हवाईदलातील गणेश पूजेचे किस्से भाग २

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
8 Sep 2019 - 11:39 pm

गणेशोत्सव १९७७
उधमपुरची विसर्जन मिरवणूक! ६० किमी अंतराची!
पायलट ऑफिसर रँक बॅडमिंटनच्या खेळातील 'शटल कॉक' प्रमाणे वापरली जात असे. आता ती रँकच बंद झाली. असो.
असेच "जा उदमपूरला" म्हणून पाठवले गेले होते. आम्हा जुनियर्सना काहीच हरकत नसे. कारण दर आठवड्याला ड्युटीऑफिसर म्हणून सर्व समावेशक मोठ्या होल्डॉल मधे गाशा गुंडाळून मेस पासून 35 किमी दूर एयरपोर्ट वर राहायला जाणे अंगवळणी पडले होते! शिवाय टीए डीए वेगळा!

उधमपुरच्या छोटेखानी मूर्तीचे विसर्जन आठवणी राहिले.

झाले असे की विसर्जन करायची जागा म्हणजे तवी नदीचा प्रवाह असे ठरवले होते. किती दूर आहे ते कोणालाही माहित नव्हते. मी व एक कोल्हापूरचा फ्लाईंग ऑफिसर पाटील आणि बाकी एयरमन, यांची बायका, मुले, शिवाय गणेश मूर्ती धरून असलेले २५-३० जण. ड्रायव्हर नॉन मराठी! असे निघालो.
१०, २०, ३०, ५० किमी झाले तरी ठरवलेली जागा येईना! आत्ता आलेच, म्हणत शेवटी तवी नदीचे पात्र सापडले. आम्हाला पुलावर उभे करून काही ४-५ मोजके मूर्तीला धक्का न लागेल अशा बेताने मोठ्या शिळा, घसरड्या वाटामधून पाण्यात उतरले.
' सर काळजी नको आम्ही मुंबईकर आहोत. समुद्रात लाटांमधून विसर्जनाची सवय आहे'! . झिरमिर पावसात, जोरदार प्रवाहात दोन जणांनी मूर्ती ३ वेळा बुचकळून विसर्जित केली!
सगळेजण वर चढून आल्यावर आम्हाला हायसे वाटले!
नंतर पुढचे बाळंतपण झाले! ड्रायव्हर एयरमनने तक्रार केली की इतके अंतर होते हे सांगितले नाही. अंतर वेल्फेअर रनपेक्षा जास्त झाले होते. कोर्ट ऑफ इन्कायरी झाली. मीमधे पडून ऑडिटर्स पकडणार नाहीत असे अंतर एडजेस्ट करून ते मिटवले. असो...

...

गणेशोत्सव १९७८ श्रीनगर.

जवाहरनगर मधे हवाईदलातील गणेशोत्सव साजरा होत असे. त्या वर्षी 'दोन्ही घरचा पाहुणा'
फार्स बसवला होता. उत्साही एयरमन एकत्र येऊन माझ्या घरी रोज प्रॅक्टिस चाले. नाटक रविंद्र नाट्य मंदिर श्रीनगर, मधे सादर झाले. आर्मीच्या अनेक युनिट्स मधील मराठी सेनेतील शेकडो प्रेक्षक टाळ्या, शिट्ट्यांनी नाट्यगृह दणाणून जाताना पाहून दिग्दर्शक म्हणून पहिल्या ओळीत बसून मी तो आनंद अनुभव घेत होतो.
...
"सर मी सतीश नांदेडकर! आठवलं का? श्रीनगरच्या पोस्टींगला नाटक बसवले होते!"
"कोण ऽऽ आमचा दोन्ही घरचा पाहुणा वाला हीरो?
"हो सर, मी आता एडव्होकेट झालोय. तुमचे नाव मिसेसला मिळाले. मला खात्री होती ते तुम्हीच असाल!"
यंदाच्या गणेशोत्सवाचा आनंद वाढला!
...

मन मागे गेले... साल होते १९७३.

मी आणि माझा पायलट ऑफिसर मित्र अशोक वाधोने लाल चौकातील पुलावरून जात होतो. मागून पाठीवर थाप पडली म्हणून मागे वळून पाहिले तो ते होते प्रसिद्ध कवी आणि प्रोफेसर ! 'मी वसंत बापट व या सुधा वर्दे मॅडम' मुंबईहून मुलींचे डान्स ट्रूप घेऊन आलो आहे. तुम्ही मराठीत बोलताना पाहून ओळख करून दिली. या जरूर रविंद्र नाट्यगृहात. निमंत्रण स्वीकारून आम्ही पोहोचलो. आम्हाला पहिल्या रांगेत स्थान दिले गेले! वेगवेगळ्या राज्यातील डान्सेस दिमाखात सादर होत होते. लावणी ठसकेबाज झाली. भांगडा सुरू झाला. तुफान रंगला. खांदे उडवून, लाठी, रुमाल, रंगी बेरंगी लुंगी कुडत्यातील मुली खांद्यावर चढून कसरती करून बेभान नाचल्या. सभागृहातील भिंती हादरल्या असाव्यात!
त्या आठवणी ठेवून रविंद्र मधे मराठीत नाटक करायचंच असे ठरवून होतो. असो.
...

मांडणीसंस्कृतीआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2019 - 7:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर आठवणी.

ही चित्रफीत कालच व्हॉट्सॅपवरून आली...

शशिकांत ओक's picture

9 Sep 2019 - 11:19 pm | शशिकांत ओक

वरील चित्रफीत पाहून मला उधमपुरच्या विसर्जनाची आठवण झाली. शिवाय नाटकाचा हीरो फोन करून बोलला... मग श्रीनगरच्या गणेशोत्सवाची आठवण जागी झाली.

एक अफलातून ओक लेखन युनिव्हर्स तयार केलेले आहे. जे MCEU, DCU अथवा गेलाबाजार कँजोरिंग युनिव्हर्स च्या तोडीस तोड नक्कीच झालेले आहे.

आपले विविध स्पिनऑफ, धक्कातंत्र, सिक्वेल, प्रिक्वेल, कोहेरन्स हे सर्व अंतर राष्ट्रीयदर्जा प्राप्त वाटते. असेच वाचकांसाठी लिहत रहा. व मौलिक मार्गदर्शन करते व्हा.

शशिकांत ओक's picture

9 Sep 2019 - 11:29 pm | शशिकांत ओक

आपले प्रोफाईल नवलाईचे आहे...
बाकीचे सोडा... प्रोफेशनल असेसिन!
मस्तच आहे... वेळ पडलीच तर कोणाला मदत कुठे मागावी याची सोय करून दिली आहेत...!
गौरवाचे शब्द वाचून मला पुढे लिहायला प्रेरणा मिळाली.

जॉनविक्क's picture

10 Sep 2019 - 12:02 pm | जॉनविक्क

वेळ पडलीच तर कोणाला मदत कुठे मागावी याची सोय करून दिली आहेत...!

I am out. आता सेवानिवृत्त जीवन जगत आहे.

शशिकांत ओक's picture

10 Sep 2019 - 12:40 pm | शशिकांत ओक

समजले ते ठीक झाले
बाय द वे, पुढारीमधील लेखमाला वाचलीत का?
नसेल तर डकवीन तुमच्यासाठी

जॉनविक्क's picture

10 Sep 2019 - 3:21 pm | जॉनविक्क

नक्कीच वाचेन.

शशिकांत ओक's picture

10 Sep 2019 - 4:09 pm | शशिकांत ओक

वाचायची उत्सुकता आहे म्हणालात म्हणून शिवाय नव्या सदस्यांसाठी लढा पावनखिंडीतला भाग १ ते ७ सादर करत आहे.
भाग ६ आणि अंतिम ७ अजून अप्रकाशित आहेत ते यथावकाश सादर करेन.

दुर्गविहारी's picture

10 Sep 2019 - 7:21 am | दुर्गविहारी

लष्करी थाटाच्या आठवणी वाचायला मजा येत आहे. सहसा असे किस्से वाचायला मिळत नाहीत. आणखी येउ देत.

जेम्स वांड's picture

10 Sep 2019 - 10:00 am | जेम्स वांड

कोर्ट ऑफ इन्कायरी झाली. मीमधे पडून ऑडिटर्स पकडणार नाहीत असे अंतर एडजेस्ट करून ते मिटवले. असो...

हे वाचून कसेतरीच झाले, म्हणजे हे असले डिफेन्स मध्येपण चालते?

बाकी आठवणी मस्तच.

शशिकांत ओक's picture

10 Sep 2019 - 10:14 am | शशिकांत ओक

तुम्हाला काय वाटतंय? लेहला जा... आर्मीच्या टायर्सच्या ढिगाचे डोंगर! स्क्रॅप सेलला लावलेल्या बोलीतून मिळकत करायला पोस्टींग साठी स्पर्धा असतात...
पण हे सर्वच बाबतीत मात्र नसते...!
लोकल ऑडिटर ५ किलो साखर, एक ब्लँकेट वर एडजस्ट करायला उत्सुक असत!

लेहला जाऊ म्हणता?

ते ही स्वतःचा कष्टाचा पैसा वापरून??

नजीकच्या कचेरीत गेलो तरी भागेल की. सगळ्यांचे पाय मातीचेच, झालं!.

जेम्स वांड's picture

10 Sep 2019 - 4:59 pm | जेम्स वांड

तुम्ही एअरफोर्स मध्ये कुठल्या पदावरून निवृत्त झालात सर? पायलट होतात काय? ते अनुभव पण सांगा की थोडे.

जॉनविक्क's picture

11 Sep 2019 - 12:34 pm | जॉनविक्क

म्हणजे बगा पाकड्यानी पकडलेले आणी सोडलेले आपले अभिनन्दन सुद्धा त्याच रँकचे की. :)

शशिकांत ओक's picture

12 Sep 2019 - 1:50 am | शशिकांत ओक

रँक चे नाव एक असले तरी कामाचे स्वरूप बदलते असते. मी एम कॉम करून अकौंट्स ब्रांच मध्ये कमिशन मिळवून ३२ वर्षे सेवा करून १६ वर्षांपूर्वी निवृत्त झालो आहे. सेवा काळात विमान चालवायचे सोडा, बोट लावायची परवानगी नव्हती! कॉकपिट मधे, सिम्युलेटर मध्ये बसून माहिती घेतली, मिसाईल, रडार, वगैरे एक्सरसाईजमधे अंपायर म्हणून काम करायला संधी मिळाली हे मी भाग्य समजतो. असो.

जॉनविक्क's picture

12 Sep 2019 - 10:38 am | जॉनविक्क

अशी मॉडेस्टी अध्यात्म ज्यांच्यात खोलवर मुरले आहे तीच व्यक्ती दाखवू शकते _/\_

तुमचे किस्से वाचनिय असतात...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiqui

नाखु's picture

17 Sep 2019 - 7:38 am | नाखु

किस्से.
लिहिते रहा.

वाचकांची पत्रेवाला नाखु

चांदणे संदीप's picture

19 Sep 2019 - 4:18 am | चांदणे संदीप

किस्से आवडले! :)

माझ्या वडीलांचे आर्मीत असतानाचे (1987) विसर्जनाचे फोटो पाहायला आजही मजा येते. ठिकाण - पठाणकोट!

Sandy