काव्य

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
31 May 2009 - 2:23 pm

काव्यात हरवलेला मी ..
शब्दांना नाही गणती
एक सोडावा, दुसर्‍या जोडावे
ओळ, शब्द मर्यादेसाठी
मनामध्ये उजवे, डावे

कुणी म्हणतात . .
काव्य असावे छांदस,
शब्दांच्या मर्यादेत.
मर्यादा सोड्ली तर गैर,
नी छंदमुक्त अन स्वैर..

मला नाही वाटंत तसं, कि ..
हव्यात मर्यादा काव्यासाठी
अथांग सागर, सुसाट वारे
खुला निसर्ग सर्वांसाठी

एक विचारू तुम्हाला मी. .?
जंगलामध्ये आडवाटेवर
फुलांची असतेच् ना वस्ती ?
रसिक पाखरे येतातच् ना
रसभरल्या फळांवरती ?

म्हणून कधी वाटते मला. .
छंदोपजीवी काव्य नको ..
मर्यादेचे नांव नको ..
अर्थभारल्या भावनांना
संख्याबाधीत ठाव नको

असेही असते बरं कां ..
काव्य कुणाला, कधी स्फुरावे
ह्याचेही बंधन नस्ते खास
वर्‍हांड्यातल्या डबड्यामधून
तुळससुध्दा घेते श्वास....

कवितामुक्तकशब्दक्रीडाविचार

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

31 May 2009 - 2:57 pm | क्रान्ति

काव्य कुणाला, कधी स्फुरावे
ह्याचेही बंधन नस्ते खास
वर्‍हांड्यातल्या डबड्यामधून
तुळससुध्दा घेते श्वास....

अगदी सही! कविता खूप आवडली.
:) क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

राघव's picture

4 Jun 2009 - 1:01 am | राघव

खूप आवडल्यात!

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

अरुण वडुलेकर's picture

31 May 2009 - 5:39 pm | अरुण वडुलेकर

क्रान्तिशी सहमत.
कविता आवडली.

बहुगुणी's picture

31 May 2009 - 6:31 pm | बहुगुणी

वृत्त, मात्रा, छंद
यात का करावे कवितेला बंद
नको अनुप्रास, न अलंकार वा यमक
शब्द काळजाला भिडणं हे यशाचं गमक

नाना बेरके's picture

2 Jun 2009 - 7:58 pm | नाना बेरके

छंदावाचून कळली कविता
शब्दांच्या पलिकडली.

चांगली वाटली.

प्रमोद देव's picture

2 Jun 2009 - 8:04 pm | प्रमोद देव

कविता मस्तच आहे.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

मला छंदमुक्त आणि मुक्तछंद काव्य आवडते, पण तुमचे कारण नाही पटत. तुमचे शेवटचे कडवे उत्कृष्ट आहे, पहिले कडवे सुमार आहे, ते छंद-मात्रांमुळे नव्हे. कवितेला कल्पकतेचे आणि कौशल्याचे निकष असतात, म्हणून तुमचे शेवटचे कडवे बहारदार आहे.

- - -
पुढील विडंबित कविता "शब्दकोषाची बंधने तोडलेली मराठी कविता" का न म्हणावी?

So look at this Marathi poem. Why not call it a Marathi poem, simply because it does not fit in the Marathi dictionary and "rules"?

I am lost in Marathi poetry काव्यात हरवलेला मी ..
Marathi words have no count शब्दांना नाही गणती
Leave one, add another एक सोडावा, दुसर्‍या जोडावे
line, for limits on Marathi words ओळ, शब्द मर्यादेसाठी
in the mind - this right this to be left मनामध्ये उजवे, डावे

Some say कुणी म्हणतात . .
Marathi poems have to be limited काव्य असावे छांदस,
To Marathi dictionary words शब्दांच्या मर्यादेत.
Not using this limit is wrong मर्यादा सोड्ली तर गैर,
And non-Marathi and loose नी छंदमुक्त अन स्वैर..

I don't think that मला नाही वाटंत तसं, कि ..
limits are needed for Marathi poems हव्यात मर्यादा काव्यासाठी
The bottomless sea, raging winds अथांग सागर, सुसाट वारे
The open Marathi nature is for all खुला निसर्ग सर्वांसाठी

May I ask you this? एक विचारू तुम्हाला मी. .?
In a jungle by an untrod track जंगलामध्ये आडवाटेवर
Aren't there patches of flowers फुलांची असतेच् ना वस्ती ?
Don't knowing birds go रसिक पाखरे येतातच् ना
On those juicy fruit रसभरल्या फळांवरती ?

So then I think म्हणून कधी वाटते मला. .
I don't want Marathi poems tied to dictionary words छंदोपजीवी काव्य नको ..
I want to hear of no limits मर्यादेचे नांव नको ..
For meaningful feelings अर्थभारल्या भावनांना
Let there we no word list संख्याबाधीत ठाव नको

I tell you it is so असेही असते बरं कां ..
There is no bound to काव्य कुणाला, कधी स्फुरावे
Whom and when a poem comes ह्याचेही बंधन नस्ते खास
Though English the word "Dalda" on the tin वर्‍हांड्यातल्या डबड्यामधून
There is a Marathi tulsi is within. तुळससुध्दा घेते श्वास....

प्राजु's picture

2 Jun 2009 - 8:49 pm | प्राजु

वर्‍हांड्यातल्या डबड्यामधून
तुळससुध्दा घेते श्वास....

ही ओळ जीवघेणी आहे. :)
मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

9 Jun 2009 - 10:27 am | विसोबा खेचर

अप्रतीम कविता रे दत्ता..!

तात्या.