दहावी होऊन मुलांना चांगले मार्क्सही मिळाले पुढे ११ वी साठी मुलांनी मिळेल तिथे ऍडमिशन घेतले . सीबीएस्सची कॉलेजेस जास्त नाहीत आणि स्टेट वाल्याना आदी प्रेफरेन्स म्हणून आणखीच गोंधळ . शिवाय त्यांची स्टेट बोर्डच्या सिलॅबस मुळे तिकडे मन असे रमतच नाही. लेकीला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते , पुण्यासारख्या शहरात ५ कॉलेज फक्त . एसपी , फर्ग्युसन ला मिळाले तरच आर्टस् ला घ्यायचे नाहीतर सायन्स असे ठरले . पण ते मिळाले नाही. एकाच कॉलेजला सायन्स आणि आर्ट्ससाठी नंबर लागला . मग सायन्स ला घेतले ऍडमिशन . चारच दिवसात म्हणे , मला इथे ऍडमिशन नकोय, तिकडे एसपी , फर्ग्युसन ला मिळतंय का बघ नाहीतर मी कॉलेजला जाणार नाही . किंवा इथेच आर्ट्सला घे . इथलया शिक्षकांना काहीच येत नाही , कसले फालतू कॉलेज आहे . मी म्हणाले, आगं फी भरलीय आता ती मिळणार नाही तर तू अकरावी सायन्स कर आणि मग आर्टस् ला घे तर म्हणे नाही मी काहीही अभ्यास करणार नाही, क्लासला तर मुळीच जाणार नाही . मी माझ्या मतावर ठाम आणि ती तिच्या . झाले , अकरावी कशी बशी पास झाली. रिझल्ट बघून मी म्हणाले आता आर्टस् ला घे. तर म्हणे जमणार नाही, काय व्हायचे ते होऊदे पण मी आता आर्ट्सला ऍडमिशन घेणार नाही आणि अभ्यासही करणार नाही . क्लास लावणार नाही. तूच शिकवायचे . मी म्हणाले तू क्लास लाव मला आता तुला मॅथ्स शिकवायला जमणार नाही . तर म्हणे दहावीपर्यंत कशी शिकवत होतीस आणि आता का नाही जमणार ? फेसबुक , मिसळपाव ह्यातून टाइम मिळेल तेंव्हा मला शिकवशील ना ? मला खरेच ते व्याप जमणार नव्हते म्हणून मी कशालाही भीक न घालता ठाम नकार दिल्यावर १ लाख भरून क्लासला ऍडमिशन घेतले पण कोणत्याच क्लासला ना नीट गेली , ना नीट अभ्यास केला. काही म्हणाले तर तूच सायन्स ला ऍडमिशन घ्यायला लावलय, माझी इच्छा नवहती , आता तू बघच . वर्षभर मी अक्षरशः भीतीच्या
सावटात काढले. पोरीने काहीही अभ्यास केला नाही . सर्व करून पाहिले - प्रेमाने, धमकवून, पण काहीही उपाय नाही . फक्त एवढेच, तू नुसत्या अकरावीच्या फीचा एवढा विचार का केलास ? वाया गेली असती तर काय होणार होते? प्रॅक्टिकल कधी असायची ते हि माहीत नव्हते . इथले सर्व गावंढळच आहेत, त्यांना नीट इंग्लिशच बोलता येत नाही ... टीचर ला पण इंग्लिश बोलता येत नाही आणि मी कॉलेजलाही जाणार नाही आणि क्लासला हि जाणार नाही . अगदी कौन्सेलर ची मदत घेऊनही पहिली पण काहीच उपयोग नाही . अजून एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटतेय ती म्हणजे , माझी लेक कॉलेजला जायला नाही म्हणत होती कारण कोणीच बरोबर नवहते, सर्व कपल्स आहेत म्हणाली. माझ्या मैत्रिणींना पण आता बॉयफ्रेंड भेटलेत म्हणे . ते रोज कोठे ना कोठे फिरायला जातात , मी त्यांच्याबरोबर गेले कि माझी सिच्युएशन ऑकवर्ड होते . मी आपली समाजवात राहायचे , तू जा . त्यांच्यात मिक्स हो . एकदा सर्व पाषाण लेक ला गेले , तिथे माझी लेक एकटी बाहेर बसून राहिली. बाकी सर्व आत झाडी झुडपात जोडी जोडीने बसायला गेले . ती हताशपणे एकटी बाहेर बसून राहिली . बाकीच्या मुलींना त्यांचे बॉयफ्रेंड सिगारेट ओढायला लावत , नाही म्हणले कि , "बस क्या यार , इतना भी प्यार नाही करती क्या मेरेसे ?" असे म्हणत ." तेंव्हापासून तर लेकीने मित्र मैत्रीचे नावच टाकले .
तिच्या वर्गात अजून एक शाळेपासूनची मैत्रीण होती. तिला एस वाय बीकॉम झालेला बॉयफ्रेंड मिळला . कॉलेजचे नाव सांगून त्यांच्यबरॊबर हि अकरावीची पोरगी नुसती फिरणार . बड्डे पार्टीला आपलय दोनच मैत्रिणी बोलावल्या मॅक डीला , त्यात माझी लेक आणि दुसरी एक मैत्रीण बाकी सर्व त्या मुलाचे मित्र . ह्या दोघी चार वाजताच निघून आल्या आणि हि त्या मुलांबरोबर कोठेतरी फिरायला गेली. तिच्या आईने फोन करून विचारल्यावर आमच्या घरी जात आहे असे तिने घरी सांगितले. तिच्या आईचा वाट पाहुन माझ्या लेकीला फोन . लेकीने सरळ सांगितले, आम्ही कधीच चार वाजतच घरी निघून आलोय म्हणून परत त्या मैत्रिणीचा लेकीला फोन, काहीही कर माझ्या आईला तू माझ्याबरोबर असल्याचे सांग. लेक अगदीच गोंधळून गेली. त्याच दिवशी त्या पोरीचा रात्री आठ वाजता छोटा अपघात झाला . सर्व ढोपरे फुटली. तिची आई माझ्या लेकीला झाप झाप झापली , कोठे गेला होतात म्हणून ?
नंतर तिच्या वडिलांनी तिला बड्डे गिफ्ट महागडा फोन घेऊन दिला होता , ती कोठेतरी बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेली होती तेंव्हा तो हरवला . तिने आईला आमच्याकडे नोटबुक घ्यायला गेल्यावर बॅग स्कुटरला तशीच राहिली आणि त्यातून कोणी काढून घेतला असे सांगितले. तिच्या आईचा परत लेकीला फोन, तुमच्या सोसायटीत फोन हरवलाय तर आईला सांगून सीसी टीव्ही बघा म्हणे, वॉचमन असताना माझ्या लेकीचा फोन गेलाच कसा म्हणे ? माझ्या लेकीचे मला फोन वर फोन , तू लवकर घरी ये, मी तिच्या आईला खरे काय ते सांगतेय . होऊदे दे तिचे कॉलेज बंद . मी लेकीला म्हणले , तू थोडा वेळ थांब मी येऊन काय करायचे ते बघते .
घरी गेल्यावर मी तिच्या आईला फोन केला आणि सांगितले कि तुमच्या मुलीचा फोन आमच्या सोसायटीत नाही हरवला . ती कोठेतरी बाहेर गेल्यावर हरवलाय पण भीतीपोटी तिने तुम्हाला मनघडत सांगितले आहे . तुम्ही तिला मारू नका पण नीट विचारलेत तर ती तुम्हाला सर्व सांगेल. बाप आय टी मध्ये मोठ्या पदावर . आई खास मुलींच्या शिक्षणासाठी घरीच. चांगल्या सोसायटीत फ्लॅट , कशाचीही कमी नाही. काय करणार आई बाप? मी तिच्या आईला , उद्या पॅरेण्ट टीचर मीट वेळी भेटू आणि मला तुम्हाला काही सांगायचे आहे असे सांगितले. मी गेले होते , सर्व तयारी करून पण पोरीने आईला माझ्याकडे फिरकून पण दिले नाही आणि आईही फिरकली नाही. काय बोलणार ?
काय करायच्या या मुलांचे ?
क्रमशः
प्रतिक्रिया
18 Dec 2018 - 12:05 am | मराठी कथालेखक
आर्टस् ला अॅडमिशन मिळाली नाही ? नवलंच आहे..
18 Dec 2018 - 12:31 pm | जेडी
सायन्स पेक्शा जास्त मेरीट आर्टस ला लागले , ओपन मधुन, ते ही ९५% पेक्शा जास्त... आयफोनचा किपॅड..।
18 Dec 2018 - 2:02 pm | सतिश म्हेत्रे
आजकाल जास्त मार्क्स मिळणारे पण आर्ट्स घेऊ लागले की काय?? रच्याकने तुम्ही जे म्हणताय त्याचा काही संदर्भ मिळेल?
20 Dec 2018 - 9:36 pm | जेडी
अकरावीला प्रवेश घेताना एक बुकलेट मिळते (त्यातील माहितीनुसारच फॉर्म भरायचा असतो ). त्यात प्रत्येक कॉलेजची प्रत्येक शाखेची कात ऑफ लिस्ट लागलेली असते ती पहा
18 Dec 2018 - 1:09 am | वीणा३
माझ्या घरी साधारण ८-९वीत असतानाच सांगितलं होता कि, तुझ्या गरजा आम्ही भागवू, ऐश आपल्या पैशानी करायची. आणि क्लास ला पण एक दिवस जरी बुडवलास तर मी ऑफिस मध्ये जाऊन पैसे परत मिळतायत का ते बघेन आणि त्यापुढे शिक्षणाला माझ्याकडून कुठलीही मदत होणार नाही.
तुला काय हवाय ते सांग, आम्हाला जेवढं बरोबर वाटेल आणि आम्हाला जे परवडेल तेवढंच आम्ही घेऊन देऊ.
मी ११वीत असल्यापासून पार्ट-टाइम काम करून पैसे मिळवले, स्वतःचा वॉकमन, पहिला नोकिया चा फोन, नंतर स्वतःची २ व्हेलर, पहिली विमान प्रवास, पहिला कॅमेरा सगळं स्वतःच्या पगारातून घेतलं. मुलगा ६ वर्षांचा आहे, पण आत्तापासून त्याला काहीही मागितलं कि, सगळीकडे किंमत बघ, प्रॉडक्ट रिव्यू बघ, सेल चा सिझन बघ, गरज आहे का बघ हे सगळं सांगत्ये.
मी तुम्हाला जज नाही करत आहे, आणि पालक होणं दिवसेंदिवस अवघड होतंय हे हि मान्य आहे आहे. माझ्या वडिलांनी जे केलं ते त्यांच्या आर्थिक परिस्थिती ला बरोबरच होत. मला तेवढं जमेल का नाही देव जाणे. पण मला खालील गोष्टी नाही पटल्या फारशा. मी तुम्हाला माझ्या बाबांचे उत्तर काय असेल ते सांगते, बघा देता आला तर, कधी कुठे कशाचा उपयोग होईल ते सांगता येत नाही.
१. तिकडे एसपी , फर्ग्युसन ला मिळतंय का बघ नाहीतर मी कॉलेजला जाणार नाही - माझ्या वडिलांनी जाऊ नकोस म्हणून सांगितलं असतं, १ वर्ष घरी बसल्यावर बाहेर जायचं महत्व कळलं असता कदाचित.
२. क्लास लावला - ती नको म्हणत असताना का लावला. कधीतरी आर्थिक स्रोत बंद करून बघितले आहेत का. सिनेमा ला जायला / नवीन ड्रेस घ्यायला इ पैसे का देऊ, तू माझं ऐकत नाहीस तर तुला मी का देऊ. किंवा "तुझ्या गरजांना आम्ही आहोत, ऐश आपली आपण करायची" असं करून बघितलंय का कधी
मुलांकडून काहीच प्रयत्न नसताना पैसे खर्च होऊ देणं हे फारसं बरोबर नाही वाटलं.
३. सर्व कपल्स आहेत म्हणाली - खरंच अक्ख्या वर्गात एकही मुलगी नाही जिला बॉयफ्रेंड नाही ??? - असं खरंच असेल तर अवघड आहे राव.
जेडी ताई /दादा - प्लिज समजून घ्या कि मला तुमच्या पालकत्वाच्या पद्धतीला नावं ठेवायची नाहीयेत, फक्त वेगळ्या पद्धतीने वागलं तर कदाचित चांगला फरक पडू शकेल, कारण तुमच्या सध्याच्या पद्धतीने अभ्यासात फायदा तसाही होत नाहीये असाच वाटतंय. अर्थात तिच्या बरोबर संवाद चालू आहे हा फायदाच म्हणावा लागेल. काय होतंय पुढे ते सांगा नक्की, मी सध्या सुपात आहे पण येईन जात्यात पुढच्या ५-६ वर्षात.
18 Dec 2018 - 8:37 am | जेडी
वीणाताई तुम्ही सांगितलेले सर्व पर्याय मी वापरुन पाहिलेत, माझ्या मुलीशी माझा खुप चांगला संवाद आहे तरीही ही परिस्थिती आहे. माझीही मुलगी लहान असल्यापासुन स्वावलंबी आहे पण हे सर्व दहावीपर्यंत ऐकतात मुले , नंतर नाही. मी वरती नमुद केलय की मी काऊन्सेलरची मदत घेवुन पाहिली, तरीही काही उपयोग नाही.
मी स्वत: खुपच खडतर परिस्थितीतुन शिकलेय, पण सरळ म्हणते तुमचा जमाना वेगळा होता. जाऊच नकोस, घरीच बस हे बी हत्यार वापरुन पाहिलेय. परिणीती... १२ वी जेमतेम पास
18 Dec 2018 - 3:13 am | पिलीयन रायडर
मला एक असं नेहमी वाटतं की कोणीही अचानक विचित्र वागायला लागत नाही, स्पेशली मुलं. आईबाप जेव्हा म्हणतात की हा ऐकतच नाही किंवा ह्याला पिझ्झा बर्गरच लागतं किंवा गेमच खेळत बसतो... वगैरे वगैरे.. तेव्हा मुळात त्या लेकरचया हातात ह्या वस्तू देणारे पालकच असतात. त्यांना हवं ते करायची मुभा देणारे, त्यांच्या समोर नांगी टाकणारे.. तेव्हा मुलं अडनडी नसून, आईबापांची चूक आहे.
स्पष्टपणे बोलायचं तर तुमची मुलगी जसं बोलली (कॉलेज, क्लास वगैरे..) तसं तुम्ही खपवून कसं घेतलं हा प्रश्न मला पडला. मुलांचं शिक्षण म्हणजे ते अपल्यावर करत असलेले उपकार नव्हेत हे त्यांना कळायला हवं. नसेल कळत तर आपण ते सांगायला हवं. बसू दे घरी, होऊ दे नुकसान. बाकी खर्च बंद करा. आणि आता आपली पॉकेटमनीची सोय स्वतः करा असं सांगा. येईलच लक्षात की शिक्षण किती आवश्यक आहे.
काळ बदलत आहे, प्रश्न बदलत आहेत हे मान्य आहेच. पण पालक सुजाण असले तर मुलं सुजाण असतील. आणि मार्ग निघेलच. पण ह्या सगळ्यात मुलांना जबाबदारीची जाणीव हवीच.
19 Dec 2018 - 9:13 am | जेडी
--------मला एक असं नेहमी वाटतं की कोणीही अचानक विचित्र वागायला लागत नाही, स्पेशली मुलं. आईबाप जेव्हा म्हणतात की हा ऐकतच नाही किंवा ह्याला पिझ्झा बर्गरच लागतं किंवा गेमच खेळत बसतो... वगैरे वगैरे.. तेव्हा मुळात त्या लेकरचया हातात ह्या वस्तू देणारे पालकच असतात. त्यांना हवं ते करायची मुभा देणारे, त्यांच्या समोर नांगी टाकणारे.. तेव्हा मुलं अडनडी नसून, आईबापांची चूक आहे.----
@@@@@आजकाल मुलांना पालकांनीच आणून दयावे लागत नाही , शाळेमध्ये सर्व कळते . मी माझ्या मुलीला निदान नववीपर्यंत तरी पिझ्झा बर्गरची चव दिली नवहती पण जसे जसे इतर मुलं डब्यातपण पिइझा बर्गर देतात किंवा बिस्कीट, नूडल्स तशी आपली मुलेही हट्ट करू लागतात . भाजी पोळीचा व्यवस्थित दाब देणाऱ्या माझ्यासारख्या दोन चारच आय होत्या हे वेगळे सांगायला नकोच . एखादीने दिलेच कष्ट करून तरी सरळ तो डबा कुत्र्यांना घालून कँटीन मध्ये खाणारी मुले कमी नाहीत
---------स्पष्टपणे बोलायचं तर तुमची मुलगी जसं बोलली (कॉलेज, क्लास वगैरे..) तसं तुम्ही खपवून कसं घेतलं हा प्रश्न मला पडला. मुलांचं शिक्षण म्हणजे ते अपल्यावर करत असलेले उपकार नव्हेत हे त्यांना कळायला हवं. नसेल कळत तर आपण ते सांगायला हवं. बसू दे घरी, होऊ दे नुकसान. बाकी खर्च बंद करा. आणि आता आपली पॉकेटमनीची सोय स्वतः करा असं सांगा. येईलच लक्षात की शिक्षण किती आवश्यक आहे.-------
@@@@@ तू माझ्यावर उपकार करत नाहीस शिकून, माझे त्यातून काहीही नुकसान होणार नाही , तू शिकली नाहीस तरी हे हि माझा पेशन्स टिकला तोवर सांगून झाले होते . त्यावर एकच उत्तर होते , मग घालायची होतीस मला चांगल्या कॉलेजला , शिकवायची होतीस मला जसे दहावीपर्यँत शिकवलंस तसे . हजार वेळा सांगून झाले, मला इंटिग्रेशन , डेरिव्हेटिव्हस आता आठवणार नाहीत, मी विसरली आणि जॉब , काम ह्यातून जमणार नाही , तर एकच पालुपद - ट्रिग्नॉमेट्रीच्या इतक्या अवघड आयडेंटिटी कशा जमत होत्या तुला, ते हि तू स्टेट बोर्ड ची असताना @@@@@
------काळ बदलत आहे, प्रश्न बदलत आहेत हे मान्य आहेच. पण पालक सुजाण असले तर मुलं सुजाण असतील. आणि मार्ग निघेलच. पण ह्या सगळ्यात मुलांना जबाबदारीची जाणीव हवीच------
@@@@@ पालक म्हणून निदान मी तरी खूप प्रयत्न केले असे मला वाटते. कदाचित अजून कमी पडले असेल म्हणून अजूनच अपारधी भाव किती दिवस वाटून घ्यायचा कोण जाणे @@@@
19 Dec 2018 - 11:31 am | पिलीयन रायडर
मला नक्की कळत नव्हतं की खटकतंय काय.. आज एकदम क्लिक झालं..
तुम्ही तिचे निर्णय तिलाच घ्यायला लावता का? 100%
म्हणजे तुमच्या प्रतिसादातून असं जाणवत आहे की ती तुमच्यावर टाकतेय सर्व जबाबदारी. आणि त्या निर्णयांच्या परिणामांना पण तुम्हीच जबाबदार, मग त्याला कसं निस्तरायच हे पण तुम्हीच बघायचे..
माझेही आयुष्यात शिक्षणाबाबत काही निर्णय चुकलेत. पण ते पूर्णपणे माझे होते त्यामुळे एकदाही इतर कुणाच्याही डोक्यावर खापर फोडता आलं नाही की जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर टाकता आली नाही. दहावी नन्तर काय करायचं, कुठे ऍडमिशन घ्यायची, इंजिनिअर बनायचं, कुठलं कॉलेज, कुठली ब्रांच हे सगळं मी एकटीने ठरवलं, आई बाबांनी फक्त पैसे दिले. जाऊन ऍडमिशन पण मी एकटीने घेतली आहे. अगदी शाळेत सुद्धा साधा होमवर्क तर करून घेत नव्हते आई बाबा. नाही केलास तर शाळेत जाऊन खुशाल मार खा. त्यांचं लक्ष होत हे आज समजत आहे. आई तर शिक्षिका होती त्यामुळे ती बरोबर नजर ठेवायची. पण मागे लागून अभ्यास कर ग बाई, बाजूला बसून केलास का ग बाई वगैरे प्रकार कुणी केले नाहीत.
त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले तरी आई बापांनी आधार दिला पण त्या निर्णयांची जबाबदारी नाही घेतली. ती आमची आम्हीच उचलली.
तुमच्या बाबतीत असा काही इश्यू आहे का? तिने खावं म्हणून तुम्ही आटापिटा करून तिच्या मागे पळत होतात का? तिचा अभ्यास प्रोजेक्ट्स वगैरे तुम्ही लीड घेऊन करवून घेत होतात का? तिच्या करिअरच्या निर्णयात लीड कोण घेत आहे नक्की? जर ती तुम्ही घेतली असेल तर ती तुम्हालाच बोल लावणार (कारण अर्थात ते तिला सोयीचे आहे आणि ती लहान आहे).
अपराधीपणाचे म्हणाल तर तो येणारच. ती अत्यन्त यशस्वी झाली असती एखाद्या क्षेत्रात तर स्वतःचा अभिमान नक्कीच वाटला असता तुम्हाला. मग आता काही तरी हुकलय तर त्याचा अपराधीपणा पण वाटणारच की. ते सुटत नाही आता, जन्मभर राहणार सोबत. तुमची चूक असो वा नसो...
19 Dec 2018 - 11:49 am | श्वेता२४
तुम्ही आणि मी बहुदा एकाच पिढीच्या प्रतिनिधी. माझ्याही graduation चे सर्व निर्णय मी स्वतः घेतले. पालक अगदी पालक सभेलाही कधी शाळेत आले नाहीत. पालकांनी कधीही अंगाला हात लावला नाही. प्रवेश प्रक्रियेचे सर्व सोपस्कार मलाच पार पडावे लागले. मी scholar असूनही एकदा 5 वि ला सहामाहित गणितात 100 पैकी 36 मार्क पडले तर वार्षिक परीक्षेला जरा अभ्यास कर इतकेच सांगितले गेले. एरवी प्रत्येक वेळी पहिला नं आला तरी छान इतकीच प्रतिक्रिया. एखाद्यावेळी कोणी ओरडला किंवा पालकांनी काही घेऊन दिलं नाही म्हणून त्यांचा राग करणारे किंवा घर सोडून जाऊ किंवा जीव देऊ असा विचारही कधी मनात आला नाही. बरोबरच्या मुलांच्या परिस्थितीत पण फारसा फरक नसायचा. त्यामुळे त्याच्याकडे ते आहे माझ्याकडे नाही किंवा एकूणच हीच गोष्ट करायचीय असा अट्टहास न्हवता. पण आता परिस्थिती खूप बादलीय. मुलांच्या आजूबाजूला असणारे वातावरण बदललंय. त्यामुळे आपण कितीही संस्कार केले तरीही या बाहेरच्या वातावरणाचा मुलांवर जास्त परिणाम होतो आणि तो समजून घेऊनच मुलांशी कसं वागायचं हे ठरवावं लागेल असं वाटतंय. माझा मुलगा आताशी 3 वर्षाचा आहे पण आतापासूनच याबाबत गोंधळून जायला होतंय.
19 Dec 2018 - 12:58 pm | जेडी
तिला लहानपणापासुन स्वत:चे निर्णय घेण्याचे पुर्ण स्वातंत्र दिलेय. क्लासला न जाण्याचा निर्णय तिचा स्वत:चा अगदी लहानपणापासुन होता त्याचा मी आदर केला. अगदी लहानपणापासुन ड्राॅईंग रिलेटेड काहीतरी करण्याचे तीने ठरवले , त्यालाही आम्ही सपोर्ट केला जरी आम्ही दोघे सायन्स स्ट्रिमचे होतो तरी. कधीही अभ्यास कर अशी जबरदस्ती केली नाही. आठवी नववीत माझ्या लकात आले, मॅथ्स मध्ये गाडं अडतय, मग मी टिचरला विचारले, तर टिचरनीच मला क्लासचा पर्याय दिला. मग मी स्वत:च लक्श देवुन शिकवले. दहावीला पिअर प्रेशर खाली क्लास लावला तरीही ती नीट गेलीच नाही. मुळात डिएवी शाळा लहान असताना वर्गातच प्रोजेक्ट करायला लावते त्यामुळे त्याचा काही प्रश्न आला नाही. मोठी झाल्यावर तीचे ड्राॅईंग चांगले असल्याने माझ्यावर कधीच प्रोजेक्ट करायची वेळ आली नाही. गणित सोडुन बाकीच्या सर्व विषयात चांगले मार्क्स मिळाले दहावीला.
19 Dec 2018 - 2:00 pm | पिलीयन रायडर
मग ती आता सगळा दोष तुम्हाला देऊन तूच काय ते माझं बघ असं का म्हणतेय? ती स्वतःच खूप घाबरलेली असेल का? टेन्शन आलं असेल म्हणून ती तुमच्यावर ते ट्रान्सफर करायला बघत असेल.
निर्णय तिलाच घेऊ द्यावा आणि काही झालं तरी आई बाबा भक्कम सोबत आहेत म्हणावं इतकंच मी सुचवेन.
19 Dec 2018 - 4:20 pm | स्रुजा
मला असं वाटतंय की तुम्ही आधी खुप लक्ष देत होतात आणि आता ऑफिसच्या निमित्ताने म्हणा किंवा आत्ताचा तिच्या अभ्यासाचा आवाका, तुम्हाला जास्त वाटल्याने म्हणा तुम्ही तिला क्लास ला जायला सांगताय. पर्यायी तुमच्या सोबत मिळणारा खास तिचा वेळ किंवा आई सगळं सोडून आपल्याकडे लक्ष देते ही तिची सुरक्षितता तिला मिळेनासी झालीये. एक तर तुमचं अटेन्शन मिळावं म्हणुन ही तिने तिच्या नकळत दिलेली पॅसिव अग्रेसिव प्रतिक्रिया असेल. दुसरं म्हणजे, बाहेर मैत्रिणी जर आपापल्या बॉफ्रे बरोबर रमल्या असतील तर हिला तिथे मजा येणार नाही. जर तिचा मैत्रिणींचा गृप असता आणि तिथे खुप धमाल करता आली असती, तर तुमच्याकडून अपेक्षा कमी झाल्या असत्या. या वयात उलट बर्याच पालकांना सतत फक्त मैत्रिणी लागतात, घरी थांबायचं नसतं, पालकांचं ऐकायचं नसतं पण मैत्रिणींनी तेच केलं की मात्र बरोब्बर पटतं वगैरे तक्रारी असतात. तुम्हाला उलट तक्रार आहे कारण आत्तापर्यंत तुम्ही तिच्या कलाने, तिच्या निर्णयाला मान देत वागलात, आता मात्र फीस भरलीये आता बस सायन्स ला हा तिच्यामते खुसपट इशु काढुन तिला एकटं टाकताय. कधी तरी या अँगलने पण तिच्या प्रतिक्रियाचा विचार करुन बघा . तुम्ही जे लिहीलअय त्यावरुन मला हे जाणवलं. तुमच्यापेक्षा जास्त कुणी समजू शकणार नाही तिला.
18 Dec 2018 - 8:57 am | झेन
फक्त तूमचा प्रश्न नसावा, एका पिढीचा आहे. आधिच आयुष्य आई वडिलांना घाबरत गेलं उरलेलं मुलांना.
18 Dec 2018 - 9:41 am | सुबोध खरे
कठीण आहे. दोन्ही बाजूनी काही तरी चुकतं आहे.
18 Dec 2018 - 1:29 pm | आंबट गोड
समजतं आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे ते. तुम्ही मोकळेपणानी आपला प्रॉब्लेम सांगितला आहे. ऐकूनच कसे घेतले, क्लास का लावला आदी गोष्टी म्हणणे सोपे आहे..पण शेवटी आपल्या मुलांचे भवितव्य असते व त्यांनी काहीही बोलले तरी एकदम इस पार या उसपार असे वागून चालत नाही.
तिला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते ना....एफ सी ची अॅडमिशन खूप हाय जाते आर्ट्स ची! आताही काही ऑप्शन्स पहा... आर्किटेक्चर वगैरे...
हे वय खूप आडनेडे असते व त्यांना कॉलेज मधले शिक्षक- विद्यार्थी सुरुवातीलाच चांगले नसले तर अजिबात जमत नाही!
अवघड आहे...:-)
पण तिच्याशी सतत बोलत रहा, तिला पटवत रहा...हार्ड वर्कचे महत्व, चांगल्या डिग्रीचे महत्व.. ऑल द बेस्ट!
19 Dec 2018 - 12:29 am | सुचिता१
अगदी .. सगळं कळत असून ही , टोकाचा निर्णय नाही घेता येत.
18 Dec 2018 - 4:48 pm | विनिता००२
मध्यंतरी मुलाच्या ग्रुपमधल्या काही मुलींचे वागणे पाहून खूप चिडचिड झाली. त्या मुली घरीच अशा वागतात, की तशीच विचारसरणी व सवय आहे हे तपासणे गरजेचे होते.
त्याला बोलले काहीच नाही. पण माझा राग त्याला जाणवत नक्कीच होता.
काही सार्वजनिक कार्यक्रमात पुर्ण ग्रुपला भेटायचा योग येत राहिला. जीवनपध्दती तशी आहे हे लक्षात आल्यावर मुलानेच विषय काढावा अशा पध्दतीने बोलत राहीले. समजवत राहीले. त्याला ते कळले, 'चुकले' म्हणुन मनातले बोलला. त्याला पण ते आवडले नव्हतेच. मळभ असे दूर झाले. :)
लगेचच रागाची प्रतिक्रिया दिली असती तर आई माझ्या मैत्रीणींना नावे ठेवते, म्हणून त्याने विचार पण केला नसता. माझ्यात आणी त्याच्यात भिंत उभी राहिली असती.
18 Dec 2018 - 8:35 pm | श्वेता२४
माझी भाची 11 वि व 12 वि गर्वारेत होती . भाचीने 10 वि ला 90 टक्केवर मार्क्स मिळवले पण आधीच सांगून टाकले मी कॉमर्स घेणार अणि cs किंवा mba करणार. तिला गरवारे कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला पण ती कॉलेज ला जात नसे. बरीचशी एकलकोंडी झाली ती त्याकाळात. वाहिनी चे आणि दादाचे तिच्याशी खूपच मित्रत्वाचे आणि ममत्वाचे नाते आहे. तिने त्यांना सांगितले वर्गातील मैत्रिणींना बॉयफ्रेंड असून त्या त्यांच्यासोबत असतात किंवा त्यांच्याबद्दल बोलत असतात. मला ते वतातवरणच आवडत नाही. तिला बारावीला यथातथाच मार्क मिळाले पण सिनियर कॉलेज चांगले मिळाले तिथे तुलनेने mature मित्र मैत्रिणी मिळाले मुख्य म्हणजे तिथल्या प्राध्यापकांची ती खूपच लाडकी होती. सर्व activity मध्ये तिने भाग घेतला आणि टॉप केले. त्यामुळे JD म्हणतात ते उदाहरण मी माझ्या डोळ्यासमोर पहिले आहे कारण मी त्यावेळी दादाकडेच राहत होते. बाकी हा विषय चर्चा करायला खूपच कठीण आहे.
18 Dec 2018 - 10:45 pm | स्मिता.
मुलांच्या चुकिच्या(?) वागण्याला कारणीभूत म्हणून फक्त पालकांनाच झोडपणे योग्य नाही. कोणतेही सुजाण पालक आपल्या मुलांना चांगलेच संस्कार, शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. पण मुले 7-8 वर्षांची झाली की काही केवळ घरातच घडत नसतात. शाळा-क्लासमधले सोबती तसेच टिव्ही, सोशल मिडिआ यांचा मुलांवर भरपूर प्रभाव पडतो.
माझ्या 'अडनिड्या' वयात (teenages) बाॅयफ्रेंड असणं म्हणजे महत्पाप मानलं जायचं. तेव्हाही काही मुलींचे बाॅयफ्रेंड्स असले तरी तो छुपा कारभार असे. आणि आपण त्या वाटेने न गेलेलेच बरे अशी धारणा असल्याने एकटे पडल्यासारखे वाटले नाही. नंतर अभियांत्रिकी करतांना जवळच्या मैत्रिणींचे बाॅयफ्रेंड्स होते पण जर्र्रा समज आल्याने फारसे जड गेले नाही.
हल्ली मात्र बाॅयफ्रेंड्स असण्यातली 'पाप-भावना' जावून त्याला 'कूल कोशंट' प्राप्त झाल्याने बाॅयफ्रेंड्स नसलेल्या मुली अश्या एकलकोंड्या किंवा बंडखोर होत असाव्यात असा अंदाज करता येतोय.
19 Dec 2018 - 9:01 am | जेडी
अगदी अगदी , बंडखोर होतात . त्याविषयी पुढच्या लेखात लिहणारा आहे.
19 Dec 2018 - 11:21 am | विनिता००२
मी बॉयफ्रेंड मिळवला नाही, कारण तुम्हांला आवडणार नाही, मग माझे बाकीचे सर्व हट्ट पुरवा. असा दृष्टीकोन असतो का? मला माहीत नाही म्हणून विचारतेय.
19 Dec 2018 - 12:03 pm | श्वेता२४
पण ज्यांना बॉयफ्रेंड नसतो त्यांना सगळ्यांमध्ये वावरताना अशा वेळी नक्कीच ओकवर्ड वाटत असणार. तसेच आपल्याला यातील अनुभव नाही म्हणून एक नूनग्नड देखील येत असण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला यात अजिबात रस नसण्याची किंवा यातला फोलपणा माहित असण्याची शक्यता आहे. अशा तुलनेने mature व्यक्तीला अशा वतातवरणात राहणे नक्कीच असह्य होऊ शकते. या मानसिक घुसमटीचा परिणाम पालकांच्या बरोबर वागण्यात होऊ शकतो
20 Dec 2018 - 9:39 pm | जेडी
नाही , तसे काहीच नाही . अगदी लहान असल्यापासून सर्व बाबतीतला मोकळा संवाद , मैत्रिणीच्या बॉयफ्रेंड्स मुले त्यांची झालेली गोची हे सर्व पाहिल्याने बॉयफ्रेंड नाही याची खंत वाटत नसावी
19 Dec 2018 - 11:41 am | पिलीयन रायडर
हा बॉयफ्रेंड वाला मुद्दा खरंच अवघड आहे.
मुलं बाहेर जास्त असतात हे ही खरं. त्यावर मी माझ्यापुरता असा उपाय केला की जेव्हा जेव्हा मी इंग्रजी शाळांमध्ये गेले, मलाच खूप दडपण आलं. हे खूप हाय फाय आहे असं वाटलं. उद्या इथल्या मुलांसारख्या डिमांड माझा मुलगा नक्कीच करेल. मराठी शाळेत मला एकदम माझ्या शाळेसारखं वाटलं म्हणून मी तिथेच मुलाला घातलंय.
एकदम घरगुती वातावरण आहे. 200/- चा टीशर्ट घ्यायला सांगितला शाळेने तरी पालक भांडतात की इतका खर्च कशाला :)) पण मुद्दा हा की मध्यमवर्गीय जनता आहे. फार वाया जाणार नाही पोरगा असं आज वाटतंय.
19 Dec 2018 - 11:58 am | श्वेता२४
शाळेत असताना तो असं काही करणार नाही पण उद्या कॉलेज मध्ये गेल्यावर इंग्रजी मराठी शाळा असा भेद आडवा येणार नाही त्याला. ;)(कृ.ह. घे.)
19 Dec 2018 - 12:23 pm | पिलीयन रायडर
छे!! जाज्वल्य अभिमान बाळगणार तो उलट!! इंग्रजी वाल्याना हटा सावन की घटा म्हणायला शिकवू आपण त्याला!
19 Dec 2018 - 12:40 pm | श्वेता२४
:D:D;)
19 Dec 2018 - 9:20 am | सुधीर कांदळकर
लेखमाला. बहुतेक उदाहरणातल्या अननुभवी मुलांपेक्षा अनुभवी पालक जास्त अविचारी, अडनिडे वाटले. भावनिक बुध्दिमत्तेचा - इमोशनल इन्टेलिजन्सचा - अभाव प्रकर्षाने जाणवला. मुलांचे संगोपन या पालकांनी कमी गांभीर्याने घेतल्यासारखे वाटले. भावनिक बुद्धिमत्तेसंबंधी सोपे प्राथमिक पुस्तक 'डॅनिअल गोलमन'चे 'इमोशनल इन्टेलिजन्स'. पालक आणि मुले सार्यांनीच या विषयाची तोंडओळख करून घेणे गरजेचे आहे असे वाटते.
खूप बुद्धिमान असण्यापेक्षा आपल्या बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त उपयोग करणारे बहुधा जास्त यशस्वी ठरतात. नैतिक मूल्ये आणि संयम याविना बुद्धिमत्ता निरुपयोगी आहे. अल कपोनसारखा अट्टल गुन्हेगार देखील अतिशय बुद्धिमान होता. निर्णयक्षमता मात्र बहुधा निसर्गदत्त असते. शिवाय मिळालेले गुण हे त्या त्या प्रश्नपत्रिकेपुरते सत्य असतात. अजून एकाही उदाहरणात परीक्षेतली कॉपी हा विषय आला नाही म्हणून गंमत वाटली.
छान लेखमाला. पुभाप्र.
19 Dec 2018 - 9:52 am | जेडी
---लेखमाला. ---
@@@@@सर्व एका दमात लिहिणे शक्य नसल्याने , हे तुकडूयात लिहावे लागले . असो. लेखमाला लिहिण्याइतका माझा अनुभव नाही किंवा पात्रताही नाही पण मलाही लोकांचे काय अनुभव असतात ते वाचायचे होते म्हणून हा प्रपंच , असो @@@@@
-----बहुतेक उदाहरणातल्या अननुभवी मुलांपेक्षा अनुभवी पालक जास्त अविचारी, अडनिडे वाटले. भावनिक बुध्दिमत्तेचा - इमोशनल इन्टेलिजन्सचा - अभाव प्रकर्षाने जाणवला. मुलांचे संगोपन या पालकांनी कमी गांभीर्याने घेतल्यासारखे वाटले. भावनिक बुद्धिमत्तेसंबंधी सोपे प्राथमिक पुस्तक 'डॅनिअल गोलमन'चे 'इमोशनल इन्टेलिजन्स'. पालक आणि मुले सार्यांनीच या विषयाची तोंडओळख करून घेणे गरजेचे आहे असे वाटते.----
@@@@@हे समजतंय , कमी पडलोय, चुकलोय पण इथे लिहिले नसते तर , "डॅनिअल गोलमन'चे 'इमोशनल इन्टेलिजन्स'." पुस्तक वाचून सुजाण पोलकं होता आले असते हे कळले . आता पुस्तक नक्कीच वाचेन @@@@@
-------खूप बुद्धिमान असण्यापेक्षा आपल्या बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त उपयोग करणारे बहुधा जास्त यशस्वी ठरतात. नैतिक मूल्ये आणि संयम याविना बुद्धिमत्ता निरुपयोगी आहे. अल कपोनसारखा अट्टल गुन्हेगार देखील अतिशय बुद्धिमान होता. निर्णयक्षमता मात्र बहुधा निसर्गदत्त असते. शिवाय मिळालेले गुण हे त्या त्या प्रश्नपत्रिकेपुरते सत्य असतात. -----
@@@@@ अहो , मान्य. आम्ही कमी बुद्धिमान ते @@@@@
--------अजून एकाही उदाहरणात परीक्षेतली कॉपी हा विषय आला नाही म्हणून गंमत वाटली.--------
@@@@@तिन्ही लेखातले अनुभव लेकीशी झालेल्या सवांदातून आणि अनुभवातून लिहिले आहेत. एकही किस्सा काल्पनिक नाही . माझी मुलगी स्वतः कॉपी करत नसल्याने , फरकही त्यावर लिहिण्यासारखे माझ्याकडे नाही @@@@@@
----शिवाय मिळालेले गुण हे त्या त्या प्रश्नपत्रिकेपुरते सत्य असतात-----
@@@@अहो निदान भारतात तरी सर्व काही मार्कांवरच मिळते , निदान कॉलेजच्या डिग्र्या वैगेरे , नोकरी सुद्धा @@@@@
-----छान लेखमाला. पुभाप्र.----
धन्यवाद
19 Dec 2018 - 9:56 am | जेडी
पोलकं ऐवजी "पालक" वाचावे
"फरकही त्यावर लिहिण्यासारखे माझ्याकडे नाही " हे"
फार काही त्यावर लिहिण्यासारखे माझ्याकडे नाही असे वाचावे
19 Dec 2018 - 11:47 am | पिलीयन रायडर
साधारणपणे मिपावर काही पर्सनल लिहिलं की कशाला लिहिलं असं वाटतच, असं माझं मत आहे. :)
19 Dec 2018 - 10:46 am | श्वेता२४
तुम्ही लेखमाला लिहून अजिबात चूक केलेली नाही. मुलांच्या बाबतीत फार टोकाचा निर्णय घेऊन चालत नसते. खरोखरच एखाद्या मुलाचे 1-2 वर्ष शिक्षणाशिवाय वाया घालवूयातच मग येईल त्याला अक्कल म्हणणारे पालक खरंच तशी वेळ आली तर खंबीर राहतील का? याचा या धाग्यावर नको पण जाचा त्याने मनातच विचार केला तरी योग्य उत्तर मिळेल. कुणीही असली रिस्क आजच्या काळात घेणार नाही. आमच्या कार्यलयातील एका अधिकाऱ्याच्या मुलाने गाडी घेऊन देता कि नाही नाहीतर आत्महत्या करतो असा संदेश पाठवला. तो अधिकारी घरी पोचेपर्यंत त्याने आत्महत्या केलिही होती. अशावेळी कोणतेही पालक मुलांचे कुठेही आणि कितीही चुकत असले तरीही विशिष्ट मर्यादेपर्यंत ताणू शकत नाहीत आणि ताणूहि नये. उद्या मुले जीवानिशी गेली तर आपल्या कर्तुत्वाला, पैशाला, आणि जीवनाला काय अर्थ असणार आहे? याचा अर्थ या दडपणाखाली पालकांनी राहावे असे नाही परंतु किती तानावे याबद्दल आहे. पालकांच्या अट्टाहासापायी मुलांनी जीव दिल्याची 3 उदाहरणे डोळ्यासमोर आहेत माझ्या.
19 Dec 2018 - 2:02 pm | विनिता००२
मुलांच्या बाबतीत फार टोकाचा निर्णय घेऊन चालत नसते. >> हे अगदी खरं !!
मुलाशी कधी वाद झाला असेल, तर मला दिवसभर ऑफीसमधे अस्वस्थ वाटत रहायचे, मधून मधून फोन करुन त्याच्याशी उगीचच काहीतरी बोलायचे :(
19 Dec 2018 - 1:00 pm | यशोधरा
हेच. अगोदरच्या एका लेखाच्या प्रतिसादात मी म्हटलेही होते की मुले अडनिडी वाटत नाहीयेत. पुढील लेख आता जसे येत आहेत त्यातून पालकांची भूमिका ही अधिक रिजिड वाटते आहे.
@जेडी, तुमचे प्रतिसाद पाहा, कोणीही तुमच्या मताविरुद्ध वा त्याला छेद देणारे असे काही मत लिहिले की तुम्ही लगेच बचावात्मक धोरण का स्वीकारत आहात? आणि तुमचेच मत ग्राह्य आहे असा एक प्रकारचा अट्टाहास का आहे? ज्या वयात तुमची पाल्य आहे, त्या वयात आजूबाजूच्या वातावरणाचा प्रभाव पडतोच. 24 तास कोणीही आई वडील आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवू शकणार नाही, पण हा प्रभाव वरचढ ठरू नये म्हणून सतत आणि संयमित संवाद हाच त्यावरचा कीचकट आणि लांब पल्ल्याचा मार्ग आहे. त्याला इतर काही पर्याय नाही.
तुमच्यात आणि पाल्यामध्ये संवाद आहे का? तिची वाद करण्याची स्टाईल तुम्ही जी वर्णन करता आहात ती आणि तुमची इथे प्रतिसादांना उत्तर देण्याची स्टाईल एकच वाटते आहे साधारण. मी म्हणेन तेच आणि तसेच टाईप.
पालकत्व सोपे होते कधी? पाल्याणा शिकवताना आपल्यालाही खूप शिकायला मिळते. फक्त ते स्वीकारायचा मोकळेपणा हवा.
19 Dec 2018 - 3:38 pm | जेडी
काय बोलु ह्यावर?
कशावरुन रिजीड वाटले ते ही सांगा.
सोपं काहीच नाही हे मान्य. म्हणुन तर लिहितेय. लोक अनुभव शेअर करतील आणि मलाही समजेल. मी स्वत: पण सपुपदेशन करुन घेतलय, तसा फरकही करुन पाहिलाय स्वत:त. अजुन काही कमी पडत असेल तर तेही करेन.
19 Dec 2018 - 5:25 pm | यशोधरा
माफ करा, पण तुम्हांला टीका आवडत नाही ( टीका म्हणून इथे कोणी प्रतिसाद देत नसावेत, मी धरून) असा एकूण मला सुर वाटतो आहे. कांदळकर ह्यांच्या पोस्टला तुमचा प्रतिसाद पहा. इतर पोस्टीना सुद्धा. ह्यावरून एकूण रीजिड वाटले, चुकीचे सुद्धा असू शकेल.
मुलीचे वागणे बदलावे ह्यासाठी सकारात्मक काय काय केले हे सांगू शकता का?
19 Dec 2018 - 5:48 pm | स्मिता.
मला नाही वाटत तुम्ही आधी काही चूक केलीये किंवा इथे लिहूनही काही चूक केलेली नाहीये. मी आधीही लिहिलंय की कोणतेही पालक मुलांच्या योग्य भवितव्यासाठीच झटत असतात, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते.
दुर्दैवाने ज्या वयात मुलांत अनेक शरिरीक, भावनीक बदल होत असतात तोच काळ त्यांच्या करियरकरता महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी भावनीक आणि व्यवहारीक गरजांचा समतोल साधला जाईलच असं नाही. हा फक्त तुमच्या घरातला प्रश्न नाहीये.
इथे वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत, ती त्यांच्या बाजूने बरोबरही आहेत. तुम्हाला त्यातली कोणती तुमच्या परिस्थितीला योग्य वाटतात ती घ्यायची.
19 Dec 2018 - 5:52 pm | श्वेता२४
सहमत आहे
19 Dec 2018 - 9:18 pm | किलबिल
अगदी माझ्या मनातलं लिहिलंत.
प्रत्येक मुल वेगळं असणार आणि त्याचबरोबर त्याला हॅण्डल करायचे मार्गही वेगळे असणार. एकच फॉर्म्युला सगळीकडे लागू होणार नाही.
जेडी, मी तुमची परिस्थिती समजू शकते. घरात एक टीनएजर असल्याने अगदीच रिलेट करु शकले. चर्चा वाचते आहे. कदाचित मलाही माझा फॉर्म्युला मिळून जाईल. चर्चा सुरू केल्याबद्दल धन्यवाद.
19 Dec 2018 - 2:38 pm | टर्मीनेटर
ज्वलंत विषयावर लिहिताय!
तिन्ही भाग आत्ता वाचले, अगदी आजूबाजूला घडणाऱ्या घटना वाचायला मिळाल्या.
19 Dec 2018 - 4:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
अत्यंत मोलाच्या विषयावरची लेखमाला ! उत्तम आणि संयत चर्चा !! यासाठी लेखक व प्रतिसादक या दोघांनाही अनेक धन्यवाद !
या लेखमालेतून अनेकांना अनेक उपयोगी विचार मिळतील यात शंका नाही.
19 Dec 2018 - 5:06 pm | तनमयी
माझी काही निरीक्षणे:
काही तरी चुकतं आहे.
मुलगी जास्त negativity कडे जात आहे असे वाटते
तिला बाहेर काढा यातून
मोठ्यांची मदत घ्या
ती अति बोलतेय एवढ नको बोलायला थोड आज्ञे मध्ये असायला हवे
वयानुसार वागले पाहिजे
adjustment is rule of life
आपण कशासाठी कॉलेज ला चाललोय आपण काय करत आहोत याचे भान असायला हव
काशाल मित्र व मैत्रिणी लागतात अपोआप eventually होतील नाहीतर नाही
आता तिला बेस्ट प्लान द्या जेणेकरून ती स्वावलंबी होईल पुढे तुमच गरज तिला प्रत्येक वेळेला भासणार नाही
स्किल छोटेसे असले तरी चालेल पण ती आयुष्यात स्वावलंबी झाली पाहिजे
ओवर आल ती तुमची आहे ती सगळ्यात खूप महत्वाची आहे हे तिला पटवून द्या
ती आनंदी कशी राहील बुस्य कशी राहील हे बघा
थोडा वेळ द्या अशा गोष्टीना होईल सर्व निट.
time is answer
सर्व पालकांना आदर्श मुल नाही मिळत त्यामुळे करितो करे स्तोवर करणे पण tension न घेता करणे
आपण एखादा बक्क प्लान त्यांच्या साठी तयार ठेवावा इन टर्म्स ऑफ money ऑर else
19 Dec 2018 - 5:06 pm | तनमयी
माझी काही निरीक्षणे:
काही तरी चुकतं आहे.
मुलगी जास्त negativity कडे जात आहे असे वाटते
तिला बाहेर काढा यातून
मोठ्यांची मदत घ्या
ती अति बोलतेय एवढ नको बोलायला थोड आज्ञे मध्ये असायला हवे
वयानुसार वागले पाहिजे
adjustment is rule of life
आपण कशासाठी कॉलेज ला चाललोय आपण काय करत आहोत याचे भान असायला हव
काशाल मित्र व मैत्रिणी लागतात अपोआप eventually होतील नाहीतर नाही
आता तिला बेस्ट प्लान द्या जेणेकरून ती स्वावलंबी होईल पुढे तुमच गरज तिला प्रत्येक वेळेला भासणार नाही
स्किल छोटेसे असले तरी चालेल पण ती आयुष्यात स्वावलंबी झाली पाहिजे
ओवर आल ती तुमची आहे ती सगळ्यात खूप महत्वाची आहे हे तिला पटवून द्या
ती आनंदी कशी राहील बुस्य कशी राहील हे बघा
थोडा वेळ द्या अशा गोष्टीना होईल सर्व निट.
time is answer
सर्व पालकांना आदर्श मुल नाही मिळत त्यामुळे करितो करे स्तोवर करणे पण tension न घेता करणे
आपण एखादा बक्क प्लान त्यांच्या साठी तयार ठेवावा इन टर्म्स ऑफ money ऑर else
19 Dec 2018 - 7:41 pm | मराठी कथालेखक
हा लेखच नव्हे तर या लेखमालेच्य निमित्ताने मला काहीसं व्यक्त व्हावसं वाटतंय.. "बिघडलेली वा वाट चुकलेली मुलं" असा काहीसा विषय इथे दिसतोय.
मला कुणाला चूक वा बरोबर ठरवायचं नाहीये. पण मी जे सहसा फारसं व्यक्त करत नाही ते लिहावंस वाटतंय.
आता मी चाळीशीच्या जवळ पोचलो आहे. शाळेत, कॉलेजात माझी प्रगती नेहमीच अतिशय चांगली होती. नेहमीच चांगला क्रमांक , टक्के ई. इंजिनिअरिंग केल्यावर नोकरी मिळाली. अगदी आई-वडीलांना अभिमान वाटेल असंच करिअर होतं.. पण.. लौकिक अर्थाने सारं काही छानच... पण मला मात्र काहीतरी हरवल्याची जाणिव नेहमीच होत राहिली, अजूनही तो सल आहेच काही प्रमाणात.
मध्यमवर्गीय असल्याने आई -वडीलांनी अगदी फक्त अन्न-वस्त्र-निवारा आणी शिक्षण ई गरजाच पुरवणार असल्याचं अनेक वेळा मनावर बिंबवलं होतं.. फारसा हट्ट करण्याचा प्रश्न नव्हताच. कोचिंग क्लासही थेट दहावीत प्रथम लावला. त्या आधीही (म्हणजे आधीच्या इयतांत) बहूधा चांगलेच गुण मिळायचे (निदान ८०% तरी) . पण वार्षिक वगळता इतर परीक्षांत एकेका विषयाची उत्तरपत्रिका एकेका दिवशी (शिक्षक जसे तपासतील तसे) हाती यायची. त्यामुळे एखाद्या विषयात जर कमी (म्हणजे ७०% वगैरे) गुण मिळाले तरी खूप बोलणी ऐकावी लागत..जरी पुर्ण परीक्षेची गोळाबेरीज चांगली असली तरी...
मी चौथीत असताना माझ्या वर्गात एक मुलगा होता, तो परिक्षेत पहिल्या क्रमांकावर असायचाच पण शाळेत कथाकथन , रेडिओवर नाटक ई गोष्टीही त्याच्या असायच्या.. खरंतर त्याच्या या यशामागे शिक्षिका असलेल्या त्याच्या आईचे खूप प्रयत्न होते. पण या मुलाचे सतत इतके काही कौतुक माझ्या घरात होत असे की जणू त्या मुलासमोर मी म्हणजे कुणीतरी अत्यंत यःकश्चित मुलगा. नकळत पणे त्या वयात मी त्या मुलाचा द्वेष करु लागलो होतो. माध्यमिक शाळेत त्याचे बाकी कर्तृत्व हळूहळू ओसरू लागले आणि अभ्यासातही तो दुसर्या फळीत गेला तर मी नेहमीच पहिल्या फळीतच होतो. पुढे आमची मैत्रीही झाली, ते असो.
वय वाढत होते तसे मनात फक्त एक गोष्ट पक्की होत होती की मला फक्त अभ्यास करायचा आहे.. मस्ती नाही की हट्ट नाही.. शिकायचे आणि स्वतःच्या पायावर उभे रहायचे इतकेच... माझ्या आईला वाटे की तिच्या मुलांना नेहमीच तिच्या इतर (सख्ख्या आणि चुलत्/मावस वगैरे) भावंडांच्या मुलांपेक्षा जास्त गुण असावेत जे सांगताना तिला नेहमी अभिमान वाटेल.. हे मी नेहमीच करु शकलो..
अकरावीत असताना माझा कल बदलला, मला इंजिनिअरिंग ऐवजी सायन्स (B Sc नंतर M Sc ई ) ला जावेसे वाटू लागले कारण मला संशोधनाची आवड निर्माण झाली होती. पण या गोष्टीला घरुन विरोध झाला.. 'नोकरी मिळणार नाही' ही मोठी भिती दाखावली गेली ..मी ही ठाम राहू शकलो नाही. मग इंजिनिअरिंगला जायचे ठरवले. पण तिथेही अट होतीच की फक्त 'फ्री सीट'ला प्रवेश घेता येईल,... फ्री सीटला इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला, सर्व वर्षांना अव्वल यश मिळवले.
पण हे सगळं करताना मोठा हट्ट मी फक्त एका सायकलकरिता (बारावीला) आणि कॉम्प्युटरकरिता (इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला) केला. या गोष्टी मिळाल्यात पण खूप दिवस हट्ट करत रहावे लागले.. सहज काही मिळाले नाही..इंजिनिअरिंगला असताना कॉलेजला बसने जाणे हे जास्त सोयीस्कर असतानाही मी लोकल ट्रेनने जायचो कारण लोकलचा पास खूप स्वस्त होता. त्या काळीही इंजिनिअरिंगला माझ्या वर्गात रोज बाईकवर येणारी अनेक मुले होती.
बरं काही हट्टांकरिता पैसे लागणार नव्हते.. जसे मला केस वाढवायची आवड होती पण त्यालाही घरातून खूप विरोध होता..
स्वतःच्या पायावर उभे राहू पर्यंत मी अभ्यासाशिवाय फारसे काही केलेच नाही ..मित्रांसोबत फिरायला जाणे तर दूर पण नातेवाईक घरी आल्यावरही एकदा नमस्कार करुन झाल्यावर "तु आत तुझा अभ्यास करत बस" अशीच सूचना असायची. कॅरम वगैरे खेळ मोठ्या परीक्षा संपल्यावर फक्त उन्हाळ्याच्या वा दिवाळीच्या सुटीत खेळता येत असंत.
एकविसाव्या वर्षी नोकरी मिळाली, स्वतःच्या पायावर उभे राहिलो.. खर्या अर्थाने आयुष्याची सुरुवात झाली असं वाटलं... तरी चोविसाव्या वर्षी स्वखर्चानेच पहिला मोबाईल घेताना घरुन झालेला विरोध आठवतो.. त्याच दरम्यान केव्हातरी अगदी चिकाटीने एखादा वर्ष केस वाढवलेत पण "कधी कापणार ? नेमके किती वाढवायचे आहेत ? वाईट दिसतायत...नातेवाईक /लोक काय म्हणतील ?..." वगैरे शेरे/ प्रश्न अनेकदा ऐकावे लागले..
अर्थात या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत.. मी फारशा व्यक्त करीत नाही.. 'जाऊ दे झालं ते झालं' म्हणत सोडून देतो. पण काहीतरी हरवल्याची भावना कधीकधी दाटून येतेच...असो.
19 Dec 2018 - 8:10 pm | सुबोध खरे
आपण फार सालस मुलगा होता पण आपले पालक जास्त नियंत्रण ठेवणारे(कॉन्ट्रॉलिंग) होते असे वाटते आहे. मी पण तसा सालसच आणि हुशारही( पहिला दुसराच नंबर असायचा) होतो म्हणजे कोणतेही व्यसन वायरट पण वगैरे न करताच लहानाचा मोठा झालो परंतु आमच्या पालकांनी आम्हाला भरपूर स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळे मनात काही किल्मिष राहिलेले नाही.
एकदा आयुष्यात वारा प्यायलेल्या वासरासारखा उ:शृंखल पणा आणि अनाठायी खर्च करून पहा. मनातील जळमटे स्वच्छ होतील. 'जाऊ दे झालं ते झालं' याची खंत वाटणं थांबेल. एकच आयुष्य मिळतंय. मन स्वच्छ ठेवून जगा.
(सल्ला आगाऊपणाचा वाटला तर सोडून द्या)
20 Dec 2018 - 12:47 pm | मराठी कथालेखक
आता करतो खर्च स्वकमाईने... पण कधी कधी काही गोष्टी पालकांकडून मिळण्यात वेगळा आनंद असतो असे वाटते... हट्ट पुरवले जाण्याचा आनंद. अगदी खूप महागडे हट्ट नाही पण निदान काही प्रमाणात आणि बजेटमध्ये बसू शकतील असे काही.
19 Dec 2018 - 11:42 pm | सुचिता१
मनाला भीडणारा प्रतीसाद आहे तुमचा. मुलांना त्या त्या वयात छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता यायला हवा , शिस्ती चा ही अतिरेक नको , या वेगळ्या मुद्द्या कडे लक्ष वेधले तुम्ही .
20 Dec 2018 - 2:10 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद
20 Dec 2018 - 7:42 pm | गामा पैलवान
म.क.,
तुमच्या एकंदरीत कथनावरनं वाटतंय की तुम्हाला तुमच्या पालकांनी त्यांच्यासाठी वापरून घेतलंय. त्यांना बरं वाटावं, प्रतिष्ठा लाभावी, वगैरे साठी.
पण असं असलं तरीही ती समस्या नाही. कारण की तुमचा वापर तरी होत होता. यथावकाश स्वत:चा वापर स्वत:साठीच कसा करायचा ते तुम्ही शिकलात.
फक्त काहीतरी हरवल्याची भावना जी येते तिचा निकाल लावायचाय. याचं कारण तुम्हीच सांगितलंय. छोटेछोटे हट्ट पालकांनी पुरवायचं जे समाधान असतं ते तुम्हाला बालपणी मिळालं नाही. मला वाटतं की तुमच्या मुलांचे असे किरकोळ हट्ट पुरवून तुम्हाला ते क्षण परत जगता येतील.
आ.न.,
-गा.पै.
25 Dec 2018 - 12:03 pm | मराठी कथालेखक
गा पै
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आता काही निकाल लावायचा आहे वगैरे नाही. मला फक्त इतर पालकांना असं सुचवायचं होतं की ही पण एक बाजू असू शकते. निदान मुलांना भविष्यात असं वाटू नये निदान इतके हट्ट तरी पुरवावेत. मुख्य म्हणजे जे योग्य आणि कुवतीत बसणारे असतील ते हट्ट पुरवावे.
मी या सगळ्या गुंतागुंतीपासून स्वतःला दूर ठेवलंय. मी विनापत्य जीवनशैली (childfree lifestyle) जगतोय.
20 Dec 2018 - 9:44 pm | जेडी
मला माहित नाही तुमचे वय काय आहे पण जे आता ३५ च्या पुढे आहेत त्यांची बहुतेंकांची हीच स्थिती असावी असे वाटतेय .
25 Dec 2018 - 12:05 pm | मराठी कथालेखक
मी पण चाळिशीच्या जवळ जात आहे ..
चला एकटा नाही तर मी :)
19 Dec 2018 - 8:28 pm | सुधीर कांदळकर
पहिल्या तीन भागांसाठी मिळून आहे.
शिवाय मिळालेले गुण हे त्या त्या प्रश्नपत्रिकेपुरते सत्य असतात. -----
@@@@@ अहो , मान्य. आम्ही कमी बुद्धिमान ते @@@@@
हे वाचून फार वाईट वाटले.
मी काही सर्वज्ञ नाही किंवा तुम्हाला कमी लेखतो आहे असेही नाही. मिपावर आपण आनंद घेण्याआठी वा ज्ञानसंपादनासाठी जमतो आणि जमेल तेव्हा एकमेकांना सपोर्ट करतो असा माझा समज आहे.
१० गुण मिळाले नाहीत म्हणून तो/ती विद्यार्थी/विद्यार्थिनी कमी बुद्धिमान असे नसते. हे यातून सूचित करायचे होते. १० गुण मिळव हा गोल सेट करणे हे ठीक. पण साध्य झाले नाही म्हणून दूषणे देऊ नयेत तर मिळतील पुढे असा उद्याच्या आशेचा किरण द्यावा.
आपण पूर्वीच्या भागातून अनेक उदाहरणे दिली आहेत त्यापैकी
अजुन एक मुलगी खुप हुशार, ९९ मार्क्स मिळाले की आख्खे खानदान १ मार्क कोठे गेला म्हणुन विचारणार?त्या एक मार्कचा तिला हिशोब द्यावा लागणार म्हणुन ती मुलगी सतत धास्तावलेली.. तिची आई डॉक्टर किंवा अशीच काही मेडिकल रिलेटेड जॉब करणारी . तिच्या हॉस्पिटलच्या शिफ्ट्स
या उदाहरणासाठी हे वाक्य आहे.
आपण इथे लिहिण्यात मुळीच चूक केलेली नाही. आपण अडचणीत सापडलो की अनेक वेळा अडचणीत सापडल्यावर इमर्जन्सी सिस्टीम कार्यरत होते आणि परिस्थितीतीचे विश्लेषण करण्याची शक्ती गमावतो. बाहेरील हितचिंतक निरीक्षक योग्य ते विश्लेषण करून आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो असा माझा मी स्वतः अडचणीत सापडलो असतांना मित्रांच्या सल्ल्याने मार्ग काढला आहे. या अनुभवाचा आपल्याला फायदा मिळावा अशा सदिच्छेने मी प्रतिसाद दिलेला आहे. विविध विचारातून मंथनाने चांगले काही निघेल अशी दृढ आशा आहे.
19 Dec 2018 - 9:36 pm | जेडी
सॉरी , काही मुद्दे मला पटले आणि काही नाही त्यामुळे असा प्रतिसाद दिला पण नुसते पालकांनाच जबाबदार धरणे मला थोडे चुकीचं वाटले. पण सॉरी माझ्या कमेंटबद्दल .
19 Dec 2018 - 9:36 pm | नेत्रेश
> "नंतर तिच्या वडिलांनी तिला बड्डे गिफ्ट महागडा फोन घेऊन दिला होता , ती कोठेतरी बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेली होती तेंव्हा तो हरवला . "
गुगल / अॅपल चे अकाउंट वापरुन प्रत्येकाला त्याचा फोन ट्रॅक करता येतो
प्रत्येक फोनचा IMEI नंबर वेगळा असतो. त्यानेसुद्धा (पोलीसांना कींवा सर्वीस प्रोव्हायडर्सना)फोन ट्रॅक करता येतो. पोलीस कंप्लेंट केली काय?
खरच फोन हरवला असेल तर शोधताही येइल. पण पोलीस कंप्लेंट केली नसेल तर फोन विकला असेल किंवा बॉयफ्रेंडला दीला असेल व घरी चोरीला गेला असे सांगीतले असण्याची शक्यता वाटते.
20 Dec 2018 - 10:00 pm | जेडी
ज्या मुलीचा फोन हरवला तिचे वडीलही आयटी मध्ये जॉब करतात , ह्या गोष्टी माहित असतीलच त्यांना
22 Dec 2018 - 5:38 am | नेत्रेश
त्यांनी डायरेक्ट CC TV रेकॉर्डींग चेक करण्याची मागणी केली म्हणुन वाटले की या मेथडस माहीत नसाव्यात.
शिवाय्स CC TV रेकॉर्डींग बघुन सुद्धा फोन सध्या कुठे आहे हे कळणार नाहीच.
19 Dec 2018 - 10:04 pm | नेत्रेश
१ वर्ष कींवा काही महीने मुलीला नोकरी करुन स्वतःचा प्रत्येक खर्च स्वतः भागवायला सांगा. घरुन फक्त जेवण आणी झोपण्याची सोय ईतकेच मीळेल. हॉटेलींग, फीरणे, मोबाईल, ईंटरनेट, कपडे, बाईक, कार ईत्यादी स्वतः कमावलेल्या पैशातुनच भागवायच्या. नोकरी करुन वेळ मिळाला तर कॉलेजला जा / घरुन अभ्यास कर व परीक्षा दे. हजारो मुले हे करत आहेत. नाहीतरी अत्ताही जेमेतेम मार्क मिळत आहेत. जास्तीत जास्त १ वर्ष नापास होईल. पण बाहेरच्या जगचा खरा अनुभव मिळेल ज्याच्यामुळे सध्या घरुन मिळत असलेल्या आर्थीक व मानसीक सपोर्टची कींमत कळेल. पालकांच्या पैशांची कींमत कळेल. ईथे मीपावर असे की त्येक लोक आहेत की ज्यांनी १ लाखापेक्षा कमी पैशांत आपले सर्व शीक्षण पुर्ण केले आहे. तसेच कमी शीक्षण असलेल्यांना काय नोकर्या मिळतात हे दीसले की चांगला अभ्यास स्वतःहुन करण्याची प्रेरणा मीळेल.
दुसरा उपाय म्हणजे काही समाजसेवी संस्थांमध्ये जाउन काही आठवडे / महीने समाजसेवा करणे. आपल्याच समाजातले लोक काय परीस्थीतीत व कसे जगतात हे पाहीले की आपल्या समस्या कीती फालतु आहेत (शिक्षकांना ईंग्लिश येत नाही / मुले गांवंढळ आहेत / बॉयफ्रेंड / ईत्यादी) याची जाणीव होईल.
दुसर्याला सल्ला देणे खुप सोपे असते याची जाणीव आहे. मी स्वतः तुमच्या जागी असतो तर काय केले असते हे सांगणे कठीण आहे.
तुम्हाला तुमच्या कांसीलरने काय सांगीतले?
20 Dec 2018 - 9:48 pm | जेडी
प्रतिसाद खूप आवडलाय . अजून एक वर्षे काही नाही झाले तर तोच मार्ग अवलंबायचा ठरवलं आहे . पण मला संधीच दिली नाही चूक सुधारणायची हि भावना आयुष्यभर राहू नये म्हणून एक वर्ष संधी द्यायची ठरवले
20 Dec 2018 - 3:38 am | वीणा३
मुलांचं पुढे काय होईल ते बऱ्याच गोष्टीवर अवलंबून आहे हे मान्य. शिक्षणात अगदी मागे पडलेली मुलं पुढे खूप यशस्वी होतात किंवा उलट सुद्धा. त्यामुळे मुलांबरोबर वेग वेगळ्या प्रकारे वागणारे पालक चुकीचे वाटत नाहीत. शेवटी स्वतःच मूळ कसं वाढवायचं हे ठरवण्याचा हक्क प्रत्येकालाच असतो आणि त्यात काय चांगलं वाईट वाटायचं कारण नाही.
पण ह्या लेखात किंवा आसपास पण असं दिसायला लागलाय कि पालक मुलावर ५-१५ लाख वाया जाणार हे गृहीत धरून चालतातय. कष्ट करणाऱ्या मुलावर कोणी पैसे खर्च केले तर चांगलाच आहे, पण दिसतंय कि पोरगं पैसे वाया घालवणार आहे तरीही खर्च चालूच आहे हे काय पटत नाहीये.
अर्थात वरती म्हंटल्याप्रमाणे एकदम सोडून देता येत नसावं त्या वयात
एक उदाहरण देते. माझा मुलगा ६ वर्षाचा आहे, रोज सकाळी नवरा शाळेत सोडतो. रोज सकाळी उठण्यावरून, दात घासण्यावरून, कपडे घालण्यावरून रडारड. शाळा ८:१० ची आहे, ८:१५ ला गेट बंद होता. त्यानंतर ऑफिस मध्ये जाऊन तिथे एंट्री करून वर्गात जायला लागतं. असं सारखं होत असेल तर प्रिन्सिपॉल कडे जायला लागतं इ.इ. नवऱ्याची तडफड कि शाळेत उशीर होऊ नये, ऑफिस मध्ये जायला लागू नये, त्याच्या रेकॉर्ड वर "लेट असतो " हे येऊ नये. रोज बाप लेकाची भांडण. थोडा उशीर झाला तरी पोरगा नवऱ्यावर ओरडतो तुझ्यामुळे उशीर झाला. परत भांडण
नवऱ्याला कितीवेळा सांगून बघितलं कि होउदे उशीर जाऊदे ऑफिस मध्ये, पण त्याने एकदा पण नाय केलं तसं. आणि मध्ये मला १ आठवडा सकाळी सोडायला लागणार होतं, पहिल्या दिवशीपासून मी आपली घड्याळाचा अलार्म लागल्यासारखी फक्त पोराला वेळ सांगत्ये. ८:१५ ला कसेबसे पोचलो शाळेत, पोरगा माझ्यावर ओरडायला लागला, म्हंटलं तुला आत्ताच ऑफिस मध्ये नेते तिकडेच सांग तू का उशीर झाला ते. गप्पा बसला. संध्याकाळी घरी आल्यावर नीट सांगितलं कि मी बाबा सारखी भांडू-ओरडू शकत नाही, पण तू नाही लवकर आवरलास तर तुला उशीर होईल. पुढचे ४ दिवस बिलकुल वादावादी नाही. सगळं वेळेत.
बाबा परत आल्यावर ये रे माझ्या मागल्या चालू!!!
20 Dec 2018 - 10:13 am | श्रीरंग_जोशी
या मालिकेतले तीनही लेख वाचले. भारतात बदललेल्या परिस्थितीची कल्पना आली. तुम्ही एवढे आव्हानात्मक अनुभवकथन मोकळेपणाने केले याबद्दल अभिनंदन व आभार. आभार अशासाठी की माझ्यासारखे अनेक तुलनेत नवे व अननुभवी पालक या विषयावर अधिक गंभीर होतील.
विविध प्रतिसादकांचे प्रतिसादही उत्तम आहेत.
मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की तुमची मुलगी गेल्या काही वर्षांपासून काय वाचते व वाचनात नियमितता आहे का?
मला माध्यमिक शाळेत असतानापासून नियमित वर्तमानपत्रे व नियतकालिके जमेल तशी वाचत राहण्याचा खूप उपयोग झाला. प्रसिद्ध पुस्तकं किंवा कादंबर्या फारशा कधी वाचायला मिळाल्या नाहीत किंवा त्यासाठी फार प्रयत्नही केले नाहीत. पण वर्तमानपत्रे व नियतकालिकांमधून प्रेरणादायी व प्रयत्नवादाचं महत्त्व अधोरेखित करणार्या गोष्टी कळत राहिल्या व त्यांचा सकारात्मक परिणाम होत राहिला.
तुम्हाला व तुमच्या कन्येला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तिच्या शिक्षणप्रवासातले हे अवघड वळण पार पडून तिची घोडदौड सुरू होवो ही सदिच्छा.
20 Dec 2018 - 10:05 pm | जेडी
माझ्या मुलीने खूप वाचलंय , जास्तीत जास्त दोन दिवसात १ बुक असे वाचन केलाय . अजूनही करते . तिचेही कलेक्शन आहे . सर्व इंग्लिश . त्यात विम्पी किड्स सेरीसी ते पर्सी जॅक्सन , शेक्सपिअर ..... ते फिफ्टी शेडस ऑफ ग्रे पर्यन्त बरेच काही वाचलंय . आता ऑनलाईनही खूप वाचते. फेसबुक वर नाही पण ब्लॉगस आणि काय काय खूप वाचते . आता मी थोडे कंट्रोल केले आहे बुक्स घेण्यावर नाहीतर एका दिवसात बुक्स वाचून संपवते आणि दुसरे आन म्हणते
27 Dec 2018 - 11:35 am | अर्धवटराव
तुमच्या मुलीचा प्रॉब्लेम सूर्याच्या पिल्लाची समस्या तर नाहि? प्रचंड कॅलीबर पण कर्तुत्वाला वाव नाहि, असाधारण प्रज्ञा पण चिंतनाला विषय नाहि, बिट्वीन द लाईन्स वाचायची तीव्र दृष्टी पण योग्य केन्व्हास नाहि, फार सखोल जाणीवा पण व्यक्त करु शकणारी कला नाहि... असे अनेक प्रॉब्लेम असतात या मंडळींचे. मग असाच चिखल तयार होतो मनात... आयुष्यात...
20 Dec 2018 - 12:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
खूप संयत, सकारात्मक व उपयोगी चर्चा चालू आहे. राजकारणी धाग्यांच्या बहुतांश निष्फळ एकेरी धुरळ्यात हा धागा म्हणजे एक सुखद हवेची झुळूक ठरला आहे !
माझा विषयातला माझे मत व अनुभव सांगायचा मोह आवरत नाही. म्हणून काही...
समजायला लागले की मुलांना सर्वप्रथम हे समजाऊन देणे महत्वाचे असते की,
(अ) आईवडील, तुम्हाला आयुष्यभर पुरणार्या, शिक्षण व कौशल्य, याच दोन गोष्टी मिळवायला मदत करू शकतात आणि त्यांच्या बळावर तुम्ही जगात कुठेही तगू शकाल, उत्कर्ष करून घेऊ शकाल, आपले स्थान निर्माण करू शकाल.
(आ)कोणतेही आवडीचे क्षेत्र निवडा, पण त्यात झोकून देऊन स्वतःला अभिमान वाटेल असे कौशल्य मिळवा.
पालकांनीही समजून घेतले पाहिजे की, शिक्षण मुख्यतः तीन प्रकारचे असते:
(अ) औपचारिक : शाळा, कॉलेज, व्यावसायिक शिक्षण, इ. हे शक्यतो मुलाच्या आवडीशी सुसंगत असले तर, ते आवडीने केले जाते व त्यात यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते. इथे योग्य शिक्षणसंस्था निवडण्यापलिकडे करण्यासारखे पालकांकडे बहुदा फारसे काही नसते.
(आ) व्यावहारिक : भारतातिल शिक्षणपद्धती, मुख्यतः "घोका आणि ओका" या पद्धतीवर चालते. या पद्धतीत, माहिती मिळते (पक्षी : घोकली जाते), पण तिचा अर्थ समजला की नाही? तिचा व्यवहारात उपयोग आहे काय? असला तर कसा? या व्यावहारीक प्रश्नांच्या उत्तरांना महत्व नसते. या प्रश्नांची उत्तरे शोधायची सवय मुलांना लहान वयापासून लावण्याने, जीवनातील यश-अपयशामध्ये जमीन अस्मानाचा फरक पाडू शकतो. शाळा-कॉलेजात सामान्य वाटणारे मूल, व्यवहारात खूप यशस्वी होते त्यामागे बहुदा या कारणाचा मोठा हात असतो. या शिक्षणात, "कळत-नकळत", पालकांचा सिंहाचा वाटा असतो... तो वाटा "कळत" अदा केला, तर पालकांच्या आणि पाल्याच्या जीवनातल्या अनेक समस्या मूळातून नष्ट होतात.
(इ) आपल्या विचाराची आणि वागणूकीची पद्धत : दुसर्याला विचारात घेऊन मगच आपले बोलणे व कृती ठरवावी व करावी, याचे शिक्षण मुलांना जन्मापासून पालकांच्या वागणूकीतून मिळत असते. भूक, शी, शू इत्यादी सोडून, लहान मुलांचा व्यवहार बहुतांश प्रतिक्षिप्त असतो... आपले किती लाड केले जातात? आपण काय केले की लाड केले जातात? आपण कोणत्या स्तरापर्यंत लाड/हट्ट करवून घेऊ शकतो (पक्षी : आपण कोणत्या स्तरापर्यंत पालकांना नमवू शकतो)? हे सर्व मूल मूलभूत प्रतिक्षिप्त व्यवहारप्रक्रियेतून शिकत असते. "मूल घरात आईवडीलांचे ऐकत नाही पण, तेच मूल शाळेतल्या शिक्षाकाचे म्हणणे टाळत नाही", हे दिसते, ते यामुळेच.
जीवनातील यशामध्ये, Emotional intelligence (EI), Emotional quotient (EQ) व Emotional Intelligence Quotient (EIQ) यांचा मोठा वाटा असतो असे म्हणतात. या सगळ्या मोठ्या संज्ञांचे सार म्हणजे, "दुसर्याला विचारात घेऊन करायच्या यशस्वी कृती ठरवण्याची व त्या अंमलात आणण्याची क्षमता" असे आहे.
"चुकीचा हट्ट --> लाड --> अधिक चुकीचा हट्ट --> अधिक लाड" हे दुर्गुणचक्र (व्हिशस सर्कल) मूल मोठे होण्याअगोदर तोडायला शिकणे आणि त्याच्या जागी "चांगले वागणे --> प्रोत्साहनपर मान्यता --> अधिक चांगले वागणे --> अधिक प्रोत्साहनपर मान्यता" हे सद्गुणचक्र (व्हर्चुअल सर्कल) स्थापित करणे; ही पालकांमध्ये आवश्यक असलेली मूलभूत गरज आहे. मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी पालकांनी हे मुलाच्या, अगदी लहान वयापासून, प्रयत्नपूर्वक (प्रसंगी कठोर होऊन), मूल लहान असतानाच, करायला हवे. जसजसे वय वाढत जाते व मूल बाहेरच्या जगात वावरू लागते, तसतसे मुलाचे पालकांवरचे अवलंबन कमीकमी होते आणि या चक्रांवरील त्यांचा ताबा कमी कमी होतो आणि त्याअगोदरच्या अनुभवाचाच प्रभाव महत्वाचा होतो. तेव्हा वेळेतच, (अ) सगळेच लाड आणि किंवा अती लाड योग्य गोष्ट नाहीत आणि (आ) जीवनात नकार आणि अपयश नैसर्गिक असतात आणि ते पचवून पुढे जाणेही नैसर्गिकरित्या करता आले पाहिजे, हे मुलाच्या मनावर, रोजच्या छोट्यामोठ्या प्रसंगांचा उपयोग करून, बिंबवले पाहिजे.
या शिक्षणाचा पाया केवळ पालकच घालतात आणि त्याच्या अनुषंगाने मुले त्यावर मजले (घरातला आणि घराबाहेरचा व्यवहार) चढवत जातात. पाया दोषयुक्त (अती/चुकीचे लाड) असला तर वरची इमारतसुद्धा तशीच बनणार ! तेव्हा, या शिक्षणाची मूलभूत जबाबदारी केवळ आणि केवळ पालकांची असते... आणि ती सवय त्यांनी आपल्या विचार व कृतींनी मुलाच्या मनावर, लहानपणापासून, बिंबवायची असते. जसजसे वय वाढत जाते, तसतसे घरातील आणि बाहेरील अनुभवांनी वरचे मजले बनत जातात (मेंटल हार्ड कोडींग)... व ते चांगले असो की वाईट, तोडणे जास्त जास्त कठीण बनते.
याबाबतीत, अजून एक फार महत्वाचे असे की, वर वर दिसत नसली तरी जन्मापासूनच मुलांची निरिक्षणक्षमता प्रखर असते. पालकांची वागणूक व पाल्याला दिला जाणारा सल्ला यांच्यातली तफावत/लपवालपवी लहान मुलेही चटकन ओळखतात. तशी तफावत नसेल तरच पालकांच्या शब्दांना वजन प्राप्त होते आणि हे शिक्षण बहुदा आपोआप व विनाअडचण होत जाते.
******
माझे आई-वडील दोघेही प्राथमिक शिक्षक होते. पण, मी स्वतःहून विचारल्याशिवाय घरी कधी बाजूला बसून अभ्यास घेतला असे झाले नाही. गृहपाठ पालकांनी करणे ही संकल्पनाच नव्हती तेव्हा. किंबहुना, असे काही म्हटले असते तर खात्रीने पाठीत दोन-चार धपाटे बसले असते!
आमची परिस्थिती निम्न मध्यम वर्गीय होती. भाऊबंदकी नको म्हणून भाऊबंदकी सुरू होण्याअगोदरच वंशपरंपरागत संपत्तीवरचा हक्क दोघांनीही स्वतःहून सोडून दिलेला होता. तसे करणार आहोत असे आम्ही दोन भाऊ लहान असताना, आम्हाला सांगितले होते. थोडी जाण आली तेव्हा, आई-वडीलांनी एकत्र बसवून सांगितले की, "आपण काही श्रीमंत नाही. खाण्यापिण्याचे योग्य लाड होतील, योग्य तितके चांगले कपडे मिळतील. पण फुकाची चैन किंवा आमच्यानंतर वारसाने मिळण्यार्या डबोल्याचा विचारही करायची नाही. शिक्षणाकरिता मात्र जेवढा लागेल तितका खर्च करायला मागेपुढे पाहणार नाही, कर्ज काढूनही तो करू." त्या बोलण्याने माझ्या जीवनात गुरुमंत्राचे काम केले आहे. आज मी जो काही आहे, तो त्यामुळेच आहे. नशीबाने माझ्या मुलालाही तो विचार पटला आणि त्यानेही बोट दाखवायला जागा दिली नाही.
त्यापुढे जाऊन, शिक्षण व कौशल्याच्या महत्वासंबंधीचा, अजून एक धडा मी अनुभवाने शिकलो, तो असा... समजा शिक्षणावर खर्च करण्याऐवजी पालकांनी मुलाला मोठी रक्कम दिली... अगदी एक पन्नास लाख रुपये दिले असे समजूया. मुलाकडे योग्य शिक्षण, कौशल्य अथवा वैचारिक समज नसेल तर ते सगळे पैसे खर्च करून उडवून टाकायला फारसा वेळ लागणार नाही व नंतर पैसे कमवायची अक्कल आलेली नसल्याने निराशा येण्याचीच जास्त शक्यता आहे. याविरुद्ध, तोच पैसा पाल्याला योग्य शिक्षण व कौशल्य देण्यासाठी वापरला तर तितके किंवा जास्त पैसे पाल्य स्वतःच्या हिमतीवर कमवू शकेल. याशिवाय, जरी काही कारणाने त्याचे ते कमावलेले पैसे बुडाले तर, "ते मी माझ्या हिमतीवर मिळवले होते, मी परत कमवेन", हा आत्मविश्वास जीवनभर पाल्याच्या बरोबर असेल व पाल्य हा आत्मविश्वास पुढच्या पिढीकडे पोचवू शकेल... जे अत्यंत अमूल्य आहे.
20 Dec 2018 - 10:14 pm | जेडी
डॉक्टर तुमचा प्रतिसाद खूप आवडलाय . विचार करत आहे .
व्यावहारिक म्हणाल तर माझी मुलगी नको इतकी व्यावहारिक झालीय असे मला वाटते . जसे कि पॉकेटमनी साठवणे . मला जर कधी अडीनडीला लागले तर त्यावर इंटरेस्ट घेणे . घरचे कामही पैशाच्या मोबदल्यात करणे . पणत्या , कानातले , ग्रीटिंग्स , बुकमार्क असले करून विकणे . आईला तुझ्या ऑफिसमध्ये सर्व दाखव म्हणून सेल्समन करतो तशी आर्जवे करणे . मेहंदी अतिशय चान्गली काढते तर ती कोणच्याही हातावर फुकट न काढणे . शाळा कॉलेजच्या मुलांना जर्नल प्रोजेक्ट करून देणे आणि त्याबदल्यात पैसे घेणे . असले बरेच उद्योग करते . अगदी कामवाल्याना बोलणे , मी बोलले नाही तर मला रागावणे असले उद्योग करते . अगदी माझीही तुलना माझ्या एखाद्या ऑफिसमधल्या माझ्या वयाच्या बाईशी करून तिने कसे स्वतःला मेंटेन केलेय ... असले बरेच उद्योग करते .
21 Dec 2018 - 12:02 am | डॉ सुहास म्हात्रे
तुमचा लेख, आधिचे प्रतिसाद आणि विशेषतः हा वरचा प्रतिसाद वाचून, माझ्या अंदाजाप्रमाणे, "तुमची मुलगी हुशार आहे. मनात आणले तर काही चांगले करायची क्षमता तिच्यात आहे. पण, तिचा EQ तुमच्या EQवर मात करत आहे. ती तुम्हाला "मॅनेज" करत आहे. मऊ जमीन मिळाल्याने, कोपराने खणत आहे !" हे काळजी करण्याजोगे आहेच, पण ते सर्व तुम्हाला कौतुकाचे वाटत आहे (किंवा तुम्ही शरणागतीने हात टेकले आहेत) असे तुमच्या लिखाणात सतत भासत आहे, जे जास्त काळजी करण्याजोगे आहे.
यात, सर्वात काळजीची गोष्ट अशी की, असे करताना ती तिच्या स्वतःच्या भवितव्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे, हे ध्यानात येण्याची पोच तिच्यामध्ये नाही... तशीही ही पोच पालकांनी मुलांना शिकवायची गोष्ट आहे.
तिच्या भल्यासाठी, वरच्या प्रतिसादात लिहिलेले एक सत्य तिला स्पष्ट शब्दांत समजाऊन सांगणे जरूरीचे आहे... "आई-वडील तिला जन्मभर पुरणार/पोसणार नाहीत. एका वेळेनंतर तिला स्वतःचे आयुष्य स्वतःच्याच जिवावर कंठायचे आहे. ते चांगले असावे असे वाटत असेल तर त्यासाठी लागणारे योग्य शिक्षण व कौशल्य तिने आताच स्वतःहून मिळवायला हवे... तसे केले नाही तर, नंतर नाईलाजाने जास्त त्रासाचे खडतर आयुष्य भोगणे भाग पडेल. आणि तेव्हा खांद्यावर मान ठेऊन रडायला किंवा आधार द्यायला आई-वडील नसतील. तसेच, आई-वडिलांना जसे ती आता आपल्या हट्टांवर नाचवत आहे तसे इतर कोणी जन्मभर नाचायला तयार होणार नाही. याचा परिणाम ती एकटी पडण्यात होऊ शकतो."
माझ्या अंदाजाप्रमाणे, हे शांतपणे व स्पष्टपणे समजाऊन सांगितले तर, ते समजण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. तिला हे समजाऊन देणे जरूरीचे आहे की, तिच्या सद्याची अवस्था काही फार चांगली नाही. त्याकरिता ती स्वतःच्या स्थितीची तुलना तिच्या समवयस्क मुलींच्या आताच्या आणि आजपासून ५ वर्षांनंतरच्या शक्य असणार्या स्थितीबरोबर करून पाहू शकते. तिच्या सद्याच्या अवस्थेसाठी तिचे स्वतःचेच विचार व आचार जबाबदार आहेत आणि आजपासून ती काय करेल त्यानेच तिचे भवितव्य कसे असेल हे ठरेल. "तुम्ही (पक्षी : पालक) घोड्याला (पक्षी : पाल्याला) पाण्यापर्यंत नेऊ शकता (पक्षी : संधी मिळविण्यासाठी मदत करू शकता), पण पाणी पिणे-न पिणे व किती प्यायचे (पक्षी : संधीचे सोने करणे न करणे), हे केवळ घोड्याच्या विचारावर व कृतीवरच अवलंबून असते." हे सत्य तिला समजावणे आवश्यक आहे. हे तिने समजून घेतल्यानंतरही, तिच्यामध्ये होणारे सुरुवातीचे बदल तात्कालिक आणि/अथवा "ठीक आहे, करून बघू प्रकारचेच" असतील. त्यापुढे, पालकांनी त्यांच्या कृतीने (तिच्या अवास्तव मागण्यांपुढे न झुकणे व तिच्यातील सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देणे), ते बदल केवळ कायमच ठेवले पाहिजेत असे नाही तर, त्यांचे "व्हर्च्युअल सर्कल" बनवून, दर पुनरावृत्तीमागे अधिकाधिक सबळ बनवले पाहिजेत... ते सकारात्मक बदल नेहमीच्या सवयी बनेपर्यंत तरी. अन्यथा, गाडी परत पूर्वीच्याच दिशेने धावायला वेळ लागणार नाही.
असो. माझ्या मनात आलेले विचार तुमच्यापर्यंत पोचवले. पूर्ण परिस्थिती केवळ तुम्हालाच अवगत आहे, तिचा सारासार विचार करून तुम्ही योग्य कृतीचा निर्णय घेण्यास समर्थ आहातच. तुमच्या मुलीच्या उत्तम भवितव्यासाठी शुभेच्छा !
21 Dec 2018 - 1:26 am | डॉ सुहास म्हात्रे
व्यावहारिक म्हणाल तर माझी मुलगी नको इतकी व्यावहारिक झालीय असे मला वाटते . जसे कि पॉकेटमनी साठवणे . मला जर कधी अडीनडीला लागले तर त्यावर इंटरेस्ट घेणे . घरचे कामही पैशाच्या मोबदल्यात करणे . पणत्या , कानातले , ग्रीटिंग्स , बुकमार्क असले करून विकणे . आईला तुझ्या ऑफिसमध्ये सर्व दाखव म्हणून सेल्समन करतो तशी आर्जवे करणे . मेहंदी अतिशय चान्गली काढते तर ती कोणच्याही हातावर फुकट न काढणे . शाळा कॉलेजच्या मुलांना जर्नल प्रोजेक्ट करून देणे आणि त्याबदल्यात पैसे घेणे . असले बरेच उद्योग करते . अगदी कामवाल्याना बोलणे , मी बोलले नाही तर मला रागावणे असले उद्योग करते . अगदी माझीही तुलना माझ्या एखाद्या ऑफिसमधल्या माझ्या वयाच्या बाईशी करून तिने कसे स्वतःला मेंटेन केलेय ... असले बरेच उद्योग करते .
व्यावहारिकता म्हणजे, योग्य वेळी योग्य कृती निवडण्याची आणि ती अंमलात आणण्याची क्षमता. मुलीने अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर लहानसहान गोष्टी करून पैसे मिळवणे याला मी व्यावहारिकता न म्हणता, तिचा अभाव असे म्हणेन. कारण, यामुळे, तिचे शिक्षण व कौशल्य कमावण्यासाठीचा वेळ क्षुल्लक व गरज नसलेले पैसे कमावण्यात खर्च होत आहे व त्याने भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
माझे उदाहरण देऊन मी माझा मुद्दा जरासा विशद करतो. माझा मुलगा अमेरिकेत एमएस करायला गेला तेव्हा, "एमएस पूर्ण होईपर्यंत पैश्याकरिता काम करायचे नाही, सर्व खर्च मी करेन. पण, त्याने त्याचा पूर्ण वेळ उत्तम GPA मिळविण्यासाठी व पुढच्या करियरसाठी आवश्यक गोष्टींवरच खर्च करायचा" असा आमचा करार होता. तो त्याने कसोशीने पाळला आणि एक पाऊल पुढे जाऊन, एका वर्षाच्या तीन सेमेस्टर्समध्ये उत्तम GPA सकट एमएस पूर्ण केली. तिसर्या सेमेस्टरमध्ये आलेली नोकरीची ऑफर, आमच्या करारामुळे, त्याने मला न सांगता नाकारली. त्याच कंपनीने एमएस झाल्यावर परत संपर्क साधून ऑफर दिली, तेव्हाच त्याने मला ती कहाणी सांगीतली !
एमएस करताना, पैसे डोळ्यासमोर ठेवणे ही त्याची आवश्यकता नव्हती आणि तसे करून GPAवर प्रतिकूल परिणाम करून घेणे, ही कृती योग्यही झाली नसती. काम न केल्यामुळे मिळालेला वेळ वापरून त्याने २-५ वर्षे मुदतीचा अभ्यासक्रम एका वर्षात संपविल्याने राहण्याचा खर्च फक्त एका वर्षाचाच झाला (खर्च वाचला) आणि उत्तम GPAमुळे त्याला करियरमध्येही फायदा झाला व पुढे होत राहील. काम करून पैसे मिळविणे आणि त्यामुळे एमएसला २+ वर्षे घालवण्यापेक्षा हा पर्याय अनेक पटींनी फायद्याचा ठरला.
21 Dec 2018 - 4:04 am | गामा पैलवान
डॉक्टर सुहास म्हात्रे,
तुमच्या मुलाच्या बाबतीत शैक्षणिक लक्ष्य निश्चित झालेलं होतं. परंतु जेडीपुत्रीच्या बाबतीत कशाचाच पत्ता नाही.
मला वाटतं की शार्क माशाला जसा रक्ताचा वास येतो तसा वास जेडीपुत्रीस येतो. ही खरंतर खूप दिलासादायक गोष्ट आहे. फक्त आलेला पैसा नीटपणे कसा गुंतवावा हे तिला कळंत नाहीये. पैशाचा माग काढणे आणि त्यातनं धंदा उभारणे ही दोन भिन्न कौशल्यं आहेत. माझ्या मते तिला व्यवसाय कसा चालवावा याचं मार्गदर्शन झालेलं बरं पडावं. तीन वर्षांच्या पूर्ण एमबीए ची गरज नाही. ज्यामुळे विचाप्रक्रियेस गती मिळून लक्ष्यनिश्चिती होईल असा एखादा छोटासा कोर्स केलेला चालून जावा.
आ.न.,
-गा.पै.
21 Dec 2018 - 8:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
परंतु जेडीपुत्रीच्या बाबतीत कशाचाच पत्ता नाही.
हेच फार महत्वाचे आहे.
तिने विचारशक्ती दाखवून काही मोठा प्रकल्प हाती घेतलेला असता तर तिला चाईल्ड प्रॉडिजी समजून, तुम्ही म्हणता ते, योग्य असते. पण वस्तूस्थिती तशी नाही. शिक्षण व कौशल्य मिळविण्यात खर्च करायचा वेळ, पैसे मिळवण्याच्या (तेही अनियमित आणि थोडेसे) मागे लागून व्यर्थ चालला आहे. इतकेसे पैसे कुठेही गुंतवले तरी पुढील जीवन स्थिर होईल इतके किमान ध्येय साध्य होणे कठीण आहे.
चाईल्ड प्रॉडिजी सोडून इतर मुलांनी २५-२७ पर्यंत आपले मूलभूत (कमीत कमी बॅचलर्स) शिक्षण व कौशल्य मिळविणे आवश्यक असते. ३५ वर्षांनंतर कितीही मोठी डिग्री घेतली तरी, एज बार झाल्याने तिचा उपयोग होईलच असे नाही... झालाच तरी, लहान वयाची अनेक मुले तुमच्या पुढे गेलेली असतात... असा सर्वसाधारण अनुभव आहे.
20 Dec 2018 - 1:03 pm | पलाश
इथे लिहिलंत ते खरंच छान झालं. चर्चा चांगली चालू आहे. आमच्यावेळी अशी चर्चा वाचायला मिळाली असती तर जरा बरं झालं असतं. मोठं मूल या महिनाअखेरीस बत्तीस वर्षांचं होईल म्हणजे पालक म्हणून माझं तेवढं वय आहे. समस्या प्रत्येक बालक-पालक नात्यात येत असतात. समस्या संपते. आपण बाहेर पडतो तेव्हा आणखी बळकट व खंबीर झालेलो असतो. मार्ग नक्की निघेल.
माझ्यामते मुलांना सगळं आपापलं काम करता येणं गरजेचं आहे. हातांनी रोजची सगळी कामं करता येणं हे एक आवश्यक कौशल्य आहे. स्पर्धेचं युग म्हणता म्हणता मुलं हे कौशल्य विसरत चालली आहेत हे मी आजूबाजूला पहाते आहे. अशी कुशल मुलं आव्हानांना चांगली सामोरी जातात, आनंदी असतात हेही एक निरीक्षण आहे.
"तू प्राॅब्लेम नीट ऐकून घेत जा. मला कोणीतरी ऐकायला हवं असतं. ती माझी गरज आहे. मधेच थांबवून समस्या सोडवायची घाई करत जाऊ नकोस. ती सुटेल. तू फक्त ऐक थोडा वेळ." हा अगदी अलिकडेच धाकटीकडून मिळालेला अहेर.
आपण असं करतो?? .हे सुरवातीला नाही पण नंतर पटलं. ...न ऐकण्याची चूक आता सुधारते आहे. :)
20 Dec 2018 - 1:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
"तू प्राॅब्लेम नीट ऐकून घेत जा. मला कोणीतरी ऐकायला हवं असतं. ती माझी गरज आहे. मधेच थांबवून समस्या सोडवायची घाई करत जाऊ नकोस. ती सुटेल. तू फक्त ऐक थोडा वेळ." हा अगदी अलिकडेच धाकटीकडून मिळालेला अहेर.
तुम्ही नशीबवान आहात. तुमची मुलगी प्रगल्भ आहे !
20 Dec 2018 - 1:49 pm | पिलीयन रायडर
हे वाक्य फार आवडलं!
एका 80 वर्षांच्या आजींनी आपल्या साठीच्या मुलाला तो कार घेऊन परगावी जाताना विचारलं होतं की "जाशील ना रे बाबा नीट, की मी येउ सोबत?". त्याची आठवण आली! कितीही मोठं झालं तरी ते मूलच!
20 Dec 2018 - 1:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
साठी म्हणजे दुसरं बालपण म्हणतात ना, म्हणून विचारलं असेल ! :)
20 Dec 2018 - 2:42 pm | मनिमौ
खूप आवडला प्रतिसाद.
मुलं जेव्हा पाच सहा वर्षाची होतात तेव्हाच अवास्तव मागच्यांना
प्रेमाने पण ठामपणे नकार दिला पाहीजे.
पिअर प्रेशर हा अंत्यत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणी हे प्रेशर अगदी साध्या गोष्टी पासून सुरू होते.
प्राथमिक शाळेत तर वेगळे कंपास खोडरबर अशा वस्तू पण मला तिच्यासारखी वस्तू हवीच आहे हे ट्रिगर करतात.
वय वाढेल तस या गोष्टीची जागा सायकली;मोबाईल फोन ई वस्तू घेतात.
काही हट्टांना वेळीच नाही म्हणणे आणी आपली आर्थिक परिस्थिती मुलांना समजावून सांगणे हे बहुतेक वेळा कामी येत
20 Dec 2018 - 5:26 pm | सस्नेह
धागा आणि प्रतिसाद यातून उत्तम विचारमंथन सुरु आहे.
जेडी यांच्या लेखनातून काही बाबी जाणवल्या
१. मुलगी व आई यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. परंतु या संवादातून मुलीला घराच्या आर्थिक, व्यावहारिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीची योग्य जाणीव दिली गेली नाही. संवाद असेल तर ती अजूनही देता येईल. ही प्रेमातूनच येते. एकदा ही जाणीव मनात खोल रुजली की मुलांचा हट्टीपणा आपोआप मावळतो असा अनुभव आहे.
२. मुलीला आर्ट्सला जायचे होते तर तिच्या इच्छेचा आदर करायला हवा होता. मग जितके गुण आहेत त्याप्रमाणे जे मिळेल त्या कॉलेजला प्रवेश घेणे अपरिहार्य आहे. हे तिला समजण्यात अडचण कसली ?
३. केवळ पुण्यातीलच कॉलेजेस हवीत असे असण्याची गरज नाही. जवळपासच्या गाव/शहरातील कॉलेजेससुद्धा शैक्षणिकदृष्ट्या उत्तम आहेत.
४. बॉयफ्रेंड वगैरे संस्कृती आवडत नसेल तर पुण्याबाहेरील कॉलेजमध्ये नक्कीच तसं वातावरण मिळू शकलं असतं.
एकूणच असं वाटतं की टीन एजच्या मुलांवर काही लादता कामा नये. आजची पिढी आपल्यापेक्षा स्मार्ट आहे आणि त्यांना सोशल मिडियामुळे आजूबाजूच्या वास्तवाची नको इतकी तीव्र जाणीव आहे. तेव्हा आपण पालकांनीही त्यांच्या अडचणी मानसिकता नीट समजून त्यांना पर्याय दाखवावे.
जेडी ताई , कृपया टीका असे समजू नये. काही वर्षांपूर्वी याच स्टेजमधून गेल्यामुळे रिलेट होऊ शकले आणि कहो सांगावेसे वाटले, इतकेच.
20 Dec 2018 - 10:16 pm | जेडी
प्रतिसादासाठी धन्यवाद . आम्ही पुण्यातच राहत असल्याने पुण्याच्या बाहेर जाणायत पॉईंट नाही वाटला आणि हे सर्व अकरावीची ऍडमिशन घेतल्यावर चालू झाल्याने , आदीच पुण्याच्या बाहेरचा विचार करणे शक्य नव्हते
20 Dec 2018 - 6:53 pm | शाम भागवत
१. आपल वागण आणि बोलण यात अंतर पडत नसेल तर मुल आपल्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवतात असा माझा अनुभव आहे.
२. आपण जर प्रत्येक बाबतीत आग्रही रहात असू तर मुलही हळूहळू तसच करायला लागतात.
३. बऱ्याच वेळेस मुल भितीपोटी खोट बोलतात. पालकांची भिती न वाटण महत्वाच.
४. घरचे संस्कार बळकट होण्यासाठी त्या संस्कारामागची कारणपरंपरा सांगता आली पाहीजे. ती माहीत नसेल तर तसे स्पष्ट केले पाहीजे.
५. वय वर्षे १२-१५ पर्यंत एखादी शंका पालकांच्या ऐवजी मीत्रमैत्रीणींना विचारली जात असेल तर तो धोक्याचा संदेश समजला पाहिजे.
20 Dec 2018 - 7:53 pm | गामा पैलवान
पिराताई,
सवाष्णींच्या कळपात कुमारिका अवघडायचीच की.
हा मुद्दा उद्भवण्याचं कारण म्हणजे बॉयफ्रेंड असल्यावर मुली थोड्या वेगळ्या वागतात. हे जे वेगळं वर्तन आहे त्याची संगती लावणं कुमारिकेस कठीण जातंय. त्यामुळे तिला न्यूनगंड येत कामा नये इतकंच तिच्या मनावर ठसवलं गेलं पाहिजे. स्वत:चा बॉयफ्रेंड करणे हा सद्य परिस्थितीवर उपाय नव्हे. स्वत:त काही न्यून नाही हे तिला पटलं पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
21 Dec 2018 - 9:34 am | अंतरा आनंद
जेडी,
(१) क्लासच्या कुबड्या न घेता स्वतहून अभ्यास करायची सवय तुमच्या मुलीला आहे.
(२) 12वी पर्यंत सायन्स घेतल्याने तिला बरेच ऑप्शन्स ओपन आहेत
(३) बॉयफ्रेंडबाबत विचार स्पष्ट असल्याने कोणत्याही भावनिक गुंत्यात ती अडकलेली नाही
(४) तुमच्याशी असलेल्या तिच्या नात्यात मोकळेपणा आहे
(५) तिला वाचनाची आवड आहे, कला अवगत आहे.
(६) तुम्हाला नको तितकी वाटत असलं तरी ती व्यावहारिक आहे. (तिला फारश्या मित्र-मैत्रिणी नाहीत या पार्श्वभूमीवर ती आपल्यातल्या कलेचा उपयोग कोणाला संतुष्ट करण्यासाठी करून वेळ घालवत नाही. आपल्या कलेचं आणि वेळेचं रुपांतर पैशात कसं करायचं ही अजून एक दुर्मिळ कला तिच्याकडे आहे)
या जमेच्या बाजू आहेत. तिचं जे काही चाललं आहे त्यातून ती नक्की मार्ग काढेल. तुम्ही फकत सोबत रहा. काय पर्याय आहेत, त्यातले खरे किती उपयुकत याची माहिती आजूबाजूकडूनही काढत रहा. तिला काय आवडेल, त्याची व्यावहारिकता यावर संवाद साधत रहा. प्रसंगी तिचं मत सपशेल चुकीच वा स्वप्नाळू वाटलं तरी थेट आणि ताबडतोब मोडीत काढू नका. (याचा परिणाम म्हणजे ते मत दृढ होतं) वर डॉ. खरेंनी म्हटल्याप्रमाणे उपदेशाचे बोल दोन मिनिटात संपवा.
मी तुमच्याच नावेतली प्रवासी आहे आणि हे करायला मी ही शिकतेय. माझी मुलगी गेल्या वर्षी बारावी झाली.
(१) नववी-दहावी - आर्टस घेऊन लिग्विंस्टिक्स करणार
(२) दहावी – मला बॉटनी-झुओ खूप आवडतं. पण मी मेडिकल, पॅरामेडिकल नाही करणार. बीएससी करेन
(३) अकरावी – सहामाहीनंतरब
\\
लिहीते नन्तर
21 Dec 2018 - 10:33 am | सुबोध खरे
आजकाल बॉय फ्रेंड असणे हे नुसते फॅशनच नव्हे तर आवश्यक झाले आहे अशी स्थिती आहे.
माझी मुलगी नववी / दहावीत असताना तिची पण मनस्थिती अशीच होती. नुसतंच बॉय फ्रेंड असणे यात गैर काय आहे असं नव्हे तर बॉय फ्रेंड असलाच पाहिजे अशी काही तरी विचित्र मनस्थिती होती. त्यामुळे तिची एका मुलाशी वाजवीपेक्षा जरा जास्तच मैत्री "होत" होती. (दुर्दैवाने या मुलाची आणि त्याच्या आईची मनोवृत्ती अशी होती कि मुलाला बऱ्याच मैत्रिणी असणे म्हणजे मुलगा स्मार्ट आहे पण मुलीला मात्र मित्र असू नये. आणि आमच्याकडे "पैसे आहेत" मग मुलाला गर्लफ्रेंड असणारच)
मी शांतपणे तिला काही गोष्टी समजावल्या--
१ ) पहिली गोष्ट म्हणजे बॉय फ्रेंड असणे यात काही चूक नाही हे मी मान्य केले. (कारण ते तुम्हाला पटत असले/ नसले तरी ती चूकच आहे हे तुम्ही ठसवून सांगितले तर तुमचा संवाद बंदच होतो)
२) तिला एक गोष्ट समजावून सांगितले कि अशा गोष्टीत मुलींची भावनात्मक गुंतवणूक(emotional investment) मुलांपेक्षा जास्त असते. येतेच मी मधू सप्रे आणि मिलिंद सोमण यांच्या ब्रेक अप नंतर मधू सप्रे या नैराश्याची शिकार झाल्या आणि मिलिंद सोमण आपल्या करियर मध्ये पुढे गेले याबद्दल विस्ताराने सांगितले.
३) जवळचा मित्र असणे हि अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु तो मुलगाच असला पाहिजे असे नव्हे तर एखादी चांगली सरळ मनाची मुलगी असू शकते हे हि समजावून सांगितले
४) आयुष्याच्या या टप्प्यावर मैत्री असणे यापेक्षा शिक्षण जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे मैत्री केली तरी त्यासाठी आपले शिक्षण "पणाला लावणे" यासारखा मूर्खपणा नाही. तेंव्हा कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे (priority) हे आपल्याला समजले पाहिजे. तेंव्हा पूर्ण वेळ केवळ आपल्या बॉय फ्रेंड बद्दल विचार करत बसून मुली आपले नुकसान कसे करून घेतात हे सांगितले.
५) प्रेम करणे अजिबात चूक नाही पण टिनपाट मुलाबरोबर प्रेम करणे आयुष्यासाठी महागात पडू शकते. याचे एक नातेवाईकाच्या मुलीचे उदाहरण समोर ठेवले.
यानंतर तिला त्या मुलाच्या आणि त्याच्या आईच्या "पुरुषप्रधान" मनोवृत्तीबद्दल हळूच सांगितले.(you are just an option for them)
६) तुझा प्रेमविवाह झाला तर मला आनंदच होईल पण मुलगा मानसिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सुसंस्कृत असला पाहिजे, बापाच्या पैशाचा माज असणारा नको हेही समजावले.
७) शेवटी हे तुझं आयुष्य आहे आणि आई बाप आयुष्याला पुरत नाहीत. भावनेच्या आहारी जाऊन वेडपट निर्णय घेतला तर त्याचे परिणाम दीर्घ कालपर्यंत भोगावे लागतील हे हि समजावून सांगितले.
८) स्मार्ट दिसण्यासाठी/असण्यासाठी किंवा केवळ "इन थिंग "म्हणून "बॉयफ्रेंड" असणे आवश्यक नाही. कारण टिनपाट मुलींना पण बॉयफ्रेंड असतो. एखादा चांगला मुलगा ज्याच्याशी काही "वैचारिक" पातळीवर संवाद होऊ शकेल असा मुलगा बॉयफ्रेन्ड असावा. केवळ पुरुष आहे म्हणून बॉय फ्रेंड असणे हे जनावरांच्या पातळीवरचे (शारीरिक पातळीवरचे) आहे.
९) वरील सर्व मुद्दे एका वेळेस एकच मुद्दा आणि तो सुद्धा दीड ते दोन मिनिटात संपवणे कारण जास्त बोलत राहिले तर मुले चक्क मनाची कवाडे बंद(shut off) करतात.
१०) बायकोला गप्प बसण्यासाठी फार वेळा सांगायला लागले होते. (बायका भावनेच्या आहारी फार पटकन जातात पण त्याचा परिणाम उलट होतो असा अनुभव आहे) तेंव्हा थंड डोक्यानेच काम करावे लागते.
हि प्रक्रिया ६-७ महिने चालली होती. सुदैवाने बाप सांगतो त्यात काहीतरी तथ्य आहे हे समजू लागल्यावर तिच्या वृत्तीत बदल झाला आणि हे प्रकरण पुढे गेलेच नाही.
यानंतर मुलीला बॉयफ्रेंड असलाच पाहिजे हि संकल्पना भंपक आहे हे पटायला लागले. यानंतर अनेक मुलांशीआणि मुलींशी तिने निखळ मैत्री केली ती मुले घरीही येत असत / येतात.
तारुण्यातील मुलगा किंवा मुलगी एखाद्या वेगवान एक्स्प्रेस गाडीसारखे असतात. एकदम "वळवायचा" प्रयत्न केल्यास मोठा अपघात होऊ शकतो एवढेच लक्षात ठेवावे.
21 Dec 2018 - 12:17 pm | यशोधरा
परफेक्ट.
21 Dec 2018 - 12:47 pm | गवि
अत्यंत महत्वाचा दुर्मिळ फॅक्टर.
21 Dec 2018 - 7:10 pm | सुबोध खरे
मुलांना मी मोठा आहे म्हणून तुम्ही माझे ऐकले पाहिजे हे फारसे पटत नाही. (याचे "न बोललेले" उत्तर असे असू शकते कि तुम्ही माझ्यापेक्षा काही वर्षे अगोदर जन्माला आलात त्यात तुमचे काय कर्तृत्व?)
पण "कळकळीने" सांगितले कि मला तुमच्या पेक्षा चुका करण्याचा आणि त्यातून शिकण्याचा जास्त अनुभव आहे. (I HAVE MORE EXPERIENCE AT BEING WRONG THAN YOU) तर ते "कुठेतरी" पटते "भले ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसले नाही तरी". आणि मुले निदान तुम्ही काय बोलता आहेत त्याचा विचार करू लागतात. विचार केल्यावर बाप सांगतो त्यात काही तरी तथ्य आहे असे जाणवले तर अजून विचार होऊ शकतो
खडकावर एकदम भरपूर पाणी ओतले तर त्यावर परिणाम होताच नाही आणि काही काळाने खडक "कोरडा" होतो.
याउलट थेम्ब थेम्ब ठिबकत ठेवला तर काही काळाने खडक सुद्धा दुभंगतो.
21 Dec 2018 - 7:29 pm | स्रुजा
वाह !
21 Dec 2018 - 8:01 pm | गवि
लाख बोललात. हेच नेहमी वाटतं.
21 Dec 2018 - 8:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
लाखमोलाचे शब्द !
21 Dec 2018 - 1:04 pm | विनिता००२
माझ्या मुलाच्या बाबतीत पण असे झालेले! त्याच्या सर्व मित्र मैत्रींनींना घराचे दरवाजे उघडे असल्याने लपून छपून घराबाहेर फारसे काही घडायला वाव उरला नाही.
मुलाला मी हेच सांगितलेले की शिकायच्या वयात शिकून घे. पैसे नंतर पुढे कमवायचेच आहेत.
21 Dec 2018 - 6:31 pm | गामा पैलवान
आवो खरे डागदर, आमास्नी येक सांगा बरं. तुमी अंगासंगे मनाचाबी यक्स रे काडत आसता व्हय?
आ.न.,
-गा.पै.
21 Dec 2018 - 10:23 pm | जेडी
अतिशय महत्वपूर्ण प्रतिसाद , डॉक्टर तुमचे मनापासून आभार