काॅफी पिऊन आले...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
28 Jun 2019 - 10:20 am

ऐकावयास गेले,
बोलून काय आले?
बोलावलेस तू, मी
काॅफी पिऊन आले..

ना थेंब पावसाचा
ओली.. भिजून आले.
भांबावल्या दुपारी
काॅफी पिऊन आले..

होते कुणी न कोणी
नव्हतोच एकटे ना?
लोकां कसे पटावे
काॅफी पिऊन आले?

पेले जरी रिकामे
डोळे भरून आले..
वाहू मुळी न देता
काॅफी पिऊन आले.

मुक्त कविताकवितामुक्तक

प्रतिक्रिया

माहितगार's picture

28 Jun 2019 - 10:26 am | माहितगार

कविता आमच्या पर्यंत पोहोचली

( जिकडे पोहोचायला हवी होती तिकडे तुम्ही पोहोचवली का पोहचवल्यावर पोहोचली का ते माहित नाही, माहित असण्याची गरजही नाही म्हणा:)) )

प्राची अश्विनी's picture

28 Jun 2019 - 11:24 am | प्राची अश्विनी

:)):)):))

चलत मुसाफिर's picture

28 Jun 2019 - 11:34 am | चलत मुसाफिर

कॉफीसोबत सँडविच, केक किंवा कुकीज नसतील तर आमचेही डोळे असेच भरून येतात.

प्राची अश्विनी's picture

29 Jun 2019 - 7:28 am | प्राची अश्विनी

:)

गवि's picture

28 Jun 2019 - 11:35 am | गवि

आवडली.

राघव's picture

28 Jun 2019 - 11:59 am | राघव

सुरेख. आवडले.

बाकी नक्की काय झालं असावं हा जो धूसर भाग आहे ना, त्यामुळे आणिक मझा येतोय वाचतांना! ;-)

प्राची अश्विनी's picture

29 Jun 2019 - 7:28 am | प्राची अश्विनी

धन्यवाद:)

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Jun 2019 - 12:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

फारच आवडली

रच्याकने :- या कवितेला "कीस बाई कीस दोडका कीस," ची चाल फीट बसते.

पैजारबुवा,

अभ्या..'s picture

28 Jun 2019 - 12:48 pm | अभ्या..

"अपना टाईम आयेगा"ची चाल पण परफेक्ट बसते
बाकी कॉफी आवडली. ;)

प्राची अश्विनी's picture

28 Jun 2019 - 12:54 pm | प्राची अश्विनी

हे राष्ट्र देवतांचे..‌ का?
:)

यशोधरा's picture

28 Jun 2019 - 1:03 pm | यशोधरा

कॉफी मस्त, सुगंधित आहे ना? बाकी सब को मारो गोली!

जव्हेरगंज's picture

28 Jun 2019 - 1:19 pm | जव्हेरगंज

kadak

प्राची अश्विनी's picture

28 Jun 2019 - 5:54 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद सगळ्यांना!

जालिम लोशन's picture

28 Jun 2019 - 6:14 pm | जालिम लोशन

+1

जॉनविक्क's picture

29 Jun 2019 - 12:56 pm | जॉनविक्क

पण ग्लास छोटा होता की काय असा प्रश्न निर्माण झाला ...

काही तरी रूपक आहे पण विचार खरतोय.
---------
तुटत आलेले नाते?

माहितगार's picture

1 Jul 2019 - 12:22 pm | माहितगार

किंवा 'शिल्लक असलेले हळुवार भावबंध' असे जरासे सकारात्मक करून वाचणे शक्य होईल का?

'प्राची अश्विनींच्या मागिल लेखनाच्या लयीतील एक आणखी वेगळं काव्यपुष्प' असे म्हणता येईल का?

प्राची अश्विनी's picture

3 Jul 2019 - 11:06 am | प्राची अश्विनी

__/\__

विचार करतोय.
तुटत आलेले नाते?

टर्मीनेटर's picture

1 Jul 2019 - 11:19 am | टर्मीनेटर

अनेकांना विडंबनासाठी प्रेरणा देणारी कविता आवडली _/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2019 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

प्रशांत's picture

1 Jul 2019 - 12:55 pm | प्रशांत

कॉफी आवडली

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2019 - 1:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

अच्छा, प्रशांतही होता तेथे कॉफी प्यायला !!? =))

आता प्रशांतला काहीतरी प्यायला नेऊन अर्थ समजून घेणे आले.

प्रशांत's picture

1 Jul 2019 - 1:40 pm | प्रशांत

बिल तुम्हिच देणार

प्रचेतस's picture

1 Jul 2019 - 1:42 pm | प्रचेतस

गवि बिल देणार असले तर मीही सोबत येईन.

गवि's picture

1 Jul 2019 - 1:44 pm | गवि

गांव बसा नही और...

तुम्ही बिल देणार ही संधी कशी सोडू? आधीच बुक केलेलं उत्तम.

गवि जपून बर्का, वल्ली एकटा येत नाही म्हणे. तो आला की मागुन मुलींची रांग असते.

प्रचेतस's picture

1 Jul 2019 - 1:51 pm | प्रचेतस

काहीतरीच हं तुझं.

गवि's picture

1 Jul 2019 - 1:53 pm | गवि

हो ना. त्यांचे ते स्टारबक्सादि हँगौट्स आपल्याला परवडत नाहीत. प्रशांतचं काय, टपरीवरही केसरी उकाळा वगैरेवर भागवता येईल.

आपल्यालाही टपरी चहाच प्रिय.

प्रशांत's picture

1 Jul 2019 - 8:51 pm | प्रशांत

तो आला की मागुन मुलींची (?) रांग असते

प्राची अश्विनी's picture

3 Jul 2019 - 11:06 am | प्राची अश्विनी

धन्यवाद सगळ्यांना!

उपयोजक's picture

5 Jul 2019 - 11:39 pm | उपयोजक

फक्कड!

रानरेडा's picture

5 Jul 2019 - 11:44 pm | रानरेडा

आले आमच्या कडे चहात टाकतात. कॉफीत कसे लागते?

विजुभाऊ's picture

8 Jul 2019 - 11:34 am | विजुभाऊ

कॉफीत"सुके आले " म्हणजे सुंठ टाकतात

रानरेडा's picture

8 Jul 2019 - 3:04 pm | रानरेडा

Coffee

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jul 2019 - 3:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही पण छान आहे !

कर्नलतपस्वी's picture

27 Dec 2023 - 7:03 pm | कर्नलतपस्वी

28966 टिचक्या कवितेच्या धाग्यावर बघून डोळे भरून आले.
आजकाल अनुक्रमे 28,89,66,96 टिचक्या जरी आल्या तरी मन सुखावते.