✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

<रडारड>

प
पिवळा डांबिस यांनी
गुरुवार, 09/13/2012 - 01:19  ·  लेख
लेख
कच्चा माल "ए जपून रे!" "काय जपून? अशीच मजा येते!" "म्हणून काय इतकी तिखट भाषा वापरायची?" "नाही तर काय? ही काय चारोळी आहे का?" "ही चारोळी नाहीये... मात्र तू गुंड आहेस हे नक्की!" "आणि तुम्ही माझे काका" "पुरे! लेखणी चालवताना जास्त तिखटपणा नको, नाही तर फटके देईन मी व्यनितून!" "ब्वॉर्र! राह्यलं! पण तुम्ही जरा अजून नवे धागे काढा ना. मस्त सागुती बनवू नव्या मटणाची." "नक्को... आधीच तू सारखे स्वाक्षरीतून धक्के मारतो आहेस ते काय कळत नाहीयेत का मला?" "हा हा हा" "जरा हळू रे... खूप खट्याळपणा वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... प्रस्थापितांबरोबर तरी जपून प्लीज!" "काही नाही होत हो... माझा कंट्रोल................. आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . "बघ तरी तुला सांगत होतो... जपून, जपून." "होय हो! ओव्हरकॉन्फिडन्समधे गेलो मी." "आता समजून काय उपयोग! त्या दिवशी तुला समजलं असतं तर आज हे असं रोज याच वेळी याच मिपावर येऊन तुझी वाट बघत बसायची अंतहीन पाळी नसती आली माझ्यावर, टार्‍या!!!!" :(
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
विडंबन
फलज्योतिष
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
8813 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

=))

विकास
गुरुवार, 09/13/2012 - 01:24 नवीन
=)) Image removed.
  • Log in or register to post comments

खतर्नाक

प्रभो
गुरुवार, 09/13/2012 - 01:27 नवीन
खतर्नाक :)
  • Log in or register to post comments

जुनी स्कॉच कशी खतरनाक होती,

बॅटमॅन
गुरुवार, 09/13/2012 - 01:29 नवीन
जुनी स्कॉच कशी खतरनाक होती, हे कळले. :) जय पिडांकाका. (टीटोटलर परंतु रसास्वादभोक्ता) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

(No subject)

इनिगोय
Fri, 09/14/2012 - 12:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ही पण!

Nile
गुरुवार, 09/13/2012 - 01:36 नवीन
ही पण ष्टोरी वळकीची वाटतीए! फक्त 'अंताचा' भाग सोडून. ;-)
  • Log in or register to post comments

दुधापेक्षा दुधावरची साय जास्त

गणपा
गुरुवार, 09/13/2012 - 03:02 नवीन
दुधापेक्षा दुधावरची साय जास्त लज्जतदार. ;)
  • Log in or register to post comments

मस्त...

राजेश घासकडवी
गुरुवार, 09/13/2012 - 03:59 नवीन
विडंबन भारी जमलेलं आहे. टाऱ्या गेल्यापासून मिपा थोडं बदललं हे मान्यच करायला हवं. (एके काळी सागुतीच काय, खिमा झालेला) व्यर्थेश कळबडवी
  • Log in or register to post comments

व्यर्थेश कळबडवी

टिवटिव
गुरुवार, 09/13/2012 - 10:02 नवीन
अगदि टारझन स्टाईल स्वाक्षरि...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

झकास ... .. व्यनितून फटके

भडकमकर मास्तर
गुरुवार, 09/13/2012 - 04:01 नवीन
झकास ... .. व्यनितून फटके देइन मस्तच.. ;)
  • Log in or register to post comments

धडाधड

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/13/2012 - 06:21 नवीन
धडाधड Image removed.
  • Log in or register to post comments

हे जास्त भावलं - याद ना जाये

५० फक्त
गुरुवार, 09/13/2012 - 07:33 नवीन
हे जास्त भावलं - याद ना जाये बिते दिनोंकी.............
  • Log in or register to post comments

क्लासच

सहज
गुरुवार, 09/13/2012 - 08:17 नवीन
सुडंबनच!!!
  • Log in or register to post comments

=))

मूकवाचक
गुरुवार, 09/13/2012 - 09:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments

एकमेकांवरी 'उधळले', गेले ते दिन गेले

नंदन
गुरुवार, 09/13/2012 - 10:38 नवीन
काही जुन्या दंग्यांची आठवण ताजी झाली...
  • Log in or register to post comments

तरीच...

श्रावण मोडक
गुरुवार, 09/13/2012 - 12:04 नवीन
तरीच हल्ली मला पश्चिम किनाऱ्याकडून सारखे 'दिन गेले भजनाविन सारे...' हे पद सारखं ऐकू येतंय राव. ;-) त्यात पश्चिम ही मुक्तीची दिशा (असं आमचे बाळासाहेब (मंगेश्शकर) सांगून गेले आहेत). म्हणजे जे ऐकू येतंय ते खरंच असावं. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

खी: खी: खी:

नंदन
गुरुवार, 09/13/2012 - 12:53 नवीन
पश्चिम ही मुक्तीची किंवा उन्मुक्तीची दिशा हे खरंच. पण यात काही आमचा 'वेस्टे'ड इंट्रेष्ट मुदलातच (किंवा इंट्रेष्ट असल्याने मुदलावर) नाही हो :).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

साक्षीदार

श्रावण मोडक
गुरुवार, 09/13/2012 - 13:03 नवीन
साक्षीदाराचा नेहमीच बळी जात असतो यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

ह्यॅ:

रमताराम
गुरुवार, 09/13/2012 - 21:34 नवीन
हा बाबा माणसांसारखा का बोलत नाही? हे असं अव्यक्तातून व्यक्त होण्याची काय गरज?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

माणूस?

Nile
गुरुवार, 09/13/2012 - 21:46 नवीन
तो माणूस आहे का पण? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

-

अमोल केळकर
गुरुवार, 09/13/2012 - 10:45 नवीन
:)
  • Log in or register to post comments

भयकथा आवडली. श्रद्धांजली!

कवटी
गुरुवार, 09/13/2012 - 14:43 नवीन
भयकथा आवडली. श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments

=)) दंडवत! आणि अक्षरशः

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 09/13/2012 - 14:45 नवीन
=)) दंडवत! आणि अक्षरशः शेवटच्या शब्दापर्यंत सहमत! ;) *** टार्‍याचा संदर्भ असल्यामुळे रडारड हे नाव शोभत नाही हां... तोडातोड (दात, हाडे इ.) किंवा फोडाफोड असं काही तरी नाव पाहिजे ब्वॉ! ;)
  • Log in or register to post comments

आणखी

श्रावण मोडक
गुरुवार, 09/13/2012 - 14:59 नवीन
पडापड, किंवा धडपड?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!

पैसा
गुरुवार, 09/13/2012 - 21:14 नवीन
पिडां स्पेशल! "उघड्या पुन्हा जाहल्या जखमा उरातल्या" ची आठवण झाली. पण टारबाचा संदर्भ असल्यामुळे रडारड ही टारबाची नाही तर त्याचे टार्गेट ठरलेल्यांची असावी असा संशय आहे! ० कैसा ०
  • Log in or register to post comments

चूssक चूsssक

Nile
गुरुवार, 09/13/2012 - 21:28 नवीन
पण टारबाचा संदर्भ असल्यामुळे रडारड ही टारबाची नाही तर त्याचे टार्गेट ठरलेल्यांची असावी असा संशय आहे!
चुकलं, चुकलं, संपादिकाबाई. (संपादकांचं नेहमीच कसं चुकतं, हीच तर (आमची रडा)रड आहे!) ;-) पळा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अवडुंबर.

शिल्पा ब
गुरुवार, 09/13/2012 - 21:34 नवीन
अवडुंबर.
  • Log in or register to post comments

=))

सोत्रि
गुरुवार, 09/13/2012 - 21:43 नवीन
पिडाकाका, जबरदस्त! दंडवत स्विकारा! _/\_ - ( मिपावर येऊन वाट बघत बसणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

शॉल्लेट !

परिकथेतील राजकुमार
Fri, 09/14/2012 - 12:57 नवीन
पिडांकाका पेश्शल 'उतारा'. एकदम आवडेश आणि पटेश देखील.
  • Log in or register to post comments

मला वाटलं हे कवितेच विडंबन

झकासराव
Fri, 09/14/2012 - 14:07 नवीन
मला वाटलं हे कवितेच विडंबन आहे म्हणुन वाचलच नाही आतापर्यंत. (म्हणल काकाश्री अचानक कविता??) भारी लिहिलय. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा