चतुरंगानी दाखवलेली भाजणी, आणी थालीपीठ बघुन भुक चाळवली,
म्हणलं आपण पण पाककृती टाकावी. ;)
पाडून खूप चर्चा, आता हसेन म्हणतो
छेडून भावनांना, थोडे बघेन म्हणतो
शर गंजलेत, 'काका' मारणार नाही
जे पिडलेस तू ते, सारे जपेन म्हणतो
सारेच शाप नाही, मी उधळले जगी या
आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो
जालींदरी नवा मी, ठ्या ठ्या करून हसतो
आता कसे छ्ळावे, 'ओवी' करेन म्हणतो
'पुपे' सुसाट सुटले, ना दोष मालकाचा
घालून याच चपला, आता पळेन म्हणतो
ती आमिषे फुकाची, नव्हती कधीच छोटी
मांडून कुंडली मी, ग्रह फीरवेन म्हणतो
टा़कून काळजाचा तात्या लिलाव पाहे
बोली 'पिडा' तरीही, मी ही फसेन म्हणतो
चेतन
प्रतिक्रिया
20 Oct 2009 - 12:20 pm | प्रमोद देव
कमाल केलीस चेतन!
20 Oct 2009 - 12:35 pm | सहज
:-)
20 Oct 2009 - 12:38 pm | llपुण्याचे पेशवेll
>>'पुपे' सुसाट सुटले, ना दोष मालकाचा <<
हा हा हा... चेतनराव जोरात सुटले आहेत. बाय द वे आमच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे अंमळ प्रसिद्ध झाल्यासारखे वाटत आहे.
बाय द वे आमचे कण्हेरीचे फूल इथे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
20 Oct 2009 - 12:42 pm | अवलिया
मस्त :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
20 Oct 2009 - 12:56 pm | मदनबाण
पुपे' सुसाट सुटले, ना दोष मालकाचा
घालून याच चपला, आता पळेन म्हणतो
खी.खी.खी... यकदम बरोबर. ;)
(कोल्हापुरी अभ्यंकरांच्या चपला घालुन आधिच तयार असलेला...) ;)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
20 Oct 2009 - 2:21 pm | श्रावण मोडक
चालू द्या!
20 Oct 2009 - 6:01 pm | चेतन
प्रमोद काका, सहज, पेशवे सरकार, अवलिया, बाणा , श्रावण
धन्यवाद
चेतन