शताब्दी - अर्थशास्त्राच्या प्रकाशनाची

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
24 Jun 2009 - 1:38 am

(इमेल वरून एका आलेल्या आणि त्या इमेलच्या वेधक मथळ्यामुळे सुदैवाने वाचल्या गेलेल्या एका लेखाचे हे स्वैर आणि संक्षिप्त भाषांतर.)

१८९१ साली म्हैसुरच्या महाराजाने राणि व्हिक्टोरीयाच्या सन्मानार्थ "व्हिक्टोरीया ज्युबिली इन्स्टीट्यूट" नामक एक वास्तू म्हैसुरमधे बनवली. विविध संस्कृतीतील वास्तुशास्त्रांचे मिश्रण केलेली ही इमारत वेगळ्याच घाटणीतील तयार केली गेली आहे.

या वास्तू मधे अनेक भुर्जपत्रांवरील लेखन विविध ठिकाणाहून आणून साठवले गेले होते. त्या काळात त्याला ओरीएंटल रिसर्च लायब्ररी म्हणायचे आता तीला ओरीएंटल रिसर्च इन्स्टीट्यूट म्हणतात.

१९०५ साली या ग्रंथालयात रूद्रपटणम शामशास्त्री (१८६८-१९४४) नावाचा एक ग्रंथपाल आला. वयाच्या सदतीस वर्षांपर्यंत त्याने वेद, वेदांग, संस्कृत, प्राकृत, इंग्रजी, कन्नड, जर्मन, फ्रेंच, आणि इतर अनेक भाषा तसेच भारतीय पुरातन लिपी आणि भाषा यांचे ज्ञान आत्मसात केले.

ग्रंथपाल म्हणून शामशास्त्री दरोज अनेक जिर्णावस्थेतील भूर्जपत्रे अतिशय नाजूकपणे हाताळत त्यातून नवीन काही माहीती मिळते का ते पहात असत. मात्र काही हातात लागायचे नाही. त्यांचे सहकारी आणि हाताखाली काम करणारे त्यांना हसायचे पण हा "विक्रमादीत्य आपला हट्ट सोडत नव्हता". १९०५ सालीच एका दिवशी अचानक त्यांना एक भुर्जपत्रांचा संच मिळाला जो त्यांनी वाचायला घेतला आणि त्यांना रोमांचकारी वाटले - कारण हातात आले होते पुरातन अर्थशास्त्र - फक्त इकॉनॉमिक्स या अर्थाने नाही तर संपुर्ण प्रशासकीय दृष्टीकोनाने. ज्या व्यक्तीने ते लिहीले होते तीचे नाव होते चाणक्य/कौटील्य/विष्णूगुप्त!

१९०९ साली शामशास्रींनी हे अर्थशास्त्र विविध पुरावे देऊन त्याचे पुरातनत्व सिद्ध करत प्रकाशीत केले. अनेक पाश्चात्य तसेच भारतीय संशोधकांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यात रविंद्रनाथ टागोर पण होते. लगेच त्याच्या आवृत्या फ्रेंच, जर्मन तसेच इतर भाषांत निघाल्या. रातोरात प्रसिद्धी मिळालेल्या शामशास्त्रीना वॉशिंग्टन विद्यापिठाने डॉक्टरेट दिली, रॉयल एशियाटीक सोसायटीने फेलोशिप दिली, कलकत्ता विद्यापिठाने डॉक्टरेट दिली तर म्हैसुर विद्यापिठाने त्यांना इतिहासाचे प्राध्यापक म्हणून नेमले. महाराजा कृष्णराज -४ ने त्यांना अर्थशास्त्र विशारद म्हणले इत्यादी इत्यादी...इतके सर्व होऊन त्यांचा नम्र स्वभाव आणि काम करायची वृत्ती जशीच्या तशीच राहीली...

नंतरच्या काळात म्हैसुरच्या महाराजा कृष्णराजाचे जर्मनीत ओळख करून झाल्यावर एका सभेतील भाषण आटोपल्यावर एक जर्मन सद्गृहस्थ त्यांच्या जवळ आले आणि विचारले की तुम्ही तिथलेच का जिथे शामशास्त्री रहातात? महाराजांना भरून आले आणि तसे त्यांनी शामशास्त्रींजवळ नंतर बोलून व्यक्तही केले.

तर अशा एका व्यक्तीच्या प्रामाणिकपणे आणि शास्त्रशुद्ध केल्या गेलेल्या संशोधनामुळे जगाला समजून चुकले की प्रशासकीय व्यवस्थापन आणि अर्थकारण हे भारताला ग्रीक अथवा नंतरच्या अनेक ब्रिटीशांच्या राजवटींकडून समजायच्या आधीपण माहीत होते आणि ते व्यवहारात अस्तित्वात होते.

तर अशा या अर्थशास्त्राच्या प्रकाशनाचे हे शताब्दी वर्ष आहे!
------

वरील मुळ इंग्रजी लेखाचे लेखक आहेत निवृत्त प्राध्यापक नरसिंह मुर्ती प्राचीन इतिहास आणि उत्खनन विभाग प्रमुख म्हैसुर विद्यापिठ.

संस्कृतीइतिहासअर्थकारणबातमीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

धनंजय's picture

24 Jun 2009 - 2:54 am | धनंजय

अर्थशास्त्र हा शासन-व्यवस्थापनाबद्दल अव्वल दर्जाचे विचार सांगणारा ग्रंथ आहे. तसेच हे त्या काळातल्या समाजाबद्दल ऐतिहासिक ज्ञान मिळवण्याचे उत्तम साधन आहे.

शोधाच्या शताब्दीच्या निमित्ताने ही कथा सांगितल्याबद्दल धन्यवाद.

(परंतु हा ग्रंथ मिळण्यापूर्वी जर लोकांना वाटत असेल की याविषयीचे जुने ग्रंथ भारतात उपलब्ध नव्हते, तर ते ठीक नाही. मनुस्मृतीतही शासन-व्यवस्थापनाबद्दल विस्तृत प्रकरण आहे - म्हणजे करभाराचे दर काय ठरवावेत, वगैरे, इतपत तपशीलवार!)

प्राजु's picture

24 Jun 2009 - 7:04 am | प्राजु

खूप छान माहिती आहे लेखात. अनुवाद करून इथे दिल्याबद्दल धन्यवाद विकासदादा. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

24 Jun 2009 - 7:08 am | सहज

चांगली माहीती दिलीत.

धन्यु विकासराव.

अडाणि's picture

24 Jun 2009 - 8:19 am | अडाणि

कुठे मिळेल का? आंतर जालीय आवॄत्ती असेल तर उत्तम...
-
अफाट जगातील एक अडाणि.

सुनील's picture

24 Jun 2009 - 9:10 am | सुनील

उत्तम माहिती.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अवलिया's picture

24 Jun 2009 - 10:44 am | अवलिया

उत्तम माहिती.

--अवलिया

कपिल काळे's picture

24 Jun 2009 - 2:30 pm | कपिल काळे

माहितीपूर्ण लेखन .

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jun 2009 - 3:31 pm | बिपिन कार्यकर्ते

विकासराव,

छान लेख आणि भाषांतरही. काळाच्या ओघात काय काय रत्नं हरवली आहेत आपल्या हातून त्याची आपल्याला जाणिवही नाहीये. असं काही काही योगायोगाने हाती लागतं.

इतिहास जतन न करणे, जो काही ज्ञात आहे तोही योग्यरितीने समजून न घेणे आणि त्यातूनही जे काही समजले ते विसरणे ही आपल्या भारतीय संस्कृतीची फार मोठी उणी बाजू आहे.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

24 Jun 2009 - 4:25 pm | श्रावण मोडक

चांगली माहिती. कर्क यांनी दिलेला दुवाही साठवून ठेवण्याजोगा.

सूहास's picture

24 Jun 2009 - 4:37 pm | सूहास (not verified)

मुळ लेख व माहीती व ग्र॑थ http://acorn.nationalinterest.in/2009/06/10/the-librarian-of-mysore/ येथे ऊपलब्ध आहे...

सुहास
आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे,
काळ्या - पांढर्‍या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर,
उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे,
कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे,
मधे अडल्यास इश्वरास विनवायचे..
सौजन्य: प्राजुताई..

संदीप चित्रे's picture

25 Jun 2009 - 2:45 am | संदीप चित्रे

माझ्याकडे 'कौटिल्याचे अर्थशास्त्र' हे मराठीत अनुवादित पुस्तक आहे (आणि मी ते वाचलंयही ;) ) पण हा इतिहास माहिती नव्हता.
-----------
त्या पुस्तकातलं बाकी काय लक्षात राहिलं माहिती नाही पण एक वाक्य (चिरंतन सत्य !) मात्र कायम लक्षात राहील ते म्हणजे --
"ज्याप्रमाणे पाण्यातला मासा श्वास कधी घेतो ते कळत नाही त्याप्रमाणे सरकारी अधिकारी लाच कधी घेतो ते कळत नाही" !!!

>>>माझ्याकडे 'कौटिल्याचे अर्थशास्त्र' हे मराठीत अनुवादित पुस्तक आहे<<<

दुर्गा भागवतांचे का? ते मस्त आहे. माझ्याकडे पण होते. मात्र नंतर ते कोणीतरी वाचायला म्हणून घेतले.... :-(

अवलिया's picture

25 Jun 2009 - 9:20 am | अवलिया

>>>दुर्गा भागवतांचे का?

हे दुर्गा भागवतांनी प्रस्तावना लिहिलेले पुस्तक आहे.
लेखक कै.ब.रा.हिवरगावकर आहेत.
अतिशय सुंदर आणि संग्राह्य पुस्तक.

--अवलिया

नितिन थत्ते's picture

25 Jun 2009 - 8:19 am | नितिन थत्ते

>>"ज्याप्रमाणे पाण्यातला मासा श्वास कधी घेतो ते कळत नाही त्याप्रमाणे सरकारी अधिकारी लाच कधी घेतो ते कळत नाही" !!!

हम्म. म्हणजे भ्रष्टाचार हल्लीच्या काळाची देणगी नाहीये तर.....
(आमचा देवही काहीतरी देण्याचे कबूल केल्यावर कामे करून देतो असे ऐकले आहे)
खराटा
(रंग माझा वेगळा)

अवलिया's picture

25 Jun 2009 - 9:24 am | अवलिया

हम्म. म्हणजे भ्रष्टाचार हल्लीच्या काळाची देणगी नाहीये तर.....
भ्रष्टाचार ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे.

(आमचा देवही काहीतरी देण्याचे कबूल केल्यावर कामे करून देतो असे ऐकले आहे)
मानवी मनाने देव निर्मिती करतांना आपल्या गुणदोषांसारखेच देवाचे वर्तन असणार या सहजसुलभ भावनेतुन देवाला काहीतरी द्यावे ही प्रेरणा तयार झाली.

श्री.खराटा यांना नम्र आणि जाहीर विनंती की आस्तिक भक्तांच्या भावनांची खिल्ली संधी मिळेल तिथे उडवणे जरा कमी करावे.

--अवलिया

नितिन थत्ते's picture

25 Jun 2009 - 9:25 am | नितिन थत्ते

माझ्यामते हे पुस्तक चिटणीस नावाच्या गृहस्थांनी अनुवाद केलेले आहे.
आणि ते छोटेसेच १००-१२५ पानांचे आहे
खराटा
(रंग माझा वेगळा)

अवलिया's picture

25 Jun 2009 - 9:26 am | अवलिया

ते वेगळे असावे मी वर उल्लेखलेले ५७०-५७५ पानांचे आहे.

--अवलिया