नवरात्र जल जागर : माळ दुसरी .
==================================================================
नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी... माळ आठवी... माळ नववी... माळ दहावी...
==================================================================
पहिल्या भगात सिंचन्कामाची आणि पाणलोट विकासाची निकड आणि तीव्रता पाहिली. त्या अनुषंगाने विद्य्मान मुख्यमंत्री यांनी काही उपयुक्त योजना चालू केल्या त्यातील मह्त्वाकांक्षी योजना म्हणजे जलयुक्त शिवार.
नवेपण फक्त कामातच नसून काम राबविण्याच्या पद्धतीत आहे.
१.गाव पातळीवर लोकांचा सहभाग
२.कामाचा निर्णय झाल्यानंतर स्थानीक आमदार खासदार यांचा अंमलबजावणीत शून्य हस्तक्षेप.
३.जिल्हाधिकार्यांना थेट अधिकार आणि परवानगीसाठी स्वतंत्र सचिव व्यवस्था.
४.कालबद्धतेचे निकष पाळणे अनिवार्य त्या मुळे याजना रेंगाळून अर्धवट कामे होउन निधी वाया जाणे नाही.
५.आणि सर्वात महत्वाचा आणि दूरगामी निर्णय म्हणजे.
"जलयुक्त शिवारमधील कामाचे पैसे फक्त ग्रामसभेच्या मान्यतेने देण्याचा निर्णय "त्यामुळे कागदोपत्री कामे दाखवून पैसे लाटण्याच्या प्रकाराला चांगलाच चाप बसला. ६.अर्थात त्याने काही महाभाग दुखावलेही पण त्याची पर्वा केली नाही. ७.या योजनेसाठी विरोधी पक्षनेता असताना संकलन केलेली माहीती ,पीक-पाणी तपशील आणि विविध स्वयंसेवी संघटनाचे अहवाल यांचा अभ्यास करून (राजकीय्/पक्षीय स्थान विशेष याचा प्रभाव बिलकुल दूर ठेऊन) फक्त पात्रता आणि आवश्यकता हाच निकष ठेऊन योजना राबविण्याचे काम केले. ८.त्यामुळे आपसूकच स्वपक्षीयच काय विरोधकांनाही विरोध करण्यास कुठलेही कोलीत दिले गेले नाही. ९. सतत शिकण्याची भूमीका असल्याने काही त्रुटी ऊणीवा लक्ष्यात आलयास त्या सुधारण्याची तयारी स्वतः मुख्यमंत्र्यांनीच ठेवल्याने अधिकारी ही मनापासून साथ देत आहेत. १०.यात काही राहिले असेलही किंवा असफल्,अपूर्ण कामांबाब्त काही बातमी मला दिसली नाही ती असेल तर सजग मिपाकरांनी निदर्शनास आणून द्यावी ही विनंती.
प्रतिक्रिया
उत्तम माहिती नाखुन काका.
उत्तम माहिती
मस्त नाखु
वरील प्रतिसादांशी सहमत.
जिल्हाधिकारी तुकाराम
लेख वाचतोय.
सुरेख संकलन... धन्यवाद!!
वाचतोय... अतिशय महत्वपूर्ण
उत्तम बातम्या
उत्तम माहिती. वाचतेय.
खूप छान माहीती.
चांगली माहिती.
सरकारच्या कामाचे मुल्यमापन
एक उत्तम माहितीपूर्ण लेखमाला.
सोलापूर