स्पर्धेनंतरची शशक : निरपराध

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in जनातलं, मनातलं
1 May 2020 - 1:59 am

"आई, कधी येणार बडोदा?"
"निघेल गाडी लगेच."
"कंटाळा आला या प्रवासाचा! राम उगीच गेला होता अयोध्येबाहेर."
"बाळ, असं म्हणू नये."
"का नको? अयोध्येतच राहिला असता तर लोकांनी त्याचं मंदिर बांधलंच नसतं ना तिथे. मग आपल्याला एव्हढं दूर जायला लागलं नसतं."
"अरे, त्याच्या वडलांनी आज्ञा होती वनवासात जायची. शिवाय राक्षस ऋषीमुनींना त्रास द्यायचे ते वेगळंच."
"आपण बडोद्याहून अयोध्येत मंदिर बांधायला जायचंच कशाला?"
"कळेल तुला मोठं झाल्यावर!"
"पण निरपराध्यांना कशासाठी त्रास द्यायचा? राक्षसांना कसला आनंद मिळतो?"
"कळेल तुला मोठं झाल्यावर!"
"निरपराध्यांना कसं वाटंत असेल?"
"कळेल तुला मोठं झाल्यावर!"
"आई, बडोदा कधी येणारे?"
"आताच तर गाडी निघालीये. बघ कोणतं गाव गेलं ते!"
"गो----ध----रा!"

---------------------------

वाचकहो,

कथा वाचल्याबद्दल धन्यवाद. साहित्य संपादकांनी ही कथा शशक स्पर्धेत स्वीकारली नाही. मात्र ही मिपावर वा अन्यत्र स्वतंत्रपणे प्रकाशित केलेली चालेल म्हणून सांगितलं. म्हंटलं स्पर्धा संपू दे.

आ.न.,
-गा.पै.

कथाप्रकटनलेख

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2020 - 8:58 am | अमरेंद्र बाहुबली

+1

ऋतु हिरवा's picture

1 May 2020 - 10:40 am | ऋतु हिरवा

अस्वस्थ करणारी

समाधान राऊत's picture

1 May 2020 - 5:35 pm | समाधान राऊत

+१

यश राज's picture

1 May 2020 - 5:50 pm | यश राज

+१

चामुंडराय's picture

2 May 2020 - 7:11 am | चामुंडराय

.

बडोदा, अयोध्या आणि कळेल तुला मोठं झाल्यावर वाचल्यानंतर अंदाज आलाच.
कथा आवडली.

गामा पैलवान's picture

3 May 2020 - 1:52 pm | गामा पैलवान

अमरेंद्र बाहुबली, ऋतु हिरवा, समाधान राऊत, यश राज, चामुंडराय व सौंदाळा,

तुम्हां साऱ्या प्रतिसादकांचे आभार!

आ.न.,
-गा.पै.

योगेश कोलेश्वर's picture

15 Jan 2021 - 10:42 am | योगेश कोलेश्वर

"गो........ध.....रा....." काटा आला अंगावर.......

मुक्त विहारि's picture

15 Jan 2021 - 11:30 am | मुक्त विहारि

अस्वस्थ

शा वि कु's picture

15 Jan 2021 - 2:35 pm | शा वि कु

कथा आवडली.

चौथा कोनाडा's picture

15 Jan 2021 - 3:02 pm | चौथा कोनाडा

आवडली कथा.

गामा पैलवान's picture

15 Jan 2021 - 7:50 pm | गामा पैलवान

योगेश कोलेश्वर, मुक्त विहारि, शा वि कु व चौथा कोनाडा,
तुम्हां साऱ्या प्रतिसादकांचे आभार!
आ.न.,
-गा.पै.
तळटीप : अचानक कथा वर आल्याचं पाहून नवल वाटलं.