(संदिप खरे आणि त्याच्या तमाम पंख्यांची क्षमा मागून)
एसी असता फ्रीज असता गरम होऊ लागले.
जाहले इतुकेच होते भारनियमन वाढले.
मीटरावीण सदनी त्याच्या बल्ब कैसा पेटला.
आकड्याने चोरताना काल त्याला पाहिले.
एवढे का घोळ करिसी वीज नियामक मंडळा,
तू दिलेले बिल खिशाला फार वाटू लागले.
वीज जाता बंद टीव्ही संगणकही पांगळा.
पोर ते क्रिडांगणावर खेळ मांडू लागले.
लाख उपकरणे हाताशी, शहर तरिही हळहळे.
मंडळाचे प्रेम केवळ मुंबईवर राहिले.
भर पहाटे अन दुपारी वीज काढून टाकली.
राहती इन्व्हर्टरावर, सुख तयांना लाभले.
-- अभिजीत दाते
(एक लोडशेडींगने त्रस्त मिपाकर)
मूळ गीत - मेघ नसता वीज नसता
कवी - संदिप खरे
प्रतिक्रिया
25 Feb 2009 - 11:26 am | अनिल हटेला
चला मंडाळाच्या कॄपे वरून एक चांगले विडंबन वाचायला मिळाले !!
सही रे अभि !! येउ देत अजुन देखील !!!
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
25 Feb 2009 - 1:28 pm | मराठी_माणूस
लाख उपकरणे हाताशी, शहर तरिही हळहळे.
मंडळाचे प्रेम केवळ मुंबईवर राहिले.
परखड सत्य
25 Feb 2009 - 3:31 pm | लिखाळ
विडंबन मस्त आहे :)
अजून असेच वाचायला आवडेल.
-- लिखाळ.
25 Feb 2009 - 6:28 pm | लक्ष्मणसुत
एकतर वीज मंडळ आता अस्तित्वात नाही. आता त्याची 'महारास्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी' झाली आहे. आणि मुंबईमध्ये 'टाटा' व 'रिलायन्स'ची वीज आहे. परंतु विडंबन एकदम झकास.
लक्ष्मणसुत
25 Feb 2009 - 8:51 pm | प्राजु
ह्याची एक प्रत सकाळ ला पाठवून द्या आणि दुसरी वीज मंडळाला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Mar 2009 - 11:35 am | उपटसुंभ
सर्वांचे आभार..! :)
2 Mar 2009 - 12:32 pm | विसोबा खेचर
मस्तच विडंबन..
भडव्यांनी हल्ली आमच्या ठाण्यात सुद्धा पुन्हा दीड-दोन तासांचं भारनियमन सुरू केलं!
तात्या.