पहिलीपासून हिंदी निर्णय की राजकीय हत्यार ?

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in जनातलं, मनातलं
30 Jun 2025 - 10:01 pm

तुम जिस स्कूल मे पढते हो उसके देवाभाऊ हेडमास्टर है.. सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती, ज्याने उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का देत विरोधी आघाडीला कमकुवत केले आहे. या रणनीतीने हिंदी आणि उत्तर भारतीय मतदारांना प्रभावित करत दोन पक्षी एकाच दगडात मारले आहेत. मास्टर स्ट्रोक काय आहे? ही खेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडी (MVA) यांना कमकुवत करण्यासाठी रचण्यात आली. यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वापर करून उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला खीळ घातली.उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये मुख्यमंत्रीपद भूषवताना शिवसेनेची पारंपरिक मराठी-केंद्रित भूमिका बदलून सर्वसमावेशक आणि सर्वसमाजाला आकर्षित करणारी प्रतिमा निर्माण केली होती. विशेषत: मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या शहरी भागात हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय मतदारांचा पाठिंबा मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. मात्र, देवाभाऊने या प्रतिमेला धक्का देण्यासाठी राज ठाकरे यांच्या मराठी-केंद्रित आणि काही काळापूर्वी उत्तर भारतीयविरोधी भूमिकेशी उद्धव यांना जोडले.हिंदी मुद्द्याचा वापर हा खरा मुद्दा की राजकीय हत्यार म्हणून वापरले हे विरोधकांना शेवट पर्यंत कळले नाही.., "हिंदीचा मुद्दा कधीच नव्हता, फक्त वापरून घेतला." हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय मतदारांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाविषयी संभ्रम निर्माण करण्यासाठी हा मुद्दा उचलला. राज ठाकरे यांच्या MNS ने भूतकाळात मराठी अस्मितेच्या नावाखाली उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे हिंदी भाषिक मतदारांमध्ये MNS बद्दल नाराजी होती.देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या MVA आघाडीतील महत्त्वाचा घटक मानला जातो. उद्धव यांच्या प्रतिमेला खीळ घालून MVA च्या एकजुटीला आणि व्यापक मतदार आधाराला धक्का दिला. हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय मतदार MVA साठी महत्त्वाचे आहेत, आणि त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न यातून झाला.कउद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचा एकत्रित प्रभाव कमी करण्यासाठी ठाकरे गटाला मराठी-केंद्रित पक्ष म्हणून चित्रित करून त्यांचा सर्वसमावेशक चेहरा कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे MVA च्या निवडणूक अजेंड्यावर परिणाम होणार. आता राज ठाकरे आणि उद्धव सेना पवार गट आणि काँग्रेस या चार दिशेला तोंड असलेली गाडी कोणत्या दिशेला ओढणार हे नेत्यांना कळणार नाही आणि जनतेला पटणार नाही.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Jul 2025 - 8:54 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती"
कट कारस्थाने करण्यासाठी मात्रुभाषेचा आणि हिंदीचा असा गैरवापर? कधी ईतिहासाचे खोदकाम तर कधी मातृभाषा/हिंदी तर कधी भ्रष्टाचार.. भाउ तोरसेकरछाप पत्रकार ह्याला यशस्वी रणनीती म्हणतील पण फडण्वीस आणि भाजपा ह्यांनी जो विश्वास गमावला आहे त्याचे काय? मराठी राजकारणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसतो असे एका दिग्गज कॉन्ग्रेस नेत्याने म्हंटले होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2025 - 9:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिल्लीत मोठ्या शर्यतीत पात्रताधारक म्हणून छबी बनविण्यासाठी सध्या उलथे पालथे निर्णय घेतल्या जात आहेत, असे वाटते. अपेक्षा करण्यात गैर नाही.

-दिलीप बिरुटे

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Jul 2025 - 10:13 am | माईसाहेब कुरसूंदीकर

शक्य आहे. पण ह्यांचे बॉस गुजरातमध्ये १२ वर्षे सत्तेवर असताना- स्वर्णिम गुजरात, गुजरात अस्मिता,तिकडची चकाचक बस स्टेशन्स्,गुजराती अनिवासी भारतियांचा डंका. हे सगळे कानावर यायचे. फडणवीस त्यांचा कित्ता गिरवतील असे वाटले होते. पण हे उलटेच करत आहेत.

कपिलमुनी's picture

1 Jul 2025 - 10:52 am | कपिलमुनी

गुजरात आणि महाराष्ट्र यांचे राजकारण वेगवेगळे राहिले आहे .
इथले राजकारण व्यक्तिकेंद्रीत नाही. गुजरात सारखा बेस भाजप ला महाराष्ट्रात नाही. तेवढे पोलरायझेशन पण नाही.
भाजप शहरी पक्ष , शेटजी -भटजींचा पक्ष अशी इमेज आहे /होती.
त्यामुळे उच्च वर्णींयांचा पक्ष अशी इमेज असल्याने विरोधक शाफुआं मांडणी करत असतात .
सध्या फ२० फोडा आणि राज्य करा निती वापरत आहेत . पुढ्च्या १० वर्षात महराष्ट्रातून विरोधी पक्ष नामशेष झाला असेल ( सर्व मोठे नेते भाजप मध्ये असतिल)..

तोवर देवाभाउला गुजरात पॅटर्न वापरता येणार नाही.

पण आहे त्या पटावर सोंगट्या अशा फिरवल्या आहेत की बाकीच्यांचे मोहरे अडकले आहेत ..
आता राज ठाकरेंना आघाडीत बसवणार की राज्यात युती / ठाकरे बंधू /आघाडी अशी तिहेरी लढत होणार ? यात फायदा फक्त भाजप चा होणार..

सुबोध खरे's picture

1 Jul 2025 - 7:42 pm | सुबोध खरे

देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला.

हायला

उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूना फडणवीसांचा डाव कळत नसेल तर ते खड्ड्यात जायच्याच लायकीचे आहेत. असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

श्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम लांगुलचालन केलेले बहुसंख्य त्यांच्या मतदारांना पटले नाही. केवळ बाळासाहबांच्या पुण्याईवर किती दिवस आपला गाडा चालवणार.

जोवर मुख्यमंत्री झाले नव्हते तोवर श्री उद्धव ठाकरे यांची झाकली मूठ सव्वा लाखाची होती. त्यानंतर संजय राऊत या नी त्यांचे पाय चाटताना काढलेले उद्गार जसे उद्धव ठाकरे हे जागतिक आरोग्य संघटनेला कोव्हीड बद्दल सल्ला देतात

किंवा

जो बायडन यांनी पुतीन याना फोन करून विचारले कि ये उद्धव ठाकरे कौन है ये हार नाही मानता सारखे महाभंपक व्हिडीओ व्हायरल झाले आणि समाजात असलेली श्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा इतकी डागाळली कि आता यातून सावरणे जवळ जवळ अशक्य आहे

संजय राऊत हे शिवसेना संपवण्यासाठी श्री शरद पवार यांनी वापरलेले प्यादे आहे अशी आवई पण उठली.

एक वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ती म्हणजे फडणवीस यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर झालेलि टिका सुद्धा लोकांना पटणारी नव्हती.

त्यातून त्यावर कोणताही आक्रस्ताळेपणा न करता फडणवीस यांनी असे डाव खेळले कि ते शरद पवारांच्या इतक्या वर्षांच्या मुत्सद्दीपणाला पण गाळात घालून त्यांनी शिवसेनाच नव्हे तर राष्ट्र्रवादीत उभी फूट पाडली.

फडणवीसांची किंवा भाजपचे एकंदर राजकारण महाराष्ट्रात खुद्द भाजपच्या ठाम कार्यकर्त्यांना सुद्धा पटणारे नाही.

परंतु आज तरी फडणवीसांच्या तुलनेचा नेता महाराष्ट्रात नाही हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Jul 2025 - 3:33 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला."
पण देवाभाउंच्या प्रतिमेचे काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुरुंगात पाठवायची भाषा करणार्या देवाभाउ आणी त्यांच्या पक्षाने 'कथित' भ्रष्ट नेत्यांना पावन करुन घेतले.
New documents with signatures of Praful Patel establish his undeniable links with Dawood Ibrahim
https://www.opindia.com/2019/10/praful-patel-dawood-ibrahim-link-documen...

patel
ई.डी.ने धाड टाकायची, मग असले नेते/त्यांच्या संस्था/पैसा भाजपाबरोबर आल्या की मग 'क्लीन चीट' . त्या बिचार्या किरीट सोमैय्यांची अस्वथा काय होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही.
BJP leader Kirit Somaiya accuses Maharashtra minister Hasan Mushrif of Rs 127-crore corruption

kirit
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/somaiya-ac...

पुलवामा असो ,उरी असो वा आताचे ऑपरेशन सिंदूर, भाजपा नेत्यांबद्दल नेहमीच संशय निर्माण होतो.

सध्याचा प्रश्न आहे तो मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी. हिंदी विरोधी हा मराठी माणसाची अस्मिता असेलही आणि त्यांच्या रक्षणार्थ उद्धव आणि राज यांनी धावणे त्यांना योग्य वाटत असेल. पण हिंदीला टाळणे म्हणजे त्यांनी बिनपाण्याच्या विहिरीत उडी मारली आहे. अमराठी लोकांच्या दृष्टीने ते विरोधक ठरले आहेत. आणि हेच लोक मुंबईत मतदार आहेत.

बाकी आम्ही शाळेत हिंदी शिकतच होतो ते कांग्रेस, शिवसेना (उद्धव) यांचा मुंबईत दरारा असताना. तेव्हा त्यांनी विरोध केला नाही किंवा ही तिसरी भाषा कशाला बोलले नाहीत. उलट आदित्य ठाकरे एका चर्चा व्हिडिओत सांगतात की आजोबांचा ( बाळासाहेबांचा)आग्रह होता की अधिक भाषा शिका. म्हणजे तेही तोंडावर पडले आहेत. पाचवीपासून ऐवजी पहिलीपासून शिका याला विरोध एवढेच.
आता " हिंदी कशी यशस्वीरीत्या परतली" याचा विजयोत्सव पाच जुलैला होणार आहे म्हणे ठिकठिकाणी. तर दिंडी का रांडा होणार ते लवकरच कळेल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Jul 2025 - 5:58 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

चेन्नई,बेंगळुरु,हैद्राबाद,कोचीन,तिरुव्नंतपूरम येथेही हिंदी मातृभाषा असणार्यांची संख्या लक्षणिय आहे. मुंबईएवढी नसेल पण बहुतांशी शेठजी.व्यापारी गुजराती/मारवाडी आहेत. नोकर्या करणारे(आय टी वगैरे) उत्तर भारतिय आहेत. तिथे त्यांच्या तोंडातुन हिंदीचा'ह' निघत नाही.
स्टॅलिन्/चंद्राबाबु नायडु सोडा, कर्नाटकातील भाजपाचे नेतेही "कन्नडिगानी हिंदी शिकावी" असे म्हणायची हिंमत करणार नाहीत. तिकडचे चॅनेलवालेही कोणी हिंदी बोलु लागला तर लगेच थांबवतात. खुद्द ए.आर. रेहमान हिंदीत बोलु लागला तेव्हा लगेच थांबवला होता.

राडा झाला तर गोळीबार, दगडफेक, खळफट्याक आणी दोनचार मेले की.....

एक टिंब जास्तीचं लागलंय आणी लोचा झाला.

कंजूस's picture

2 Jul 2025 - 8:32 pm | कंजूस

एक टिंब जास्ती झालं. हो.

विवेकपटाईत's picture

3 Jul 2025 - 11:58 am | विवेकपटाईत

बहुतेक थोक मतपेटीसाठी उर्दू तिसरी भाषा लादायचा काहींचा मनसुबा आहे. त्यासाठीच हिंदीचा विरोध आहे. एकदा हिन्दी तिसरी भाषा झाली की उर्दू तिसरी भाषा म्हणून लादणे सहज शक्य होणार नाही.

कर्नलतपस्वी's picture

3 Jul 2025 - 12:35 pm | कर्नलतपस्वी

जास्तीत जास्त कार्यकर्ते UPSC,MPSC कसे यशस्वीपणे कसे पुर्ण करतील याकडे आज लक्ष दिले तर उद्या त्यांचा महाराष्ट्र, मराठी माणसालाचभरपूर फायदा होईल. . आज उत्तर प्रदेश, बिहार,राजस्थान या राज्यातील सर्वात जास्त विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण होत.आहेत.

बाकी हिन्दी पाचवी पासून ठिक आहे.

कपिलमुनी's picture

4 Jul 2025 - 9:59 am | कपिलमुनी

मनसे विरुद्ध मोर्चा काढला आहे. नॉन मराठी मतांचे ध्रुवीकरण + मराठी मधली ५०% मते जरी मिळाली तर भाजप सहज निवडून येणार.

गणित फिट्ट बसणार

कंजूस's picture

5 Jul 2025 - 1:19 am | कंजूस

हेच होणार

>> राज ठाकरे आणि उद्धव सेना पवार गट आणि काँग्रेस या चार दिशेला तोंड असलेली गाडी कोणत्या दिशेला ओढणार हे नेत्यांना कळणार नाही आणि जनतेला पटणार नाही.>>
शिवाय राज आणि उद्धव एक झाले तर महाविकास आघाडीचं काय होणार?
.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2025 - 8:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकीकडे 'मराठी' विषयावरुन महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतांना काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा लावला. माणसं सत्तेसाठी आणि हुजरेगिरीसाठी कोणता स्तर गाठू शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण वाटलं. गुजराती समाजाच्या गुणांच्या आरत्या ओवाळाव्या लागल्या. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानली त्यामुळे मी जय गुजरात म्हणालो. गुजरात काय पाकिस्तानात आहे काय असे खुलासे मा. उपमुख्यमंत्र्यांना द्यावे लागत आहे.

-दिलीप बिरुटे

रात्रीचे चांदणे's picture

5 Jul 2025 - 1:26 pm | रात्रीचे चांदणे

शरद पवार, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचेही जय कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश म्हणलेले vudioes आहेत.

कपिलमुनी's picture

5 Jul 2025 - 3:54 pm | कपिलमुनी

ठाकरेंनी अमित शाह च्या प्रचारावेळी गुजरात मध्ये म्हणाले आहे.

शिंदे येडा महाराष्ट्रात म्हणतोय

विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे आणि स्वागताचे गुजराती फलक कुठे गेले?

त्यात एवढी रडारड करण्यासारखं काय आहे?

शिवसेनेचे उर्दू मधले फलक सुद्धा आहेत

हा का ना का

सुबोध खरे's picture

5 Jul 2025 - 8:07 pm | सुबोध खरे

माणसं सत्तेसाठी आणि हुजरेगिरीसाठी कोणता स्तर गाठू शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण वाटलं

कपिलमुनी's picture

5 Jul 2025 - 10:53 pm | कपिलमुनी

थुंकलेले चाटावे ते राजकीय पक्षांनी..
पवार , चव्हाण , भुजबळ , राणे पवित्र करणे असो.. की पवार ठाकरे घरोबा असो. किंवा सध्याचा ठाकरे बंधुप्रेम असो...

सब घोडे बारा टक्के

हिंदीच्या ओक्टोपसने मराठीला केव्हाच विळखा घातला आहे. मुंबईत दोन अमराठी लोक भेटले तर ते मराठीत कशाला बोलतील? पण हे कळेपर्यंत वेळ निघून गेली आणि आता जागे झाले.

चंद्रसूर्यकुमार's picture

6 Jul 2025 - 9:55 am | चंद्रसूर्यकुमार

अगदी १०१% राजकीय हेतूने प्रेरीत निर्णय होता असे वैयक्तिक मत. कदाचित तो निर्णय घेतानाच अंमलात येण्यापूर्वी तो मागे घ्यायचा असाच डाव असेल पण त्यातून ठाकरेंना मात्र अडकवायचे हा हेतू असेल.

महापालिका निवडणुका पावसाळा संपल्यावर होतील. मुंबई सोडून इतर महापालिका कोणाच्या ताब्यात आहेत याने फारसा फरक पडणार नाही. अनेक राज्यांपेक्षा मोठी आर्थिक उलाढाल असलेली मुंबई महापालिकाच सगळ्यात महत्वाची. नोव्हेंबर २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत उबाठा सेनेला पूर्ण राज्यात २० च जागा मिळाल्या असल्या तरी त्यातील १० मुंबईतील आहेत. मुंबईत तो गट प्रभाव राखून आहे हे नक्की. तसेच महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवरील कनेक्ट आणि कार्यकर्त्यांचे जाळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपेक्षा अधिक उपयोगाला येते. तिथे उबाठा गटाची ताकद आहे हे नक्की. तसेच अनेक नगरसेवक हे स्थानिक पातळीवरील स्वतःच्या लोकप्रियतेच्या जोरावर निवडून येतात. उबाठामध्ये अनेक दशकांपासून असलेले असे लोक आहेत. त्यांना मते मिळतात ती स्वतःची असतात- उबाठा पक्षासाठी मिळालेली असतीलच असे नाही. त्यामुळे विधानसभेत जसा स्वीप केला तसा महापालिका निवडणुकीत होईलच असे नक्कीच नाही. उलट महापालिका निवडणुक भाजपला या स्थानिक कारणांमुळे जड गेली तरी आश्चर्य वाटू नये.

एकतर उबाठाला (पूर्वी पक्ष एकसंध होता तेव्हापासूनच) मराठी मतदारांची मते सगळी नक्कीच नाही पण मोठ्या प्रमाणावर मिळत आली आहेत. ती एकनिष्ठ मते भाजपकडे जाणार नाहीत. शिंदे त्यातील किती मते आणतात ते बघायचे पण मुंबईत शिंदे गटापेक्षा उबाठाची ताकद जास्त आहे असे वाटते. भाजपशी युती तोडल्यानंतर भाजपविरोधी अमराठी मते उबाठाकडे जाऊ शकली असती. तसेच बदललेल्या परिस्थितीत मुस्लिम मतेही जाऊ शकली असती- अजूनही जातील. अशावेळेस तो हिंदी सक्तीचा निर्णय आला. त्यानंतर मग ठाकरेंना त्याविरोधात भूमिका घेणे भाग झाले. त्यामुळे मग उबाठाकडे जी अमराठी मते अन्यथा गेली असती त्या मतदारांना संभ्रमात टाकले गेले. त्यात अपेक्षेप्रमाणे मीरा-भाईंदरला त्या दुकानदाराला मारहाण करण्यात आली. त्याविरोधात मोर्चा निघाला आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल पण झाला. त्या दुकानदाराला बदडून २००३ मध्ये रेल्वे परीक्षेसाठी आलेल्या बिहारी लोकांना बदडून केली तशीच चूक केली गेली आहे असे वाटते. त्या घटनेमुळे २००४ मध्ये उत्तर भारतीयांचे काँग्रेसकडे counter polarization झाले होते. तसे यावेळी व्हायला आपण होऊन त्यांनी मदत केली आहे. आणि ते पोलरायझेशन भाजपच्याच बाजूने होणार ही शक्यता जास्त. तसेच राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. समजा राज-उध्दव एकत्र आले तर मग उबाठाच्या मुस्लिम मतदारांमध्येही काही प्रमाणात चलबिचल होईल ही पण अपेक्षा असेल.

तसेच कोणीही उसकावले की लगेच ते लोक तलवार उपसून अंगावर येतात. पण आपण असे डोके गरम करून काहीतरी करावे म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा फायदा होईल म्हणून आपला प्रतिस्पर्धीच आपल्याला उसकावत असेल, त्याच्या सापळ्यात आपण बळी पडायचे नाही तर आपले डोकं थंड ठेवायचे इतका विचार दोन्ही सेनावाले कधीच करत नाहीत. त्या केडियाला भाजपनेच 'मराठी बोलणार नाही जा....' असे वक्तव्य करायला सांगितले असले तरी आश्चर्य वाटू नये. अपेक्षेप्रमाणे त्याच्या ऑफिसमध्ये तोडफोड झाली- खरं तर अशी तोडफोड त्यांनी करावी म्हणूनच मुद्दामून ते वक्तव्य केडियाने कशावरून दिले नसेल? केडिया बिल्डर आहे. जर ऑफिसमध्ये तोडफोड झाली आणि त्यातून ५-१० लाखाचे नुकसान झाले तरी त्याला ती रक्कम विशेष नाही. पण अशा घटना झाल्या की त्यातून मग अमराठी मतदारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते आणि काँग्रेस-उबाठा एकत्र असतील तर अमराठी मतदारांपुढे भाजप हा एकच पर्याय राहतो आणि अशी तोडफोड करून आपण त्या मतदारांना भाजपकडे ढकलत आहोत याचा विचार ते करणार नाहीत या अपेक्षेने- खरं तर खात्रीनेच केडियाला ते वक्तव्य द्यायला भाजपने सांगितले असले तरी आश्चर्य वाटू नये.

बाकी महापालिका निवडणुकीत कोणीही निवडून आले तरी नगरसेवक आणि बिल्डर यांच्यामधील अभद्र युती कायमच राहणार आहे. शहरात अजून मोठे मोठे टॉवर उभे राहून पाणी वाहून नेणारे नैसर्गिक स्त्रोत बुजवले जाऊन दरवर्षी तेवढ्यात पावसात अधिकाधिक मोठे पूर येणारच आहेत. त्यामुळे आपल्या सामान्यांच्या आयुष्यात घंटा काहीही फरक पडणार नाहीये. तरीही उबाठासेनेचा माज उतरवायला त्यांचा पराभव व्हावा असे मला नक्कीच वाटते. नवे भाजपचे नगरसेवक आले की मग केडिया त्याचे जे काही तुटपुंजे नुकसान त्या तोडफोडीतून झाले असेल ते अधिक टी.डी.आर किंवा एफ.एस.आय मिळवून शेकडो पटींनी भरून काढेल.

बाकी मराठी माणसासाठी सेनेने जे काही केले होते ते स्थानिय लोकाधिकार समितीने- त्याला ५० वर्षे झालीत आता. यांची मर्दुमकी फक्त मराठी बोलत नाही म्हणून फेरीवाले, इस्त्रीवाले वगैरे साध्यासाध्या माणसांना बदडण्यापुरतीच. मुंबईतील मराठी टक्का कमी होत होता, मराठी शाळा बंद पडत होत्या त्याविषयी त्यांनी काही भरीव काही केल्याचे ऐकिवात नाही. आता ठाकरेंनी परत एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरल्यावर या सगळ्या गोष्टी पुढे आणून त्यातील किमान काही मराठी मतदारांमध्येही चलबिचल निर्माण करायची संधी आता भाजपकडे आहे.

फडणवीसांनी तेवढ्यापुरता हा एक निर्णय घेऊन उबाठांना सापळ्यात अडकवले असे दिसते. आणि त्यात नेहमीप्रमाणे मारहाण, तोडफोड करून ते त्या सापळ्यात चालत गेले असे वाटते. एकूणच जी मराठी मते उबाठाकडे अन्यथाही गेली असती ती तिथेच राहणार आहेत. पण अमराठी मते जी उबाठाकडे गेली असती त्यांना मात्र भाजपकडे जायचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटी कोणत्याही निवडणुकीत मते किती फिरतात यावरच निकाल बदलत असतो. या सगळ्या प्रकारात उबाठाकडे नव्याने किती मते येतील आणि विरोधात किती जातील हा हिशेब केल्यावर उबाठासाठी तो हिशेब ऋण असेल असे वैयक्तिक मत.

रात्रीचे चांदणे's picture

6 Jul 2025 - 6:32 pm | रात्रीचे चांदणे

तुम्ही म्हणता तस खरंच झालं असेल तर एक प्रश्न पडतो की एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की?
त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती?

बरं समजा राज उद्धव यांनी हा मुद्दा उचलूनच धरला नसता तर पहिली पासून तीन तीन भाषा शिकवणार होते का? म्हणजे आपल्या राजकीय सोयीसाठी ६ वर्षाच्या मुलांचा वापर.

चंद्रसूर्यकुमार's picture

6 Jul 2025 - 10:13 pm | चंद्रसूर्यकुमार

एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की?
त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती?

याविषयी मला तरी काही सांगता येणार नाही. मी भाजप समर्थक आहे हे जगजाहीर असले तरी मी पक्षाचा प्रवक्ता नाही त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट केली तर ती का केली किंवा केली नाही तर का केली नाही याविषयी मी माझे तर्क मांडू शकतो- पक्षाची भूमिका नाही. बाकी स्थानिक पातळीवर सगळे चोर असतात. कोणत्याही पक्षाला स्थानिक पातळीवर खरोखरच काही करावे असे वाटते असे मला तरी वाटत नाही. आज मुंबईत काही शे ठिकाणी मोठमोठ्या टॉवर्सचे बांधकाम सुरू आहे. एकेक फ्लॅट तीन-चार कोटींचे आहेत. म्हणजे किती हजार कोटींची उलाढाल तिथे नुसत्या टॉवर्सच्या बांधकामात चालली आहे याची कल्पना करता येते. सध्या कोणाचा किती टक्के रेट आहे कल्पना नाही पण बर्‍यापैकी असावा. इतका मलिदा कोणी सोडेल याची खात्री सोडाच अपेक्षाही नाही. त्यामुळे असेच मोठेमोठे टॉवर बनत राहणार आणि पुढील तीसेक वर्षात मोठ्ठा पूर येऊन हे शहर बुडणार. त्यामुळे महापालिकेत कोणीही सत्तेत आले तरी त्यात बदल होईल याची मला तरी अपेक्षा नाही.

राजकीय दृष्टीने तो निर्णय का घेतला असेल याविषयी वर लिहिलेच आहे. तसाही हा निर्णय यावर्षी अंमलात येणे कठीणच होते. एप्रिल-मे मध्ये निर्णय झाला आणि जूनपासून लगेच अंमलबजावणी तशीही सुरू होणार नव्हती. त्यामुळे समजा ठाकरेंनी थंड घेऊन भाजपचा पोपट केला असता तर मग सगळा धुराळा खाली बसल्यावर शांतपणे तो निर्णय मागे घेतला असता. त्यात आजच राजन विचारेंच्या कार्यालयात मराठी बोलले नाही म्हणून काही दुकानदारांना कानफाटवल्याचा व्हिडिओ ट्विटरवर बघितला. ते बघून फडणवीसांना मनातल्या मनात गुदगुल्या होत असतील.

दुकानदारांना कानफाटवल्याचा जो प्रकार मनसेने चालवलाय त्याला कांग्रेसचा विरोधच असेल. पण आता सेना विकास आघाडीत आहे आणि त्यांनी राजला हात धरून आणल्यावर कासावीस झाले असतील. त्यामुळे मविआ फुटणार हे निश्चित.

कर्नलतपस्वी's picture

6 Jul 2025 - 8:51 pm | कर्नलतपस्वी

निवडणूक निर्णयाकडे लक्ष ठेवून सगळ्या हालचाली. सापळे सगळेच लावतात. कोण आडकतय ते बघावे लागेल.

कपिलमुनी's picture

6 Jul 2025 - 10:47 pm | कपिलमुनी

सुरुवातीला हा विचार मांडला तेव्हा लोकांना पटला नव्हता.

आता हळूहळू त्याचे राजकीय परिणाम समोर येत आहेत.
यात काँग्रेसची फरफट झाली.

परवा सुळेंना पाठवून पवारांनी दोन्ही दगडांवर पाय ठेवायचा नेहमीचा प्रकार केला आहे.

जिथे जास्त शिते तिथे ते जातील

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jul 2025 - 8:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाजप कार्यकर्ते, प्रत्येक गोष्टीत जी काही चूक घडेल किंवा घडले की त्याचं भविष्याच्या दृष्टीने कसा फायदा असतो, त्याला 'गोबरयुगात' केंद्रात 'माष्टर ष्ट्रोक' असे म्हणतात. तर इकडे महाराष्ट्रात फडणविसांचे डावपेच किंवा हे सगळं त्यांचं 'स्क्रीप्टे'ड प्रयोग आहेत, इतकं म्हटलं की, शाब्दिक पोचा-यांची गरज पडत नाही. खरी मेख अशी आहे की, दोघे ठाकरे बंधू एकत्र आले तर भविष्यात आपल्या सत्तेला किती हादरे बसू शकतील या कल्पनेनेच सध्या भाजप गटात अस्वस्था आहे. फडणविसांनी मराठी माणसाच्या विजयी मेळाव्याला 'रुदाली' म्हणने यात सगळं आलं. मुंबई महानगरपालिका ही रंगीत तालीम असेल. दोघांची युती झाली तर, मुंबई महानगरपालीकेत भाजपचा प्रवास अजूण कठीण होईल हे कोणीही सांगेल त्याला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.

आता राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना युती करतील का ? तर मला स्वतःला अशी काही युती महानगर पालिकेत जरी युती झाली तरी भविष्यात अशी युती अशी होईल असे वाटत नाही, दोघांची इच्छा असली तरी. सद्य भाजप सरकार आपल्या साम,दाम, दंड भेद या नितीचा वापर करुन या दोघा भावांना एकत्र येऊ देणार नाही हे सुर्यप्रकाशा इतके सत्य आहे. मनसे- जागा वाटप त्या त्या तालुक्यातील काम करणारे नेते कार्यकर्ते यांच्यातील दोन्ही पक्षातील मतभेद पुढे चव्हाट्यावर येतील.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे, महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात प्रभाव सोडला तर इतर जिल्ह्यात फारसा प्रभाव नाही. राज ठाकरे यांचे भाषण, विचार अगदी मार्मिक असतात. सभांना गर्दी होते पण निवडून येण्याइतकी त्यांची ताकद लागत नाही, त्याचं कारण इतर पक्षांशी जुळवून घेणे, निवडून येण्यासाठीचे प्रयत्न करणे, युती करणे, कार्यकर्त्यांची फौज बूथवर उभे करणे, निवडणूकांपूर्वी वातावरण करणे आणि इतर गोष्टीत सुरुवात जोरदार करुनही ते कायम मागे पडतात. मनसेला नाश्कातून महाराष्ट्रात इमेज बिल्ट करण्याची संधी होती पण ते झालं नाही.

भाजप विरोधात राज ठाकरे यांनी पूर्वीच्या लोकसभेत भाजप विरोधात प्रचारात मुसंडी घेतली होती. 'लाव रे तो व्हीडीयो' म्हणून त्यांच्या सभा गाजल्या होत्या. पण पुढे ते भाजपच्या गळाला लागले आणि त्यांचा भाजप विरोध कमी होत होत त्यांच्या दावनीला ते गेले. भरवशाचं राजकारण करायचं तर, एकदा आपण स्थिरास्थावर होईपर्यंत थेट भूमिका व्यवस्थेविरुद्ध घेतली पाहिजे, नेमके यांचं राजकारण अशावेळी कच खातं आणि त्यांच्या वाट्याला अपयश येतं. मनसे, भाजपाच्या अमिषाला बळी पडणार नाहीत याची गॅरंटी नाही.

सारांश, युती अवघड वाटते.

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

6 Jul 2025 - 10:49 pm | कपिलमुनी

कोणी कितीही काही म्हणले तरी याचा डायरेक्ट फटका शिंदेंना बसणार आहे आणि फायदा भाजपला..

देवाभाऊचे पत्ते फिट बसत आहेत..

मराठीच्या मुद्दा रेटून काही फायदा होणार नाही. उलट मतदार ढकलले जाणार. आणि स्वतः ची मुले मात्र इंग्रजी शाळेत पाठवतात.

चंद्रसूर्यकुमार's picture

7 Jul 2025 - 9:54 am | चंद्रसूर्यकुमार

एक गोष्ट कळत नाही.

इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही. तरीही तोंडदेखल्या ते दोन मुद्दे त्यांचे होते. मग त्यांना एका कृतीतून दोन्ही मुद्दे रेटता येतील अशी नामी संधी होती.

पूर्ण भारतात काही लाख/कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत आणि त्यापैकी काही हजार/लाख मुंबईत राहतात हे मी अगदी शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहे. २०११ मध्ये माझे ऑफिस महालक्ष्मी स्टेशनजवळ फेमस स्टुडिओच्या शेजारी होते. तिथे जायला मी रे रोड या हार्बर लाईनच्या स्थानकात उतरून १६४ नंबरची बस पकडून जायचो. रे रोड स्टेशनच्या बाजूला जी झोपडपट्टी आहे ती बांगलादेशींनी भरलेली आहे हे उघड गुपित होते. कधी आयुष्यात अंघोळ न केलेले अंगाला वास मारणारे ते घाणेरडे बांगलादेशी बसमध्ये आजूबाजूला वावरायचे त्याची किळस यायची. पण करता काही यायचे नाही. कारण माझ्यासारखे लोक मारामारी करू शकत नाहीत. पण उबाठावाल्यांचा मारामारी करण्यात पहिल्यापासूनच हातखंडा होता. मग मुंबईत जिथेजिथे बांगलादेशी आहेत तिथेतिथे जाऊन त्यांना बदड बदड बदडून मुंबई आणि देश सोडून जायला त्यांना भाग पाडायची नामी संधी त्यांच्याकडे होती. त्या बांगलादेशींना कायदेशीरपणे हाकलता येणे फारच कठीण आहे कारण त्यांनी पैसे चारून सगळी डॉक्युमेन्ट्स बनवून घेतली आहेत. त्यांना हाकलायचा एकच उपाय म्हणजे हा- उठता लाथ बसता बुक्की असे करत बदड बदड बदडायचे आणि इथे राहायलाच नको असे वाटणे भाग पाडायचे. तसेही ते लोक मराठीभाषिक नाहीत, भारतीय नाहीत आणि हिंदूही नाहीत. मग असे बांगलादेशींना बदडून उबाठासेनेचे मराठी आणि हिंदुत्व हे दोन्ही मुद्दे साध्य झाले नसते का? तसे झाले असते तर मग मी अगदी आजन्म उबाठासेना समर्थक झालो असतो. भाजपवाल्यांना मारामारी जमत नाही त्यामुळे ते काही बांगलादेशींना हाकलणार नाहीत पण उबाठावाल्यांनी हाकलले असते तर पूर्ण देशावर आणि मुंबईवर कधी न फेडता येतील असे उपकार त्यांनी करून ठेवले असते.

पण कुठचे काय- त्यांची मर्दुमकी फक्त युपीतून आलेले फेरीवाले, इस्त्रीवाले, दुकानदार वगैरे हातावर पोट असलेल्या साध्यासाध्या लोकांविरूध्दच. आणि त्यातील बरेचसे हिंदूच असावेत असे म्हणायला जागा आहे. आणि हे यांचे हिंदुत्व.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jul 2025 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही.

अजिबात लिहू नका, असे वाटते. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला. हिंदूत्ववादी संघटना म्हणूनच स्व.बाळासाहेब ठाकरें यांच्या शिवसेनेची ताकद होती. भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले. 'जेवायला ताट द्यावे, पण बसायला पाट देऊ नये' अशी म्हण आहे. ताट आणि पाट दोन्ही दिल्यामुळे भाजप डोईजड झाली. महाराष्ट्रातून हिदुत्ववादी म्हणजे आम्हीच अशी इमेज शिवसेनेची कमी होत गेली. आणि भाजपचं फावलं अर्थात हिंदुत्ववाद्यांचा आणि धर्माचा वापर केवळ मतांसाठीच उपयोग होतो. स्पेशल हिंदूमाणसासाठी रुपयाचा फायदा नाही, हे मागील लोकसभेत लोकांच्या लक्षात आलं आहेच.

बाकी चालू द्या.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

8 Jul 2025 - 10:09 am | सुबोध खरे

सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला.

मुदलात खोट आहे.

गर्व से कहो हम हिंदू है' हा नारा बाळ ठाकरेंचे बाळासाहेब होण्याच्या अगोदर पासून विश्व हिंदू परिषदेने लावलेला आहे

कोणताही क्लेम साहेबांसारखा बाळासाहेबांच्या नावावर खपवला जातो.

बाकी "तुमचं" चालू द्या

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Jul 2025 - 10:30 am | चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेची स्थापना झाली १९६६ मध्ये. बाळासाहेबांनी १९८७ पर्यंत हिंदुत्व मधील हिं पण उच्चारला नव्हता. मराठी मराठी करून फार तर मुंबईत काही नगरसेवक निवडून आणता येतील पण त्यापलीकडे जायचे असेल तर मराठी मुद्दा उपयोगाचा नाही हे लक्षात आल्यावर. १९८० च्या दशकात देशात हिंदुत्वाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. १९८२ मध्ये मदुराईला धर्मांतरे झाली त्याचे पडसाद सगळीकडे उमटले. १९८४ पासून संघ परिवाराने राममंदिर मुद्दा लावून धरायला सुरवात केली. मग शहाबानो आणि अयोध्येत कुलूप उघडणे यातून हळूहळू हिंदुत्वाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. ती वेळ हेरून मग बाळासाहेबांनी १९८७ मधील पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा हिंदुत्वाचा उच्चार केला - पक्षाची स्थापना झाल्यानंतर २१ वर्षांनंतर. तोपर्यंत मराठी हाच मुद्दा त्यांचा होता. आणि मराठी हा मुद्दा म्हणजे स्थानिय लोकाधिकार समितीचे काम होते त्यातून अनेक मराठी तरुणांना नोकऱ्या लावल्या. अन्यथा मराठी पाट्या, बेस्टची तिकिटे मराठीत छापा यापलीकडे लोकाधिकार समितीप्रमाणे फार विधायक कामे मराठी माणसांसाठी नव्हती.

म्हणजे या सेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे फारच कुचकामी होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jul 2025 - 11:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे फारच कुचकामी होते.' पण शिवसेनेचे दोन्ही मुद्दे मान्य झाले तर.

शिवसेनेने मराठी माणूस आणि मराठी विषय घेवून राजकारण केले हे तरी मान्य झालं. मराठी माणूस आणि मराठी भाषा, मराठी माणसाला रोजगार दिला यात शिवसेना होती. शिवसेनेने 'गर्व से कहो हम हिंदू'चाही नारा महाराष्ट्रात दिला. मराठी भाषा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा महाराष्ट्रात कुठे होती एवढे सांगा आता.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

8 Jul 2025 - 10:53 am | सुबोध खरे

भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले.

काय सांगताय?

भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली. आणि त्यानंतर सलग पहिल्या पाच लोकसभांमध्ये त्यांना मिळणाऱ्या जागा ३,४,१४,३५ आणि २२ अशा आहेत.

आणीबाणीत जनता पक्षात विलीन झाल्यानंतर नव्या अवतारात भाजप आला तेंव्हा १९८४ साली २, नंतर १९८९ साली ८५ आणि त्यानंतर गेली ३५ वर्षे तीन आकड्यात खासदार निवडून येत आहेत.

शिवसेनेचा पहिला खासदार १९८९ साली निवडून आला आणि केवळ १९९६ साली भाजप बरोबर युती केल्या वर शिवसेनेला ११ खासदार निवडून आणता आले. अन्यथा दोन आकड्यात खासदार नाहीत कि तीन आकड्यात आमदार काही निवडून आणता आले नाहीत.

बेडकीने किती वल्गना केल्या तरी तिचा बैल होत नाही.

तेंव्हा "तुमचं" चालु द्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jul 2025 - 11:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली त्यानंतर त्यानंतर त्यांचं इकडे तिकडे आणि तुकडे वगैरे पडले. नवा 'भारतीय जनता पार्टी' नावाचा पक्ष स्थापन व्हायला १९८० उजाडला. स्व.बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापना झाली १९६६ ला. कोणता पक्ष मोठा आहे, वयाने एवढेही कळत नसेल तर बोलणे खुंटले.

-दिलीप बिरुटे

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Jul 2025 - 11:25 am | चंद्रसूर्यकुमार

भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले.

याविषयी मिपावर यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या प्रतिसादांमध्ये लिहिले आहे. त्यातील एक तरी मुद्दा चुकीचा आहे हे सिद्ध करता येईल का?

१. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनसंघाला पूर्ण देशात ४ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी अर्ध्या- म्हणजे दोन जागा आताच्या महाराष्ट्रातून आल्या होत्या. त्या होत्या- रत्नागिरीतून प्रेमजीभाई असर आणि धुळ्यातून उत्तमराव पाटील. तेव्हा शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता. ज्या काळात काँग्रेसच्या नावावर दगडही निवडून यायचा त्या काळात एका राज्यातून दोन लोकसभेच्या जागा जिंकणे ही तितकी सोपी गोष्ट नव्हती. ती जनसंघाने केली होती.

२. १९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती?

३. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती? या जागा राज्याच्या वेगवेगळ्या भागात होत्या हे लक्षात घ्यायला हवे.

४. जनसंघाने महाराष्ट्रात १९६७ च्या निवडणुकांमध्ये ४, तर १९७२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ५ जागा जिंकल्या होत्या. भाजपची स्थापना झाल्यावर १९८० आणि १९८५ मध्ये अनुक्रमे १२ आणि १६ जागा जिंकल्या होत्या. त्याउलट शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षांच्या काळात महाराष्ट्र विधानसभेत फक्त चार आमदार निवडून आणले होते आणि ते सगळे मुंबईतूनच होते. मुंबईबाहेर त्यांची ताकद शून्य होती. ते चार आमदार होते- १९७० मध्ये परळमध्ये पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक, १९७२ मध्ये विधानसभा निवडणुकीत गिरगावमधून प्रमोद नवलकर, १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत माझगावमधून छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत पार्ल्यातून रमेश प्रभू. तुलनाच करायची झाली तर २०२२ मध्ये एकाच निवडणुकीत केजरीवालांच्या आपने दिल्लीतून येऊन गुजरातच्या वेगवेगळ्या भागात मिळून ५ जागा जिंकून दाखविल्या होत्या. आणि शिवसेनेने १७ वर्षात तब्बल चार आमदार आणि ते पण सगळे मुंबईतून.

५. १९८४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे नेते भाजपच्या कमळ या चिन्हावर लढले होते. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह १९९० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळाले. ते पण का मिळाले? तर १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विद्याधर गोखले मुंबईतून लोकसभेची जागा जिंकले- भाजपशी युती असताना. १९८९ मध्ये शिवसेनेचे इतर तीन खासदार निवडून आले होते- वामनराव महाडिक, औरंगाबादमधून मोरेश्वर सावे आणि परभणीतून अशोक देशमुख. त्यांना तर निवडणुक आयोगाने शिवसेना या पक्षाच्या नावावर निवडणुक लढूही दिली नव्हती आणि ते अपक्ष म्हणून निवडणुक लढले आणि जिंकले. १९८५ मध्ये छगन भुजबळ जिंकले ते मशाल या चिन्हावर. १९८५ च्याच महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना सगळ्या वॉर्डांमध्ये एकच चिन्ह नव्हते त्याचे कारण केंद्रीय निवडणुक आयोगाने कोणतेही चिन्ह तेव्हा शिवसेनेला दिलेच नव्हते त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठीही एकच चिन्ह शिवसेनेच्या उमेदवारांना नव्हते.

आणि असल्या पक्षाने महाराष्ट्रात भाजपला मोठे केले. घंटा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jul 2025 - 2:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्रात शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आणि मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले. १९७० पासून त्याची सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली. पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही. महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं. कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं.

भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेबांकडे युतीची भिक मागितली. स्व. बाळासाहेबांनी भाजपाला भिक द्यायच्या ऐवजी जेवणाचं ताट आणि पाट दोन्हीही दिले आणि इथेच घाताला सुरुवात झाली. दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे.

शिवसेनेने भाजपाला बोट दिलं नसतं तर महाराष्ट्रात भाजपा एव्हाना भिकेला लागला असता.

-दिलीप बिरुटे

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Jul 2025 - 2:55 pm | चंद्रसूर्यकुमार

मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले.

कोणते चार-पाच आमदार हो? कोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते?

भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली.

भाजप हाच पूर्वाश्रमीचा जनसंघ होता हे तुमच्यासारख्या झंटलमन प्रा.डॉ ना माहित नाही?

पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही.

बरं मग? आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती ३५ खासदार- १९६७ मध्ये. सुरवातीला असाच संघर्ष करत, झगडत भाजप आज आहे तितका मोठा झाला आहे. पण शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षात केवळ चार आमदार निवडून आणले होते हे माझे म्हणणे खोडून काढून दाखवा आधी.

महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं.

तसंच गुजरातमध्ये नव्हते, कर्नाटकात नव्हते, त्रिपुरात नव्हते, हरियाणात नव्हते. अनेक राज्यांमध्ये नव्हते. आज गुजरात भाजपचा बालेकिल्ला आहे. त्रिपुरात दोन विधानसभा निवडणुका सलग भाजपने जिंकल्या आहेत. कर्नाटकातही पक्षाचे सरकार पूर्वी होते. लोकसभेत राज्यात २८ पैकी २५ जागा जिंकण्यापर्यंत पक्षाने मजल मारली आहे. या सगळ्या राज्यांमध्ये भाजपने इतकी मोठी मजल मारलीच ना? मग पूर्वी कधीतरी भाजपला पोषक वातावरण नव्हते याचा नक्की काय रेलेव्हन्स आहे?

कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं.

जसं काही शिवसेनेला हत्ती-घोडेच पालख्या घेऊन आले होते विचारायला. हॅ हॅ हॅ

दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे.

हे टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले. १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या २ जागांवरून ८६ जागांपर्यंत मोठी उडी मारली होती. तेव्हा महाराष्ट्राबाहेर कोणते बाळासाहेब मदतीला होते? त्या काळात रामजन्मभूमी आंदोलन तापले आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. बरं १९९० मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाली त्याचवेळेस गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातही विधानसभा निवडणुक झाली होती. इतर राज्यांमध्ये भाजप पूर्वीच्या तुलनेत कुठे गेला हे माहित आहे का? गुजरातमध्ये ११ वरून ६७, मध्य प्रदेशात ५८ वरून २२०, राजस्थानात ३९ वरून ८५ तर हिमाचल प्रदेशात ७ वरून ४६. त्या राज्यांमध्ये कोणते बाळासाहेब मदतीला आले होते? १९९० मध्ये महाराष्ट्रात भाजपने २८८ पैकी ११४ जागाच लढविल्या म्हणून ४२च निवडून आल्या. शिवसेनेला १७४ जागा द्यायची अवदसा आठवली नसती तर स्वबळावर ७० पर्यंत जागा तेव्हाच भाजपच्या आल्या असत्या असा माझा दावा आहे. कारण इतर राज्यांमध्ये भाजपने तशीच मोठी उडी मारली होती. ती महाराष्ट्रात मारता आली नसती असे म्हणायला काहीही कारण नाही. तरीही तुमचा मुद्दा असेल की शिवसेना बरोबर होती म्हणून भाजप १६ वरून ४२ वर गेला तर मग त्यावर माझे काऊंटर आर्ग्युमेंट हे की भाजप बरोबर असल्यामुळे शिवसेना २ (१९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत जिंकलेले छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत जिंकलेले रमेश प्रभू) वरून ५२ वर गेला.

जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका. नाही झेपायचे तुम्हाला. तुम्ही आपले कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय वगैरे विषयांमध्ये रमता तेच ठीक आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jul 2025 - 4:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरेरे, आवरा.

>>>> आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती.

विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे..

>>> टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले.

शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात.

>>>> १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या....

पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे.

>>> जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका.

=)) गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही.

स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं बोट धरुन भाजप कसा मोठा होत गेला त्याची आठवण म्हणून सांगावे लागले.

-दिलीप बिरुटे

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Jul 2025 - 4:27 pm | चंद्रसूर्यकुमार

विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे..

कसं आहे-महाराष्ट्रात काय झाले याची आकडेवारी वरील प्रतिसादात दिली होती ती तुम्हाला समजली नसावी म्हणून मग इतर राज्यातील आणि लोकसभेतीलही द्यावी लागली.

शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात.

या म्हणण्यात थोडेही तथ्य नाही हा माझा मुद्दा मी अनेकवेळा मांडला आहे. परत मांडणार नाही.

पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे.

घंटा

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही.

ते आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते. बाकी माझ्या शाब्दिक पोचार्‍यांच्या चर्चा वाचत नसाल तर मग प्रतिसाद द्यायला का येता? याचा अर्थ एक तर तुम्ही खोटं बोलत आहात- म्हणजे तुम्ही ज्याला शाब्दिक पोचारे म्हणता ते वाचता इतकेच नव्हे तर त्याच पोचार्‍यांमधील एकेक वाक्य उधृत करून त्याला प्रतिसादही देता. तसे असेल तर मग वाचत नाही असे खोटे का बोलता? तुमच्या विद्यार्थ्यांना पण असेच खोटे बोलायला शिकवता का? समजा तुम्ही खोटं बोलत नसाल- म्हणजे माझे शाब्दिक पोचरे वाचत असाल तरीही वाचत नाही असे लिहित असाल तर मग कदाचित तुमची मराठी भाषेची समजच कमी असावी. कोणी दिली तुम्हाला मराठीत पी.एच.डी?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jul 2025 - 4:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं बोट धरुन भाजप कसा मोठा होत गेला त्याची आठवण म्हणून सांगावे लागले.

मराठी वाचता येत नाही वाटतं.

>>>>आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते.
म्हणूनच शाब्दिक पोचारे म्हणालो. =))

बाकी, चालू दया... =))

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

8 Jul 2025 - 7:10 pm | सुबोध खरे

@ चंद्रसूर्यकुमार

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागतंय याच चालीवर आता

कुठे त्या बिरुटे मास्तरांच्या नादाला लागताय? असे म्हणण्याची वेळ त्यांनी आणली आहे.

बहिऱ्या माणसाला जोरात ओरडून बोलल्यास समजते किंवा ओठाच्या हालचालीने तो समजून घेतो.

पण बधिरपणाचा आव आणणाऱ्याला तुम्ही कानाशी बोम्बल्या (लाऊडस्पिकर) लावलात तरी ऐकू येणारच नाही.

तेंव्हा सोडून द्या.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Jul 2025 - 7:19 pm | चंद्रसूर्यकुमार

बहुतेक वेळा तेच करतो पण माझ्याच प्रतिसादाला उत्तर द्यायला आले तर कधीकधी दखल घ्यावी लागते.

शिवसेनेची स्थापना झाल्यापासून पहिल्या चार-पाच वर्षांत नक्की कोणते ४-५ आमदार आणि कोणत्या मतदारसंघातून निवडून आणले होते हे त्यांनी चुकूनमाकून लिहिले तर पुढचे बघू. अर्थात ते त्यांना लिहिता येणार नाहीच कारण मुळात तसे कोणीही आमदार निवडून गेलेच नव्हते. आणि कोणती कोणती काल्पनिक नावे पुढे आणली तर मग निवडणुक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील नावे त्यांच्या तोंडावर फेकून मारून त्या थापा आहेत हे जगजाहीर करायला मला तो प्रतिसाद लिहायला लागेल तितकाच वेळ लागेल :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jul 2025 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिवसेनेची स्थापना १९६६ ला झाल्यावर महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेला शिवसेनेचा पहिला ढाण्या वाघ होता वामन महाडिक १९६९-७० पोटनिवडणुकीत एवढ्यात विसरले का ?

भाजपचा महाराष्ट्रात जन्मही झाला नव्हता.. आपल्या शाब्दिक पोचा-यांवर भरवसा तसा नाहीच म्हणून लिहिते राहावे लागते.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jul 2025 - 8:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिल्या पाच सहा वर्षाच्या आत शिवसेने वामन महाडिक आणि प्रमोद नवलकर दोन आमदार दिले. आता चार कुठे दिले त्या शब्दावर आडून राहा.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर यूती केली म्हणून भाजपच्या आमदारांची संख्या वाढली. ओसरी दिली नसती तर, भाजप कधीच शिरजोर झाला नसता.

-दिलीप बिरुटे

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Jul 2025 - 9:18 pm | चंद्रसूर्यकुमार

अहो वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर ही नावे मीच वर दिली आहेत. तीच वाचून परत मलाच काय देताय? की स्वतःचे विश्लेषण काहीही न करता ढापाढापी करायची सवय आहे ? तुम्हाला निवडणुकांच्या इतिहासातील घंटा काहीही माहिती नाही तर मग ती झाकली मूठ ठेवावी हो. आपले अज्ञान असे जगजाहीर का करत आहात? आणि परत परत तेच तेच पालुपद -बाठांमुळे भाजप वाढला चालू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये त्या काळात भाजप वाढला तसाच तो महाराष्ट्रातही वाढतच होता. उलट शिवसेनेशी युती करायची चूक केल्यामुळे वाढीला मर्यादा आल्या.

बाकी तुम्ही माझे शाब्दिक पोचारे वाचत नाही नाही असे म्हणत बरेच वाचता की. मग खुलेपणाने कबुल करा की. बाळासाहेब दिलदार होते ना? की उध्दवसारखा कुचकटपणा आणि खत्रुडपणा तुम्हाला अधिक भावतो?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jul 2025 - 10:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिवसेनेबद्दल जालावर ढिगभर माहिती पडलेली आहे, आपले 'शाब्दिक पोचारे' म्हणजे काही जगातलं पहिलं ज्ञान नसतं, नाही. आपल्याकड़े असलेली माहिती मिळवलेलीच असते. असलेल्या माहितीवर विश्लेषण व्यक्तिगणिक चूक बरोबर असते. आपण काही त्या काळातील प्रत्यक्ष साक्षीदार नसतो. आपले काही विशेष संशोधनही नसते.

महाराष्ट्र आणि देशातील राजकारणावर सर्व माहिती सर्वांना उपलब्ध आहे, राजकारणातील आपल्यालाच फार कळते,असेही अजिबात समजू नका. उन्नीस बीस सगळेच जाणते असतात. आपल्या सारखे भक्त सगळीकडेच असे उथळ माथळ करीत असतात त्यामुळे उगा आपल्याला राजकारणातली फार समजते असेही समजू नये असे वाटते.

बाकी, लोकसभेच्या विश्लेषणात आपलं राजकारण आणि विश्लेषणातील घण्टागाडी उलथी-पालथी पाहिलेली आहे, तेव्हा उगाच शेखी मिरवू नका. =))

थेट, निर्भीड दिलादार स्व. बाळासाहेब कायम आवडले.

-दिलीप बिरुटे