प्रेरणा : गुरुवर्य सुरेश भटांची गझल इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
इतकेच मला जाताना परदेशी कळले होते
'माय नेम इज खान' म्हणूनच गोर्याने छळले होते
ही मिडिया हपापलेली फुकटात बरळली नाही
मी बहर इथे पैशांचे भरपूर उधळले होते
मी लबाड इतका आहे हे सांग कुणा कळले का?
मी पैसे 'कोल्ह्याकडुनी' आधीच उकळले होते
त्या माजी राष्ट्रपतींची मी उगाच नक्कल केली
लावून दिवे अंबर का हे कधी उजळले होते?
स्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली
अफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते
माघारी आल्यावरती मी शब्द फिरविले सारे
करणार काय लोकांचे जर पित्त खवळले होते?
झालेल्या नामुष्कीला सारेच चला विसरू या
पाऊल घसरले होते डोकेही चळले होते
प्रतिक्रिया
17 Sep 2009 - 5:18 pm | स्वाती२
मिपावर स्वागत! विडंबन नेहमीप्रमाणे झकास.
17 Sep 2009 - 6:36 pm | क्रान्ति
ही मिडिया हपापलेली फुकटात बरळली नाही
मी बहर इथे पैशांचे भरपूर उधळले होते
=D> =D>
सही! मस्त विडंबन!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
17 Sep 2009 - 6:37 pm | संदीप चित्रे
>> स्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली
अफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते
मस्तच एकदम..
लै दिवसांनी दर्शन दिलंत ?
17 Sep 2009 - 7:54 pm | अविनाश ओगले
अप्रतिम...
17 Sep 2009 - 8:11 pm | प्राजु
मस्त!!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Sep 2009 - 7:08 pm | मिल्या
सर्वांना खूप खूप धन्यवाद
संदिप अरे आहे की इथेच आहे.. कुठे जाणार?