आज का

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
17 Jun 2009 - 7:30 pm

आज का मुरलीधराच्या पावरीची साद नाही?
आज का राधे तुझ्याही पैंजणांचा नाद नाही?

शब्द झाले मूक, जागी नेत्रभाषा, स्पर्शभाषा
मौन झाले बोलके; मग सांग, हा संवाद नाही?

हाक माझी दशदिशांचा उंबरा स्पर्शून आली
आसमंतातून सा-या एकही पडसाद नाही

निर्गुणी भजने कुमारांची कधी ना ऐकिली तू,
भीमसेनांच्या स्वरांचा घेतला आस्वाद नाही!

सोड हे सुकणे, फुलांची पालखी दारात आली
स्वागताला हो पुढे, यासारखा आल्हाद नाही

या तुझ्या असण्यास वा दिसण्यास का जगणे म्हणावे?
खोलली त्याने कवाडे, अन् तुझा प्रतिसाद नाही!

आज छेडू या सुरांना, विसरुनी चिंता उद्याच्या
आजचे गाणे खरे, येथे उद्याला दाद नाही!

गझलप्रकटनविचार

प्रतिक्रिया

प्राजु's picture

17 Jun 2009 - 10:35 pm | प्राजु

हाक माझी दशदिशांचा उंबरा स्पर्शून आली
आसमंतातून सा-या एकही पडसाद नाही

खास! सुंदर गझल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश's picture

17 Jun 2009 - 11:54 pm | ऋषिकेश

चांगली गझल

शब्द झाले मूक; जागी नेत्रभाषा, स्पर्शभाषा
मौन झाले बोलके; मग सांग, हा संवाद नाही?

हा शेर अतिशय आवडला..

मात्र अर्धविरामाचा स्वप्लविराम करता येईल का कारण ठेक्यात म्हणताना मूक आणि जागीमधे फारच कमी वेळ थांबता येतेय

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

प्रमोद देव's picture

19 Jun 2009 - 5:55 pm | प्रमोद देव

आवडली गजल.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!