(देवाने मुलींना अस का बनवलं?)

अनामिक's picture
अनामिक in जे न देखे रवी...
28 Mar 2009 - 5:40 pm

प्रेरणा

*********************************

देवाने मुलींना अस का बनवलं?
की बघताच मन पत्येकीवर बसावं
सगळ्याच मला हव्याहव्याश्या वाटतात
पण तिने कोणा दुसर्‍याच्याच गळ्यात का पडावं?

कुणाचे डोळे, तर कुणाचे ओठ
प्रत्येकीचा काहीतरी वेगळाच गुण
दरिद्री मेलं मन, एकीवर बसत नाही
पाहताच त्यांना वाजते हृदयात धून

कुणी हसून आपलंसं करतं
कुणी लाजून हृदयात शिरतं
प्रत्येकीची खुबी निराळीच असते
मग आपली निद्रा कुठे आपल्याजवळ उरते

कुणी गुलुगुलू बोलून गार करतं
कुणी नुसत्या नजरेनेच वार करतं
किती अदा त्रासवण्याच्या असतात
मन हे वेडं प्रत्येक नखर्‍यात फसतं

सगळ्याच मुली कमाल करतात
नकोनको म्हणताना मनात घर करतात
कोणाकोणाला नजर द्यावी
एकसाथ सर्वच हृदयाला घेरतात

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

दशानन's picture

28 Mar 2009 - 5:42 pm | दशानन

छे छे !

तुम्हाला हे शोभत नाही बरं का !

आमच्या मनातील भावना अश्यारिती ने शब् बध्द करने आम्हाला पटले नाही बॉ ;)

=))

लै भारी !

झन्टयांक मॅट्याक झालं आहे विडंबन !

+१

अनामिक's picture

28 Mar 2009 - 5:46 pm | अनामिक

म्हणजे आपल्या दोघांनाही एकच भावना आवडते तेर? :X

अनामिक

दशानन's picture

28 Mar 2009 - 5:49 pm | दशानन

ओ भाऊ दुर रहा बघू ..... येथे ती भावना आवडते... तो भावना नाही =))

ह. घ्या.

अनामिक's picture

28 Mar 2009 - 6:01 pm | अनामिक

तुझ्यापासून दुर राहतो.... भावना मात्र जवळच राहील ;)

-अनामिक

मराठमोळा's picture

28 Mar 2009 - 5:47 pm | मराठमोळा

सहमत...

जबरदस्त !!!!!! एकदम जबर्‍या विडंबन...
फुलटु आवडलडले.

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

अनंता's picture

28 Mar 2009 - 5:53 pm | अनंता

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

शितल's picture

28 Mar 2009 - 7:15 pm | शितल

अनामिक,
झक्कास विडंबन केले आहेस. =))
तुझा ही गेम झालेला दिसतो आहे. ;)

टारझन's picture

28 Mar 2009 - 7:58 pm | टारझन

वा !! झकास !!! बेष्ट !!
शुद्धलेखणाच्या चुका नसल्याने शेवटपर्यंत वाचले =))
असो .. मेल्या अनामिका ... अरे काहीतरी चॉईस ठेव रे ... प्रत्येक येणारी पोरगी आवडत असेल तर त्याला "टर्की"(शब्दसौजण्य : सग'ळे) असा शब्द आहे ...

(शंभरात एखादी आवडणारा) टारझन

अनामिक's picture

28 Mar 2009 - 8:06 pm | अनामिक

चॉईस आहेच... शंभरात एक असाच आहे... पण बाकी सगळं I-Vitamin (Eye-Vitamin) कसं वाया जावू देणार... डोळे शाबूत रहायला नको? :)

-अनामिक

प्राजु's picture

28 Mar 2009 - 8:58 pm | प्राजु

कुणी गुलुगुलू बोलून गार करतं
कुणी नुसत्या नजरेनेच वार करतं
किती अदा त्रासवण्याच्या असतात
मन हे वेडं प्रत्येक नखर्‍यात फसतं

हे छान..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

हरकाम्या's picture

29 Mar 2009 - 1:22 am | हरकाम्या

काव्य लिहिण्याआधी घरची परवानगी घेतलीत का?

सुहास's picture

29 Mar 2009 - 4:17 am | सुहास

की बघताच मन पत्येकीवर बसावं
सगळ्याच मला हव्याहव्याश्या वाटतात

तुमचे लग्नाचे वय झाले आहे... लवकर शुभमंगल ठरवावे... ;)

स्वप्निल..'s picture

29 Mar 2009 - 5:10 am | स्वप्निल..

काय रे .. मस्त चालु आहे .. लेख, विडंबन .. चालु दे ..

अगदी झक्कास जमलंय!!!

स्वप्निल

मूखदूर्बळ's picture

29 Mar 2009 - 9:12 am | मूखदूर्बळ

एकदम फेस ऑफ स्टाईल :)
.
मस्त जमलय अनामिक :)

अत्तु's picture

2 Apr 2009 - 3:15 pm | अत्तु

अशीच कविता बरेच दिवसांपुर्वी मायबोलीवर वाचली आहे..खुप गोंधळ झाला होता तिथे.. निखिल राव या कवीनी लिहिली होती... ते निखिल राव आपणच का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Apr 2009 - 3:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

http://www.maayboli.com/node/6184?page=1

अनामिक यांच्या उत्तराची वाट पहात आहे.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

अनामिक's picture

2 Apr 2009 - 4:43 pm | अनामिक

माझ्या खरडवहीत मीच निखिलराव का असं विचारणार्‍या २-३ खरडी आल्या होत्या. त्यांना मी तो निखिलराव नाही आणि माझा मूळ कवितेशी काही संबंध नाही असे २ दिवसांपुर्वीच सांगितले. तसेच मी माबोवर जवळ-जवळ नसतोच... आणि माझे तिथे खातेही नाही. मी केलेले विडंबन किती फुटकळ आहे याची मला कलपना आहे... आणि मुख्य म्हणजे मला कुणाचे लेखण चोरी करायची गरजही नाही. तसे असते तर आता पर्यंत मी बरेच लेख-कविता लिहू शकलो असतो. मला जे माझे नाही ते माझे म्हणावयाची गरज वाटत नाही.

मला आलेल्या खरडीबद्दल आणि माबोवरच्या दुव्याबद्दल मी प्राजुताईला एक संपादक म्हणून आधीच कल्पना दिली होती... ति ई-मेल मी अदितीला व्यनीमधून पाठवत आहे.

मला आलेल्या खरडीतला माबोवरचा दुवा बघता मुखदुर्बळ यांनी माबोवरच्या मूळ कवितेवरच्या प्रतिसादात माश्यांवरची कविता विडंबन म्हणून केले होते, ते इथे मिपावर स्वतंत्र कविता म्हणून प्रकाशित केले. मी मागच्या शनिवारी त्यांची कविता वाचली असता उत्स्फुर्तपणे विडंबन केले. त्यावेळी मला माबोवरच्या कवितेची कल्पनाही नव्हती. माझे विडंबन माबोवरच्या मूळ कवितेशी बर्‍याच अंशी जुळते हे मला आलेल्या खरडीवरून कळाले... आता या प्रसंगी मी काय करावे हे संपादकांनी सुचवावे.

परत एकदा एवढेच सांगू इच्छितो की मला जे माझे नाही ते माझे आहे असे म्हणायची गरज वाटत नाही. (चोरी करायचीच असती तर चांगल्या लेख किंवा कवितेची केली असती... अशा आधीच वादग्रस्तं ठरलेल्या कवितेची का केली असती?)

-अनामिक

आणि माबो वरची कविता आणि ही कविता.. दोन्ही मध्ये थोडाफार फरक आहेच. आणि अनामिकची आतापर्यंतची वाटचाल पहाता... त्याला काव्यचौर्य करण्याची गरज नाही आणि तेही एखादे विडंबन तर अजिबात नाही असे वाटते.
तेव्हा.. या विडंबनाचा सर्वांनी केवळ अस्वाद घ्यावा.. आणि विषय इथेच संपवावा.
अनामिक, तू केवळ शांत रहा... ती कविता तू चोरलेली नाहीस ते सांगण्यासाठी काहीही वेगळे करण्याची गरज नाहीये. हा निव्वळ एक योगायोग आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Apr 2009 - 9:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्राजुशी सहमत.

तत्सम काही प्रतिसाद अप्रकाशित केले आहेत.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

राघव's picture

2 Apr 2009 - 3:21 pm | राघव

मस्त लिहिलंय!!
आवडेश :)

राघव

सँडी's picture

2 Apr 2009 - 3:54 pm | सँडी

मस्त जमलयं...:)

- सँडी
नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.

अदित्य's picture

2 Apr 2009 - 3:59 pm | अदित्य

अनामिक दादा माझ्या मनातले सर्व काहि तुम्हि लिहिले आहे, मस्तच.