< गणपा खरंच मिपाशेफ बनतील का ! >

प्यारे१'s picture
प्यारे१ in जनातलं, मनातलं
26 Mar 2014 - 2:42 pm

सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार
केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष
लक्षात येण्याजोगे आहेत...

गणपाहूनही गणपाभक्त किंवा
मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे

असो तर प्रश्न असा आहे

खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल...
प्रश्न अनेक आहेत.

हे पाहता होणारे मिपाशेफ हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवशेफ त्यांना टिकू देतील का?
गणपाशेठचं मिपाशेफ पद २ २|| दिवसच टिकेल.

आपल्याला काय वाट्टं?

(अवांतर तरीही महत्त्वाचं (नसलेलं): सर्व संबंधितांनी वजनानं अतिशय हलकं घ्यावं. ;)
आम्ही जुने असल्यानं कुणावरही भारी वगैरे नाही आहोत. असो! )

बालगीतविडंबनचौकशीप्रश्नोत्तरेवादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

दिव्यश्री's picture

26 Mar 2014 - 3:03 pm | दिव्यश्री

मी तर आधीच शेफ म्हणाले आहे फक्त मिपा हा शब्द जोडला कि झाल . :)

सानिकास्वप्निल's picture

26 Mar 2014 - 3:35 pm | सानिकास्वप्निल

आमच्यासाठी गणपाभौ कधीच मिपाशेफ झालेत :)
ट्रुअली अ पर्फेक्श्नीस्ट!!
___/\___

प्यारे१'s picture

26 Mar 2014 - 5:04 pm | प्यारे१

तुम्ही निवडणूक लढवणार नाही काय मग?

(कुणीतरी लोकाग्रह करा रे! ;) )

- समिधा ;)

समिधा सारुन उपेग नय प्यारे.
आम्हा पाकॄविभागीयांची आघाडीची महायुती अभ्येद्य आहे. ;)

प्यारे१'s picture

26 Mar 2014 - 8:08 pm | प्यारे१

एक वर्षापूर्वीची कोअर टीम आठवली. ;)

(हलकं घ्या हो. सगळ्या मिपाशेफ ना पाकृ करायला नि खिलवायला सब कुछ उत्तम लाभो!)

गणपा's picture

26 Mar 2014 - 3:03 pm | गणपा

गणपा येडा आहे
गणपा बावळ्ट आहे
गणपा बाशिंग बांध्ले आहे
गणपा हरणार आहे
गणपा आला मोठा फार शाहणा लागुन गेला
गणपा इत्का बिंडोक कोणी नाही
गणपा सेटिंग कर्तो
गणपा भ्रश्टाचारी आहे
गणपा थापाड्या आहे
गणपा अम्का
गणपा ढ्म्का

- मीएकशुन्य

गणपा कसाही असला तरी गणपा नीच नाहीये रे!

दिव्यश्री's picture

26 Mar 2014 - 3:16 pm | दिव्यश्री

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
१ १ १ १ ११ ११ ११११ ११११११ १११११११ १११११११११ ११११११११ ११११११११ १११११११११ ११११११११ ११११११११११

आदूबाळ's picture

26 Mar 2014 - 3:26 pm | आदूबाळ

अगदी हेच लिहायला आलो होतो :))

भिकापाटील's picture

26 Mar 2014 - 3:36 pm | भिकापाटील

गणपा कसाही असला तरी गणपा नीच नाहीये रे!

:D =))
ठार मेलो हसून...

कानडाऊ योगेशु's picture

26 Mar 2014 - 4:23 pm | कानडाऊ योगेशु

गणपा कसाही नसला तरी गणपा हुच्च आहे रे! :D

चिरोटा's picture

26 Mar 2014 - 3:15 pm | चिरोटा

गणपा येवोत अथवा कोणीही!
आपल्याला मिपावर अधिकाधिक सुविधा हव्यात.
कुठलाही धागा कमीत्कमी संपादित केला जावा.
जिलब्या पाडणे( प्रदूषण) कमी करण्याचे सक्षम पर्याय
डुप्लिकेट आय्.डीज्.,खरडफळ्यावरचे प्रदूषण रोखता आले पाहिजे.
या सर्वात मिपाकरांची वाढती जागरुकता व सहभाग हवाय!
(आपल्या सर्वांचा)होमियोहित

आदूबाळ's picture

26 Mar 2014 - 3:28 pm | आदूबाळ

होमियोहित

फुटलो!!!!

बॅटमॅन's picture

26 Mar 2014 - 3:31 pm | बॅटमॅन

अख्खा प्रतिसादच कहर आहे पण होमियोहित म्हंजे केकावरचे आयसिङ्ग आहे =)) लैच फुटलो =)) _/\_

संजय क्षीरसागर's picture

26 Mar 2014 - 10:23 pm | संजय क्षीरसागर

ते होमी बाबा आहेत का?

टिवटिव's picture

27 Mar 2014 - 12:34 am | टिवटिव

बेक्कार....

अन घटकाभर धरा, झाला तुमचा गणपा मिपाशेफ.. त्यानं काय होणारे? पाककृती विभागाचा अत्याचार थांबणारे? वेगेवेगळ्या दालनातले वाचक अन त्यांचे पित्ते यांची पाककृती पाहुन होणारी जळजळ थांबणारे? चमचमीत पदार्थांचे नुसते फोटोच्या फोटो टाकून लोकांना त्रास देणे थांबणारे? सगळ्या गफ्फा आहेत हो गफ्फा....

बॅटमॅन's picture

26 Mar 2014 - 3:18 pm | बॅटमॅन

या प्रतिसादात गणपाऐवजी सानिकास्वप्निल/पेठकरकाका/मृणालिनी किंवा इतर कोणीही क्षयज्ञ टाकला तरी चालू शकेल :)

गणपा's picture

26 Mar 2014 - 3:18 pm | गणपा

;)

सुहास झेले's picture

26 Mar 2014 - 3:21 pm | सुहास झेले

अगदी....

दिव्यश्री's picture

26 Mar 2014 - 3:26 pm | दिव्यश्री

पुणह्ह्ह्हा एकदा सहमत आहे . :D तसेही येथे सुग्रणीनची आणि सुग्रणांची(बल्लव हा शब्द आवडत नसल्याने ), पाककला निपुण लोकांची कमी नाही . भरपूर मातब्बर मंडळी आहेत येथे हे माझे(आपले) भाग्यचं आहे . :)

आत्मशून्य's picture

26 Mar 2014 - 3:27 pm | आत्मशून्य

नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे म्हणून त्यांचे नाव टाकायचे इतकेच.

भिकापाटील's picture

26 Mar 2014 - 3:49 pm | भिकापाटील

नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे म्हणून त्यांचे नाव टाकायचे इतकेच.

आशू, आपण वास्तव सांगितलत.

खाणासाहेब चिपळे

वरची नावं घेतलेले गणपाशेठचे स्पर्धक आहेत हो! ;)

-'पेठकरकाकांची रेसिपी ४७.५ मिनिट वाली' वाला प्रायोजित कार्यक्रम बघायला उत्सुक =))

बॅटमॅन's picture

26 Mar 2014 - 3:37 pm | बॅटमॅन

यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही

कारण गणपा मिपाशेफ झाल्यावर रोजच्या लेखन-प्रतिसादात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व पाकृंमध्ये जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे.

इतर बल्लवाचार्यांनी कुरापत काढली , महागाई वाढली , संपादनशाही वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,धाग्याचे भाव गगनाला भीडले तरी आमचे शेफ ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल !

गणपा मिपाशेफ झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "हाणा" म्हणणारा शेफ लागतो मगच राष्ट्रात बुभुक्षु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही.

मिपाकर म्हणून आमची काही एक अस्मिता आहे आणि ती राहीली पाहीजे असे मूळात प्रत्येक मिपाकराला वाटत असतेच!
हल्ली परदेश प्रवास आणि एकूणच जग जवळ्येत चालले आहे त्यामुळे ही भावना अधिक जोमाने वाढीस लागली आहे आणि म्हणून गणपा मिपाशेफ झाल्यास फरक पडायला सुरुवात होईल.

गणपाच असे नव्हे तर कोणी ही एक प्रसन्न मुद्रेने हाणण्याचे आवाहन करणारा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे..

बॅटेकर

गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !!

(ह.घ्या. हेवेसांनल)

विटेकर's picture

26 Mar 2014 - 4:47 pm | विटेकर

खो खो हसलो ! धमाल ..
(पीसासारखे हलके घेतले आहे... हेवेसांनल )
आत्मुस .. एक पिसाची स्मायली टाका बघू..

आदूबाळ's picture

26 Mar 2014 - 4:54 pm | आदूबाळ

a

बॅटमॅन's picture

26 Mar 2014 - 5:00 pm | बॅटमॅन

=)) ठ्ठो =))

तुम्ही हलके घेतले, भरून पावलो. धन्यवाद!!!

विटेकर's picture

26 Mar 2014 - 5:02 pm | विटेकर

नुस्ते हलके ?

नाही .. पीसासारखे हलके घेतले आहे .. आधिक माहीतीसाठी पीसाचे चित्र पहा.

बॅटमॅन's picture

26 Mar 2014 - 5:55 pm | बॅटमॅन

येस्सार!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Mar 2014 - 5:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

गेल्या आख्ख्या आठवड्यात सर्व जगभरच्या अतिरेक्यांनी मिळून एवढा गोळिबार केलेला नाही, हे पहिलेच नमूद करतो. आता तुम्ही याचा पुरावा मागणार, मग तुमच्याशी चर्चा शक्य नाही.

गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !!
हे पहा तुम्हीच तुमच्या अतिरेकीपणाचा पुरावा देताहात. जो तुमचे इतके मनोरंजन करतो त्या जोलरलाच तुम्ही खलास करता. मग फिल गुड फॅक्टर कसा येईल ? आणि 'फिल गुड' ऐवजी 'फिल शक्कर' वापरली तर मग पाकृ बिघडणार नाही तर काय ?

तुम्हाला हे कळणं कठीणच आहे म्हणा. कारण तुम्ही सर्व पदार्थ पातेल्याच्या बाहेरून बघता आहात. कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते. हे मला माहिती आहे पण तुम्हाला समजणे कठीण आहे. तुमच्याकडे ती मानसिकताच नाही.

आता परत पुरावा पुरावा म्हणायला लागू नका. कारण किचनमध्ये पदार्थ कसा पुरणार?... फारतर आपण तो जाळू शकतो. बघा मीच जिंकलो तुम्ही सर्व हारलात, नेहमीप्रमाणे.

बॅटमॅन's picture

26 Mar 2014 - 5:54 pm | बॅटमॅन

हा हा हा हा =)) इस्पीक एक्के ने क्या बात बोली है, बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!!!!!!!

-बॅटू हटेला ;)

निराकार गाढव's picture

27 Mar 2014 - 12:27 am | निराकार गाढव

अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच ना माझी आठवण?

प.पु. गुर्जीन्नना णमास्कार क्रून सांगट्त्टो,...

आणुभवावीण माण हालवू णको रे...

.

राजो's picture

27 Mar 2014 - 5:49 pm | राजो

यावरुन

हरिभजना "वीणकाळ" घालवू नको रे....!!!

हे आठवले :P

बॅटमॅन's picture

27 Mar 2014 - 6:26 pm | बॅटमॅन

हा हा हा =))

रेवती's picture

27 Mar 2014 - 6:38 pm | रेवती

हा हा हा.

बाकी मा. निराकारजी गाढवजी, तुम्ही साकार होऊन त्या क्षुद्र भवकूपात का बरे पडलाहात तिथे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Mar 2014 - 6:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपा-शेफनं त्यांना किचनमधे यायला मज्जाव केल्यामुळे ते गर्दभ-शेफ "पातेल्यात बसून किचन कसे दिसेल" याचा अंदाज घेत आहेत.

बॅटमॅन's picture

27 Mar 2014 - 7:06 pm | बॅटमॅन

किचेनमध्ये बसून............पातेले का लपविता??????????????????? ;)

पैसा's picture

27 Mar 2014 - 7:09 pm | पैसा

मी कैच नै बोलले हां.

फोटो बघता विहीर का लपविता हे सयुक्तिक (?) होईल नै का? ;)

बॅटमॅन's picture

27 Mar 2014 - 7:44 pm | बॅटमॅन

अगदी अगदी ;)

पैसा's picture

26 Mar 2014 - 5:54 pm | पैसा

बाकी कसल्याही आठवणी काढा ओ, पातेली आणि भांड्यांच्या नका काढू! अत्रुप्त आत्मे बंदुका घेऊन धावत येतील!

प्रचेतस's picture

26 Mar 2014 - 6:08 pm | प्रचेतस

मी कैच नै बोल्लो हां इथे.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2014 - 6:12 pm | अत्रुप्त आत्मा

@मी कैच नै बोल्लो हां इथे.>>> धन्यवाद! :) आता काहि(ही) बोलायचं पण नाय हां ..पुढे सुद्धा!

चौकटराजा's picture

26 Mar 2014 - 8:49 pm | चौकटराजा

फेसबुक वर "बुवाला भडकवा" असा निरोप ज्योकाला दिला असण्याच्यी शक्यता आहे की नाही मिलॉर्ड ?

पैसा's picture

27 Mar 2014 - 12:36 am | पैसा

आमच्या कंपूत फूट पाडण्याचे खेळ क्रिपया करू नयेत ही णम्र धमकी!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2014 - 6:10 pm | अत्रुप्त आत्मा

@गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

हसून हसून डोक्याची शकलं होणार आहेत आज! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

कवितानागेश's picture

27 Mar 2014 - 12:11 am | कवितानागेश

खतर्नाक! =))
"कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते." हे वाक्य सही म्हणून घेउ का हो काका? ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Mar 2014 - 12:26 am | डॉ सुहास म्हात्रे

बेशक घ्या !

धन्या's picture

27 Mar 2014 - 11:22 am | धन्या

ते पिवळं करायचं राहीलं.

रमताराम's picture

26 Mar 2014 - 7:29 pm | रमताराम

<< गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !!>> क्या बोल्या तू क्या बोल्या.

केदार-मिसळपाव's picture

26 Mar 2014 - 7:38 pm | केदार-मिसळपाव

तु म्हणजे ना अगदी ना कहर आहेस...
(अग तु ना म्हैस आहेस म्हैस... - शांतेच कार्ट चालु आहे) ह्या तालावर वाचावे.

बाबा पाटील's picture

26 Mar 2014 - 8:06 pm | बाबा पाटील

पार चमत्कार करुन टाकलास की रे इलेक्शनचा....!

आशु जोग's picture

25 Aug 2015 - 11:36 pm | आशु जोग

हे हे हे

कोणी एकच मिपाशेफ बनेल असे नाही. गणपादादा ,सानिका,पेठकर काका,दिपक यातले कोणीहे होऊ शकते!।हा शेफ फार तर दोन-अडीच वर्ष टिकेल. तोवर कोणीतरी मित्र जोडुन ठेवेल. मग मात्र सेमीफायनल मॅच होईल.

मिपानिरिक्षक
अजया

मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.

बॅटमॅन's picture

26 Mar 2014 - 4:02 pm | बॅटमॅन

मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.

ठ्ठो =))

विटेकर's picture

26 Mar 2014 - 4:54 pm | विटेकर

मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.

तोच तर प्रोब्लेम आहे , मिपाकर संघटीत्च होत नाहीत! शिंची कंपूबाजी करत बसतात आपआप्ल्या खुराड्यात आणि गहूम्हणून एरंड्या विकतील लेकाचे आप्ल्या कंपूमित्रांचे .. संपादक लोक्स पण त्यांनाच सामिल....
.
..
.
.
.
.
.
..
पूर्वी हे नव्हतं ... स्वातंत्र्यपूर्व काळात ..

विजुभाऊ's picture

27 Mar 2014 - 11:15 am | विजुभाऊ

मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.

तो संगठीत न होउ देणे हा दळभद्री लोकांचा डाव आहे.
त्यासाठी मिपाबंधन हा अतूट धागा आहे.

आशु जोग's picture

27 Mar 2014 - 12:01 pm | आशु जोग

हो क्का

बट्टमण्ण यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही
कारण गणपा मिपाशेफ झाल्यावर रोजच्या स्वयंपाकात फार मोठा फरक पडला नाही तरी सर्व आचार्‍यांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व स्वयंपाकघरात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे.

शेजारच्या हॉटेलने कुरापत काढली , रेट वाढवले, मेनु कमी केला, भेसळ केली तरी आमचे मिशे ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल !
गणपा मिशे झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "जीभ" असलेला शेफ लागतो मगच स्वयंपाकघरात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही.

@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&

गणपाच असे नव्हे तर कोणी ही एक तीक्ष्ण जीभेचा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे..

विटेकर's picture

26 Mar 2014 - 4:49 pm | विटेकर

तीक्ष्ण जीभेचा माणूस

हा हा हा ....

क्लिंटन's picture

26 Mar 2014 - 9:45 pm | क्लिंटन

भगवान करो अन तुमची बात सच निकलो! पण सध्या तरी इतके आशावादी रहावे असे वाटत नै. असो, घोडामैदान जवळच आहे.

गणपा मिपाशेफ व्हावेत ही इच्छा. पण मिपाशेफ होऊन त्यांनी मिपाची जिलबी करण्यापेक्षा मिपाचा रसगुल्ला बनवावा.

-बॅटाजीराव.

मूकवाचक's picture

26 Mar 2014 - 4:25 pm | मूकवाचक

तसा पुरावा देणे अशक्य कोटीतले असले तरी गणपाशेठ भेसळीचे पदार्थ वापरून तयार केलेले हाटेलातले पदार्थ चोरवाटेने आणून शेफ म्हणून मिरवतो हे मी सप्रमाण सिद्ध केलेले असूनही गणपा मिपाशेफ व्हावेत यावर तुम्ही अडून बसता हे नवल आहे! तुमच्याशी चर्चा संभवत नाही.

खातो तेच ...

बॅटमॅन's picture

26 Mar 2014 - 4:29 pm | बॅटमॅन

खातो तेच ...

निराकार गाढवाला उचक्या लागल्या असतील =))

निराकार गाढव's picture

29 Mar 2014 - 7:35 pm | निराकार गाढव

छ्या! अजूनही अभ्यास जरा कमीच पडतोय. उचकीच काय, टिचकी लागल्यावरसुद्धा मी हजर होतो.
.

निराकार गधे ने क्या बात बोली है. बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!!!

प्यारे१'s picture

26 Mar 2014 - 4:44 pm | प्यारे१

>>>खातो तेच ...

___/\___

-कुंथलगीकर का? ;)

विजुभाऊ's picture

27 Mar 2014 - 11:19 am | विजुभाऊ

ब्याटाजीराव

त्यांनी मिपाची जिलबी करण्यापेक्षा मिपाचा रसगुल्ला बनवावा.

तुमचे बंगालप्रेम आत्ताच का एवढे उचळंबुन आले.
जीलेबी हा मराठी पदार्थ आहे. मराठी पदार्थाऐवजी बंगाली पदार्थ सुचवून मराठी माणसाची गळचेपी करुन त्याला हद्दपार करण्याचा हा डाव कदापी सहन करणार नाही. आमचे मिपाबंधन अभेद्य आहे......करुन दाखवले.
ब्याटाजीराव तुम्ही ब्याटाजीरॉय हे नाव लावा आता.

साफ चूक. उलट जिलेबी हा मूळचा इराकमधील झलाबिया गावचा पदार्थ आहे. त्याउलट रसगुल्ला हा भारतातच पैदा झालेला पदार्थ आहे. शिवाय रसगुल्ला कसा रसाने भरलेला असतो. त्यामुळे रसगुल्लाच पाहिजे होऽऽऽ!!!!!!!!

पेठकर काकांचे नाव चर्चेत आल्याने गणपासेठ मिपाशेफ बनण्याचा धोका वाटत नाही. सध्या कुठल्याही मिपाकराच्या नावावर निर्णायक सहमती होण्याचे दिवस गेले आहेत.

अविनाश डोईफोडे
पाककला समीक्षक महामंडळ

माझीही शॅम्पेन's picture

27 Mar 2014 - 9:58 am | माझीही शॅम्पेन

शी बाबा कंटाळा आला अश्या धाग्याचा सारख-सारख काय गणपामोडी, राहुल पेठकर , सास्ववाल ह्याचे धागे वॅकॅयक ....सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत वाट बघा आपोआप उत्तर मिळेल ना !!

(चूप-चाप भक्षक) शॅम्पेन :)

क्लिंटन's picture

27 Mar 2014 - 1:34 pm | क्लिंटन

सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत वाट बघा आपोआप उत्तर मिळेल ना !!

मला वाटलं ९० च्या दशकातील आणि अजून कुठली कुठली आकडेवारी गोळा करुन हे आधीच सांगता येतं :)

माझीही शॅम्पेन's picture

27 Mar 2014 - 2:55 pm | माझीही शॅम्पेन

काही तरी काय क्लिंटन मामा,
आकडेवारीला काय अर्थ असतो का? मुद्दे, आकडे यातून काहीही निष्पन्न होत नाही.
शेवटी तुम्हाला काय वाटतं तेवढं आणि फक्त तेच खरं - बरोबर आहे ना? :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Mar 2014 - 4:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

डोक्यावरुन जात असल्याकारणाने माझा पास :(

पैसा's picture

26 Mar 2014 - 5:08 pm | पैसा

माझा एकच स्टँड आहे. गणपा कोंबड्यांचा मॅसॅकर करतो. त्यामुळे मांसाहारवादी आहे. पण तरीही शेवटी तो आमचा बाब्या आहे आणि फेसबुकावर मी काही लिहिलं तरी त्याला लाईक करतो. त्यामुळे "आप"लं मत गणपालाच! तुम्हीही सगळ्यांनी बर्‍या बोलाने ऐका. नाहीतर मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे न देता चर्चा बंद करीन!

विटेकर's picture

26 Mar 2014 - 5:21 pm | विटेकर

संपादक लोक्स पण त्यांनाच सामिल....

हेच तर आम्ही म्हण्तोय>>>>>
Dont waste your time in Tunking .. People only pratisad what they want to pratisad... (हे कोणीतरी निळे करा रे !)

दिव्यश्री's picture

26 Mar 2014 - 5:55 pm | दिव्यश्री

भारीच पैतै... :D मी तुझ्या गटात , कंपूत या बाबतीत . ;) :P

कारण मी पण सुद्द साकाहरीच हाये . *beee*
तंवर बाकीच्याणी इ णो ग्यावे . *drinks* *lol*

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Mar 2014 - 7:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी पण, मी पण. माझा पण एक स्ट्यांड आहे. गणपा भाज्यांचाही मॅसॅकर करतो. अजून एक आहे तो दरवेळेस चिकनऐवजी चीज चालेल म्हणतो आणि लोक म्हणतात की "धागा उघडला आणि चीज झालं" आता पाकृत चीज टाकलं की तिचं चीज होणारच हे तुम्हाला अगोदर पासून कळायला पाहिजे. ते मला कळतं, पण तुम्हाला नाही. कारण तुमच्या दृष्टीचा कोन वेगळा आहे. तो काय आयस्क्रिम कोन नाहिये. बघा परत मलाच ते माहितेय, तुम्हाला कधीच कळणार नाही. असो.

फेसबुकाचं म्हणाल तर आम्हीच तुमच्या दोन पावलं पुढे आहोत. हे दोन्ही शेफ आम्ही काहि लिहीलं नाही तरी त्याला लाईक करतात (कोणी काही लिहील्यावर लाईक केलं यात काय नविन?). आता बोला... नको, नको कायपण बोलू नका, तो हक्क माझा. तुम्ही फक्त मी म्हणतो त्याला हो बोला बर्‍या बोलाने; तो हक्क तुमचा, माझ्या सौजन्याने. नाहीतर तुम्ही न विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देवून मी "तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही" असे म्हणत चर्चा लै लै लांबवीन. कारण मला नैतिकता समजते, तुम्हाला ती समजणे शक्य नाही.

पैसा's picture

26 Mar 2014 - 7:48 pm | पैसा

=)) साष्टांग नमस्कार! म्हंजे "गिर्‍या तो भी टांग ऊपर" ही तुमची वृत्ती आवडली! =))

निराकार गाढव's picture

29 Mar 2014 - 7:27 pm | निराकार गाढव

अहो ही तर माझीच favorite pose आहे. गुर्जींची कॄपा, otherwise आमचं कसलं आलंय करतुब?
पण आता पैसाताईंनासुद्धा अखेर माझी आठवण झाली म्हणायची.
.

मूकवाचक's picture

26 Mar 2014 - 7:57 pm | मूकवाचक

एस सर्व्हिस!

पिलीयन रायडर's picture

26 Mar 2014 - 11:34 pm | पिलीयन रायडर

हा सगळ्यात जमुन आलेला प्रतिसाद आहे!!!
कहर आहात तुम्ही!!!!

बाळ सप्रे's picture

27 Mar 2014 - 10:10 am | बाळ सप्रे

ग्रेट पिस्पिकचा केक्का
चिकन अथवा भाज्यांचं मॅसॅकर नव्हतं.. त्याला संमं नी कधीच क्लीनचिट दिली आहे.

//misalpav.com/mit_clean_chit_to_Ganapa.pdf

तुम्हाला हे सिद्ध करता आलेलं नाही. मी तुम्हाला उघडं पाडलयं. (पुन्हा येताना शर्ट घालून या :-) )
गेट वेल सून

आणि किती दिवस हे चिकनचं मॅसॅकर वापरणार. यात फक्त गणपाद्वेष दिसुन येतो.
पण त्यांच्या मिपावरील पाककृतीना सलग ३० वेळा मिपाकरांनी शंभराहून अधिक प्रतिसाद देउन उचलून धरलयं ते काय उगाच. पाकृ विभागाचे वाचक मूर्ख नाहीत.. आज मिपाकरांच्या घराघरात चांगलेचुंगले पदार्थ घडत आहेत ते फक्त गणपांच्या उत्तम पाकृंमुळेच ..

फेकु, पप्पु पाकृंवर प्रतिसाद सोडा त्यांची १०० वाचनेदेखिल होत नाहीत.

प्रीगुर्जी

दिव्यश्री's picture

27 Mar 2014 - 10:19 am | दिव्यश्री

मॅसॅकर>>> ????????????????????????????????????????????????

म्हणजे काय ? मराठीत अर्थ सांगा कृपया ? :(

(पुणहह्ह्हा ढ शिष्या/चेली) :P

बाळ सप्रे's picture

27 Mar 2014 - 10:24 am | बाळ सप्रे

हत्याकांड
कत्तल

दिव्यश्री's picture

27 Mar 2014 - 10:32 am | दिव्यश्री

ओह्ह्ह्ह्ह ...ओके . फारच भयानक अर्थ निघाला . :(
मला वाटल होत काहीतरी चेष्टेचा/ मजेचा असेल . असो .

अर्थ लिहिल्याबद्दल धन्यवाद .

(पहिल्यांदा अर्थ समजल्यावर कसतरी झालेली.)

मूढबालकाच्या मूषकलीला सुरु झाल्या! विषयाचं गांभीर्य काय आणि विडंबनाची बाष्कळता किती. आणि त्यावर जवाबदार मंडळींची ही: ही: ही:! आयला, कमाल आहे.

- बंदय वीजपावर