असली-नकली

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
27 Oct 2009 - 8:36 am

व्हिटी स्टेशच्या बाहेर पडून जीपीओ कडे वळलं की रस्ता फोर्ट मार्केटच्या दिशेनी वळतो.
उजवीकडचं वळण टाळलं की सरळ डॉक्सकडे जाणार्‍या या रस्त्याला वालचंद हिराचंद मार्ग म्हणतात.
थोडं असंच पुढे गेलं की बॅलार्ड पियर लागतं .
एकेकाळी नरीमन पॉईंट नव्हतं तेव्हा सगळ्या विदेशी कंपन्यांची ऑफीसं इथेच होती.जुन्या आयताकृती तासलेल्या दगडांच्या इमारती म्हणजे ब्रिटीश आर्कीटेक्चरच्या नमुना आहेत.फार पूर्वीचं फेमस रेक्स थिएटरपण इथेच होतं .आता ते नाही .त्याच्या जागी एक नवीन बटबटीत इमारत उभी झाली आहे.
एकेकाळी गजबजलेल्या या परीसरात आता संध्याकाळी सात नंतर शुकशुकाट होतो.एखादाच दारु पिऊन मस्त झालेला खलाशी आणि भरकटत आलेली वेश्या आणि गल्लीत माना मुडपून पडलेले चरसी .
वालचंद हिराचंद रस्ता आणि आतून येणारा रामजीभाई कमानी मार्ग एकमेकांना कापतात तिथे बिर्ला कंपनीची एक जुनी बिल्डींग आहे. या बिल्डींगला खेटून एक पेट्रोलपंप पण आहे. या पंपामुळे या इमारतीचे कमानदार प्रवेशद्वार झाकले जाते. या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर डिआरायचं ऑफीस आहे जिथे ही कथा सतरा जुलैच्या दुपारी सुरु झाली.

अरविंद सलढाणा उशीर होऊ नये म्हणून तासभर आधीच ऑफीसात पोहोचला होता.
दुपारी दोन वाजता मिटींग बोलावली आहे म्हणून फिल्डमध्ये असणारे बहुतेक सगळे आयो (इंटेलीजन्स ऑफीसर) त्यांच्या सेक्शनचे सिनीअर आयो आज सकाळपासून ऑफीसात आले होते.दुपारी बारापासून ठिय्या देऊन बसलेला पाऊस बघून मिटींग शक्य तितक्या लवकर सुरु होऊम संपली तर बरं असं प्रत्येकाच्या मनात होतं म्हणून आपापल्या सेक्शनच्या फायली तयार करून गप्पा मारत होते.
मोहन बाक्रे आपला डबा संपवून पेपर वाचत असले तरी त्यांचे कान ऑफीसच्या वर्दळीकडे होते. एकदा खिडकीतून बाहेर नजर टाकून त्यांनी स्वतःशीच मान डोलावली.आपला हा मुंबईतला शेवटचा कदाचीत शेवटून दुसरा मान्सून .बस. शेवटची काही वर्षं.मग गावाला जायचं नक्की झालं होतं. काय करायचं हा प्रश्न बाक्र्यांना पडणार नव्हता.
आता काही पाशही शिल्लक नव्हते.गेल्या मे महीन्यात त्यांची पत्नी गेल्यापासून त्यांना निवृत्तीचे वेध जास्तच लागले होते.
त्यांची मुलगी बंगलोरला स्थायीक झाली होती.सुरुवातीला ते रोज फोन करायचे नंतर ओढून ताणून एकमेकांना बांधून ठेवण्याचा त्यांना कंटाळा आला.
मुलगी संसारात रमली होती.रोज फोन करून पुन:पुन्हा आठवणींना उजळणं त्यांना नकोसं झालं होतं.
गेल्याच वर्षी पार्ल्याच्या घराला कुलूप लावून ते अँटॉप हिलच्या स्टाफ क्वार्टरमध्ये रहायला आले होते. येताना चार भांडी सोडल्यास पंचवीस वर्षाच्या संसाराची एकही खूण ते घेऊन आले नव्हते.
पत्नीच्या मृत्युनंतर त्यांना व्यसन लागायची भिती वाटत होती म्हणून गेले नऊ महीने त्यांनी आठवड्यात होणारं एखादं ड्रिकींग सेशन पण बंद केलं होतं.
पिणं बंद केल्याचं बक्षीस म्हणून गेल्या महीन्यात त्यांनी स्वतःला एक कॅमेरा बक्षीस घेऊन दिला होता.आता ते आणि कॅमेरा .असा विचार मनात येता येता डिपार्टमेट मधला गलबला वाढल्याचं त्यांच्या ध्यानात आलं.
बुलीयन आणि नार्कोचे आयो नेहेमीप्रमाणे मोठ्मोठ्यानी ओरडत ऑफीसमध्ये आले होते.डीआरआय मध्ये सगळेच इंस्पेक्टर सारखे पण हे मात्र इतरांपेक्षा अधीक ....
सम अ‍ॅनीमल्स आर मोर इक्वल असा विचार मनात ये येता थांबला तो प्रभात तिवारी च्या आवाजानी.
प्रभात तिवारी आणि अरविंद सलढाणा त्यातल्या त्यात नविन आयो.
दोघंही डायरेक्ट भरतीतले.
सलढाणा आधी पॅराट्रुपर होता आणि प्रभात तिवारी आर्टीलरीवाला.
का कुणास ठाउक पण प्रभात बरोबर काम करायला बरेच जण नाखूष असायचे.

पार्टीशनच्या पलीकडून बाक्रेना शर्मांनी हाक मारली.शर्मा डीइपीबी आणि इओयुचं काम बघायचे.
"बाक्रेसाहेब आजच्या मिटींगचा अजेंडा काय आहे ?"
"शर्मा , डीआरयमध्ये अजेंडा कधीपासून आधी कळवायला लागले.?"
"तसं नाही हो साहेब ,तुम्ही सध्या फिल्डमध्ये नाही म्हणून विचारलं ."
शर्मानी नकळत बाक्र्यांच्या दुखर्‍या मनावर टिचकी मारली होती.
"शर्माजी ,मी तर आता निवृत्त होणार म्हणून गेले चार महीने माझ्यासाठी पार्कींग लॉटचा शोध चालू आहे .बघू या ."
शर्मा आपल्या जागेवरून उठून मोहन बाक्र्यांच्या जवळ आला.
"आपल्याकडे हीच समस्या आहे. आता तुम्ही निवृत्त होण्यापूर्वी एकेका यंगस्टरला ब्रीफ केलंत तरी आपलं रेकॉर्ड सुधारेल."
"रेकॉर्ड काय सुधारायचं आहे.गेल्या पाच वर्षाचं अ‍ॅरेस्ट-अ‍ॅक्वीटल अ‍ॅरेस्ट-कन्वीक्शन रेशीओ वाचा."
"मी तेच म्हणतो.माझा एकही ज्युनीअर गेल्या महीन्यात कोर्टात हजर नव्हता.आज मिटींगमध्ये हा इश्यु येणार आहे."
शर्मा आणखी काही बोलत राहीले असते तेव्हढ्यात शिपायानी मिटींग सुरु होत असल्याचा आवाज दिला आणि सगळे घाईघाईत मोंडल साहेबांच्या केबीनमध्ये शिरले.

डीआरआय आणि इतर सरकारी कार्यालयांच्या अवतारात फारसा फरक नाही .कारकूनी काम करणारे वर्षानुवर्षं टेबल धरून बसतात ते निवृत्तीच्या रजेपर्यंत.
डीआराअयची स्थापना केंद्रीय अर्थविभागानी केली असल्याने बरेचसे ऑफीसर फायनान्स मधून इथे आले आहेत.
काही जनरल कस्टम काही मरीन प्रिव्हेंटीव तर बरेचसे केंद्रीय अबकारी खात्यातून डेप्युटेशनवर आले आहेत.
डायरेक्ट रीक्रूट आहेअत ते सगळे नव्या जनरेशनचे.मोहन बाक्रे आणि शर्मा वगैरे जुन्या पठडीचे त्यामुळे एकमेकांना बांधून ठेवणारा धागा अस्तित्वात नाही.
नविन डिव्हीजन चीफ चक्रधर मोंडल गोहाटीहून बदली होऊन आले होते.गोहाटीत अनुभव फार मर्यादीत होता आणि तो लपवण्याची खटपट करता करता अनेक वेळ हाताखालचे सिनीअर आयो दुखावले जायचे.
आपल्या हाताखालच्या प्रत्येक माणसावर आपला ताबा रहावा म्हणून आपापसात गैरसमज पसरवण्याचं तंत्र त्यांना चांगलंच अवगत होतं .
दोन वाजता त्यांची केबीन जवळ जवळ पूर्ण भरली होती.
पहील्या चार खुर्च्यांवर सिनीअर इंटेलीजन्स ऑफीसर .त्यांच्या मागे त्यांचे ज्युनीअर्स. दोन कोपर्‍यापैकी एका खुर्चीत ऑफीस सुपरीटेंडंट .
दुसर्‍या कोपर्‍यात मोहन बाक्रे.बाक्र्यांच्या मागे अरविंद सलढाणा आणि त्याच्या मागे प्रभात तिवारी.
केबीनचं दार बंद झाल्यावर शांतता पसरली .फक्त डोक्यावरच्या पंख्याचा आवाज. मोंडलनी आपले हात जोडून डोळे बंद करून हळू आवाजात बोलायची सुरुवात केली. ही त्यांची खास लकब.
बोलताना कुणीतरी प्रश्न विचारला की ते डोळे उघडायचे आणि मग खरी मिटींग सुरु व्हायची.
आधी मुंबई डिव्हीजनचं कौतुक .
मग गोहाटीच्या पावसाचं कौतुक.
मग कोर्टाच्या तारखेपासून सुरुवात झाली. कोर्टाच्या तारखांना यावेळी गैरहजर राहील्यास सेंशर इश्यु करायची तंबी .
हेही नेहेमीचं असल्यामुळे कुणीच काही बोलायला तयार नव्हतं.
त्यातल्या त्यात नव्या अटकेच्या बातम्या आणि काही क्रॉस लिंक असल्यास लवकरात लवकर कळवण्याची विनंती.
सगळे ऑफीसर गप्प बसून ऐकत होते.खरं म्हणजे हे सगळं त्यांना दहा दिवस आधी माहीती असतं.
एक छोटासा पॉज. मोंडल साहेबांनी अजून डोळे उघडले नव्हते.
डीएच्या अ‍ॅडीशनल स्लॅब आल्याची बातमी.
शर्मानी एक मोठी जांभई दिली मग सगळ्यांनी जांभया द्यायला सुरुवात केली.
इतक्यात मोंडल साहेबांच्या टेबलवरचा फोन वाजला.
मोंडलनी डोळे उघडले.
"हलो.मोंडल हिअर.सेंड हिम राईट इन."फोन खाली ठेवत मोंडलनी घोषणा केली.
"आपल्या सगळ्यांच्या एक खास पाहुणा वक्ता आज मी बोलावला आहे."
असं काही म्हणेस्तोवर एका काळासा बुटका मध्यमवयीन माणूस आत आला.
मोंडलनी उठून उभं राहून त्यांचं स्वागत केलं .
"फ्रेंड्स .धिस इज मिस्टर मणी नायर ,पीआरओ नासिक सिक्युरीटी प्रेस.मी खास आज त्यांना बोलावलं आहे .ते इंडीयन करन्सी एक्सपर्ट आहेत."
सगळ्यांनी टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत केलं .
मोंडलसाहेबांचा चेहेरा खुलला.
"नाउ इफ यु आस्क मी व्हाय करन्सी एक्सपर्ट देन आय विल टेल यु लेटर बट फर्स्ट .."
मणी नायरचं लक्ष तोपर्यंत मोहन बाक्रेंकडे गेलं होतं.
"अरे बाक्रे सर, आप इधर कभी आये ?"
"दो साल हो गये मणी."
नायर मोंडलकडे वळून म्हणाले
"अरे मोंडल साहेब , बाक्रे सर है तो मेरी क्या जरूरत है ?"
मणी नायर आणखी काही बोलणार होते तेवढ्यात बाक्रेनी त्यांना खूण करून थांबवलं.
मोंडल साहेबांचा चेहेरा जरासा उतरलाच.
"ओव्हर टु यु सर" असं म्हणत मोंडल आपल्या खुर्चीत बसले.
नायरनी खिशातून काही पाचशे रुपयांच्या नोटा काढल्या .
"जंटलमन , मी तुम्हाला काही पाचशेच्या नोटा देतो आहे त्यातल्या खोट्या नोटा तुम्ही ओळखायच्या आहेत."
प्रत्येक ऑफीसरनी हातात आलेली नोट तपासून बघीतली.
उजेडाकडे धरून गांधींचं दर्शन घेतलं.
एक दोन वगळता सगळ्याच नोटा खर्‍या आहेत असं मत पडलं आणि नायरनी नाटकी आवाजात घोषणा केली "जंटलमन ह्या सगळ्याच नोटा खोट्या आहेत."
केबीनमध्ये शांतता पसरली.
नायरना जरा बरं वाटलं आणि आवेशात येऊन त्यानी पुढच्या भाषणाला सुरुवात केली.
पेपर .प्रिंटींग,शाई . वॉटरमार्क लॅटंट प्रिंटींग एकेक शब्द कळत गेले.
बाहेरचा पाऊस सगळेजण विसरले होते.
अर्ध्या तासाच्या लेक्चरनंतर पहील्यांदा नार्कोचे आयो करंगळी वर करून गेले.
पाच मिनीटानी बुलीयनवाले बाहेर पडले.
चहा घेऊन कँटीनवाला आत आला तेव्हा सगळे परत एकदा जागेवर बसले.
चहावाल्यानी पाऊस थांबल्याची बातमी दिली.चुळबुळ वाढली.
आता मणी नायरनी खिशातून आणखी काही नोटा काढल्या .
"नाव जंटलमन ,यु शुड चेक दीज..यु नो फेक करन्सी इज ऑलव्वेस पुश्ड बाय लेडीज ."
"नाव अ लेडी कम्स टू यु एंड ओफर्स...नाव यु सिंबळी फाईंड आउट .वॉट्टेवर शी ऑफ्फर्स इज रीअल ऑर फेक्क."
"वनली वन लूक अँड आय कॅन टेल द डिफरन्स.आप लोगोको भी ऐसा आना चाहीये."
"इतना जादा अनुभव नई है ना ." कुणीतरी कुजबुजलं.
"अगर देकनेसे मालूम नही पडता तो टच करो."
"आयडीआ अच्चा है ".नायरच्या लकबीत एक आवाज आला.
"वेल टच देम .देन तो पक्का मालूम पडता है ."
आपापसातली कुजबुज वाढली.बाक्रेंनी डोळे मिटून घेतले.
प्रकरण वहावत चाललं आहे याची त्यांना कल्पना आली.
"इन्टेलीगो बोलनेका तो हलका हात घुमाओ. रेज्ड सरफेस मालूम पडता है."
आता शर्मानी मागे वळून त्यांचा ज्युनीयर मस्करीत सामील नाही याची खात्री करून घेतली.
अरविंद सलढाणा आणि प्रभात मात्र गंभीरपणे इन्टीलीगो तपासत होते.
मागच्या खुर्चीवरून कुणीतरी विचारलं "नायर साब इसका आगेका टेस्ट क्या है ?"
नायर खूष झाले ."आगेका टेस्ट बोलनेका तो मेरा बोलनेका है एटी ट्वेंटी माल रहेगा तो टच करनेसे भी मालूम नही पडेगा"
"तो फिर क्या करनेका .?"
"जस्ट क्रंपळ देम .क्रंपळ देम हार्ड."
हातवारे करून नायरनी जस्ट क्रंपळ देम ची अ‍ॅक्शन करून दाखवायला सुरुवात केली.
केबीनमध्ये खसखस पिकली.
" क्रंपळ करेगा और लूज पडेगा तो .."
"तो क्या ?"
"माल बोलेगा तो पेपर सही नही है.वेरी सिंबळ."
आता चक्रधर मोंडलनी सूत्र परत ताब्यात घेतली.
नायर खुर्चीवर बसले.
मोंडलनी त्यांच्या हातात एक पांढरा कागद दिला .
हामारा प्रॉब्लेम इधरभी है .
नायरनी कागद उजेडाकडे धरला.
"ये गवरमेंट स्टँपपेपर दिखता है लेकीन बोगस है."
आता सगळे ऑफीसर मस्करी विसरून लक्ष द्यायला लागले.
नायरनी पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली.
"लॉस ऑफ रेवेन्यु .गवरमेंटको लॉस .बनानेवालेको फायदा.आजकल ये पेपर बनता है .पुछो क्यु?"
असं म्हणत त्यांनी स्वतःच उत्तर दिलं .
"बिकाज ये कागज इंडीयामे कहीबी मिलता है.ये एक बार युज होता है.बादमे तिजोरीमे बंद हो गया तो सर्क्युलेशन बंद."
पाच मिनीटात त्यांनी समजावलेला तथ्यांश असा होता की आता नोटा छापणारे बदमाश स्टँप पेपर छापतात.
नोटांचा कागद इंपोर्ट करावा लागतो.
भारतात फक्त होशंगाबादला बनणारा पेपर फक्त सरकार वापरतं.
सरकारी कामात दस्ताऐवज बनवण्यासाठी कागद वापरला गेला की जन्मात तो परत बाहेर येत नाही.
बोगस स्टॅंपपेपर ची हाताळणी कमी असल्यामुळे गवगवा कमी होतो.
आता मात्र मिटींगला एक गंभीर वातावरण तयार झालं .
शर्माजीनी मोंडलना प्रश्न विचारला "सर हम इसमे क्या करेंगे ? स्टँपपेपर तो स्टेट गवरमेंटका प्रॉब्लेम है."
मोंडल याच प्रश्नाची वाट बघत असावेत.
"बॉयज ,फर्स्ट हम लोक नायरसाबको रीलीव्ह करते है."
नायर उठून जायला उभे राहीले .
सगळ्यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं.
मोंडल त्यांना बाहेर सोडायला गेले.
पाच मिनीटानी मिटींग पुढे सुरु झाली.

मोंडलनी बोलायला सुरुवात केली. खणातून एक कागद काढून सगळ्यांना दाखवत म्हणाले
"जंटलमन .आजच मला मिनीस्ट्री ऑफ फायनान्स कडून हे पत्र आलं आहे.महाराष्ट्र ,गोवा आणि बर्‍याच राज्यात खोटे स्टँपपेपर ही एक मोठी समस्या झाली आहे.राज्य सरकार याला आळा घालू शकत नाही म्हणून त्यांनी केंद्रसरकारची मदत मागीतली आहे.आपल्या डिपार्टमेंटनी छडा लावावा अशी विनंतीवाजा सूचना यात आहे. स्टेट नी माझ्याकडे फाईलची एक कॉपी पाठवली आहे.
या फाईल प्रमाणे या प्रकरणाची सुरुवात महीन्यापूर्वी डोमेस्टीक एअरर्पोर्टला झाली."
"मोहम्मद इद्रीस नावाच्या एका व्यापाराला फेक करन्सी वापरून टिकीट घेताना जेट एअरवेजच्या काउंटरवर अटक झाली.त्याची झडती घेतली तेव्हा त्यांच्या बॅगेत पाच लाखाचे बोगस स्टँपपेपर मिळाले.स्टेट पोलीस फारशी माहीती त्याच्याकडून काढू शकले नाहीत. "
"मोहम्मद इद्रीसला या अगोदर सहा वेळा फेक करन्सी विकताना अटक झाली होती.दोन वेळा सजा झाली होती.याखेरीज इतर बर्‍याच गुन्हेगारांची माहीती या डॉसीएत आहे. पण सगळ्यांचा केंद्रबिंदू एकच आहे. सुंदर मलकाणी.कुलाब्यातला एक फौजदारी वकील."
"सुंदर मलकाणीची लिंक आहे रफीक जुमाणी.फिल्म फायनान्सर.मोठं प्रस्थ आहे.तपासकाम इथेच संपलं .मोहम्मद इद्रीस सध्या आर्थुररोड जेलमध्ये आहे. त्याचा बेल होऊ नये म्हणून सरकारनी खूप प्रयत्न करून आतपर्यंत त्याला अडकवलं आहे पण आज नाही तर उद्या त्याला बेल मिळेलच."
"सो ,जंटलमन धिस बेबी इज नाव इन अवर लॅप."
"पण सर एफाअयसीएन आणि काउंटरफीटींगसाठी सीबीआय आधीच काम करत आहे मग आपण काय नविन करायचं .? "बाक्रेंनी विचारलं .
"वेल, आपल्या डिपार्टमेंटचं मूळ उद्दीष्ट रेवेन्युशी निगडीत असल्याने आपल्याकडे हे काम आलं आहे आणि मला वाटतं ही इष्टापत्ती आहे "
सर,हे काम आपण करत नाही असं नाही.तुमचा गोहाटीचा अनुभवही आमच्या उपयोगी पडेल."
"बाक्रे ,हाउ यु नो दॅट"
"सर.गेली सात वर्षं उल्फाला फयनान्स कसा होतो हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीती आहे."
मोंडलसाहेबांचा चेहेरा खुलून हसरा झाला.
"यस, तो अनुभव माझ्याकडे आहे म्हणून मी म्हणतो या निमीत्तानी स्टेटपोलीस आणि आपण जास्त जवळ येऊ आणि त्यांच्या नेटवर्कचा फायदा आपल्याला
जास्तीत जास्त करून घेता येईल."
बाक्रे काहीतरी बोलणार होते पण एक लांब श्वास सोडून ते गप्प बसले.
दोन सरकारी यंत्रणा एकत्र काम करणं हे किती कठीण असतं हे त्यांनी तीस वर्षात अनुभवलं होतं.
"बाक्रे आपण असं करू या .? कॅन वी युज देअर कॉटॅक्टस ?
आपण त्यांचे खबरी वापरू."
बाक्रेनी नकारार्थी मान डोलावली.
"सर स्टेट एजन्सीचे खबरे आपल्या सोबत बोलणार नाहीत."
"त्यांचे खबरी नेहेमी रीम वॉकर असतात. रीम वॉकर म्हणजे आज इन्फो देताना ते खबरी असतील पण त्याच दिवशी दुसर्‍या डिपार्टमेंटचे ते वाँटेड असतील.
दुसरी गोष्ट अशी आहे की खबरी पैशावर पोसले जातात ."
"स्टेट एजन्सीचे ऑफीसर त्यांना जे पैसे देतात ते आपल्या ऑफीसरला नाही जमणार.त्यांचं डेली कलेक्शन असतं.कमीशनरचा छुपा फंड असतो.
आपल्याकडे तशी काहीच व्यवस्था नाही.आणि असला तरी मला तरी आतापर्यंत मिळाला नाही.म्हणून आम्हाला खबरी डेव्हलप करता येत नाहीत ."
मग तुम्ही खबरी बनवले ते कसे.? मोंडलनी विचारलं.
"कारण मी सात वर्षं जनरल आणि नंतर कमर्शीअल इंटेलीजन्स केलं म्हणून .
मला लोकं भेटत गेले पण मी आधीच सांगतो ,कॅश अवार्ड पाहीजे असेल तर आयडेंटीटी द्यावी लागेल.
माझं अवार्ड माझं आहे त्यातून मी काही देणार नाही."
"फेक करन्सी आणि पेपर म्हणाल तर अ‍ॅवार्ड नक्की किती हे कुणालाच माहीती नाही.जे फेक करन्सी बाहेरून आणतात ते कॅरीअर असतात. हेच कॅरीअर नार्कोचं पण काम करतात."
"स्टेटचं जाऊ द्या आपल्याच डिपार्टमेंटचे नार्को वाले आहेत त्यांना विचारा ते त्यांचे खबरी माझ्यासोबत शेअर करतील का ?"
काही वेळ मिटींगमध्ये शांतता पसरली.पंख्याचा रणंग-गण रणंग गण आवाज येत राहीला.
नार्कोवाले आपल्याला काहीच ऐकू नाही आले असे चेहेरे करून बसून राहीले.
बाक्रेनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.
"सर ,बाहेरून फेक करन्सी आली तर त्यांचं पेमेंट सोन्यात होतं ."
"आपल्या बुलीयन ब्रँचला विचारा ते शेअर करणार आहेत का त्यांचा इंटेलीजन्स."
"नाही करणार .सोन्याचं अ‍ॅवार्ड पन्नास हजार रुपये एका किलोला -हेरॉईनचं विस हजार रुपये किलो -कोकेनला चाळीस हजार रुपये."
आणखी एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की आपला प्राईज मनी यायला दहा पंधरा वर्षं लागतात."
"प्रत्येक इंटेलीजन्स ऑफीसर आपला जीव धोक्यात घालून काँटॅक्ट बनवत असतो."
"चार चार महीने सर्वेलन्स करून पुरावा जमा करायला लागतो.
आपला सर्वेलन्स पे आहे सदतीस रुपये तासाला.सर्वेलन्सला असलेली ऑफीसरची पेअरसुध्दा काहीवेळ माहीती शेअर करत नाहीत."
प्रभात तिवारीनी जांभई दिली.
"बाक्रे , एआययु सारखी टर्शरी एजन्सी माल पकडते आपले ऑफीसर एअरपोर्टवर असताना. हेडक्वार्टरच्या क्वार्टरली मिटींगमध्ये हाच प्रश्न मला डेप्युटी डायरेक्टरनी विचारला."
आता त्यात आज महाराष्ट्र सरकारनी हे पत्र पाठवलं आहे.मदत मागण्यासाठी.गेल्या महीन्याभरात त्यांनी खोट्या नोटांच्या आणि स्टँपपेपरच्या छोट्या मोठ्या सत्तावीस केसेस केल्या आहेत.
बुलीयन वाल्या गुहानी आता तोंड उघडलं ."तो त्यांचा सीवायए प्रोग्राम आहे."
मोंडलला हा शब्द नविन होता हे सीवायए काय आहे ?
"कव्हर युअर अ‍ॅस.आज लेटर देतील उद्या असेंब्लीत डिक्लेअर करतील .डीआरआय कडे तपासकाम दिलं आहे.मग सहा महीने शांती."
नार्कोच्या वर्तकनी आता तोंड उघडलं." एक तर स्टेटच्या कस्टडीत आमचे आरोपी माजतात. स्टेटवाले त्यांना व्हिआयपी ट्रीटमेंट देतात. अ‍ॅरेस्ट करून फायदा काय ?"
वर्तकच्या तीन केसचे साक्षीदार होस्टाईल म्हणून डिक्लेअर झाल्यामुळे त्याला तात्पुरतं डिप्रेशन आलं होतं.
ओके.बट अ‍ॅज अ मुंबई झोनल इनचार्ज मी काही निर्णय घेतले आहेत.
सगळे ज्युनीअर्स कान देऊन ऐकत होते.
"मला ही फाईल वाचून बाक्रेसाहेब सोमवार पर्यंत त्यांचं मत देतील.या कामासाठी मी सिनीअर आयो म्हणून त्यांना निवडलं आहे. हा तपास दुहेरी व्हावा म्हणून मी प्रभात तिवारी आणि अरविंद सलढाणा यांची नियुक्ती फिल्डवर करतो आहे.बाकीची सर्व खाती त्यांना योग्य ते सहकार्य करतील ."
"डायरेक्ट रीक्रूट आणि सिनीअर प्रमोटीचा हा सामना आहे."
बाक्रेंचा चेहेरा गंभीर झाला."सर,माझी दोन वर्षाची नोकरी बाकी आहे आणि तुमची चार वर्षं.हा डायरेक्ट आणि प्रमोटीच्या वैमनस्याचा वारसा आपण या मुलांना देऊ नये.बाकी काही नाही तरी इतकं तर आपण करालच नाही का ?"
मोंडल साहेबांचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता.
खुर्च्या सरकवण्याच्या आवाजा खेरीज आणखी संभाषण न होता मिटींग संपली होती.

कथालेख

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

27 Oct 2009 - 8:47 am | विनायक प्रभू

जग
रामदास स्टाईल मधे.

सहज's picture

27 Oct 2009 - 9:08 am | सहज

रामदास यांची रेंज अनंत आहे.

मस्त कलंदर's picture

27 Oct 2009 - 9:25 am | मस्त कलंदर

रामदास यांची रेंज अनंत आहे.

आणखी काय काय येणं बाकी आहे अजून पोतडीतून?????

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

घाटावरचे भट's picture

27 Oct 2009 - 9:52 am | घाटावरचे भट

ऐसेच बोल्ता...

गणपा's picture

27 Oct 2009 - 1:17 pm | गणपा

शेम टु शेम बोल्तो...

पिवळा डांबिस's picture

27 Oct 2009 - 9:52 am | पिवळा डांबिस

मस्तच लेखन!
तुमच्या लेखनाबद्दल तर काही प्रश्नच नाही, जबरदस्त!!!!

मुक्तसुनीत's picture

27 Oct 2009 - 11:17 pm | मुक्तसुनीत

उत्तम लिखाण. (पानवलकरांची आठवण जागवली परत.)

सुनील's picture

27 Oct 2009 - 10:25 am | सुनील

आणखी एक क्षेत्र!

रामदासबुवा जियो!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिरोटा's picture

27 Oct 2009 - 10:30 am | चिरोटा

एका वेगळ्याच विषयावरची चांगली कथा.मराठीत ह्या विषयांवर खूपच कमी लेखन झालय.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

विंजिनेर's picture

27 Oct 2009 - 10:50 am | विंजिनेर

नेहेमीप्रमाणेच ताकदवान लिखाण.
शेवट आटोपता घेतला का घाईत?

अवलिया's picture

27 Oct 2009 - 12:03 pm | अवलिया

मस्त !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

श्रावण मोडक's picture

27 Oct 2009 - 2:27 pm | श्रावण मोडक

एक भाग संपला. दुसरा सुरू झालाय. पुढे लिहाच!

स्वाती२'s picture

27 Oct 2009 - 6:05 pm | स्वाती२

+१

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Oct 2009 - 2:33 pm | llपुण्याचे पेशवेll

झकास. धातुकोषाचे पुढे काय झाले. असो. हा ही लेख उत्तमच.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

धमाल मुलगा's picture

27 Oct 2009 - 7:03 pm | धमाल मुलगा

पिसीजेसी....
दोयुग्मा..........
शून्य प्रहर...........
शिंपिणीचं घरटं.........
इब्लिस चाचा................
मिस्टर गोडबोल्यांची कहाणी.......
माझा धातुकोष.............

आणि आता हे!
रामदास काका, मला एक सांगा, व्हॉट द हेल आर यु??????

दशानन's picture

27 Oct 2009 - 7:05 pm | दशानन

रामदास काका, मला एक सांगा, व्हॉट द हेल आर यु??????

असेच म्हणतो...

चरण कुठे आहेत सेठ :?

विनायक प्रभू's picture

27 Oct 2009 - 7:05 pm | विनायक प्रभू

ऑफ अ पर्सन.

स्वप्निल..'s picture

28 Oct 2009 - 1:49 am | स्वप्निल..

प्रतिक्रिया पण काय दयायची ..

रामदासांचं लेखन म्हणजे पर्वणीच असते वाचणार्‍यांसाठी!!

स्वप्निल

चतुरंग's picture

27 Oct 2009 - 7:44 pm | चतुरंग

अनुभवांचा परीघ विस्तारतोच आहे.

(गडबोल्यान कुठं दडी मारलीन कुणास ठावकी ?:?)

चतुरंग

धनंजय's picture

27 Oct 2009 - 11:43 pm | धनंजय

मस्त रंगवले आहे.

(कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही.)

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Oct 2009 - 11:45 pm | अक्षय पुर्णपात्रे

असेच म्हणतो.

भडकमकर मास्तर's picture

28 Oct 2009 - 1:03 am | भडकमकर मास्तर

कमाल आहे...
वाचतोय...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

टुकुल's picture

28 Oct 2009 - 1:39 am | टुकुल

काय लिहु कळत नाही आहे.. आणी काही लिहायची माझी पात्रता पण नाही !!

--टुकुल

निमीत्त मात्र's picture

28 Oct 2009 - 1:52 am | निमीत्त मात्र

मस्त कथा...वाचतो आहे!

सुवर्णमयी's picture

29 Oct 2009 - 6:49 pm | सुवर्णमयी

कथा आवडली.

श्रीयुत संतोष जोशी's picture

30 Oct 2009 - 8:13 am | श्रीयुत संतोष जोशी

पकड घेतली आहे.
अजून पाहिजे आणि ते ही लवकर.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.