चपला आणि सत्कार

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
4 Oct 2011 - 8:17 pm

दै. संचार - तारीख - १३.०९.२०११ पहिले पान

स्था. वार्ताहर - सोलापुर शहर

दिनांक ११ सप्टेंबर रोजी शहरात श्री गणॅश विसर्जन मिरवणुक सकाळी साडेदहा वाजता सुरु झाली. मिरवणुकीच्या दोन्ही मार्गावर बंदोबस्तासाठी शहर पोलीस व राज्य राखीव दलाच्या ८ तुकड्या तैनात करण्यात आलेल्या होत्या. सदर वृत्त हाती येईपर्यंत मानाच्या १२ गणपतींपैकी ३ गणपतींचे विसर्जन पुर्ण झालेले असुन, पत्रा तालिम मंडळाचा गणपती मल्लिकार्जुन देवळाच्या चौकात तर पाणिवेसचा गणपती टिळक चौकात होते. या वर्षी पाणिवेस मंडळाने डॉल्बी स्पिकरच्या भिंती न उभ्या करता फक्त ढोल व ताशे असाच मिरवणुकीचा थाट केल्याने समाजातील सर्व थरातुन कौतुक केले जात आहे. या बद्दलचे अधिक फोटो पान क्रमांक ४ वर.
......................................................................
एकतर काल पेपर नाही आणि आज ही नेहमीच्या बातम्या वाचुन निराश झालेला हर्षद, माधवी चहा देते का याकडे लक्ष देउन संचारची पानं उलटत होता. लग्नाआधी घरात नियमित मिळणारा चहा लग्नानंतर ब-याच प्रेस्टीज प्वाईंट पैकी एक का होतो यावर त्याचा मेंदु एका बाजुला विचार करतच होता, आता चवथ्या पानावरचे फोटो बघावेत, चुकुन एखादा आपला फोटो असेल असा विचार करुन तो फोटो पहायला लागला, सगळ्या फोटोच्या शेवटी उरलेल्या जागेत आता टाकायचीच म्हणुन टाकलेली एक बातमी होती, बाकी बातम्यांबरोबर आणि फोटो बरोबर न जुळणारी, पण त्यामुळेच लगेच नजरेत भरलेली., संचारची घडी घालुन ती बातमी वाचायला सुरुवात केली.

स्था. वार्ताहर - सोलापुर ग्रामिण

,,,,

------------------
अर्थातच - क्रमश :

कथासमाजराहती जागाबातमीप्रतिभा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

4 Oct 2011 - 8:54 pm | प्राजु

ओह... कम ऑन!! :-|

काय झालं एकदम? ल्ह्यायचे थांबलात का?
सोलापुरातही सुरक्षाव्यवस्थेशिवाय विसर्जन होत नाही, तिथेही मानाचे गणपती असतात हे या बातमीवरून दिसून आले.
मला वाटलं फक्त पुण्यातच असतं काय असं!;)

बहुगुणी's picture

4 Oct 2011 - 8:59 pm | बहुगुणी

कसल्या झपकन् 'क्रमशः' आलंय! कमीत कमी पॅराग्राफ्स मध्ये कमाल उत्सुकता :-)

प्रास's picture

4 Oct 2011 - 9:14 pm | प्रास

हे हो काय?

वाचायला सुरूवात नाही केली तर 'क्रमशः'?

बहुत नाइंसाफी हैं भौसाहेब.....

लिहा पुढचे प्रकरण लौकरात लौकर.....

:)

पुढील भाग वाचण्यास उत्सुक...

इंटरनेटस्नेही's picture

4 Oct 2011 - 9:54 pm | इंटरनेटस्नेही

पुढील भागाच्या प्रति़क्षेत.

प्रचेतस's picture

4 Oct 2011 - 10:04 pm | प्रचेतस

काय हो पन्नासराव, इतक्यातच क्रमशः...!
पुढचा भाग येउ द्या लवकर.

शीर्षक आणि आशय वाचून पुण्यातील अनंतचतुर्दशीच्या मिरवणुकीची आठवण आली.
आदल्या दिवशी मंडळांचा सत्कार होतो आणि दुसर्‍या दिवशी रस्त्यात चपलांचा खच पडलेला दिसतो.

निवेदिता-ताई's picture

4 Oct 2011 - 10:10 pm | निवेदिता-ताई

पुढचा भाग येउ द्या लवकर.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

अत्रुप्त आत्मा's picture

4 Oct 2011 - 10:29 pm | अत्रुप्त आत्मा

इतक्या पटकन क्रमशः का?... चांगला शिनुमा सुरु झाला,आणी अता मुळ विषयाला तोंड फुटणार,एवढ्यात लाइट गेले... व थेटर मधे... अंधार......... :-(

धन्या's picture

4 Oct 2011 - 10:42 pm | धन्या

हेम्याच्या श्टोरीचं काय झालं ?

स्मिता.'s picture

4 Oct 2011 - 10:49 pm | स्मिता.

याला म्हणतात प्रसिद्धीकरताचे स्टंट!!
उगा ४ ओळी खरडून उत्सुकता वाढवायची आणि क्रमशः टाकून महिनाभर आराम करायचा... ;)

५० फक्त's picture

5 Oct 2011 - 8:28 am | ५० फक्त

''महिनाभर आराम करायचा...''

स्मितातै, हे शब्दशः खरं आहे, सध्या एका पायावर भुमि पादाक्रांत करतो आहे त्यामुळं आरामच आहे.

स्मिता.'s picture

5 Oct 2011 - 3:46 pm | स्मिता.

अरे!? असं कारण आहे का? कुठे धडपडलात (हा शब्द हलकेच घेणे) बरे? ;)
काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा :)

धन्या's picture

5 Oct 2011 - 7:07 pm | धन्या

पन्नासराव, सांगा की कुठे धडपडलात ते. ;)

रेवती's picture

5 Oct 2011 - 8:41 pm | रेवती

तेच म्हणते. सांगा की पन्नासराव, फक्त एकदाच सांगा.
मी धडपडले तेंव्हा नाही का तुम्ही येऊन चौकशी केलीत!;)

प्रीत-मोहर's picture

4 Oct 2011 - 10:56 pm | प्रीत-मोहर

काय हे.. ष्टुर्‍या अर्धवट ठेवल्या तर हेम्याला उलटी गणित सांगायला लावणार .....

<निर्मीती सावंत मोड>आणी हे अस करत का कोणी? कथा अशी अपुर्ण नाही ठेवायची रे....

ओ प्रिमोबै, निर्मीती सावंत मोड फक्त फक्त चालू केलात. बंद नाही केलात. भलतंच व्हायचं ना. :)

श्रावण मोडक's picture

5 Oct 2011 - 2:11 pm | श्रावण मोडक

कोडर आहेत त्या... ;)

अच्छा, असं आहे होय. प्रोडक्शन सपोर्टवाल्याच्या पोटयापाण्याची सोय केली म्हणायची तर. ;)

बर्‍याच दिवसानी संचार च नाव ऐकुन रंगा वैद्य (संस्थापक संचार) यांची आठवण आली लहान पणी त्यांच्या घरा जवळ्च रहात होतो,

मन१'s picture

5 Oct 2011 - 7:54 am | मन१

प्रतिक्रिया पुढला भाग वाचल्यावरच देउ शकेन....

प्यारे१'s picture

5 Oct 2011 - 8:58 am | प्यारे१

___/\____

आता लिगामेण्ट शिऊन परत मिळे पर्यन्त भराभरा आधीची ष्टोरी पूर्ण करा आणि हिचे भाग पण पटापट टाका.

चपला आणि सत्कार
हे वाचुन इथले जुने दिवस आठवुन राहिले! म्हंटल नक्की मँटर काय झालयं ? (याचा डार्क मॅटरशी जवळुन देखील संबंध नाही.)
उघडुन पाहिले तर हा फास्ट ट्रॅक धागा दिसुन राहिला...बरं वाटल !
पुढचा भाग जरा मोठा आणि लवकर टंका.

५० फक्त's picture

6 Oct 2011 - 12:07 am | ५० फक्त

भाग -२ टाकला आहे - http://misalpav.com/node/19352