सावज (भाग २)

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
24 Aug 2019 - 12:01 pm

भाग १ : http://misalpav.com/node/45068
तिच्या डोळ्यात धुंद होऊन त्याने त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले आणि त्यांचा रस तो प्राशन करू लागला . त्याला समजतच नव्हत जास्त धुंदी कशात आहे , तिच्या डोळ्यात कि तिच्या ओठात . तो कितीतरी वेळ त्यांच प्राशन करतच होता . दोघंही एकमेकांना उत्तेजित करत होते . तो नवखा असला तरी त्याच्या स्पर्शाने ती वेडी झाली होती . ते अजूनही foreplay पर्यंतच होते . अजून त्याने खऱ्या विषयाला सुरुवातही नव्हती केली होती . तेव्हढ्यातच तिची हि दशा झाली होती . ती या पूर्वरंगातच इतकी उतावीळ झालेली कि तिला आता खऱ्या सुखाची ओढ लागली होती . आणि त्यासाठी ती आर्जव करत होती . तोही आता तयार झाला होता . पण अचानक तो थांबला आणि तिला हलकेच स्वतःपासून दूर केलं आणि खिडकीपाशी आला . तिने क्षणभर त्याची वाट पाहिली . त्याला सादही घातली . पण त्याने तिच्याकडे लक्ष नाही दिल आणि तसाच थांबला .

रात्र किती सरली होती काय माहित ? तो खिडकीतून बाहेर बघत बसला होता . त्याला साद देऊनही तो येत नव्हता त्यामुळे ती उठली आणि हळुवारपणे त्याच्यापाशी आली . तिने नाजूकपणे पाठीमागूनच त्याला मिठी मारली आणि त्याच्या कानापाशी ओठ नेऊन त्याच्या कानात कुजबुजली
" मला अशी अधुरी नको ना सोडूस . चल ना . "
असं म्हणत ती आर्जव करत होती . त्याने समोर पडलेल्या पाकिटातून एक सिगारेट बाहेर काढली . ती त्याच्या पाठीवर किस करत होती . त्याने सिगरेट शिलगावली आणि त्याचा कश घेत तो खिडकीतून बाहेर बघत होता . ती इतकी आतुर झाली होती मात्र तो शांत होता .
" ये ना रे . काय झाल ? " तिने त्याला परत हाक दिली आणि त्याला ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती .
" बस जरा " म्हणत त्याने तिला आपल्या शेजारी बसवल .
" कस आहे मला तू खूप आवडलीस आणि मी तुझ्याबरोबर एकरूप होणार होतो पण मधेच मला तुझ्या पहिल्या नवऱ्याची आठवण आली आणि मग जाणवल हा बेड , हि रूम इथे तुम्ही दोघ असाल , एकत्र आलेले आणि इथंच मला ... मला नाही ठीक वाटलं . मी हा विचार आल्यावरपण तसाच पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण मला तोच सर्वत्र जाणवत होता . मग माझा मूडच गेला . "
" come on . तो नाहीए आता . आता फक्त आहे ते तू आणि मी . " ती त्याला समजावत म्हणाली .
" नाही I am not OK with that . म्हणजे किमान या जागेवर तरी , या वास्तूत तरी नाही . या वास्तूत असं काहीतरी आहे जे जाणवतंय आणि त्यामुळे नको . "
" मग आपण बाहेर जाऊया ना . "
" कुठे जाणार आहेस पावसात ? "
" come on असं नको ना करुस माझी काय अवस्था झालीय ते तुला काय सांगू . "
" सोड मला " म्हणत त्याने तिचा हात झिडकारला . ती तशीच जाऊन बेडवर पडली . कितीतरी वेळ तळमळत पहाटे कधीतरी तिला झोप लागली .

तिला जाग आली तेव्हा तो तिला उठवत होता . ती पटकन उठून बसली .
" काय हे तू तयार पण झालास मला काही बोलला का नाहीस . "
" मी निघतो आता . तुझी झोप नीट नाही झाली . तू आराम कर . "
त्याच्या वाक्याने ती चिडली . शेजारची उशी फेकून म्हणाली
" माझी काय अवस्था झाली आहे आणि तुला झोपेच पडलं आहे . "
हे बघ मी तुला सांगितलं ना कारण त्याच "
" but I want that "
" पण इथे शक्य नाही . "
" तू म्हणशील तिथं यायला तयार आहे मी . तू थांब मी लगेच तयार होऊन येते . जाऊ आपण . "
असं म्हणत केस सावरत ती स्वतःच आवरू पहात होती .
" एक मिनिट शांत हो . आता नाही . माझं काम आहे . आपण नंबर एक्सचेंज करू . मी तुला फोन करेन . "
" ए मला नाही ना धीर धरवत . तुझ कधी काम होणार मग तू कधी फोन करणार ? "
" ठीक आहे मग काय करू ? "
" तू लगेच फोन कर . "
" इथूनच करू का ? "
" नको तिकडे पोहोचलास कि कर फोन . "
" ठीक आहे करतो मी फोन . "
त्यांनी नंबर एक्सचेंज केले . अचानक तिच्या लक्षात आलं त्याचा फोन सुरु होता . पण त्याच्या फोनची तर काल बॅटरी संपली होती .
" अरे तुझ्या फोनची बॅटरी संपली होती आणि तुझ्याकडे तर चार्जर पण नव्हता मग कस ? "
" अग इथंच सापडला चार्जर त्याने केला चार्ज . "
" इथे कुठे माझा फोनचा चार्जर वेगळा आहे . मग हा ... "
त्याने तिला मधेच अडवलं आणि म्हणाला
" काय ते चार्जरच घेऊन बसली आहेस . ते सोड मला उशीर होतो आहे . " म्हणत तो निघाला .
ती कितीतरी वेळ त्याला पाठमोरा जाताना पाहत होती . तिने फोन चेक केला त्याची बॅटरी लो झाली होती . ती तो चार्ज करण्यासाठी पाहू लागली तर लाईट नव्हती . आता अजून थोडा वेळ लाईट नाही आली तर तिचा फोन बंद होऊ शकेल अशी स्थिती होती . मग नंतर त्याचा फोन आला तर . त्याला माझा फोन बंद लागेल . त्यापेक्षा मी फोन करू का त्याला . नाही तस केलं तर त्याला राग येईल . ती असा विचार करत होती तेव्हढ्यात त्याचा फोन आला . त्यानं तो पोहोचल्याच सांगितलं . तिला पुढे बोलायचं होत तितक्यात फोन बंद झाला . तिने पाहिलं तर त्याची बॅटरी संपली होती . असू दे त्याच्या पोहोचण्याची तर खबर मिळाली . आता काय करावं याचा विचार ती करत होती . लाईट नसल्यामुळे काही करता येणार नव्हतं . मग तिने काही नाही तर रेडिओ सुरु केला . त्याच्यावर बातम्या सुरु होत्या . दोन बातम्या तिला नीट ऐकू आल्या नाहीत कि काय कुणास ठाऊक .
' शहराला जाणाऱ्या पुलावर अजूनही पाणी असल्यामुळे तो कालपासून बंदच आहे . पावसामुळे लाईटचा काही बिघाड झाला आहे आणि लाईट जी रात्री गेली आहे ती आज संध्याकाळपर्यंत परत येण्याची शक्यता नाही . ' काल मला कितीतरी वेळ झोप आली नाही . मी तशीच पडून होते आणि त्यावेळी तो तिथेच होता बसून . तो कुठेही गेला नाही . लाईट गेल्याच आठवतंय मला तोपर्यंत मी जागीच होते आणि त्यावेळी गेलेली लाईट अजून आली नाही मग याने फोन चार्ज कधी केला ? तो रात्री आला तेव्हापासून माझ्या समोरच आहे मग त्याला कधी वेळ मिळाला आणि पुलावर तर अजूनही पाणी आहे मग तो कसा गेला पलीकडे .

तिला ऐकलेली अजून एक बातमी आठवली . ' कोणी बाईकस्वार पुलावरून वाहून गेला होता . '

.... क्रमशः

वाङ्मयकथालेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

24 Aug 2019 - 12:11 pm | जॉनविक्क
ज्योति अळवणी's picture

24 Aug 2019 - 6:19 pm | ज्योति अळवणी

मस्त

पुढचा भाग लवकर येउद्या

मराठी कथालेखक's picture

27 Aug 2019 - 11:44 am | मराठी कथालेखक

छान..
पण ....मंजू आली का हो परत :)

मराठी कथालेखक's picture

4 Sep 2019 - 4:04 pm | मराठी कथालेखक

कथेचे भाग वेळेत न टाकणे - दंड रु. ५०००
कथा अपुर्ण ठेवणे - दंड रु १०,०००