यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः
यत्रैतात्सु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः
शिवाजी महाराज कि जय . सगळा आसमंत दुमदुमून गेला या गर्जनांनी . सगळीकडे उत्साह भरून राहिला आहे. शिवाजी महाराज , काय आहे या माणसामध्ये जे इतके वर्ष होऊन गेले म्हणजे अगदी इ.स. १६३० ते १६८० चा काळ तो. आज १९ फेब्रुवारी २०२० , शिवजन्मापासून ३९० वर्ष होऊन गेलीत पण त्यानंतरही इतक्या अठरा-पगड जातीमधे मानान घेतलं जाणार नाव . काय कारण असेल कि इतके शूर-वीर होऊन गेले , इतके शासक होऊन गेले पण शिवाजी महाराजांची पातळी कोणी गाठू शकाल नाही. शिवरायांच्या अंगी असलेल्या विविध गुणांमुळेच हे शक्य झालं आहे .
परस्त्री मातेसमान
ज्या गुणामुळे आपले लोकच काय पण शत्रूही शिवरायांसमोर मान झुकवत होते तो म्हणजे स्त्रियांचा सम्मान . मात्र आजकाल काय दिसत आपल्या तोंडातून निघणाऱ्या शिव्याही आई-बहिणीचा त्यांच्या अवयवांचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. स्त्रियांच्या बाबतीत होणारे अत्याचार, अपराध पहिले ऐकले कि प्रश्न पडतो कि शिवरायांचे विचार ज्या मातीत रुजले तिथे असे जघन्य अपराध कसे होत आहेत ? यावर काही लोकांचं म्हणणं आहे कि शिवाजी महाराजांच्या काळातील कायदे हवे . पण मूळ प्रश्न हा कि कायदा तर नंतरची गोष्ट आहे. गुन्हा घडून गेल्या नंतरची . पण आधी हे गुन्हे घडतच का आहेत ? या मातीचे संस्कार कुठे गेले ? तरुणांचं काय सुरु आहे ? यासाठी काही करता येऊ शकणार नाही का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न .
गुन्ह्यांचा विरोध :
हे गुन्हे घडल्यानंतर एक संतप्त प्रतिक्रिया उमटते . राग व्यक्त केला जातो . पण कशाप्रकारे :-
तो गुन्हा त्या गुन्हगाराच्या आई , बहिणीसोबत करावा . त्या गुन्हेगाराला शिव्या दिल्या जातात . म्हणजे काय तर त्याच्या आई बहिणीचा आणि त्यांच्या अवयवांचा उद्धार केला जातो. का तर त्याच्या आई बहिणीसोबत असे केल्यास त्याला त्याने काय गुन्हा केला ते कळेल . पण जर त्याला त्यानंतरही नाही कळलं किंवा त्याच्या आई-बहिणीबाबतही त्याचे असेच विचार असतील तर . मग तर त्यांचा दोष नसतानाही तुम्ही त्यांना यात गोवत आहेत. म्हणजे एका स्त्रीला न्याय देण्यासाठी तुम्ही दुसऱ्या स्त्रीसोबत गुन्हा करत आहे. हि कुठली मानसिकता ? जर आपला राग व्यक्त करायचा असेल तर जे काही करावं असं वाटत आहे ते त्याच्यासोबत करा . त्याच्या आई-बहिणीबद्दल वाईट करण्याचा विचार करू नका . इथं काही लोक असही कारण देतील कि जिच्यासोबत गुन्हा घडला तीही कुणाची तर आई, बहीण लेक होतीच ना. पण मग तो गुन्हेगार आणि तुम्ही यांच्या मानसिकतेत कुठे फरक आहे ? त्यानं एका स्त्रीवर अत्याचार केला आणि तुम्ही त्याचा बदल म्हणून दुसऱ्या स्त्रीवर अत्याचाराचा विचार करत आहे . हि मानसिकता येते कुठून कि कुणाला शासन करायचं तर त्याच्या कुटुंबातील स्त्रियांना ते करायचं म्हणजे त्याला समजेल . आजकाल अशी मानसिकता बळावत आहे कि लोक स्वतःच्या आई-वडिलांचाही विचार करत नाही . मग बहीण-भाऊ तर दूरच . काहींना स्वतःच्या बायकोची मुलं-मुलींची काडीची किंमत नसते . असे महाभाग आहेतच ना. मग तो तर गुन्हेगार आहे त्याची मानसिकता तशी असू शकतेच कि . त्यामुळे राग व्यक्त करताना शिक्षा देण्याचा विचार करताना त्याच्याबद्दल बोला , त्याच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल किंवा विशेषकरून स्त्रियांबद्दल तर मुळीच नाही .
काही लोकांच अस मत होत कि असे गुन्हे घडत आहेत तर शिवरायांचा कायदा आणा . पण माझं म्हणणं आहे कायदा हा नंतर येतो आधी गुन्हा घडतो . आपण त्याचा विचार का करू नये . शिवरायांचे संस्कार ज्या मातीत रुजले आहेत त्या मातीत असे गुन्हे घडतातच कसे ? आपण असं पाहिलं तर गुन्हेगार आणि गुन्हेगारी वृत्ती हि मानवाच्या सुरुवातीपासूनच आली आहे. काही लोक अशा मानसिकतेचे असूच शकतील पण अशा मानसिकतेला सुदृढ मनोवृत्ती आणि सजग नागरिक लगाम घालून या गुन्ह्यांमधे दोन प्रकार आहेत
१. सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या समोर घडतो किंवा घटना घडल्यानंतर तरी तिथे लोक उपस्थित असतात.
२. निर्जन ठिकाणी घडतो जिथे इतरांकडून मदतीची शक्यता कमी असते किंवा नसतेच .
पहिल्या प्रकारामध्ये ऍसिड हल्ले, जिवंत जाळण्याचे प्रकार, शस्त्राने वार किंवा मारहाण हि लोकांसमोरच घडते पण लोक काही रिऍक्ट करत नाहीत किंवा पुढे यायला धजावत नाहीत . का धजावत नाहीत तर तेही एकटा विचार करतात . इथं लक्षात घेण्याची गोष्ट आहे कि भीती गुन्हेगारालाही असते . अगदी जीवावर उदार असला तरीही त्याच्या सबकॉन्शस माईंडमधे कुठेतरी
हि भीती असतेच . तो स्वतःच्या कृतीच कितीही समर्थन करो तळ्याला तो चुकीचं करत आहे ल्याची थोडी का होईना जाणीव किंवा भीती असतेच . याच गोष्टीचा उपयोग स्वतःचा किंवा इतरांचा बचाव करण्यासाठी होऊ शकतो .
उपाय :
१. गुन्हेगाराला भीती उत्पन्न होईल असा प्रयत्न करणे त्यासाठी फक्त आवाज जरी वाढवला तरी हे काम होऊ शकत . अनेक लोक आसपास असतील तर त्यांनी आवाज वाढवून व थेट गुन्हेगाराच्या दिशेने वेगाने जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या दिशेने काही फेकल्यास त्याच्या मनात भीती उत्पन्न होऊ शकते . काहीसा असाच प्रकार सैन्यातही केला जातो, मोठ्या आवाजात ललकारून शत्रूवर वेगाने हल्ला केला जातो .
२. गुन्हेगाराला विचलित करणे . जिच्यासोबत हा गुन्हा घडत आहे तिने जरी आपल्या शरीरापासून थोड्या दूर हातांची वेगवान हालचाल केल्यास त्याचे लक्ष विचलित होते . कारण हल्ला करण्यासाठी तो कॉन्सन्ट्रेशन करून एकाच ठिकाणी वार (हल्ला) करण्याचा प्रयत्न करत असतो . जो बिंदू तुमच्या अशा हालचाल करण्यामुळे बदलतो . त्यामुळे त्याच लक्ष विचलित होत. इतर लोकही वर सांगितल्याप्रमाणे आवाज वाढवून, त्याच्याकडे धाव घेऊन , काही वस्तू फेकून त्याला विचलित करू शकतो .
३. राग : प्रत्येकाला काही ना काही गोष्टीचा राग थोडाबहुत तरी असतोच तो व्यक्त करण्याचं आयात समजून त्या गुन्हेगाराचा समाचार घेता येऊ शकतो . पण इतकंही मारू नये कि त्याच्या जीविताला धोका निर्माण होईल.
प्रतिकार आणि प्रतिहल्ला या गोष्टी नक्कीच त्याला थोपवू शकतात .
असं पाहण्यात आलं आहे कि गुन्ह्यानंतर गुन्हेगाराला त्याची उपरती होते . अगदी सर्वांना नसली तरी होणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे तो क्षण किंवा ती वेळ जरी चुकवली तरीही बरेच गुन्हे कमी होतील.
दुसरा प्रकार आहे निर्जन ठिकाणी किंवा इतरांची मदत कमी किंवा होऊच शकत नाही तिथे . इथे लढा वयत्तिकच असतो इथे कणखर मानसिकताच एक अशी गोष्ट आहे जी वाचवू शकते . हि मानसिकता त्या घटनेपूर्वीच फार आधी बनवावी लागेल . मुळात तो कशी बनते ? ती बनते कुटुंबातून , समाजातून पालकांनी मुलीला वाढवताना कधीही तिरस्काराची , तुछतेची वागणूक देऊ नये . त्यांच्या मनात कसलाही न्यूनगंड उत्पन्न होईल असं वागू नका . मुलींनीही स्वतःच्या भावना मुक्तपणे व्यक्त करायला हव्या . आनंद व्यक्त करताना खळखळून हसा , मोकळेपणाने हसा . याचा फारच पॉसिटीव्ह परिणाम आपल्या मानसिकतेवर , शरीरावर होतो. मुक्तपणे हसण्यानेसुद्धा तुमच्या फुफुसांची कार्यक्षमता वाढते . आनंदाची भावना असे विकर सिक्रीट करते ज्यामुळे ताण तणाव दूर होतात . त्याच्यामुळे कॉन्फिडन्स येतो . हृदयाचं काम व्यवस्थित सुरु राहत . यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेऊन किंवा साधं घरातील काम करूनही खूप फायदा होतो . यामुळे कोणतीही गोष्ट स्वात हा करण्याचा कॉन्फिडन्स येतो . ज्यामुळे इतरांवर विसंबण्याची वेळ येत नाही . भावना व्यक्त करताना शक्यतो स्पष्ट कराव्या . दिलेला नकार , कारण स्पष्ट सांगावे ज्यामुळे अनेक प्रॉब्लेम जागेवर संपतील . अगदी सॉरी भाव, सॉरी किंवा नाही शक्य म्हणूनही सहज नकार देता येतो . पण तो ठाम आणि स्पष्ट असावा . अनेक मुलींना जे वाईट अनुभव आले असतील त्यातून बोध घेऊन त्या जेव्हा आई होतील तेव्हा आपल्या मुलांना मुलींचा महिलांचा सन्मान करण्यास नक्की शिकवावं . कारण शिवराय मोठे झाले ते आई जिजाऊंच्या संस्कारानी हे लक्षात असू द्या . यासोबत मुलींनी थोडे स्वसंरक्षणाचे धडेही घेतले तर तेही फार उपयोगी पडतील .
(इथं या मुद्द्यावर अजून काही विषय प्रभाव टाकतात त्यांच्याबद्दल स्वतंत्र लेख लिहीन त्यात ते स्पष्ट होतील . )
आता आपण बोलूया गुन्हेगारांबद्दल . तर कोणीही गुन्हेगार जन्मतःच नसतो त्याला काही गोष्टी गुन्हेगार बनवतात . इथे एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो आहे कि मी मी कुठेही गुन्हेगारांच त्यांच्या गुन्ह्यांचं समर्थन करत नाहीए . तर इथं प्रयत्न होत आहे कुणीही सामान्य व्यक्ती गुन्हेगार होऊ नये यासाठी .
१. लहानपानपासून काही मुलांना सर्वकाही दिल जात. माझा एकुलता एक आहे मी त्याला सर्वकाही देणार यामुळे त्याच्यात कधी नकार सहन करण्याची क्षमताच राहत नाही . तुम्ही त्याला जिंकण्यासाठी तयार करा . कधी हरला तर धीर देऊन परत उभं राहायला शिकवा पण यापेक्षा सर्वात आधी समोरच्याच्या मतांचा विचार करायला त्या मतांचा आदर करायला शिकवा .
२. आर्थिक परिस्थिती : आपली मुलांना आपल्या आर्थिक परिस्थितीची झळ पोहचू नये असं सर्वच पालकांना वाटत . चांगली गोष्ट आहे , पण त्या परिस्थितीची जाणीव मात्र मुलांना नक्कीच असू द्या . ज्यामुळे भविष्यात ती आर्थिक क्षमतेपेक्षा जास्तही खरेदी करून स्वतःला टेन्शन मध्ये आणू शकतात . हीच खरेदी एखाद्या मुलीसाठी होत असल्यास तिला लय तणावामुळे त्रास होऊ शकतो .
३. तुम्हाला माहित आहे का एखाद्या कुत्र्याला अधिक आक्रमक कस बनवलं जात. त्यासाठी अनेक मार्ग आहेत . पण त्यातले काही असे त्याला बांधून ठेवलं जात त्याचा संपर्क जास्त लोकांशी होऊ दिला जात नाही . हीच गोष्ट आपण आपल्या हाताने स्वतःबाबत करत असतो . स्मार्ट फोनचा वापर ज्यामुळे आपण जवळपास स्वतःला त्या मोबाईलशी बांधून घेतो . तो असला कि बाकीच्या जगाशी इतर लोकांशी आपला संपर्क आपण कमी कमी करत जातो. यातून मनाची अस्थिरता आणि आक्रमकता निर्माण होते . जर काही दिवस मोबाइलचा वापर थांबविला किंवा काही प्रमाणात कमी केला तरी बराच फरक पडेल.
मागे एका ठिकाणी मुलींच्या मोबाईल वापरावर बंदी बाबत बोललं जात होत . यातला भेदभाव काढून जर एका वयापर्यंत मुला-मुलींना स्मार्टफोन दिला नाही किंवा गरजेचंच असेल तर फक्त कॉलिंगचा साधा फोन दिला तरी चालू शकेल.
इथे अनेकांचे आक्षेप असतील काही मुलं ब्लॅक बोर्ड वरच लिहिलेलं लावलेली नोटिस , नोटबूकमधला अभ्यास , आकृत्या स्मार्टफोनने कॅपचर करून आपापसात शेअर करत असतात . हा वापरही थांबेल सो हे ज्यांनी त्यांनी स्वतःच्या गरजा ओळखून पर्याय निवडावा .
४. जर एखाद्या उंदराला पोट भरण्यास आवश्यक इतकं अन्न दिल आणि एक्स्ट्रा कुरतडायला काही दिल नाही तर काय होईल . उत्तर आहे तो मारून जाईल . कारण त्याच्या दातांची खूप अधिक प्रमाणात वाढ होत असते जे कुरतडल्याने झिजतात पण कुरतडायलाच नाही मिळालं तर ते पाठीमागच्या बाजूला वाढून त्याच्या मेंदू आणि इतर अवयवांना इजा पोहचून त्याचा जीव जातो.
तसच ,माणसाचही आहे . माणूसही फक्त पोटापुरतं अन्न खाऊन जगू शकत नाही. तो सामाजिक प्राणी आहे . त्यालाही गरज असते व्यक्त होण्याची , बोलण्याची . अगदी जे मूकबधिर आहेत आणि जे sign language ने व्यक्त होतात त्यांच्या sign language ची इन्टेन्सिटी पहा . एखादी क्षमता नसेल तर ती दुसऱ्या एखाद्या क्षमतेत वाढ करते . त्यांची ऐकण्या बोलण्याच्या क्षमतेतील कमी त्यांच्या sign language च्या एनर्जीतुन व्यक्त होते पण ज्यांना बोलता येत पण ते बोलत नसतील व्यक्त होत नसतील तर त्यांच्यावर stress नक्की येतो . याचा अर्थ असा होत नाही कि सारखी बडबड करावी . पण स्वतःच्या भावना ज्या व्यक्त करुशा वाटतात त्याही जर व्यक्त करता येत नसतील तर तुम्ही स्वतःला प्रोब्लेममध्ये आणत आहात .
यातून प्रत्येकजण गुन्हेगारच होईल असं नाही पण तो स्वतःच नुकसान करू शकतो . कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो , न्यूनगंड निर्माण होऊ शकतो . मानसिक अस्वास्थ्य निर्माण होत.
अगदी गुन्हेगार एखादा गुन्हा करण्याआधी त्याच्यात बरीच मानसिक घालमेल होत असते . याकाळात जर त्याच योग्य कॉन्सेलिंग झालं तर होणारे अनेक गुन्हे हे होणारच नाहीत . पण आता प्रश्न हा आहे कि या लोकांचं कॉन्सेलिंग कोण करणार आणि ते का जातील कॉन्सलर कडे . तर हा प्रॉब्लेम नक्कीच असेल पण याला उत्तरही आहेच , जर अगदी शालेय वयापासून मुलांना कॉन्सेलिंग होत असेल तर त्यांना नियमित व्यक्त होता येईल व नंतरच्या आयुष्यातही प्रश्न निर्माण होतील तेव्हा त्याला त्याच उत्तर कॉन्सेलिंग आहे हे माहित असेल .
५. व्यायाम हा तुमची शारीरिक क्षमता तर वाढवतोच पण तुमचं मानसिक स्वास्थ्यही चांगलं ठेवतो.
(यात काही जघन्य अत्याचाराच्या गुन्हेगारांबद्दल जास्त बोललं गेलं नाही त्याचे उपाय नंतरच्या लेखात येतील )
मुली काय करू शकतील :
* स्वतःला कमी लेखू नये .
* स्वतःबद्दल कोणताही न्यूनगंड बाळगू नये .
* स्वतःला काही त्रास होत असला किंवा कोणी त्रास देत असेल तर शिक्षक , पालक , मैत्रिणी किंवा कोणी जबाबदार व्यक्ती यांच्यासमोर व्यक्त व्हावं.
* स्वसंरक्षणाचे धडे जरूर घ्यावे.
मानसिक दृष्ट्या कणखर व्हावं .
सळसळता उत्साह असलेले तरुणही याबाबतीत आपली जबाबदारी ओळखून योग्य मदत करू शकतात . शिवरायांनी सांगितलेला स्त्रियांचा आदर आपणही आचरणात आणावा . कुठे कोणी मुली सोबत , एखाढ्या महिलेसोबत काही चुकीचं होत असेल तर स्वतः पुढाकार घेऊन मदत करावी . कुणा ladies सोबत एखाद्या विषयावर काही पटत नसेल तर आपला मुद्दा मांडताना किंवा विरोध करताना स्त्रीदाक्षिण्य नक्की राखावे.
असं खूप काही आहे . आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे सुराज्य घडू शकेल .
जय शिवराय
जय महाराष्ट्र
जय हिंद
प्रतिक्रिया
20 Feb 2020 - 11:28 am | शशिकांत ओक
आपणास शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार या मातीत रुजले असे वाटते याचे आश्चर्य वाटते. महाराजांनी जे आदर्श घालून दिले ते मोडायची अहमहमिका लागलेली असताना दिसत असताना हे म्हणणे साहसी आहे असे वाचते.
22 Feb 2020 - 10:25 pm | अनाहूत
किमान त्यांना माननारे तरी आहेतच की. विचार आचरणारनात आणणारे कमी असतील पण आहेत अपेक्षा करूया इतरही लोक या दिशेने येतील
20 Feb 2020 - 11:35 am | अनिरुद्ध.वैद्य
महाराजांच्या नावाचा वापर
22 Feb 2020 - 10:29 pm | अनाहूत
विचार त्यांचेच आहेत आजच्या काळाला अनुसरून मांडले आहेत
20 Feb 2020 - 5:25 pm | अधर्म
लेख आवडला पण जयहिंद आधी लिहायला पाहिजे होते. छत्रपती स्वतः स्वराज्या साठी लढले...त्यांनी आधी स्वराज्य सर्वोच्च मानले. म्हणून आधी लगीन कोंढाण्याचं आहे मग रायबाचं. महापुरुषांचे आणि संतांचे खूप मोठे वरदान आहे ह्या भूमीला, पण ज्या भूमी साठी ते घडले ती भूमी तेवढी एकच आहे. म्हणून जयहिंद आधी हवे होते.
22 Feb 2020 - 10:27 pm | अनाहूत
अगदी पटल. एडीट करता आल असत तर लगेच केल असत