तुम जिस स्कूल मे पढते हो उसके देवाभाऊ हेडमास्टर है.. सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती, ज्याने उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का देत विरोधी आघाडीला कमकुवत केले आहे. या रणनीतीने हिंदी आणि उत्तर भारतीय मतदारांना प्रभावित करत दोन पक्षी एकाच दगडात मारले आहेत. मास्टर स्ट्रोक काय आहे? ही खेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडी (MVA) यांना कमकुवत करण्यासाठी रचण्यात आली. यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वापर करून उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला खीळ घातली.उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये मुख्यमंत्रीपद भूषवताना शिवसेनेची पारंपरिक मराठी-केंद्रित भूमिका बदलून सर्वसमावेशक आणि सर्वसमाजाला आकर्षित करणारी प्रतिमा निर्माण केली होती. विशेषत: मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या शहरी भागात हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय मतदारांचा पाठिंबा मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. मात्र, देवाभाऊने या प्रतिमेला धक्का देण्यासाठी राज ठाकरे यांच्या मराठी-केंद्रित आणि काही काळापूर्वी उत्तर भारतीयविरोधी भूमिकेशी उद्धव यांना जोडले.हिंदी मुद्द्याचा वापर हा खरा मुद्दा की राजकीय हत्यार म्हणून वापरले हे विरोधकांना शेवट पर्यंत कळले नाही.., "हिंदीचा मुद्दा कधीच नव्हता, फक्त वापरून घेतला." हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय मतदारांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाविषयी संभ्रम निर्माण करण्यासाठी हा मुद्दा उचलला. राज ठाकरे यांच्या MNS ने भूतकाळात मराठी अस्मितेच्या नावाखाली उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे हिंदी भाषिक मतदारांमध्ये MNS बद्दल नाराजी होती.देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या MVA आघाडीतील महत्त्वाचा घटक मानला जातो. उद्धव यांच्या प्रतिमेला खीळ घालून MVA च्या एकजुटीला आणि व्यापक मतदार आधाराला धक्का दिला. हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय मतदार MVA साठी महत्त्वाचे आहेत, आणि त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न यातून झाला.कउद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचा एकत्रित प्रभाव कमी करण्यासाठी ठाकरे गटाला मराठी-केंद्रित पक्ष म्हणून चित्रित करून त्यांचा सर्वसमावेशक चेहरा कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे MVA च्या निवडणूक अजेंड्यावर परिणाम होणार. आता राज ठाकरे आणि उद्धव सेना पवार गट आणि काँग्रेस या चार दिशेला तोंड असलेली गाडी कोणत्या दिशेला ओढणार हे नेत्यांना कळणार नाही आणि जनतेला पटणार नाही.
प्रतिक्रिया
1 Jul 2025 - 8:54 am | माईसाहेब कुरसूंदीकर
"सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती"
कट कारस्थाने करण्यासाठी मात्रुभाषेचा आणि हिंदीचा असा गैरवापर? कधी ईतिहासाचे खोदकाम तर कधी मातृभाषा/हिंदी तर कधी भ्रष्टाचार.. भाउ तोरसेकरछाप पत्रकार ह्याला यशस्वी रणनीती म्हणतील पण फडण्वीस आणि भाजपा ह्यांनी जो विश्वास गमावला आहे त्याचे काय? मराठी राजकारणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसतो असे एका दिग्गज कॉन्ग्रेस नेत्याने म्हंटले होते.
1 Jul 2025 - 9:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिल्लीत मोठ्या शर्यतीत पात्रताधारक म्हणून छबी बनविण्यासाठी सध्या उलथे पालथे निर्णय घेतल्या जात आहेत, असे वाटते. अपेक्षा करण्यात गैर नाही.
-दिलीप बिरुटे
1 Jul 2025 - 10:13 am | माईसाहेब कुरसूंदीकर
शक्य आहे. पण ह्यांचे बॉस गुजरातमध्ये १२ वर्षे सत्तेवर असताना- स्वर्णिम गुजरात, गुजरात अस्मिता,तिकडची चकाचक बस स्टेशन्स्,गुजराती अनिवासी भारतियांचा डंका. हे सगळे कानावर यायचे. फडणवीस त्यांचा कित्ता गिरवतील असे वाटले होते. पण हे उलटेच करत आहेत.
1 Jul 2025 - 10:52 am | कपिलमुनी
गुजरात आणि महाराष्ट्र यांचे राजकारण वेगवेगळे राहिले आहे .
इथले राजकारण व्यक्तिकेंद्रीत नाही. गुजरात सारखा बेस भाजप ला महाराष्ट्रात नाही. तेवढे पोलरायझेशन पण नाही.
भाजप शहरी पक्ष , शेटजी -भटजींचा पक्ष अशी इमेज आहे /होती.
त्यामुळे उच्च वर्णींयांचा पक्ष अशी इमेज असल्याने विरोधक शाफुआं मांडणी करत असतात .
सध्या फ२० फोडा आणि राज्य करा निती वापरत आहेत . पुढ्च्या १० वर्षात महराष्ट्रातून विरोधी पक्ष नामशेष झाला असेल ( सर्व मोठे नेते भाजप मध्ये असतिल)..
तोवर देवाभाउला गुजरात पॅटर्न वापरता येणार नाही.
पण आहे त्या पटावर सोंगट्या अशा फिरवल्या आहेत की बाकीच्यांचे मोहरे अडकले आहेत ..
आता राज ठाकरेंना आघाडीत बसवणार की राज्यात युती / ठाकरे बंधू /आघाडी अशी तिहेरी लढत होणार ? यात फायदा फक्त भाजप चा होणार..
1 Jul 2025 - 7:42 pm | सुबोध खरे
देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला.
हायला
उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूना फडणवीसांचा डाव कळत नसेल तर ते खड्ड्यात जायच्याच लायकीचे आहेत. असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
श्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम लांगुलचालन केलेले बहुसंख्य त्यांच्या मतदारांना पटले नाही. केवळ बाळासाहबांच्या पुण्याईवर किती दिवस आपला गाडा चालवणार.
जोवर मुख्यमंत्री झाले नव्हते तोवर श्री उद्धव ठाकरे यांची झाकली मूठ सव्वा लाखाची होती. त्यानंतर संजय राऊत या नी त्यांचे पाय चाटताना काढलेले उद्गार जसे उद्धव ठाकरे हे जागतिक आरोग्य संघटनेला कोव्हीड बद्दल सल्ला देतात
किंवा
जो बायडन यांनी पुतीन याना फोन करून विचारले कि ये उद्धव ठाकरे कौन है ये हार नाही मानता सारखे महाभंपक व्हिडीओ व्हायरल झाले आणि समाजात असलेली श्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा इतकी डागाळली कि आता यातून सावरणे जवळ जवळ अशक्य आहे
संजय राऊत हे शिवसेना संपवण्यासाठी श्री शरद पवार यांनी वापरलेले प्यादे आहे अशी आवई पण उठली.
एक वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ती म्हणजे फडणवीस यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर झालेलि टिका सुद्धा लोकांना पटणारी नव्हती.
त्यातून त्यावर कोणताही आक्रस्ताळेपणा न करता फडणवीस यांनी असे डाव खेळले कि ते शरद पवारांच्या इतक्या वर्षांच्या मुत्सद्दीपणाला पण गाळात घालून त्यांनी शिवसेनाच नव्हे तर राष्ट्र्रवादीत उभी फूट पाडली.
फडणवीसांची किंवा भाजपचे एकंदर राजकारण महाराष्ट्रात खुद्द भाजपच्या ठाम कार्यकर्त्यांना सुद्धा पटणारे नाही.
परंतु आज तरी फडणवीसांच्या तुलनेचा नेता महाराष्ट्रात नाही हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
2 Jul 2025 - 3:33 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला."
पण देवाभाउंच्या प्रतिमेचे काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुरुंगात पाठवायची भाषा करणार्या देवाभाउ आणी त्यांच्या पक्षाने 'कथित' भ्रष्ट नेत्यांना पावन करुन घेतले.
New documents with signatures of Praful Patel establish his undeniable links with Dawood Ibrahim
https://www.opindia.com/2019/10/praful-patel-dawood-ibrahim-link-documen...
ई.डी.ने धाड टाकायची, मग असले नेते/त्यांच्या संस्था/पैसा भाजपाबरोबर आल्या की मग 'क्लीन चीट' . त्या बिचार्या किरीट सोमैय्यांची अस्वथा काय होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही.
BJP leader Kirit Somaiya accuses Maharashtra minister Hasan Mushrif of Rs 127-crore corruption
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/somaiya-ac...
पुलवामा असो ,उरी असो वा आताचे ऑपरेशन सिंदूर, भाजपा नेत्यांबद्दल नेहमीच संशय निर्माण होतो.
2 Jul 2025 - 5:17 pm | कंजूस
सध्याचा प्रश्न आहे तो मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी. हिंदी विरोधी हा मराठी माणसाची अस्मिता असेलही आणि त्यांच्या रक्षणार्थ उद्धव आणि राज यांनी धावणे त्यांना योग्य वाटत असेल. पण हिंदीला टाळणे म्हणजे त्यांनी बिनपाण्याच्या विहिरीत उडी मारली आहे. अमराठी लोकांच्या दृष्टीने ते विरोधक ठरले आहेत. आणि हेच लोक मुंबईत मतदार आहेत.
बाकी आम्ही शाळेत हिंदी शिकतच होतो ते कांग्रेस, शिवसेना (उद्धव) यांचा मुंबईत दरारा असताना. तेव्हा त्यांनी विरोध केला नाही किंवा ही तिसरी भाषा कशाला बोलले नाहीत. उलट आदित्य ठाकरे एका चर्चा व्हिडिओत सांगतात की आजोबांचा ( बाळासाहेबांचा)आग्रह होता की अधिक भाषा शिका. म्हणजे तेही तोंडावर पडले आहेत. पाचवीपासून ऐवजी पहिलीपासून शिका याला विरोध एवढेच.
आता " हिंदी कशी यशस्वीरीत्या परतली" याचा विजयोत्सव पाच जुलैला होणार आहे म्हणे ठिकठिकाणी. तर दिंडी का रांडा होणार ते लवकरच कळेल.
2 Jul 2025 - 5:58 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
चेन्नई,बेंगळुरु,हैद्राबाद,कोचीन,तिरुव्नंतपूरम येथेही हिंदी मातृभाषा असणार्यांची संख्या लक्षणिय आहे. मुंबईएवढी नसेल पण बहुतांशी शेठजी.व्यापारी गुजराती/मारवाडी आहेत. नोकर्या करणारे(आय टी वगैरे) उत्तर भारतिय आहेत. तिथे त्यांच्या तोंडातुन हिंदीचा'ह' निघत नाही.
स्टॅलिन्/चंद्राबाबु नायडु सोडा, कर्नाटकातील भाजपाचे नेतेही "कन्नडिगानी हिंदी शिकावी" असे म्हणायची हिंमत करणार नाहीत. तिकडचे चॅनेलवालेही कोणी हिंदी बोलु लागला तर लगेच थांबवतात. खुद्द ए.आर. रेहमान हिंदीत बोलु लागला तेव्हा लगेच थांबवला होता.
2 Jul 2025 - 7:46 pm | कर्नलतपस्वी
राडा झाला तर गोळीबार, दगडफेक, खळफट्याक आणी दोनचार मेले की.....
एक टिंब जास्तीचं लागलंय आणी लोचा झाला.
2 Jul 2025 - 8:32 pm | कंजूस
एक टिंब जास्ती झालं. हो.
3 Jul 2025 - 11:58 am | विवेकपटाईत
बहुतेक थोक मतपेटीसाठी उर्दू तिसरी भाषा लादायचा काहींचा मनसुबा आहे. त्यासाठीच हिंदीचा विरोध आहे. एकदा हिन्दी तिसरी भाषा झाली की उर्दू तिसरी भाषा म्हणून लादणे सहज शक्य होणार नाही.
3 Jul 2025 - 12:35 pm | कर्नलतपस्वी
जास्तीत जास्त कार्यकर्ते UPSC,MPSC कसे यशस्वीपणे कसे पुर्ण करतील याकडे आज लक्ष दिले तर उद्या त्यांचा महाराष्ट्र, मराठी माणसालाचभरपूर फायदा होईल. . आज उत्तर प्रदेश, बिहार,राजस्थान या राज्यातील सर्वात जास्त विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण होत.आहेत.
बाकी हिन्दी पाचवी पासून ठिक आहे.
4 Jul 2025 - 9:59 am | कपिलमुनी
मनसे विरुद्ध मोर्चा काढला आहे. नॉन मराठी मतांचे ध्रुवीकरण + मराठी मधली ५०% मते जरी मिळाली तर भाजप सहज निवडून येणार.
गणित फिट्ट बसणार
5 Jul 2025 - 1:19 am | कंजूस
हेच होणार
>> राज ठाकरे आणि उद्धव सेना पवार गट आणि काँग्रेस या चार दिशेला तोंड असलेली गाडी कोणत्या दिशेला ओढणार हे नेत्यांना कळणार नाही आणि जनतेला पटणार नाही.>>
शिवाय राज आणि उद्धव एक झाले तर महाविकास आघाडीचं काय होणार?
.
5 Jul 2025 - 8:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकीकडे 'मराठी' विषयावरुन महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतांना काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा लावला. माणसं सत्तेसाठी आणि हुजरेगिरीसाठी कोणता स्तर गाठू शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण वाटलं. गुजराती समाजाच्या गुणांच्या आरत्या ओवाळाव्या लागल्या. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानली त्यामुळे मी जय गुजरात म्हणालो. गुजरात काय पाकिस्तानात आहे काय असे खुलासे मा. उपमुख्यमंत्र्यांना द्यावे लागत आहे.
-दिलीप बिरुटे
5 Jul 2025 - 1:26 pm | रात्रीचे चांदणे
शरद पवार, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचेही जय कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश म्हणलेले vudioes आहेत.
5 Jul 2025 - 3:54 pm | कपिलमुनी
ठाकरेंनी अमित शाह च्या प्रचारावेळी गुजरात मध्ये म्हणाले आहे.
शिंदे येडा महाराष्ट्रात म्हणतोय
5 Jul 2025 - 1:58 pm | कंजूस
विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे आणि स्वागताचे गुजराती फलक कुठे गेले?