छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या स्क्रीनसेव्हरचे प्रकाशन

सागर's picture
सागर in कलादालन
27 Mar 2009 - 6:31 pm

नमस्कार मित्रांनो,

आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९)
छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत.
तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे. या लेखाच्या माध्यमातून मला हा स्क्रीन-सेव्हर तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आनंद होत आहे. या स्क्रीन-सेव्हरसाठी ठाण्याचे इतिहासकार आणि कवी श्री . उदय गंगाधर सप्रे यांनी कविता लिहून मोठे योगदान दिले आहे....

पुढील दुव्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित मराठीतील हा आगळा-वेगळा स्क्रीनसेव्हर तुम्ही डाऊनलोड करुन घेऊ शकाल...

http://shivmudra.com/http//shivmudra.com/download/setup.exe
अथवा
http://shivmudra.com/http//shivmudra.com/download/setup.zip

जय भवानी !!! जय शिवाजी !!! जय महाराष्ट्र !!!
-सागर

कलाकविताधर्मइतिहासरेखाटन

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

27 Mar 2009 - 8:09 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मित्रा, आतापर्यंत माझा वॉलपेपर रा़जांचे चित्र होते, आता स्क्रीन सेवरही असेल. मनःपुर्वक आभार या माहितीबद्दल !!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

प्राजु's picture

27 Mar 2009 - 8:16 pm | प्राजु

हे स्क्रीन सेवर्स आम्ही घेऊन उअतरवून. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विशाल आणि प्राजु

तत्पर प्रतिसादाबद्दल तुम्हा दोघांचेही मनापासून धन्यवाद.
खरे श्रेय आहे ते श्री. उदय सप्रे आणि शिवमुद्रा.कॉम यांचे..
मी फक्त माध्यम आहे हा स्क्रीन सेव्हर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा.. :)

जय भवानी !!! जय शिवाजी !!!
(शिवभक्त) सागर

विसोबा खेचर's picture

28 Mar 2009 - 12:09 pm | विसोबा खेचर

स्क्रीन सेव्हर उतरवून घेतला, छान आहे!

आपला,
(महाराजांचा भक्त) तात्या.

सागर's picture

28 Mar 2009 - 1:58 pm | सागर

धन्यवाद तात्या,

सांगायला आनंद होतो आहे की स्क्रीनसेव्हर प्रकाशित होऊन अजून २४ तास देखील झाले नाहीत पण १०० च्या वर डाऊनलोड्स झालेली आहेत :)
यावरुनच अवघ्या मराठी मनांवर महाराजांची केवढी मोहीनी आहे हे लक्षात येते...
लवकरच हा स्क्रीन सेव्हर उतरवून घेणार्‍यांची संख्या हजारांत आणि नंतर लाखांत जाईन ही अपेक्षा

(शिवभक्त) सागर

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Mar 2009 - 2:02 pm | घाशीराम कोतवाल १.२

मी पण केला डाउन लोड

*************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सागर's picture

28 Mar 2009 - 2:11 pm | सागर

नक्कीच होतील घाशीरामजी ...
तुमच्यासारखे शुभचिंतक पाठीशी असल्यावर तर नक्कीच होतील...
छत्रपतींची मराठी मनावर मोहीनीच एवढी आहे की त्यांचे नावच अंगी स्फुल्लिंग पेटवते... :)

जय भवानी !!! जय शिवाजी !!!
(शिवभक्त) सागर

अश्विनि३३७९'s picture

28 Mar 2009 - 12:32 pm | अश्विनि३३७९

सागर
धन्यवाद!

सागर's picture

28 Mar 2009 - 2:00 pm | सागर

धन्यवाद अश्विनीताई... : )

- सागर

वेताळ's picture

28 Mar 2009 - 4:14 pm | वेताळ

उतरवुन घेतला. दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.
वेताळ

चंद्रशेखर महामुनी's picture

28 Mar 2009 - 5:34 pm | चंद्रशेखर महामुनी

मि उतरवुन घेतला आहे....

सागर's picture

29 Mar 2009 - 11:54 pm | सागर

वेताळराव आणि चंद्रशेखर

मनापासून धन्यवाद :)
फक्त २ दिवसांत २००+ डाऊनलोड्स झाली आहेत...
- सागर

Meghana's picture

31 Mar 2009 - 3:13 pm | Meghana

मी उतरवुन घेतला आहे....

चंबू गबाळे's picture

31 Mar 2009 - 4:37 pm | चंबू गबाळे

स्क्रीनसेवर उतरवून घेतले आहे. या सुंदर स्क्रीनसेवरकरता शिवमुद्रा डॉट कॉम व सागर यांना धन्यवाद!

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D

मेघना आणि चंबूजी

मनापासून धन्यवाद ...
अवघ्या ३ दिवसांत ३००+ डाऊनलोड्स झाली आहेत ...
तुमच्यासारख्या शिवभक्तांच्या सहकार्‍याने लवकरच हा आकडा हजारांत, मग लाखांत जाईन यात शंका नाही...

सागर

आशिष सुर्वे's picture

23 Feb 2010 - 2:42 pm | आशिष सुर्वे

हा दुवा आता उपलब्ध नाहीये.. कोणी मदत करेल का?

======================
कोकणी फणस

कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..

मिक्सरमधूनच काढावे!!