वेगळ्या प्रतिमांचे मुस्लीम

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
21 Jul 2018 - 12:19 pm

ज्यांना टिका करायच्या आहेत त्यांनी माझ्या आधीच्या धाग्यांवर जावे, ज्यांना (खरोखर उपरोधाने नव्हे) मुस्लीमातील (परधर्मीय/नास्तिक द्वेष, तकफीर, हिंसा नसलेला) नेमस्तपणा (मॉडरेशन), सुधारणावाद, प्रबोधनवाद, आधूनिकता, अनुकूलनीयता, सहिष्णुता, लवचिकता, अभिव्यक्ती स्वात्रंत्र्य, कला आणि संस्कृती स्वातंत्र्याची बुज राखणार्‍या, रचनात्मक आणि सकारात्मक योगदानाचे कौतुकाचे दाखले देणे शक्य आहे त्यांनी धागा लेख न वाचताही प्रतिसादातून मनमोकळे कौतुक करण्यास हरकत नसावी. अर्थात त्यात मर्यादा अथवा उणीवा असल्यास प्रसंगी कठोर टिकाही केली जाऊ शकेल हे लक्षात घ्यावे.

*** नमनाला घडाभर ***
त्याज्य ते टाकायचे आणि चांगले ते घ्यायचे या साध्या तत्वाचा का कोण जाणे विसर पडतो. बहुतेक लोक, कोणतेही धर्म किंवा समाज असतील त्यात सर्वच चांगले किंवा सर्वच चुकीचे अश्या उणिवग्रस्त बायनरीत सापडलेले असतात. मी अलिकडे मुस्लीम समाजीय मर्यादांची चर्चा विवीध धागा लेखातून केली, प्रबोधनांच्या दिशांची चर्चा पुढच्या लेखातून करणार आहेच. यात धर्मग्रंथातील मर्यादांबद्दल पालन करणार्‍या समुहास का जबाबदार धरु नये असे जे मत असते त्या बद्दलच्या बाजूची चर्चा मी इतरत्र केल्या आहेत त्यांचे संकलन पुढील लेखातून देता आल्यास बघेन. तुर्तास त्याचा इथे केवळ दुवा आल्यास बघेन - थोडक्यात सांगायचे तर कोणतेही व्यक्ति, गट आणि समुह पुर्णतः धर्मग्रंथा-पंथा प्रमाणे चालत नाहीत आणि इन एनी केस विचारांची लढाई विचारांनी लढावी आणि व्यक्ती व समुह स्टिरीयो टाईपींगीग आणि विशेषतः द्वेष टाळावेत ; पण या नाण्याची दुसरी बाजू धर्मग्रंथांची चिकित्सा करताना अंशतः तरी टिका होणे स्वाभविक असते आणि धर्मग्रंथांची नावे नमुदकरुन अशी टिका करणे जोखीमीचे असू शकते शिवाय त्यासाठी अधिक अभ्यासाची गरज असते आणि असे अभ्यास लेखन सर्वसाधारणपणे अभ्यासकांपर्यतच मर्यादीत रहातात. ईतर धर्मीय सर्वसाधारणपणे धर्मग्रंथांच्या चिकित्सा आणि प्रबोधनाच्या प्रक्रीयेतून जरासे पुढे गेले असल्यामुळे धर्मग्रंथांच्या तत्वज्ञानांच्या चिकित्सा करणे कमी जोखीमीचे होते आणि समुहाच्या नावामागे राहुन आडमार्गाने टिका करण्याची गरज कमी भासत असावी तेच मुस्लीम समाजाच्या बाबतीत समुहांचे नाव घेऊन टिका करणे स्टिरीओ टायपींगच्या शक्यता असल्या तरी कमी जोखीमीचे आणि ढोबळ भेद आणि खुपणार्‍या बाजू सर्वसामान्यांना एकमेकांशी शेअर करणे अधिक सोपे जात असावे. याचा अर्थ मी स्टीरीओ टायपींग अथवा सरसकटीकरणाचा समर्थक आहे असा होत नाही, वस्तुतः स्टीरीओ टायपींग अथवा सरसकटीकरण तर्कशास्त्रीय कसोट्यांवर टिकत नाही. ढोबळ भेद आणि खुपणार्‍या बाजूतर शेअर केल्या पण या स्टीरीओ टायपींग अथवा सरसकटीकरणाचा प्रभावातून बाहेर कसे यायचे हा ही महत्वाचा प्रश्न असला तरी संबंधीत धर्मीय असलेले पण स्टिरीयो टाईप मध्ये न बसणार्‍या छोट्या छोट्या गट, समुह आणि स्टिरीयो टाईप मध्ये न बसणार्‍या व्यक्तिंचे योगदान आणि उदाहरणे लक्षात घेतली की सरसकटीकरणाच्या प्रभावातून मोकळे करणे सोपे जावे असे वाटते. आणि या धागा लेखाचा उद्देश्यही असाच आहे. अर्थात आपापल्या समुहांच्या गतकालीन चुका मोकळेपणाने मान्य करण्याची प्रक्रीया उपलब्ध असल्यास समाज गतकालीन वेदनांच्या कोषात अडकलेला न रहाता परस्परांचे सकारात्मक योगदान समजून घेणे आणि पचनीपडणे सोपे जात असावे.

तसे पहाता सर्वसामान्य माणसाचा सर्वसामान्य दिवस ८ तास काम आठतास झोप आणि उर्वरीत वेळ त्यासाठी लागणारी तयारी कौटूंबिक जबाबदार्‍या कुटूंब आणि मित्रांसोबतच्या मनोरंजन आणि खेळात संपत असतो. त्यातला जेमतेम थोडा वेळ धार्मीक बाबींवर खर्च होतो. तेव्हा इतराम्शी धार्मीक बाबीम्वरुन संघर्ष होण्याचे प्रसंग कमी यावयास हवे. पण प्रत्यक्षात काही वेळा उलटेही घडताना दिसते की ज्यामुळे अविश्वास आणि असुरक्षीततेच्या भावना मनात घरे बनवू लागतात. मुस्लिम समाजावरील (कि धर्मावरील ?) एक आक्षेप काहीसा असा असतो की अल्पसंख्य असतात तिथे तडजोड करुन रहावे, तडजोड करुन रहाणे अवघड गेल्यास स्थलांतर करावे, पण संधी मिळाल्यास प्रेम किंवा लागल्यास भेद निती वापरुन धर्मप्रसार करावा. अशा पद्धतीच्या बाबी ग्रंथीत असल्याने संशयवादास बळ मिळते हे खरे. पण या नाण्याची दुसरी बाजू अशी की कोणताही समुदाय अत्यल्पसंख्यांक असतो तेव्हा तो बहुसंख्यांशी जुळवून घेऊन रहातो, जुळवून घेऊन रहाणे अशक्य होत असल्यास स्थलांतरे करतो आणि पण संधी मिळाल्यास प्रेम किंवा भेद निती वापरुन स्वतःचा प्रसार करतो हे तत्व ग्रंथात लिहिले नाही तरीही अस्तीत्वात येऊ शकते. ह्या मुद्याकडे नरहर कुरुंदकरांनीही त्यांच्या लेखनातून लक्ष्य वेधले असावे. अत्यल्पसंख्य असताना समुह आहे ती स्थिती स्विकारतात तेच संख्या वाढते तशी अपेक्षा आणि सवलतींची इच्छा वाढते. या नव्या वाढलेल्या अपेक्षा आणि सवलतींच्या अपेक्षा बहुसंख्य समाजास खुपणे स्वाभाविक असते मग त्या सोबत एकमेकांच्या निसटत्या बाजू अधिक खुपणे अविश्वास असुरक्शेच्या भावना इथपर्यंतचा प्रवास सहज पुढे जात असावा. तेच नवीन अल्पसंख्यांकाचा गट आला की आधीचे लोक आपापसातले मतभेद विसरुन नव्या अल्पसंख्यांका विरुद्ध एकजूट होऊ लागतात हे सर्व नैसर्गीक असावे. त्यामुळे नवे नवे अत्यल्पसंख्यांक गट आयात करावे पण कोणताही नवा अल्पसंख्यांक गट एकगठ्ठा इंट्रोड्यूस न होऊ देऊ नये तर या मानवी प्रश्न आणि भावनांचे निराकरण होऊ शकेल का असा प्रश्न मला कधी कधी पडत असतो. असो.

सगळेच मुस्लीम मॉडरेट असतात असा एक पुरोगामी आक्षेप असतो, प्यु रिसर्च सर्वे चे अहवाल बघता असे सरसकट प्रमाणपत्र देण्याबद्दल साशंकता वाटते. दुसरा एक आक्षेप विरुद्ध बाजूने काही अभ्यासकांचा असा येतो की मुस्लीमातील धर्मग्रंथाधारीत मॉडरेट मॉडरेशन साठी जी टूल्स आणि टेक्निक वापरतात तीच टूल्स आणि टेक्नीक एक्सट्रीमीस्ट वापरतात (उदा. इज्तीहाद ) केवळ वेगळ्या दिशेने एवढेच त्यामुळे मॉडरेशनची वेगळी दखल का घ्यावी. मला वाटते मॉडरेशनची दख्ल घेण्याने भावी प्रबोधनाच्या दिशांसाठी आणि सामंजस्यासाठी अशा अभ्यासाचा उपयोग होऊ शकावा.
*** विषय ओळख समाप्त***

मुस्लिम समाजातील मॉडरेशनचा तात्वीक मांडणी वाचनास आली तरी मॉडरेशन झालेल्या व्यक्ती आणि समुहांच्या इतिहासाचा नेटका अभ्यास माझ्या प्राथमिक गूगल शोधातून अद्याप मिळाला नाही -कुणाला त्याची माहिती असल्यास तो येथे देण्यास हरकत नाही. जिथे जगण्याची व्यावहारीक गरज येत असणार तेथे किमान थोडे फार मॉडरेशन होत असणार हे स्वाभाविक आहे. खासकरुन व्यावहारीक राहुन सत्तेत टिकून रहाण्याची सत्ताधिशांना गरज असते. त्यामुळे अंषतः मॉडरेशनला त्यांचा सपोर्ट मिळत असतो, कोणत्याही समाजात कर्मठतेला वैतागून नास्तिक आणि लिबरल असणारे छुपे किंवा उघड व्यक्ती आणि गटही असणे स्वाभाविक असते तेही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मॉडरेशनचे मार्ग शोधत असतात.

वासतीया wasatiyyah हि एक इस्लामिक संकल्पना आहे जी मध्यममार्ग किंवा समतोलाचे प्रतिपादन करते. तर इज्तिहाद हि संकल्पना दुधारी तलवार आहे जी, न उलगडलेल्या इस्लामिक संकल्पनांची स्वतःचे अर्थ स्वतः लावण्याची लवचिकता उपलब्ध करते यात नकारात्मक अर्थ काढल्यास अतिरेकाच्या दिशेने प्रवास होऊ शकतो तेच आधुनिकतेच्या बाजूने अर्थ काढल्यास नेमस्तपणा किंवा सुधारणावादास पोषक ठरु शकते.

काही मुस्लीम खलीफा आणि तत्वज्ञांनी कर्मठांपासून सुटकेसाठी काही चातुर्यपुर्वक मांडण्या केल्याचे क्वचित दिसते. कुराण अनादी आहे की इश्वर निर्मीत हा मुस्लीम खलिफांच्या इतिहासात चातुर्यपूर्णपणे कर्मठांच्या गळ्यात मारण्यासाठी वापरला गेलेला असाच वाद होता (Muʿtazila). याच धर्तीवर जो पर्यंत कर्मठता समोर येते तो पर्यंत विज्ञान अनादी आहे की इश्वर निर्मित हा वाद श्रद्धावंतांसमोर उकरण्यात काहीच हरकत नसावी. ओटोमनांच्या एका खलिफाच्या काळात अशाच काही वैचारीक युक्त्या वापरुन स्त्रीयांना दगडांनी मारण्याची शिक्षा केवळ कागदावर राहिल प्रत्यक्षात होणार नाही हे पाहिले गेले. युरोपीयन दबावाखाली अल्पसंख्याकांना किमान अधिकार देणारे तंझीमत सुधारणा ओटोमनांनी केल्या अर्थात याच काळात ओटोमनांनी त्यांच्या युरोपीयन वसाहतीत अर्मेनीयन जिनोसाईड घडवले.( याच तंझीमीयत सुधारणांच्या परिणामी रशियन ज्यूंना इज्राएलमध्ये जमिनी विकत घेण्याचे आधीकार मिळाले) तसेच तंझिमीयत सुधारणांनी तुर्कस्थानच्या भावी म्हणजे २०व्या शतकाच्या पुर्वार्धातील केमाल पाशा याच्या सेक्युलर सुधारणांची बिजे रोवली असे समजले जाते. ( संदर्भ इंग्रजी विकिपीडीया). १९ आणि २० व्या शतकात रशियनांनी मध्य आशियात स्वतःची सत्ता बळकट करताना सुधारणावादी जदीदांची मदत घेतली. सेंट्रल एशियातील समुहांशी जोडून घेत केलेल्या प्रसंगी लादलेल्या रशियन-सोव्हीएत-कम्युनीस्ट सुधारणावादाचे प्रयत्नांचे यशापयश अभ्यासणे उपयु़क्त ठरु शकते (संदर्भ,,,) चीनही किमान पातळीवर सांस्कृतिक स्वरुप स्थानिक असेल , तर दुसर्‍या बाजूला चीन बाह्य राजकीय प्रभाव पडणार नाहीत या दृष्टीने अती संवेदनशील रहात आला आहे. चिनी सुधारणावादी प्रयत्नांच्या यशापयाशाचाही अभ्यास होण्यास वाव असावा असे वाटते. (इराणसारख्या देशात क्ठीण परिस्थितीतून का होईना बहाई सारखा पंथ पुढे येताना दिसतो त्याचा विकास आणि त्यातील सुधारणावाद त्यांच्या मर्यादांसहीत समजून घेणे उपयूक्त असू शकते)

ओमानी स्वतःला अधिक कट्टर म्हणवून घेतात, अंशतळ धर्मांतरेही करवतात पण अरबी देशांमध्ये हिंदूंसाठीचे आधूनिक काळातले पहीले मंदिर उभारुन गुण्यागोविंदाने नांदण्या एवढी मुभा देण्यातही ओमानी सुल्तानाचा पहिला क्रमांक होता.

इंडोनेशियातील प्रमुख विचारधाराही तुलनेने सहीष्णू समजली जाते, आपल्याकडे केरळी नायरात जशी स्त्री सत्ताक कुटूंब पद्धती नांदत असे तशी इंडोनेशियातील एका बेटावर मुस्लीम असूनही स्त्री सत्ताक पद्धती नांदते. सिरिया इराक इराण तुर्कस्तान यांच्या सिमावर्ती भागात वास्तव्य करणारे कुर्दीश लोक सुन्नी असूनही सांस्कृतिक दृष्ट्या लिबरल आहेत आणि आपली लिबरल संस्कृती जिवंत रहावी म्हणून चार चार देशांचा राजकीय छळही सहन करताना दिसतात. गुरु परंपरा चालवणारे सुफी आणि शियांचे गटही दिसून येतात त्यातील काही आपापल्या पद्धतीने लिबरल होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या सर्वावरही दगडा पेक्षा वीट मऊ म्हणजे लोणी नव्हे हि रास्त टिका होउ शकते आणि वेळो वेळी अशी चिकित्सा झाली पाहिजे तरीही विटे एवढे मऊ होण्यासाठीही कुणाचेतरी योगदान कारणी पडले त्यांना त्यांचे क्रेडीट दिले पाहीजे. स्वप्नाला खरे मानून बळी जाण्याची शक्यता असलेल्या मुलाच्या जागी शेळी ठेवणारा जो कोण अनामिक मॉडरेट राहीला असेल किंवा जी कोण शेळी असेल त्याच्या तिच्या प्रसंगावधानाचे मानवतेने अंशतःतरी अभारी रहाण्यास हरकत नसावी - त्यामुळे किती कोटी की लाख मुलांचे जिव वाचले असतील याचा विचार करा.

दारा शुकोह , वीर अब्दुल हमीद ते एपिजे अब्दुल कलाम अशा अनेक व्यक्तींचे योगदान या धागा लेख आणि चर्चेच्या माध्यमातून पुढे यावे असे वाटते.
लेखन चालू

* अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी, चंद्रा एवजी चंद्र दाखवणार्‍या बोटा बद्दलचे प्रतिसाद टाळण्यासाठी सकारात्मक रचनात्मक योगदानासाठी अनेक आभार,

* इंग्रजी विकिपीडियावरील या विषयावरील अपरिपूर्ण लेख
** Islamic Modernism
** Islam and modernity
** Liberalism and progressivism within Islam

* critics of Islam https://twitter.com/ApostateRidvan/status/1100934630864232449

संस्कृतीधर्मसमाज

प्रतिक्रिया

ट्रम्प's picture

21 Jul 2018 - 2:37 pm | ट्रम्प

बाकीच्यांचे माहीत नाही पण मला तुम्ही लिहलेला लेख व्यवस्थित रित्या समजतात !!! खरचं !!!!!!!!

तुम्ही खूपच मनमोकळं सोप्या भाषेत लिहता आणि बाकीच्यां मिपाकरांना क्लीष्ट मराठी वाचायची सवय असल्या मुळे ते तुमच्या लेखा कडे यायला घाबरत असतील .

धागालेखावर शतकोत्तरी प्रतिसाद मिळालेले माझा एकही धागा नाही असे नसावे. या लेखा प्रमाणे माझ्या इतरही बर्‍याच धागा चर्चात केवळ शीर्षक वाचूनही सहभागी होता यावे, एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल लिहायचे असेल तर लेख समजला काय अणि नाही समजला काय काय फरक पडतो ? धागा लेखात काहीच नाही लिहिले तर संपादक धागा लेख वगळतील म्हणून भिती असते मग त्या निमीत्ताने काही लिहित असतो बर्‍यचदा चर्चा सहभागासाठी शीर्षकही पुरेसे असते. तुमचे आवडते शिक्षक अशा विषयाची माझा चर्चा धागा आहे. धागा लेखात काय आहे आणि काय नाही याने काय फरक पडतो ? इथे या धाग्यात प्रतिसादातून तुम्हाला आवडलेल्या मॉडरेट मुस्लीम समुह आणि व्यक्तींबद्दल माहिती देऊ शकता. (धागा लेख मग समजला काय ,नाही समजला काय) पण ज्यांना रचनात्मक सहभाग घ्यायचा नसतो आणि टिका झेपत नाहीत ते हजार सबबी हजार बहाणे काढताना दिसतात.

मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार

मदनबाण's picture

22 Jul 2018 - 10:45 am | मदनबाण

ओमानी स्वतःला अधिक कट्टर म्हणवून घेतात, अंशतळ धर्मांतरेही करवतात पण अरबी देशांमध्ये हिंदूंसाठीचे आधूनिक काळातले पहीले मंदिर उभारुन गुण्यागोविंदाने नांदण्या एवढी मुभा देण्यातही ओमानी सुल्तानाचा पहिला क्रमांक होता.
आपल्या देशात बाबरी ढाचा पाडला गेला तर काय गरादोळ झाला, पण हिंदुच्या देशात हिंदुंचीच लाखो मंदीरे पाडली गेली, विद्रुप केली त्यावर मशीदी बांधल्या गेल्या याबाबतीत सगळे मौनी बाबा बनुन राहिले आणि राहतात याचे मला कायम नवल वाटत राहिले आहे. ओमानच्या सुलताना पेक्षा हिंदुस्थानच्या प्रत्येक हिंदु माणसाचे मन मोठे असायला हवे... कारण इतके झाले तरी मुसलमानांसाठी जगात सगळ्यात सुरक्षित जागा हिंदुस्थानच आहे ! बरं खरा इस्लाम कोण शिकवतो हा मोठा कुतुहलाचा विषय आहे ! जिथे जिथे तो शिकवला जातो असे सांगितले जाते तिथे हिंदुंचा विरोध आधी शिकवला जात असावा मग ती शिकवणे जगात कुठेही होत असावे असे दिसते... एकंदर धागा वाचल्यावर जे मनात आले ते टंकले आहे आणि त्याच बरोबर जे व्हिडियो टाळक्यात आले ते इथे देउन जातो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया... :- Mr. Natwarlal

मदनबाणजी धागा लेखाशी सहमत झालेच पाहीजे असे नाही. 'नवे पुराण आल्या शिवाय, जुने पुराण विस्मृतीत जात नाही.' आता हेच वाक्य उलटे लिहा 'जुने पुराण विस्मृतीत जाण्यासाठी, नवे पुराण लिहावे . ' ( हे मी हिंदू पुराणांबद्दल म्हणत नाहीए, येतय का लक्षात मी काय म्हणतोय ते ) आता याच धर्तीवर, ' नवे हिरो दिल्या शिवाय, जुने विस्मृतीत जात नाहीत', 'जुने हिरो विस्मृतीत घालवण्यासाठी, नव्या हिरोंची चरित्रे उभारावीत' बघा हे पण लक्षात घेता येईल का ?

इथे जुना हिरो लिटरली विस्मृतीत गेला पाहीजे असे नाही बेसिकली आपल्याला ग्रंथ प्रामाण्य थांबवायचे आहे. शब्द पुजा नाकारुन जमले तर विवेकावर आधारीत निवड शिकवायची आहे. पण विवेकावर आधारीत निवड जमली नाहीतर किमान नवे हिरो आणि नवे शब्द आणि नवे ग्रंथ द्यावेत. काय म्हणतात ?

त्यामुळे या धाग्यापुरते टिकेवर वेळ घालवण्या पेक्षा मॉडरेट, मॉडरेट पेक्षा रिफॉर्मर आणि रिफॉर्मर पेक्षा प्रबोधनकार यांच्या चरीत्र आणि ग्रंथावर भर द्यावा. टिकेसाठी इतर धागे आहेतच.

मदनबाण's picture

22 Jul 2018 - 1:20 pm | मदनबाण

'जुने पुराण विस्मृतीत जाण्यासाठी, नवे पुराण लिहावे . '
हे जो करायचा प्रयत्न करेल त्याचे सर कलम करण्याचा फतवा लगेच निघेल याची खात्री बाळगा !

' नवे हिरो दिल्या शिवाय, जुने विस्मृतीत जात नाहीत', 'जुने हिरो विस्मृतीत घालवण्यासाठी, नव्या हिरोंची चरित्रे उभारावीत' बघा हे पण लक्षात घेता येईल का ?
अश्या हिरोंची कमतरता नाही, अगदी अलिकाळच्या काळातले उदा. ध्यायचे झाले तर सन्माननिय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम.
आता समाजात चित्र काय दिसले ? तर... त्यांच्या जनाज्याला जितकी गर्दी झाली होती त्यापेक्षा अधिक गर्दी देशद्रोही याकुब मेननच्या जनाज्याला झाली ! याची कारणमिमांसा केल्यास समुदायास देशभक्त हिरो पेक्षा देशद्रोही गुन्हेगार अधिक प्रिय आणि जवळचा वाटतो असे दिसुन आले.
वरती सन्माननिय पुर्व प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा व्हिडियो याच कारणास्तव इथे दिला आहे कारण हिंदुस्थानात धर्मांतरा बरोबरच संस्कॄती सुद्धा बदलली गेली आहे म्हणुनच इथे श्री रामाचा विरोध होतो आणि इंडोनेशिया मध्ये आजही रामलीला सादर केली जाउ शकते !
बाकी दुसर्‍यांना हिरोची गरज किती आहे या पेक्षा आपल्याला हिरोंची अधिक गरज आहे असे मला वाटते,कारण आझादी बिना खगड ढाल मिळाली अशी धदांत खोटी समजवुत जनमानसात रुजवुन क्रांतिकारी हिरोंच्या जागी स्वतः महात्मा होउन इथल्या जनमानसात अहिंसा नामक षंढपणा रुजवुन गेले आहेत. एका पेक्षा एक सरस अश्या "बाहुबली" हिरोंची गरज अधिक आहे.

जाता जाता :- बाभळीच्या झाडाला खत घातल्यास काटे येणार नाहीत ही समजुत करुन घेणार्‍याला त्याच बाभळीचे काटे भविष्यात टोचण्याची शक्यता अधिक असते.
अंजीर जरी गोड असले तरी ते रोज खात बसल्यास त्याचे सुद्धा अजिर्ण होते... [ येतय का लक्षात मी काय म्हणतोय ते ? :) ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया... :- Mr. Natwarlal

माहितगार's picture

22 Jul 2018 - 5:40 pm | माहितगार

तारेक फताहचा कॅनेडाच्या सिनेट कमिटी सोबतचा एक युट्यूब व्हिडीओ लिंक देतोय ती बघुन प्रथमिक प्रतिक्रीया द्यावी मग आपण चर्चा पुढे नेऊया.

मदनबाण's picture

22 Jul 2018 - 7:06 pm | मदनबाण

सार :- ५:४६ ते ६:०१ :- गेल्या १४०० वर्षात प्रत्येक इस्लामी हिरो हा जिहादी होता :- इति तारेक फताह
तुम्हाला वाटत असेल की येत्या काळात यांच्या हिरोची व्याख्या बदलेले तर ते अशक्य आहे ! जे १४०० वर्षात झाले नाही ते काही नव हिरोंमु़ळे शक्य होइल असा विचार करण देखील कमालीचा भाबडेपणा [ इथे दुसरा शब्द वापरायची इच्छा झाली होती, पण ती आवरली. ] आहे. तुम्ही कितीही नविन पुराण लिहायचा प्रयत्न करा कट्टरतावाद हा नेहमीच विजयी होताना दिसला आहे आणि यापुढेही दिसेल. जसे आपल्यात असुरांचा कितीही पराभव झाला तरी निविन असुर निर्माण होत राहिले आहेत ! एखादा असुर कुळात जन्म घेणारा भक्त प्रल्हाद जसे संपुर्ण असुर कुळास बदलु शकला नाही तसेच यांचे देखील आहे, याचे कारण आसुरीपणा ही व्यक्ती नसुन प्रवॄत्ती आहे.

सव्वाशे करोड देशवासीयांचे प्रतिनिधित्व करणारे मा. नरेंद्र मोदी मशिदीच्या बागेंला ऐकताच भाषण करणे थांबतात. हे अनेक वेळी घडले आहे तर त्यांची ही कॄती योग्य की अयोग्य ? आपणास काय वाटते ते नक्की सांगावे, कारण मोदी अनेकांचे हिरो आहेत आणि मोदी भक्तांची संख्या देखील कमी नाही ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया... :- Mr. Natwarlal

माहितगार's picture

23 Jul 2018 - 9:06 am | माहितगार

....आपणास काय वाटते ते नक्की सांगावे,

मला भाषण करताना कोणत्याही तिसर्‍या आवाजाचा डिस्टर्बन्स आला तर मी थांबेन. कारण मी काय बोलतो आहे ते दोन आवाजांच्या गोंधळात माझ्या श्रोत्यांना समजणार नाही. या पलिकडे नरेंद्र मोदींच्या कृतीचा मी स्वतःहून अर्थ काढू शकत नाही. मोदींच्या त्या कृती बद्दल त्यांनी स्वतःहून काही वेगळे स्पष्टीकरण दिले तर बाब वेगळी.

...एखादा असुर कुळात जन्म घेणारा भक्त प्रल्हाद जसे संपुर्ण असुर कुळास बदलु शकला नाही

१) ज्या ज्या भक्त प्रल्हादाची कृती तुम्ही सकारात्मक पणे बघत असाल तर त्या त्या प्रल्दादास क्रेडीट देण्यास काय हरकत आहे ? जर प्रल्हादांकडे लक्ष दिले नाही तर नरसिंहांचा नुसता गवगवा काय कामाचा ? अरे आमच्या कडे नरसिंह आहेत अरे आमच्या कडे नरसिंह आहेत पण नरसिंहाना प्रल्हाद कुठे आणि कोण आहेत त्याची माहितीच नाही हे काय कामाचे ?

२) Islam reform, Islam renaissance, Muslim reformers, Muslim renaissance असे गूगल शोध देऊन तर बघा आम्ही मोती शोधलेच नाहीत, मोत्यांची माळ बनवलीच नाही असे व्हावयस नको.

३) कट्टरता वाद विजयी होतो आणि भविष्यातही होईल या निराशेपोटी नवी पुराणे लिहिणे का थांबबावे ?

प्रकाश घाटपांडे's picture

23 Jul 2018 - 9:15 am | प्रकाश घाटपांडे

कट्टरता वाद विजयी होतो आणि भविष्यातही होईल या निराशेपोटी नवी पुराणे लिहिणे का थांबबावे ?

नाही पण डोस हळू हळू वाढवावा लागतो. त्यासाठी अवधी द्यावा लागतोच. समाजाला बरोबर घेउन जाताना जर तुम्ही वेगाने जायचा प्रयत्न केला तर समाज राहिल मागे आन तुम्ही जाल पुढे. समाज प्रबोधन आक्रमक पद्धतीने व वेगाने करता येत नाही. तरी देखील काही अशा अतिरेकी प्रबोधनकारांची गरज ब्रेकिंग दे मोल्ड साठी लागतेच.

माहितगार's picture

24 Jul 2018 - 11:50 am | माहितगार

ठिकेना घाई कुठाय ? एक प्रा समद म्हणून इजिप्शियन पुरोगामी प्राध्यापम्हणतात, अजून वेळ आली नाही या उत्तराला ते म्हणतात, कोणती वेळ तारीख योग्य असेल ती द्या मी प्रबोधनासाठी तुम्ही म्हणालेल्या मुहूर्तावर येतो ! महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर महात्मा फुल्यांचा सत्यशोधक समाजाची मुहूर्तमेढ २४ सप्टेंबर १८७३ ला झाली म्हणजे उर्वरीत महाराष्ट्रीयांच्या प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्यास तब्बल १४५ वर्षे होत आली आहेत. मुस्लीमांमध्ये कुणिच नाही असे नाही. प्रगती व्हायची असेल तेव्हा होईल , मी स्वतःहून हमीद दलवाईंचे नाव मुद्दाम लिहिले नाही. त्यांच्या सत्यशोधक समाजाची स्थापना २२ मार्च १९७० ला झाली त्यास आता ४८ वर्षे झाली. आता यापुढची प्रगती केव्हा ? प्रगती नसेल तर नसूद्यात असा धागा निघाल्यावर त्या बिचार्‍या हमीद दलावाईंची कुणाला स्वतःहून आठवण तरी यावी की नको . की कोकणी मुस्लीम म्हटले की मदन बाणांनी खालील व्हिडीओत लावलेली माणसेच आठवावीत ? हमीद दलावाईं पण कोकणी मुसलमान होते ना !

..गेल्या १४०० वर्षात प्रत्येक इस्लामी हिरो हा जिहादी होता

या धागा लेखाचा उद्देश्य जिहादी अतिरेक्यांचे हिरो शोधण्याचा नाही आहे, जे जिहादी अतिरेकी नाहीत त्यांना शोधण्याचा आहे. परफेक्ट आहे की नाही ह भाग वेगळा पण तारेक फताह असेच उदाहरण नाही का ? मग अशी आणखी उदाहरणे शोधा , शोधा म्हणजे सापडतील.

विरोधी पक्षास तुम्हीच एकतेचे आणि य्शाचे श्रेयदान केल्यास फटी कशा मिळतील ?

या पलिकडे नरेंद्र मोदींच्या कृतीचा मी स्वतःहून अर्थ काढू शकत नाही.
याही वेळेला मी हेतुपुर्वक मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडियो दिला आहे. मी स्वता: या आधी मिपा कधी काळी मी आर्ततेने दिलेली अजान ऐकल्याचे सांगितले आहे, ती मला आवडल्याचे ही संगितले होते [ ती भोंग्यातुन दिलेली नव्हती असे बहुतेक स्मरते ],परंतु या भोंग्यातुन कर्णकर्कश प्रार्थना ध्वनी प्रदुषणास कारणीभुत ठरते आणि देशात अनेक ठिकाणी तो मोठा ताप ठरला आहे !

तारेक फताह यांच्या खालील व्हिडियोत या बद्धल थोडक्यात विवेचन केलेले आहे :-

तर या कर्णकर्कश आवाजाचा अनेकांना त्रास होतो... मग काही काळा पुर्वी गायक सोनु निगम यांनी हा त्रास उघडपणे बोलुन दाखवला तर मोदी गप्प बसतात तर तु कोण मोठा शाहणा असा प्रेमळ संदेश "शांतता प्रेमी" समाजाच्या एका बंद्यानी दिला. तो खालील प्रमाणे :-

आता नरेंद्र मोदींच्या कृतीचा नक्की अर्थ कसा घेतला जातोय ते लक्षात आले असेल तर ठीक नसेल तरही ठीक.

असो... आता मला कंटाळा आला आहे या विषयाचा, मी सध्या तरी थांबतो... आपण उदाहरणे शोधा , शोधुन सापडली की इथे देत चला. मला अशी उदाहरणे शोधण्यात सध्या तरी रस नाही.

जाता जाता :- Husbands give triple talaq so that they don't have to kill wife: SP leader justifies practice
यावर किती मुस्लिम विचारवंत, बॉलिवूडवाले इ.इं.इं मंडळी मंडळी तोंड उघडतात ते पाहुया.
चिवचिव दुवा :- https://twitter.com/ZeeNews/status/1021304229468700673

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiya Kiya... - Welcome

मदनबाणजी,

मी टिकेच्या विरुद्ध नाही मी ही इतर धागे आणि प्रतिसादातून टिका केलेल्या आहेत. ध्वनी प्रदुषण विषयक धाग्यात संबंधीत विषयावर भूमिका मांडून झालेल्या आहेत. विषयांतराची शक्यता असूनही 'आपणास काय वाटते ते नक्की सांगावे' असा आपण आग्रह केलात तर उत्तर दिले आणि इतर कुणी कुणाच्याही कृतीचे काही अर्थ काढले तरी कृती करणारी व्यक्ती तसा अर्थ स्विकारत नाही तो पर्यंत कुणि काही वेगळा अर्थ लादले तरी सिद्ध होतात असे नसावे.

आजतकच्या बातमीच्या युट्यूब मध्ये याच विषयावर सोनु निगमची बाजू घेणार्‍या त्याच्या हेअर ड्रेसरचे नाव मुस्लिम दिसते आहे. व्हिलन लोक जगात पुर्वी होते , आज आहेत, उद्याही असतील. त्या व्हिलनीश आयडीऑलॉजीं ना चांगल्या आयडीऑलॉजीने परास्त केले पाहीजेच यात वाद नाही. पण सतत व्हिलन लोकांचा विचार करुन आपल्यालाच थकायला होते. ह्या धाग्याचा विषय सकारात्मक कृती करणार्‍यां पुरता मर्यादीत आहे. ह्या विषयातल्या नाही दुसर्‍या विषयातल्या हिरों बद्दलही विचार केला म्हणजे आपल्या मनाला शांतता लाभण्यात मदतच व्हावी असे वाटते.

विषय निघालाच तेव्हा सोनु निगमच्या मुस्लीम हेअर ड्रेसरची सकारात्मक नोंद घेतली. आपण आपण घेतलेला विषय त्यातील तारेक फताह या धाग्याच्या दृष्टीने हिरो ठरतात. आपण लाऊडस्पिकर शिवायच्या आजान ऐकण्यास आवडू शकते म्हटले ही पण सकारात्मक विचार दृष्टी झाली, अर्थात मी धाग्याच्ता सुरवातीस म्हटले आहे मला गोष्टी चिमुटभर मिठासोबत घेण्याची सवय आहे. ईस्लाम धर्मीय (किंवा इतर धर्मीय) प्रार्थना जिथे कुठे भारतात (किंवा जगात कुठेही) होतात त्या सहसा स्थानिक बहुजनीय (भारतीय) भाषातून व्हाव्यात असे माझे व्यक्तिगत मत आहे ते विषय निघाला म्हणून मांडून ठेवतो. विषयांतर हे सुद्धा ध्वनी प्रदुषणाप्रमाणे वेगळ्या प्रकारचे प्रदुषणच आहे ते टाळण्यात मदतीसाठी आभारी असेन.

मनमोकळ्या चर्चेसाठी अनेक आभार

त्या व्हिलनीश आयडीऑलॉजीं ना चांगल्या आयडीऑलॉजीने परास्त केले पाहीजेच यात वाद नाही.
हे सर्वच ठिकाणी लागु पडत नाही, तसं असतं तर जगात एकही युद्ध झालं नसत ! लातों के भूत बातों से नहीं मानते !

पण सतत व्हिलन लोकांचा विचार करुन आपल्यालाच थकायला होते.
व्हिलन लोकांना मिळेल तेव्हा एक्स्पोज करायला हवे ! बाकी आपली विचार भावना कळाली.

ह्या धाग्याचा विषय सकारात्मक कृती करणार्‍यां पुरता मर्यादीत आहे. ह्या विषयातल्या नाही दुसर्‍या विषयातल्या हिरों बद्दलही विचार केला म्हणजे आपल्या मनाला शांतता लाभण्यात मदतच व्हावी असे वाटते.
एक तर तुम्ही फार बोजड लिखाण करता [ निदान मला तरी तसे वाटते. ] शिर्षक वाचले तरी गुंगी येइल ! [ हे विनोदाने लिहले आहे याची कॄपया नोंद घ्यावी. ] तर... तुमचे आवडते मुस्लिम व्यक्तिमत्व , मुस्लिम धर्मसुधारक , मुस्लिम कुप्रथांवर मुस्लिम समाजातील जाणकारांचे मत... इंइंइं. अशी सहज सोपी शिर्षके निवडण्यास आपणास काय कठीण जाते ? निदान आपणास काय नीट अपेक्षित आहे याचा अंदाज येइल. आपल्या धाग्यात आपणास आपल्याला नक्की काय हवे आहे ते लिहावे लागते यातच सर्व आले. [ यात अर्थात प्रतिसादातील अवांतरपणा सुद्धा कारणीभूत असतो हे मान्य आहे. ] तेव्हा जरा आमच्या आकलन क्षमतेस सुलभ पडेल असे लिखाण करावे ही नम्र विनंती [ मी बर्‍याच विषयात माठ असल्याने अजुन काळजीपोटी हे सांगत आहे ! ;) ] म्हणजे आपल्या विषयानुरुप प्रतिसाद देण्यास हुरुप येइल !
दुसर्‍या विषयातल्या हिरों बद्धल विचार केला गेलेला असतोच... नव्हे व्हिलन मंडळीं पेक्षा जास्तीचा जिव्हाळा आहे त्यांच्यावर ! उस्ताद अमजद अली खान यांची सरोद लंडनवरुन परत मायदेशी येताना हरवली होती तेव्हा आपलीच महत्वाची वस्तु हरवली असावी अशी भावना त्यावेळी मनात तरळली होती... त्यांना ती परत मिळाल्याची बातमी समजताच मला फार आनंद झाला होता. इरफान खान... सध्या दुर्धर व्याधी ने ग्रस्त आहे... त्यांचा अभिनय मला संजय खान यांच्या टिपु सुलतान या मालिके पासुन आवडलेला आहे. मारूफ रजा यांच्या न्यूज चॅनल वरील अनेक डिबेट्स मी आवडीने पाहतो... त्यांच्या आवाज आणि त्यांची बोलायची शैली दोन्ही मला फार आवडते.
निगेटिव्ह शिक्का पुसुन टाकण्यासाठी एक पॉझिटिव्ह व्हिडियो देउन जातो... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खिलते हैं गुल यहाँ खिलके बिखरने को, मिलते हैं दिल यहाँ, मिलके बिछड़ने को... :- शर्मिली (१९७१)

मदनबाण's picture

29 Apr 2020 - 1:50 pm | मदनबाण

इरफान खान... सध्या दुर्धर व्याधी ने ग्रस्त आहे... त्यांचा अभिनय मला संजय खान यांच्या टिपु सुलतान या मालिके पासुन आवडलेला आहे.
इरफान गेला ! मला मनापासुन आवडणार्‍या गुणी अभिनेत्यांपैकी तो एक होता ! :(

Ram ram's picture

22 Jul 2018 - 11:28 am | Ram ram

मदनबाणजी मुस्लिम व्हिडीओमध्ये खरे सैतान दिसून रायलेत. (संपादित)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2018 - 1:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

ओमानी स्वतःला अधिक कट्टर म्हणवून घेतात,

सर्वसामान्य ओमानी माणूस कट्टर मुस्लिम नाही, जे काही आहेत त्यांचे प्रमाण फार कमी आहे. किंबहुना, सगळ्या खाडी देशातला ओमान हा सर्वात जास्त उदारमतवादी देश आहे. तेथे गेल्या जवळ जवळ एक शतकापेक्षा जास्त अनेक काळ मंदीरे आहेत व त्यातली दोन मोठी मंदीरे सुलतानाच्या दरबारातून दिलेल्या मदतीने उभारलेली आहेत. सर्वसामान्य ओमानी माणूस परदेशी अमुस्लिम लोकांशी मित्रत्वाने वागतो, भारतियांशी तर जरा जास्तच. तो एक असा खाडी देश आहे की जेथे २० पेक्षा जास्त वर्षे खुशीने राहत असणारे भारतिय सहज दिसतात. अनेक हिंदूना त्या देशाचे नागरिकत्व दिलेले आहे, या बाबतीत हा देश मोठा अपवाद आहे. हे मी माझ्या त्या देशातील १४ वर्षांच्या वास्तव्याच्या अनुभवावरून खात्रीने सांगू शकतो. कामाच्या निमित्ताने आणि माझ्या भटक्या प्रवृत्तीमुळे मी बहुतेक ओमानी लोकांनी पाहिला नसेल इतका ओमान पिंजून काढला आहे. तेव्हा हा अनुभव केवळ मोठ्या शहरात नाही तर दूर दराजमधील गावांतीलही आहे. भारतातल्या कट्टर मुस्लीमांसारखे भडकाऊ भाषण ओमानमध्ये मला एकदाही दिसले नाही. त्या १४ वर्षांत मला मोजून चारदाच माझा धर्म विचारला गेला आणि मी हिंदू असे अभिमानाने सांगितल्यावर कोणतीही विरोधी भावना दिसली नाही.

याची दोन मुख्य कारणे आहेत :

१. ओमानी लोक सलाफी नाहीतर इबाधी पंथाचे आहेत. इबाधी पंथ हा कट्टर नाही तर बराच उदार विचारसरणीचा पंथ आहे.

२. ओमान उदारमतवादी राहण्याचे सर्वात महत्वाचे कारण तेथिल राजे 'सुलतान काबूस बिन सैद' हे आहेत. जगातील केवळ चारच सर्वसत्ताधिश राजांपैकी (अबसॉल्युट मोनार्क) एक असलेला हा शासक "उदार सर्वसत्ताधिशाचे (benevolent monark)" उदाहरण आहे, असे मी दीर्घ व्यक्तिगत अनुभवावरून खात्रीने म्हणू शकतो.

गेल्या सुमारे चार दशकापासून आस्तित्वात असलेले आणि ओमानच्या सुलतानांच्या आर्थिक व जमिनीच्या मदतीने उभे राहिलेले, राजधानी मस्कतमधील संगमरवरी हिंदू मंदीर हे मस्कतमधील पर्यटक आकर्षण आहे. तेथे सर्व हिंदू सण अनेक दशके मोठ्या प्रमाणात साजरे होत आलेले आहेत. त्या मंदीरामधील काही फोटो...

 ...

 ...

 ...

 ...

 ...

 ...

गामा पैलवान's picture

22 Jul 2018 - 2:07 pm | गामा पैलवान

डॉक्टर सुहास म्हात्रे,

चांगली माहिती आहे. जमल्यास एखादी लेखमाला होऊ द्या.

मी ऐकलंय की येमेनमधले लोकं सुद्धा सौदीसारखे कट्टर नसून उदारमतवादी आहेत. तिथला इस्लामी पंथ जगातल्या पहिल्या काही पंथांपैकी आहे.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2018 - 11:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

भारत आणि "खाडी देश, उत्तर आफ्रिकन देश व पाश्चिमात्य देश" यांच्यातील सागरी व्यापारामधील महत्वाचे स्थान (विशेषतः एडन बंदर) असल्याने येमेनी लोकांचे भारतियांशी शेकडो (?अनेक सहस्त्र) वर्षांचे (वसाहतवादी ताकदी भारतिय महासागरात येण्याच्या फार पूर्वीपासून) मैत्रीचे संबंध आहेत. सद्या ते शिया-सुन्नी झगड्याला मध्यवर्ती ठेऊन चाललेल्या दुर्दैवी यादवीयुद्धात पिचून गेलेले आहेत आणि एकमेकाशी कडवे युद्ध करत आहेत... अर्थातच तो देश कोणासाठीही असुरक्षित झालेला आहे. तरीही त्या यादवी युद्धातून भारताने मध्यस्ती करून हजारो भारतीय व (अमेरिका व युरोपसकट) परदेशी नागरिकांची सुटका केली होती, हे आठवत असेलच... तेव्हा भारताच्या अत्यंत प्रगल्भ मुत्सद्दीपणाबरोबर भारतियांबद्दल येमेनी लोकांना असलेले ममत्वही कामी आले होते.

सावळे येमेनी मूळ अरब आहेत आणि सद्या प्रबळ असलेले गोरे अरब उत्तरेकडून तेथे आलेले असा प्राचीन इतिहास आहे असे म्हणतात. पण, येमेन फारकाळासाठी गरीब व युद्धाग्रस्त देश असल्याने, त्याला आता फक्त पुस्तकी महत्व राहीले आहे.

ओमानच्या खूप आठवणी आणि अनुभव आहेत. पण, त्या लिहिण्यासाठी तेवढ्याच खूप मोठ्या प्रमाणात वेळ व चिकाटी लागेल... त्याची उपलब्धता झाल्यावर ते काम होईल. तसेही, त्याकाळी डीजिटल फोटोग्राफी नव्हती व त्या वेळेची प्रकाशचित्रे आता तांबूस झाली आहेत... हे पण एक महत्वाचे कारण उत्साह कमी करते. :)

माहितगार's picture

23 Jul 2018 - 9:30 am | माहितगार

नाही येमेन म्हणजे गापैंचा निर्देश बहुधा दावुदी बोहरांकडे असावा परसीक्युशन मुळे भारतात स्थानांतरणापुर्वी ह्यांचे येमेनशी घनिष्ठ संबंध होते . भारतात आल्या नंतर यांचे बर्‍यापैकी मॉडरेशन झाले . अर्थात त्यांच्या पोप आणि प्रथांची पुरेशी अंधश्रद्धा मुक्ती झाली नाही ( भारतातील एफजीएम वाली मंडळी हीच), असगर अली इंजिनीयर या रिफॉर्मरच्या प्रयत्नांनी समांतर रिफॉर्मीस्ट मुव्हमेंट यांच्यात पुढे आली, अलिकडे एफजीएम विरोधातही सुधारणवाद्यांचे प्रयत्न चालू असतात.

ओमान आंतरधर्मीय सौहार्दासाठी ठिक आहे पण पुढील टप्प्यातील सुधारणावाद आणि प्रबोधनाचा काळाच्या उदयास अद्याप अवकाश असावा. अर्थात हे दोन्ही समुदाय इतर धर्मीयांशी आतापावेतो रचनात्मक वागले त्याचे त्यांना क्रेडीट देण्यास हरकत नसावी.

येमेनमधले लोकं सुद्धा सौदीसारखे कट्टर नसून उदारमतवादी आहेत.

हे चूक आहे.

गामा पैलवान's picture

10 Aug 2020 - 1:43 am | गामा पैलवान

माझा_डूआइडी,

हे जर चूक असेल तर मग योग्य विधान काय आहे त्याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

मागाजी लवकरच धर्मांतर करतील की क्काय असं वाटुन राह्यलयं. मागाजी हेच मोगा नव्हेत ना?

माहितगार's picture

23 Jul 2018 - 1:59 pm | माहितगार

=)) या हिशेबाने प्रत्येक धागा प्रत्येक प्रतिसादापर्यंत एक धर्मांतर दिसावयास हवे नाही का ?

माहितगार's picture

23 Jul 2018 - 2:02 pm | माहितगार

आणि इतर आयड्यांसोबत जोडून वैचारीक उंची कमी करण्याचे टाळल्यास आभारी असू

गामा पैलवान's picture

25 Jul 2018 - 1:27 pm | गामा पैलवान

माहितगार,

येमेन म्हणजे गापैंचा निर्देश बहुधा दावुदी बोहरांकडे असावा परसीक्युशन मुळे भारतात स्थानांतरणापुर्वी ह्यांचे येमेनशी घनिष्ठ संबंध होते .

नाही. मी येमेनमधल्या उदारमतवादी इस्लामबद्दल बोलंत होतो. अगदी अलीकडे म्हणजे १८६३ साली एडनमध्ये एक हिंदू मंदिर बांधण्यात आलं होतं : https://www.thehindu.com/todays-paper/tp-international/an-indian-city-on...

याउलट दाऊदी बोहरा भारतातले आहेत.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

25 Jul 2018 - 1:52 pm | माहितगार

ओके हे माहित नव्हते. आपल्या प्रतिसादा नंतर शोध घेतला. औदार्याचे मुख्य क्रेडीट ब्रिटीशांचे असले तरी कम्युनीझम येई पर्यंत मंदिरे टिकून होती म्हणजे अदेनच्या स्थानिक जनतेने पुरेशी सहिष्णूता नक्कीच बाळगली असणार त्या सहिष्णूतेचे क्रेडीट आपण म्हणता तसे त्यांना देण्यास हरकत नसावी.

माहितगार's picture

31 Dec 2018 - 12:07 pm | माहितगार
माहितगार's picture

28 Jun 2019 - 8:29 am | माहितगार

आरिफ़ मोहम्मद ख़ान यांच्यावर खरेतर एक वेगळा लेख लिहिण्यास आवडला असता पण वेळे अभावी शक्य नाही. त्यांची एक अगदी ताजी चांगली मुलाखत आली आहे त्याचा आवर्जून पहावा असा युट्यूब तुर्तास देतो.

जो हिंदुस्तान का भविष्य है, वही मुसलमानों का भविष्य है: आरिफ़ मोहम्मद ख़ान

जालिम लोशन's picture

30 Jun 2019 - 1:45 pm | जालिम लोशन

ते समजत नाही. एखाद्या प्राॅडक्टमधेच जर मॅन्युफॅक्टरिंग डिफेक्ट असेल तर किती ही फिनिशींग केले तर ते नाॅर्मल काम करणार नाही.

जालिम लोशन's picture

30 Jun 2019 - 1:46 pm | जालिम लोशन

अपवाद हे नियम नसतात.

माहितगार's picture

30 Jun 2019 - 4:43 pm | माहितगार

__/\__

चौकस२१२'s picture

30 Jun 2019 - 7:37 pm | चौकस२१२

तहिर गोरा , आजा वर शोधा , तरिक फतेह न च्या देशातिल , म्रुदुभाशि , रिपब्लिक च्या अर्नव ने धडे घ्यावेत ,

रांचो's picture

2 Jul 2019 - 8:33 pm | रांचो

काश्मिर चर्चेत आहे तेव्हा भारताच्या धार्मीक आधारावरील राजकिय फाळणीच्या वेळी पाकीस्तानी रेजिमेंट मध्ये जाण्याचा पर्याय डावलून ब्रिगेडीयर मोहम्मद उस्मान ने भारतीय डोगरा रेजिमेंट मध्ये जॉईन होण्याचा पर्याय निवडला. लौकरच काश्मिर बद्दलच्या वादातून काश्मिर राखण्यासाठी पाकीस्तानशी झाले झालेल्या युद्धात भारताची अखंडता राखताना ब्रिगेडियर मोहम्मद उस्मानने आपल्या प्राणांची आहुती दिली. (जयंती १५ जुलै पुण्यतिथी ३ जुलै)

Shahid Mohammad Usman

उपेक्षित's picture

10 Sep 2019 - 1:16 pm | उपेक्षित

मस्त चर्चा झाली माहितगार आणि मदनबाण यांच्यात
विशेषतः वयक्तिक आरोप न करता आणि विखारी भाषा न वापरता मुद्देसूद कसे बोलावे हे दाखवून दिल्याबद्दल तुम्हा दोघांचे खास अभिनंदन.

मारवा's picture

10 Sep 2019 - 7:37 pm | मारवा

वेगळ्या प्रतिमांचे मुस्लिम हे शीर्षक काय सुचवतं ?
विशेषतः यात फक्त " चांगली" बाजु दाखवावी असा पवित्रा घेतला आग्रह दाखवला तर "गृहीत" बाजु कोणती हे न सांगता ही उत्तमरीत्या अधोरेखीत होते.
म्हणजे बघा यातुन हे किती कौशल्ल्यपुर्णतेने दाखवता येते की बघा सर्वच मुस्लिम हे वाईट नसतात काही चांगले ही असतात,
तुम्हाला यातील विरोधाभास जाणवतोय की हे अजाणता लिहीलेले आहे ?
उदा.
वेगळ्या स्टेटसचे बॉम्बेतील घाटी
हे शीर्षक कसे वाटते ?
यात मग काही घाटी हे मी श्रीमंत बघितलेले आहेत. काही घाटी अतिशय सफाईदार इंग्रजीही बोलतात काही घाटी पार्टीत आल्यावर ओळखुही येत नाहीत की ते घाटी आहेत
अशी पुढील सर्व स्तुतीसुमने काही घाटी हे अपवाद आहेत
बाकी बहुसंख्य घाटी लॉट हा वरील च्या विरोधात आहेत हे गृहीतक आहे.

मारवाजी, आपल्या प्रतिसादातील खवचटपणाचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे

चंदनाच्या बागेला चंदनाची बाग का म्हणताय ? चंदनाच्या बागेला चंदनाची बाग म्हणताय म्हणजे बाकी सगळ्या कोळश्याच्या खाणी का काय ?

जगात कोळसापण असतो आणि चंदनही असते. हि धागा चर्चा चंदन उगाळणारी आहे. कोळसा विषयी चर्चेचा आपणास मोह असला तरी या धागाचर्चेपुरता आम्ही तो फाट्यावर मारुन चंदन उगाळण्याकडे वळतो.

चौकस२१२'s picture

10 Aug 2020 - 6:09 am | चौकस२१२

अजून एक
अरिफ अजकिया
https://www.youtube.com/watch?v=Z5vpc3QKkwY

यात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांची मुलखात आहे , पुष्पेंद्र अलिघड मुस्लिम युनी च्या क्षेत्रात वाढले .. तर्कशुद्ध पणे गोष्टी मांडतात , तसेच निवृत्त कप्तान गौरव आर्य हे हि माहित असतील
हे दोघेही अंध भक्त आहेत असे वाटते का? ( टीकाकारांना वाटेल ) पण त्यांची मांडणी बघा, विचारांची स्पष्टता बघा

माहितगार's picture

10 Aug 2020 - 12:55 pm | माहितगार

हि अरीफ अजकीयांनी 'अंबर खान' यांची घेतलेली मुलाखत सुद्धा रोचक आहे.

https://youtu.be/ftDXP98aU3M

पुरातत्व विशेषज्ञ के. के, मुहम्मद यांनी चंबळच्या खोर्‍यातील बटेश्वर संकुलाच्या केलेल्या प्राचीन मंदिरांचे पुनरुज्जिवनाची कथा त्यांच्याच शब्दात जे ऐकतील त्यांना अनेक तिर्थयात्रांची प्रसन्नता युट्यूबर उपलब्ध असलेले खालील सादरीकरण पाहून अवश्य लाभावी.

माहितगार's picture

18 Sep 2020 - 5:30 pm | माहितगार

Muslims love Hindu liberals conditionally, and together they hate the microscopic Muslim liberals unconditionally.

नजमुल होडा तामीळनाडूतील एक हिंदी आयपीएस आहेत. त्यांच्या लेखातील वाचण्यात आलेले त्यांचे वरील वाक्य पुरेसे बोलके आहे, लेख दुवा

https://theprint.in/opinion/indian-muslims-and-liberals-are-trapped-in-a...

माहितगार's picture

23 Mar 2022 - 10:34 pm | माहितगार

फर्स्टपोस्ट वर अभिजीत मजूमदार यांचा लेख Opinion: A patriotic, progressive Muslim voice is rising in India that is challenging Islamism जरा विस्तारीत यादी देताना दिसतोय. प्रत्येक नाव मी तपासले नाही पण फुल नाहीतर फुलाची पाकळी अशा स्वरुपाची बातमी येणे पण दिलासादायक बाब आहे. ज्यांना ह्यातील जी नावे माहिती आहेत त्यापैकी कोणती वेगळ्या प्रतिमांचे मुस्लिम म्हणून स्विकारावीशी वाटतात आणि का ? या बद्दल मिपाकरांची मते जाणून घेणे आवडेल.