लग्न हा "बाजार' म्हटला जातो. मनांचं मीलन बिलन खूपच दूर राहिलं. अनेकदा फक्त महत्त्वाचा असतो व्यवहार! "देहभान' नाटकात मुक्ता बर्वे म्हणते ना..."बुद्धिमत्ता वगैरे सगळं झूट आहे. शेवटी मुलग्याचा पगार आणि मुलीचं रूप, यावरच सगळं ठरतं!' आमच्याही "लग्नावळी'च्या अनुभवातले हे काही किस्से...अर्थातच, क्रमशः!
(किस्से क्रमशः लिहिले नाहीत, तर तो "मिपा'वर फाऊल धरतात!)
---
"हॅलो'
""हां. बोला.''
""मी XYZ बोलतोय. तुमच्या मुलीची माहिती वाचली होती एका लग्नसंस्थेत.''
""बरं.''
""माहिती आवडली होती, म्हणून भेटायचं होतं.''
""बरं. कोणत्या संस्थेत?''
""दडूादूीदज या.''
""बरं. आपण काय करता?''
""मी XYZ शिकलोय. XYZ ध्ये नोकरी करतो.''
""अच्छा.''
""नाव काय आपलं?''
""XYZ''
""अच्छा अच्छा! पण XYZ (आडनाव) म्हणजे तुम्ही कऱ्हाडे ना?''
""हो!''
""मग आम्हाला नकोय कऱ्हाडे स्थळ. आम्हाला मुलगा "कोकणस्थ'च हवाय.''
""हो क्का? पण तुमच्या मुलीने तिच्या अर्जातील अपेक्षांमध्ये तसं काही लिहिलं नाहीये!''
""असं? बरं बरं!''
""तिनं लिहिलंय...मुलगा मनमिळाऊ, मला समजून घेणारा, मला "करिअर' करू देणारा असावा.''
""हो. मग?''
""खरं म्हणजे असं लिहायला हवं होतं..."मनमिळाऊ, मला समजून घेणारा, मला "करिअर' करू देणारा असा "कोकणस्थ' मुलगा हवा!''
(खास लोकाग्रहास्तव) क्रमशः
प्रतिक्रिया
28 Feb 2009 - 5:39 pm | मदनबाण
""खरं म्हणजे असं लिहायला हवं होतं..."मनमिळाऊ, मला समजून घेणारा, मला "करिअर' करू देणारा असा "कोकणस्थ' मुलगा हवा!''
आमचे तिर्थरुप हे सांगुन सांगुन थकले !!! :)
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
28 Feb 2009 - 5:50 pm | नाना बेरके
म्हणजे मुलीकडच्यांना XYZ नको होता, तर नुसता YZ मुलगा पाहीजे होता.
28 Feb 2009 - 6:18 pm | सुक्या
नावाप्रमाणे बेरकी आहात नाना. . .. YZ =))
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
16 Apr 2009 - 12:10 pm | निखिलराव
नमस्कार गुरुजी..........
28 Feb 2009 - 6:01 pm | आपला अभिजित
म्हणजे मुलीकडच्यांना XYZ नको होता, तर नुसता YZ मुलगा पाहीजे होता.
हे बरीक बेस बरं का नाना!
तुमचे नाव `नाना फडणवीस' असे हवे होते!!!
28 Feb 2009 - 6:12 pm | परिकथेतील राजकुमार
किती छोटेखानी लेखन केले आहेस रे अभिदा ? का फोन कॉल म्हणुन ६० सेकंदात संपवलास ? बाकी लिहिले आहे छान :)
अवांतर :- अजुन एक झरझरती लेखणी क्रमशः च्या भुलाव्याला भुलली... कलियुग हो कलियुग !
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
28 Feb 2009 - 9:02 pm | सखाराम_गटणे™
लग्न हा खरच बाजार आहे.
मला तर परम्परागत कांदेपोहे म्हणजे, एकादी वस्तु बघायला जातो आहे असे वाटते.
तरी हल्ली ते प्रमाण कमी झाले आहे, बर्यापैकी समानता आली आहे.
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
1 Mar 2009 - 9:25 am | खरा डॉन
बोळा निघाला की नाही रे अजून गटण्या? :)
1 Mar 2009 - 2:38 pm | परिकथेतील राजकुमार
तरी हल्ली ते प्रमाण कमी झाले आहे
कशाचे प्रमाण ? कांद्यापोह्याचे का वस्तु बघायला जायचे ?
शंकासुर
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
28 Feb 2009 - 11:12 pm | भडकमकर मास्तर
"देहभान' नाटकात मुक्ता बर्वे म्हणते ना..."बुद्धिमत्ता वगैरे सगळं झूट आहे. शेवटी मुलग्याचा पगार आणि मुलीचं रूप, यावरच सगळं ठरतं!'
+१ ...
अभिराम भडकमकरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
1 Mar 2009 - 2:34 am | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Mar 2009 - 2:12 pm | नाना बेरके
हे बरीक बेस बरं का नाना!
तुमचे नाव `नाना फडणवीस' असे हवे होते!!!
- नावांत काय आहे ?
- मलाच "आपला नाना YZ" समजा, म्हणजे झालं.
2 Apr 2009 - 6:32 pm | संदीप चित्रे
लिही रे आणि मग क्रमश: कर...
इतक्या छोट्या लेखाला पण फाउल धरतात ;)
--------
पुढचे लेख वाचण्यास उत्सुक आहे
2 Apr 2009 - 10:52 pm | chikusi
खुप सत्य परिस्थिति