(श्मश्रू)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
14 Apr 2019 - 10:24 am

पेरणा अर्थात

श्मश्रू

पाणावलेला ब्रश
खसाखसा साबणावर फिरवूनी

सुरुवात जाहली श्मश्रू ला
काय बेरहेमीने वस्तरा,
चालवला त्या न्हाव्यानी

रूळली अधरांवरती मिशी,
अन ओघळली दाढी गाली
काय मोल त्या केसांना ,
क्षणात साफ केले त्यानी

असो राठ किंवा विरळसे डोके
नरम करी पाण्याचे थेंब उडवून
ओळखातो न सांगता
कोणाची भादरावी कशी .....

- पैजारबुवा

काणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडकविताशुद्धलेखनकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

14 Apr 2019 - 10:41 am | यशोधरा

बुवा, आपल्या काव्यविडंबनप्रतिभेचे सद्ध्या जोरदार तांडव सुरू आहे!! =))

प्रचेतस's picture

14 Apr 2019 - 11:00 am | प्रचेतस

लैच =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2019 - 11:11 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) पैजारबुवा सुसाट सुटले आहेत !

पाषाणभेद's picture

14 Apr 2019 - 12:46 pm | पाषाणभेद

सुंदर आहे.
विडंबन न ठरवता स्वतंत्र वाचली तरी चालू शकते.

का कुणास ठाऊक पण हजाम हा मला नेहेमीच मला एका बॉसप्रमाणे वाटत आलेला आहे .. बॉस जसा ठोकून काढताना कुठलाच मुलाहिजा बाळगत नाही तसेच काहीसे या न्हाव्याचे असते .. कुणी कितीही शिरीमंत असला तरीही त्याची हजामत तो त्याच्याच पध्द्तीने करतो कुठलीही दयामाया ना दाखवता ...