मिसळगावाच्या कवीश्वर बाजारात भानगड
चटपटीत चांगलचुंगलं खाण्याचा शौक होताच. मिसळगावाच्या कवीश्वर बाजारात एक छोटीशी टपरी टाकली. आपल्याला धंद्याची काय येवढी पडलेली नाही. जनशेवा महत्वाची. म्हणून टपरीवर पोटाला सोसेल एवढेच खा असा संदेश देणारी कार्टून्स पण लावून ठेवली. धंदा कमी झाला तरी चालेल, पण निदान लोकांनी आपल्या मालाचे निदान कौतुक तरी करावे अशी माफक अपेक्षा होती. टपरीवर केळी, शेंगादाणे, असे हौसेने मांडून ठेवले. चटमटीत मिसळ होती. म्हटले चार लोक खाऊन नाही, तरी निदान वास घेऊन कौतुक करतील.