वाटा वेगळ्या

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
14 Apr 2009 - 5:12 pm

गर्द निळाईने रंगले आभाळ
शांत तळ्याकाठी दिशा विसावल्या
हलकेच जरा छेडता वा-याने
पाण्यात तरंग होऊन सांडल्या

सोन्याची झळाळी माखलेली सांज
फुलवित आली प्राजक्तपाकळ्या
घुमे घंटानाद राउळाच्या दारी
दूर डोंगरात झांजाही वाजल्या

काजळे क्षितिज, अंधाराच्या संगे
गूढ, अनामिक सावल्या जागल्या
एका अवघड वळणावरून
झाल्या तुझ्या माझ्या वाटाही वेगळ्या

तुझ्या वाटेवर आतुर फुलांनी
मुलायम गंधपाकळ्या पेरल्या
माझ्या वाटेवर उदास काळोख,
काट्यांचे कुंपण, भयाच्या सावल्या

तुझी वाट साद सुखाची घालते,
उजळीत लाख चांदण्यांच्या कळ्या
माझी वाट घुटमळते एकटी,
जशा पायी मणामणाच्या साखळ्या

कविताप्रकटनविचार

प्रतिक्रिया

उमेश कोठीकर's picture

14 Apr 2009 - 5:23 pm | उमेश कोठीकर

सुंदर आहे कविता.

सूहास's picture

14 Apr 2009 - 6:26 pm | सूहास (not verified)

<<सुंदर आहे कविता.>>

आम्हाला वाटलं सा॑गळेसाहेबा॑ची की काय !!

बाकी वरील ओळी छान...

सुहास
मिपादर्शनम सुखकारकम..

पाषाणभेद's picture

14 Apr 2009 - 5:36 pm | पाषाणभेद

"माझ्या वाटेवर उदास काळोख,
काट्यांचे कुंपण, भयाच्या सावल्या"
मस्त
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

प्राजु's picture

14 Apr 2009 - 6:12 pm | प्राजु

खूपच सुंदर!
माझी वाट घुटमळते एकटी,
जशा पायी मणामणाच्या साखळ्या
खास आहेत या ओळी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ठकू's picture

14 Apr 2009 - 6:23 pm | ठकू

अप्रतिम! अलंकारिक शब्दांत वेदना मांडली आहे.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

मराठमोळा's picture

14 Apr 2009 - 7:38 pm | मराठमोळा

कविता आवडली.. छान आहे... :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!