मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक

चित्तरंजन भट's picture
चित्तरंजन भट in जनातलं, मनातलं
18 Sep 2007 - 11:45 pm

सगळेच लेखक आणि कवी चांगले असतात. पण जे माझ्या कंपूतले ते जरा भारीच आहेत. मी प्रियाली, टग्या ह्यांना माझ्या कंपूतले समजतो म्हणून त्यांचं लिखाण, प्रतिसाद मला भारीच वाटतात. आम्ही प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी आमची मांडवली झाली आहे. त्यामुळेच टग्याची टगेगिरी मला भलतीच आवडते आणि व्यासंगी प्रियालीचे अभ्यासपूर्ण लेख मला भलतेच रंगतदार वाटतात.

तसे सगळेच कवी बरे लिहितात. पण "माझ्याएवढं चांगलं कुणी लिहू शकत नाही," हे मी माझ्या तोंडून तर म्हणू शकत नाही ना. समजून घ्या. फार त्रास होतो हो. जाऊ द्या. ज्यांना आपण चहा किंवा इतर काही पाजतो किंवा त्याहून उत्तम म्हणजे जे आपणांस चहा किंवा इतर गोष्टी पाजतात ते अर्थातच श्रेष्ठ कवी. कोणाचीच नावं उघड करणार नाही.कारण सिच्युएशन फ्लुइड आहे. यादगार, ओंकार जोशी, वैभव जोशी, केशवसुमार, विसुनाना, सुभाषचंद्र आप्टे आणि प्रवासी म्हणूनच मला विशेष करून आवडतात. आणि म्हणूनच कधी कधी शशांक जोशीत भरपूर प्रतिभा आहे असे मला वाटते. बाय द वे, सुरेशभट.इन वर लिहिणारे सर्वच गझलकार केवळ अप्रतिम लिहितात. कारण तुम्हाला माहीत आहेच.

मिसळपाव हॉटेलचे मालक तात्या असल्याने त्याचं लेखन मला आवडणं भागच आहे. तात्यांचं 'बसंतचे लग्न' वाचून संगीताचा आस्वाद घेण्याएवढंच लग्न करणं सहज आहे, सोप आहे किंवा लग्न केलं की माणूस आपोआप संगीताचा आस्वादक बनतो असा माझ्यासारख्या काही मूर्खांचा समज झाला होता. अर्थात तात्यांनी प्रत्यक्ष भेटून तो गैरसमज दूर केला. तसे ते वेळोवेळी भेटून माझे अनेक गैरसमज दूर करीत असतात. तर शिंत्रे गुरुजी हे पात्र तात्यांनी लिहिलंच नाही असं वाटावं एवढं उत्तम लिहिले आहे, असं कुणी कुचकटच म्हणू शकतो. तात्यांना प्रशंसा आवडते (तशी कुणाला आवडत नाही. साले सगळे नाटक करतात.) आणि तात्याला प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचाच मी चाहता आहे. विशेषतः माधवी गाडगीळ. बाई काय स्वीट प्रतिसाद देतात! तात्यांना!! मंडळी इथे आमचा तात्या किती प्रेमळ, दयाळू आहे, साक्षात भोलेनाथ आहे, ह्याचा एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो. मनोगताच्या विदागाराला अपघात झाला होता तेव्हा 'अरे, चित्त्त्या प्रशासकाला, वेलणकराला अपघात झाला रे" असे तात्या मला कळवळून म्हणाला होता. मनोगताबद्दल, प्रशासकांबद्दल तात्यांच्या मनात एवढं प्रचंड प्रेम आहे. पण एक मानावंच लागेल की मनोगताच्या प्रशासकांनी प्रशासकीय भाषेला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. मी त्यांच्या
प्रशासकीय भाषेचा फ्यान आहे. डबक्यात डुंबूनही एखाद्याला कसं काय कोरडं राहणं जमतं ह्याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत आलं आहे, हेवा वाटत आला आहे.

तर तात्यांच्या लेखनावर जळणारे काही महानुभाव त्यांची लोकप्रिय लेखक म्हणून संभावना करतात. पण त्यात एकटे संजोप राव प्रामाणिक आहेत. संजोपराव तात्यांवर जळतात असं मला सुचवायचं नाही. केवळ संजोपरावांना तात्यांना ते लोकप्रिय लेखक आहेत असे न जळता म्हणण्याचा अधिकार आहे, असे मला सुचवायचंय. हो, संजोप आणि मी ३-४ दा भेटलो आहोत. त्यामुळे संजोपरावांच्या "मरणा काय तुझा तेगार"चा उल्लेख मला नाइलाजानं करावाच लागेल आणि त्यांचा आधीच वधारलेला भाव आणखीन वाढेल ह्याची मला काळजी वाटत नाही. पण असे मरणाबिरणावर लेखन करण्यापेक्षा चित्रपट संगीतावर, विशेषतः लक्ष्मीप्यारेवर, लेख लिहावेत, असं सुचवावंसं वाटतं. ते कदाचित अधिक मौलिक कार्य ठरेल.

आता फुडं जाऊ. कोडाबाबत काही लहान मुलांना असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन चौकस ह्यांनी एका उत्तम कथा घडविली आहे असे माझा एक कथाकार मित्र म्हणत होता. त्यानेही अशीच एक कथा लिहिली आहे फक्त त्यातल्या जयूताईला कोडाऐवजी फिट्स येतात. ह्याच मित्राला जीएसचे पॉटहोलवर भूलपाखरू ही अप्रतिम कहाणी लिहिणे बिलकुल आवडले नव्हते. "तुम्हीच सांगा पॉटहोलवर कुणी कशी कथा लिहू शकतं," असं सतत बरळत-बरळत तो अनेक दिवस वस्तीतल्या रस्त्यांवर भुलपाखरं शोधतशोधत फिरत होता. बाय द वे संजोपराव, पार्टनर ही वपुंची कथा फ्यामिली प्लानिंगबद्दल आहे असे मला अजूनही वाटते. वडुलेकरांमुळे आखातात मराठी माणूस सहज तग धरू शकतो आणि त्याच्याही सुरम्य कथा असू शकतात हे कळले. आधी विश्वास नव्हता. प्रमोदकाका ऊर्फ प्रमोद देवांनी माझे नाव त्यांच्या यादीत पहिले टाकल्यामुळे मला त्यांच्यासारखे सरळ, प्रांजळ, प्रामाणिक गद्य कुणीच लिहीत नाही असेच वाटते. (अर्थात, कदाचित प्रमोदरावांचा नाइलाज असावा.) दिगंभांचे संगीतावरचे लेख वाचून टेक्निकल डॉक्युमेंटशन लिहिणे खरेच किती सोपे आहे असे वाटले होते. जाऊ द्या लोक उगाच मात्सर्याचा आरोप करतील. अधिक काही बोलत नाही. ते, आनंदघन मला एकदा भेटले आहेत. त्यामुळे त्यांचे, म्हणजे दोघांचे, प्रतिसाद आणि लेखन तसे भारीच असते. वडिलधाऱ्यांचा मान राखावा असं आपली संस्कृतीही सांगते.आणि हो, वाचक्नवी हे बाईचे नाव असू शकते हे कळायला मला थोडा उशीरच झाला. बाई पुणे मराठी ग्रंथालयात लायब्ररियन आहेत आणि त्यांना इंटरनेटचा २४ तास ऍक्सेस असतो अशी मला शंका आहे. नुसत्या सटासट संदर्भ देत असतात बाई.

सर्किट ह्यांनी जेव्हा जेव्हा मला एखादा हरभऱ्याच्या झाडावर चढवणारा प्रतिसाद दिला आहे तेव्हा मला त्यांच्या सर्किटात प्रतिभावंताचा स्पार्क दिसला आहे. अर्थात, अनेकदा त्यांचे प्रतिसाद ग्लेनफिडीशऐवजी गावठी घेऊन लिहिल्यासारखे वाटतात, हा भाग निराळा. नंदनला समीक्षकाची भाषा चांगली गवसली आहे कारण त्यानं माझ्या अंधाऱ्या खोलीतली पुस्तकंही बघितली आहेत.

आता राहिली ब्लॉगांतली फुलं.ह्या ट्युलिपबाई फारच उत्तम लिहितात हो. हा नंदन सतत त्यांचा आवर्जून उल्लेख करत आला आहे. त्यांच्या लिखाणावर ब्लॉगकार , विशेषतः तरुण मुलं, फिदा आहेत. नंदन, कसे होईल तुम्हा मुलांचे!

हे ठिकाणसंस्कृतीवावरसद्भावनाशुभेच्छाप्रतिसादवादआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

19 Sep 2007 - 12:03 am | विसोबा खेचर

आत्ता जरा गडबडीत आहे, त्यामुळे 'सुरेख' असा प्रतिसाद देऊन हे दोन शब्द संपवतो..

विस्तृत प्रतिसाद सवडीने... :)

तात्या.

कोलबेर's picture

19 Sep 2007 - 12:16 am | कोलबेर

'चित्त ह्यांच्याकडे एक उत्तम सटायरीकल व्हेन आहे' हे संजोप रावांचे उद्गार सार्थ ठरवणारा लेख

प्रियाली's picture

19 Sep 2007 - 12:29 am | प्रियाली

>>'चित्त ह्यांच्याकडे एक उत्तम सटायरीकल व्हेन आहे' हे संजोप रावांचे उद्गार सार्थ ठरवणारा लेख

अगदी!!

अवांतरः लेख वाचून असेही वाटले की फुकटची वाहवा, व्यक्तिगत आरोप, जाहिरातबाजी, पाठीची थोपटाथोपटी, एकमेकांच्या घरात घुसणे, नकारात्मक प्रतिक्रियांवर आपला फालतूचा अहंकार दुखवून घेणे यांना सर्वांनीच कोठेतरी आवर घालणे गरजेचे आहे.

सर्किट's picture

19 Sep 2007 - 12:45 am | सर्किट (not verified)

अवांतरः लेख वाचून असेही वाटले की फुकटची वाहवा, व्यक्तिगत आरोप, जाहिरातबाजी, पाठीची थोपटाथोपटी, एकमेकांच्या घरात घुसणे, नकारात्मक प्रतिक्रियांवर आपला फालतूचा अहंकार दुखवून घेणे यांना सर्वांनीच कोठेतरी आवर घालणे गरजेचे आहे.

सहमत आहे.

- (गावठी) सर्किट

(ता.क. स्कॉटलंड मध्ये देशी दारूच्या नावाखाली ग्लेनफिडिश विकतात का?)

प्रियाली's picture

19 Sep 2007 - 1:00 am | प्रियाली

हा लेख सर्वांना एक मस्त सल्ला देणारा वाटला म्हणून व्यक्तिगत टिका असतानाही आवडला.

GROW UP GUYS!!!

हा उपप्रतिसाद कोणा एकासाठी नसून सर्वांसाठी आहे!

सर्किट's picture

19 Sep 2007 - 1:01 am | सर्किट (not verified)

जिथे जिथे नवीन उत्पादने निर्माण करतात, तेथे एक क्वालिटी अशुअरन्स चे डिपार्टमेंट असते. संकेतस्थळ हे उत्पादन मानले, तर त्याचा क्यू ए दोन प्रकारे होईल. एक म्हणजे तांत्रिक दृष्ट्या. (योग्य ठिकाणी क्लिक केल्यास योग्य पानावर पोहोचता येते, वगैरे.) आणि दुसरा, म्हणजे त्या संक्केतस्थळाच्या स्टेटेड पॉलिसीप्रमाणे ते वागते आहे, की नाही ह्याचा. मिसळपाव वर गेल्या चोवीस तासात, काही सदस्यांनी ह्या क्यू ए चा रोल स्वीकारला आहे, हे पाहून चांगले वाटते. कारण ते लेखन म्हणजे क्यू ए डिपार्टमेंटने केलेली "स्ट्रेस टेस्ट" होती. अद्याप तरी मिसळपाव ह्या टेस्ट सुट ला पुरून उरले आहे, असे मला वाटते.

- (मिसळपाव क्यू ए म्यानेजर) सर्किट

विसोबा खेचर's picture

19 Sep 2007 - 1:25 am | विसोबा खेचर

- (मिसळपाव क्यू ए म्यानेजर) सर्किट

नाही, म्यॅनेजरकी करताय हे चांगलंच आहे, परंतु पगार काय घेणार हे पंचायत समितीच्या कानावर असू द्या म्हणजे झालं! :)

आपल्यासारख्या ज्येष्ठ संगणकतज्ञाचा आणि क्वालिटी ऍनालिस्टचा पगार, केवळ मिसळ आणि फार फार तर ताक मिळणार्‍या जुन्नरच्या फलटण्च्या ष्टँडवरील 'मिसळपाव' नावाच्या गावरान टपरीला परवडला तर पहिजे ना! :)

असो!

अवांतर - तात्या अभ्यंकर या इसमाचे ग्लेन फिडिच या विदेशी व्हिस्कीवर मनस्वी प्रेम आहे! सदर लेखात चित्तोबांनी ग्लेन फिडिच चा विषय काढला म्हणून ही अभिव्यक्ति करण्यावाचून राहवले नाही! :)

तात्या.

आजानुकर्ण's picture

19 Sep 2007 - 8:25 am | आजानुकर्ण

इतके दिवस चित्तरंजन (गझला लिहित असल्यामुळे आणि आम्हाला त्या कळत नसल्यामुळे) लिष्टमध्ये नव्हते. पण आता तेही आमच्या 'हिट लिस्ट' मध्ये.

शशांकची "क्रिएटिव्हीच्या भुतास" ही उत्तम रेवडी आता आठवली. आणि सोबत पिवळाई पण. मस्तच!

प्रमोद देव's picture

19 Sep 2007 - 8:59 am | प्रमोद देव

चित्त गजला चांगल्या लिहितात हे सगळ्यांनाच माहित आहे आणि होते;पण ते गद्य इतक्या चांगल्या प्रकारे लिहू शकतात हे फक्त मलाच माहित होते(कोण तो? कोण प्रतिप्रश्न विचारतोय?). त्यांचे वेळोवेळी आलेले प्रतिसाद ज्यांनी काळजीपूर्वक वाचले असतील त्यांना माझे म्हणणे नक्की पटेल. तेव्हा चित्तना एक विनंती म्हणा,फर्माइश म्हणा! काय हवे ते म्हणा पण आता असेच काही तरी मधनं मधनं(गजलेतून बाहेर येतील तेव्हा) फर्मासपैकी गद्यही लिहित जा. वाचायला मजा येतेय.
चिमटे कसे काढावेत हे कुणीही चित्त ह्यांच्याकडून शिकावे(हां! आता कधी कधी ते जरा जास्त जोरात चिमटा घेतात तेव्हा माणसं कळवळतात.तेव्हा तेवढे दूर्लक्षित करू या.) तसे संजोपजी पण चिमटे काढण्यात उस्ताद आहेत पण ते जगजाहीर असल्यामुळे लोकांना त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही. त्यांनी कुणाचे कौतुक केले तर मात्र जरा पचवणे जड जाते हे मात्र खरे आहे पण आता त्यांच्या जोडीला चित्त हेही सामील झालेले दिसताहेत तेव्हा आता इथली 'मिसळ' चांगलीच झणझणीत होणार आहे हे नक्की!
तात्यांचे हाटेल आता एकदम फार्मात चालणार बरं का!

बेसनलाडू's picture

19 Sep 2007 - 10:34 am | बेसनलाडू

pulmonary आणि umbilical वेन्स वगळता बाकीच्या वेन्स अशुद्ध (ऑक्सिजन कमी असलेले - सामान्य मराठीत 'नासके'?) रक्त वाहून नेत असल्याने चित्तरंजन यांच्यासारख्या सर्वपरिचित व्यक्तिमत्त्वाच्या सटायरिकल वेन्स मधून कशा(कशा)मुळे नासलेले रक्त वाहत असेल, असा प्रश्न पडला आहे.
(सर्वांनी हलकेच घ्या.)

दिगम्भा's picture

19 Sep 2007 - 10:41 am | दिगम्भा

संजोपरावांचे नैसर्गिक व चित्तोबांचे अनैसर्गिक, दोन्ही प्रकारचे चिमटे आम्हाला आवडतात हे नोंदवू इच्छितो.
हाही लेख बेहद्द आवडला.
- (एकूणच फ्यान) दिगम्भा

विसोबा खेचर's picture

19 Sep 2007 - 11:33 am | विसोबा खेचर

संजोपरावांचे नैसर्गिक व चित्तोबांचे अनैसर्गिक, दोन्ही प्रकारचे चिमटे आम्हाला आवडतात हे नोंदवू इच्छितो.

संजोपशेठचे चिमटे तेवढे नैसर्गिक आणि चित्तोबांचे अनैसर्गिक?
हे कसे काय हो दिगम्भाशेठ?

बहुधा संजोपशेठ तुमच्या गोटातले, कळपातले, कंपूतले, वगैरे वगैरे दिसतात! :) असो..

बाय द वे, अनैसर्गिक चिमट्यांविषयी जरा विस्तृतपणे लिवाल का?

जसा 'नैसर्गिक विधी' असा शब्द आहे, तसं तब्येत (म्हणजे पोट,) बिघडल्यावर जी धावपळ करवी लागते त्याला 'अनैसर्गिक विधी' असे म्हणावे काय? :)

उत्तरांच्या अपेक्षेत..

आपला,
(आजच्या दिवसातले सगळे विधी आटपलेला, शुचिर्भूत!) तात्या. :)

कोलबेर's picture

19 Sep 2007 - 11:36 am | कोलबेर

...ह्याचे उत्तर प्रमोदकाकांच्या ह्या ओळीत आहे
तसे संजोपजी पण चिमटे काढण्यात उस्ताद आहेत पण ते जगजाहीर असल्यामुळे लोकांना त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही.
आगाऊपणा बद्दल क्षमस्व!
-कोलबेर

दिगम्भा's picture

19 Sep 2007 - 11:43 am | दिगम्भा

प्रतिसाद पहावा. "आगाऊ" खुलासा झाल्याने वेगळा प्रतिसाद अनावश्यक.
- दिगम्भा

विसोबा खेचर's picture

19 Sep 2007 - 11:17 am | विसोबा खेचर

अर्थात तात्यांनी प्रत्यक्ष भेटून तो गैरसमज दूर केला. तसे ते वेळोवेळी भेटून माझे अनेक गैरसमज दूर करीत असतात.

हम्म! :) तरी अद्यापही आपल्यात काही गैरसमज बाकी आहेत ते दूर करण्याकरता लवकरच आपल्याला भेटायला पुण्याला येत आहे! :)

तात्यांना प्रशंसा आवडते (तशी कुणाला आवडत नाही. साले सगळे नाटक करतात.) आणि तात्याला प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचाच मी चाहता आहे. विशेषतः माधवी गाडगीळ. बाई काय स्वीट प्रतिसाद देतात! तात्यांना!!

हो, खरं आहे. आणि बरं का चित्तोबा, त्या बाई दिसायलाही स्वीट आहेत. वाटल्यास ओळख करून देईन केव्हातरी! :)

मंडळी इथे आमचा तात्या किती प्रेमळ, दयाळू आहे, साक्षात भोलेनाथ आहे, ह्याचा एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो. मनोगताच्या विदागाराला अपघात झाला होता तेव्हा 'अरे, चित्त्त्या प्रशासकाला, वेलणकराला अपघात झाला रे"

अर्थात, अनेकदा त्यांचे प्रतिसाद ग्लेनफिडीशऐवजी गावठी घेऊन लिहिल्यासारखे वाटतात, हा भाग निराळा.

हा हा हा!

असो, लेखन बाकी फर्मास आहे हो चित्तोबा. आमच्या वाचण्यात तरी आपला हा पहिलाच लेख आला आहे. आम्हाला वाटले होते की आपण फक्त काव्यच करता!

'मात्सर्य' हा शब्द विशेष आवडला! मिलिंदा हा शब्द तुझ्या भांडारत टाक रे! :)

तात्या.

विसुनाना's picture

19 Sep 2007 - 12:12 pm | विसुनाना

ज्यांना आपण चहा किंवा इतर काही पाजतो किंवा त्याहून उत्तम म्हणजे जे आपणांस चहा किंवा इतर गोष्टी पाजतात ते अर्थातच श्रेष्ठ कवी. कोणाचीच नावं उघड करणार नाही.कारण सिच्युएशन फ्लुइड आहे.

बरेच काही इतर फ्लुईड स्टॉकमध्ये आहे - चित्तोपंत, या एकदा आमच्याकडे, कधी येताय? ;-)

स्वाती दिनेश's picture

19 Sep 2007 - 1:18 pm | स्वाती दिनेश

मस्त रेशमी चिमटे काढले आहेत चित्त तुम्ही ,
तुम्ही गद्य फार कमी का हो लिहिता?
स्वाती

विसोबा खेचर's picture

19 Sep 2007 - 1:22 pm | विसोबा खेचर

चित्तोबा रसिक आहेत आणि रंगेल (ही) (असावेत), त्यामुळे ते चिमटेही दुखरे किंवा बोचरे न काढता रेशमीच काढतात असे वाटते! :)

विकेड बनी's picture

19 Sep 2007 - 1:33 pm | विकेड बनी

वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे इथेही ज्येष्ठांनी पाठीची थोपटाथोपटी सुरु केली आहे. :-) लेखाचा उद्देश फसला की हे वाचक मठ्ठ आहेत का हा त्यांचा एखाद्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवण्याचा डाव आहे तेच कळत नाही.

बहुधा त्यांना त्या फ्लुईड स्टॉकमध्येच जास्त इंटरेस्ट असावा!

टीकाकार-१'s picture

19 Sep 2007 - 4:14 pm | टीकाकार-१

सहमत !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2008 - 10:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्त हे गझलांचे संस्थळ चालवतात ही आमची माहिती, पण त्यांच गद्य लेखन वाचायचं आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे