'आपला अभिजित' यांच्या ह्या कवितेच्या प्रेरणेने खालच्या ओळी रखडल्या... जमल्याच असतील असे नाही. तसेच या ओळींना शिर्षक काय द्यावे ते पण कळले नाही... कुणीतरी सुचवले तर बरे!
वाटलं आपण पण पेताड होऊ
आणि चारदोन पेग पिऊ
चढली तर चढेल, नाही चढली तर दारुच फसेल
हसले लोक, तर हसतील; त्यांचेच दात दिसतील
हाती घेतला प्याला अन् बसलो प्यायला
तास लागला काय प्यावे, तेच ठरवायला
व्हिस्की की स्कॉच, सोड्या बरोबर की तशीच
पिताना विचारांची भलतीच झाली चोंदी
धाडस केलं शेवटी अन् प्यायली तशीच
मन म्हणालं, स्वःताला जरासं आवर
म्हटलं आजकाल कुणीही उठतं अन् पित बसतं
मलासुद्धा त्यासाठी खास सोबत कशाला हवी?
प्यावं काहीबाही अन् बसावं कुठेही
रिकामटेकड्यांच्या सोबतीची काही कमी नाही!
विचार करता करताच एक प्याला रिता झाला
म्हटलं अभिजितमूळे अनामिक विडंबक झाला
हे विडंबन वाचल्यावर आपला अभिजितच्या प्रतिभेला बाळंत झाल्यावर वेदना होतील असे वाटते.
-अनामिक
प्रतिक्रिया
20 Feb 2009 - 11:30 pm | आपला अभिजित
विचार करता करताच एक प्याला रिता झाला
म्हटलं अभिजितमूळे अनामिक विडंबक झाला
जियो!!
हे विडंबन वाचल्यावर आपला अभिजितच्या प्रतिभेला बाळंत झाल्यावर वेदना होतील असे वाटते.
माझी कुणी प्रतिभा-बितिभा नाहीये! आणि ती गरोदर असल्यास, त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही!!
असो.
विडंबन झकास! मूळ कवितेवरच अजून प्रतिक्रिया यायच्या आहेत. वाट बघू.!!
20 Feb 2009 - 11:31 pm | स्वप्निल..
तुझ्यात लपलेला कवी जाग्रुत झाला..एकदम झक्कास विडंबन..आवडले मला!!!
स्वप्निल
20 Feb 2009 - 11:49 pm | प्राजु
यू टू!!!
मस्त!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Feb 2009 - 7:28 am | सहज
दारु, प्याला, पेताड अरे वा विडंबनाचे सर्व प्राथमीक नियम पाळलेत की :-)
और भी लिख्खो!
21 Feb 2009 - 12:34 pm | विशाल कुलकर्णी
<<माझी कुणी प्रतिभा-बितिभा नाहीये! आणि ती गरोदर असल्यास, त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही!!>>
अजुन एक विश्वामित्र !!! पण दोन्ही कविता मस्तैत बर्का !!! >:)
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)