरवण्यासाठी उपलब्ध करून देणे, युद्धाच्या वेळी सीमेवर सैनिकांची सेवा करणे पुर, दुष्काळ ,भूकंप , वादळ ,विमान किंवा रेल्वे अपघात यात मदतीला धावून जाणे याचे कधीच श्रेय घेण्याच्या भानगडीत संघ पडला नाही. याचे श्रेय घेणे म्हणजे आज माझ्या आईचे पाय दाबून दिले. तिला औषध दिले तीची सेवा केली असे स्वतःच म्हणणे हे जितके हास्यास्पद तितके संघाने हे केले , स्वयंसेवक असे करतात असे म्हणून पाठ थोपटून घेणे हास्यास्पद आहे. म्हणूनच अनेक वर्ष रामजन्मभूमी आंदोलन करत कोठारी बंधूंचे बलिदान समोर असून प्रत्यक्ष बाबरी
ढाचा उध्वस्त झाल्यावर संतप्त हिंदू समाजाचे हे कार्य आहे असे सांगून सरसंघचालक समाजाला श्रेय देवून मोकळे झाले. आणीबाणी चा प्रदीर्घ लढा देवून ही" विसरा आणि क्षमा करा" असे म्हणताना सरसंघचालकांनी स्वयंसेवक ना चालून आलेली सत्ता पदे नाकारली.गोवा , दादरा नगर हवेली चा स्वातंत्र्य संग्रामात स्वयंसेवक अग्रेसर होते पण संघाने त्याचे श्रेय घेतलेले नाही . एखाद्याला देशभक्त म्हणणे हा त्याचा सन्मान असू शकतो पण बाकीच्यांच्या अपमान आहे असे संघाला वाटते. देशभक्त असणे किंवा मातृभक्त असणे हा गुण नाही तर
ती सहज सुलभ मानवी भावना असली पाहिजे अशी संघाची धारणा प्रथमपासून आहे. हा फार वेगळा विचार आहे. तो मुळात च समजून घेण्याचा आहे. श्रेय देणारे ,श्रेय नाकारणारे आणि श्रेय घेणारे या सगळ्यांनीच संघ मुळात समजून घेण्याची गरज आहे.
सामाजिक माध्यमे हे अत्यंत स्वस्त सोपे संवंग माध्यम व्यक्त होण्यासाठी आज सर्वांना उपलब्ध आहे. अनेक जण ज्यांना संघ स्वयंसेवकांनी केलेल्या सेवेचा उपयोग झाला ते संघाची अफाट स्तुती करतात मग ती सगळ्या समाज माध्यमातून प्रसिद्ध पावते. ज्या राजकारणी मंडळींना याचा आपल्याला फायदा आहे असे वाटते ते पण याला प्रसिध्दी देतात. या उलट जे दीर्घ द्वेष करणारी मंडळी आहेत किंवा ज्यांना असे वाटते यामुळे आपले राजकीय नुकसान आहे ,( कारण नसताना असे वाटत असते) ते संघावर मग खालच्या पातळीवर टीका करतात संघाचे व्यंगात्मक प्रदर्शन वगैरे करतात.वस्तुस्थिती कडे डोळेझाक करतात. वास्तविक स्वयंसेवकांनी
स्वतःचे जीव धोक्यात घालून काम केले ही वस्तू स्थिती आहे. ज्या तरुणांनी काम केले त्यांच्या घरातले वयस्कर मंडळी आज कोरोना positive झाले आहेत. पुणे ,नाशिक,ठाणे, डोंबिवली कल्याण मुंबई आणि धारावी सगळीकडे कार्यकर्ते काम करत आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि या कामाचा सरकार कुणाचे आहे आणि देशाचे नेतृत्व कोण करत आहे याच्याशी काही संबंध नाही हे पण लक्षात ठेवावे लागेल.
खरा स्वयंसेवक स्तुतीने हुरळून जात नाही आणि निंदा झाली म्हणून खचून पण जात नाही. कर्तव्य भावनेने या कोविडच्या काळात अन्न धान्य वाटप ते अंत्य संस्कार करण्या पर्यंत सर्व काम कुठल्याही श्रेयाची अपेक्षा न बाळगता चालू आहे ते टीका झाली म्हणून थांबणार नाही आणि कौतुक झाले म्हणून हुरळून पण केले जाणार नाही.
जेंव्हा अशी संकटे येतात तेंव्हा केवळ एखादी व्यक्ती किंवा सरकार किंवा संघटन पुरेसे नसते तर या सर्वांनी मिळून त्या संकटाला तोंड द्यायचे असते पण प्रत्येक बाबतीत राजकीय लाभ आणि मलिदा शोधणारी संस्कृती उदयाला आली की तेथे प्रश्न सोडवण्यापेक्षा श्रेय घेण्या कडे कल जास्त येतो.
संघाने आपल्या सेवा प्रकल्प, सेवा कार्य याची कधीच फारसी प्रसिध्दी केलेली नाही आणि टीका करणाऱ्या लोकांना फार महत्त्व दिलेले नाही संघाचे कार्य अविरत चालू राहणार आहे पण ते सर्व समाजाला बरोबर घेवून .संघ संस्थापक तर संघाचे लवकरात लवकर समाजात विसर्जन व्हावे या मताचे होते. आज ही संघाची हीच भूमिका आहे. या कोविद च्या काळात केवळ संघ नाही तर अनेक संस्था ,धार्मिक मठ मंदिरे , अनेक ज्ञाती संस्थांचे कार्यकर्ते अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आहेत.पुण्यात उद्योजक एकत्र आले आणि त्यांनी एक व्यासपीठ उभे करून खूप मोठे काम उभे केले. कुणी कोविद साठी रुग्णालय उभे केले. संघ आणि समाज त्यांचा मना पासून ऋणी आहे.
भाजप विरोधकांनी आपल्या राजकीय लढाईत संघाला ओढण्याची गरज नाही. पण राजकीय पक्ष म्हणून या काळात कुठल्या पक्ष कार्यकर्त्याने काय भूमिका बजावली याचे तटस्थ समीक्षण अवश्य पत्रकार मंडळीनी करावे अशी स्थिती आहे. संघ स्वयंसेवक म्हणून स्वयंसेवकांची ती जबाबदारी नाही त्यांचे ते काम पण नाही. गीतेतील
वर्णन केलेला स्थित प्रज्ञ ,कर्मयोगी असा स्वयंसेवक डॉक्टर साहेबांना अपेक्षित होता.
सुरुवातीच्या काळात संघ प्रसिध्दी परांमुख आहे असे प्रसिद्ध वाक्य होते. काळ बदलला संघाची इच्छा असो नसो काही नाही तर टीआरपी साठी किंवा राजकीय फायदा तोट्यासाठी लोकांचे कॅमेरे हे
संघाकडे आहेत आणि संघाची हीच खरी परीक्षा आहे. पण शाखेतील संस्कारांच्या बळावर स्वयंसेवक ही परीक्षा पास होतील. तेंव्हा तूर्तास श्रेय देणाऱ्या मंडळीनी जरा सबुरीने घ्यावे , श्रेय नाकारणाऱ्या नी प्रामाणिक व्हावे आणि संघ स्वयंसेवकांनी हुरळून न जाता अलिप्त पणे बघावे एव्हढेच वाटते.
१३/७/२०

Gk's picture

14 Jul 2020 - 2:04 pm | Gk

मग नागपुरात का करोना वाढला ?

विटेकर's picture

14 Jul 2020 - 2:09 pm | विटेकर

तुम्ही प्रतिसाद पूर्ण वाचलाच नाही असे मी छातीठोकपणे सांगू शकतो !

असो , सहवेदना आणि शुभेच्छा !

शा वि कु's picture

13 Jul 2020 - 10:09 am | शा वि कु

लॉकडाऊन फार गरजेचे होते, पण व्यवस्थित पणे पूर्वसूचना देऊन आणि काही दिवसांनी मुदत देऊन करणे योग्य झाले असते, अथवा गरजेची ती व्यवस्था करून निर्णय व्हायला हवा होता. (निर्णय घेऊन व्यवस्था करण्यापेक्षा.)

अर्थात हे इतके सोपे नाही असेही वाटते. नोटीस पिरियड देऊन लॉकडाऊन करणे कौंटरप्रोडक्टिव्ह होण्याची शक्यता पण होतीच.

खरे सांगू का? लॉकडॉउन होणार हे साधारणपणे सामान्य जनतेला १५ मार्च च्या आसपास कळलेले होते, कारण करोना आटोक्यात राहत नाहीये याचा अंदाज यायला लागला होता.

परंतु २ दिवसांचा अवधी दिला असता तर स्थलांतरितांनी घरी जाण्यासाठी अभूतपूर्व गर्दी केली असती आणि शासनव्यवस्था तिथेच कोलमडली असती. (अमेरिकेत वगैरे काय झाले हे साक्षीला आहे)
असो, प्रत्यक्षात हे सगळे असे करायला हवे म्हणून घरात बसून बोलणे सोपे असते, फिल्ड वरचे प्रोब्लेम वेगळे असतात. त्यामुळे जालपंडितांना माझा लांबूनच नमस्कार.

हे सगळे असे करायला हवे म्हणून घरात बसून बोलणे सोपे असते, फिल्ड वरचे प्रोब्लेम वेगळे असतात. त्यामुळे जालपंडितांना माझा लांबूनच नमस्कार.

सहमत..
असा समंजसपणा जर भारतीय जनतेत, आंतरजालीय समाजात आधीपासूनच असता तर क्या ब्यात होती !

शा वि कु's picture

13 Jul 2020 - 11:57 am | शा वि कु

फारच परस्परविरोधी आहे तुमचा प्रतिसाद. असो.

सर्वसामान्यपणे परिस्थिती अशीच परस्परविरोधी असते.. त्यामुळे काहीच बरोबर किंवा चूक नसते. प्रत्येक गोष्टीला ट्रेड ऑफ असतो आणि फायदे पण असतात.

वरती बसलेल्या माणसाला प्राधान्यक्रम ठरवायचे असतात. त्याने काहीही केले तरी खालचे त्याला शिव्या घालणारच आहेत. सामान्यपणे अश्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दीर्घकालीन असतात, त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे असे बोलणे अस्थानी ठरते.

mrcoolguynice's picture

13 Jul 2020 - 1:45 pm | mrcoolguynice

वरती बसलेल्या माणसाला प्राधान्यक्रम ठरवायचे असतात. त्याने काहीही केले तरी खालचे त्याला शिव्या घालणारच आहेत. सामान्यपणे अश्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दीर्घकालीन असतात, त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे असे बोलणे अस्थानी ठरते.

ह्या आज दिसणाऱ्या सुद्न्यपणाची सुरुवात साधारण २०१४-१५ साली झाली कि काय... ?

अवान्तरः
History will be kinder to me than the media, says Manmohan
JANUARY 04, 2014 01:44 IST

आनन्दा's picture

13 Jul 2020 - 4:05 pm | आनन्दा

हा हा..
आम्ही कायमच सोशिक होतो.

२००५ साली महापूर आला, २००६ का ७ ला बाँब्स्फोट झाले, २००८ साली कसाब चा हल्ला झाला तरी देखील आम्ही सहनच केले.

जर नसतो तर २००४ आणि २००९ मध्ये मनमोहन आणि सोनियांना सरकार बनवायची संधीच मिळालीच नसती.
२०१४ साली थोडे भावनिक झालो होतो, पण आत सूज्ञ झालो आहोत. विषेषतः ज्या नवीन नवीन भानगडी बाहेर येत आहेत त पाहिल्यावर तर नक्कीच.

मागच्या ६ वर्षात सैन्य सोडल्यात भारतातील एक तरी सामान्य नागरिक दहशतवादी हल्ल्यात बळी पडला आहे का?

mrcoolguynice's picture

13 Jul 2020 - 4:21 pm | mrcoolguynice

मागच्या ६ वर्षात सैन्य सोडल्यात भारतातील एक तरी सामान्य नागरिक दहशतवादी हल्ल्यात बळी पडला आहे का?

विचारा फेकूला ...
एटीम लाईनमध्ये उभे राहून किती मेले, ब्यांकेत ऑन ड्युटी किती मेले,
हजारो किलोमीटर पायी चालता किती मेले , रेल्वे रुळावर झोपलेले किती मेले.
ऑक्सिजनवाचून किती बालके मेली.

व्हाट अबाउटरी करायची असेल तर मी पण करू का?

जिनके घर शीशेके होते है, वो दरवाजा बंद करके कपडे बदलते है.

व्हाट अबाउटरी करायची असेल तर जरूर करा,
परंतु या व्हाट अबाउटरीचे कुळ मूळ कुठून उगम पावलंय या देशात , याचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे.
देशातील व्हाट अबाउटरीच्या संस्कृतीची चाल चेहेरा चारित्र्य प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे.
काही लोकं पिढ्यान पिढ्या व्हाट अबाउटरी करत आहे या देशात.

सर टोबी's picture

13 Jul 2020 - 5:08 pm | सर टोबी

जरूर करू. अगदी टणत्कार होईल याची खात्री देतो. परंतु आत्ता नको. एकूणच भारतीय जनतेची स्मरणशक्ती फार कमजोर आहे. तेंव्हा २०२४ च्या सुरुवातीला जरूर एक धागा काढा. जगलो वाचलो तर त्यावर जरूर जोरकस प्रतिवाद करेन. तोपर्यंत फक्त अतिश्रीमंत, डॉक्टर्स, राजकारणी, कोरोनाच्या साथीत गब्बर झालेले पोलीस आणि सरकारी अधिकारी आणि अति कंगाल एवढेच लोकं १०० कोटीच्या आसपास शिल्लक असतील असे वाटते. तोपर्यंत बरं वाटावं म्हणून खालील सूक्ताचा जप करावा:

  • पुरे विश्व में भारत की गरिमाको चार चाँद लग गए है
  • हमारे आत्मनिर्भर होने के दृढ निश्चय से बड़ी बड़ी अर्थव्यवस्थाएं कांप उठी है
  • भारत में पहले कई ज्यादा उद्योग को रियायते मिल रही है
कंजूस's picture

13 Jul 2020 - 10:27 am | कंजूस

खरंच वाट लागली

सुबोध खरे's picture

13 Jul 2020 - 7:29 pm | सुबोध खरे

जालावर अनेक लोक आपले अमूल्य विचार सूर्याच्या तेजाने तळपवताना पाहून खरंच गम्मत वाटते आहे.

कोणत्याही सरकारला शिव्या घालणे सोपे असते. ( पक्ष विरहित वाक्य आहे).

सचिन तेंडुलकरला काय अक्कल आहे का? असा शॉट मारतात का कधी?

असे मोहिते गल्लीत चेंडू फळी खेळणाऱ्याने म्हणावे तसे लोक आपले शरसंधान चालवीत आहेत.

सरकारने काय करायला हवे होते हे कोणी मला सुसंगत रित्या योजना आखून दाखवेल का?

मग चर्चा करू

अन्यथा चालू द्या

कपिलमुनी's picture

13 Jul 2020 - 7:59 pm | कपिलमुनी

पण ऐकणार कोण? बाकी सचिनला मी शिकवत नाही पण

माझ्या मताने सरकार बनवले असल्याने माझ्या मताला किंमत नक्कीच आहे.
सामान्यांच्या अमूल्य विचारांचे मतप्रवाह एकत्र येतात तेव्हा सरकार बनतात आणि पडतात.

सुबोध खरे's picture

13 Jul 2020 - 8:11 pm | सुबोध खरे

टीका करणे सोपे आहे.

नक्की काय करायला हवे होते हे सांगता येईल का?

केवळ पाच वर्षात एकदा एक मत दिले कि कुणावरही काहीही टीका करायला मोकळे झालो असे समजणारे लोक सोशल मीडियावर फार झाले आहेत.

हो नक्कीच !

23 January 2020 ला चायना मध्ये लॉक डाऊन जाहीर झाले तेव्हा पासून पूर्व तयारी करायला हवी होति.
आंतरराष्ट्रीय प्रवास करुन येणार्‍या लो़कांसाठी विलगीकरण प्रक्रिया , टेस्टिंग किट्स ची उपलब्धता या गोष्टी हव्या होत्या , अगदी लॉ़कडाऊन नंतर सुद्धा केवळ टेंपरेचर गन आणि सेल्फ डीक्लेरेशन फॉर्म एवढ्यावर मुक्त प्रवेश होता.

भारतातील पहिले काहि रुग्ण हे चायना ( वूहान )मधून आले होते , त्यानंतरहि आंतर राष्ट्रीय प्रवासाचे योग्य स्क्रीनिंग झाले नाही किंवा तो थांबवला गेला नाही.

खुद्द पप्पूने १२ फेब ला सांगितले होते

यावर हा रीप्लाय होता

यानंतरही डोनाल्ड ट्रंप चा दौरा आयोजित केला गेला, तबिलगी सारख्या कार्यक्रमांना परवानगी दिली गेली ( त्यांच्या नावने कितिही शंख केला, तरि सगळे व्हिसा घेउन आले अनि परवानगि घेउन कार्यक्रम केला होता) मध्य प्रदेश मध्ये सरकर पडण्याची वाट बघितलि गेलि आणि नंतर केवळ ४ तासाचा अवधी देउन लॉ़कडाउन केले गेले.

असे कार्‍यक्रम टाळत आले असते, जे टाळले नाहीत

लॉक डाउन चा कालावधी प्लानिंग नसणे

आपण लॉक डाऊन जाहीर करणरे पहिले देश नक्किच नव्हतो .
त्यमुळे २१ दिवस लॉक डऊन जाहीर केल्यानंतरही मार्गदर्शक सूचना नव्हत्या,
यात्रेला गेलेल्या , एखद्या दिवसाच्या प्रवसाला गेलेल्या , प्लॅटफॉर्म वर अडकलेल्या, आई वडिल एका दिवसा साठी बाहेर गेलेत अशांचाअ, वृद्ध लोकांचा शून्य विचार केला गेला.

लोक आहे त्या परिस्थीतीत अडकून पडले, पैसे , पाणी, रहन्याची सोय असा कहिहि विचार केला नाही.

आणि ह २१ दिवसाचा लॉक डाउन ९० दिवस रेटला गेला.
२ दिवसा साठी बाहेर पडलेलया कोणाला ९० दिवस बहेर राहायला लगले तर कसे मॅनेज होइल ?

तळेगावची एक केस सांगतो, माणूस डायबेटिक होता, हॉटेल मध्ये रहय्चे पैसे संपले , हॉतेल बन्द झली, औषधे संपलि , चालत जायला लगले त्यामुळे पायाला गँगरीन झले.
अशा रस्त्यावर मेलेल्या , बाळंत झलेल्या केसेस आहेत.

लॉक डाउन सोबत स्थानिक संस्थाशी समन्वय साधून शेल्टर होम तयार करुन तिथे सोय करायला हवी होति , त्याची माहिति सार्वजनिक माध्यमातून मिळायला हवि होति.

वेळ मिळेल तसे टंकतो..

गावी जाणार्‍यांची सोय वगैरे याबद्दल पुढे लिहीतोच,

केवळ पाच वर्षात एकदा एक मत दिले कि कुणावरही काहीही टीका करायला मोकळे झालो असे समजणारे लोक सोशल मीडियावर फार झाले आहेत.

मी मत देतो, मी टॅक्स देतो , मी कायदा पाळतो आणि मला बोलायचा हक्क नक्कीच आहे , मला पंतप्रधान काय कोणत्यही लोकसेवकावर कितिहि टीका करायचा घटनादत्त हक्क आहे !

टीका करायला अजुन काही क्वालिफिकेशन तुम्ही मिळवले असल्यास सांगा

रात्रीचे चांदणे's picture

14 Jul 2020 - 2:22 pm | रात्रीचे चांदणे

23 January 2020 ला चायना मध्ये लॉक डाऊन जाहीर झाले तेव्हा पासून पूर्व तयारी करायला हवी होति.
आंतरराष्ट्रीय प्रवास करुन येणार्‍या लो़कांसाठी विलगीकरण प्रक्रिया , टेस्टिंग किट्स ची उपलब्धता या गोष्टी हव्या होत्या , अगदी लॉ़कडाऊन नंतर सुद्धा केवळ टेंपरेचर गन आणि सेल्फ डीक्लेरेशन फॉर्म एवढ्यावर मुक्त प्रवेश होता.>>>>
तर हे तुम्ही 14 जुलै ला सांगताय, 13 जानेवारी लाच सरकार ला एखाद पत्र लिहून नाहीतर मिसळपाववर एखादा धागा काढून सुचवले असते तर हजारो लोकांचे प्राण तरी वाचले असते, आणि हाच सल्ला तुम्ही अमेरिका , ब्रिटन आणि इटली आदी देशांना दिला असता तर लाखो लोकांचा जीव वाचला असता आणि वरती लाखो लोकांचे जीव वाचवले मानून देशो देशाचे पुरस्कार मिळाले असते, पण अत्ता तुम्ही उशीर केला आहे. फ्रेब्रुवारी आणि मार्च मध्ये खुद्द WHO च्या वेबसाईटवर सुद्धा फ़क्त चीन मधून येणाऱ्या आणि त्यातल्या त्यात vuhan मधून येणाऱ्या प्रवाश्यांचे विलंगिकरांन करावे अशी guideline होती.

Lockdown हा कधीही केला असता तरी लोकांचे हाल हे होणारच होते, अगदी दोन दिवसा पूर्वीची गोष्ट सांगतो पुणे आनि पिंपरी मध्ये 14 ते 24 जुलै ला lockdown होणार आहे असे 3 दिवस आदी जहिर केला, तर lockdown कसा असतो हे 3 महिने माहीत असून सुद्दा शनिवारी आणि रविवारी जशी दिवाळी आहे अशी खरेदी साठी गर्दी केलेली होती, जर हेच मोदींनी 23 मार्च ला केले असते तर किती गोंधळ उडाला असता हे अत्ता सांगू शकत नाही, टोल नाक्या वरती 10-10किलोमीटर च्या रांगा, प्रवासात जेवण न मिळाल्या मुळे मृत्यू, गर्दी होऊन अपघात होऊन मृत्यू आणि वरुन शहरातला कोरोना हा मोदींनी गावाकडे पाठवला अशी टीका तुम्हाला करावी लागली असती.
आणि महत्वाचं म्हणजे मोदींनी lockdown जाहीर करण्या पूर्वी च आपल्या राज्यात जवळ जवळ lockdown जाहीर केलाच होता , लोकल ट्रेन बंद, st बंद, रेल्वे बंद शेयर रिक्षा बंद झालेलेच होते.

कपिलमुनी's picture

14 Jul 2020 - 2:34 pm | कपिलमुनी

सगळं मीच सांगायचे तर ? त्यांनी काय ** खेळायच्या का?

रात्रीचे चांदणे's picture

14 Jul 2020 - 2:44 pm | रात्रीचे चांदणे

सगळं कशाला सांगताय अत्ता धागा काडून जे सांगितलंय तेच 13 जानेवारी ला सांगायला पाहिजे होत असं म्हणतोय, का १३ जानेवारी ला .. खेळत होता?

कपिलमुनी's picture

14 Jul 2020 - 5:25 pm | कपिलमुनी

ज्यनी इचारल त्यांना संगितल !
तुम्हि मध्ये येउन फुगडी घलू नका !

सुबोध खरे's picture

14 Jul 2020 - 8:00 pm | सुबोध खरे

केवळ गरळ ओकायची म्हणून काहींच्या काही लिहीत आहात.

RT-PCR चे किट जानेवारीत फेब्रुवारीत किती उपलब्ध होते? याची माहिती शोधा.

भारर्तात याचे उत्पादन केंव्हा पासून सुरु झाले तेही शोधा

WHO च्या साईटवर जाऊन जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये काय सुचवले होते तेही पाहून घ्या.

एवढे झाले कि बोलू.

बाकी तुम्हि मध्ये येउन फुगडी घलू नका ! यावरून मिरच्या झोंबल्या ते स्पष्ट दिसते आहे.

बाकि तुमचे लाडके युगपुरुष यांच्या दिल्लीत सद्यस्थितीइतकी गंभीर का आहे याचे एकदा विश्लेषण करून सांगा

सगळं मीच सांगायचे तर ? त्यांनी काय ** खेळायच्या का?

आपण कोण आणि कुणाला बोलतो आहे याचे भान सुटत चालले आहे हे नैराश्याचे लक्षण आहे.

कपिलमुनी's picture

14 Jul 2020 - 9:32 pm | कपिलमुनी

मूळ मुद्दा काय करायला हवा एवढंच होता तर तुम्ही बाकी मध्ये आणलेत, तुम्ही धाग्यावर गोट्या काढता तेव्हा तुमची सुटलेली कळत नाही का ? त्यामुळे फक्त धाग्यावरील मुद्द्यांवर लिहिल्यास त्यावर योग्य उत्तरे मिळतील.

इथं दिल्लीमधील युगपुरूषाचा काय संबंध ? आणि त्याचा आणि माझा तरी काय संबंध ? स्वतः पातळी सोडून बादरायण संबंध जोडायचे , गोट्या टाईप लिहायचे ,धागे भरकटत न्यायचे , ही पॉलीसी जुनी झाली, काही स्टॅटिस्टिक्स असेल, विदा असेल तर लिहा

सुबोध खरे's picture

15 Jul 2020 - 10:41 am | सुबोध खरे

RT-PCR चे किट जानेवारीत फेब्रुवारीत किती उपलब्ध होते? याची माहिती शोधा. ( तेंव्हा इतक्या चाचण्या का केल्या नाहीत याचे उत्तर तुम्हाला सापडेल)

भारर्तात याचे उत्पादन केंव्हा पासून सुरु झाले तेही शोधा

WHO च्या साईटवर जाऊन जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये काय सुचवले होते तेही पाहून घ्या. भारत सरकार जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार वागली आहे. ( हा सल्ला चूक निघाला हि गोष्ट भारतासारखीच इतर अनेक देशांना नंतर समजली त्यामुळे त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले)

बाकी मी एका महाशयांना ते आपल्या पंतप्रधानांना एकेरीत बोलत होते म्हणून आपण त्यांचे लहानपणचे मित्र आहात का या अर्थाने आपण त्यांच्या बरोबर गोट्या खेळत होता का असे विचारले.

एक तर याचा आणि आपला काहीही संबंध नव्हता पण त्याचा अत्यंत अश्लील द्वयर्थ आपण काढलेला आहे आणि तशाच तर्हेची टिप्पणी केली आहे.

सार्वजनिक जालावर लेखन करता तेंव्हा एक सभ्य पणाची पातळीअसते.

ती आपली सुटत चाललेली आहे आणि त्याचे आपण समर्थन करता याचे आश्चर्य वाटते.

बाकी आपण पातळी सोडूनच टीका करणार असलात तर आपण चर्चा इथेच थांबवू.

राज्यसरकार दिवसेंदिवस विनोदी होत चाललय असे हतबलतेने म्हणावेसे वाटते

गोंधळी's picture

14 Jul 2020 - 1:07 pm | गोंधळी

भक्तांना देशभक्ती ची गोळी दिली कि भक्त त्या नशेत एकदम टुल्ल होतात. आणि ह्यांचा देवही वेळोवेळी गोळी पुरवत असतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2020 - 1:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Report
लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. आपल्याकडे म्हणजे भारतात जेव्हा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून ते कालपर्यंचा शिक्षण व औषधी द्रवे विभाग महाराष्ट्र यांचा अहवाल पाहिला तर लक्षात येते की रुग्णसंख्या अजिबात कमी झालेली नाही. राहीला प्रश्न लॉकडाऊनचा ? किती दिवस लॉकडाऊन ठेवणार ? जगरहाटी सुरु करावीच लागणार आहे. आवश्यक आहे तर त्याचा फायदा दिसलाच पाहिजे होता असे वाटते. सध्याच्या आलेखात नखभरही आलेख खाली आलेला दिसत नाही. मिपावर अनेकांनी लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असे सांगितले होते त्याची प्रचिती केव्हाच यायला लागली आहे, अर्थात हे सर्वांनाच मान्य होत असते असे नाही.

लॉकडाऊनमुळे लोकांचे रोजगार गेले, काही लोक रस्त्यावर आले. काही बिचारे मरण पावले. काहींची उपासमार सुरु आहे, काहींचा जीवन जगण्याचा संघर्ष सुरु आहे. काहींचे वेतन कपात होत आहे. काहींचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरु आहे. काही लोकांच्या टेष्ट होतात, लोक कोरंटाईन होतात. काहींमधे संसर्ग आढळतो. काही गंभीर असतात, काही उपचार घेऊन बाहेर पडतात. , काही दुर्दैवाने मागे राहतात, हे सध्या भारतातील चित्र आहे.
-दिलीप बिरुटे

रात्रीचे चांदणे's picture

14 Jul 2020 - 2:34 pm | रात्रीचे चांदणे

मग सरकार ने नक्की काय करायला पाहिजे होते?
सुरवातीला दर दिवशी अगदी शेकड्यात होणारी टेस्टीग ची संख्या आत्ता जवळ जवळ 3 लाखां पर्यंत पोहचली आहे, दिल्ली मुंबई मध्ये मोठी मोठी Covid रुग्णालये उभारली गेली आहेत, जर lock down केला नसता तर हे सर्व करायला वेळ तरी मिळाला असता का?

आज रातको आठबजहसे सबकुछ बंद रहेगा अशी धक्कादायक घोषणेऐवजी संकटकाळीन प्लॅनिंग काय काय करणार आहोत हे आश्वासक पद्धतीने जनतेला सांगायला पाहिजे होतं. पहिल्या घोषणेने संपूर्ण भारतीय जनता घाबरुन गेली होती. माध्यमातूनही काहीतरी भयंकर होणार आहे अशी परिस्थिती घराघरात होती, तेव्हा असे काही नसून शक्य तितकी काळजी, सोशीयल डिस्टेन्स, मास्क आणि योग्यउपचारांनी माणूस बरा होतो असे सकारात्मक-आश्वासक बोलायला हवं होतं. गर्दी न करता रुग्णालयात असे असे उपचार करता येतील. प्रामुख्याने अधिक आजार असलेल्यांना असे असे इथे उपचार शहरात असतील. सामान्य लक्षणे असलेले असे असे इथे इथे उपचार करता येतील. असे तरी करायला पाहिजे होते. सुरुवातीच्या काळात तसेही टेष्टींग नसल्यामुळे जितके आजारीपडेल तितकेच रुग्णालयात येत होते. एक फेब्रुवारी ते एक मार्चपर्यंत नियोजन करता येणे शक्य होते तेव्हा काहीच तयारी केली नाही. एक मे पर्यंत रुग्ण संख्या कमी येत होती, तेव्हाही फार काही दिवे लावलेले नव्हते. आणि तेव्हाही दुर्दैवाने समजून कोणीच सांगितले नाही. एका आश्वासक बोलणे महाराष्ट्र सरकारचे होते, मी त्यांची भलावण करीत नाही. सकारात्मक असे कोणी बोलत नव्हतं तेव्हा ते बोलत होते आणि काही तरी करीत होते. लॉकडाऊन न करताही हॉस्पीटल्सची उभारणी, कोवीड सेंटरची उभारणी करता येणार होती जी आत्ताही सुरु आहे. टेष्टींगचं नियोजन, हॉस्पीटल उभारणी आणि प्लॅनिंग करायला लॉकडाऊनच करायला पाहिजे होतं का ? आत्ताही अनलॉक लॉकडाऊनच्या काळात लोक जितके बाहेर पडायचे तितके पडतच आहेत. वरील आकडे पाहिल्यावर रुग्णसंख्या तितकीच वाढत होती आणि आहे. लॉकडाऊन काळातही लोक असेच बाहेर पडले असते. अशा काही अवजड मालांची देवान-घेवान करायची नव्हती की त्यासाठी ही सर्व यातायात बंद करावे लागणार होती. सरकाच्या नियोजनअभावी धोरणामुळे एक भितीदायक वातावरण निर्माण झालं त्याची अजिबात गरज नव्हती ते सध्याच्या काळात आजूबाजूला बघीतल्यावर लक्षात येतं. उगाच टीवळ्या-बावळ्यासारखे दिवाबत्ती आणि टाळ्या कैच्या कै, ज्या गोष्टींवर भर द्यायला पाहिजे ते सोडून सर्व लॉकडाऊनच्या इतरच गोष्टी या काळात सुरु होत्या असे दिसते. सामान्य लोकांचं तसेच सर्व व्यवस्था मोडकळीला आणायला सरकारचं नियोजन नसलेल्या धोरणांनी या देशाचं प्रचंड नुकसान झालं.

-दिलीप बिरुटे

मराठी_माणूस's picture

14 Jul 2020 - 3:41 pm | मराठी_माणूस

पहील्या घोषणे नंतर खरेच खुप ताण आला होता तसेच महाराष्ट्र सरकारचे बोलणे निश्चितच दिलासादायक होते.

सर आताचा पुणे-पिंपरी चिंचवडचा लॉकडाऊन महाराष्ट्रसरकार आणि अजितदादांनी अगदी पुणे महापालिकेचा आयुक्त बदलून लावला आहे.

लोक शारीरीक अंतर पाळत नसतील तर पर्यायी उपाय योजनेची गरज आहे का ? तर याचे उत्तर होकारार्थी आहे. वीषाणू प्रसार साखळी कशी का होईना तोडण्या शिवाय पर्याय नाही

माझ्याही व्यक्तीगत मते ट्रान्सपोर्ट चार्जेस वाढवणे आणि व्यापारी वेळ कमी करण्याच्या उलट वाढवणे, दर चार घरात एकालाच बाहेर पडण्याची परवानगी, व्यापार्‍यांना एन - ९५ मास्क इत्यादी करता आले असते. पण एवढ्या बारकाव्यांचा विचार डोक्यात येणे आणि पालन लोकांकडून होत नाही त्यामुळे प्रशासन लॉकडाऊनचा सोपा मार्ग पत्करते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2020 - 1:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असे समजा. पुण्याची लोकसंख्या शंभर लोकवसतीची आहे. आज तिथे कोणीही संसर्ग झालेला व्यक्ती आता राहीलेला नाही. लॉकडाऊनमुळे विषाणूची साखळी मोडली. संपूर्ण पुणे चकचकाट शुद्ध झालं. आता या शंभर लोकांनी शंभर लोकांशीच संपर्क करायचा. अजिबात एकशे एकव्या माणसाला भेटायचं नाही. नवीन माणसाला शंभरात मिसळू द्यायचं नाही. असा हा व्यवहार राहीला तर संसर्ग कोणाला होणार नाही. (असे समजू)

आता या शंभरपैकी पंचवीस लोकांना नौकरी आणि अन्य कारणाने या शंभर सोडून इतरांमधे मिसळायचं आहे. मास्क, फिझीकल डिस्टेन्स, सॅनिटायजरचा वापर, साबण-पाण्याने हात धुणे या सर्व गोष्टी सुरु आहेत त्यातूनही दोन-पाच निष्काळजीपणे म्हणा किंवा काही म्हणा संसर्ग घेऊन येणारच आणि इतरांना बाधा होऊन त्यांना रुग्णालयात उपचाराला पाठवावे लागेल, ते बरे होऊन येतील यात लॉकडाऊनचा असण्याचा-नसण्याचा काय उपयोग आहे. उद्या जेव्हा लॉकडाऊन नसेल तेव्हाही असे होतच राहणार आहे.

उदाहरण सांगतो. काल एका मित्राच्या परिसरात राहणार्‍या आजोबांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आजोबा कुठेही बाहेर फिरत नव्हते, पण मुलगा नौकरीनिमित्त बाहेर जात होता. आता किती दिवस माणसं घरात बसून राहतील. प्रॅक्टीकली काही विचार केला पाहिजे. जो पर्यंत 'करोना' थेट हद्दपार होत नाही तो पर्यंत सामान्य तापासारखे उपचार घेऊन येणे-जाणे सुरुच राहील असं सध्या तरी याचं स्वरुप होत आहे. लॉकडाऊन हा उपाय हा उपाय असूच शकत नाही, असं माझं व्यक्तीगत मत आहे.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

15 Jul 2020 - 7:16 pm | सुबोध खरे

लॉकडाऊन हा उपाय हा उपाय असूच शकत नाही,

लॉक डाऊन हा उपाय आहे असे कुणीच म्हणत नाहीये.

लॉक डाऊन हे गॅस चेंबर मध्ये गॅस मास्क घालण्यासारखे आहे. मुळात गॅसची गळती बंद होईपर्यंत स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वापरलेला तात्पुरता उपाय आहे.

जेंव्हा कोव्हीडवर लस किंवा नक्की उपचार उपलब्ध होईल तोवर आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे याबद्दल कुणालाही शंका नाही.

गेल्या दोन महिन्यात कोव्हीड वर अनेक उपचार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मृत्यूचा दर नक्कीच कमी झाला आहे.

विशेषतः तरुण आणि ज्यांना इतर आजार नाहीत अशा रुग्णांना वाचवणे शक्य होत आहे. जसे अधिक संशीधन उपलब्ध होईल तसे हा मृत्यू दर अधिकच कमी होईल.

तोवर आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे.

शा वि कु's picture

15 Jul 2020 - 7:43 pm | शा वि कु

लॉक डाऊन हा उपाय आहे असे कुणीच म्हणत नाहीये.

जेंव्हा कोव्हीडवर लस किंवा नक्की उपचार उपलब्ध होईल तोवर आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे याबद्दल कुणालाही शंका नाही.

असेच वाटते.

माहितगार's picture

15 Jul 2020 - 9:00 pm | माहितगार

१) एखादी गोष्ट दुसर्‍यांनी केल्यास त्याचा उहापोह नक्कीच केला पाहीजे परंतु 'असेतसे करणे चुकीचे म्हणताना आपण त्याजागी असतो तर परिस्थिती कशी हाताळली असती ? मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? हे सांगण्याची अप्रत्यक्ष नैतीक जबाबदारीही निर्माण होते. अन्यथा 'मला मार्ग माहित नाही पण तू त्या मार्गाने जाऊ नकोस' या सल्ल्याचे वजन कमी होते म्हणून जे होते आहे ते बट्ट्याबोळ आहे असे वाटते त्यांची मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? स्वरुपात व्यक्त होणे आणि स्वतःच्या मतांचे इतरांकडून समिक्षा होऊ देणे नैतीक जबाबदारी बनते असे माझे प्रांजळ मत आहे .

२) ....उदाहरण सांगतो. काल एका मित्राच्या परिसरात राहणार्‍या आजोबांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आजोबा कुठेही बाहेर फिरत नव्हते, पण मुलगा नौकरीनिमित्त बाहेर जात होता. .....

अ) ज्या आजोबांना आपण अ‍ॅडमीट करावे लागले म्हणता त्या आजोबांना - त्यांच्या पत्नी आणि मुलांना विचारून त्यांची लॉकडाऊन बद्दलची मते प्रत्यक्षात जाणून घेऊन सांगू शकाल?

आ) माझ्या व्यक्तीगत मते आपण दिलेल्या उदाहरणाच्याच कारणाने लॉकडाऊनचे अंशतः समर्थन होते. आजोबांच्या संपर्कातील व्यक्ती आपल्या स्वतःच्या अंदाजावरून बहुतेक मुलगा ज्यांच्या संपर्कात आला त्यांच्या पैकी कुणितरी किमान शारीरीक अंतर , निर्जंतुकीकरण आणि मास्क वापरात कुठेतरी कमी पडले असा याचा अर्थ होत नाही का? म्हातारीमंडळी केव्हातरी उद्याना आज जाणारच असे क्षणभर समजले तरी ज्यांच्यावर बेतते त्यांची हुरहुर संपते का ? शिवाय परिवारातील कूणाच्याही आजाराने पैसा आणि वेळ यांचा राडा होतो तो वेगळा. आणि का तर किमान शारीरीक अंतर , निर्जंतुकीकरण आणि मास्क वापरात समाजाचे फेल्युअर ! हे फेल्युअर का तर उपलब्ध मर्यादीत पर्याय आणि उपायांवरचा अविश्वास ? हा असा अविश्वास का पसरतो तर अधिक चांगले पर्याय उपलब्ध करण्या आधीच उपलब्ध पर्यायाला हाणून पाडले जाते. हे दुष्टचक्र नाही का ?

सुबोध खरे's picture

14 Jul 2020 - 8:02 pm | सुबोध खरे

लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही.
बिरुटे सर

तुम्हाला लॉक डाऊन कशाला केलं ते मुळातच समजलेले नाही.

ते समजावून घ्या मग चर्चा करू.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2020 - 9:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>तुम्हाला लॉक डाऊन कशाला केलं ते मुळातच समजलेले नाही.

धन्यवाद डॉक्टर साहेब. कृपया,अजिबात समजावून सांगू नका. चर्चा करायचीच नै ये...!

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

15 Jul 2020 - 10:44 am | सुबोध खरे

आपला पूर्वग्रह फार पूर्वीच स्पष्ट झालेला आहे.

तेंव्हा त्याबद्दल इतकी प्रदीर्घ चर्चा करण्यात मला अजिबात रस नाही.

बाकी आपला अभ्यासाचा विषय नाही आणि तो समजलेला नाही तरी आपण एक्स्पर्ट कॉमेंट्स टाकताय हे पाहून गम्मत वाटते.
असो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2020 - 11:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>आपला पूर्वग्रह फार पूर्वीच स्पष्ट झालेला आहे.
बरं...!
>>>>>तेंव्हा त्याबद्दल इतकी प्रदीर्घ चर्चा करण्यात मला अजिबात रस नाही.

चर्चा कराच ना, असा आपल्याकडे हट्ट धरल्याचे मला स्मरत नाही.

>>>आपला अभ्यासाचा विषय नाही आणि तो समजलेला नाही तरी आपण एक्स्पर्ट कॉमेंट्स टाकताय हे पाहून गम्मत वाटते.

मी एक्सपर्ट आहे, तज्ञ आहे, असे कधीही म्हटलेले नाही. एक हौशी माणूस, मिपाकर म्हणून मतं व्यक्त करतो.

>>>असो
आभार....!

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

15 Jul 2020 - 12:21 pm | सुबोध खरे

मी एक्सपर्ट आहे, तज्ञ आहे, असे कधीही म्हटलेले नाही. एक हौशी माणूस, मिपाकर म्हणून मतं व्यक्त करतो.

लॉकडाऊन न करताही हॉस्पीटल्सची उभारणी, कोवीड सेंटरची उभारणी करता येणार होती जी आत्ताही सुरु आहे.

टेष्टींगचं नियोजन, हॉस्पीटल उभारणी आणि प्लॅनिंग करायला लॉकडाऊनच करायला पाहिजे होतं का ?

लॉक डाऊन केले नसते तर रुग्ण संख्या किती वाढली असती याची आपल्याला कल्पना आहे का?

आता जी रुग्णालये उभारली आहेत ती पण कमी पडली असती आणि सगळेच्या सगळे नियोजन कोलमडले असते.

रुग्णालय उभारणे हि गोष्ट सभा घेणे इतकी सोपी असल्यासारखे लोक येथे बोलत आहेत.

आपल्या राज्यात सुद्धा जम्बो केंद्रे उभारली ( त्यात येणाऱ्या सुविधा किती पैशात आल्या आणि त्याच्या निविदा कशा मागवल्या याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत पण तो निराळा विषय आहे) पण ती पावसाळ्यात टिकून राहतील का याचा विचार झाला नव्हता. नुसती जमीन तयार करण्यासाठी लागणारे मजूर आणि कंत्राटदार कुठून येणार होते याचे नियोजन करता आले नाही.

एक महिन्यात रुग्णालय उभे राहते हा गैरसमज घेऊन आलेलया बाबू लोकांची बदली तर सरकार ने केली पण या रुग्णालयात काम करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना कसे आणायचे याबद्दल कोणालाच कल्पना नाही. डॉक्टरांना तुमचे रजिस्ट्रेशन रद्द करू म्हणून धमकी देऊन वेठीस धरले परंतु तृतीय आणि चतुर्थ कर्मचाऱ्यांना चाप लावण्याची हिम्मत राज्य सरकारला दाखवता आली नाही. यामुळेच मृत झालेले रुग्ण हलवण्याची कामे सुद्धा डॉक्टरांना करायला लागली आणि त्यात अत्यंत हलकटपणा म्हणजे इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधलेले मृतदेहाचे व्हिडीओ शूटिंग करून रुग्णालयात किती वाईट स्थिती आहे हे सर्वाना दाखवून २४ तास काम करणारी त्या बिचार्या डॉक्टरांच्या जखमेवर मीठही चोळले आणि समाजाची हिडीस वृत्ती दिसून आली

असो.

हा विषय लेख माला होईल इतका लांब आहे पण त्यात कुणाला रस आहे. प्रत्येकाला आपली तुतारी वाजवण्यात रस आहे.

Gk's picture

14 Jul 2020 - 2:07 pm | Gk
Gk's picture

14 Jul 2020 - 2:07 pm | Gk

करोना न झालेला मनुष्य :

मेरे पास मास्क है , साबण है , सॅनिटायझर है , काढा है
तुमहारे पास क्या है?

करोना होऊन बरा झालेला मनुष्य :
मेरे पास अँटीबॉडीज है

गर्व से कहो हम अँटिबॉडीजवाले है

करोना होऊन बरा झालेला मनुष्य :
मेरे पास अँटीबॉडीज है

गर्व से कहो हम अँटिबॉडीजवाले है

एकदा कोविड - १९ होऊन गेल्यावर पुन्हा होणारच नाही याची अद्याप खात्री नाही, किंबहुना दीर्घकालीन इम्युनिटी तयार होण्याबाबत बरीच साशंकता शिल्लक आहे. एकदा कोविड-१९ होऊन गेला तर पुन्हा होणार नाही या भ्रमात रहाणे तुर्तास जोखीमेचे असल्याचे काही संशोधन सुचवते आहे तेव्हा तुर्तास अतीआत्मविश्वास टाळलेला बरा.

एकदा कोविड - १९ होऊन गेल्यावर पुन्हा होणारच नाही याची अद्याप खात्री नाही,
हे एकवेळ मान्य जरी केले.
तरी एकदा कोविड होऊन त्यातून काहीही जास्त त्रास न होता बरे झालेल्या पेशंटला , जवळच्या भविष्यात पुन्हा कोविड कुळातील विषाणूचा सामना करावा लागला, तरी स्टाटीस्टीकली
त्याला त्रास होऊन पेशंट दगावण्याची शक्यता अत्यंत नगण्य होते.
त्याचापेक्षा जास्ती शक्यता उपासमारीने मरण्याची असू शकते.
_________________________
उत्तरदायित्वास नकार लागू.

Gk's picture

14 Jul 2020 - 10:10 pm | Gk

MUMBAI: The ongoing serosurveillance test for Covid-19 among 10,000 residents of three municipal wards in the city has thrown up a startling find: the level of antibodies in asymptomatic patients is low.
BMC is conducting the survey, along with NITI Aayog and Tata Institute of Fundamental Research, in F North (Sion), M West (Chembur) and R North (Dahisar) wards.

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-residents-immune-...

माहितगार's picture

14 Jul 2020 - 10:32 pm | माहितगार

मला वाटते या वृत्तातील दावे शास्त्रीय पद्धतीने अद्याप सिद्ध होणे बाकी असावे.

ज्यांना कोविड-१९ होऊन बरे झालेत त्यांच्या शरीरात फुफुस आणि इतर अवयवांनाही अनुषंगिक क्षमतांवर उर्वरित आयुष्यासाठी विपरीत परिणाम होत असल्याची बरीचशी शक्यता आहे - म्हणजे शास्त्रीय परिक्षण न झालेले नैसर्गिक हर्ड इम्युनिटीचे प्रयोग -म्हणजे काळजी न घेता आजार अंगावर ओढावून घेणेअथवा आपल्या शरीरामार्फत दुसर्‍याच्या अंगावर पोहोचवणे पूर्ण आयुष्यभरासाठी जोखीमीचे आणि अत्यंत महागात पडू शकतात. (- डॉ. रणदीप गुलेरीयांच्या वक्तव्याचे संदर्भ अभ्यासा)

कपिलमुनी's picture

14 Jul 2020 - 2:21 pm | कपिलमुनी

गोट्यांना पंख लागले !
स्वतःवर शेकले कि प्रतिसादंना पंख लावले जातात .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2020 - 2:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धाग्यातील मुद्द्यांशी सहमत आहे. आपण काही मिपाकर सुरुवातीपासून लॉकडाऊनच्या घोषणेबद्दल आणि त्याच्या नियोजनाबद्दल टीका करीत आलो पण काही लोकांनी व्यक्तीगत होऊन टीका केल्या. आज काळाने त्याची उत्तरे दिली आहेत, मिळत आहेत. लॉकडाऊनमुळे देशाचं प्रचंड नुकसान झालं. आर्थिक हानी जिवीत हानी हा मोठा आकडा आहे, ती कधीच न भरणारी हानी आहे.

मला परिक्षेबद्दल पुन्हा बोललं पाहिजे. पहिल्या पत्रामधे युजीसीने विद्यापीठाने ठरवावे की परिक्षा कशा घ्यायच्या त्याचं वेळापत्रक करुन नियोजन करुन घ्यावे असे म्हटले होते. तेव्हा संसर्ग असा गावागावात पोचला नव्हता त्यावेळी असे वाटले की आपल्याला परिक्षा घेता येतील. नंतर संसर्ग वाढत गेला अजूनही वाढत आहे, त्यावर महाराष्ट्र सरकारने युजीसीला पत्र लिहून प्रथम-द्वीतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील सत्र परिक्षांचे निकाल पाहुन पुढील वर्षांसाठी सरासरी गुणांआधारे त्यांना प्रमोट करावे,याला मात्र युजीसीने हरकत घेतली नव्हती मात्र अंतीम वर्षाच्या परिक्षा या घेतल्याच पाहिजे असा आग्रह आता युजीसीने धरला आहे. भाजपचे पुढारी रात्रंदिवस त्या राजपालांचे उंबरे झीजवत असतात त्यामुळे हे सर्व नाटक झालं आहे, खरं तर सध्याची परिस्थिती ही परिक्षा घेण्याजोगी नाही. आताही पुन्हा महाराष्ट्र सरकारने केंद्रसरकारला पत्र लिहून परिक्षा घेऊ नका अशी विनंती केली आहे, तर भाजपाचे पुढारी युजीसीने परिक्षा घ्या म्हटलंय तर परिक्षा घ्या असा हट्ट करीत आहे. युजीसीनेही जी राज्य परिक्षा घेणार नाही त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करु असे म्हटले आहे. सर्व राजकीय घोळ आणि विद्यार्थी शिक्षक यांच्या जीवाशी खेळणे आहे.

मी सध्या जिथे शिकवतो त्या महाविद्यालयाचं वसतीगृह कोरंटाइन सेंटर केलं आहे. उपचारासाठी जिल्ह्याला नेण्यापूर्वी तालुक्यातील कोरंटाइन रुग्ण वसतीगृहात आणून ठेवतात. आता १२ वीचा निकाल लागल्यावर प्रवेश घ्यायला विद्यार्थी येतील. आम्हालाही जावे लागेल एकूण परिस्थिती कठीण आहे.

-दिलीप बिरुटे

Gk's picture

14 Jul 2020 - 10:12 pm | Gk

करोना डॉकटरसाठी लिलाव बोली लागत आहेत
एक महिन्यांपूर्वी पगार 65000 च्या जाहिराती होत्या,
मग गेल्या आठवड्यात 75000 च्या जाहिराती आल्या,

आता 1 लाखाची जाहिरात

1. मोठी सरकारी हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर केली आहेत, तिथे कोविड चे उपचार होतात. सामान्य सेंटर मध्येही किमान 200 - 300 बेड असतात , 100 आय सी यु त व 100 - 200 वॊर्ड मध्ये , त्यासाठी सरकारी दवाखान्यात इतर वोर्ड सध्या बंद आहेत व फक्त कोविड पाहिले जाते, मोठ्या खाजगी हॉस्पिटलनि मंगल कार्यालये , बेंकवेट हॉल वगैरे घेतले आहेत.

2. जनरल वोर्डातही ऑक्सिजन असतो, आयसीयूत इतर उपकरणे व्हेंटि वगैरे असतात, ऑक्सिजनची डिमांड प्रचंड आहे, म्हणून बाहेर राक्षसी आकाराचे सिलेंडर बसवले जातात.

ग

3. प्रत्येक लोकेशन ला 2-4 डॉकटर , 5-10 नर्सेस , 4- 5 आया , वोर्ड बॉय वगैरे असतात, शिवाय फोन वरून कन्सल्टंट उपलब्ध असतात, लॅब , एक्स रे वगैरे उपलबंध असतात, जनरल वोर्डात केवळ टेस्ट पॉझिटिव्ह पण त्रास नाही , पासून ते थोडेफार धापणारे , पण ऑक्सिजन लावून बरे आहेत , अशी मोठी रेंज असते, यापेक्षा गंभीर रुग्ण आयसीयु त जातात

4. सर्व स्टाफ ppe घालतात , यात शूज कव्हर , गाऊन , ग्लोज , दोन मास्क , केप, गॉगल किंवा फेस शिल्ड असते, ते घालणे व काढणे यासाठी दोन स्वतंत्र कक्ष असतात व शेजारीच गरम पाण्याचे शॉवर सोय असते,
ड्युटीला आले की सर्व घालणे , अंगात टी शर्ट व बर्म्युडा असेल तर ते घालणे सोयीचे जाते, ppe घालणे याला donning म्हणतात , एकदा ते चढवले की काहीही खाता पिता येत नाही, टॉयलेट वगैरे नाही, फक्त ड्युटी.
ड्युटी झाली की ppe काढणे ह्याला doffing म्हणतात,आधी हातावर सॅनिटायझर लावायचे, काढताना एकेक वस्तू उलटी गुंडाळत काढायची म्हणजे तिचा बाह्यभाग व आपले अंग , कपडे कुठे एकमेकाला लागणार नाही , अशी खबरदारी घेऊन करावे लागते. एका मोठ्या यलो पॉलिथिन पिशवीत ते घालून पिशवीला गाठ घालून ती डिसपोज करायला द्यायची , मग लगेच गरम पाण्याने शॉवर घ्यावी लागते

5. रुगणाच्या नातेवाईकास आत यायची परवानगी नसते, मोबाईल वरून किंवा बाहेरील काउंटर च्या माध्यमातून संपर्क केला जातो.

6. साधारण 8 दिवसाने पुन्हा घशाचा स्वेब तपासतात, निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असूनही त्रास नसेल तर पुढच्या उपचाराचा सल्ला प्रिस्क्रिप्शन लिहून डिस्चार्ज देतात, हे निर्णय कन्सल्टंट घेतात, उपचारानंतरही घरी 7 ते 21 दिवस आयसोलेशन चा सल्ला देतात

ग

मागे अमित शाहंचं एक इंटरव्यू बघितला २-३ आठवड्यांपूर्वी. त्यात त्यांनी बऱ्यापैकी माहिती दिलीये काय काय काम केलं लोकांना घरी जायला म्हणून. त्यामुळे अजिबात काहीच केलं नाही असं म्हणवत नाहीत, पण अजून बरंच काही करू शकले असते कदाचित.

माहितगार's picture

15 Jul 2020 - 6:48 pm | माहितगार

* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ?

या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.