अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी कैरो येथील मुस्लिम जनतेला उद्देशून केलेल्या भाषणाचा संक्षिप्त परिचय

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
18 Jun 2009 - 9:39 pm

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी कैरो येथील मुस्लिम जनतेला उद्देशून केलेल्या भाषणाचा संक्षिप्त परिचय

हा लेख या आधी कुठेही प्रकाशित झलेला नाहीं. सर्वप्रथम मिसळपाववर प्रसिद्ध करताना मला हर्ष होत आहे.

महत्वाचे: या भाषणातील (बहुतेक) सर्व मतें ओबामांची आहेत.

यजमान इजिप्तच्या जनतेचे आभार मानीत, आम अमेरिकन जनतेच्या व खास करून अमेरिकन मुस्लिम जनतेच्या जागतिक शांतीसाठीच्या सदिच्छांचा उल्लेख करीत व "अस्सलाम आलेकुम" असं खास इस्लामी थाटाचं अभिवादन करीत व टाळ्यांच्या कडकडाटात ओबामा कैरो विश्वविद्यालयाच्या सभागारात प्रवेश करते झाले.

ओबामांची एक खासियत आहे. ते कधीच तिरकस बोलत नाहींत. आणि बोलायची शैली अशी कीं ऐकणार्‍याला खात्री वाटते की हा माणूस जे बोलतो तेच त्याच्या मनात असतं व जे मनात असतं तेच तो बोलतो. यात कांहींही आत-बाहेर नसतं. विषय-मग तो सोयीचा असो किंवा गैरसोयीचा-त्याला ते थेट हात घालतात. इथेही अगदी सुरुवातीलाच अमेरिकन सरकार व जगभरची मुस्लिम जनता यांच्यामध्ये जो तणाव आहे त्या विषयापासून त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या मते या तणावाला अलीकडील परराष्ट्रीय धोरणापेक्षा खूप इतर ऐतिहासिक कारणं आहेत व त्यात अर्वाचीन काळातील साम्राज्यवादामुळं आलेल्या तणावाची भर पडली आहे कारण या साम्राज्यवादामुळं मुस्लिम जनतेला तिचे हक्क व संधी यापासून वंचित व्हावं लागलं. त्यानंतरच्या शीतयुद्धाच्या काळात मुसलमान राष्ट्रांना बुद्धिबळातील प्याद्याप्रमाणं वापरण्यात आलं. अल्पसंख्यांक पण उग्रवादी अतिरेक्यांनीही या तणावाचा फायदा घेतला आहे. ११ सप्टेंबरला अमेरिकन भूमीवर झालेले हल्ले आणि त्यानंतरही या उग्रवाद्यांकडून जारी असलेले निष्पाप जनतेवरील हल्ले यांमुळं बहुसंख्य अमेरिकन जनता मुस्लिम धर्माकडे केवळ अमेरिकन किंवा पाश्चात्यच नव्हे तर सर्व मानवी हक्कांविरुद्ध वैर असलेला धर्म या दृष्टिकोनातून पाहू लागली आहे.

अमेरिकन जनता व जगभर पसरलेली मुस्लिम जनता यांच्या संबंधांमध्ये परस्पर हितसंबंध व परस्पर आदर यांच्यावर आधारलेली एक नवी सुरुवात करण्यासाठीच ते कैरोला आले आहेत असं जाहीर करून ते पुढं म्हणाले कीं ही नवी सुरुवात अमेरिकन व मुस्लिम जनतेनं एकाकी व स्पर्धात्मक पवित्रा न घेता सत्य परिस्थितीकडं पाहून करायची आहे. कारण हे दोन धर्म खूप ठिकाणी सारखे असून त्यांच्यात न्याय, प्रगती, सहिष्णुता आणि सन्मान यांसरखी बरीच तत्वं सामान्य आहेत. तरुणपणी शिकागो शहराच्या गरीब वस्त्यांमध्ये समाजकार्य करत असताना मुस्लिम धर्मातील सन्मान व शांतिप्रियता या गुणांनी आकर्षित झालेले अनेक लोक त्यांना भेटलेले आहेत. (टीप: याची माहिती "Dream from my father या ओबामालिखित पुस्तकात वाचायला मिळते-सुधीर काळे)

इतिहासाचा विद्यार्थी या नात्यानं अभ्यासलेल्या मानवजातीवरील मुस्लिम धर्माच्या ऋणाबद्दलच्या माहितीचाही त्यांनी उल्लेख केला.

मुस्लिम धर्म नेहमीच अमेरिकन इतिहासाचा भाग राहिलेला आहे कारण अमेरिका स्वतंत्र झाल्यावर त्या देशाला सर्वप्रथम राजकीय मान्यता मोरोक्को या मुस्लिम देशानं दिली होती याची आठवणही त्यानी सर्वांना करून दिली.

अमेरिकेन व मुस्लिम जनतेतील संबंध "इस्लाम काय नाहीं" यापेक्षा "इस्लाम काय आहे" या सिद्धांतावर आधारित असले पाहिजेत अशी खात्री त्याना वरील अभ्यासावरून झाली आहे असेही त्यांनी प्रतिपादन केले. आणि इस्लामबद्दलच्या सर्व उणीवा व गैरसमज दूर करण्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्यानं सर्व प्रयत्न करणं ते स्वत:ची जबाबदारी समजतात असंही ते म्हणाले.

जसे इस्लामबद्दल अमेरिकेन माणसामध्ये गैरसमज आहेत तसेच गैरसमज अमेरिकन माणसांबद्दल मुस्लिम लोकात आहेत व तेही चूक आहेत. "फक्त स्वत:च्या हितसंबंधात पूर्णपणे मश्गुल असलेलं एक भांडवलवादी साम्राज्य" हे अमेरिकेचं चित्रही चुकीचे आहे कारण अमेरिका नेहमीच जगाच्या सर्वांगीण प्रगतीतील शक्तीचा सगळ्यात मोठा स्त्रोत बनली आहे असं त्यांनी सांगितलं.
अमेरिकेतील अनेक नागरिक स्वातंत्र्यात कुठलाही धर्म आचरण्याचे स्वातंत्र्य अभेद्य आहे.

यावरून इस्लाम हा अमेरिकन जीवनाचा एक भाग आहे व जातपात, धर्म किंवा सामाजिक स्थान यांच्यावर अजीबात अवलंबून न रहाता शांततेत व सुरक्षितपणे जगणं, चांगलं शिक्षण मिळविणं व सन्मानाने काम करायला मिळणं, आपल्या कुटुंबियांवर, समाजावर व देवावर प्रेम असणं अशा सर्वसामान्य आशा-आकांक्षाच अमेरिकन माणसाच्याही नसानसांतून दौडतात असंही त्यांनी ठासून सांगितलं. आमच्याही जनतेचं नुसत्या गोड शब्दांनी समाधान होणं शक्य नाहीं. जेंव्हा एक देश अण्वस्त्र-निर्मितीमागे लागतो तेंव्हा अणुयुद्धाचा धोका सर्वांनाच जाणवतो. जेंव्हा हिंसक अतिरेकी लोक डोंगरांच्या एका कोपर्‍यात कार्यरत होतात तेंव्हां सातासमुद्रापारचे लोकांनाही धोका पोचतो. अशा तर्‍हेने सर्व जगाची राज्यव्यवस्था परस्परांवर अवलंबून असताना एका देशाला किंवा जथ्थ्याला वरच्या दिशेने ढकलणारी राज्यव्यवस्था नक्कीच अयशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"अमेरिका इस्लाम धर्माबरोबर युद्ध करत नाहीय़् व कधीच करणार नाहीं" या तुर्कस्तानची राजधानी अंकाराला दिलेल्या भेटीत केलेल्या विधानाची त्यांनी पुनरुक्ती केली. पण त्याच वेळी आम्ही आमच्या सुरक्षेला धोका असलेल्या संहारी अतिरेक्यांच्या मागे हात धुवून लागू असा इशाराही दिला. कारण निष्पाप पुरुष, स्त्रिया व मुले याच्या संहाराच्या विरुद्ध जसे सगळेच धर्म आहेत तसे आम्हीही (अमेरिकन जनता) आहोत. आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष या नात्याने अमेरिकन जनतेचे संरक्षण करणे हे माझे पहिले कर्तव्य ठरते असे ते म्हणाले.

अफगाणिस्तानमधील सद्य परिस्थिती अमेरिकेचे ध्येय व आपणा सर्वांनी एकजुटीने काम करण्याची का जरूरी आहे हे यथार्थपणे दर्शविते. सात वर्षांपूर्वी अमेरिकेने अल् कायदा व तालीबान या दोन संघटनांवर आंतरराष्ट्रीय सहमतीने हल्ला चढविला. जे अमेरिकन व अनेक इतर देशातले लोक - पुरुष, स्त्रिया व मुलें - त्यांच्या हल्ल्याला बळी पडले होते ते सगळे निष्पाप होते व त्यांनी कुणालाच कसलीही हानी पोचविली नव्हती. आणि तरीही अल् कायदाने त्यांना निर्दयपणे व क्रूरपणे ठार केले व ते केल्याबद्दल जबाबदारीही स्वीकारली व अशी मोठ्या प्रमणावर मानवहत्या करण्याची दुष्कृत्ये करतच रहाण्याचा त्यांचा निर्धारही जाहीर केला. मुस्लिम पवित्र ग्रंथ कुराणात म्हटले आहे कीं जो निष्पाप लोकांची हत्या करतो तो जणू सगळ्या मानवजातीचीच हत्या करतो. त्या अर्थी इस्लाम धर्म अशा संहारक अतिरेकी वागणुकीचा मुळीच भाग नाहींय्. इस्लाम धर्म हा शांतीचाच पुरस्कर्ता आहे व शांतीच्या.प्रक्रियेचा एक भाग आहे.

इराकबद्दल बोलताना ते म्हणाले कीं इराकची परिस्थिती अफगाणिस्तानमधील परिस्थितीपेक्षा खूपच वेगळी आहे. इराकमधील युद्ध हा अनेक पर्यायांपैकी एक पर्याय होता व युद्धाच्या पर्यायाची निवड केल्याबद्दल माझ्या देशात व इतर देशांतही खूप तीव्र व प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्या आहेत असे सांगून ते म्हणाले कीं आज अमेरिकेवर दुहेरी जबाबदारी पडली आहे. एका बाजूने इराकचा भविष्यकाळ सध्याच्या (वर्तमान)काळापेक्षा जास्त चांगला असेल याची खात्री करणे व दुसर्‍या बाजूने इराक देश इराकी जनतेला/सरकारला परत करणे. ओबामा म्हणाले कीं त्यांनी इराकला स्पष्ट शब्दात सांगितले आहे कीं अमेरिकेला त्यांच्या देशात सैनिकी तळ उभारायची इच्छा नाहीं तसेच त्यांच्या जमीनीवर किंवा संपत्तीवर अमेरिकेचा डोळा नाहींय्. ते म्हणाले कीं अमेरिका इराकला सुरक्षित बनवू इच्छिते व त्या देशाला आर्थिक प्रगतीची वाट दाखवू इच्छिते आणि एक सुरक्षितपणे व एकजूटिने उभा असलेला इराक अमेरिकेला एक सहचर म्हणून हवा आहे, एक आश्रित म्हणून नव्हे.

जशी अमेरिका कधीही संहारक अतिरेक सहन करणार नाही त्याच प्रमाणे आपण सर्वांनी आपली तत्वे सोयीनुसार बदलू नयेत किंवा त्या तत्वांची विस्मृती होऊ देऊ नये असं शेवटी ते म्हणाले!

त्यानंतर ते इस्रायल, पॅलेस्टाईन व अरबी विश्व याम्च्या समस्यांकडे वळले.

ते म्हणाले कीं अमेरिकेचे इस्रायलबरोबरचे दृढ संबंध जगजाहीर आहेत. जगभर ज्यू जमातीने शेकडो वर्षें सहन केलेल्या हाल-अपेष्टांचा उल्लेख करून ते म्हणाले की हा ज्यूद्वेष इतक्या विकोपाला गेला कीं त्याची परिणती एका प्रचंड हत्याकांडात झाली (ज्याला इंग्रजी भाषेत Holocaust म्हणून ओळखले जाते). त्याचप्रमाणे पॅलेस्टिनी जनतेची पण परिस्थिती असह्य झालेली आहे. आणि अमेरिका जशी इस्रायलबरोबर दृढ संबंध ठेवू इच्छिते तशीच ती पॅलेस्टिनी लोकांच्या सन्मान, संधी व स्वत:चे राष्ट्र या आकांक्षांकडेही पाठ फिरवू इच्छित नाहीं.

असे पॅलेस्टाईन राष्ट्र बनू देणे इस्रायलच्या, पॅलेस्टाईनच्या, अमेरिकेच्या व सार्‍या जगाच्या हिताचे आहे असे प्रतिपादन त्यांनी ठामपणे केले. पण पॅलेस्टिनी लोकांनी त्यासाठी संहारक प्रवृत्तीचा त्याग केला पाहिजे असेही त्यांनी तितक्याच ठामपणे सांगितले. अमेरिकेतील कृष्णवर्णियांच्या समस्यांकडे बोट दाखवून ते म्हणाले कीं कृष्णवर्णियांनी शेकडो वर्षें चाबकाचे फटके खाऊन गुलामगिरीत दिवस काढले व एक तर्‍हेची अस्पृश्यता भोगली. अशाच तर्‍हेचा त्रास व हाल-अपेष्टा दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णियांनी भोगला, तसेच पूर्व युरोपियन जनतेने, इंडोनेशियन जनतेनेही भोगला. ते पुढे म्हणाले कीं आज पॅलेस्टिनी लोकांनी एक विधायक दृष्टिकोन ठेवून ते काय निर्मू शकतील तिकडे पाहिले पाहिजे. पॅलेस्टिनी सरकारने योग्य त्या संस्था उभ्या करून राज्य करण्याचे कसब शिकले पाहिजे जेणेकरून पॅलेस्टिनी लोकांच्या आशा-आकांक्षा, त्यांचे ऐक्य ते निर्मू शकतील. हमास या संघटनेनेही संहाराच्या धोरणाचा त्याग केला पाहिजे, गतकालात मान्य केलेल्या शर्तींचा सन्मान केला पाहिजे व इस्रायलचा जगण्याचा हक्कही मान्य केला पाहिजे. त्याचप्रमाणे इस्रायलनेही पॅलेस्टिनी जनतेच्या जगण्याच्या हक्काची पायमल्ली होऊ देता कामा नये.

इस्रायल सरकारने जॉर्डन नदीच्या पश्चिम किनार्‍यावरील बेकायदा वसाहती वसविण्याचे कामही थांबविले पाहिजे. या वसाहती पूर्वीच्या करारांचे उल्लंघन तर करत आहेतच, पण त्याचबरोबर शांतीच्या मार्गातील धोंडही बनत आहेत असे त्यांनी टाळ्यांच्या गजरात जाहीर केले.

इस्रायलनेही पॅलेस्टिनी जनता जगू शकेल, काम करून आपल्या समाजाला प्रगतीपथावर नेऊ शकेल या जबाबदार्‍या निष्ठेने पाळल्या पाहिजेत. पॅलेस्टिनी लोकांच्या रोजच्या जीवनातील क्रमा-क्रमाने होणर्‍या सुधारणा याच शांतीच्या मार्गातील मुख्य टप्पे आहेत व त्या सुधारणा करण्यासाठी दिशेने इस्रायल सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत असेही ते म्हणाले.

आम अरब जनतेची त्यांच्या इतर महत्वाच्या समस्यांपासून दिशाभूल करण्यासाठी अरब-इस्रायल देशांतील या कलहाचा दुरुपयोग होऊ देता कामा नये, उलट त्या कलहाचा उपयुक्त संघटना बांधून, इस्रायलला राजनैतिक मान्यता देऊन व गत-इतिहास विसरून प्रगतिपथावर जाण्यासाठी व पॅलेस्टिनी जनतेच्या उद्धारासाठी उपयोग केला गेला पाहिजे असेही ते म्हणाले. पण खासगीत बोलतांना कित्येक मुसलमान मान्य करतात कीं इस्रायल हा देश तिथे कायमचा वसलेलाच रहाणार आहे, तसेच कित्येक इस्रायली लोक मान्य करतात कीं पॅलेस्टिनी देशही उभा राहिलाच पाहिजे.

अण्वस्त्रे बाळगणार्‍या राष्ट्रांचे हक्क व त्यांची कर्तव्ये या तिसर्‍या विषयाकडे वळून ते म्हणाले कीं या विषयामुळे अमेरिका व इराण यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने लोकशाहीच्या मार्गाने आलेले सरकार पाडण्यात भाग घेतला होता हे मान्य करून ते म्हणाले कीं अशा भूतकाळात अडकून पडण्यापेक्षा आपण पुढे जाऊ या, त्याला अमेरिका तयार आहे असा प्रस्ताव त्यांनी इराणपुढे मांडला आहे. कुणाकडे अण्वस्त्रे असावीत हे ठरविण्याचा अधिकार कुठल्याच राष्ट्राकडे असू नये म्हणूनच ओबामांनी अण्वस्त्रविरहित जग निर्माण करण्याचा अमेरिकेचा निर्धार जाहीर केला आहे. प्रत्येक राष्ट्राला अणु-उर्जा बनविण्याचा पूर्ण हक्क आहे व तो nuclear Non-Proliferation Treaty च्या अटीनुसार जबाबदारी घेणार्‍या प्रत्येक राष्ट्राला उपलब्ध आहे.

अमेरिका सर्व जगातील शांतिप्रिय व कायदा पाळणार्‍या नागरिकांच्या विचारांचा सन्मान करते. त्यांच्याबरोबर मतभेद असले तरी! आणि सर्व निवडून आलेल्या आणि स्वत:च्या नागरिकांचा सन्मान करत असलेल्या प्रत्येक शांतिप्रिय सरकारांचे स्वागत करते. कुठे का असेना लोकांचे व लोकांनी सत्तेवर बसविलेले सरकार इतर सर्व सरकारांशी एकच परिमाणाने वागते असेही त्यांनी ठासून सांगितले: प्रत्येक सरकाराने सत्ता संमतीने मिळवावी, दादागिरीने नाहीं. आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कांचा सन्मान ठेवावा, सहिष्णुतेने आणि तडजोडीने कारभार करावा आणि स्वत:च्या पक्षापेक्षा जनतेचे हितसंबंध व राजनैतिक पायंडे यांचा मुलाहिजा ठेवावा असाही सल्ला त्यांनी दिला.

हा शेवटचा मुद्दा महत्वाचा आहे असे ठासून सांगताना ते पुढे म्हणाले कीं जे सत्तेवर नसतात ते लोकशाहीची मागणी करतात पण एकदा का सत्तेवर आले कीं लोकशाहीचे, प्रौढ मतदानाचे हक्क पायदळी तुडवताना ते कसलीही दया-माया दाखवत नाहींत.
ते म्हणाले कीं मुस्लिम धर्माची सहिष्णु धर्म अशी खात्री आहे. त्यांना सर्वप्रथम या धर्माची ओळख इंडोनेशियात झाली. इथे मुस्लिमांची संख्या अनेक पटीने मोठी असूनही त्यांनी ख्रिश्चन धर्मियांना मुक्तपणे त्यांच्या प्रार्थना करताना त्यांनी त्यांच्या लहानपणी पाहिले होते. त्यांच्या मते प्रत्येक देशात या प्रकारे प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या पसंतीच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. कांहीं मुस्लिम जनतेत स्वत:च्या धर्मावरील श्रद्धा इतर धर्मांना कमी लेखून दाखविण्याकडे कल दिसतो.

धार्मिक स्वातंत्र्य जनतेला एकत्र बांधणारी शक्ती आहे असे त्यांना वाटते. पण आपण तिचे कसे संरक्षण करतो हे सतत तपासून पाहिले पाहिजे. उदाहरणार्थ अमेरिकेत जे दानधर्माबद्दलचे नियम आहेत त्यामुळे अमेरिकेतील मुस्लिम जनतेला त्यांच्या धर्माच्या नियमानुसार दानधर्म करणे अवघड झालेलं आहे. म्हणूनच अमेरिकन मुस्लिम जनतेबरोबर चर्चा करून त्यांना जकात देण्याची मुभा मिळेल असे बदल करण्याचा त्यंचा इरादा आहे. तसेच पाश्चात्य देशांनी मुस्लिम नागरिकांना त्यांच्या धार्मिक प्रथा पाळण्यात अडथळे उभे करू नयेत असं त्यांना वाटतं. उदाहरणार्थ मुस्लिम स्त्रियांनी काय कपडे घालावेत यावर आणलेले प्रतिबंधही मागे घ्यावेत असं त्यांना वाटतं.

स्त्रियांचे हक्क या सहाव्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले कीं स्त्रियांना सारखे अधिकार देणे हा केवळ मुसलमान धर्माचा प्रश्न नाहींय्. तुर्कस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया या मुस्लिम बहुसंख्य देशात स्त्रियांनी राज्य चालविलेले आहे. याउलट स्त्रियांच्या समानतेचा लढा अमेरिकन व इतर अनेक देशांत जीवनाच्या अनेक क्षेत्रांत अद्यापही चालू आहे. अमेरिकेसहित सर्व देशांत या बदलाने एक तर्‍हेचे भय पैदा होते असं त्यांना वाटतं.

जपान किंवा कोरियासारख्या देशांची स्वत:च्या संस्कृतीत फारसा बदल न करता प्रचंड आर्थिक उन्नती झाली याचा उल्लेख करून ते म्हणाले कीं तशीच आर्थिक उन्नती मलेशियापासून दुबईपर्यंत्च्या मुस्लिम बहुसंख्य राष्ट्रांत झाली आणि प्राचीन काळापासून आजपर्यंत मुस्लिम समाज शिक्षण क्षेत्रात व नवीन उपक्रम सुरू करण्यात आघाडीवर राहिला आहे. २१व्या शतकात शिक्षण व नवीन उपक्रम सुरू करण्याची क्षमता हेच चलनी नाणम् रहाणार आहे आणि ओबामांच्या मते कित्येक मुस्लिम राष्ट्रांत व समाजांत याबाबतीत कमी भांडवल गुंतविलं गेलं आहे. ओबामा म्हणाले कीं असं भांडवल अमेरिकेतसुद्धा गुंतविण्यावर ते भर देत आहेत. आणि आतापर्यंत अरब भूमीतल्या फक्त तेल व नैसर्गिक वायू याच गोष्टींवर केंद्रित केलेले लक्ष आता जास्त विस्तृत भागावर केंद्रित करण्याचा त्यांचा मनसुबा आहे.

आर्थिक प्रगतीसाठी एक नवा उद्योगधंद्याला समर्पित असा स्वयंसेवक संघ मुस्लिम बहुसंख्य राष्ट्रात कार्यरत होण्यासाठी बनविण्याचा त्यांचा निर्णय आहे आणि प्रथितयश उद्योजक व सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातले नेते यांच्या शिखर परिषदा योजून हे संबंध मजबूत करण्याचाही त्यांचा वचार आहे.

अमेरिकन लोक जगभर पसरलेल्या मुस्लिम जगातील व समाजातील नागरिकांत, सरकारांत, सामाजिक संस्थांत, धार्मिक क्षेत्रांत व उद्योगधंद्यात सामील होऊन काम करायला व त्यांचे जीवनमान सुधारायला मदत करण्यास तयार आहेत.

आपण या जगात एका छोट्या काळासाठी येतो. हेच सत्य देश व समाज यानाही लागू आहे. हे सत्य नवीनही नाहीं, त्यात वर्णभेद नाहीं, धर्मभेद नाहीं. इतर समाजावरील मला जो विश्वास आहे त्यामुळे ते इजिप्तला आले असं ते म्हणाले. जगभरचे लोक एकत्र शांतीत राहू शकतात असा विश्वास त्यांनी प्रकट केला.

देव आपल्याला शांती प्रदान करो असे सांगून त्यांनी आपले भाषण संपविलं.

धर्मराजकारणलेख

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

18 Jun 2009 - 10:58 pm | संदीप चित्रे

एका उत्कृष्ठ भाषणाचा मुद्देसूद अनुवाद केल्याबद्दल धन्यवाद.

प्राजु's picture

18 Jun 2009 - 11:18 pm | प्राजु

सुंदर!!
अप्रतिम भाषण. इथे मुद्दे दिल्याबद्दल धन्यवाद. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुधीर काळे's picture

19 Jun 2009 - 1:23 pm | सुधीर काळे

सौ. प्राजूताई,
तुमच्या ब्लॉगवर जाऊन "अग अग बशी" हा लेख वाचला. झक्कास जमला आहे.
सुधीर काळे

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 12:43 am | विसोबा खेचर

हा लेख या आधी कुठेही प्रकाशित झलेला नाहीं. सर्वप्रथम मिसळपाववर प्रसिद्ध करताना मला हर्ष होत आहे.

काळेसाहेब,

'मनापासून धन्यवाद!' इतकेच म्हणू इच्छितो..!

'खास मिपाकरता म्हणून काही लेखन करेन..'असा आजच दिलेला शब्द आपण इतक्या तातडीने आणि कसोशीने पाळलात हे निश्चितच अभिनंदनीय आहे!

एका उत्कृष्ठ भाषणाचा मुद्देसूद अनुवाद केल्याबद्दल धन्यवाद.

चित्रे साहेबांशी सहमत...

तात्या.

सुधीर काळे's picture

19 Jun 2009 - 5:35 am | सुधीर काळे

कर्कसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे हा अनुवाद नसून संक्षिप्त परिचय आहे. त्यात "ओबामांची एक खासियत आहे. ते कधीच तिरकस बोलत नाहींत. आणि बोलायची शैली अशी कीं ऐकणार्‍याला खात्री वाटते की हा माणूस जे बोलतो तेच त्याच्या मनात असतं व जे मनात असतं तेच तो बोलतो. यात कांहींही आत-बाहेर नसतं. विषय-मग तो सोयीचा असो किंवा गैरसोयीचा-त्याला ते थेट हात घालतात." किंवा (टीप: याची माहिती "Dream from my father या ओबामालिखित पुस्तकात वाचायला मिळते-सुधीर काळे) यासारखी माझी वाक्ये आहेत, पण एरवी ६००० शब्दांना २००० शब्दात मी मांडले आहे.

कपिल काळे's picture

19 Jun 2009 - 9:55 am | कपिल काळे

भाषणाच्या मध्येच ११००/२००० हे काय असा प्रश्न पडला होता.
पण तुमच्या वरील खुलाश्यावरुन ते काय हे समजले.

बाकी भाषणाचे कॉम्प्रेहेन्शन तुम्ही सुंदर केले आहे.

ओबामा जसे मनात आहेत तेच बोलतात किंवा बोलतात तेच मनात असते. असे तुम्ही म्हणालात, आजपरर्यंन्तची त्यांची भाषणे एकून/ वाचून हा माणूस फक्त बोलतोच की काय असे वाटते. कुणी राजकिय निरिक्षकाने हे भाषण म्हणजे " अ‍ॅज युज्वल हेवी ऑन प्रॉमिसेस" असे नमूद केल्याचे आठवते.

पण हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे तुमच्या भाषण- संक्षेपाचे ( आत्त आठवला मराठी प्रतिशब्द!) सौंदर्य कमी होत नाही.

मराठी_माणूस's picture

19 Jun 2009 - 8:48 am | मराठी_माणूस

भाषणाचा इथे परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद

सुधीर काळे's picture

19 Jun 2009 - 11:08 am | सुधीर काळे

(११००/२०००) हा भाग खोडण्याचा मी (बहुदा यशस्वी) प्रयत्न केला आहे!
खरं तर सध्या बोलताहेत तरी बरे, आता त्यांनी घेतलेल्या कृतींचा कसा आणि किती उपयोग होईल हे कळायला एकादे वर्ष तरी लागेल. काल मी लिहिलेले एक पत्र पणजीच्या नवहिंद टाईम्समध्ये प्रसिद्ध झाले आहे त्याचा एक छोटासा भाग खाली दिला आहे, पहा कसा वाटतो ते. पण हा भाग इंग्लिश भाषेमध्ये आहे, तरी क्षमस्व.
पूर्ण पत्र वाचायचे असल्यास http://tinyurl.com/kjk5km ही लिंक वापरावी!

In Pursuit of an Untrodden Path
by K B KALE Posted on 2009-06-19
Link: http://www.navhindtimes.com/story.php?story=2009061922 किंवा http://tinyurl.com/kjk5km

SUCCESS of a speech can be gauged by how it is attacked and what it leads to. From both these counts, Mr Barack Obama’s speech in Cairo seems to be a great success with Muslim audiences all over the world.Firstly, it attracted pre-emptive attack from his biggest adversary, the Al Qaeda, two full days before he gave it (“Obama’s bloody messages would not be concealed by polished words”)!
And then, last Sunday, the Israeli PM accepted the two-nation theory to create a Palestine state. Though he added a lot of conditions, these are just pre-loaded stuff for trading at the negotiating table in subsequent ‘give-and-take’.
So the US President, Mr. Obama is worthy of congratulations for this success.

ऋषिकेश's picture

19 Jun 2009 - 12:26 pm | ऋषिकेश

सर्वप्रथम मराठीतून मिपावर टंकन केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.

भाषण ऐकले होतेच (रेकॉर्डेड) तुमचा स्वैर संक्षिप्त-अनुवाद छान झाला आहे. तुम्ही नियमीत इंग्रजीत लेखन करता असे वाटते.. तरीही ह्या अनुवादात योग्य मराठीचा वापर कौतुकास्पद आहे.. अनेक प्रतिशब्द चपखल आहेत..

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

सूहास's picture

19 Jun 2009 - 4:55 pm | सूहास (not verified)

<<<सर्वप्रथम मराठीतून मिपावर टंकन केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.>>>
हेच म्हणतो...

यु हॅव केप्ट युवर प्रॉमीस...

<<ओबामा जसे मनात आहेत तेच बोलतात किंवा बोलतात तेच मनात असते. असे तुम्ही म्हणालात, आजपरर्यंन्तची त्यांची भाषणे एकून/ वाचून हा माणूस फक्त बोलतोच की काय असे वाटते. कुणी राजकिय निरिक्षकाने हे भाषण म्हणजे " अ‍ॅज युज्वल हेवी ऑन प्रॉमिसेस" असे नमूद केल्याचे आठवते>>>
सहमत्....
जे ते म्हणतायत ते जर त्या॑च्याकडुन झाल तर चा॑गलच आहे..
बाकी" अमेरिकेनी" जर "जगाचे पोलीस" ही भुमीका सोडली तर मुस्लीमच काय पण सर्व राष्ट्रा॑चे (अमेरिका धरुन )भले होईल,असे मला वाटते....एक मात्र चा॑गल आहे की " हिलरी क्लि॑टन" परराष्ट्र खाते स॑भाळत आहे.बाकी काही ही असो म॑त्रालय आणी त्याला लागणारा पैसा स॑भाळण्यात ह्या बाई बाकबगार आहे असे म्हणतात.पद ग्रहण करताच पाकीस्तानला दिलेल्या पैशाचा हिशेब मागीतला होता म्हणतात या बाईने,

बाकी ह्या सर्व प्रकारात आज आमच्या "क्लि॑टन" साहेबा॑ची आठवण झाली..आय्.आय्.एम मध्ये आहेत सध्या,मिपावर असते तर त्या॑नी नक्की काहीतरी चा॑गले खरडले असते....

सुहास

अविनाशकुलकर्णी's picture

19 Jun 2009 - 6:05 pm | अविनाशकुलकर्णी

All Muslims are not Terrorist
But all Terrorists are Muslims

ऋषिकेश's picture

20 Jun 2009 - 2:15 am | ऋषिकेश

But all Terrorists are Muslims

खरं की काय?
नुकताच यमसदनास पाठवलेला प्रभाकरन मुसलमान होता वाटतं?
बिहारमधील माओवादी मुसलमान आहेत का?
त्रिपूरातील एन्.एल्.एफ्.टी. हे ख्रिश्चन आतंकवादी आहेत ऐकून आहे.
जेडीएल हे ज्युईश आतंकवादी नाहीत तर कोण आहेत?

आतंकवाद्यांना धर्म नसतो असे वाटते .. नाहि का?

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

मिसळभोक्ता's picture

20 Jun 2009 - 7:53 am | मिसळभोक्ता

मालेगावची साध्वी आणि तो कर्नल (सोयिस्कररीत्या) विसरलात ऋषिपंत !
(आणखी लोह घ्या :-)

-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)