आज हे माझे हे पहिले स्वतंत्र लेखन मिपावर होत आहे.काही चुका असतील तर माफ कराव्यात ही मिपाकराना विनंती.
आजकाल सर्व भारतभर लोकसभा निवडणुकीचे वारे वहात आहे. ही १५वी लोकसभा निवडणुक ५ टप्प्यात होत असुन तिचा पहिला टप्पा पार पडला आहे.महाराष्ट्रात ही २ टप्प्यात होत आहे.१५ व्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाकडे ठोस कोणताच मुद्दा नाही त्यामुळे प्रचारात व्यक्तिगत आरोप जास्त वाढले आहेत.भाजपाने पंतप्रधान मनमोहनसिंगाच्यावर निशाना धरला आहे तर कॉग्रेसने अडवानीना कोंडीत पकडले आहे.
कोल्हापुर जिल्ह्यात ह्या उलट वातावरण खुप तापले आहे. निवडणुका जाहिर होण्यापुर्वी कोल्हापुर जिल्ह्यातील दोन्ही जागा एकतर्फी राष्ट्रवादी कॉग्रेसला मिळणार अशी सर्वाना खात्री होती. पंरतु हे शरद पवाराना पटले नाही व त्यानी घोडचुका करुन ही निवडणुक काट्याची बनवली.महाराष्ट्रात शरद पवार हे अत्यंत धुर्त व चाणाक्ष राजकारणी समजले जातात.परंतु त्याचा धुर्तपणा त्याच्याच अंगावर उलटला आहे.ते कोल्हापुर जिल्ह्यात प्रत्येक निवडणुक इच्छुकाच्या पाठिवर हात ठेवुन तयारीला लागा असा इशारा गेली वर्षभर देत होते. त्याचा इशारा शिरसावद्य मानुन मुन्ना महाडिक व संभाजीराजे हे दोन युवानेते कामाला लागले. परंतु शरद पवार त्याचे ३५ वर्षापासुनचे सहकारी व विद्यमान खासदार मंडलिक ह्याना ते विसरले.ही घोडचुक आता त्याना महाग पडली आहे.मुन्ना महाडिक ह्याना दिलेला शब्द विसरुन त्यानी संभाजीराजे ना तिकिट दिले. परंतु महाडिक त्यामुळे नाराज झाले. गेली ४ वर्षे त्यानी त्याच्या युवाशक्तिच्या माध्यमातुन जिल्ह्यात खुप सामाजिक कार्य केले आहे व मागिल निवडणुकीत ते शिवसेना तिकिटावर उभे होते ,त्यात त्यानी मंडलिकाना काट्याची टक्कर दिली होती अवघ्या १५ हजार मतानी त्याचा पराभव झाला होता .या निवडणुकीत त्यानी पवारसाहेबानी शब्द दिला म्हणुन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यामुळे त्याचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. महाडिकाची नाराजी पवारांनी दुर केली पण आज कार्यकर्ते मंडलिकाच्या बाजुने फिरत आहेत्त.मंडलिकाची इच्छा जाणुन न घेता त्याचे वय झाले म्हणुन त्याना डावलले . परंतु हेच मंडलिक शरद पवारांवर जाहिर टिका करुन अपक्ष उभे राहिले.मंडलिकांच्या वर शरद पवारानी अन्याय केला आहे हि भावना आज लोकाच्या मनात रुजवायला मंडलिक यशस्वी झाले आहेत हे त्याचा प्रचारसभांवरुन दिसुन येत आहे.त्यामुळे कोल्हापुर मतदार संघातली ही निवडणुक एकतर्फी न होता अत्यंत चुरशीची होत आहे व त्यात मंडलिक विरुध्द शरद पवार असे वातावरण तयार झाले आहे.
इथे सभेत होणार्या टिका एकायला खुप मजा येत आहे. पवारानी मंडलिकाच्या वर टिका करताना त्याना म्हातारपणा मुळे वेड लागले आहे असे सांगितले. पुढे ते म्हणाले कि आता पोराचे लग्नाचे वय झाले अन हे मुंडावळ्या बांधुन लग्नाला तयार झाले आहेत.त्यावर मंडलिकानी पवारांवर टिका करताना सांगितले मी लग्नासाठी माझ्याच मांडवात उभा आहे तुम्ही मात्र दुसर्याच्या मांडवात शिरला आहात.तसेच शरद पवार माझ्याहुन ४ वर्षे मोठे आहेत मग म्हातारचळ कोणाला लागले आहे. अशा शेलक्या भाषेत प्रचाराचा धुरळा दोघानी उडवुन दिला आहे. एरवी एकतर्फी निवडणुक आता राष्ट्रवादीला जड जाताना दिसत आहे.मागील निवडणुकीच्या वेळीस शरद पवारांनी फक्त एकच सभा कोल्हापुरसाठी घेतली होती ,परंतु यंदा त्याना ६ प्रचारसभा घ्याव्या लागल्या आहेत,इथेच निवडणुक राष्ट्रवादी साठी अवघड असल्याचे दिसते.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
21 Apr 2009 - 12:45 pm | चिरोटा
ह्या राजकारणी लोकाना सांगा-मांडवात उभे रहा नाहीतर परसात उभे रहा पण निदान कपडे तरी घाला!!
पवारांचे वय (६९) लक्षात घेता माणसांची जमवाजमवी करण्याची ही पवारांची अखेरची वेळ असावी.शेंडी तुटो वा पारंबी ..प्रमाणे त्याना ह्यावेळी पंतप्रधान व्हायचेच आहे.कालच जयललिता 'पवार हे पंतप्रधान बनण्यास लायक उमेदवार आहेत' असे टी.व्हीवर म्हणाल्या.पुढचे पटवापटवीचे राजकारण करायचे तर महाराश्ट्रातून पवाराना १५ खासदार तरी निवडून आणावेच लागतील.कॉग्रेसचा पाठिंबा घेतला तर संरक्षण्/ग्रुह खात्यावर त्याना समाधान मानावे लागेल.त्यामुळे तिसर्या आघाडीचा पर्याय जास्त सोपा आहे.तिकडेपण चंद्राबाबु,मायावती,पटनायक दबा धरुन आहेतच.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
21 Apr 2009 - 12:47 pm | अवलिया
पहिल्या लेखाबद्दल अभिनंदन :)
बाकी, वाचत आहे :)
--अवलिया
21 Apr 2009 - 1:02 pm | सँडी
छान लिहिले आहे...विस्तारने लिहले तर अजुन माहीतीपुर्ण होईल.
-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
21 Apr 2009 - 1:05 pm | परिकथेतील राजकुमार
तटस्थ लेखनशैली आवडली.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
21 Apr 2009 - 1:05 pm | केदार_जपान
माहिती पुर्ण लेख आहे :)
कोल्हापुरात सामान्यतः राजकारण पक्षसापेक्ष नसून व्यक्तीसापेक्ष आहे... आणि जोपरयन्त मंडलिकाना तोडीस्-तोड उमेदवार मिळत नाही तोपरयन्त मंडलिक वरचढ रहातिल..जरी त्यानी फारसे उल्लेखनिय असे काही केले नसले तरीही..
तेच दुसर्या मतदारसंघात राजु शेट्टी सारखा उमेदवार आल्यामुळे, आणि त्यानी दुध्-ऊस दरवाढ इ. कोल्हापुर च्या शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्णांवर काम केले असल्यामुळे जनतेचा पाठिंबा त्याना राहिल असे वाटत आहे..
बघु काय होते ते..
-----------
केदार जोशी