वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी नाखुकाकां कडून सदर हकिगत
नाखु, तुम्ही ग्रेट आहात.
तुमचे मनापासून अभिनंदन आणि
+१
राग मानणार नसाल तर एक बोलु का
प्र.गो. >>> आंम्ही टुमच्याशी
गिर्जाकाका, कवापास्न
आता बुवांच्या पुढच्या
त्यापेक्षा पुढचा धागा मी
प्रगो...येउंद्या एक फर्मास
एवढ्यात लायकी काढू नका हो, ..
एकदा मुलाला शिक्षण दिल्यानंतर परत पुढे नोकरी मिळवुन देण्यासाठी फ्लॅट मिळवुन देण्यासाठे जर तुम्हालाच प्रयत्न करावे लागत असतील तर तर तो मुलगा नक्कीच लग्नाला लायक नाहीये .यातला नोकरी मुद्दा बरोबर आहे, म्हणजे ती स्वकर्तुत्वावर मिळवावी लागते, पण घर खरच जमेल का ? पुण्याचेच उदाहरण पहा, साधा २ बेडरुमचा फ्ल्याट ५० लाखाच्या पुढे जातोय, पगार ५ लाखापासुन २२ वर्षी सुरु झाला, तरी नुस्ते कर्ज भेटायची लायकी यायला अजून ७ एक वर्ष लागतील, तोपर्यंत तो फ्ल्याट कमीतकमी कोटीच्या वर गेला असेल. कसे गणित सुटणार ? :(लईच मोठा आवाका आहे लेखाचा.
मित्रांच्या वधुशोधादरम्यान
ह्या निमित्ताने,
दोन्ही बाजूने संसाराची
अभिमान!
आयला लई नशीबवान आहात कि.
हे पटलं नाही ..
काळे साहेब
असे अमुक एक रक्कम टेक-होम आणि
ह्म्म
मुलीच्या संसारात आईची लूड्बूड
काका जोक करत नसावेत. मी
हेच म्हणतो
अहो पण किती ते जनरलायजेशन??
नाही नाही, जनरलायजेशन
सिलेक्शन बायस बद्दल सहमत.. पण
मला वाटते...
मुलीच्या संसारात आईची लूड्बूडया वाक्याचा अर्थ " मला हा असा फाटका औरंगजेब मिळाला हो, कध्धी पिक्चर नाही, का भेळ नाही. कधी शिंगणापूर साधी पण विचारले नाही ग तुझ्या बापाने, पण तू नक्की जावैबापूच्या मागे लागुन शिंगापूर तरी करुन घे हो" असा होतो. :)फाटका औरंगजेब
+१
फाटका औरंगजेब हा लई म्हणजे
मुलीच्या संसारात आईची लूड्बूड
@अशा बावळट बायका आहेत जगात
अपर्णातै रामतीर्थंकर
पि.रा. बाई... आपण म्हणताय, ते
सहमत
मुलाला त्याच्या आई बाबा पासून
मित्रांमधे गप्पा मारता मारता
आयला म्हणजे पुरुषभ्रूणहत्या
अगा बाबौ नको नको _/\_
चर्चा वाचतोय
आता मेल्या तु कशाला वाचतोयस?
का रे बाबा बिचार्या
ते हे आप्लं
ल ग्न बं बा ळ!!!! तु पण ठेव
मूवी काकांसाठी एवढे तर करूच
इथे येऊन
(No subject)
@वाचत बसू नका हो, घरी 'ते'
थोडा गोंधळ होतोय.