इतका मिताक्षरी बेहर (वृत्त) घेऊन इतकी अर्थपूर्ण रचना करणे फारच कठिण.
(शेवटचे यमक "शांत आता" हे प्रथम ओळीतही आलेले आहे. हे तुम्ही मुद्दाम केले असेल. पण माझ्या दृष्टीने थोडासा रसभंग झाला.)
ही द्विपदी फार आवडली -
सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता
वाह! दुसर्या ओळीत पहिल्या ओळीला उत्तर मिळते, पण जे उत्तर मिळते ते अनपेक्षित मिळते, सुंदर मिळते. हा अनपेक्षित उत्तराचा आनंद याच द्विपदीत मला सर्वाधिक मिळाला.
धनंजयजी, नेटक्या आणि सहज अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मृत्यूनंतरच्या पार्श्वभूमीवर ही गझल रचली आहे. प्राणपाखरू उडून गेलंय, जाताना सगळं इथेच सोडून गेलेलं आहे, पण शेवटच्या द्विपदीत पुन्हा वादळाच्या धुमसण्याचा उल्लेख पिंडदान विधीच्या निमित्ताने आलेला आहे. सगळं शांत आहे, ते वरवर! कुठेतरी काहीतरी अतृप्ती रहातेच, ती का? या अर्थाने ती द्विपदी शेवटी आलेली आहे. केवळ यासाठीच पहिल्याच यमकाची द्विरुक्ती. ती शांतता वादळापूर्वीची होती.[पिंडाला कावळा शिवत नाही, कुणी काही, कुणी काही सुचवत रहातात, जर सगळंच संपलं आहे, तर आत्म्याची ही तडफड कशासाठी?]
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
प्रतिक्रिया
15 Jun 2009 - 9:19 pm | श्रावण मोडक
सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता
या ओळी आवडल्या. धागे आणि भ्रांत मात्र तितकेसे नीटस बसत नाहीये.
15 Jun 2009 - 9:27 pm | निशिगंध
नेहमीसारखी सुरेख कवीता..
खुप खुप आवडली
____ नि शि गं ध ____
15 Jun 2009 - 10:24 pm | प्राजु
सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता
अप्रतिम! किति सुंदर शब्द आहेत!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jun 2009 - 10:31 pm | अनिल हटेला
वादळाचे धुमसणे हे
का न होई शांत आता?
सुरेख नेहेमीप्रमाणेच !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
15 Jun 2009 - 10:45 pm | अनामिक
सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता
काय सुंदर ओळी आहेत. शब्दच नाहीत.
-अनामिक
16 Jun 2009 - 10:31 am | सायली पानसे
नेहेमी प्रमाणेच अप्रतिम कविता .............
19 Jun 2009 - 4:02 pm | राघव
खूप छान!
तुमच्या कविता/गझलांच्या बाबतीतले माझे आधीचे मत आणखीच पक्के होत आहे म्हणायचे तर!! :)
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
15 Jun 2009 - 10:58 pm | धनंजय
इतका मिताक्षरी बेहर (वृत्त) घेऊन इतकी अर्थपूर्ण रचना करणे फारच कठिण.
(शेवटचे यमक "शांत आता" हे प्रथम ओळीतही आलेले आहे. हे तुम्ही मुद्दाम केले असेल. पण माझ्या दृष्टीने थोडासा रसभंग झाला.)
ही द्विपदी फार आवडली -
वाह! दुसर्या ओळीत पहिल्या ओळीला उत्तर मिळते, पण जे उत्तर मिळते ते अनपेक्षित मिळते, सुंदर मिळते. हा अनपेक्षित उत्तराचा आनंद याच द्विपदीत मला सर्वाधिक मिळाला.
16 Jun 2009 - 12:51 am | विसोबा खेचर
यायचे ना फिरुन येथे,
सोडला हा प्रांत आता
तोडले सारेच धागे,
का पडावी भ्रांत आता?
सु रे ख...!
आपला,
(फ्यॅन) तात्या.
16 Jun 2009 - 6:32 am | अवलिया
सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता
वा! मस्त फार आवडले !! :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
16 Jun 2009 - 7:40 am | क्रान्ति
धनंजयजी, नेटक्या आणि सहज अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मृत्यूनंतरच्या पार्श्वभूमीवर ही गझल रचली आहे. प्राणपाखरू उडून गेलंय, जाताना सगळं इथेच सोडून गेलेलं आहे, पण शेवटच्या द्विपदीत पुन्हा वादळाच्या धुमसण्याचा उल्लेख पिंडदान विधीच्या निमित्ताने आलेला आहे. सगळं शांत आहे, ते वरवर! कुठेतरी काहीतरी अतृप्ती रहातेच, ती का? या अर्थाने ती द्विपदी शेवटी आलेली आहे. केवळ यासाठीच पहिल्याच यमकाची द्विरुक्ती. ती शांतता वादळापूर्वीची होती.[पिंडाला कावळा शिवत नाही, कुणी काही, कुणी काही सुचवत रहातात, जर सगळंच संपलं आहे, तर आत्म्याची ही तडफड कशासाठी?]
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
16 Jun 2009 - 10:09 am | नितिन थत्ते
सुंदर कविता
नंतरचे स्पष्टीकरणही छान.
खराटा
(रंग माझा वेगळा)
17 Jun 2009 - 6:54 pm | सुबक ठेंगणी
आणि त्या निमित्ताने बेहेर वृत्तही माहित झालं. तुझ्या स्पष्टीकरणामुळे अधिक भावलं सगळं..
16 Jun 2009 - 10:47 am | मदनबाण
एकदम सॉलिट्ट्ट कविता...
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
16 Jun 2009 - 10:58 am | जागु
सुंदर.
16 Jun 2009 - 6:58 pm | ऋषिकेश
जरा उशीराच वाचली.. मात्र गझल आवडली.
त्यातहि मिताक्षरी गझला लिहिणं हे कठीण काम छान पेललंय.. अभिनंदन
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
17 Jun 2009 - 2:37 pm | दत्ता काळे
गझल आवडली.
17 Jun 2009 - 3:03 pm | अ-मोल
फारच छान,
सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता
आवडली!
11 Jul 2009 - 8:30 am | सुवर्णमयी
सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता
- जोरदार!
ही गझल अतिशय आवडली.
सोनाली
11 Jul 2009 - 10:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली.