हं... इथे खण....
खणत रहा ...हा भूतकाळ आहे ....
तो तुला खणायचाय...
खणताना निघतील अवशेष
आठवणिन्चे... यशाचे .. चुकांचे... हवेसे... नकोसे
लक्षात ठेव, .... अवशेषामधे मन गुंतवायचं नसतं.....!
पुढे लागतील थडगी,
सोडून गेलेल्या आप्तांची... दगलबाज मित्रांची,
लक्षात ठेव, ... थडग्यांपुढे फुलेच ठेवायची..... मन नाही !
खण .... खणत रहा ......
खणता खणता संपेल सारं ..
थकून पाहशील अवती भवती ..
.... तहानलायस ..!
उतर .. या खोल भूतकाळाच्या गाभा-यात ..
शोध मूळ जाणीवेचा निर्मळ झरा..
आता या झ-यालाच वर्तमानकाळ बनव
अन् पडून रहा, ... या झ-याकाठी .. निपचित ...!
-- सागरलहरी