हतबल

शब्दसखी's picture
शब्दसखी in जनातलं, मनातलं
7 Jan 2020 - 10:53 pm

खरं तर टक्क जागा आहे मी. घरच्यांना वाटतंय की झोपलोय मी अजून, पण जागा आहे मी.
डोक्यावरचा पंखा मंद फिरतोय. तोही सहन नाही होत आहे मला. पण उठून बंद नाही करू शकत मी.
हतबल आहे मी.

खिडकीचा पडदा जरासा उघडा राहिलाय आणि सकाळच्या उन्हाची कोवळी तिरीप नेमकी डोळ्यावर पडतेय.
तो बंद करता आला असता उठून तर किती बरं झालं असतं.... पण नाही जमत आहे मला.
हतबल आहे मी.

लाव जोर आणि उठ, कर पुन्हा एकदा प्रयत्न, जमेल तुला.... असा माझ्या स्वतःच्या मनातून आवाज येतोय..
पण नाहीच जमत आहे.
खरंच हतबल झालोय मी.

बघा ना... इतका हतबल झालोय मी ह्या थंडीसमोर.... तुम्हीच सांगा, कसा जाऊ जिमला??

मुक्तकप्रकटनलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Jan 2020 - 6:52 am | मुक्त विहारि

थंडी बाधत नाही आणि व्यायाम पण होईल.

(बायको काही ना काही काम सांगत असतेच. त्या कामाच्या निमित्ताने व्यायाम होतो.)

मनस्विता's picture

10 Jan 2020 - 8:42 pm | मनस्विता

मजा आली.

गोंधळी's picture

10 Jan 2020 - 9:12 pm | गोंधळी

शेवटची ओळ एकदम सिक्सर.

शब्दसखी's picture

22 Jan 2020 - 6:34 pm | शब्दसखी

मुवि, एवढा हतबल गडी विवाहित असण्याचीच शक्यता जास्त आहे... ;-)

मनस्विता आणि गोंधळी : प्रतिसादाबद्दल आभार!!