कृष्णस्वामिनी..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
20 Apr 2009 - 8:19 pm

राजपुताना जन्म तिचा, मेवाडची महाराणी होती
भातुकलीच्या खेळामध्ये श्रीकृष्णाची रमणी होती..

दिन सरले ऋतू सरले, खेळ ना तो संपला कधी
गोविंदाच्या लीला मध्ये रमलेली ती तरूणी होती..

गीत तयाचे, नाव तयाचे, तन-मन अन रूप तयाचे
संसाराच्या वेशीवरती, कृष्णमयी ती गृहिणी होती..

कुणी म्हणे तिज व्यभिचारी, कुणी म्हणे तिज बेताला
कृष्णभक्तीचा नाद ल्यायली, ती वेडी तपस्विनी होती

मधु म्हणूनी विष प्यायली, सर्पमाला ती ल्यायली
कृष्णप्रेमा चिंब नाहली, ती अभिसारिणी होती..

सभोवताली अत्याचारी, मोह-माया पाश सारे
अंध:कारी जगतामध्ये, लखलखती दामिनी होती

'पौरूष एकच, तो मुरलीधर, अन्य गोपिका....' ती सांगे
रायदासी शिष्योत्तमा, ती दिव्य तेजस्विनी होती..

नीज तयाची, स्वप्न तयाचे, कृष्णभक्तीची ती परिसीमा
नीलवर्णी, श्यामवर्णी, ती घन:श्याम स्वरूपिणी होती..

नंदकंदा, रे मुकुंदा, ती तव भक्त शिरोमणी होती,
वरली ना कधी, तरी मानसी, ती तव अर्धांगिनी होती..

ना राधा, ना रूक्मिणी होती, ना कोणी तव सखी होती
देह त्यागिणी, कृष्णकामिनी, मीरा, तुझीच स्वामिनी होती...

- प्राजु

प्रेमकाव्यकविताप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

20 Apr 2009 - 8:31 pm | मराठमोळा

सुरेख कविता.

मधु म्हणूनी विष प्यायली, सर्पमाला ती ल्यायली
कृष्णप्रेमा चिंब नाहली, ती अभिसारिणी होती..

मस्तच.. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

संदीप चित्रे's picture

20 Apr 2009 - 8:32 pm | संदीप चित्रे

समर्पण भावनेचं दुसरं नावच !
>> नीज तयाची, स्वप्न तयाचे, कृष्णभक्तीची ती परिसीमा
नीलवर्णी, श्यामवर्णी, ती घन:श्याम स्वरूपिणी होती..

नंदकंदा, रे मुकुंदा, ती तव भक्त शिरोमणी होती,
वरली ना कधी, तरी मानसी, ती तव अर्धांगिनी होती..
>>
या ओळी विशेष आवड्ल्या प्राजु
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2009 - 8:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख कविता ! मला पंडिती काव्याची आठवण झाली.
सुंदर कथा काव्य म्हणेन मी...वरील कवितेला.

-दिलीप बिरुटे

शितल's picture

20 Apr 2009 - 8:49 pm | शितल

प्राजु,
प्रेमकाव्य सुरेख रचले आहेस. :)

यशोधरा's picture

20 Apr 2009 - 8:53 pm | यशोधरा

सुरेख!

मानस's picture

20 Apr 2009 - 8:56 pm | मानस

सुरेख प्राजु,

तुझ्या पहिल्यावहील्या कविता-संग्रहाचे प्रकाशन लवकरच होऊ दे हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना ..... मी नक्कीच असेन अशी आशा करतो.

अवलिया's picture

20 Apr 2009 - 9:14 pm | अवलिया

मस्त :)

--अवलिया

चंद्रशेखर महामुनी's picture

20 Apr 2009 - 9:19 pm | चंद्रशेखर महामुनी

प्राजु... कविता छान आहे..

दशानन's picture

20 Apr 2009 - 9:44 pm | दशानन

सुरेख !!!

ज ब रा !

मला खरं तर मीराचे खुप नवल वाटतं जेव्हा जेव्हा मी तिच्या बद्दल वाचतो, एवढं प्रेम कोणी कोणावर कसे करु शकते हेच मला समजत नाही !

थोडेसं नवीन !

चतुरंग's picture

20 Apr 2009 - 9:32 pm | चतुरंग

सुंदर कविता प्राजू! :)

चतुरंग

चन्द्रशेखर गोखले's picture

20 Apr 2009 - 9:56 pm | चन्द्रशेखर गोखले

एक सुंदर काव्य वाचल्याचा आनंद मिळाला !!

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Apr 2009 - 11:28 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम...

नीज तयाची, स्वप्न तयाचे, कृष्णभक्तीची ती परिसीमा
नीलवर्णी, श्यामवर्णी, ती घन:श्याम स्वरूपिणी होती..

भक्तिमार्गातली परमोच्च अवस्था... सुंदर वर्णन.

बिपिन कार्यकर्ते

समिधा's picture

20 Apr 2009 - 11:46 pm | समिधा

सुंदर लिहीली आहेस कविता अन्य शब्द नाहित.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

मीनल's picture

21 Apr 2009 - 2:20 am | मीनल

आवडली कविता.
साधी सोपी नाही म्हणता येणार पण खूप काही सांगणारी आहे.
मीनल.

क्रान्ति's picture

21 Apr 2009 - 5:15 am | क्रान्ति

सुन्दर कथाकाव्य. त्यातही माझ्या अगदी आवडत्या मीरेवर लिहिलेलं! खूप आवडलं.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

घाटावरचे भट's picture

21 Apr 2009 - 6:44 am | घाटावरचे भट

छान!

उमेश कोठीकर's picture

21 Apr 2009 - 6:49 am | उमेश कोठीकर

प्राजु,धन्य झालो ही कविता वाचून. तुझे कसे आणि किती आभार मानू हेच कळत नाही. प्रत्यक्ष श्रीकृष्णानेच जणू तुझ्या मीरेच्या हाताने लिहून घेतली असावी इतकी सुंदर आहे. दंडवत तुला.

मनीषा's picture

21 Apr 2009 - 7:11 am | मनीषा

मीरेचे अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले आहे .
कविता आवडली !

स्मिता श्रीपाद's picture

21 Apr 2009 - 10:51 am | स्मिता श्रीपाद

अप्रतिम कवीता...

-स्मिता

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Apr 2009 - 11:02 am | llपुण्याचे पेशवेll

सुंदर कविता.

पुण्याचे पेशवे

एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

राघव's picture

21 Apr 2009 - 11:06 am | राघव

सगळी कविताच अप्रतीम!
गझल म्हणण्याचा मोह आवरत नाही!

(प्राजुतै च्या कवितांचा फ्यॅन :) ) राघव

मदनबाण's picture

21 Apr 2009 - 4:14 pm | मदनबाण

सुंदर कविता... :)

(गोपाल भक्त)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

तिमा's picture

21 Apr 2009 - 6:05 pm | तिमा

प्राजुताई,
कविता छान लिहिली आहे.
पण गेय वाटत नाही, काही शब्दांना थोडे कंगोरे वाटतात.
चितोडगड पाहिला तेंव्हा मनापासून वाटले की एवढे सर्व जीवन कृष्णावर ओवाळून टाकणार्‍या मीरेला एकदा तरी कृष्ण भेटला असेल का ? या निव्वळ विचारानेच जीव कासावीस झाला.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

जयवी's picture

22 Apr 2009 - 6:53 pm | जयवी

माणूसघाणे..... खरंच त्या विचाराने जीव अगदी कासावीस झाला.

जयवी's picture

21 Apr 2009 - 8:01 pm | जयवी

छान :)

सुवर्णमयी's picture

21 Apr 2009 - 11:06 pm | सुवर्णमयी

मस्त ग प्राजू

विसोबा खेचर's picture

22 Apr 2009 - 9:54 am | विसोबा खेचर

वरील सगळ्यांशी सहमत....

सुंदर कविता..

आपला,
(गणेशभक्त) तात्या.