माझी मद्रास ची सफर

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
13 May 2009 - 12:08 am

नमस्कार मंडळी...
मी मिपा ची एक शांत वाचक.. ईथे बरीच मंडळी धो-धो लिहीताना पाहून वाटे.. की आपणही लिहावं.. पण का कोण जाणे.. पट्कन गूगल क्रोम उघडले जाते... नी त्यात.. एक अक्षर खोडले , की पुढची अक्षरं बोंबलतात.. पण आताशा ही उर्मी जरा जास्तच उचल लागलीय... कारणे दोनः एक, पेशावर मधल्या एका गायिकेची भावांकडून हत्या.. कारण काय.. तर ती टी. व्ही. वर गाते... आणि दुसरे.. देवांनी चालु केलेली.. मद्रास ची लेखमालीका...
चला... काही कारणाने सुरुवात तर होतेय... मी हे माझ्या तिथल्या वास्तव्यातले अनुभव मांडतेय... काही नव्याने माहीत झालेल्या गोष्टी... काही विचित्र वाटलेल्या.. त्यातल्या काही तर खुपच खटकलेल्या... खुपदा वाटे की याबद्दल पण चर्चा व्हायला हवी... तालिबानी पाकिस्तानचा संदर्भ यासाठी, कारण ते नको तितके परंपरावादी असतात... खास करून मुली नि स्त्रियांच्या बाबतीत..... चेन्नईत ही काही वेगळी परिस्थिती नाही... फक्त कट्टरपणा तितका नसेल... असो..

पार्श्व्भूमी: मी.. सध्या मुंबईकर... अभियांत्रिकि महविद्यालयात व्या़ख्याती.. एका.. प्रशिक्षणासाठी भारतीय औद्यौगिकि प्रशिक्षण संस्था (आय आय टी) मध्ये गेल्या मे-जून मध्ये जाण्याचा योग आला... आता पर्यंत या मद्रदेशा बद्द्ल फक्त ऐकले होते.. आता प्रत्यक्ष जाण्याची संधी अन वेळ दोन्ही आल्या होत्या... उन्हाळ्याचे दिवस... सग्ळ्याना सुट्या.. त्यामुळे गर्दी असणार ही अट्कळ होतीच..पण ट्रेनिंगही चुकवायचे नव्हते.. म्हनून आगगाडी आणि विमान.. दोहोंचे तिकिट घेतले.. आगगाडी चे काही शेवट्पर्र्यंत नककी झाले नहीच मग शेवटी विमानशिवय पर्यायच नव्हता... त्यात मी एकटीच जाणार होते.. माझा मानलेला भाउ म्हणाला.. विमानानेच जा.. म्हणजे दोन दिवस तु पोचलीस की नाही याची काळजी तर लाग्णार नाही...!!! झाले.. एकदाचे बाईसाहेबांचे विमान उडाले... पोचल्यानंतर पहिला अनुभव म्हनजे तिथले रिक्शवाले.. त्यांच्याबद्दलचे अनुभव सविस्तर येतीलच..

तर.. तिथे आय आय टी च्या तारामणी अतिथीगॄहात राह्ण्याची व्यवस्था होती.. चौकशी केल्यानंतर कळाले कि एक हैद्राबाद ची मुलगी रुममेट आहे म्हणून.. बरेचसे प्रसंग तिच्यासोबत असतानाच आले...

प्रसंग १) मला पोचल्याच्या दिवशीच एका नातेवाईकांकडे जायचे होते... त्यांना मी काळे की गोरे हेही पाहिले नव्हते पण आईची भु्णभुण नको म्हणुन गप्प जायला तयार झाले होते... मि निघेनिघेस्तोवर ही मुलगी आली.. २२-२३ वय असावं साधारण... बहुधा पहिल्यांदाच घरबाहेर नि तेही इतके दूर आली असावी... बाबा अन भाउ पोचवायला इथवर आले होते...पण ते रुम मध्ये काही आत नाही आले.. मी अपली निघण्याच्या गड्बडीत तरीहि म्हट्लं.. त्या दोघांना आत बोलाव.. थोडे हातपाय धुवुन ताजेतवाने वाटेल... सग्ळ्यांनी मझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले.. मि पुन्हा एक्दा तरीही पुनरुच्चार केला... नि निघाले.. (यायचे तर या.. नाहीत्र तुमची मर्जी...) सन्ध्याकाळी तिला विचारले.. तर मुलींच्या रुम मध्ये पुरुष कसे जाणार?? हे उत्तर मिळाले.. (आयला.. हे आणखी काय असते??) जाउ दे.. नवीन जागा... नवीन लोक..कुणाची मते कशी.. माहीत नाही..... नि कुणाच्या अध्यात्मध्यात पडायचे नाही म्हणुन काही न बोलता झोपले..

प्रसंग २) दुसर्या दिवशी यथावकाश इतर लोकांशीही ओळख झाली.. मी आणी एक गुज्जुभाइ सोडला तर झाडुन सारे केरळी न तामिळी होते... मी मुंबईची म्हटल्यावर.. मल्लिका तिचे रोजचे कपडे माझ्याकडुनच उसनवारीवर नेते.... मी कपडेबदलल्यासारखे बॉयफ्रेंड्स बदलते... रोजची अर्धी रात्र पब मध्येच होते....हे नी असंच बरंच काही बोलणार्या नजरा मी स्पष्ट वाचल्या.... नी वरती इतरांना ओळख करून देताना.. बॉम्बे गर्ल... अशीच खासकरून दिली जायची... (नंतर २ आठवड्यांच्या काळात हे इत्क्यांदा झाले... कि याचे काही वाटेनासे झाले.. यथावकाश ते प्रसंगही येतीलच)

प्रसंग ३) सन्ध्याकाली आयआयटी च्या बाहेर फिरायला जायचा बूट निघाला... त्यांच्या विजेरी वर चालणार्या मिनिबसेस मधुन गेलो.. जाताना तर काही गर्दी नव्हती.. पन येताना मात्र चांगलीच भरली होती.. अचानक मी पाहिले.. की मागे बल्कनी ला एक जागा रिकामी होणार होती.. तसं माझ्या मुंबईच्या मित्रमंडळीत मी सर्वात लहान असल्याने सगळयांनी डोक्यावर चढवलेय.. पन त्याच वेळी आपल्याहून कुणी लहान असेल तर त्याची काळजी आधी घ्यायची हेही शिकवलेय.. नि त्यात हिचे बाबा-भाउ तिला इत्क्या दुरून सोडायलाही आले होते.. साह्जिकच.. त्यामुळे आम्ही तिला हाक मारून त्या सीट शेजारी बोलावू लागलो.. पण ती काही तिच्या जागेपासुन ढिम्म हलायला तयार नव्हती... नि इत्क्या गर्दीत ती राखुन ठेवणेही शक्य नव्ह्ते.. परिणामी लहान नाहीतर सग्ळ्यांत जे मोठे होते.. त्याना ती जागा कशीबशी मिळवून दिलि... तिला रूम मध्ये गेल्यानंतर का गं आली नाहीस म्हणून विचारले... तर म्हणाली.. " हाउ केन आय सीट नेकस्ट टू स्ट्रेंज जंटलमेन"??? मी परत सपाट.. (तिचंच काय, बर्याच जणांचं इंग्रजी कच्चं होते.. त्यामुळे तिच्या लेखी सगळे पुरुष पुस्तकि भाषेप्रमाणे जेंटलमेन होते... सगळे दक्षिणी बंधुभगिनी जेवण झाले का असे विचारायचे असेल तर, "completed??" असे विचारत!!!!) पण आतापावेतो मी धीट झाले होते.. मुलगी खुपच निरागस होति.. त्यामुळे तिने मी काही विचारले तर मनावर नसते घेतले.. म्हणून म्हट्ले.. बये.. हे प्रकरण काहीतरी नवीन आहे.. जरा सांगशील का समजावून?
तर होते असे: घरची शिकवण अशी होती कि.. परपुरुषाच्या शेजारी बसायचे नाही.. बसले तर लोक वाइट चालीची ठरवतात... समाजात मुलीला नि घरच्यांना प्रतिष्ठा मिळत नाही.. (बरोबर आहे कि.. चुकलं कुठे मग?? पण ते आपल्या घरी फक्त ना?? तिथे भरपूर जागा असते.. नि कुठे बसायचे यासाठी हजारो पर्याय असतात.. इथे बस आणी ट्रेन च्या गर्दीत हा विचार करायला तरी सवड मिळते का हो मुंबईकर??)

मग मी तिला समजावून सांगितले... हे बघ.. बदलत्या काळानुसार नियम नि विचार थोडे बदलायला लागतील...
१. हे सगळे नियम आपण घरी असताना अंमलात आणू शकतो.. तिथे जागा भरपूर असते... नी कुठे बसायचे हे आपल्या हातात असते.. नि असे असताना जर तू परपुरूषाशेजारी बसलीस.. तर नक्कीच ते वाईट ठरवले जाईल...
१. पण, तु बस मध्ये परपुरषाशेजरी बसली नाहीस.. नि गर्दीत उभी रहिलीस... कि आजुबाजूच्या ५-६ लोकांचे किमान धक्के लागतात.. Vs जंटलमन च्या शेजारी जास्तीत जास्त दोन(दोहो बाजूंचे जंटलमन) की जे तु टाळूही शकतेस...
२. तरीही एखाद्याने त्रास द्यायचा प्रयत्न केल्यास सोबतचे अथवा सहप्रवासी मदत करू शकतात.. पण जर तु उभी असशील... तर गर्दी आहे.. धक्का लागायचाच अस पवित्र घेतला जाउ शकतो
आता.. जसंच्या तसं सारं आठवत नाही पण बरंचंसं सांगितले होते.. पण (देवकीताईंचा!!) ती अंमलात कित्पत आणेल.. शंकाच होती..
आणी झालं अगदी तस्संच हो... वर्गातली ७० मुलं ऐकतात.. नि नंतर समोर असताना तरी सांगितल्याप्रमाणेच वागतात.. पण ही मास्तरीण मात्र ढिम्म!!! :(

प्रसंग ४) चेन्नई मध्ये पोंडी बाजारात जाण्यासाठी बसमधून निघालो... वेळ दुपारची होती.... त्यामुळे गर्दी तितकीशी नव्हती... माझ्या रूम मेट्चा जेंटलमनचा अनुभव लक्षात होताच... एकाच बाईशेजारची जागा रिकामी होती नि बाकी टिकाणी एक पुरूष अथवा दोन्ही जागा भरलेल्या होत्या..बस बर्यापैकी स्त्री व पुरूष अशी विभागली गेली होती... तिला म्हटले.. जा तू लेडी कडे.. मल जेंटलमन शेजारी बसयला काही प्रोब्लेम नाही... मी बसले मात्र.....( आणि मुंबईतून तिकडे गेले म्हणजे.. आरामदायक पोषाख म्हणजे जीन्स अन शर्ट (कधीतरी कुर्ता)... केस ही कापलेले...) यच्चयावत लोकांनी... काय छचोर मुलगी आहे.. असे द्रूष्टीक्षेप टाकले.... यंडूगुंडू काहीतरी बोलले.. पण त्यातले बाँबे गर्ल हे शब्द मात्र नीट ऐकू आले...

प्रसंग ५) या सार्या प्रकाराची बिचार्या गुज्जुभाईला काही कल्पना नव्हती... नि तो एक बाई उतरल्यानंतर रिकाम्या झालेल्या सीट वर (आणखी एक बाई त्या बाकावर बसली होती) बसायला गेला.... त्याला तिथे बसूही न देता.... तीने जे काही शब्द उच्चारले... ते वर्णायला माझा कळफलक असमर्थ आहे!!!! :P

नंतर कळाले.... परस्त्री शेजारी बसून प्रवास करण्याचा प्रयत्न जरी केला.. तर आधी ती बाई स्वतः , किंवा तिच्याबरोबरचा पुरूष.. जो भाऊ वा पती नसेल, तर दुसर्या बाकावर बसलेला असतो... नि या दोघांनी काही म्हटले नाही ... तर कंडक्टर स्वतः..., येऊन त्या पर(!)पुरूषाला रागे भरतात.. अहो खोटे नाही.... एक्दा असेच एक जेंटलमन.. माझ्याशेजारची जागा रिकामी पहून तिथे बसायला आले.... त्यांना मास्तर रागवले.. मी म्हटलं.. मला काही प्रोब्लेम नाही.... यांना बसायचं तर बसू द्या.. यावर काय धर्मबुडवी अवलक्षणी कार्टी आहे.. असंच कायसंसं मोठ्मोठ्यांदा(!) पुट्पुट्त गेला... (बाँबे गर्ल चं पालुपद होतंच तोंडी लावायला)

आता पूढ्चे याबाबतीतले प्रसंग तपशीलात देत नाही.. मात्र...
१५ दिवसांचे प्रशिक्षण संपत आले.. तरी.....
माझी रूम मेट... माझे एक सहाध्यायी(वय वर्षं ५० नि आम्हा सर्वांचे एकमेकांसोबत दिवसातले १७-१८ तास व्यतीत होतात) त्यांच्या शेजारी ही बसत नाही... आणि अजून्ही धक्के खात उभी रहाणं तिला सोयिस्कर वाटते....

माझा दुसरा एक सहाध्यायी... वय वर्षं २८... ४४ वर्षं वयाच्या आमच्याच गटातल्या बाईंशेजारी सार्वजनिक वाहनात बसत नाही...

मला जाड मिशांच्या दाक्षिणात्य हिरोंबद्द्ल जाम चीड आहे... प्रत्यक्ष आयुष्यात आजोबा झाले तरी.. पडद्यावर... मुख्य नायक.... त्यामुळे मी यावर खुप छान वाद घालू शकते.. नि साह्जिकच ते लोक असे शेरे सहन करू शकत नाहीत... असाच एक्दा एकासोबत वाद रंगात आला असताना.(वेग्वेगळ्या बाकांवर बरं का!!). काय वाह्यात कार्रटी आहेत.. असाच आजूबाजूच्या सगळ्यांचा अविर्भाव होता....त्यात आमच्या ग्रुप मधले लोक नव्हते.. एव्हाना आम्ही एकमेकांना बर्यापैकी ओळखू लागलो होतो... एक तर आम्ही दोघेही असणार्या खर्या वयापेक्षा खुपच लहान दिसतो....आणि, सार्वजनिक ठिकाणी मुलामुलींनी बोलणे... थट्टामस्करीतही वाद घालणे बहुधा तिकडे मान्य नसावे....
तर मला म्हणायचंय असं, की जर चेन्नईत ही कथा... तर खेड्यापाड्यांत काय परिस्थिती असेल???
मला सांगा... असं शेजारी बसून प्रवास केल्याने का कुणी चांगल्या किंवा वाईट चालीचं ठरतं... मुंबई सारख्या ठिकाणीतर असा विचारही करता येणं अशक्य आहे... नि जर यासगळ्या गोष्टी करून जर तुमचे संस्कार सिध्द होत असतील.... तर हेच नियम ते स्वतः सगळीकडे क पळत नाहीत? यांच्या नि तालिबान्यांच्या मध्ये फरक कितिसा तो राहीला??

(क्रमशः)
[अवांतरः हा विचार प्रकटनाचा माझा पहिलाच प्रयत्न आहे... त्यामुळे सगळे लक्ष टंकलेखनाकडेच होते...त्यामुळे काही ठिकाणी ओघ कदाचित जणवणार नाही.... मद्रासच्या कथामालिकेचा २रा भाग प्रशिद्ध झाला.. तेव्हा लिहायला घेतलं होतं... आजच त्या मालिकेतला अंतिम भागही वाचला.. गेले दोन दिवस मिपा उघडलेच नाही.. असो... एक भाग तरी कसाबसा का होईना, पुर्ण झालाय...

पण आईशप्पथ.... ही लांबलचक पाने.... नी ३-४ भागांचे लेख.. किंवा लंबाचवडा प्रतिसाद टंकणारं कुणी भेटलं.. तर साष्टांग घालेन.. अगदी स्थळ्काळाचा विधिनिषेध न बाळगता..... hats off to you guys!!!]

संस्कृतीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

नंदन's picture

13 May 2009 - 12:28 am | नंदन

लेख छान झालाय. पुढच्या भागांची वाट पाहतो. मद्रासमधल्या सार्वजनिक परिवहनाच्या बसेसमध्ये पुरुष आणि स्त्रिया यांच्या राखीव जागा विभागणारा एक मोठा दोरखंड बसमध्ये असतो असे कुठेसे वाचले होते. बाकी मुंबईचा म्हटल्यावर थोडंफार यक्षलोकातून आल्यासारखा पाहण्याचा, बदलणारा दृष्टिकोन रंजक आहे. थोड्याफार फरकाने मलाही असे एक-दोन अनुभव आले होते. अगदी पेशावरसारख्या दूरच्या शहरातही याच जातकुळीचे अनुभव आल्याचं भारत-पाकिस्तान क्रिकेट दौर्‍यावर गेलेल्या लोकांनी नमूद करून ठेवलं आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मस्त कलंदर's picture

13 May 2009 - 12:44 am | मस्त कलंदर

आणखीही बरेचसे अनुभव आहेत.. नि बर्यापैकी मुंबईवरून्च आहेत.. यथावकाश टंकायचा प्रयत्न करेनच....

मस्त कलंदर
http://picasaweb.google.com/swatsurmy

बिपिन कार्यकर्ते's picture

13 May 2009 - 7:30 am | बिपिन कार्यकर्ते

कलंदर मॅडम, छान लिहिलंय. आवडलं. चांगलं लिहिलं असेल तर टंकलेखनाकडे लक्ष जात नाही. आणि फारशा चुका पण नाहीयेत. सो, पर्वा इल्ले, जस्ट राइट पण्णी...

मला तमिळलोकांबरोबर खूप सहवास लाभला आहे. त्यांच्या भाषेबद्दल, संस्कृतीबद्दल पराकोटीचे अभिमानी (खरं तर दुराभिमानीच) असतात बहुतेक जण. जगात तमिळ आणि (चुकीचे) इंग्लिश या दोनच भाषा आहेत असाच बर्‍याच जणांचा समज असतो. ;) आपली दखल न घेता निवांतपणे आपापसात तमिळमधून बोलत राहतात. आपण आपल्या अस्तित्वाची जाणिव करून दिल्यावर "काय तुम्हाला तमिळ कळत नाही?" असा खरोखरचा प्रश्न त्यांना पडत असावा. अर्थात सन्मान्य अपवाद आहेतच. पण सर्वसामान्य लोक असेच. असो.

मुंबईच्या लोकांबद्दल केवळ मद्रासमधेच नाही तर पूर्ण भारत - पाकिस्तानातले लोक वेगळ्याच दृष्टीने बघतात हा अनुभव मलापण आहेच. त्यांना वाटते की आपण अगदी फिल्मस्टार्सच्या अवतीभोवतीच राहतो.

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

13 May 2009 - 7:28 am | सहज

लेख आवडला. :-)

अजुन येउ दे!

स्वाती दिनेश's picture

13 May 2009 - 11:27 am | स्वाती दिनेश

बाँबे गर्ल,
लेख आवडला.
अजुन येउ दे!
सहजरावांसारखेच म्हणते,
स्वाती

क्रान्ति's picture

13 May 2009 - 8:52 am | क्रान्ति

मद्रास सफर आवडली. :)
अवांतर : वाईट संस्कार? तमिळ नट्या हिन्दी नट्यांपेक्षा जास्त बोल्ड असतात म्हणे! [खरं-खोटं देव जाणे]

क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

आनंदयात्री's picture

13 May 2009 - 9:01 am | आनंदयात्री

छान .. अजुन येउद्या अनुभव !!

प्रमोद देव's picture

13 May 2009 - 9:19 am | प्रमोद देव

बाँबे गर्ल...मस्तच लिहीलं आहेस.
मद्रास (आता चेन्नई) शहरातल्या बस सेवेबद्दल मी लिहायचे राहूनच गेले.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तिथे बायकांसाठी एक अख्खी बाजू राखीव असायची आणि ती बाजू मोकळी असली तरी त्यावर कोणत्याही पुरुषाने बसू नये असा दंडक होता. अर्थात आता कदाचित नियमात काही बदल झाला असल्यास मला माहीत नाही.
बंगलोरमध्येही हा अनुभव आला होता. एकूणच दक्षिण भारतात स्त्रियांना मान आहे हे पदोपदी जाणवते. स्त्री-दाक्षिण्य ह्या शब्दाचा उगम ह्यातूनच तर झाला असावा काय? ;)

मी सुद्धा एकदा त्या मोकळ्या जागेवर बसलो असतांना बसमधील इतर मद्रदेशीय जन्ता माझ्याकडे ज्या विचित्र नजरेने पाहात होती ते आठवले. नंतर स्वतः वाहक महाशय(कंडक्टर)माझ्यापाशी येऊन सांगते झाले....कुड्कुड्कुड.
मी नकारार्थी मान हलवली. तेव्हा त्याच्या लक्षात आले आणि तो इंग्लीशमध्ये बोलला आणि तिथला कायदा मला समजला.
जागा मोकळी असतानाही त्यावर बसायचे का नाही? ह्यावर मी माझ्या परीने वाद घातला पण बसमधील बाकी यच्चयावत लोक माझ्या विरोधात दिसल्यामुळे मी यशस्वी माघार घेतली.

येऊ द्या तुमचेही अनुभव....भरभरून आणि जरा सविस्तर लिहा एकेक अनुभवाबद्दल.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

मस्त कलंदर's picture

13 May 2009 - 9:36 am | मस्त कलंदर

माझ्या एका तामिळ मित्राला मी जेव्हा हे अनुभव सांगितले, तेव्हा त्याने सांगितले की दाक्षिणात्य पुरूष जास्त कामुक (अक्षरांचा रंग बदलत नाहिये) असतात.. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना अशा अनुभवापासून वाचवण्यासाठी असे नियम बनवले गेले आहेत.... ( जरा आठवा... दाक्षिणात्य चित्रपट.... नि त्यातली...ऐकलेली... पाहिलेली..... भडक... ओंगळवाणी द्रूश्ये.....)
यात स्त्रिदाक्षिण्याचा भाग कमीच....!!!!

मस्त कलंदर

सँडी's picture

13 May 2009 - 11:17 am | सँडी

मद्रासची सफर आवडली. अजुन विस्ताराने लिहावे असे वाटते.

अवांतर : आजकालच्या दाक्षिणात्य चित्रपटात नायकाकडे पहायला वेळ कुठे असतो...;)

-संदीप.
काय'द्याच बोला.

मस्त कलंदर's picture

13 May 2009 - 6:08 pm | मस्त कलंदर

अवांतर : आजकालच्या दाक्षिणात्य चित्रपटात नायकाकडे पहायला वेळ कुठे असतो.. ;)

हे मात्र अगदी खरं....

मस्त कलंदर

चिरोटा's picture

13 May 2009 - 9:46 am | चिरोटा

लेख आवडला.
दाक्षिणात्य पुरूष जास्त कामुक (अक्षरांचा रंग बदलत नाहिये) असतात.. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना अशा अनुभवापासून वाचवण्यासाठी असे नियम बनवले गेले आहेत

बेंगळूरुमध्ये तरी बाहेरून आलेल्या मुलीना हे अनुभव येतात असे ऐकले आहे.त्यात विदेशी पाहुणे असाल तर बघायलाच नको.व्यक्ती दिसेनाशी होईपर्यंत टक लावून बघणे हे ईकडे नेहमीचे आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

शेखर's picture

13 May 2009 - 10:03 am | शेखर

सुंदर लेखन. पुढचा भाग पण लवकर टाका.

समिधा's picture

13 May 2009 - 10:33 am | समिधा

मस्त लेख लिहीलाय, पुढील भाग लवकर टाका.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 May 2009 - 10:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त लिहिलं आहेत कलंदर ताई! वाचायला मजा आलीच, पण दोन महिन्यांच्या बंगळूरूच्या वास्तव्यात आलेले अनुभव पुन:पुन्हा येत आहेत असं वाटलं. फक्त मीच नाही, इतर मुंबईच्या मुलींकडेही लोकं "बाँबे गर्ल" म्हणून पहातात यामुळे खरंतर समदु:खी मिळाल्याचा फार आनंद झाला! ;-)

छान लिहिलं आहेत. टंकलेखनाची सवय होईल तसं तुम्हीही तावच्या ताव भरून लिहायला लागाल आणि त्याचा आनंदही होईल तुम्हाला!!

अवांतरः टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी "इनपुट फॉरमॅट"वर क्लिक करा. तिथे 'फुल एच.टी.एम.एल.' सिलेक्ट करा, रंग बदलतो. इथेही तेच केलं आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

13 May 2009 - 6:21 pm | परिकथेतील राजकुमार

एकदम नावाप्रमाणे मस्त कलंदर लेख.
लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे असे कुठेही जाणवत नाही.

पु.ले.शु.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

धमाल मुलगा's picture

13 May 2009 - 6:29 pm | धमाल मुलगा

कलंदरताई,
चांगलं लिहिताय की. आणि हो त्या क्रोमच्या नादी नका लागू बरं. त्याद्वारे गुगल आपली माहिती ठेवतं असं ऐकुन आहे.

आता मुद्द्याचं.
हे तामिळी अंमळ वेडपटच असतात असं माझं वैयक्तिक मत आहे. पराकोटीचा दुराभिमान हा त्यांचा (बहुतांशांचा!) सहज दिसणारा (अव)गुण.
बाकी, तुम्हाला आलेले अनुभव खरंच विचित्र आहेत बॉ. कमाल आहे ह्या लोकांची. कै च्य कै इमेजेस डोक्यात ठेऊन वावरतात हे लोक.

एक असाच किस्सा: मुंबईच्या आय-फ्लेक्समध्ये माझा एक मित्र होता त्या टीममध्ये १४ तामिळी आणि हा एकटा मराठी. तर म्हणे त्यांच्या ग्रुप मिटींगाही तामिळमध्येच चालायच्या. मित्रानं भांडून भांडून एच आर कडे वगैरे तक्रारी करुन त्यांना इंग्रजीत उतरवलं..हिंदीचा प्रश्नच नव्हता..एकालाही येत नव्हतं. तर, तामिळ परवडलं पण इंग्रजी आवरा अशी गत झाली म्हणे. :)

बाकी, स्त्रीदाक्षिण्य, मुलीबाळींना जपणं वगैरे गोष्टी नक्कीच चांगल्या आहेत, पण त्यांचाच उदोउदो करणारे प्रादेशिक चित्रपटात मात्र मुच्च्छड अगडबंब पंक्चर काढणार्‍यासारखे दिसणारे हिरो आपल्या लेकीच्या वयाच्या हिरोइनला चतकोर रुमालापासुन केलेल्या कपड्यांत नाचवत कवटाळताना पाहिले की नक्की खरं काय असा प्रश्न पडतो.

असो, आणखी येऊ द्या तुमचे असेच अनुभवकथन.

- (रात्री बेरात्री उदया, सुर्या टिव्ही चोरुन पाहणारा आंबटशौकिन) धमालमणि मुथ्थु :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

बिपिन कार्यकर्ते's picture

13 May 2009 - 7:22 pm | बिपिन कार्यकर्ते

मुच्च्छड अगडबंब पंक्चर काढणार्‍यासारखे दिसणारे हिरो आपल्या लेकीच्या वयाच्या हिरोइनला चतकोर रुमालापासुन केलेल्या कपड्यांत नाचवत कवटाळताना

या हिरोबद्दल काहीतरी कॉमेंट केली (हिंदीत) म्हणून मद्रासमधला रिक्शावाला मारायला (अक्षरशः) धावला होता.

बिपिन कार्यकर्ते

परिकथेतील राजकुमार's picture

13 May 2009 - 7:36 pm | परिकथेतील राजकुमार

च्यायला हा हिरो ? मग आमचे अशोकरावजी चव्हाण काय वाईट आहेत ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मस्त कलंदर's picture

13 May 2009 - 9:55 pm | मस्त कलंदर

बिपिनदा, तुम्हाला तो रिक्षावाला मारायला धावला असेल.. पण मला मात्र तिथे त्याचे जोक्स रंगवून रंगवून सांगितले... त्यातले बरेचसे आपण ईकडे रजनीकांथ च्या नावावर ऐकले आहेत...

मस्थ ;p कलंदर

बिपिन कार्यकर्ते's picture

13 May 2009 - 9:58 pm | बिपिन कार्यकर्ते

हे साहेब तळागाळाच्या वर्गात लै पापुलर आहेत म्हणे. त्याच्यावर टीका वगैरे केली की राडे होतात म्हणे जोरदार!!!

बिपिन कार्यकर्ते

मस्त कलंदर's picture

13 May 2009 - 10:20 pm | मस्त कलंदर

बिपिनदा, तुम्हाला तो रिक्षावाला मारायला धावला असेल.. पण मला मात्र तिथे त्याचे जोक्स रंगवून रंगवून सांगितले... त्यातले बरेचसे आपण ईकडे रजनीकांथ च्या नावावर ऐकले आहेत...

त्यातला मला आवड्लेला विनोदः

करवीर निवासिनी महालक्ष्मी मातेच्या एकदा मनी आलं या चालीवर.. एकदा न्यूटनच्या मनी आलं, की आपण एवढ्या मोलाचे गतिविषयक नियम सार्या जगाला सांगितले... जाऊन पाहुयात तरी ही मंडळी त्यांचा कसा उपयोग करताहेत ते.. नि त्याचं दुर्दैव असं, की पॄथ्वीवर तो उतरला नेमका विजयकांत च्या शूटींग लोकेशनवरती...
तिथे.. विजयकांतला १० गुंडानी घेरलेले असते.. वि. चे पिस्तुल रिकामे असते.. सगळेजण त्याच्या दिशेने गोळ्या झाड्तात... हा माकडासारखा ईकडेतिकडे उड्या मारत राहतो... गुंडांच्या गोळ्या संपतात... आता हा अरविंद त्रिवेदी स्टाईलमध्ये ही ही करू लागतो... सगळे चक्रावतात... हा पिस्तूल उघडून दाखवतो.. त्याने सगळ्यांनी झाडलेल्या गोळ्या आपल्या पिस्तू्लमध्ये झेललेल्या असतात.. :))

न्यूटन आत्महत्या करतो (मेलेला असून देखील)

मस्थ ;p कलंदर

यशोधरा's picture

13 May 2009 - 6:29 pm | यशोधरा

आवडला लेख. दाक्षिणात्य लोकांमध्ये स्रीला मान वगैरे असतो असं वाटत नाही, कधी कधी - खरंतर बर्‍याचदा, बसमध्ये बसायची वेगळी व्यवस्था आहे, हेच उत्तम असे वाटते!

प्राची's picture

13 May 2009 - 10:21 pm | प्राची

लेख आवडला. =D>
पु.ले.शु. :)

Nile's picture

14 May 2009 - 2:04 am | Nile

मद्रास! मद्रास बद्द्ल सगळं नकारार्थी पाहुन अजिबात आश्चर्य नाही वाट्लं.

पण मद्रासचे दिवस आम्ही सर्व मित्र मात्र मनापासुन miss करतो. तुम्हाला चार गमतीच्या गोष्टी सांगतो कदाचीत तुम्हीही आठ्वणी गोळा करुन परताल. :)

मद्रास म्हट्लं कि पहीला प्रश्न असतो खाण्याचा, तुम्ही IIT मुख्य लायब्ररी जवळील मेस मध्ये सकाळी जाउन पुरी-भाजी खाउन पाहीली आहे का? (नाव विसरलो, पण आमचे आवड्ते ठिकाण) तिथला डोसा तर अप्रतिम असतो! सांबार बंगलोर ला लाजवेल असं! कधी सकाळी सकाळी सहाला बाहेर येउन पहा, पहील्या घाण्याच्या इड्ल्या अन मेदुवड्यासाठी आम्ही रात्रं जागुन काढायचो, सहाला दाबुन खायचं आणि मग द्यायची ताणुन! रुपया दिड रुपयाला एक इड्ली, काय सुख होतं, श्या!! पाणि सुट्लं. :)
सात-आठ दिवसांत आंघोळ केली नसेल असा तो अण्णा, त्याचं ते संपुर्ण ओशट असं गाळा वजा हॉटेल, त्याचं नावच आम्ही dirty tea shop ठेवलं होत, पण त्या वाफाळलेल्या इड्ल्या समोर आल्या कि जगी सर्व-सुखी आम्हीच.

सेंन्ट्रल रेल्वेस्थानकाच्या मागे शिवसागर मध्ये मस्त पावभाजी मिळते. नुंगंबक्कम ला काही चांगली युरोपयीन ठीकाणं ही आहेत.

मद्रासच्या काही आवड्लेल्या गोष्टींमध्ये: भर उन्हाळ्यात मिळनारं ते एक रुपयाचं पाण्याचं पाकिट, १० रु. मध्ये इगा वा सत्यम मध्ये पाहीलेले ते सिनेमे, मोकळी लोकल वगेरै वगेरै. असो, आवरायला हवं! :)

नक्कीच पुण्यामुंबईची सर नाही मद्रासला पण लोकांचा साधेपणा मात्र चकित करुन जातो.

असो, IIT म्हणजे आमचं दुसर घर तिथलं, सिंधु नाही तरि क्रुष्णा, आठ्वणी ताज्या करुन दिल्याबद्द्ल मनापासुन आभारी आहे.

मस्त कलंदर's picture

14 May 2009 - 9:53 am | मस्त कलंदर

सगळ्याच आठवणी नकारार्थी नाहीत... पण मद्रास म्हटले.. की पहिल्यांदी हेच आठवते म्हणून.. काही चांगलेही अनुभव आहेत.... येतीलच ते मिपावर एक दोन दिवसांत..

मस्त कलंदर..

हे जीवन सुंदर आहे..