मिष्टर गोडबोल्यांची प्रेमकहाणी. (भाग दुसरा)

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
12 May 2009 - 8:25 pm

मिस्टर गोडबोल्यांची प्रेमकहाणी

गोडबोल्यांचा दिवस निर्लेप तव्यासारखा जायचा.आजचा दिवस आजच संपायचा . दुसर्‍या दिवसाठी त्याचा मागमूस पण नसायचा.काहीच छाया नसायची.
पेंटहाऊस मध्ये येऊन त्यांना दोन वर्षं होत आली होती. पण त्यांच्या गिरगावातल्या दिवसात आणि इथल्या दिनक्रमात काहीच फरक नव्हता.
सकाळी पेपर आणि शब्दकोडं .दुपारी ते एकटेच कॅरम खेळायचे.एकदा डाव्या हातानी आणि एकदा उजव्या हातानी.पण त्यांचं एकट्यानी कॅरम खेळणं विधुरानी ठेवलेल्या देवदेवकासारखं.
गेल्या उन्हाळ्यात मुलगी आणि जावई आले होते त्यांनी सुडोकू सोडवायला शिकवले म्हणून आता सुडोकूची पण भर पडली होती.
बरीचशी शब्दकोडी आणि सुडोकू अर्धवट सोडवून व्हायची .
अट्टल शब्दकोडं सोडवणार्‍याला शब्द नाही मिळाला तर दुसरा दिवस उजाडेपर्यंत हुरहुर लागून राहते असंही काही नव्हतं.नाही सुटलं तर नाही सुटलं कोडं.
समजा सुटलंच तर सांगायचं कुणाला?.

गेल्या उन्हाळ्यात आणखी एक गंमत ते शिकले होते ती म्हणजे एफएम रेडीओ.सकाळी त्या रेडीओवर गाणी ऐकत ते झाडांना पाणी घालायचे.त्यांच्या बागेतली झाडं त्यांनी हौशीनी आणलेली नव्हती.सोसायटीतली लिव्ह लायसन्सवाली मंडळी घर सोडताना एकेक झाड त्यांच्याकडे सोडून गेलेली होती. नेमस्तपणा पोटी गोडबोले झाडांचं बेबी सिटींग करत असायचे.
एफेम रेडीओचं मात्र तसं नव्हतं त्यांना रेडीओवर गाणी ऐकण्यापेक्षा रेडीओजॉकी(णी)चा आवाज ऐकायला आवडायचा.पण त्यातही एक पंचाईत होती .त्यांचा रेडीओ फक्त टेरेसवर छान वाजायचा.घरात आलं की बंद पडायचा.त्यामुळे उन्हं टेरेसवर येईपर्यंत ते टेरेसवर फेर्‍या मारत असायचे आणि असेच त्या दिवशी पण ते फेर्‍या मारत होते .सुधाबाई यायला थोडा अवकाश होता.
अचानक गोडबोल्यांच लक्ष एका कुंडीकडे गेलं .कुंडीतल्या झाडावर दोन मोठ्ठी पांढरी फुलं उमललेली पाहून त्यांना गंमतच वाटली .
ब्रम्हकमळच असणार त्यांनी मनाशी विचार केला.
काल रात्री उमलल्यावर बघायला आपण नव्हतो असाही विचार क्षणभर त्यांच्या मनात येऊन गेला.
गोडबोले हळूच झाडाजवळ गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की ती फुलं नव्हती.एक पांढरीशुभ्र नविन ब्रेसीअर वार्‍यावर स्वार होऊन त्यांच्या बागेत पडली होती. त्यांचा हात पटकन पुढे झाला आणि मागेपण आला. अशा बायकी वस्तूशी गेल्या कित्येक वर्षात त्यांचा संबंध आला नव्हता.पण त्यांना कोडं उलगडेना की ही वस्तू बागेत आली कुठून?
पण शंकेचं समाधानही ताबडतोब झालं.
शेजारच्या टेरेसवरून कोणीतरी शुकशुक केलं आणि त्याचं लक्ष वर गेलं .एक काळासावळासा सुंदर चेहेरा त्यांना दिसला. बाई हातवारे करून काहीतरी सांगत होती.
गोडबोले बावचळले.
त्यांनी खरं म्हणजे एरव्ही मुकाट ऐकलं असतं पण आधीच अशी वस्तू .
त्यातून मालकीण ती उचलून द्यायची विनंती करत होती.
एकूण परीस्थिती मिष्टर गोडबोल्यांच्या आकलना पलीकडली होती.
हातवार्‍यांचा फारसा काही उपयोग होत नाहीय्ये म्हटल्यावर मालकीणीनी बोलायचा प्रयत्न केला.
"प्लीज थ्रो इट."
जिवाचा धडाकरून मिष्टर गोडबोले पुढे झाले आणि दोन बोटाच्या चिमटीत त्यांनी ब्रेसीअर उचलली.
आता मालकीणीचा धीर सुटला होता.
"कमॉन थ्रो इट".
दोन बोटांच्या चिमटीत धरून फेकलेली वस्तू अर्ध्या मजल्याचा पल्ला पार न करता गुरुत्वाकर्षणाचे सगळे नियम सिद्ध करत वार्‍यावर झोके घेत खाली खाली गेली आणि तेराव्या मजल्यावर जाणार्‍या केबलवर वाळत घातल्यासारखी विसावली.फिरून वर बघण्याचा गोडबोल्यांचं डेरींग झालं नाही पण कानावर येणारे काही शब्द ओळखीचे होते.
"ओल्ड क्लम्झी इडीयट ".
सोबत दरवाजा धाडकन बंद झाल्याचा आवाजही आला.
ओल्ड -क्लम्झी -इडीयट गोडबोल्यांच्या भाबडेपणाचा अंत नव्हता .
त्यांनी एकदा वाकून बघीतलं .मनाशी विचार केला .आतून ते पंचा घेऊन आले . त्यांचा विचार उघड्यावर पडलेली लाज झाकावी एव्हढाच होता.अंदाज चुकला आणि पंचा हेलकावे घेत ब्रेसीअरच्या शेजारी जाऊन बसला.त्यांनी स्वतःला परत एकदा शिव्या घातल्या.
"ओल्ड क्लम्झी इडीयट"
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सुधाबाईंना आल्याआल्या त्यांनी केबलवाल्याचा पत्ता विचारला. त्यांचा चेहेरा प्रश्नार्थक झाला.
"साहेब बिलं भरलंय आपण."त्यांनी सांगीतलं.
गोडबोले काहीच बोलले नाहीत.सुधाताई सगळी बिलं वेळेत भरायच्या.
मागे एकदा गोडबोले टेलीफोनचं बिल भरायला गेले होते आणि रस्ता चुकले होते.त्यानंतर सुधाबाईंनी आपण होउन ही जबाबदारी स्विकारली होती.
गोडबोले हरवून जाणं हे त्यांचं मोठ्ठं दु:स्वप्न होतं.
नाराज नाही करायचं म्हणून त्यांनी गोडबोल्यांच्या हातात केबलचं बिल दिलं.रस्ता समजावून पण सांगीतला.
निघता निघता "मी येऊ का सोबत ?"असं पण विचारलं ."नको नको "म्हणताना गोडबोले लाजून गुलाबी झाले होते.
गोडबोल्यांनी निरखून पाह्यलं असतं तर सुधाबाईंचा थोडासा बदललेला रंग त्यांच्या लक्षात आला असता.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ केबलवाल्याच्या ऑफीसात एक तोंडावर मुरमं असलेला मुलगा त्यांना भेटला.
त्यानी बिलाकडे बघीतलं .
"अंकल,काय कंपलेन आहे"त्यानी एका मुरमाची शिकार करत त्यांना विचारलं.
"काही नाही."
गोडबोले काहीच बोलत नाही म्हटल्यावर तो आत गेला .कागदात गुंडाळून दोन डिव्हीडी त्यांच्या समोर ठेवल्या.
"साठ रुपये द्या,अंकल, शॉलीट ट्रीपल हायेत."
आता मात्र तोंड उघडून बोलल्याशिवाय पर्याय नव्हता.
गोडबोल्यांनी त्याला समस्या सांगीतली.
"दुपारी तीन वाजता फिस्क"असं त्यानी दोनदा सांगीतल्यावर गोडबोले घरी आले.
हातात एक चेंडू आणि दोरी घेऊन शॉलीट ट्रीपल बरोबर तीन वाजता आला.गोडबोले विकेटकीपर सारखे खाली उभे होते.
दहा मिनीटानी त्यांना हवी असलेले वस्तू हवेत तरंगत खाली आली.
शॉलीट ट्रीपल मेहनताना घेऊन रवाना झाला.
कामगीरीचा एक टप्पा पूर्ण झाला. आता दुसरा टप्पा ....
संध्याकाळी हातात एक कागदी पिशवी घेऊन ते समोरच्या पेंटहाउसच्या दाराशी उभे होते.छातीत प्रचंड धडधड होत होती.
पण ओल्ड -क्लम्झी -इडीयट त्यांना फारच टोचत होतं.
चौथ्यांदा बेल वाजवली आणि लिफ्टचा दरवाजा उघडून सुधाबाई बाहेर आल्या.
"साहेब ,तो दरवाजा आपला नाही ."
गोडबोल्यांचा चेहेरा इतका ओशाळला की सुधाबाईंनी पुढचे प्रश्न विचारलेच नाहीत.
घरात आल्यावर सुधाबाईंनी गोडबोल्यांच्या हातात पन्ह्याचा ग्लास देत विचारलं
" काय काम होतं ढमालीकडे"
गोडबोले काहीच बोलले नाहीत.
"ढमालीला भेटायचं असंल तर सक्काळ्ळी पाच वाजता उठा."
"कँपुटरवाली आहे ती .सकाळी येते घरी "
बिचारे गोडबोले काहीच बोलले नाहीत.पण
"काय करावं बरं ? " या विचारानी गोडबोल्यांना रात्री धडशी झोप पण आली नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रात्री न आलेली झोप तशी पथ्यावरच पडली. गोडबोले सकाळी पाच वाजताच बाहेर पडले.
लिफ्टच्या बाहेर उभे राहीले.सहा वाजले तरी ढमालीचा पत्ता नव्हता. तारवटलेल्या डोळ्यांनी वाट बघता बघता आठ वाजले .
हॉलचा दरवाजा उघडा ठेवून ते खुर्चीत बसून राहीले होते.
आठ वाजता समोरच्या दाराजवळ चाव्या खुळखुळल्याचा आवाज आला तेव्हा ते सावध झाले.काल दिसलेल्या काळासावळ्या चेहेर्‍यानी साक्ष दिली की मालकीण हीच.
त्यांनी जीव एकवटून "हेलो " म्हटलं .
"येस ? येस्स ? " आवाजातला राग लपत नव्हता .
मिष्टर गोडबोल्यांनी धैर्य एकवटून हातात पिशवी दिली.
"वॉट्टज दॅट ....आवाजात मद्रासी हेल होता.
"युवर सॉफ्टवेअर..दॅट हँगींग ऑन ट्री "
"माय व्हॉट ...?"
मिष्टर गोडबोल्यांनी परत एकदा सांगीतलं
"युवर सॉफ्टवेअर .."
बाईच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्या .त्रासीक चेहेर्‍यानी पिशवीतला मुद्देमाल बघीतल्यावर तिला हसावं की रडावं नव्हे फक्त हसावं एव्हढंच कळलं.
हसत हसत ती आत गेली आणि लिफ्टचा दरवाजा उघडून सुधाबाई बाहेर आल्या.

समोरचे पेटहाउस कुठल्यातरी कंपनीचे गेस्ट हाऊस आहे हे गोडबोल्यांना माहीती होते पण गेस्ट एव्हढे सुंदर असतात हे त्यांना माहीती नव्हते.
गोडबोल्यांचा मॉर्नींग वोक जरा हटकेच होता.सोसायटीतले रेग्युलर डायबेटीक पेशंट बाहेर पडण्याच्या आधीच गोडबोले बाहेर पडायचे आणि बाकीचे मॉर्नींग वॉकर्स बाहेर पडायचे तेव्हा ते घरी परतायचे.
अशाच एका पहाटे लिफ्टची वाट बघत असताना अनुसेरीची आणि त्यांची ओळख झाली.
अनुसेरी लिफ्टमध्ये आत येताच गोडबोल्यांना सिगरेटच्या धुराचा वास आला.त्यांनी अजाणता नाकाला हात लावला. अनुसेरीच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिनी मानेला हलका झटका देत गोडबोल्यांना विचारलं "हाय नेबर ऍम आय स्टिंकींग दॅट बॅड ?"
बिचार्‍या गोडबोल्यांना तिच्या इंग्रजीचा थांगपत्ता लागला नाही.
अंग चोरून ते फक्त "गुड मॉर्नींग "म्हणाले.
"वेल इट्स टू अर्ली .बट आय एम अनुसेरी, योर नेबर अँड मि. नेबर युअर नेम.?"
"दिगंबर .माय नेम दिगंबर ."गोडबोले म्हणाले .
चौदावा मजला आला .
दार उघडलं.गोडबोले बाहेर पडणार तोच आणखी एक प्रश्न .
"दइगंबर वॉव गुड नेम.व्हॉत डज इट मिन."
गोडबोले लाजले. लिफ्टच्या बाहेर पडता पडता म्हणाले "दिगंबर मिनींग नेकेड."
आता आश्चर्य अनुसेरीला वाटलं .
"फनी नेम नेबर ." दुसर्‍या क्षणाला ती मोठमोठ्यानी हसायला लागली.
"ऊप्स ! दईगंबर. माय नेकेड नेबर."
आपल्या नावापासूनच सगळी पंचाईत आहे असा विचार करत मिष्टर गोडबोले काही न बोलता त्यांच्या दरवाज्याकडे वळले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्या दिवसानंतर अनुसेरी आणि मिष्टर दिगंबर गोडबोलेंची ओळख वाढत गेली. त्यांना कळलं की ती श्रीलंकेची नागरीक आहे. व्हर्जीन ऍटलांटीकच्या बॅकऑफीसमध्ये काम करते. तिचा बॉस तिचा बॉय फ्रेंड आहे वगैरे वगैरे.
अनुसेरीला पण तिचा ओल्ड बॉय फार आवडला .मिष्टर गोडबोले कधी डीअर गडू झाले ते कोणालाच कळलं नाही. कुणालाच म्हणनं थोड चुकीचच असेल.
सुधाबाईं बारीक मागोव्यावर होत्याच.शिवाय दुबई विकलीत थोडी भर टाकतच होत्या.
एका शनीवारी दाराची बेल वाजली.
अनुसेरी दारात हसत हसत उभी होती. निळ्या रंगाचा बिनबाह्यांचा टॉप आणि आखूडसा स्कर्ट.टॉप जेमतेम बेंबीपर्यंत पोहचत होता.
गोडबोल्यांनी आवंढा गिळला पण त्यांना लाळेचा ठसकाच लागला. पाच फूट पाच इंचाच्या गोडबोल्यां समोर अनुसेरी थोडीशी उंचच असल्यामुळे गोडबोल्यांना मान उंचावून तिच्याकडे बघत
"या ना.आईये ना ..बसो , बसो असं म्हटल खरं तोपर्यंत त्यांना थोडसं बाजूला ढकलूनच अनुसेरी आत आली.
"वुद यु नॉत वेलकम मी ? "
आय सेड ना बसो बसो ..
बाहेरच्या आवाजानी सुधाबाई किचनमधून बाहेर बाहेर आल्या.
"काय मॅडम "असं म्हणत त्यांनी एकीकडे गोडबोल्यांकडे नजर टाकली.
गोडबोले मंत्रमुग्ध होऊन अनुसेरी कडे बघत होते.
"साहेब काय काम आह्ये विचारा ना" असं त्यांनी म्हणेस्तो तिनी चाव्यांच पाकीट सुधाताईंच्या दिशेनी फेकलं.
गोडबोले अजूनही अनुसेरीकडे बघत होते.
अनुसेरीकडे म्हणण्यापेक्षा तिच्या नेवल रींग कडे बघत होते. आख्ख्या आयुष्यात पहील्यांदा नेवल रींग जवळून बघण्याचा योग आज त्यांच्या समोर आला होता.
आयल नॉट बी हीअर दिस वीक एंड, सुदाबाई.आउट ऑफ स्टेशन.
गोडबोल्यांची निराशा त्यांच्या चेहेर्‍यावर उतरली.
सुधाबाईंना काय ते समजलं.
"तुम जावा बिंधास ,मै देखती इधर बराबर" असं म्हणत त्यांनी गोडबोल्यांकडे बघीतलं .
ते अजूनही त्या रींगमध्येच अडकले होते.
अनुसेरी आणि सुधाबाई एकमेकींकडे क्षणभर बघत राहील्या.
सुधाबाईंनी पा़कीट ब्लाउजच्या आत योग्य जागी ठेवता ठेवता गोडबोल्यांची नजर सुधाबाईंकडे गेली.
काही सेकंद त्यांना कळेचना नक्की कुठे बघावं ?
मग मनानी कौल दिला आणि त्यांची नजर परत नेवल रींग कडे गेली.
अनुसेरीच्या धीट स्वभावाला ह्या सगळ्या प्रकाराची गंमत वाटत होती.
"गडु बॉय ,धिस इज ओन्ली अ नेवल रींग...ती हसत हसत म्हणाली."माय गॉड यु आर स्टेअरींग.."
"आय आल्सो हॅव रींग ."गोडबोल्यांना कंठ फुटला.
"वॉट्ट ?" आता आश्चर्य वाटण्याची पाळी अनुसेरीची होती. "यु मीन ...असं म्हणत ती खदखदून हसायला लागली.
सुधाबाईंच्या डोक्यात काही प्रकाश पडेना पण तेव्हढ्यात तव्यावरची पोळी करपल्याचा वास आला आणि त्या किचन मध्ये पळाल्या.
गोडबोल्यांची धिटाई वाढली होती."यास ,आय हेव रींग बट केप्ट इन बँक लॉकर "
आता मात्र अनुसेरीचं हसणं पेंटहाऊसच्या छतापर्यंत पोहचलं होतं.
"माय गॉड रींग इन बँक लोकर्स.." हसण्याच्या लाटा वाढतच चालल्या होत्या आणि आत आणखी एक पोळी करपल्याचा वास आला.
"यास माय वाईफ्स रींग .नोज रींग "असं म्हणत गोडबोल्यांनी एक बोट नाकाला लावलं .
किचनमधून नेमकं तेव्हढंच सुधाबाईंना दिसलं . पुढच्या क्षणी तवा दाणकन ओट्यावर आपटल्याचा आवाज आला.
अनुसेरी खिदळत बाहेर पडली.
ब्रेकफास्टला त्या दिवशी करपलेल्या पोळ्याच गोडबोल्यांना खाव्या लागल्या.पण त्यांचं लक्ष नव्हतं.शनीवारी बॅक लवकर बंद होते हे एकच त्यांच्या लक्षात होतं .नाश्ता लगबगीनी करून ते बॅकेकडे गेले आणि सुधाबाई रागारागानी घरात कामं आटपत राहील्या. त्यांच्या डोक्यात काहीबाही चक्रं फिरत होती.
गोडबोले बाहेर पडल्यावर पंधरा मिनीटानी एक कल्पना त्यांच्या मनात आली.गॅस बंद करून त्या बाहेर आल्या .दरवाजाला आतून कडी घातली आणि बेडरुममध्ये गेल्या.बेडरुममधल्या आरशात त्यांनी स्वतःकडे निहाळून बघीतलं.एकदा डावीकडून एकदा उजवीकडून .मग घाईघाईनी त्यांनी साडी सोडून परत नेसायला सुरुवात केली. निर्‍या मोजून मापून केल्या. हव्या तशा कोनातून खोचून पाहील्या .मनाचं समाधान होईना.पुन्हा एकदा प्रयत्न केल्यावर बेंबीच्या दिड इंच खाली निर्‍या खोचण्याचं तंत्र मनासारखं जमलं.सुधाताई खुसुखुसु हसल्या.इंग्रजी नाही आलं तरी काय झालं त्यांच्या चेहेर्‍यावरचे भाव
"ढमाले बघ बघ ,रींग ऑर नो रींग माईन इज बेटर दॅन यू "असंच काहीसं सांगत होते.
*****************************************************************************************************
गोडबोल्यांनी हातातली छोटीशी डबी अनुसेरीला दाखवली.
"वॉव !! ब्युतीफुल .व्हॉट डू आय डू विथ धिस गडू ?"
"यू वेरींग सारी टुडे .वेर धिस आल्सो.यु हॅव गूड नोज लाईक ...."(चाफेकळी ला काय म्हणायचं हेच गोडबोल्यांना कळत नव्हतं)
गोडबोले मनाशीच बोलल्यासारखं हळूच बोलले पण आता तिलाही त्यांच्या बुजरेपणाची सवय झाली होती.
"गडू सो च्वीट"बट व्हेर इज सुधाबाई हाव डू आय वेर सारी ?"
"आय हेल्प यू"गोदबोल्यांची धिटाई फारच वाढायला लागली होती
"हाव रोमँटीक !!!!गडू ,बट नो . ."आयल डू इट मायसेल्फ."अनुसेरी जवळ जवळ किंचाळलीच.
हातात परकर आणि साडी घेऊन ती आतल्या बेड रुमकडे गेली.
गोडबोले चुळबुळत जायला निघाले.
"गडू डोंट गो.आयल नीड योर हेल्प टू वेर दॅट रींग" आता आवाजात हसण्याची एक मंद लकेर होती.
दहा मिनीटानी आतून परत हाक आली.
"गडू हेल्प मी प्लीज" अनुसेरी हातात साडीचा घोळ घेऊन उभी होती.
"आय कँट मेक द प्लीट्स" जस्ट हेल्प मी टू टक थिस इन"
गोडबोले पुढे झाल्यावर हळूच म्हणाली "..बट बी अ गूड बॉय अँड डोंट ओगल लाईक धीस"
तोपर्यंत अनुसेरीनी लावलेल्या डिओच्या सुगंधानी गोडबोले एका अनामीक मस्तीत आले होते.
त्यांनी तो घोळ घेऊन एकेक करून निर्‍या जमा केल्या .
निर्‍या खोचून देण्याच्या कल्पनेनी मस्ती आता सर्वांगात भिनायला लागली होती.
एक प्रॅक्टीकल प्रॉब्लेम त्यांच्या लक्षात आला आणि मस्ती डोक्यापासून पायापर्यंत सणसणायला लागली.
अनुसेरीनी उत्साहाच्या भरात परकराची नाडी एकदम गच्च घट्ट बांधली होती.
गोडबोल्यांनी एकदा अनुसेरीकडे बघीतलं .तिचे डोळे हलकेच बंद होते.
पहील्या प्रयत्नात निर्‍या काही निट खोचल्या गेल्या नाहीत.
"अनुसेरी धिस इज टाईट.."गोडबोल्यांनी सुचवण्याचा प्रयत्न केला .
अनुसेरीनी लांब श्वास सोडून पोट आत घेतलं .गोडबोल्यांनी दुसरा प्रयत्न केला.
आणि जे झालं त्याला वॉर्डरोब मालफंक्शन म्हणतात हे गोडबोल्यांना माहीती नव्हतं .
निर्‍या कोंबण्याच्या जोरानी परकराच्या नाडीनी प्राण सोडला आणि परकर आणि साडीचा डोलारा एकाएकी कोसळून खाली पायाशी आला.
अनुसेरी जोरात किंचाळली "गडू डॅम इट .. क्लोज योर आईज..."
गोडबोले त्या क्षणी एका उन्मनी अवस्थेत पोहचले होते.
त्यांना काहीच कळेना पण "क्लोज योर आईज" सांगूनही डोळे बंद व्हायला तयार नव्हते.
"प्लीज क्लोज योर आईज गडू आयम ऑलमोस्ट डिगंबर "एव्हढच सारखं सारखं त्यांना ऐकू येत होतं............................

व्हायचं ते झालंच . पंचवीस वर्षानी झालं .गोडबोल्यांनी ते थांबवायचा प्रयत्न पण केला नाही .ते होण्याचा प्रत्येक क्षण त्यांनी उपभोगला .गोडबोले कूस बदलून पुन्हा झोपी गेले.सकाळी उठल्यावर त्यांना ते आठवलं पण आता त्यांना लाज वाटत नव्हती. खूप हलकंहलकं वाटतं होतं.
सुधाबाईंनी "चादर धुवायला घ्यायची का?" असा प्रश्न विचारल्यावर मात्र थोडसं लाजल्यासारखं झालं खरं.

अपूर्ण....
*****************************************************************************************************

कथालेख

प्रतिक्रिया

मेघना भुस्कुटे's picture

12 May 2009 - 8:34 pm | मेघना भुस्कुटे

काका, तुम्हांला साष्टांग नमस्कार. इत्यलम.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 May 2009 - 8:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी. तिसर्‍या भागाची वाट पहात आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 May 2009 - 8:41 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमतच.... दुसरं गत्यंतरच नाही. अजून पुढे काय आता?

१२०-१६० बिपिन कार्यकर्ते

निखिल देशपांडे's picture

13 May 2009 - 10:56 am | निखिल देशपांडे

पुढचा भाग लवकर टाका......
==निखिल

धमाल मुलगा's picture

13 May 2009 - 1:51 pm | धमाल मुलगा

आयला! वाचायला सुरु केलं आणि दोन मिनिटं चरकलोच की. म्हणलं चुकुन 'जत्रा'चं पान उघडलंय की काय? ;)
पण नाय, रामदासकाकांवर विश्वास टाकून वाचत होतो. चीज झालं.

लय भारी हो काका! येऊद्या आणखी.

अवांतरः ह्या मानवाला नक्की कोणत्या पध्दतीचं लेखन आजिबात येत नसावं बरं? उत्तर अवघड दिसतंय. :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

कथा अश्लीलतेपासून वाचवायचं तुमचं कसब थक्क करणारं आहे, रामदास!
आता उत्सुकता ताणू नका!

चतुरंग

मेघना भुस्कुटे's picture

12 May 2009 - 8:51 pm | मेघना भुस्कुटे

एका वाक्यात नेमकं रसग्रहण. अगदी असंच म्हणायचं होतं. पण काकांच्या कथेनंतर उगाच आपली उधळमाधळ नको, म्हणून गप बसले होते.

प्राजु's picture

12 May 2009 - 8:53 pm | प्राजु

अश्लिलतेपासून.. खूप लंब ठेवून कथा चांगल्या वळणार पोचली आहे.
लवकर लिहा आता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन's picture

12 May 2009 - 9:13 pm | छोटा डॉन

>>अश्लिलतेपासून.. खूप लंब ठेवून कथा चांगल्या वळणार पोचली आहे.
+१, असेच म्हणतो ....

काका, थोडा आगाऊ आणि आमची सल्ला देण्याची लायकी नसली तरीही एक विनंती ...
कॄपया "इंग्रजी संवाद" हे मराठीत न दिलता आहे तसे इंग्रजीत लिहले तर वाचन सुलभ होईल ...
गुस्ताखी के लिये माँफी चाहता हुं ....

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

श्रावण मोडक's picture

12 May 2009 - 9:44 pm | श्रावण मोडक

सहमत.

संदीप चित्रे's picture

12 May 2009 - 10:56 pm | संदीप चित्रे

चतुरंगने पर्फेक्ट दाद दिलीय.
कथा लवकर पूर्ण करा ... वाट बघतोय !

नंदन's picture

12 May 2009 - 11:52 pm | नंदन

रंगरावांशी सहमत आहे, पुढील भागाची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

लिखाळ's picture

13 May 2009 - 6:12 pm | लिखाळ

कामुकतेच्या काठा काठाने जाता जाता कथा अश्लीलतेपासून वाचवायचं तुमचं कसब थक्क करणारं आहे, रामदास!
आता उत्सुकता ताणू नका!

अगदी बरोबर !
फार छान कथा ! पुढे वाचण्यास उत्सुक..

फारसे महत्वाचे नसलेले : गोडबोले तिथे राहतात की नाही याची जाणीव सुद्धा नसलेल्या बिल्डिंगमधले लिव्ह्-लायसन्स वरचे लोक त्यांना जाताना कुंड्या देतात हे आश्चर्याचे वाटले.

-- लिखाळ.

Nile's picture

12 May 2009 - 8:52 pm | Nile

सुरेख! बरेच दिवसांनंतर उत्कंठेला पोहेचल्यासारखं झालंय! ;)

आनंदयात्री's picture

12 May 2009 - 8:58 pm | आनंदयात्री

हा भागही एका कथेसारखाच वाटला .. आवडला !!

विसोबा खेचर's picture

13 May 2009 - 10:51 am | विसोबा खेचर

हा भागही एका कथेसारखाच वाटला .. आवडला !!

हेच बोल्तो...

रामदादा, जियो...!

तात्या.

मराठमोळा's picture

12 May 2009 - 9:18 pm | मराठमोळा

कथेने मला वाटत होते त्यापेक्षा वेगळा आणी अनपेक्षित टर्न घेतला खरा, पण खरच यावर एक सुंदर लघुपट तयार होईल असेच वाटते.
पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे.

चतुरंग शी सहमत.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

क्रान्ति's picture

12 May 2009 - 9:35 pm | क्रान्ति

आवडतेय. पुढचा भाग कधी?
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
http://www.agnisakha.blogspot.com

ब्रिटिश टिंग्या's picture

13 May 2009 - 12:46 am | ब्रिटिश टिंग्या

चतुरंगकाकांशी सहमत!

अवांतर : यापुढे मी सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे हे सांगताना आता दर वेळेस हसु फुटेल ;)

पिवळा डांबिस's picture

13 May 2009 - 12:55 am | पिवळा डांबिस

"युवर सॉफ्टवेअर..दॅट हँगींग ऑन ट्री "
हहपुवा!:)

रामदासाचा 'काकोडकर' व्हायला लागलेला दिसतोय!!! ;)
चालू द्या!:)

धनंजय's picture

13 May 2009 - 1:28 am | धनंजय

एखाद्या मध्यमवयीन पुरुषाचे रेतस्खलन ही विनोदी लेखातली घटना वाचून...
लेखक कल्पक आहे याबद्दल खात्री बळकट झाली!!!
गोडबोल्यांच्या धांदरटपणाबद्दल कधीकधी हसू येण्याऐवजी जरा शहारायला झाले - फळ्यावर नख ओढल्याच्या गमतीदार आवाजासारखे :-(

चन्द्रशेखर गोखले's picture

13 May 2009 - 6:52 am | चन्द्रशेखर गोखले

छान ! खूप आवडली लेखन शैली !!

सहज's picture

13 May 2009 - 8:14 am | सहज

:-)

आता पुढचा भाग पण २८ दिवसांनी का ?

डॉ.प्रसाद दाढे's picture

13 May 2009 - 8:52 am | डॉ.प्रसाद दाढे

शब्द नाहीत.. प्लीज लवकर पुढचा भाग टाका..

विजुभाऊ's picture

13 May 2009 - 10:38 am | विजुभाऊ

छान ....पण बरेच दिवसांनन्तर आले काका.
खुसखुशीत कथा

चिरोटा's picture

13 May 2009 - 11:19 am | चिरोटा

आहे.आधी वाटले कथा शॉलीट ट्रीपल च्या दिशेने चालली आहे की काय.पण कथा अश्लीलतेपासून खूप लांब आहे.
तिसर्‍या भागाची वाट पहात आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

दिपक's picture

13 May 2009 - 1:52 pm | दिपक

उत्सुकता वाढवणारे अतिसुंदर लिखाण. कुठेही कृत्रीमपणा जाणवत नाही.
पुढील भाग आता लवकर टाका ही आवर्जुन विनंती. :)

(रामदासांच्या लेखांची आतुरतेने वाट पाहणारा)- दिपक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2009 - 3:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...!
कथा वाचतांना रमून गेलो ! :)

सॉफ्टेवेअर मस्तच ;)

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

13 May 2009 - 8:36 pm | मदनबाण

काका एकदम सरस... :)
पुढच्या भागाची वाट पाहतोय बरं... :)

"युवर सॉफ्टवेअर.
=))
हा.हा.हा...च्यामारी आपलं तर नेटवर्कच जामं झाल !!! ;)

(चावट)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

यशोधरा's picture

13 May 2009 - 11:40 pm | यशोधरा

पुढील भाग कधी?

विनायक प्रभू's picture

14 May 2009 - 6:47 am | विनायक प्रभू

हा भाग वाचताना 'पडोसन्' (सनई वाजवतानाचा शेवटचा सीन) आणि 'कुवारा बाप' मधला मेहमुद आठवला.
लेखातले कारुण्य हतबलता अस्वस्थ करुन गेली.
धनंजयशी संपुर्ण सहमत.

अवलिया's picture

14 May 2009 - 6:56 am | अवलिया

जबरदस्त !! वा !!

--अवलिया

मराठमोळा's picture

22 Oct 2010 - 8:26 am | मराठमोळा

रामदास काका,
कृपया पुढचा भाग लवकर लिहा. ही कथा अपुर्ण राहिल्याचे आठवत होते, न रहावल्याने इथे प्रतिसाद देत आहे.

सविता's picture

22 Oct 2010 - 9:28 am | सविता

सहमत.....

ज्ञानेश...'s picture

22 Oct 2010 - 11:15 am | ज्ञानेश...

ही कथा वाचलीच नव्हती... उत्खननाबद्दल ममोचेही आभार !
जोरदार कथानक आहे. ही कथा पूर्ण झाली तर आणखीनच बहार येईल.

विकाल's picture

22 Oct 2010 - 12:10 pm | विकाल

"एक अधुरी प्रेम कहाणी नको....काका कळस करा आता...!"

विकाल's picture

22 Oct 2010 - 12:10 pm | विकाल

"एक अधुरी प्रेम कहाणी नको....काका कळस करा आता...!"

शिल्पा ब's picture

23 Oct 2010 - 5:02 am | शिल्पा ब

मस्त गोष्ट...वयस्कर माणसाचा romance क्वचितच कुणी लिहितं...तुम्ही खूप छान लिहिलंय...हि कथा आधी माहितीच नव्हती...आता पुढचा भाग लवकर येऊ द्या.

गोडबोले आणि सुधाताई
किंवा
गोडबोले आणि ढमाली

रामदासकाका, आगे क्या हुआ? गोडबोले को रिकामा छोडकर काका मटका खेलने निकल गयेले है! इस गोडबोले का कुछ तो होने को मंगताय!!!

ही गोष्ट खंप्लिट वाचायला मिळणार का?

-- (प्रतिक्षाग्रस्त) असुर

प्रीत-मोहर's picture

8 Apr 2011 - 7:34 pm | प्रीत-मोहर

'बिका' म्हणाले स्वाक्षरीतलं वाक्य बदला, आम्ही म्हणालो 'ब्वॉर्र'!!!

हाहाहाहा __/\__

पिलीयन रायडर's picture

9 Apr 2011 - 10:29 am | पिलीयन रायडर

कथा आधि वाचली .. तारिख नंतर पाहीली... २००९????

चांगल्या कथा सुरु करुन मध्येच सोडुन देणार्या वर कारवाई केली पाहिजे......

श्रावण मोडक's picture

24 May 2011 - 5:35 pm | श्रावण मोडक

अ जंटल रिमायंडर सर! :)

गोगोल's picture

28 May 2011 - 6:20 am | गोगोल

अ रिमायंडर जंटलमॅन सर!

दत्ता काळे's picture

24 May 2011 - 6:46 pm | दत्ता काळे

कथा आवडली. बाकी डॉ. बिरुटेंशी सहमत.

शाहिर's picture

26 May 2011 - 5:45 pm | शाहिर

रापचिक !!

चिगो's picture

16 May 2012 - 5:16 pm | चिगो

"युवर सॉफ्टवेअर..दॅट हँगींग ऑन ट्री "

किचनमधून नेमकं तेव्हढंच सुधाबाईंना दिसलं . पुढच्या क्षणी तवा दाणकन ओट्यावर आपटल्याचा आवाज आला.

इंग्रजी नाही आलं तरी काय झालं त्यांच्या चेहेर्‍यावरचे भाव
"ढमाले बघ बघ ,रींग ऑर नो रींग माईन इज बेटर दॅन यू "असंच काहीसं सांगत होते.

ह्या वाक्यांना खास दाद..

काका, पुढची कथा? कृपा करुन पुढील भाग टाकावा, ही विनंती..

(नाहीतर ह्या भागासारखाच पुढचा भागही शोधून द्यावा, ही "मी-सौरभ"ला विनंती :-))

राघव's picture

25 Apr 2016 - 8:48 pm | राघव

कहर आहे! पुढचा भाग बहुदा आलेला नाही.. सापडला नाही.

वैभव जाधव's picture

25 Apr 2016 - 9:05 pm | वैभव जाधव

रामदास काका, लिहा हो.... पुढचा भाग

मराठी कथालेखक's picture

26 Apr 2016 - 12:55 pm | मराठी कथालेखक

कसली खतरनाक कथा.. मिपाकरांना फुकटात वाचायला देताय त्यबद्दल धन्यवाद :)
मला माझ्या आयडीची शरम वाटू लागलीये , बदलायलाच हवा :)

पुढचा भाग आहे का ?

रातराणी's picture

26 Apr 2016 - 1:52 pm | रातराणी

_/\_

टुकुल's picture

26 Apr 2016 - 3:08 pm | टुकुल

रामदास काका.. एकदा मनावर घेवुन संपवुन टाका कि हि कथा

मोहनराव's picture

26 Apr 2016 - 4:46 pm | मोहनराव

_/\_

रामदास भाव लिहा कि आता पुढचा भाग, उगाच कशाला वाचकांचा तळतळाट घेताय...

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2016 - 12:48 pm | टवाळ कार्टा

आयला रामदासकाकांनी लिहिले हे? भ ह न ना ट