मला भेटलेले रुग्ण - १७
https://www.misalpav.com/node/42846
अहो डाॅक्टर तुम्ही सांगीतलं होतं की प्रत्येक वेळेस अपॉईन्टमेन्ट घेऊनच या , पण तुमचा फोनच लागत नाहीये ; परवा पासून किमान १५ वेळा तरी प्रयत्न केला .......
मी विचारलं नेमका कोणता फोन नंबर लावताय दाखवा बरं .... मग पेशंटनी नंबर दाखवला आणि मी एवढच बोलू शकलो की हा नंबर कधीच लागणार नाहीये !! ....
कारण हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....
_/\_....
__________________•______________
हा ७ वर्षाचा मुलगा माझा पेशंट आहे, आई बाबांसोबत नियमित येतो. मागच्या भेटीत विचारलं त्याला काही व्यायाम करतोस का ? तर आई अगदी हिरीरीनं म्हणाली डाॅक्टर तुम्हीच सांगा बरं काहीच व्यायाम म्हणून काहीच करत नाही बघा हा....
.... मग त्याच्या पालकांना विचारलं मी तुम्ही करता का काही व्यायाम ? त्यावर दोघांनीही नकारार्थी माना डोलावल्या ...
जर तुम्हीच व्यायाम नाही करत तर मुलाकडून का अपेक्षा ठेवता ? संस्कार घडवावे लागतात ते आचरणातूनच , उपदेश करून होत नाहीत ....
फिस्स् करून मुलगा हसला ......
ह्या प्रसंगातली गंमत सोडली तर आपल्या देशाची अवस्था अजिबात वेगळी नाहीये . १% लोक सुद्धा नियमीत व्यायाम करत नाहीत आणि जे करतात त्यातले बहूतांश लोकं रिटायर झालेले असतात किंवा बिपी /डायबिटीस झाल्यानंतर डाॅक्टरांनी सांगीतलं म्हणून करतात .
__________________•______________
ह्या बाई पहिल्यांदाच दाखवायला आल्या होत्या . आलेल्या प्रत्येक पेशंटचं नाव , वय आणि पत्ता लिहून घेतल्यावरच मी पुढची हिस्ट्री घ्यायला सुरवात करतो...
बाईंना वय विचारल्यावर ....३५ वर्षे !!!त्यांनी ईतक्या कॉन्फिडन्टली सांगीतलं की मला हसू आवरलंच नाही .... :)))
मी हसणं आवरत म्हणालो अहो मावशी तुमचं किमान ५५-६० दरम्यान वय असावं तुमचा मुलगा पस्तिशीचा दिसतोय... ह्यावर त्यांचा मुलगा पण चिडून म्हणाला अग ३५ वर्ष !! मीच तर ३६ चा आहे .....
पुढे हिस्ट्री घेतांना खोकला आणि बेडका (कफ) आहे म्हणल्यावर कफ कोणत्या रंगाचा आहे हे विचारलं तर पेशंट म्हणते निळा !!....
सहसा हिरवट किंवा पिवळसर कफ म्हणजे ईन्फेक्शन, लाल म्हणजे बहूतांशी रक्तमिश्रीत पण निळा म्हणजे सायनाईडमुळे किंवा लहान मुलं खेळतांना पेनाची शाई तोंडात घालतात तेव्हा ....
आता मात्र मुलगा चिडला ... निळा रंग असतो का कुठे कफाचा ? ....
मी त्याला शांत करत पेशंटला विचारलं की आकाशाचा रंग निळा असतो तसा निळा रंग का ? ... त्यावर पेशंट नाही म्हणाली आणि हिरवा रंग असावा असं सांगितलं.....
हे छोटेसे पण मजेदार प्रसंग कायम स्मरणात राहून जातात ;))
_________________॰_______________
Book traversal links for मला भेटलेले रुग्ण - १७
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
मस्त आणि हलकंफुलकं.. सही.
...
+१
:-)
:D
मस्त !
डाॅक्टर तुम्हीच सांगा बरं
हो. अगदी अगदी.
हे कधीच स्वीकारलं जाणार नाही
तुमचं म्हणण पटतंय....
कित्येकदा
हेच तर माझं म्हणणं आहे ....
तुमचं म्हणणं पटतंय, पण.....
खरय...
लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी
बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या
पत्ता द्या. =))
अरे देवा, म्हणजे हा पण येणार
:D
ह्यावरुन एक किस्सा आठवला....
=)) =)) =))
नेहमी प्रमाणेच सुंदर...
_/\_
आखूड नसतात.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.
मजेशीर अनुभव
मस्त किस्से
१. व्यायामाबद्दल ....
कांदळकर साहेब
>> मीच तर ३६ चा आहे :) :)
एक्दम बरोबर .....
काही भाष्य
माझ्या सासूबाई पण अशाच;
माझ्या पेशंटबाबतीत ...
अगतिक पालकांची दुसरी बाजू
तसं नाहीये
माझं एकंदरीत मत
अवांतर : एक कोडं
हेक्सॅडेसिमल??
.
डॉक.. भारी लिहिताय.. अजून