✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शत्रुघ्न

म
मृत्युन्जय यांनी
Tue, 02/05/2013 - 13:08  ·  लेख
लेख
इतिहास मोठा क्रूर आहे. काही लोकांना त्याने देव पदी पोचवले तर काही जणांना उपेक्षेने मारले. ज्याव्यक्तिरेखांची इतिहासाने उपेक्षा केली त्यांत शत्रुघ्नाचे नाव फार वरती आहे. किंबहुना सर्वात वरती तेच आहे. वटवृक्षांच्या सावलीत एखादे रोप कोमेजुन जावे तशी शत्रुघ्नाची व्यक्तिरेखा कोमेजुन गेल्यागत भासते. राम तर देवपदी पोचला. लक्ष्मण अजरामर झाला. भरत भ्रातृप्रेमावर आणि निस्पृहतेवर गाजला. शत्रुघ्नाच्या वाट्याला मात्र ते मोमेंट्स ऑफ फेम आलेच नाहीत. नाही म्हणायला तसे महाभारतातले नकुल सहदेव देखील उपेक्षित. पण त्यांच्याबद्दल निदान काही कौतुकास्पद शब्द लिहिले गेले. नकुलाची अश्वपरीक्षा आणि सहदेवाची भविष्यपरीक्षा यांवर काही मिथके तरी वाचायला मिळाली आहेत. नकुल / सहदेव म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर महाभारतातले नकुल सहदेवच येतात. शत्रुघ्न म्हटल्यावर मात्र आपल्या डोळ्यासमोर "खामोश" "जली को आग कहते है बुझी को राख कहते है" वगैरे म्हणणारा शत्रुघ्न सिन्हा येतो. (तोच तो सोनाक्षी सिन्हा चा बाप. काही वर्षांनी तो केवळ दगडीचा बाप म्हणुनच देखील ओळखला जाउ शकतो. द्गडी म्हणजे सोनाक्षी. अंदर की खबर आहे की तिचे मूळ नाव सोनाक्षी नसुन 'स्टोना'क्षी आह'. तिच्या डो़ळ्यात आणि दगडात एकच भाव असतात. कधीकधी दगडही सुंदर दिसतो तशी स्टोनाक्षीही सुंदर दिसते. साम्यस्थळे एवढ्यात संपतात. बाकी दगडाचा अपमान करण्याचा काही हेतू नाही. असो. विषय बदलला. त्या शत्रुघ्नाचे दुर्दैव. लेखाचा विषय आहे शत्रुघ्न आणि लिहितो आहे सिन्हांच्या दगडीवर.) पण आज शत्रुघ्नाबद्दल विचारले तर आपल्यापैकी कितीजण धाडधाड १० ओळी म्हणुन दाखवु शकतील. राम बोला लक्ष्मण बोला, अर्जुन म्हणा कर्ण म्हणा लोक अधिकारवाणीने थोडेफार बोलतील. महाभारतातल्या खलनायकांबद्दलही लोकांना माहिती आहे पण रामायणातल्या बंधुनिष्ठ शत्रुघ्नाबद्दल नाही. कारण मुळात त्याचे आख्खे जीवनच अळणी आहेत. त्यात काही माल मसाला नाही, मेलोड्रामा नाही. तो रामासारखा वलयांकित नाही, लक्ष्मणासारखा पराक्रमी आणि सेवाव्रती नाही. भरतासारखा उदार आणि त्यागी नाही कारण मुळात त्याला कधी तो चान्सच मिळाला नाही. भरतासारखे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेउन त्याने कधी राज्य केले नाही कारण मुळात त्या राजपदाचे मापच त्याच्या पदरी पडले नाही. शत्रुघ्नाचे आख्खे आयुष्यच आपल्यासाठी केवळ भरताचा धाकला भाऊ इतपतच सिमीत आहे. आणि हीच मुळी प्रचंड मोठी शोकांतिका आहे कारण तो भरताचा सख्खा धाकटा भाऊ नसुन लक्ष्मणाचा जुळा भाऊ आहे. शत्रुघ्न मुळात कोण होता हेच जर माहिती नसेल तर त्याचे कार्य काय माहिती असणार? शत्रुघ्न म्हणजे शत्रुंचा नाश करणारा. दशरथ आणि सुमित्रेचा मुलगा. लक्ष्मणाचा जुळा भाऊ, राम आणी भरताचा सावत्रभाऊ आणि चार भावंडांमधला सर्वात धाकटा (जुळा असुनही). पण शत्रुघ्नाची खरी ओळख याहुनही खुप मोठी आहे. त्याच्या आयुष्यातला प्रसिद्धीचा एकमेव क्षण लवणासुराच्या वधात आला. लवणासुर म्हणजे मधु राक्षसाचा मुलगा. या मधुच्या नावावरुनच मथुरा हे नाव आले. या मधुने देव दानव मनुष्य या सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. प्रजाहितदा होता. त्यावर खुष होउन साक्षात शिवाने त्याला स्वतःचा त्रिशूळ दिला. जो मधुच्या मृत्युन्ंतर लवणासुराकडे आला. लवणासुर स्वत: पराक्रमी आणि अस्त्रनिपुण होता. मात्र ऋषीमुनींना आणि मनुष्यांना त्रास देणारा होता. प्रजानन त्रासले आणि रामाकडे आले आणि रामाने याकामी भरताला लावुन दिले. पराक्रम गाजवण्याचा हा एक क्षणही वाट्याला येत नाही हे बघुन अखेर शत्रुघ्नाने रामाकडे या कामगिरीची मागणी केली आणि मिळवली. रामाने खास विष्णुने दिलेले अस्त्र शत्रुघ्नाकडे देउन त्याला लवणासुराकडे धाडले. आख्यायिका अशी आहे की लवणासुराच्या महालात अनेक दैवी अस्त्रे होती जी जवळ असेतो तो अजेय होता. त्यामुळे शत्रुघ्नाने भक्ष्याचे आमिष दाखवुन त्याला महालापासु दूर नेले आणि मग युध्दाचे आव्हाने दिले. याबाबत त्याने त्याच्या जुळ्या भावाचा कित्ता गिरवला. त्यानेही इंद्रजिताला असेच अजेय अस्त्रांपासुन दूर ठेवले होते. अखेर लवणासूर मेला. मथुरेचे राज्य त्यानंतर शत्रुघ्नाकडे आणि मग त्याच्या मुलांकडे गेले. लवणासुर वधाने आणि अश्वमेध दिग्विजयाने त्याने मिळवलेले किर्ती अखेरच्या क्षणी त्याच्या पुतण्यांनी त्याला हरवुन त्याच्यापासुन हिरावुन नेली. पण शत्रुघ्नाचा मोठेपणा लवणासुर वधात किंवा अश्वमेधाच्या दिग्विजयात नाहिच मुळी. त्याचा मोठेपणा इतिहासाने कधी अधोरेखितच केला नाही. त्याचा मोठेपणा आहे राम - लक्ष्मण वनवासात गेलेले असताना आणि भरत रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवुन अयोध्येबाहेर कुटीत राहत असताना निरपेक्ष, नि:स्पृह वृत्तीने अयोध्येच रक्षण करण्यात आहे. १४ वर्षाच्या काळात अयोध्या कधी नव्हे इतकी सजली, नटली, बहरली, समृद्ध झाली. याचे श्रेय सर्वांच्या अनुपस्थितीत राज्य योग्यप्रकारे सांभाळणार्‍या शत्रुघ्नाकडेच जाते. याबदल्यात त्याच्या पदरात कुठलेच कीर्तीचे माप पडले नाही. १४वर्षांनी राम परतल्यावर लोक म्हणाले भरताने रामाला राज्य परत केले. पण ते राज्य भरताने तरी कुठे केले होते. ते शत्रुघ्नानेच तर केले. वास्तविक पाहता लक्ष्मणाने जी सेवा रामाची केली तशीच शत्रुघ्नाने भरताची केली. लक्ष्मण रामाची सावली बनुन राहिला तर शत्रुघ्न भरताचे प्रतिरुप बनुन. दोन्ही जुळ्या भावंडांनी निरपेक्षपणे आपल्या सावत्र भावांची सेवा करण्यात धन्यता मानली. परंतु इंद्रजित वधामुळे असेल कदाचित किंवा वनवास भोगल्यानेही असेल पण लक्ष्मणाची प्रतिमा एका वटवृक्षा एवढी मोठी झाली तर शत्रुघ्न त्या वटवृक्षाची केवळ एक सावली बनुन राहिला. लक्ष्मणाच्या मृत्युनंतर रामापाठोपाठ भरतानेही जलसमाधी घेतली तसे कायम त्या दोघांबरोबर सावली सारखा राहिलेला शत्रुघ्नही सरयूत विलीन झाला. बंधुप्रेमाचे याहुन उदात्त उदाहरण इतिहासात नाही. राम उदात्ततेचे प्रतीक आहे तर लक्ष्मण बंधुप्रेमाचे, भरत त्यागाचे आणि उदारपणाचे प्रतीक आहे तर शत्रुघ्न निरपेक्ष आणि नि:स्पृह व्रुत्तीचे. त्याच्या या नीरक्षीरसमान वृतीला सलाम करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
नाट्य
धर्म
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
लेख
मत

प्रतिक्रिया द्या
21108 वाचन

💬 प्रतिसाद (130)

प्रतिक्रिया

:)

अग्निकोल्हा
गुरुवार, 02/07/2013 - 22:47 नवीन
होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अहो ग्लिशूकाका पण त्याचे

मृत्युन्जय
Fri, 02/08/2013 - 11:17 नवीन
अहो ग्लिशूकाका पण त्याचे आयुष्य म्हणजे शोकांतिका आहे असे कुठे म्हटले आहे मी? त्याचे कार्य मी लोकांसमोर मांडले आणि त्याला त्याचे ड्यु क्रेडिट मिळालेले नाही हे त्याचे दुर्दैव असे म्हणालो. जसे अनिल कुंबळेला योग्य वेळात कप्तनाची धुरा मिळाली नाही हे त्याचे आणि देशाचे दुर्दैव पण म्हणुन काय कुंबळेचे आयुष्य म्हणजे शोकांतिका थोडीच आहे. तसेच थोडेसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

मृत्युंजय साहेब ?

अग्निकोल्हा
Wed, 02/13/2013 - 23:42 नवीन
५फ म्हणतात तसं (५० फक्त चा शॉर्ट्फॉर्म), "कलिंगडात बी सुरक्षित" त्यात उगा बी ला क्रेडिट दिलं गेलं नाही असं म्हणन्यात काय अर्थ आहे ? नाही मिळालं कुंबळेला कप्तानपद पण धोनीने वर्ल्डकप मारला तर उगाच कुंबळेच दुर्दैव म्हणुन बोटं मोडण्यात काय हशिल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

बोटं मोडण्यात काहिच हशील नाही

मृत्युन्जय
गुरुवार, 02/14/2013 - 13:07 नवीन
बोटं मोडण्यात काहिच हशील नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेचे योगदान अधोरेखित करुन त्याची दखल घेण्यात देखील काहीच हरकत नाही. शिवाय मुद्दा आयुष्य शोकांतिका असण्याचा होता. तशी शोकांतिका काही नाहे असेच म्हटले आहे मी माझ्या प्रतिसादात. शिवाय कुंबळेला त्याचे ड्यु क्रेडिट मिळणेही गरजेचे आहे. जर तसे मिळाले नसेल तर त्याची दखल घेतलीच पाहिजे. राष्ट्रीय कर्तव्य आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

शोकांतिका तर नाहीच नाही पण ड्यु क्रेडिट देणेही अनाकलनीय!

अग्निकोल्हा
गुरुवार, 02/14/2013 - 18:13 नवीन
शिवाय मुद्दा आयुष्य शोकांतिका असण्याचा होता. तशी शोकांतिका काही नाहे असेच म्हटले आहे मी माझ्या प्रतिसादात.
समजा रामायण घडले नसते व राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे शांतपणे जन्मले तिथेच राज्य उपभोगुन अंती सहकुटुम्ब वानप्रस्थाला निघुन जाउन इश्वरचरणी लिन झाले याबद्दलही ड्यु क्रेडिट मिळणेही गरजेचे ठरलं असतं काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अहो रामायणच घडले नसते तर

मृत्युन्जय
गुरुवार, 02/14/2013 - 18:39 नवीन
अहो रामायणच घडले नसते तर रामाला तरी कशाला कोणी मरयला कशाचे क्रेडिट दिले असते. सचिन तेंडुलकर जन्मलाच नसता तर त्याला क्रेडिट मिळाले असते का महान फलंदाज असण्याचे? मला मुद्दाच कळाला नाही. बाकी पराशी बाडिस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

मला मुद्दाच कळाला नाही.

अग्निकोल्हा
Fri, 02/15/2013 - 00:36 नवीन
मला मुद्दाच कळाला नाही.
होतं असं कधी कधी. मुद्दा इतकाच आहे की जर तिन भावांनी जगायच्या तिन वेगवेगळ्या तर्‍हा जोपासल्या असताना चवथ्याने मात्र डोक शांत ठेउन जेव्हां परिस्थिती संयमाने हाताळली भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेतले नाहीत या बद्दल त्याला ड्यु क्रेडिट देणे म्हणजे उरलेल्या तिघांनी अनुसरलेल्या मार्गाचा अपमान ठरत नाही काय ? तसं नसेल तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कधी कधी नाही. समोरचा माणूस

मृत्युन्जय
Sat, 02/16/2013 - 10:52 नवीन
कधी कधी नाही. समोरचा माणूस क्षणाक्षणाला मुद्दे बदलत असेल तर बर्‍याचदा होते. असो. मुद्दा इतकाच आहे की जर तिन भावांनी जगायच्या तिन वेगवेगळ्या तर्‍हा जोपासल्या असताना चवथ्याने मात्र डोक शांत ठेउन जेव्हां परिस्थिती संयमाने हाताळली भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेतले नाहीत या बद्दल त्याला ड्यु क्रेडिट देणे म्हणजे उरलेल्या तिघांनी अनुसरलेल्या मार्गाचा अपमान ठरत नाही काय ? जर एखाद्या गोष्टीसाठी २ वेगवेगळे मार्ग अवलंबले गेले तर त्यातला एक निखालस चुकीचाच असला पाहिजे काय? तिन्ही भावांनी आपापल्या वृत्तीला अनुसरुन काही एक निर्णय घेतले आणि त्यातुन काही आदर्श घालुन दिले. अगदी तसेच शत्रुघ्नाने केले. फरक इतकाच की इतर तिघांना त्यांचे ड्यु क्रेडिट मिळाले. शत्रुघ्नाला मिळाले नाही. याचा अर्थ कोणी एक किंवा आधिक चुक आणि इतर बरोबर असा त्याचा अर्थ होउच शकत नाही. हे काही राम आणी रावण इतके सरळसोप्पे गणीत नाही आहे. तसं नसेल तर... अपमान ठरत नसल्याने याबद्दल काही टिप्पणी करु इच्छित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

जर एखाद्या गोष्टीसाठी २

अग्निकोल्हा
Sat, 02/16/2013 - 23:18 नवीन
जर एखाद्या गोष्टीसाठी २ वेगवेगळे मार्ग अवलंबले गेले तर त्यातला एक निखालस चुकीचाच असला पाहिजे काय?
नाही.
तिन्ही भावांनी आपापल्या वृत्तीला अनुसरुन काही एक निर्णय घेतले आणि त्यातुन काही आदर्श घालुन दिले. अगदी तसेच शत्रुघ्नाने केले.
चुकताय. शत्रुघ्नाने तिन भावांनी घालुन दिलेल्या आदर्शाच्या विरोधि वर्तन केले आहे.
फरक इतकाच की इतर तिघांना त्यांचे ड्यु क्रेडिट मिळाले. शत्रुघ्नाला मिळाले नाही.
शत्रुघ्नाने तिन भावांच्या आदर्शाच्या नेमके विरोधि वर्तन केल्याने जर तिन भावंडांनाच्या वर्तानाला जे आदर्श मानले तर त्या अनुशंगाने शत्रुघ्नाचे वर्तन दखलपात्र ठरत नाही, ते जर दखलपात्र ठरवले तर तिन भावंडांच्या आदर्शवादी भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, म्हणूनच महात्म्यांनी शत्रुघ्नाचे वर्तन दखलपात्र ठरवलेले अनुभवास येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

लक्षात घ्या!

अग्निकोल्हा
Sat, 02/16/2013 - 23:23 नवीन
शत्रुघ्नाचे वर्तन हे त्याच्या तिनही भावंडानी स्ववर्तनातुन घालुन दिलेल्या आदर्शांची*** नेमकी प्रतारणा आहे हे आपण विसरता कामा नये. (***जर का ते आदर्श ठरत असेल तर...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तिन्ही भावंडांनी घालुन

मृत्युन्जय
Sun, 02/17/2013 - 19:57 नवीन
तिन्ही भावंडांनी घालुन दिलेल्या आदर्शांची *** प्रतारणा तर होतच नाही. त्यापैकी एखाद्याच्या आदर्शाविरोधी वर्तन असा एखाद्याचा गैरसमज होउ शकतो. प्रत्यक्षात शत्रुघ्नाचे वर्तन हे इतर तिघांच्या आदर्शांना आणि वर्तनाला अतिशय पूरक असल्याचे दिसुन येते. शत्रुघ्नाने निर्लेप वृत्तीने राज्याची सेवा केली त्यामुळेच तर इतर तिघे आदर्श निर्माण करणारे वर्तन करु शकले आणी त्यांच्या धर्माचे पालन करु शकले. प्रत्येक भाऊ आपापल्या भूमिकेत एक आदर्श जीवन जगला असेच म्हणावे लागले. *** चुका करुन का होइना चारही भाऊ आदर्श निर्माण करुन गेले यात शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

=))=))=))

अग्निकोल्हा
Mon, 02/18/2013 - 07:45 नवीन
चुका करुन का होइना भाऊ आदर्श निर्माण करुन गेले यात शंका नाही ?
=)) आता क्रेडीट चुकांना द्यायचा विचार झाला की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तसेच आदर्श शत्रुघ्न युध्द काळात

अग्निकोल्हा
Mon, 02/18/2013 - 07:52 नवीन
सैन्य घेउन मदतिला का येउ शकला नाही याबद्दल मला स्वतःला वैयक्तिक कुतुहल आहे, तो चर्चेचा मुख्य मुद्दा नाही पण अनुशंगाने उजेड जरुर टाकावा. भरताकडे बहुदा सैन्यच न्हवते, लक्ष्मण तर सावलीच होता... शत्रुघ्न चा मोबाइल स्विचॉफ होता काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

सैन्य घेउन मदतिला का येउ शकला

मृत्युन्जय
Mon, 02/18/2013 - 11:18 नवीन
सैन्य घेउन मदतिला का येउ शकला नाही याबद्दल मला स्वतःला वैयक्तिक कुतुहल आहे, भारीच ब्वॉ कुतुहल तुम्हाला. तुमच्या रामालाच विचारा की त्याने सैन्याची मदत का नाही मागितली ते. कदाचित तुमच्या रावणाने टेलिफोन लाइन्स कट केल्या असतील. आम्हाला काय विचारता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तुमच आमच असं यात काही यात नाही!

अग्निकोल्हा
Mon, 02/18/2013 - 20:34 नवीन
कदाचित तुमच्या रावणाने टेलिफोन लाइन्स कट केल्या असतील. आम्हाला काय विचारता?
म्हंणजे तुम्हाला याबद्दल काही माहितीच नाही ? असुदे आपण शत्रुघ्न अदखलपात्र कसा आहे याची चर्चा करतोय त्यामुळे तुमचा माहितीचा अभाव तुमच्या मुद्याच्या विरोधात न्हेणार नाही हे नक्कि. असो... सविस्तर प्रतिसाद या आधिच इथे दिलेला होता ज्यात शत्रुघ्नाचे पुरक वर्तन या अनुशंगाने मुख्य मुद्दे मांडलेले आहेत अवश्य वाचावा. शत्रुघ्नचे वर्तन जे आपण पुरक मानत आहात ते खरच परिस्थितीजन्य / आदर्श होते का यावरतीही प्रश्न निर्माण होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अहो तो रावण येऊन रोज तुमच्या

मृत्युन्जय
Tue, 02/19/2013 - 10:28 नवीन
अहो तो रावण येऊन रोज तुमच्या कानात गुफ्तगू करुन जातो तसा तो आमच्याकडे येत नाही. त्यामुळे रामायणातली अद्ययावत दळणवळण यंत्रणा याबाबत त्याने मला मौलिक माहिती दिली नाही. ;) शिवाय त्या काळच्या आयडिया / व्होडाफोनचे रेकॉर्ड माझ्याकडे नाही. वाल्मिकी कडे आणि तुलसीदासाकडेही नव्हते त्यामुळे त्यांच्याकडुन माहिती मिळण्याची शक्यता मावळली. त्यामुळे तुमच्यावर विसंबुन राहण्यावाचौन पर्याय नाही. तुम्हीच सांगा आता की मोबाइल स्विच ऑफ होता की रेंजच नव्हती की रावणाने मधल्यामध्ये फेरफार करुन शत्रुघ्नाचे कॉल्स इंद्रजीताकडे फॉरवर्ड केले. :P बाकी तुम्ही मोठ्या मनाने माझ्या या अज्ञानाबद्दल माझी कानौघडणी न करत मला सोडुन द्यायचे ठरवले त्यामुळे तुमच्या क्षमाशीलतेबद्दल मी शतशः ऋणी आहे :D . मज पामरास याबाबतीत थोडे ज्ञानदान करुन उपकृत करावे. अमल भारतवर्षाची परिक्रमा करुन आपण मिळवलेले मौलिक ज्ञान इतर अज्ञ मानवासही थोडे द्यावे अशी नम्र विनंती :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

अहो पण चुका केल्या म्हणुन

मृत्युन्जय
Mon, 02/18/2013 - 11:16 नवीन
अहो पण चुका केल्या म्हणुन चांगल्या कामांचे आणि निर्माण केलेल्या आदर्शांचे क्रेडिट देखील नाही द्यायचे काय? नाही मह्णजे उद्या दाउदने एखादे सत्कर्म केले तर त्याची पापे लक्षात घेता त्याला क्रेडिट दिले गेले नाही तर समजु शकतो. पण गोष्ट जेव्हा राम - लक्ष्मणाची असते तेव्हा तोच आदर्श कसा काय असु शकतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

सविस्तर प्रतिसाद आधिच इथे

अग्निकोल्हा
Mon, 02/18/2013 - 20:39 नवीन
सविस्तर प्रतिसाद आधिच इथे दिलेला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सविस्तर प्रतिसाद तुमच्या

मृत्युन्जय
Tue, 02/19/2013 - 10:58 नवीन
सविस्तर प्रतिसाद तुमच्या सविस्तर प्रतिसादाखाली दिलेला आहे तरी तो जरुर वाचावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

समजा रामायण घडले नसते व राम

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/14/2013 - 18:22 नवीन
समजा रामायण घडले नसते व राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे शांतपणे जन्मले तिथेच राज्य उपभोगुन अंती सहकुटुम्ब वानप्रस्थाला निघुन जाउन इश्वरचरणी लिन झाले याबद्दलही ड्यु क्रेडिट मिळणेही गरजेचे ठरलं असतं काय ?
मी काय म्हणतो, जर हा धागाच निघाला नसता, तर ह्याची गरज पडली असती काय ?
संपादनाचे अधिकार असणार्‍या एका व्यक्तिने त्याच्या संपादकिय अधिकाराचा गैरवापर करत माझा येथिल आधिचा प्रतिसाद मला कोणतिही सुचना व कारण न देता परस्पर उडवल्या बद्दल निषेध.
नाही आवडला तुमचा पहिला प्रतिसाद, म्हणून उडवला गेला पण दुसरा प्रतिसाद तर टिकला ना तर उगाच निषेध म्हणुन बोटं मोडण्यात काय हशिल ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

मी काय म्हणतो, जर हा धागाच

मृत्युन्जय
गुरुवार, 02/14/2013 - 18:41 नवीन
मी काय म्हणतो, जर हा धागाच निघाला नसता, तर ह्याची गरज पडली असती काय ? हे बघ आता हे पुढे नेउन " हा मृत्युंजय जन्मलाच नसता तर.............." असे नको होउ देउस बरे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मी काय म्हणतो, जर हा धागाच

अग्निकोल्हा
Fri, 02/15/2013 - 00:39 नवीन
मी काय म्हणतो, जर हा धागाच निघाला नसता, तर ह्याची गरज पडली असती काय ?
पडल्यास स्विकारायची तयारी आहे काय ?
नाही आवडला तुमचा पहिला प्रतिसाद, म्हणून उडवला गेला पण दुसरा प्रतिसाद तर टिकला ना तर उगाच निषेध म्हणुन बोटं मोडण्यात काय हशिल ?
मग काय मोडायचं तुम्ही सुचवता बरे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पडल्यास स्विकारायची तयारी आहे

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/19/2013 - 11:34 नवीन
पडल्यास स्विकारायची तयारी आहे काय ?
अहो, पदरी पडले पवित्र झाले ! तुम्हाला नाही का सदस्य म्हणून स्विकारले.
मग काय मोडायचं तुम्ही सुचवता बरे ?
तुमच्याकडे काही असेल मोडायसारखे तर मोडा.. नाहीतर गाजराची पुंगी बनवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तुमच्याकडे काही असेल

स्पा
Wed, 02/20/2013 - 10:38 नवीन
तुमच्याकडे काही असेल मोडायसारखे तर मोडा.. नाहीतर गाजराची पुंगी बनवा.
चुकून गुजरात्याची पुंगी बनवा असे वाचलेअसो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

दखल

संपादक मंडळ
गुरुवार, 02/14/2013 - 18:32 नवीन
काही तांत्रिक कारणाने येथील मूळ प्रतिसाद उडाला असावा. आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे आणि सदर प्रतिसाद त्याप्रमाणे संपादित केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

छान

चावटमेला
गुरुवार, 02/07/2013 - 10:02 नवीन
छान लेख. लवणासुर वधाबद्दल माहिती होती (लहानपणी चांदोबा मध्ये वाचल्याचे आठवतेय). पण मी आजपर्यंत भरत आणि शत्रुघ्न हेच सख्खे जुळे भाऊ होते असं समजत होतो. गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद. एक शंका की अशी समजूत का झाली असावी? कदाचित काही साहित्यामध्ये असा चुकीचा संदर्भ आला असावा. जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

राम लक्ष्मण वनवासाला

मृत्युन्जय
गुरुवार, 02/07/2013 - 10:39 नवीन
राम लक्ष्मण वनवासाला जाण्यापुर्वी भरत आणि शत्रुघ्न भरताच्या आजोळी गेले होते. ती संधी साधुन कैकेयीने रामाला वनवासात धाडले असे संदर्भ आहेत. ज्या अर्थी ते दोघे अजोळी गेले होते त्या अर्थी तेच भाऊ असणार असा आभास निर्माण होतो. शिवाय नावे घेताना नेहमीच राम - लक्ष्मण, भरत - शत्रुघ्न असा उल्लेख होतो. तेही एक कारण असावे. त्याशिवाय एक कारण म्हणजे राम - लक्ष्मण वनवासाला गेले. त्यापैकी फक्त रामाने वनवासाला जावे असे कैकेयीने सुचवले होते. लक्ष्मणाबद्दल तिला काही अढी नव्हती कारण रामानंतर मोठा भरत होता त्यामुळे रामानंतर सिंहासनावर हक्क त्याचा होता. लक्ष्मण स्वेच्छेने रामाबरोबर गेला. पण लोकांना असे वाटते की कैकेयीने त्याच्यासाठीही वनवास मागितला होता. आणि ज्या अर्थी शत्रुघ्नासाठी मागितला नव्हता आणी ज्या अर्थी ते दोघेही (भरत आणि शत्रुघ्न) अयोध्येत राहिले त्याअर्थी ते दोघे भाऊ असावेत असा लोकांचा समज होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

छान

प्रमोद्_पुणे
गुरुवार, 02/07/2013 - 11:17 नवीन
छान लेख बरिच नवीन माहिती समजली. अशाच फारशा परिचीत नसलेल्या व्यक्तिरेखांवर वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

मस्त

हासिनी
गुरुवार, 02/07/2013 - 11:26 नवीन
मस्त लेख!! आवडला!!! :)
  • Log in or register to post comments

शतृघ्न कोणाचा मुलगा?

आनंद घारे
गुरुवार, 02/07/2013 - 20:28 नवीन
याबद्दल पाठभेद आहेत. तो कैकेयीचा मुलगा होता असेच मला लहानपणी सांगितल्या गेलेल्या रामायणात होते, पण तो सुमित्रेचा मुलगा होता असे अनेक ठिकाणी वाचले किंवा ऐकले आहे. बहुधा तुलसीदासांच्या रामचरितमानसमध्ये तसे असावे. त्याला वनवास घडला नाही, तो पर्णकुटीमध्ये न राहता राजवाड्यातच राहिला वगैरे पाहता त्याचे काही बिघडले नाही असे दिसते.
  • Log in or register to post comments

शत्रुघ्न सुमित्रेचाच मुलगा.

मृत्युन्जय
गुरुवार, 02/07/2013 - 20:40 नवीन
शत्रुघ्न सुमित्रेचाच मुलगा. लक्ष्मणाचा जुळा भाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

आधार

आनंद घारे
Fri, 02/08/2013 - 11:30 नवीन
हे विधान कोणत्या आधारावर केले जाते? राम वनवासाला गेला त्यावेळी शत्रुघ्न कोठे होता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

वाल्मिकी रामायणाच्या इंग्रजी

मृत्युन्जय
Fri, 02/08/2013 - 12:07 नवीन
वाल्मिकी रामायणाच्या इंग्रजी अनुवादातुन पुढील उतारे घेतले आहेतः And Queen Kaikeyí bore a child Of truest valour, Bharat styled, With every princely virtue blest, One fourth of Vishnu manifest. Sumitrá too a noble pair, Called Lakshman and S'atrughna, bare, Of high emprise, devoted, true, Sharers in Vishnu's essence too. शत्रुघ्न लक्ष्मणाचा नसुन भरताचा जुळा भाऊ आहे हा प्रवास पसरण्यास मुख्य कारण हेच असावे की रामाने वनवासासारठी जेव्हा प्रस्थान केले तेव्हा शत्रुघ्न भरताबरोबर भरताच्या आजोळी होता. बाकी अजुन कारणे वरती एका प्रतिसादात देखील नमूद केली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

आणि हा मूळ संस्कृतातला दाखला

प्रचेतस
Fri, 02/08/2013 - 13:30 नवीन
आणि हा मूळ संस्कृतातला दाखला प्रोद्यमाने जगन्नाथं सर्वलोकनमस्कृतम् । कौसल्याजनयद् रामं दिव्यलक्षणसंयुतम् ॥ भरतो नाम कैकेय्यां जज्ञे सत्यपराक्रमः । साक्षाद् विष्णोश्चतुर्भागः सर्वैः समुदितो गुणैः ॥ अथ लक्ष्मणशत्रुघ्नौ सुमित्राजनयत् सुतौ । सर्वास्त्रकुशलौ वीरौ विष्णोरर्धसमन्वितौ ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अध्याय आणि श्लोक क्रमांक न

नाना चेंगट
Fri, 02/08/2013 - 13:33 नवीन
अध्याय आणि श्लोक क्रमांक न दिल्याने सदर संदर्भ आधारहीन आहे असे आम्ही दाखवून देऊ इच्छितो. तसे हा श्लोक तुम्ही तुमच्याच मनाने लिहिला नाही हे कशावरुन? ऑ !! (विज्ञाननिष्ट) नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काय हे नाना, रामायणात अध्याय

प्रचेतस
Fri, 02/08/2013 - 13:39 नवीन
काय हे नाना, रामायणात अध्याय नसून सर्ग आहेत हे तुम्हास माहित नव्हे काय? :) असो. बालकांड, सर्ग १८, श्लोक १०, १३ आणि १४.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

माहीती बद्दल धन्यवाद

नाना चेंगट
Fri, 02/08/2013 - 13:40 नवीन
माहीती बद्दल धन्यवाद :) तुम्ही दिलेली माहिती पडताळून पाहिली जाईल ;) (तार्किक) नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

फारच विदानिष्ठ ब्वॉ तुम्ही.

प्रचेतस
Fri, 02/08/2013 - 13:42 नवीन
फारच विदानिष्ठ ब्वॉ तुम्ही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

विज्ञाननिष्ट व्हायचे म्हणजे

नाना चेंगट
Fri, 02/08/2013 - 13:44 नवीन
विज्ञाननिष्ट व्हायचे म्हणजे विदानिष्ट व्हावेच लागते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

प्रचेतस
Fri, 02/08/2013 - 13:46 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

नवीन माहिती

नक्शत्त्रा
Fri, 02/08/2013 - 14:07 नवीन
छान नवीन माहिती समजली. अशाच अपरिचीत व्यक्तिरेखांवर वाचायला आवडेल. संस्कृतातला दाखला दिल्याने लेख आणखी चांगला झाला आहे.
  • Log in or register to post comments

वाचनिय, मस्त लेख...

इशा१२३
Wed, 02/13/2013 - 23:31 नवीन
वाचनिय, मस्त लेख...
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकर्त्यांना

मृत्युन्जय
गुरुवार, 02/14/2013 - 13:07 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांना पुनःश्च धन्यवाद.
  • Log in or register to post comments

आभारी आहे

नाना चेंगट
Fri, 02/15/2013 - 09:45 नवीन
आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

उत्तम

श्रीरंग_जोशी
Fri, 02/15/2013 - 00:57 नवीन
शतुघ्नाच्या दुर्लक्षित कामगिरीविषयी प्रथमच वाचण्यास मिळाले. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मृत्यंजय , प्रतिसाद वाचणेस त्रास होतोय म्हणुन इथे लिहतो!

अग्निकोल्हा
Mon, 02/18/2013 - 08:18 नवीन
प्रतिसाद वाचणेस त्रास होतोय म्हणुन इथे लिहतो!
चुका करुन का होइना भाऊ आदर्श निर्माण करुन गेले यात शंका नाही ?
:) आता क्रेडीट चुकांना द्यायचा विचार झाला की काय ? तसेच आदर्श शत्रुघ्न युध्द काळात सैन्य घेउन मदतिला का येउ शकला नाही याबद्दल मला स्वतःला वैयक्तिक कुतुहल आहे, तो चर्चेचा मुख्य मुद्दा नाही पण अनुशंगाने उजेड जरुर टाकावा. भरताकडे बहुदा सैन्यच न्हवते, लक्ष्मण तर सावलीच होता... शत्रुघ्न चा मोबाइल स्विचॉफ होता काय ? मुळातच विरोधाभासी वागणुक असताना ज्या महाकाव्याच्या मुलभुत घटनाक्रमात अथवा घटनांना कलटणी देणार्‍या कृत्यामधे शत्रुघ्नाचे ठोस योगदानच नाही त्यात त्याला क्रेडीट न दिल्या बद्दल विषेश दखल कशाला ? थोडक्यात जर लक्ष्मणासोबत तो ही निघाला असता... १) रामाची सेवा घडली असती. २) निरपेक्षपणे का होइना भरताकडुन राज्य करणे घडले असते, त्याच्या मातेला संतोष मिळाला असता. त्याच उद्देशाने तर रामाने राज्यत्याग केला होता. ३) सिता एकटी पडली नसती व रावणाला तिला पळवायची संधी मिळाली नसती. होता जिवा म्हणुन वाचल शिवा म्हणतात तसे होता शत्रुघ्न म्हणुन राहीला श्रीराम प्रसन्न असे काही क्षणोक्षणी ऐकायला मिळाले असते पण त्या वेळी एखाद्याने कदाचीत गैरसमजातुन भरताला त्या रामायणात राम नसताना राज्य केल्याबद्दल क्रेडीटच दिलं गेलं नाय म्हणुन ओरड केली असती हा भाग अलहिदा.
  • Log in or register to post comments

तुमच्या दोघांपैकी कुणी थकणार

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 02/18/2013 - 22:17 नवीन
तुमच्या दोघांपैकी कुणी थकणार आहे की नाही ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

वैचारीक मैथुनात कुणीही थकत

नाना चेंगट
Mon, 02/18/2013 - 23:11 नवीन
वैचारीक मैथुनात कुणीही थकत नसतं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मला लेच उत्साह आहे. किमान

मृत्युन्जय
Tue, 02/19/2013 - 11:01 नवीन
मला लेच उत्साह आहे. किमान धाग्याने शंभरी गाठेपर्यंत तरी. नाहितर आमच्या धाग्यांनी कधी १०० प्रतिसाद बघावेत. नर्मदामैय्याच्या कृपेने जरा बरे दिवस आले आहेत तर तुम्ही आला लगेच दृष्ट लावायला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

तसे आधी सांगितले असते तर

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 02/19/2013 - 11:24 नवीन
तसे आधी सांगितले असते तर हातभार लावला असता ना भौ ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा