✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मला भेटलेले रुग्ण - १९

ड
डॉ श्रीहास यांनी
Fri, 09/06/2019 - 18:46  ·  लेख
लेख
‘डॉक्टर कभी भी कुछ लगे तो याद किजीये ‘ असं म्हणत पेशंटच्या बापानी हात जोडून नमस्कार केला ..... ६ महीन्यांपुर्वी टिबीचं निदान झालं आणि सेकंड ओपिनीयनसाठी माझ्याकडे आले होते.... मग औषधं लिहीणं, टिबीची माहिती देणं आणि आहारासंबंधी बोलून झाल्यावर धीर देणं हा माझा नियमीत प्रोटोकाॅल ! प्रत्येक व्हिसीट वेळेवर किंवा वेळेआधीच आणि शेवटी पेशंट आजारातून बाहेर असा सगळा काळ गेला परंतू डोळ्यात अश्रु घेऊन धन्यवाद देतांना त्यांनी अदृश्य आर्शिवाद दिलेला मला दिसला .... मी असं काय जगावेगळं केलं की त्यांच्या डोळ्यात पाणी यावं ? मी ईतका महान आहे का ? ह्या प्रश्नांची उत्तरं स्वत:ला विचारणं सोडून दिलंय आताशा ..... —————————————- ह्या बाई ओपिडीत मुलगा आणि सुनेसोबत आल्या होत्या.....नुकत्यात आयसीयू मधून सुटी बाहेर आल्या आणि दम्यासाठी माझ्याकडे त्यांच्या फॅमिली डाॅक्टरांनी पाठवलेलं होतं.... तपासणी केली आणि औषधं , ईन्हेलर्स देऊन महीनाभरानी दाखवा म्हणून सागितलं.... महीनाभरानी त्या मुलीला सोबत घेऊन आल्या; तब्येत अगदी ठणठणीत होती ... मला बघून त्यांनी विचारलं की ते आधीचे डाॅक्टर नाहीत का ? मला कळेचना असं का विचारत आहेत , मी म्हणालो अहो मावशी मीच तर आहे तो आधीचा डाॅक्टर त्यावर त्यांनी विचार केला आणि बोलल्या की माफ करा डाॅक्टर मला आठवतच नाहीये हो ..... ह्याचं कारण असं होतं की ज्या दिवशी आयसीयूमधून बाहेर पडल्या तेव्हा रक्तातलं आॅक्सिजनचं प्रमाण कमी होतं , तसचं मी पहील्यांदा तपासल्यावरही कमीच होतं त्यामुळे त्यांच्या मुलाला मी कल्पना दिली होती की पेशंटला घरी आॅक्सिजनची व्यवस्था करावी लागू शकते ( पण तब्येत सुधारली तर नाही गरज पडणार)... मेंदूला पण आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे काही गोष्टी रजिस्टर नव्हत्या करता आल्या .... पण आज अगदी फ्रेश दिसत होत्या आणि रक्तातल्या आॅक्सिजनचं प्रमाण ९९% !! —————————————— दमा आहे निदान झालेलं होतं परंतु औषधांचा असर होत नाहीये आणि त्याला सारखा त्रास होतो असं आई कळवळून सांगत होती .... आई-वडील दोघही हवालदिल झालेले आणि मुलगा खोकून बेजार... शांतपणे सगळी माहिती घेतली आणि ईन्हलर्स कसे घ्यायचे , आहार काय असावा शिवाय त्रास झाला तर काय ॲक्शन प्लॅन हवा हे सगळं समजावलं आणि दमा प्रशिक्षण कार्यक्रमाला बोलावलं .... महिन्यानी कार्यक्रमानंतर ओपिडीत तपासणी करतांना त्यांचा (आई-वडील) चेहराच सगळं काही सांगत होता , पण त्यांच्या शब्दात ऐकायचा ईच्छा होती म्हणून विचारलं कसं आहे आता ? त्यावर आई म्हणाली सगळं छान आहे हो पण हा अभ्यासातच मागे आहे हो , अजिबात लक्ष्य देत नाही .... तुम्ही सांगा बरं त्याला ...मी पेशंटकडे बघून का कोण जाणे विचारलं “तू काय खेळतोस किंवा तुला नेहमीच्या विषयांशिवाय काय आवडतं? “ .... त्याची कळी खुलली “सर मी ॲथलेटीक्स (लाॅन्ग जंप आणि रनिंग) मध्ये डिस्ट्रीक्ट ला खेळतो”.... मी आई वडीलांना विचारलं “किती मुलं शाळेकडून खेळायला जातात ?” तर त्यांनी सांगीतलं हा एकाटाच शाळेला रिप्रेझेंट करतो !! मग मी म्हणालो ...”तू चालू ठेव खेळण..... एक दिवस एखादी मस्त स्पोर्ट स्काॅलरशिप परदेशी शिकायला जा आणि परत येऊन जास्त छानसं करिअर कर... आॅल द बेस्ट” आई-वडीलांना सांगितलं की त्याच्या आवडीचं करू दिलंत ना तर तो दम्यातून बाहेर पडेलच पण आयुष्यात खूप पुढे जाईल.... मला हे बोलतांना खूपच भारी वाटलेलं :)) —————————————— “ डाॅक्टर सगळ्या टेस्ट झालेल्या आहेत हो, माझा दमा कधीच बरा होणार नाही असं त्या डाॅक्टरांनी सांगीतलं “ अतिशय निराश सुरातच त्यानी सुरवात केली ..... मी सगळे रिपोर्ट चाळत त्याचं ऐकलं आणि विचारलं “ तू काय करतोस , म्हणजे शिक्षण चालू आहे की काम करतोस की एखाद्या स्पर्धापरिक्षेची तयारी करतो आहेस ?” त्यावर तो उत्तरला “सर पोलीस भरतीचा लेखी परिक्षा पास झालो , ग्राउंड बाकी आहे ...पण पळतांना खूप दम लागतोय, तयारी करतांना त्रास होतोय “...... औषधं बदलून दिली आणि सांगितलं की तुला काहीही अडचण येणार नाही , महिनाभरात परत भेट तुझ्या ग्राउंडआधी . हा प्रसन्न चेहेऱ्यानी गेला आणि त्याच हास्यासकट परत तपासणीसाठी आला .... औषधांची मात्रा कमी करतांना म्हणालो पुढच्या वेळेस पेढे घेऊनच ये रे.... हा जेव्हा परत येईल तेव्हा एक संपूर्ण भाग लिहून काढणार आहे ....... ——————————————
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
आरोग्य
औषधोपचार
व्यक्तिचित्र
व्यक्तिचित्रण
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
प्रतिक्रिया
समीक्षा
लेख
अनुभव
सल्ला
माहिती
प्रश्नोत्तरे
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
17393 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

वाह...

किरण कुमार
Fri, 09/06/2019 - 19:01 नवीन
नेहमीप्रमाणे झक्कास ..
  • Log in or register to post comments

Sooper

स्थितप्रज्ञ
Fri, 09/06/2019 - 19:16 नवीन
  • Log in or register to post comments

वा! अप्रतिम .....

सुधीर कांदळकर
Fri, 09/06/2019 - 19:16 नवीन
”तू चालू ठेव खेळण..... एक दिवस एखादी मस्त स्पोर्ट स्काॅलरशिप परदेशी शिकायला जा आणि परत येऊन जास्त छानसं करिअर कर... ऑ द बेस्ट”
औषधं बदलून दिली आणि सांगितलं की तुला काहीही अडचण येणार नाही , महिनाभरात परत भेट तुझ्या ग्राउंडआधी .
वा! याला म्हणतात सल्ला! झकास. वैद्यराज चिंताहर देखील असतात बरें! मस्त लेखाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Sooper

स्थितप्रज्ञ
Fri, 09/06/2019 - 19:22 नवीन
तुस्सी ग्रेट हो डॉक!!!
  • Log in or register to post comments

सुंदर ! बर्‍याच दिवसांनी

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 09/06/2019 - 19:32 नवीन
सुंदर ! बर्‍याच दिवसांनी लिहिलंत. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट

गवि
Fri, 09/06/2019 - 20:09 नवीन
उत्कृष्ट पण इतके मोठे ब्रेक्स घेऊ नका.
  • Log in or register to post comments

मस्त लेख.

तमराज किल्विष
Fri, 09/06/2019 - 21:24 नवीन
मस्त लेख.
  • Log in or register to post comments

झक्कास

भंकस बाबा
Fri, 09/06/2019 - 21:33 नवीन
मस्त लेख
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय.

शलभ
Sat, 09/07/2019 - 10:31 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

पोषण आहार योजना

अमोल निकस
Sat, 09/07/2019 - 20:57 नवीन
प्रत्येक क्षयरुग्णांस पोषण आहार योजने विषयी माहिती दिली, तर रुग्णांस आर्थिक मदत होत जाईल सर..(500रुपये प्रति महिना ) ती आर्थिक मदत तुम्ही त्यास प्राप्त करुन देऊ शकता.!
  • Log in or register to post comments

माहिती आहे ...

डॉ श्रीहास
Sun, 09/08/2019 - 08:24 नवीन
माझ्या क्लिनीक ला JEET (Joint Efforts to Eliminate TB) सेंटर आहे. धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल निकस

म्हणजे डॉट सेंटर आहे का ? ?

अमोल निकस
Sun, 09/08/2019 - 20:31 नवीन
म्हणजे डॉट सेंटर आहे का ? ? कूठे आहे ? ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

डाॅटस् सेंटर नाहीये ... JEET

डॉ श्रीहास
Mon, 09/09/2019 - 09:56 नवीन
डाॅटस् सेंटर नाहीये ... JEET सेंटर वेगळा पण डाॅटस् ला सपोर्ट म्हणून सुरू झालेला प्रयोग आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल निकस

टीजर आवडल्या

जॉनविक्क
Sat, 09/07/2019 - 21:52 नवीन
पुढील लिखाण लवकर एउदया
  • Log in or register to post comments

प्रतिक्रीयांसाठी आभारी आहे ..

डॉ श्रीहास
Sun, 09/08/2019 - 08:26 नवीन
प्रतिक्रीयांसाठी आभारी आहे .... असाच लोभ असू द्या
  • Log in or register to post comments

डॉ, मनापासून नमस्कार!

तुषार काळभोर
Sun, 09/08/2019 - 20:08 नवीन
तुम्ही अगणित रुग्णांसाठी आणि कुटुंबासाठी सुखकर्ता दुःखहर्ता आहात. प्रश्न-पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा आणि जिल्हास्तरावर अॅथलेटिक्स मध्ये खेळणे हे सामान्य तरुणांसाठीसुद्धा खूप दमखाऊ असतं. दमा असलेला रुग्ण या स्तरावर तसेच पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा देण्यासाठी आजार कसा बाजूला ठेवतात?
  • Log in or register to post comments

नियमीत ईन्हेलर्स वापरले तर

डॉ श्रीहास
Mon, 09/09/2019 - 09:54 नवीन
नियमीत ईन्हेलर्स वापरले तर दमा १००% आटोक्यात राहातो .... दमा आटोक्यात आणणं अवघड नाहीये , लोकांची भिती / गैरसमज जास्त अवघड आहेत आणि ते दूर केले की माझं काम सोपं होतं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

jeet या सामजिक संस्थेचे लोक

अमोल निकस
Sun, 09/08/2019 - 20:33 नवीन
jeet या सामजिक संस्थेचे लोक भेटीसाठी पण येत असतील ? ?
  • Log in or register to post comments

अहो त्यांनी एक व्यक्ती

डॉ श्रीहास
Mon, 09/09/2019 - 10:06 नवीन
अहो त्यांनी एक व्यक्ती फुलटाईम नेमलेली आहे ... JEET सेंटरची खास बाब (बाकी लोकांसाठी सांगतो) अशी की रुग्णाचं टिबीचं निदान झाल्यावर सरकारी नोंदणी (Notification)करण अत्यावश्यक असतं , त्या नंतर रुग्णाचं आधारकार्ड ज्या बॅंक खात्याशी जोडलेलं आहे त्याचं रेकाॅर्ड घेऊन त्या दर महिन्याला ५००₹ डायरेक्ट जमा होतात ( incentive/support) म्हणून ... आजतागायत महाराष्ट्रात ३५ कोटी ₹ ची मदत केली गेलेली आहे आणि ५० कोटींपर्यत करायचं टार्गेट ठेवलं गेलंय.. ही बाब फारच कमी डाॅक्टर्स , रुगण आणि ईतरांना माहिती आहे पण हळूहळू समाजात पोहोचेल आणि टिबीचं प्रमाण कमी होईलच!! अमोल तुमचे आभार .... उत्तराच्या निमित्तानी सरकार नी सुरू केलेल्या आणि आमचा सक्रीय सहभाग असलेल्या जनहीत कार्याबद्दल लिहीता आलं _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल निकस

सर मी जिल्हा क्षयरोग केंद्र

अमोल निकस
Mon, 09/09/2019 - 21:02 नवीन
सर मी जिल्हा क्षयरोग केंद्र येथेच (T.B.H.V) म्हणून नौकरीला आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

तुमच्या कडे JEET वाले Full

अमोल निकस
Mon, 09/09/2019 - 21:09 नवीन
तुमच्या कडे JEET वाले Full time असतील. आमच्याकडे private च बहुतांश notification मलाच बघाव लागत.. private डॉक्टरांनी क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वोत्तपरी मदत करने खुप आवश्यक आहे.. त्यांना सर्व सोयी-सुविधा देऊन पण पाहिजे तेवढे सरकारी यंत्रणेला खाजगी रुग्णांलयांकडून मदत होतांना दिसत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

भारी हो डॉक!

mayu4u
Mon, 09/09/2019 - 14:02 नवीन
डॉक, तुस्सी ग्रेट हो!
  • Log in or register to post comments

हाडाचे डॉक्टर आहात...

शशिकांत ओक
Wed, 09/18/2019 - 23:23 नवीन
वाचून पुढच्या भागाची वाट बघतोय.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा