याहू मेसेंजर वरील मराठी चॅट रूम्स उदय १९९८ साली झाला... त्याकाळातील एकमेव इन्स्टंट चॅट मेसेंजर क्लाईंट म्हणजे याहू (तसं रेडिफमेल, हॉटमेल सुद्धा होते पण याहू एवढी प्रसिद्धी नव्हती)... शिवाय त्यांत आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या रूम्स, कम्युनिटीप्रमाणे लोकल चॅट रूम्स असायच्या... मी सुद्धा त्यावेळी याहूच्या मराठी चॅट रूममध्यें चॅट करायचे...सुरुवातीला फार अप्रूप वाटायचे..मस्त मजा- मस्ती , गप्पा-टप्पा, ज्ञानाची देवाण-घेवाण (knowledge sharing), त्यातल्या त्यात भांडणे रुसवे- फुगवे आणि मग एकमेकांच्या समजुती असे अनेक प्रकार चालायचे.... तर याचीच काही निगेटिव्ह बाजू पण होती... काहींची तिथे प्रेम प्रकरणं पण जुळली गेली होती... काहींची यशस्वीरीत्या पार पडून लग्नाच्या बेडीत पण अडकले... नंतर नंतर येथे बॉट्स येऊ लागले काही टारगट कार्टी हे उद्योग करीत असत अगदीच फार फार तर पाकिस्तान रूम्स मध्ये जाऊन कळी काढून येत असत मग तिथली लोकं यांच्या मागे आली की शिव्यांची लाखोली वाहीत असत.. तसेच काही जण लक्ष वेधून घेण्यासाठी मोठं मोठे फॉन्टस ने चॅट करायचे... काहींना इग्नोर केलं की त्यांचा इगो दुखावला जायचा मग परत भांडण वैगैरे व्हायची...काहींना तर बूट बसायचे... पण मग एकदा का चॅट रूम्स बंद केल्या किंवा कॉम्प्युटर बंद केला की डोक्यातून निघून जाई... कुणाशी आपण काय बोललो, कुणाशी आपण भांडलो हे काहीच लक्षात नाही राहायचं..
नंतरच्या काळात Y! Supra, YahElite, Yazak सारखें याहूचे क्लाईन्ट्स वापरण्यात आले ज्यावर फारसे बुट्स नाही बसायचे...
याहू रूम्स मध्यें व्हॉइस चॅट पण असायचा त्यावर अंताक्षरी किंवा कुणीतरी एखादा मेंबर गाणी लावी.. कधी कधी गप्पा पण मारावयास मिळत असत..
काही परदेशी मित्र मैत्रिणी पण त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार ऑनलाईन येत असत मग त्यांच्या वेळेनुसार आम्ही कधी कधी आमचा टाईम ऍडजस्ट करत असू... त्यातही एक वेगळीच मज्जा असे...
एकेकाचे आयडी पण अगदी मजेशीर असायचे फार कमी जण स्वतःच्या खऱ्या नावासकट येत असत.. आणि अजूनही जे लोकं संपर्कात आहेत त्यांना आम्ही एकमेकांच्या त्यांच्या आयडीनेच संबोधतो...
कधी भेटायचा योग आला की छोटी मोठी गेट टूगेदर होत असत..
पुढे, डिसेंबर २०१२ साली याहु चॅट रूम्सचा अस्त झाला आणि त्या बंद पडल्या.. फक्त मॅसेंजर मात्र चालू राहिले.. मग जे संपर्कात होते ते सगळे व्हॉट्स अँपच्या ग्रुपवर एकत्र आले आणि इथेही अजूनही तशीच धमाल होते, पण तरीही ज्या माध्यमातून एकमेकांशी ओळख झाली ते माध्यम काही केल्या विसरता येत नाही...
आजही याहू रूम्स ची आठवण मनात तेवढीच ताजी आहे..
प्रतिक्रिया
23 Mar 2020 - 7:07 pm | प्रचेतस
याहूच्या ऍडल्ट चाट रूम्स आठवल्या आणि डोळे पाणावले.
24 Mar 2020 - 2:27 am | पर्ण
तिथे जायची कधी वेळ नाही आली मराठी चॅट रूम्स चॅट करायला दिवस कमी पडायचा... स्व. तात्या अभ्यंकर सुद्धा तिथे विसोबा खेचर ह्या आयडी ने असायचे..
24 Mar 2020 - 3:03 pm | टवाळ कार्टा
+1
23 Mar 2020 - 7:38 pm | मारवा
बुक्स अॅन्ड लिटरेचर एक भन्नाट रुम होती. त्या रुमवर मी जात असे.
तेथे अनेक असामान्य व्यक्ती येत असत
एक sammy_weller_au या नावाचे अफलातुन ऑस्ट्रेलियन गृहस्थ त्यावर येत असतं. त्यांचा फॉन्ट एक सारखा लाल रंगात एकच साइज मध्ये ते लिहीत असत. ते नेहमी मेन रुम वर मेन वॉल मध्ये च टंकत असत. त्यांना जर व्यक्तिगत मेसेज केला तर ते sammy never pm,s असा एक कडक रीप्लाय देत असत. त्यांचा अभिजात इंग्रजी व इतर साहीत्याचा व्यासंग निव्वळ थक्क करणारा होता. त्यांच्या काही भन्नाट पंचलाइन असत त्यात एक की अंधुक आठवते कुठलातरी एक क्लासिक लेखक ज्याचे नाव आता आठवत नाहीये तर ते म्हणत असत की सॅमी अमुक अमुक नंतर च काहीच वाचत नाही. एकदा त्यांनी विविध इंग्रजी डिक्शनरींच्या खासियती संदर्भात केलेला उहापोह इतका विलक्षण होता की तो टेक्स्ट मेसेज साठवुन ठेवला नाही याची मोठी खंत वाटते.
सॅमी नेहमी मधुन मधुन म्हणत असे की आता माझी स्कॉच घ्यायची वेळ झाली मग थोड्या वेळाने पेग मारुन बहुधा परत येत असे. सर्वात स्मरणीय बाब त्यांच्याविषयी म्हणजे त्यांचे रेसीटेशन अनेक सुंदर जुन्या अभिजात कवितांचे ते इतके अप्रतिम भावुक रेसीटेशन करत असत की आजही ते आठवले की मन तरंगु लागते. लोक त्यांना उचकवत असत मुद्दाम मग ते रंगात आले की रेसीटेशन करत असत तेव्हा कधी कधी हेडफोन उपलब्ध नसला तर मोठे फ्र्स्ट्रेशन च येत असे.
इतकी वर्ष झाली बाकी सगळे सगळे स्मृतीबाहेर गेले पण सॅमी वेलर सारखा अफलातुन माणूस नंतर कधी कधी च भेटला नाही त्या रुम्स चे टेक्स्ट त्या माणसाचा शोध घेण्याचा निष्फळ प्रयत्न करुन पाहीला पण
जिंदगी के सफर मे जो बिछड जाते है वो...............
असो
24 Mar 2020 - 2:25 am | पर्ण
अनेक आठवणी अनेक आयडी आहेत काहींची नावे त्यांच्या फॉन्ट कलर, साईज पण अजून लख्ख आठवतंय... छान दिवस होते याहूवरचे..