सात वेळा मेलेला माणूस "The Dead Man"
खेळ.खेळ म्हणजे खेळच.मग तो कुठलाही असो.आजकाल एक नवा ट्रेंड चाललाय,काय तर,90'Kids.तसा मी काही नव्वदच्या दशकातील नाही.आणि नसलो तरी मी काही दुर्देवीही नाही,कारण माझा जन्म तो २००० सालचा,त्यामुळे संगत होती ती नव्वदच्याच दशकाची.
तो काळही तसाच होता.T.V.नावाचा प्रकार तितकासा सगळ्यांकडे नसायचा.त्यात त्यावेळच्या रामानंद सागरांच्या रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकांनी अगदी दशक उलटल्यानंतरही आपलं वर्चस्व प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं होतं,आणि त्यामुळे ज्याघरी T.V.त्याघरी संध्याकाळी गर्दी हे ठरलेलं.आणि दुसरं काय तर?क्रिकेट,त्यावेळी क्रिकेट म्हणलं की सचिन अाणि सचिन म्हणलं की क्रिकेट,एवढंच गणित.आणि आमचं काहीतरी वेगळंच असायचं,शक्तिमान,सोनपरी आणि बरंच काही.
पण जरा कळायला लागलं आणि एक नवा शब्द कानावर पडला आणि तोच शब्द जिभेवरु रेंगाळायचा WWF.होय आज जरी ते WWE असलं तरी तेव्हा ते WWF च होतं.अगदी भांडणं करायची म्हटली तरी चल WWF खेळू,हेच बोलायचं.
या WWF च वेड लागलं ते काही थोडक्याच खेळाडूंमुळे.त्यातलाच एक "The Undertaker".काहीसा वेगळाच दबदबा होता या माणसाचा.नुकतंच या माणसाने त्यावेळचं WWF आणि आत्ताच्या WWE ला रामराम ठोकला.३० वर्षांची कारकिर्द संपली.माझ्या वयापेक्षाही मोठी कारकिर्द होती या पठ्ठयाची.खरतर तितकीशी माहिती आजही नाही याबद्दल,पण या माणसाची चाहत कधी लागली ते कळालच नाही,पण का लागली,त्याला मात्र एकच उत्तर अफवा.होय 'अफवा'.
काय तर म्हणे,हा माणूस सात वेळा मरुन जिवंत झालाय.एकदा तर म्हणे याला मेला असा समजून पुरुन टाकण्यात आला होता,मग याच्या बायकोने त्या जागेवर जाऊन पूजा केली म्हणजे त्यांच्या परंपरेनुसार.तब्बल सहा दिवस पूजा केल्यानंतर सातव्या दिवशी याने जमिनीतून हात बाहेर काढला,मग याला वर खेचून घेतले.एकदा तर असंही ऐकलंय की या माणसाची जीभ कापली गेली होती आणि या माणसाने शेळीची वा अन्य कुठल्यातरी प्राण्याची जीभ लावली.
एकदा तर म्हणे हा माणूस सातवेळा मेलाय.एकदा तो जमीन फाडून वर आला,दुसर्यांदा वेगळंच काही,अश्या तब्बल सात पद्धती.पण एक मात्र नक्की त्यावेळी हे अगदीच खरं वाटायचं,कारण त्याला फक्त पडद्यावर बघूनच एवढी भिती वाटायची,की कधी कधी तर कोणाचे अंगवस्त्र अोले व्हायचे.कारण हा माणूस अंधारातून यायचा,नेमकं याला एवढ्या अंधारात दिसतं कसं?हे देखील एक आश्चर्यच.कधी हा रिंगणाच्या खालून अचानकच प्रकट व्हायचा,कधी रिंगणात थेट कोणाच्यातरी मागे असायचा.नेमका हा काय प्रकार ते आजही कोडंच.
कधी पुण्या-मुंबईहून नातेवाईक यायचे,त्यावेळी त्यांची मुलं पत्ते घेऊन यायची,चक्क WWF च्या खेळाडूंची.ती पत्ते खेळताना हा अंड्या म्हणजेच अंडरटेकर आमचा हुकमाचा इक्का ठरायचा.
साधारण आठवणीतला अंडरटेकर म्हणजे त्याच्याबद्दलच्या अफवा.तसा तो आजही "Dead Man" म्हणूनच अोळखला जातो.मी तर माझ्या आठवणीत त्याला तब्बल सात वेळा मारलाय.आणि तुम्ही?
ज्याला पडद्यावर बघून आजपण भिती वाटते,असा हा पठ्ठया.सातवेळा मरुन जिवंत झालेला हा एकमेव अवलिया."The Dead Man Undertaker."
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
WWF खरं असतं?
आधी ते खरं वाटायचं,पण मग नंतर
१००% सर्व काही नकली असते.
पुरुष मंडळीचा मुर्खपणा असं
अंडरटेकर, रेमिस्टीरीओ, ट्रीपल
किती नावं घ्यायची अजून!
त्या खलीने
होय,शेवटी अफवाच.त्या उघड
ब्रेट
व्वा!एकदातरी हे पुस्तक वाचलेच
ते व्व्फ वाले पत्ते खुप
ते अंगवस्त्र अोले होणे म्हणजे
WWE
होय,आम्ही तर कधीकधी डंबेल्स
अंगवस्त्र अोले व्हायचे???
मनापासून धन्यवाद!